Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Aurangabad431001
अत्यावृष्टि से किसान नुकसान भरपाई की मांग: उपोषण खत्म, मंत्री घर पर वार्ता शुरू
VKVISHAL KAROLE
Oct 20, 2025 02:47:30
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
संभाजी नगरच्या कन्नड तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानीबाबत शासनाकडून ठोस मदत मिळावी, तसेच तत्काळ सरसकट कर्जमाफी जाहीर करावी, या मागणीसाठी कन्नड तहसील कार्यालयासमोर १० ऑक्टोबरपासून एका व्यक्तीने सुरू केलेले बेमुदत उपोषण अखेर नवव्या दिवशी शनिवारी छत्रपती संभाजीनगर येथे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या घरी जाऊन मागे घेतल्याची घटना घडली, त्यामुळं राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चा सुरू आहेत... कन्नड येथील संदीप विजयकुमार सेठी या व्यक्तीने, अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना पंजाब सरकारप्रमाणे सरसकट नुकसानभरपाई द्यावी, पूरग्रस्त मृतांच्या कुटुंबीयांना तातडीची मदत करावी, सर्व शेतकऱ्यांचे पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, सरसकट कर्जमाफी जाहीर करून नवीन कर्ज मंजूर करावे, बँक वसुली वर्षभरासाठी स्थगित करावी आदी मागण्यांसाठी १० ऑक्टोबरपासून तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण केले. तहसीलदारांनीसेठी यांना उपोषण मागे घेण्यासाठी विनंती केली; परंतु त्यांनी पालकमंत्री संजय शिरसाट जोपर्यंत उपोषणस्थळी येऊन आश्वासन देणार नाही तो पर्यंत माघार घेणार नाही अशी भूमिका घेतली, मात्र पालकमंत्र्यांचे बिझी शेड्यूल असल्यामुळे कन्नडला येणे शक्य नाही, असे सांगण्यात आले. उपोषणकर्त्यांनाच इकडे छत्रपती संभाजीनगरला पालकमंत्र्यांच्या घरी आणा. इथेच उपोषण सोडवू, असा संदेश दिला. त्यानंतर उपोषणकर्त्यांनी छत्रपती संभाजीनगरला जाण्याची तयारी दर्शविली. त्यानंतर एका रुग्णवाहिकेमध्ये उपोषणकर्ते संदीप सेठी हे डॉक्टर आणि काही कार्यकर्त्यांसह छत्रपती संभाजीनगरला रवाना झाले आणि पालकमंत्र्यांच्या घरी उपोषणाची सांगता झाली. मात्र एखाद्या मंत्र्याच्या घराला जाऊन उपोषण सोडण्याची ही पहिलीच वेळ असावी मंत्र्यांना उपोषणकर्त्याकडे जाण्यास वेळ नाही का अशा चर्चा सुरू झाल्या.
2
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
APAMOL PEDNEKAR
Oct 20, 2025 06:00:52
Mumbai, Maharashtra:संजय राऊत ऑन राज ठाकरे 96 लाख बोगस मतदार काल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये विशेषतः खास करून निवडणूक आयोग निवडणूक यादी मधील घोटाळे निवडणूक यंत्रणेचा भ्रष्टाचार यावर भाष्य केलं आणि त्याच्यातला जो महत्त्वाचा मुद्दा आहे आजही महाराष्ट्रातल्या निवडणूक मतदार यादी मधील साधारण 96 लाख मतदार बोगस आहेत ज्याला आपण राऊंड फिगर म्हणतो ते एक कोटी एक कोटी मतदार बोगस असल्यामुळे निवडणुकीचा निकाल पूर्ण या बोगस मतदार यांच्या हातामध्ये आहे आता विधानसभा निवडणुकीनंतर मुंबईमध्ये चार दिवसात साडेसहा लाख मतदान वाढवले हा काय प्रकार आहे कुठून येतात अमित शहा म्हणतात दोन दिवसांपूर्वी