Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Jalna431213
रोहित पवार की सुरक्षा पर महाराष्ट्र में सियासी हलचल
NMNITESH MAHAJAN
Feb 20, 2026 07:45:43
Jalna, Maharashtra
छत्रपती संभाजीनगर | संजय शिरसाट PC ऑन दादांच्या अपघाताचा प्राथमिक अहवाल 28 तारखेपूर्वी येणार - अजित दादांचा दुर्दैवी अपघात झाला आहे याची माहिती 28 तारखेंत येण्याची शक्यता आहे. - अपघाती घात यासंदर्भात तो जो अहवाल येईल त्यानंतर भाष्य करण योग्य राहील. - अनेकांनी अनेक आरोप केले आहेत अनेकांच्या अनेक शंका आहेत, या संकेचे निरसन तो अहवाल प्राप्त झाल्यानंतरच होईल. ऑन रोहित पवारांना सुरक्षा दया - सुळे - रोहित पवार यांच्या जीवितवाला धोका असेल तर त्यांनी सुद्धा मागणी केली पाहिजे परंतु ही मागणी मान्य करण्यासाठी शासनातर्फे कमिटी नियुक्ती केलेली असते ती कमिटी त्यावर निर्णय घेते. - त्यांच्या यंत्रणेमार्फत जर त्यांना असं वाटलं त्यांच्या जीवाला धोका आहे तर निश्चित त्यांना हे संरक्षण दिलं जाईल. - हे संरक्षण देण्यामध्ये कुणाचाही काही विरोध असण्याचे कारण नाही. ऑन महाराष्ट्रातील लोकांनी गुजरात मध्ये जाऊन व्यवसाय करावी - गणेश नाईक - गणेश नाईकाचा नेमकं काय चाललंय तेच कळत नाही, कोणत्या खात्याचे मंत्री आहेत हे माहीत नाहीत, खात्याच्या संदर्भात एखादं चांगलं विधान कधी त्यांच्याकडून ऐकलं नाही. - कधी ते मुंबईवर बोलतात कधी ठाण्यावर बोलतात आणखी काही भ्रष्टाचारावर बोलतात आता ते गुजरातवर बोलायला लागलेत. - एक दिवस हे गणेश नाईक या भाजप सरकारला जरूर अडचणीत आणेल. ऑन भिवंडी महापौर पदासाठी भाजपा तर उपमहापौर पदासाठी काँग्रेसच्या उमेदवाराला मतदान करा - काँग्रेसचे अध्यक्ष - हे आदेश कुणी काढलेत स्थानिक राजकारण काय आहे याबद्दल सखोल माहिती नसल्यामुळे लोकल राजकारणात एक ट्विस्ट यायला लागला आहे याला कारण काय आहेत हे शोधावे लागेल. - आता कोण कोणाशी युती करेल सध्याच्या राजकारणात काही मेळ राहिला नाही, कधी काय घडेल ते सांगता येत नाही. ऑन शरद पवार मवीआचे उमेदवार म्हणून राज्यसभेवर? - पवार साहेब आता राज्यसेवेवर जाण्यासाठी त्यांच्याकडे असलेल्या संख्यांना काँग्रेसने आणि उबाटाचा पाठिंबा असेल तर निश्चित ते राज्यसभेवर जातील, - आता त्यांनी जावं की न जावं हा त्यांच्या पक्षातील अंतर्गत प्रश्न आहे म्हणून त्यावर आम्ही भाष्य करणे योग्य नाही. ऑन सोलापूरमध्ये महिला अधिकारीवर गाडी घालण्याचा प्रयत्न - गुटख्याचा धंदा करणारे हे जे लोक आहेत ते सगळ्यात खतरनाक लोक आहेत, खऱ्या अर्थाने ते गुंडगिरी सांभाळतात, पोचतात हे दोन नंबरचे धंदेवाले माफिया आहेत. - असे लोक कुणाच्याही जीवाची परवा करत नाहीत वाळू माफिया तसेच आहेत ड्रग्ज