Back
कोल्हापूर, सोलापूर, सांगली में तुल्यबळ मुकाबला: शक्ति-फेर की तैयारी
PNPratap Naik1
Jan 09, 2026 09:20:00
Kolhapur, Maharashtra
कोल्हापूर महानगरपालिका प्रमुख तुल्यबळ लढती.
1) प्रभाग क्रमांक 9 मध्ये सर्वसाधारण गटातून शिवसेनेचे शारंगधर देशमुख विरुद्ध राहुल माने अशी काटाजोड लढत होत आहे. शारंगधर देशमुख हे काँग्रेस नेते सतेज पाटील यांचे निकटवर्ती होते. महानगरपालिकेत काँग्रेस गटनेता म्हणून देखील त्यांनी काम पाहिले होते. पण विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी शिवसेनेत पक्ष प्रवेश केला. त्यामुळे काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी शारंगधर देशमुख याचा पराभव करण्यासाठी राहुल माने यांच्या रूपाने तुल्यबळ उमेदवार दिला आहे.
2) प्रभाग क्रमांक चार मध्ये सर्वसाधारण गटामधून काँग्रेस उमेदवार राजेश लाटकर विरुद्ध भाजपा उमेदवार संजय निकम यांच्यामध्ये काटाजोड लढत होत आहे. राजेश लाटकर यांनी कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होते. लाटकर हे काँग्रेसचे महत्त्वाचे नेते मानले जातात.
3) प्रभाग क्रमांक 12 मध्ये सर्वसाधारण गटातून राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आणि मंत्री हसन मुश्रीफ याचे निकटवर्तीय आदिल फरास निवडणूक रिंगणात आहेत. त्यांच्या विरोधात काँग्रेसचे उमेदवार ईश्वर परमार उभे आहेत. या प्रभागात अंबाबाई मंदिर परिसर येत असल्याने या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे
4) प्रभाग क्रमांक 7 मधून सर्वसाधारण गटातून शिवसेना आमदार राजेश क्षीरसागर यांचे चिरंजीव ऋतुराज क्षीरसागर हे निवडणूक रिंगणात आहेत. त्यांच्या विरोधात अपक्ष उमेदवार विजय साळुंखे सरदार आणि शिवसेना ठाकरे गटाचे राजेंद्र जाधव निवडणूक रिंगणात आव्हान दिले आहे.
5) प्रभाग क्रमांक 19 मध्ये मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांचे निकटवर्ती राहुल चिकोडे हे भाजपाकडून निवडणूक रिंगणात आहेत. अनुसूचित जाती प्रवर्गातून ते निवडणूक लढवत आहेत. भाजपाचे शहराध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. त्यांच्या विरोधात भाजपा बंडखोर सुभाष रामगुडे यांनी जनसुराज्य पक्षाकडून निवडणूक लढवत आव्हान दिले आहे. काँग्रेसकडून दुर्वास कदम निवडणूक लढवत आहेत.
*सोलापूर महानगरपालिका तुल्यबळ लढती*
1) प्रभाग - 5 - ड - भाजपचे बिज्जू प्रधाने विरुद्ध राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे गणेश पुजारी, अपक्ष राजू आलूरे
कारण - भाजपाकडून नुकत्याच प्रवेश केलेल्या उमेदवाराला संधी, भाजपातील नाराज बंडखोरांनी घेतली अपक्ष उमيدवारी
2) प्रभाग - 7 - ड - भाजपाचे पद्माकर काळे विरुद्ध शिंदे सेनेचे अमोल शिंदे
कारण - नवीन प्रवेश करून तिकीट दिल्याने भाजपा अंतर्गत नाराजी... शिवसेना जिल्हाप्रमुखाची प्रतिष्ठा पणाला
3) प्रभाग - 15 - ड - काँग्रेसचे चेतन नरोटे विरुद्ध भाजपचे अंबादास करगुळे
कारण - चेतन नरोटे हे काँग्रेसचे शहराध्यक्ष आहेत, त्यांच्या प्रतिस्पर्धी नुकताच प्रवेश झालेले त्यांचे सहकारी भाजपातून लढत आहेत.
4) प्रभाग - 15 - क - भाजपाचे विनोद भोसले विरुद्ध काँग्रेसचे आरिफ शेख
कारण - काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून विनोद भोसले यांची ओळख होती मात्र ते आता भाजपाकडून निवडणुकीला सामोरे जात आहेत
5) प्रभाग - 20 - ड - राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे तोफिक शेख विरुद्ध भाजपचे अमीर शेख
कारण - प्रभाग 20 हा मुस्लिम बहुल परिसर आहे. इतिहासात पहिल्यांदाच भाजपाने या प्रभागात मुस्लिम उमेदवार दिले आहेत.
