Back
शिंदे की शिवसेना में घराणेशाही चरम पर, नगरपालिका तक family-based सत्ता
VKVISHAL KAROLE
Jan 23, 2026 11:00:23
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
राजकारणातील घराणेशाहीचा पॅटर्न गेल्या काही दिवसात प्रत्येक पक्षात पाहायला मिळतोय. छत्रपती संभाजीनगरमध्ये तर शिंदे की शिवसेनेत घराणेशाहीने अक्षरशः टोक गाठले आहे. मराठवाड्यातही काही वेगळी स्थिती नाही त्यामुळं शिवसेनेतील कार्यकर्त्यांनी फक्त सतरंज्या उचलायच्या का असा प्रश्न या कार्यकर्त्यांना पडला आहे...\nशिंदे सेनेत घराणेशाहीचा वर चष्मा\nमहापालिकेनंतर आता झेडपी मध्येही घराणेशाही\कार्यकर्त्यांना तोंड दाबून बुक्क्यांचा मार !!!\nराजकारण आणि घराणेशाही हा नेहमीच चर्चिला जाणार विषय आहे, संभाजीनगरमध्ये तर शिवसेनेत महत्त्वाच्या नेत्यांच्या घरातच सत्ता फिरत असल्याचे चित्र आहे. कुणी आमदार आहे, तर कुणी भावाला नगरसेवक केले, काही नेत्यांनी तर तीन-तीन लोकप्रतिनिधीचे पद आपल्याच घरात ठेवली आहे. मंत्री संजय शिरसाट, खासदार संदीपान भुमरे, आमदार अब्दुल सत्तार, आमदार प्रदीप जैस्वाल, आमदार रमेश बोरणारे यांचा यात समावेश आहे. महापलिकेनंतर आता जिल्हा परिषदे निवडणुकात हेच चित्र आहे...\nअब्दुल सत्तार यांनी नगरपालिका निवडणुकीत त्यांचा मुलगा समीर यांना निवडून आणल्यानंतर त्यांचे दुसरे चिरंजीव आमेर सत्तार यांना झेडपीच्या भवई गटातून जिल्हा परिषदेसाठी उमेदवारी दिली आहे. खासदार संदीपान भुमरे यांचा मुलगा विलास हे सध्या आमदार आहेत. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये पाचोड गटातून त्यांनी त्यांचे पुतणे शिवराज भुमरे यांना उमेदवारी दिली आहे. धाराशिवचे माजी खासदार रविंद्र गायकवाड यांचा मुलगा किरण गायकवाड हे सध्या उमरगा नगरपालिकेमध्ये नगराध्यक्ष आहेत. आता त्यांच्या पत्नी उषा गायकवाड यांना जिल्हा परिषदेमध्ये उमेदवारी दिली आहे. उमरगा तालुक्याचे माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांनी त्यांच्या कन्येला पंचायत समितीमध्ये उमेदवारी दिली आहे. धाराशिव जिल्ह्यातील भूम परंडा मतदारसंघात तानाजी सावंत यांचा पुतण्या धनंजय सावंत हे जिल्हा परिषदेच्या राजकारणात पूर्वीपासून होते. त्यांनी आता स्वतंत्र उमेदवारही दिले आहेत. त्यामुळं चाललंय काय असा प्रश्न निर्माण होतोय...\nजालना जिल्ह्यातून माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी त्यांनीची मुलगी दर्शना यांना निवडून आणण्यासाठी जीवाचे रान केले. बंधूही जिल्हा परिषदेमध्ये काम करत होते. बाजारसमितीवरही त्यांच्या वर्चस्व आहे.\nधाराशिवचे माजी खासदार रवींद्र गायकवाड यांचा मुलगा किरण गायकवाड सध्या उमरगा नगरपालिकेचे नगराध्यक्ष आहेत. \nनांदेड जिल्ह्यातील आमदार बालाजी कल्याणकर यांच्या चिरंजीव सुहास कल्याणकर नगरसेवक, नांदेडचे जिल्हा प्रमुख उमेश मुंडे यांच्या मुलगा योगेश मुंडे निवडून आले. युतीमध्ये असताना त्यांच्या आई नगरसेवक म्हणून निवडून येत असे.\nआमदार संतोष बांगर यांच्या भावजयी आता हिंगोलीच्या नगराध्यक्ष आहेत. आमदार बांगर यांचे मोठे बंधू श्रीराम यांच्या पत्नी निवडून आल्या. यावर शिंदे सेनेच्या संजय शिरसाठ याना मात्र काहीही वेगळं वाटत नाही... इतरही पक्षात हेच चित्र असल्याचे ते सांगताय...
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
LBLAILESH BARGAJE
FollowJan 23, 2026 13:36:530
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowJan 23, 2026 13:36:250
Report
UPUmesh Parab
FollowJan 23, 2026 13:18:210
Report
UPUmesh Parab
FollowJan 23, 2026 13:08:460
Report
SRSHRIKANT RAUT
FollowJan 23, 2026 12:38:100
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowJan 23, 2026 12:36:570
Report
AKAMAR KANE
FollowJan 23, 2026 12:33:110
Report
ABATISH BHOIR
FollowJan 23, 2026 12:18:020
Report
SRSHRIKANT RAUT
FollowJan 23, 2026 12:17:200
Report
JMJAVED MULANI
FollowJan 23, 2026 12:01:120
Report
GMGANESH MOHALE
FollowJan 23, 2026 12:00:580
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowJan 23, 2026 11:49:500
Report
KJKunal Jamdade
FollowJan 23, 2026 11:36:340
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowJan 23, 2026 11:35:480
Report
AAASHISH AMBADE
FollowJan 23, 2026 11:31:120
Report