माफीया तसेच आहेत. - आता यांच्यावर प्रत्येक वेळेला मोकासारखी कारवाई सरकारने केली पाहिजे. ऑन राज्यसभेसाठी ठाकरे शिवसेनेकडून मोर्चे बांधणी? - शरद पवारांनी जावा की न जावं यावर काँग्रेस आणि उबाटाच्या मताची किती गरज आहे पहावं लागेल. - आता जर उबाटा स्वतःच उमेदवार उभा करत असेल तर त्यांच्याकडे असलेल्या संख्या व त्यांना काही आवश्यकता आहे की नाही ही सगळी वजाबाकी बेरीज पूर्ण होत नाही तोपर्यंत उमेदवार कोण असेल. ऑन संख्याबळानुसार राज्यसभेत जागा आमची - आदित्य ठाकरे - ती गेल्या वेळेला होती मात्र आताच त्यांचं संख्या पाहिलं तर त्यांना आता इतरांचा पाठिंबा घेण्याची आवश्यकता आहे, जर घेतला नाही तर स्वबळावर जागा येण्याची शक्यता कमी आहे. EVM हॅक करण्यासाठी भारतीय जनता पार्टीने 25 ते 30 लाख दिले - सुनील शेळके - निवडणूक झाल्यानंतर प्रत्येक पक्षाचा पराभूत जो असतो तो, EVM वर, पैसे वाटण्यावर, दादागिरीवर अशा गोष्टीवर भर देऊन ही निवडणुuket कशी चुकी झाली हे सांगण्याचा प्रयत्न करतो असतो. - परंतु एकदा निवडणुका झाल्यानंतर तुम्हाला जो कायदेशीर मार्ग आहे तो मार्ग आहे कोर्ट कोर्टात जाऊन या संदर्भात पुरावे दिले तर खऱ्या अर्थाने तुम्हाला न्याय मिळेल. - बोलणे आणि काही काळानंतर गप्प बसणे हा जो प्रॅक्टिस चा भाग झाला आहे त्याला काही काळानंतर राजकारणात महत्त्व उरलेलं नाही. ऑन रोहित पवारांनी अपघाताचा राजकारण करू नये - विखे पाटील - विखे पाटलांनी रोहित पवार यांच्यावर केलेली टीका ती वैयक्तिक टीका आहे. - परंतु अजित दादा गेल्याचं दुःख असताना एकमेकांवर टीका करणे योग्य नाही. ऑन मंत्री झिरवळ यांचे खाजगी सचिव कार्यमुक्त - मंत्रालयात असे अनेक अधिकारी आहेत अनेक अधिकाऱ्यांची चर्चा होत असते, - वर्ष दोन वर्ष मंदिरात बसून आम्ही राज्यकारभार करतो असे अधिकाऱ्याची भावना झाली आहे. - म्हणून हे सगळे भ्रष्टाचाराचे प्रकरण समोर येत चालले आहेत. - मुख्यमंत्री साहेबांनी निश्चित याची दखल घेतल्या असेल ज्यांना अनेक वर्ष मंत्रालयात झाले आहेत त्या सर्वांना मंत्रालयाच्या बाहेर जोपर्यंत काढत नाहीत तोपर्यंत ही जी काही लागलेली कीड आहे थांबणार नाही. - मला वाटतं या अधिवेशनात या सगळ्या लास्कोर प्रकरणात सुद्धा चर्चा होईल मंत्रालयातील अधिकाऱ्यावर सुद्धा चर्चा होईल. ऑन अमोल कोल्हे यांच्या व्याख्यानाला विरोध - असं व्याख्यान करायला कुणाला विरोध करणे योग्य नाही, शिवाजी महाराजांवर कोणताही वक्ता बोलत असेल तर कोणत्या पार्टीचा पक्षाचा न पाहता कोणत्या जातीचा न पाहता, - जर तो शिवचरित्रावर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर महात्मा फुले वर कोणत्याही महापुरुषावर व्याख्यान देत असेल तर त्याचा स्वागत केले पाहिजे. ऑन विल्लीकरानंतर अमोल कोल्हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष झाले असते - रोहित पवार - मला वाटतं यात जर चर्चा ला आता काही अर्थ नाही, आता विलीनीकरण होतं का नाही ते पाहावं लागेल, - विलनीकरण प्रक्रिया आता धुसर झाल्यासारखं वाटत आहे. आता विलनीकरण होणार नाही असं एकंदरीत चित्र आहे
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
SKSudarshan Khillare
Feb 20, 2026 09:05:09
Niphad, Maharashtra:नाशिकच्या निफाड तालुक्यातील प्रसिद्ध व राम सर दर्जा प्राप्त असलेले नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्यात ४० वर्धापन दिनानिमित्त वन्यजीव विभागाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या वनदर्शिकेचे प्रकाशन राज्याचे अन्न, नागरी, पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले येवला येथील भुजबळ संपर्क कार्यालयात वन्यजीव विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा प्रकाशन सोहळा पार पडला यावेळी एक मार्च रोजी होणाऱ्या अभयारण्याच्या ४० व्या वर्धापन दिन कार्यक्रमाचे निमंत्रणही मंत्री छगन भुजबळ यांना देण्यात आले वनदर्शिकेमध्ये देशी व विदेशी तसेच विविध रंगीबेरंगी पक्ष्यांची आकर्षक छायाचित्रे समाविष्ट करण्यात आली आहेत ही छायाचित्रे पाहून मंत्री छगन भुजबळ यांनी अभयारण्याच्या जैवविविधतेचे कौतुक करत पक्षी संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित केले नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्य हे स्थलांतरित पक्ष्यांचे महत्त्वाचे अधिवास असून पर्यावरण संवर्धन आणि जैवविविधतेच्या दृष्टीने राज्यातील एक प्रमुख अभयारण्य म्हणून ओळखले जाते
0
comment0
Report
DPdnyaneshwar patange
Feb 20, 2026 08:33:21
Dharashiv, Maharashtra:शिवसेनेचा सत्ता स्थापनेचा प्रस्ताव राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने स्पष्टपणे फेटाळला आहे. धाराशिव जिल्हा परिषदेत सत्तेच्या समीकरणांवर मोठी घडामोड घडली आहे. आमिषाला थारा नसल्याची ठाम भूमिका राष्ट्रवादीने घेतली आहे. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष तथा नवनियुक्त जिल्हा परिषद सदस्य महेंद्र धुरगुडे यांनी महायुतीसोबतच राहणार असल्याचे जाहीर केले. निवडणुकीपूर्वी महायुती होती आणि पुढेही असणार असल्याचे त्यांनी सांगितले. अध्यक्षपदाच्या ऑफरवर संभ्रम नको म्हणून धुरगुडे यांनी व्हिडिओ जारी केला. दरम्यान, राष्ट्रवादी सदस्यांनी शिवसेनेकडे यावे, असे आवाहन शिवसेनेचे प्रवक्ते योगेश केदार यांनी केले आहे. राष्ट्रवादीला मिळालेल्या ६ जागांमुळे सत्तेच्या गणितात त्यांची भूमिका निर्णायक ठरत आहे.