सांगली महानगरपालिकेतील तुल्यबळ लढती.
1 ) सांगलीच्या प्रभाग 11 मध्ये माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे पणतू खासदार विशाल पाटील यांचे पुतणे हर्षवर्धन पाटील आणि भाजपाचे माजी नगरसेवक मनोज सरगर यांच्या लढत होणार आहे.
( तुल्यबळ का ? - मनोज सरगर हे विशाल पाटलांचे कट्टर समर्थक होते,त्यांनी विशाल पाटलांची साथ सोडून भाजपमध्ये प्रवेश केला,त्यामुळे त्यांच्या विरोधात विशाल पाटलांनी पुतण्याला उमेदवारीच्या रिंगणात उतरवले आहे.)
2 ) सांगलीच्या प्रभाग 14 भाजपाचे विजय साळुंखे व माजी उपमहापौर शिवसेना शिंदे गटाचे युवराज बावडेकर यांच्यात प्रमुख लढत होणार आहे.
तुल्यबळ का ? - माजी उपमहापौर असणारे युवराज बावडेकर यांना भाजपाने उमेदवारी नाकारली आहे,या ठिकाणी नवखे असणारे विजय साळुंखे यांना उमेदवारी देण्यात आली आहे,त्यामुळे बावडेकर यांनी बंडखोरी केली करत शिवसेना शिंदे गटात प्रवेश करत निवडणूक लढवत असून याठिकाणी दुरंगी अशी एकास-एक लढत होत आहे.
3 ) सांगलीच्या प्रभाग 15 मध्ये काँग्रेसचे माजी नगरसेवक मंगेश चव्हाण व भाजपाचे हणमंत पवार.
( तुल्यबळ का ? - काँग्रेस उमेदवारा विरुद्ध काँग्रेस उमेदवार ,माजी नगरसेवक मंगेश चव्हाण यांच्या विरोधात काँग्रेसचेच माजी नगरसेवक राहिलेले हणमंत पवार हे भाजपा कडून मैदानात आहेत.)
4 ) मिरजेमध्ये प्रभाग 20 मध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार इद्रिस नायकवडी यांचे पुत्र अतहर नायकवडी व भाजपाचे योगेंद्र थोरात आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अभिजीत हारगे यांच्यात लढत होत आहे.
(.तुल्यबळ का ? आमदार पुत्र या निवडणुकीच्या रिंगणात आहेत शिवाय जयंत पाटलांचे ते विरोधक आहेत. तिघेही माजी नगरसेवक आहे, आणि तिघेही पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे आहेत.)
5 ) मिरजेच्या प्रभाग 6 मध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी महापौर मैनुद्दीन बागवान विरुद्ध भाजपाचे अल्लाबक्ष गडेकरी
आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे समीर कुपवाडे यांच्यात लढत होत आहे.
( तुल्यबळ का ? म्हणून बागवान हे राष्ट्रवादी शरद पवार गटातून ऐनवेळी अजित पवार गटात आलेत, त्यांच्या उमेदवारीला स्थानिक पातळीवर विरोध झाला होता. बागवान यांच्या उमेदवारीवर निवडणूक आयोगाकडे भाजपाने आक्षेप नोंदवला होता. पण निवडणूक आयोगाने आक्षेप फेटाळले. या प्रभागामध्ये मेनूदिन बागवान यांना पक्षांतर्गत देखील मोठा विरोध आहे,शिवाय राष्ट्रवादी शरद पवार गटाचा उमेदवार त्यांच्या विरोधात आहे)
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PNPratap Naik1
FollowMar 04, 2026 04:02:110
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowMar 04, 2026 04:01:590
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowMar 04, 2026 04:01:190
Report
SMSATISH MOHITE
FollowMar 04, 2026 04:01:020
Report
AKAMAR KANE
FollowMar 04, 2026 04:00:430
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowMar 04, 2026 04:00:280
Report
AKAMAR KANE
FollowMar 04, 2026 03:46:010
Report
TTTUSHAR TAPASE
FollowMar 04, 2026 03:45:420
Report
SRSHRIKANT RAUT
FollowMar 04, 2026 03:45:270
Report
SKSudarshan Khillare
FollowMar 04, 2026 03:45:130
Report
MAMILIND ANDE
FollowMar 04, 2026 03:32:440
Report
TTTUSHAR TAPASE
FollowMar 04, 2026 03:32:210
Report
SGSagar Gaikwad
FollowMar 04, 2026 03:32:050
Report
DPdnyaneshwar patange
FollowMar 04, 2026 03:31:380
Report
LBLAILESH BARGAJE
FollowMar 04, 2026 03:31:230
Report