दिल्लीत आम्ही घुसकरांना शोधून काढू आणि घुसखोर जर मतदार यादीत असेल तर आम्ही त्यांना हाकलून देऊ मतदार यादीतून महाराष्ट्रामध्ये एक लाख बोगस मतदार आणि घोस्कर आहे असे आम्ही मानतो अमित शहा यांनी एक कोटी मतदार घुसखोर विजय तुमच्या भाजप मिंधे लोकांनी घुसवले आहेत सुरुवातीतून करा मतदार यादीतला घोटाळा जोपर्यंत आहे तोपर्यंत निवडणुका निष्पक्ष पारदर्शक होणार नाही आणि त्यासाठी देशाचे लक्ष वेधून घेण्यासाठी महाराष्ट्र निवडणूक आयोगावर एक नोव्हेंबर रोजी मुंबईमध्ये सर्वपक्षीय मोर्चाचं आयोजन केलं त्यात काल घोषणा झाली काल शिवसेना भवनात पत्रकार परिषदेला सर्वपक्षीय नेते होते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व नेते हजर होते काँग्रेसचे नेते हजार होते राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंतराव पाटील होते आणि आता हळूहळू त्या संदर्भात पाऊल पडत आहेत निवडणूक आयोग कार्यवाही करेल हे कोणत्या भरोशावर युतीफुटी बोलत आहे निवडणूक आयोगाने कार्यवाही करावी म्हणून दोन दिवस 14 15 तारखेला शिस्त मंडळ भेटलं काय कारवाई केली पुरावे दिले ना विधानसभा लोकसभा निवडणुकांचीदरम्यान मतदान आहे 46 लाख 50 लाख ते एकाच पक्षाला कसं काय पडू शकतं का दुसरं कोणी येथे निवडणुकीला उभे नव्हते का ज्या चोराला रंगे हात पकडला आहे तो चोरच पुरावा मागत आहे आणि चोर पुरावा कोणाकडून मागत आहे हे चोर आहेत यांनी चोरा केलेल्या आहेत आमचा प्रश्न निवडणूक आयोगाला आहे भारतीय जनता पक्षाला उत्तर द्यायचं कारण नाही आमचा प्रश्न संविधानिक पदावर बसलेल्या संस्थेला आहे ते उत्तर देतील भारतीय जनता पक्षाला किंवा मिंधे यांना मिरच्या का लागत आहे याच्यातच एक मराठीमध्ये फार मन आहे चोराच्या मनात चांदणे आम्ही सवाल विचारतो निवडणूक आयोगाला जसे केंद्रात राहुल गांधी सवाल विचार होते निवडणूक आयोगाला उत्तर कोणते आहे तर भाजपचे नेते काय गरज आहे तुम्हाला जर भारतीय जनता पक्ष उत्तर देत असेल मिंधे उत्तर देत असेल याचा अर्थ निवडणूक आयोगाने या सगळ्यांची मिली बघत आहे हे जॉईंट वेंचर आहे भ्रष्टाचार आणि घोटाळ्यामध्ये ऑन शिंदे मन मिलन प्रमोशन विधान एकनाथ शिंदे यांच्या वाचन वाढलेले दिसत आहे मराठी वाचता येत त्यांना माझा एक प्रश्न विचारा आता लगेच भाऊ बंदगी नाटकाचे लेखक कोण आहेत हे नाटक कोणत्या साली नाटक आला आपण पाहिलात का इतिहास काळामध्ये भाऊबंदकी नष्ट झाल्यावरती या राज्यात शिवशाही अवतरली कृष्णाजी प्रभाकर खांडविलकर हे त्या नाटकाचे लेखक आणि भाऊबंदकी या माध्यमातून चित्र महाराष्ट्राला दाखवलं भाऊबंदकी आहे तोपर्यंत राज्य आपलं एकत्र आलं पाहिजे मराठी लोकांनी देशातल्या लोकांनी तेव्हा भाऊ बंदगी संदेश आहे तो संदेश अस्वस्थ गरज आहे वाद संपले मतं बसले भाऊ एकत्र आले कुटुंब एकत्र आले का पक्षाचे कार्यकर्त्यांच्या भाऊबंदकी संपली आता या राज्यावर एकेचा सूर्य उगवला महाराष्ट्र शिवशाहीचे सूर्य उगवला आहे भाऊ बंदगी नाटकाचं नाटकाचे महत्त्व तेच आहे कृष्णाजी खांडविलकर आणि तेच सांगितलं आहे सारखं छातीत दुखत आहे आणि आज नारक चतुर्थी आहे नारकासुराचा जन्म कुठे झाला नरकासुराचा मूळ स्थान गुहाटी त्याच्यामुळे हे जे नरकासुर एकडेल आहेत जे गोवाटीला जाऊन पूजा करतात त्यांचं हे बॉडी पेन होणार आमचा विषय पोटात दुखण्याचा कारण नाही आमचा कोणाच्या पोटात छातीत दुखत नाही आम्ही ठणठणीत आणि तंदुरुस्त आहोत पण आज त्यांची जयंती आहे आज एकनाथ शिंदे यांची जयंती आहे त्यांना गोहाटी जावं लागेल कदाचित नरकासुर हा उगम पावला गोहाटी मधून आणि ते प्रेरणा घेत आहेत पण त्या नरकासुराचा अंत झाला आणि म्हणून आज आपण नरकासुर चीरडतो तसं नारकासुराला या गद्दार नरकासुराला चिरडलं जाईल जनता या राज्याचे पाय खाली चिरडेल नो किंग्स आंदोलन चालू आहे अमेरिकेत नो किंग्स ट्रम्प च्या विरुद्ध हिंदुस्थानामध्ये देखील हे होणार आहे ऑन इंडियन अलायन्स त्याच्यावरती सगळ्यांना चिंता वाटते आयआयटी जे सरकार गुहाटी मध्ये रेड्यांचे बळी दोन निर्माण झालं त्यांच्याकडून तुम्ही काय अपेक्षा करता ज्या देशाचे पंतप्रधान ज्या राज्याचे मुख्यमंत्री हे विज्ञानापेक्षा तंत्र मंत्र याच्यावरती अवलंबून राहतात त्यांच्याकडून तुम्ही काय अपेक्षा करता पंडित नेहरूंनी हा देश विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये खूप पुढे नेला तितकंच हे मागे आणून लोकांना अंधश्रद्धा मध्ये गुंतवून ठेवत आहेत काय अपेक्षा करणार त्यांच्याकडून तुम्ही 50 रेड्यांचे बळी देऊन सरकार जे सत्तेमध्ये आला आहे त्यांच्याकडे दुसरी काय अपेक्षा ऑन शिवसेना भवन जुन्या आठवणी हिंदुरुदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना भवन मराठी माणसाच्या ऐकायच्या प्रतीक म्हणून उभं केलं अशा वेळेला मराठी माणूस तिथे येणार असेल पक्षभेद मतभेद विसरून तर त्याचा स्वागत आहे काल मनसेचे सर्व नेते तिथे आले ते भारावले होते त्या वास्तेमध्ये त्यातले काही नेते प्रथमच इथे आले राजू पाटील वगैरेंचन्या त्यांच्यासाठी फार मोठ्या भावनिक सहन होता हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब भवन मध्ये यांना त्यांच्या त्या सगळ्या गोष्टींचे दर्शन घेणं अनेकांनी भावना शोधा व्यक्त केल्या हे चांगल आहे
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Oct 20, 2025 05:47:05
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:सांगली फ्लॅश ऐन दिवाळीतच सांगली शहरात पाण्याचा ठणठणाट निर्माण झालाय. महापालिका प्रशासनाकडून शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला, त्यामुळे नागरिकांचे दिवाळीच्या पहिल्या दिवशीच मोठा खोळंबा झाला. पाणीपुरवठा होत नसल्याने संतप्त झालेल्या काँग्रेस आणि भाजपच्या नगरसेवकांनी नागरीकांसह थेट महापालिकेच्या पाणीपुरवठा कार्यालयावर धडक देत, पाणीपुरवठा अधिकाऱ्यांना घेराव घालत धारेवर धरलं. यावेळी संतप्त झालेल्या नगरसेवकांनी पाणीपुरवठा कार्यालयाच्या दारातच हंडे आणि घागर घेऊन धरणे आंदोलन देखील केलं. यावेळी महापालिका आयुक्तांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध नोंदवण्यात आला. दिवाळीच्या पहिल्या दिवशीच महापालिकेकडून शहरात पाणीपुरवठा करण्यात आला नसल्याने नागरिकांचे प्रचंड हाल झाल्याचा आरोप करत तातडीने पाणी सोडण्याची मागणी करण्यात आली.