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Feb 20, 2026 08:32:13
Chandrapur, Maharashtra:Feed slug :--- 2002ZT_CHP_TEACHER_ARREST ( single file sent on 2C) टायटल:-- चंद्रपूर शहरातील सिटी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या एका शाळेच्या विद्यार्थिनींचा शिक्षकाकडून विनयभंग, गोवर्धन गोंडाने (50) नामक शिक्षकाला पोलिसांनी केली अटक अँकर:--चंद्रपूर शहरातील सिटी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या एका शाळेच्या विद्यार्थिनींचा शिक्षकाकडून विनयभंग झाल्याचा प्रकार पुढे आला आहे . गोवर्धन गोंडाने (50) असं आरोपी शिक्षकाचं नाव असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी शिक्षकाकडून अश्लील वर्तन आणि बॅड टच होत असल्याची तक्रार पोलिसांना मिळाली होती. त्या आधारे महिला व बालकल्याण समितीने शाळेतील विद्यार्थिनींचे बयान नोंदवले. आरोपी शिक्षकाविरोधात पॉक्सो च्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे सध्या पाच ते सहा विद्यार्थिनींनी अशा प्रकारची तक्रार दिली असून या प्रकरणात पुढील तपास सुरू आहे. बाईट १) पालक आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर
0
comment0
Report
SNSWATI NAIK
Feb 20, 2026 08:03:56
0
comment0
Report
KJKunal Jamdade
Feb 20, 2026 08:03:41
Shirdi, Maharashtra: अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील एका गावातील १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचं अपहरण करून तिला तब्बल पाच दिवस जंगलात ठेवत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे...या प्रकरणाला आता ‘लव्ह जिहाद’चा अँगल जोडला जात असून राजकीय वातावरणही तापलं आहे... राहुरी पोलिसांनी मोठी कारवाई करत नाशिक–सुरत रोडलगत रामशेज किल्ला परिसरातील जंगलातून मुलीची सुटका केली आहे... मुख्य आरोपीसह तिघांना अटक करण्यात आली आहे...१३ फेब्रुवारी रोजी कॉलेजला जाते असं सांगून घराबाहेर पडलेली १५ वर्षीय मुलगी परतलीच नाही… पालकांनी तात्काळ राहुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली...वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तांत्रिक विश्लेषण, मोबाईल लोकेशन ट्रॅकिंग आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी तपासाची सूत्रं वेगाने हलवली…आणि अखेर जंगल परिसरातून मुलीची सुटका करण्यात यश मिळालं... या प्रकरणात मुख्य आरोपी मुक्तार हैदर पठाण , कौसर हैदर पठाण , आकाश शरद संसारे यांना पोलिसांनी अटक केली आहे...मुख्य आरोपीवर अपहरण आणि लैंगिक अत्याचाराचे गंभीर आरोप ठेवण्यात आले आहेत....पीडितेच्या जबाबानुसार पॉक्सो आणि लैंगिक अत्याचाराची कलमे लावण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे...या घटनेच्या निषेधार्थ संबंधित मुलीच्या गावात बंद ठेवण्यात आला होता.
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Feb 20, 2026 07:55:14
Jalna, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर: मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचा ऐतिहासिक निर्णय; मुलीच्या नावामागील वडिलांचे नाव आणि जात हटवण्याचे आदेश या निर्णयानुसार अल्पवयीन मुलीच्या शालेय नोंदणीतून वडिलांचे नाव आणि त्यांची जात वगळण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. हे प्रकरण एका अल्पवयीन मुलीशी संबंधित आहे. संबंधित मुलीची प्रत्यक्ष देखभाल आई करत असताना शाळेच्या दाखल्यात वडिलांचे नाव आणि त्यांची जात “मराठा” अशी नोंद करण्यात आली होती. याविरोधात आईने न्यायालयात याचिका दाखल करत वडिलांचे नाव वगळावे आणि मुलीची जात आईच्या “महार” (अनुसूचित जाती) प्रमाणे दुरुस्त करावी, अशी मागणी केली होती. याचिकेवरील सुनावणीदरम्यान न्यायालयाने स्पष्ट शब्दांत नमूद केले की, मुलाची ओळख केवळ पितृसत्तात्मक परंपरेवर अवलंबून राहू शकत नाही. भारतीय संविधानात समानता, सन्मान आणि वैयक्तिक स्वातंत्र्याला प्राधान्य देण्यात आले आहे. न्यायालयाने आदेश देताना स्पष्ट संदेश दिला की, एकल मातांना पूर्ण पालकत्वाचा अधिकार देणे हे कुठलेही ‘दान’ नसून तो त्यांच्या संवैधानिक हक्क आहे. पितृसत्तात्मक अडथळे, वंशपरंपरा आणि जातीचे बंधन यापेक्षा मुलाच्या सन्मानाचा आणि ओळखीच्या अधिकाराचा विचार अग्रक्रमाने झाला पाहिजे, असेही न्यायालयाने नमूद केले. या निर्णयामुळे एकल मातांच्या आणि त्यांच्या मुलांच्या ओळखीच्या हक्कासाठी महत्त्वाचा टप्पा गाठला गेला असून, समाजव्यवस्थेत सकारात्मक बदलाची दिशा या निकालातून अधोरेखित झाली आहे.
0
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Feb 20, 2026 07:05:19
Amravati, Maharashtra:अमरावती महानगर पालिकेच्या पहिल्याच आमसभेत सभागृहातील बत्ती गुल; बंद माईकवर पार पडला आयुक्तांच्या अभिनंदनचा ठराव. तब्बल आठ वर्षानंतर अमरावती महापालिकेत आज पहिल्यांदा महापालिकेची आमसभा पार पडत आहे. अशातच अमरावती महानगर पालिकेच्या पहिल्याच आमसभेत काही वेळासाठी सभागृहातील बत्ती गुल झाल्याने मोठ्या प्रमाणात नगरसेवकांमध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळत आहे. महानगरपालिकेत पालिका आयुक्तांच्या अभिनंदनाचा ठराव सुरू असताना अचानक बत्ती गुल झाल्याने नगरसेवकांनी बंद माईकवर अभिनंदनचा ठराव वाचून दाखवला आहे. त्यामुळे नगरसेवकांना काही वेळासाठी बंद माईक वर बोलावं लागल्याचं दिसून आले आहे.
0
comment0
Report
KJKunal Jamdade
Feb 20, 2026 07:04:18
Shirdi, Maharashtra:अहिल्यानगर जिले के राहوري तालुक़े के एक गाँव में 15 वर्षीय नाबालिग लड़की का अपहरण करके उसे पाँच दिनों तक जंगल में रहने के दौरान लैंगिक अत्याचार के मामले सामane आया है। इस प्रकरण को अब ‘लव जिहाद’ के एंगल से भी जोड़ा जा रहा है और राजनीतिक वातावरण भी गर्म है। राहुरी पुलिस ने रामशेज किल्ला परिसर के जंगल से लड़की को सुरक्षित बचाया है तथा मुख्य आरोपी समेत तीन को गिरफ्तार किया गया है। 13 फ़रवरी को कॉलेज जाने के बहाने घर से निकली लड़की वापस नहीं आई—पड़ोसियों ने इसकी शिकायत राहुरी थाना में दर्ज करवाई। वरिष्ठ अधिकारियों के मार्गदर्शन में तकनीकी विश्लेषण, मोबाइल लोकेशन ट्रैकिंग और गोपनीय जानकारी के आधार पर जांच तेज की गई और अंततः जंगल से लड़की को छुड़ाया जा सका। इस मामले में मुख्य आरोपी मुक्तार हैदर पठाण, कौसर हैदर पठाण और आकाश शरद संसारे पर अपहरण और लैंगिक अत्याचार के गंभीर आरोप लगाए गए हैं। पीड़िता के बयान के अनुसार पॉक्सो कानून और लैंगिक अत्याचार की धाराएं लगाई गई हैं और आगे की जांच चल रही है। घटना के विरोध में संबंधित गाँव में बंद रखने की जानकारी भी मिली है। बाईट- संजय ठेंगे, पुलिस निरीक्षक
0
comment0
Report
AKAMAR KANE
Feb 20, 2026 06:33:40
Nagpur, Maharashtra:नागपूर चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री. नागपूर विभागीय क्रीडा स्पर्धा... राज्यस्तरीय स्पर्धा होण्यापूर्वी विभागीय स्तर क्रीडा होत असतात, ज्या अधिकाऱ्यांनी आपल्या बाल वयात शिकलेले खेळ अजून विसरलेले नाही, वेगवेगळ्या खेळांची स्पर्धा या ठिकाणी आयोजित केली आहे. विभागीय क्रीडा स्पर्धा झाल्यानंतर राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा होणार आहे. म्हसोबाच्या ताणतळा सोबतच आणि महसूल विभागाच्या कामातही प्राविण्य मिळवला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार महाराष्ट्रात पुढील तीन महिन्यात छत्रपती शिवाजी महाराज महाराज राजस्व अभियान राबवलं जात आहे. 