0
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Oct 20, 2025 05:31:46
Shirur, Maharashtra:पुणे के चाकण में महामार्ग के पास ड्रेनेज के काम के दौरान कांक्रीट स्लैब गिरने से एक मजदूर स्लैब के नीचे फंस गया। बाकी मामला: चाकण के तळेगाव चौक के गटर पर रखे कंक्रीट स्लैब के गिरने से एक मजदूर घायल हो गया और स्थानीय नागरिकों की मदद से उसे सुरक्षित बाहर निकाला गया। राती टाकलेला स्लैब ताजा होने के बावजूद आधार घटाने पर स्लैब गिर गया, जिसमें हसन अन्सारी नामक मजदूर फंस गया। नगरपालिका/ठेकेदार द्वारा रस्ते के रुंदीकरण के समय ड्रेनेज लाइन के काम शुरू थे, पर ठेकेदार द्वारा काम गटांरदार पर ध्यान नहीं दिए जाने की बातें भी सामने आईं। स्लैब कोटिंग के कारण गिरा या नहीं, यह प्राथमिक जानकारी है।
2
comment0
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
Oct 20, 2025 05:17:31
Pune, Maharashtra:तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या नूतन प्रशासकीय इमारतीचं आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज तसेच धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मृतींना सन्मान देणाऱ्या “श्री शिवशंभू स्मारक” प्रकल्पाचं लोकार्पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे. या सोहळ्यासाठी तळेगाव दाभाडे परिसरात उत्साहाचं वातावरण आहे. सोहळ्याच्या सर्व तयारीचा आणि सुरक्षा व्यवस्थेचा आढावा आमदार सुनील शेळके यांनी घेतला असून, तळेगाव दाभाडे पोलिसांनी देखील परिसरात पाहणी केली आहे. तळेगाव शहराचा हा ऐतिहासिक क्षण ठरणार असून, नूतन प्रशासकीय इमारत आणि शिवशंभू स्मारक हे शहराच्या विकासाचे आणि इतिहासाच्या अभिमानाचे प्रतीक ठरणार आहे.
0
comment0
Report
PTPRATHAMESH TAWADE
Oct 20, 2025 05:17:20
Virar, Maharashtra:यंग स्टार ट्रस्ट मार्फत दिवाळी पहाटकार्यक्रमाचे आयोजन यंदा कार्यक्रमाचे २५ वे वर्ष अँकर- विरारकरांची आजची दिवाळीची पहाट सुरेल संगीताने झालेली पाहायला मिळाली.. बहुजन विकास आघाडी व यंग स्टार ट्रस्टच्या वतीने विरार येथील पद्मश्री भाऊसाहेब वर्तक सांस्कृतिक भवनात गाणी तुमच्या आमच्या मनातली सांगीतिक मैफिलीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात संगीतकारांनी पहाटे साडे सहा वाजल्यापासून दिवाळी दर्शवणारी गीते गाऊन दिवाळीची पहाट सुरांच्या मैफिलीने केली.. ज्येष्ठ नागरिक संघ विरार आणि अखिल भारतीय निवृत्त रेल कर्मचारी संघ यांच्या संयुक्त विद्यमनाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गेल्या २५ वर्षांपासून दिवाळीच्या पहिल्या दिवशी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असते....
0
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Oct 20, 2025 05:16:56
Satara, Maharashtra:सातारा:राज ठाकरे यांनी 96 लाख खोटे मतदार यादीत असल्याबाबत टीका केली होती याला मंत्री शंभूराज देसाई यांनी प्रतिउत्तर दिल आहे... राज ठाकरे यांनी जर 96 लाख खोटे मतदार असतील तर त्यासाठी त्यांनी पुरावा द्यायला हवा.. आता हरकती घेण्याची मुदत संपून गेली आहे... अशी काही माहिती मनसेकडे आली असेल तर त्यांनी निवडणूक आयोगाकडे सादर करावी. निवडणूक आयोगाने देखील प्रत्येक जिल्हा प्रशासनाला अशा काही बाबींनी आढळून आल्या तर अहवाल मागितला होता. चुकीचा असेल तर निवडणूक आयोग कारवाई करेल. असे मत मंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केले बाईट: मंत्री शंभूराजे देसाई निवडणूक आयोग हा एक स्वायत्त संस्था आहे. प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीने बोलल्यानंतर निवडणूक आयोग प्रत्येकावर बोलू शकत नाही. ते घटनात्मक पद आहे. सत्ताधारी हे वस्तुस्थिती मांडत आहेत. आम्ही याचे राजकीय भांडवल करत नाही. मागील लोकसभेला आम्हाला जागा कमी मिळाल्या महाविकास आघाडीला जास्त जागा मिळाल्या. त्यावेळी आम्ही हरकती घेतल्या नव्हत्या. त्यामुळे वस्तुस्थिती स्वीकारले पाहिजे. तुमच्या जागा निवडून आल्या की मतदार यादी योग्य आणि आम्ही जिंकलो की मतदार यादीत घोळ ...याचा अर्थ भविष्यात त्यांना पराभव दिसू लागला आहे. म्हणून त्याची उत्तर आत्ता विरोधक तयार करू लागले आहेत. हा त्यांचा रडीचा डाव आहे अशी प्रतिक्रिया मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली आहे बाईट- मंत्री शंभूराज देसाई ठाणे मुंबई या ठिकाणी गद्दारांच्या ठिकऱ्या उडणार या संजय राऊतांच्या विधानावर मंत्री शम्भूराज देसाई यांनी आपली प्रतिक्रिया दिली यावेळी त्यांनी आम्ही लोकांच्यातून निवडून आलो आहोत. संजय राऊत यांच्यासारखी राज्यसभेवर बॅकडोर एन्ट्री केलेली नाही. संजय राऊत यांनी खासदारकीचा राजीनामा देऊन भांडुपच्या महानगरपालिकेच्या वार्डातून निवडून येऊन दाखव मग आमच्या ठिकऱ्या होणार का याचा विचार कर ... ठिकऱ्या कोणाच्या होणार याबाबत ठाणेकर जनता दाखवून देईल... ठाण्यात जो मागे मोर्चा काढला त्याला 400 लोकांच्यावर लोक नव्हते. सर्व लोक आणले ते बाहेरून आणले होते. संजय राऊत काय आहेत हे ठाणेकरांना चांगलेच माहित आहे. आता जे बहुमत आहे त्यापेक्षा जादा बहुमत येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत महायुतीला मिळेल. असे सडेतोड प्रतिक्रिया मंत्री शम्भूराज देसाई यांनी दिली बाईट- मंत्री शंभूराज देसाई 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही ज्यावेळेस भूमिका घेतली होती. त्यावेळी संजय राऊत यांनी मुंबईत येऊन दाखवा. असे विधान केलं होतं. आम्ही खुलेआम त्यावेळी वरळीतून वाजत गाजत गेलो त्यावेळी काय झालं. संजय राऊत जे बोलतात त्याचं अर्ध वाक्य जरी खरं ठरलं तरी आम्ही म्हणल ते ऐकू.... अशी प्रतिक्रिया मंत्री शंभूराजे देसाई यांनी दिली आहे बाईट- मंत्री शंभूराज देसाई संजय राऊत यांनी आनंद दिघे यांना तुळशी वृंदावन या केलेल्या विधानावर मंत्री शंभूराज देसाई यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. नेहमीच आम्ही स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे फोटो शेजारी आनंद दिघे यांचा फोटो लावत असतो. यावर पंधरा दिवसांपूर्वी संजय राऊत यांनी काय विधान केलं होतं याबत मीडियाने पहावं.... आम्ही बाळासाहेब ठाकरे यांची तुलना कोणाच्या बरोबर करत नाही.. मात्र आमचे श्रद्धास्थान आनंद दिघे आहेत. बाळासाहेब ठाकरेंच्या बरोबरीने हिंदुत्वाचे विचार जर कोणी पुढे नेले असतील तर त्या आनंद दिघे यांनी पोचवले आहेत. संजय राऊत हे सोयीस्कर बोलतायत कारण त्यांना माहित आहे. आपण बोलून चूक केली आहे. ठाण्यात गेल्यावर आपल्याला जोडे पडतील हे वाचण्यासाठी दिघे साहेबांना वृंदावन असं संबोधित आहेत. अशी प्रतिक्रिया शंभूराज देसाई यांनी दिली आहे बाईट: मंत्री शंभूराज देसाई
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Oct 20, 2025 05:15:19
Chandrapur, Maharashtra:टायटल:-- नापिकीमुळे शेतकऱ्याने पेटविला सोयाबीनचा ढीग, सहा एकरातील सोयाबीन जळून खाक, चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातल्या काग गावातील घटना चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातल्या काग येथील स्वप्नील धोंगडे या शेतकऱ्याने नапिकी आणि भाव पडल्यामुळे हताश होऊन स्वतःच्या शेतातील सोयाबीनचा ढीग पेटवून दिला. सततच्या अनियमित पावसामुळे यंदा सोयाबीन पिकाचे उत्पादन अत्यंत कमी झाले. त्यातच बाजारभाव खर्चही भरून निघणार नाही इतका घसरण झाल्याने शेतकरी निराश झाला होता. त्याने सहा एकर क्षेत्रात सोयाबीन पिकाची लागवड केली होती. मात्र, अतिवृष्टीमुळे पिकाचे अतोनात नुकसान झाले. मजुरांच्या हाताने कापणी केली असली तरी उत्पादन अत्यल्प झाल्याने मजुरांचे पैसेही देता येणार नाही, अशी वेळ आली. अखेरीस नैराश्यातून शेतकऱ्याने पिकाचा ढीग पेटवून दिला. या घटनेत शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून शासनाने तात्काळ पंचनामे करून योग्य ती नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