15 सेवा जनतेला मिळणार आहे.... जे काही निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतलेले आहे. सनद असो तुकडेबंदी कायदा या सर्व कायद्याने लोकांना लाभ मिळणार आहे.... 15 सेवा देणार आहोत गतिमान पारदर्शक आणि लोकाभिमुख सरकार म्हणून काम करणार आहे. नागपूर जमीन अधिग्रहण जे काही पॅकेज नवीन नागपुरसाठी तयार केले ते उत्कृष्ट आहे... आतापर्यंत भूसंपादनानंतर कधीही प्लॉट मिळायचे नाही. नवीन नागपूरच्या कमर्शियल एरियामध्ये त्या ठिकाणी प्लॉट सुद्धा देत आहे... त्यामुळे अनेकांनी समर्थता दर्शवली... लँड इक्वेशन करून योग्य मोबदला प्लॉट हे सगळं देव करणार आहे नागपूरचा संकल्प करणार आहे... विकसित नागपूर नागपूर जिल्ह्याच्या विकासासाठी सर्व विभागाच्या माध्यमातून वेगवेगळ्या जिल्ह्याचे डेव्हलपमेंट करणार आहे. शेतकऱ्यांपासून, या सर्वच रोजगारी वाढवण्याच्या शेतकऱ्यांसाठी सगळ्याच गोष्टी विचारात घेऊन सर्व क्षेत्रांमध्ये अग्रगण्य राहील... यासाठी प्रशासनाने सरकारने काम सुरू केल आहे. नागपूर RL 15 - 10- 2024 च्या आधी ज्या ज्या लोकांनी भूखंड घेतले असतील एखाद्या असतील त्यांना अधिकृत करून खरेदी विक्रीचे योजना केली आहे. त्यात आम्ही तुकडेबंदी कायदामध्ये समाविष्ट केल आहे. यानंतर कुठलही अनधिकृत लेआउट चालणार नाही. जो त्यांनी पालन करणार नाही...त्यावर फौजदारी गुन्हे दाखल करणार आहोत...त्याठिकाणी पुढे माफी नसेल.. रिजनल प्लानचे पालन करू... नाशिक जिल्ह्यात कागदपत्रे गहाळ अधिवेशन काळात कलेक्टर बैठक असेल त्या सगळ्याची तपास करून.. निवडणूक याद्या SIR नवेहीची ओढ ओढ आहे. दुब तीन बसू होते, शुद्ध यादी लोकांना मिळणार आहे.. आदर्श लोकशाहीसाठी तरतूद करेल सरकार किती पैसा लागतरील आदर्श मतदारयादी लागेल, निवडणुका पारदर्शक होण्यासाठी कंरणार आहे.. कर्जमाफी सहकार बँक सहकार कायद्या अंतर्गत गरीब शेतकऱ्यांची पिळवणूक झाली आहे.. गर्जूवंत शेतकऱ्यांगरीब शेतकऱ्यांचे कर्ज कर्जमाफी झाली पाहिजे... तो शेतकरी आत्महत्या कडेजाता कामा नये, सर्व शेतकऱ्यांची यादी बोलावत आहे..सोबतच सहकार खात्याकडून काही लोक लुटल्या गेले आहे का नागपूर जिल्ह्यात सहकार बँकेत बाराशे कोटीचा घोटाळा त्याचाही विचार सरकार करत आहे.