0
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Oct 20, 2025 04:47:39
Beed, Maharashtra:बीड़ के गेवराई तालुक्यातील मादळमोही गावात धनगर समाज बांधवाने गळफास घेऊन आत्महत्या केली. योगेश बबन चौरे असं 33 वर्षीय तरुणाचे नाव असून तो आरक्षणाच्या मागणीसाठी झालेल्या आंदोलनात सक्रिय होता. मात्र आरक्षणाचा तिढा सुटत नसल्याने योगेश चौरे याने आत्महत्या केल्याचं बोललं जात आहे. दरम्यान याच ठिकाणी एक सुसाईड नोट आढळून आली असून पोलीस या अनुषंगाने माहिती आणि तपास करत आहेत. दरम्यान आत्महत्याग्रस्त कुटुंबाला न्याय मिळावा या मागणीसाठी धनगर समाजाचे नेते भारत सो Sonnar यांच्यासह धनगर समाजाने मादळमोही पोलीस चौकीत ठिय्या मांडला. मागील आठवडाभरापूर्वीच गेवराई तालुक्यात एका धनगर समाजाच्या बांधवाने आत्महत्या केली होती. हे प्रकरण ताजे असताना आता पुन्हा अशीच एक घटना समोर आलीय.
0
comment0
Report
VBVAIBHAV BALKUNDE
Oct 20, 2025 04:47:17
Latur, Maharashtra:लातूर ब्रेकिंग न्यूज.. प्रेमीयुगुलाने लातूरजवळ जीवन संपवले.... प्रेमसंबंधांना घरच्यांचा विरोध झाल्याने एका नर्स आणि एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या अपंग तरुणाने एकत्र आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना लातूर जिल्ह्यात घडली आहे. पेठ गावच्या शिवारात घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. नितीन दराडे व राणी दराडे अशी मृतांची नावे आहेत. या प्रकरणी लातूर ग्रामिण पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यू अशी नोंद घेण्यात आली आहे. दोघेही भावकीतील असल्याने आधीपासून दोघांची ओळख होती. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. मात्र या प्रेमसंबंधांना दोन्ही कुटुंबीयांचा तीव्र विरोध होता. घरच्यांच्या या विरोधामुळे मानसिक तणावाखाली आलेल्या या जोडप्याने टोकाचा निर्णय घेत आपली जीवनयात्रा संपवली अशी प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे.
0
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Oct 20, 2025 04:47:04
Bhandara, Maharashtra:भंडाऱ्यातील खांबतलाव येथे प्रभू श्रीराम चरणी 51 हजार दिव्यांचा आरास. दिवाळीच्या पूर्व संध्याला भव्य आयोजन. प्रकाशमय पर्व दिवाळीचे अवचित्य साधत भंडाऱ्यातील खांबतलाव येथे 51 हजार दिवे लावण्याचा संकल्प आ.नरेंद्र भोंडेकर यांच्या पुढाकारातून घेण्यात आला असून आज या भव्य दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रभू श्रीराम उत्सव व खांबतलाव पुनर्विकास समिति द्वारे आयोजित या दीपोत्सवाचे उद्घाटन आम.नरेंद्र भोंडेकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. हे आयोजन आज सायंकाळी खांबतलाव येथील प्रभू श्री राम प्रतिमा परिसरात करण्यात येणार आहे. समाजात एकोपा आणि शांती निर्माण व्हावी या हेतूने प्रभू श्री राम उत्सव व खांबतलाव पुनर्विकास समिति द्वारा मागील वर्षी सुद्धा 21 हजार दिव्यांचा दीपोत्सव साजरा करण्यात आला होता आणि यात शहरातील अनेत नागरिकांनी सहभागी दिला. या वर्षी हा दीपोत्सव 51 हजार दिव्यांसह आयोजित केला असून यात भंडारा शहरातील 100 पेक्षा अधिक मंदिराचे पदाधिकारी सहभागी होणार आहेत.
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Oct 20, 2025 04:31:59
0
comment0
Report
Diwali 2025
Advertisement
Back to top