-parth pavar - kharge samiti ahwal संहितेचा अहवाल माझ्याकडे आला आहे मुख्यमंत्र्यांशी आज त्या संदर्भात चर्चा करणार आहे. समितीचा रिपोर्ट आपल्या आणि जनतेपर्यंत लवकर पोहोचणार आहे..अजून लिफाफा उघडला नाही... सीलबंद लिफाफा मुख्यमंत्री यांच्याकडे जाईल की माझाकडे येईल, ते ठरल्या नंतर लिफाफा उघडला जाणार आहे... भिवंडी नंतर बोलतो, गडचिरोली रेती तस्करी जिल्ह्याच्या नवीन निविदा केल्या आहे.. त्यामुळे रेती तस्करी थांबणार आहे, विभागीय आयुक्त लक्ष घालून त्या वाळू चोरीला लगाम लावला जाणार आहे.. गडचिरोलीचे लवकरात टेंडर निघणार आहे...तथापि त्यापूर्वी जर काही असेल तर आम्ही स्वतः लक्ष घालणार आहे.
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Feb 20, 2026 06:17:09
Jalna, Maharashtra:जालना :आजपासून दहावीची परीक्षा जालना जिल्ह्यातल्या 102 परीक्षा केंद्रावर होणार परीक्षा 4 संवेदनशील केंद्रावर ड्रोनची नजर अँकर- आजपासून दहावीची परीक्षा सुरु झाली असून जालना जिल्ह्यात 102 परीक्षा केंद्रांवर परीक्षा पार पडत आहे.. काॅपीमुक्त परीक्षा व्हावी यासाठी प्रशासनाचे प्रयत्न आहेत. त्यासाठी संवेदनशीलसह सर्वच केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आलेत. तर जिल्ह्यातल्या चार संवेदनशील केंद्रावर ड्रोनची नजर असणार आहे. याशिवार बैठे पथकांसह फिरते पथकही तैनात करण्यात आले आहेत.. विद्यार्थ्यांनाही परीक्षा केंद्रात जाण्याआधी तपासणी करून सोडलं जात आहे. दरम्यान विद्यार्थ्याजवळ काॅपी आढळल्यास विद्यार्थ्यासह पर्यवेक्षक आणि केंद्रचालक जबाबदार असणार असल्याचा इशारा जिल्हाधिकार्यांनी दिला आहे..
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Feb 20, 2026 06:16:53
Washim, Maharashtra:वाशीम: अँकर:राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात झाली आहे.वाशीम जिल्ह्यातील ८८ परीक्षा केंद्रांवरील ८३५ वर्ग खोल्यांमधून एकूण २० हजार ५६ विद्यार्थी परीक्षा देत आहेत.परीक्षा कॉपीमुक्त आणि सुरळीत वातावरणात पार पडावी यासाठी शिक्षण विभागाने व्यापक नियोजन केले आहे.परीक्षा कॉपीमध्ये कोणताही गैरप्रकार होऊ नये यासाठी परीक्षाकेंद्रावर CCTV ची नजर असणार असून प्रत्येक केंद्रावर केंद्रप्रमुख,पर्यवेक्षक आणि भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली.परीक्षा केंद्र परिसरात अनधिकृत व्यक्तींना प्रवेशबंदी घालण्यात आली असून नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.८८ पैकी १९ संवेदनशील परीक्षा केंद्रांवर प्रशासनाचे विशेष लक्ष असणार आहे.
0
comment0
Report
Advertisement
Back to top