Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Aurangabad431001
फडणवीस की प्रचार सभा: कमल के लिए आगे बढ़ने का पांच साल का वादा
VKVISHAL KAROLE
Nov 25, 2025 14:01:51
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
नगरपरिषद आणि नगरपंचायतच्या प्रचारासाठी छत्रपती संभाजनगराच्या खुलताबाद तालुक्यात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रचार सभा झाली, संभाजीनगर जिल्ह्यातील भाजपचे सातही नगराध्यक्षपदाचे उमेदवार यावेळी उपस्थित होते, भाजपकडे विकासाची किल्ली आहे भाजपला निवडून द्या असा आवाहन यावेळेस देवेंद्र फडणवीस यांनी केलं , येत्या दोन तारखेला तुम्ही कमळाची काळजी घ्या पुढील पाच वर्षे कमल तुमची काळजी घेईल असे आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केले आम्ही सत्तेत आलो तेव्हा लोक सांगायचे आम्ही लाडक्या बहिणी आणि इतर योजना बंद करू आम्ही योजना चालू ठेवल्या या योजना कुणीच बंद करू शकत नाही आमला फक्त लाडकी बहीण योजना चालू ठेवायची नाही तर लखपती दीदी तयार करायची आहे राम मंदिरावर भगवा ध्वज फडकवला आणि मी भद्रा मारुतीचे दर्शन घेतले ही सौभाग्याची बाब आहे 2 तारखेला मतदान होईल, त्यासाठी तुमचा आशीर्वाद घेण्यासाठी इथे उपस्थित आहे नगरपालिकेत देखील आपलाच अध्यक्ष आणि आपलेच सरकार हवे समस्या कशा सोडवता येईल, विकास कसा करता येईल यासाठी प्रयत्न सुरू आहेत कचऱ्यामुळे आरोग्य धोक्यात झाले होते, मात्र मोदींनी शहरीकरण ही संधी असल्याचे सांगितले आणि शहर चांगले झाले पाहिजे म्हणून शहरासाठी योजना चालू केली 1 लाख कोटी पेक्षा जास्त पैसे मोदी यांनी दिले लोकांचे जीवनमान बदलण्याचे काम आम्ही करतो आहे नगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता आली तर त्यांच्यावर आमचा कंट्रोल असेल, जो निधी आम्ही देऊ त्याच्यावर आमचं लक्ष असेल, आणि योजना योग्य पद्धतीने राबवण्याचे काम होईल फक्त आश्वासन देणारे नाही जे सांगतो ते करणारे लोक आम्ही आहोत भाजपा निवडून आल्यानंतर, मी जसा आमदारांच्या पाठीशी आहे तसा नगराध्यक्षांच्या आणि नगरसेवकांच्या पाठीशी गंभीरपणे उभा राहणार आहे कोणत्या योजना बंद होणार नाही पुढचे पाच वर्षे शेतकऱ्यांना मोफत वीज देणार शेतकऱ्यांना 24 तास मोफत वीज देणार मी 2018 मध्ये सांगितलं होतं पिढी दुष्काळ बघेल पुढची पिढी बघणार नाही .... कोकणातले पाणी मराठवाड्यात आणून मराठवाड्याचा दुष्काळ भूतकाळात न्यायचा आहे 1000 कोटी रुपयांची गंगापूर आणि खुलताबाद यासाठी ग्रीड योजना दिली आहे दोन तारखेला आमची जबाबदारी तुम्ही घ्या *दोन तारखेला कमळाची जबाबदारी तुमची आणि त्यानंतर पाच वर्ष तुमची जबाबदारी आमची* जातिपातीचं राजकारण येणाऱ्या दिवसात होईल पण ते सर्व बाजूला ठेवा *कुणाच्या हातात महाराष्ट्राची किल्ली आहे... भाजपाकडे महाराष्ट्राची आर्थिक चावी आहे. कोण महाराष्ट्राला पुढे घेऊन जाऊ शकेल हे लक्षात ठेवा*
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
GMGANESH MOHALE
Nov 25, 2025 15:46:27
Washim, Maharashtra:अँकर:वाशीम नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एमआयएमचे नेते व माजी खासदार इम्तियाज जलील यांनी वाशीम येथील प्रचारसभेत शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटावर जोरदार टीका केली. सभेत उपस्थित मुस्लिम मतदारांना उद्देशून जलील यांनी उद्धव ठाकरे यांच्या जुन्या विधानांची आठवण करून दिली. जलील म्हणाले आज उद्धव ठाकरे साहेब मोठे सेक्युलर झाले आहेत मुसलमान म्हणतात की ते खूप चांगले व्यक्ती आहेत. पण इतकं भोळं राहू नका. बाबरी मशीद शहीद झाली तेव्हा ‘मला गर्व आहे माझ्या शिवसैनिकांनी बाबरी पाडली’ असं विधान उद्धव ठाकरे स्वतः केलं होतं. ते विसरलं का? त्यांनी पुढे इशारा दिला की उद्धव ठाकरे यांच्या ती भूमिकेची थोडक्यात जाणीव घेतली, तर शिवसेनेला मतदान करणारा प्रत्येक मुस्लिम बाबरी विध्वंसाचा समर्थक मानला जाईल, असा अर्थ निघतो. मग आपण स्वतःच्या इतिहासाच्या आणि भावनांच्या विरोधात का जावं सभेला अपेक्षेपेक्षा मोठी उपस्थिती होती. जलील यांनी मुस्लिम समाजाने स्वतंत्र आणि ठाम राजकीय भूमिका ठेवण्याची गरजही अधोरेखित केली. महाविकास आघाडीतील ठाकरे गट मुस्लिम मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करत असला तरी त्यांची पूर्वीची विधानेच त्यांच्या विचारसरणीचा आरसा दाखवतात, असा टोला तेव्हा जलील यांनी लगावला.
145
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Nov 25, 2025 15:21:58
Solapur, Maharashtra:सोलापूर - अनगर नगरपंचायतीची निवडणूक बिनविरोध झालेली नाही, आता उलट्या फुगड्या खेळा। - एक गोष्ट स्पष्ट झाली आहे अनगर नगरपंचायतीची निवडणूक बिनविरोध झालेली नाही - निवडणूक निर्णय अधिकारी कायद्याचा भंग करून प्रक्रिया केलीय - ज्यावेळी अपील दाखल होतं त्यावेळी पुढची प्रक्रिया त्याच ठिकाणी थांबते, जोपर्यंत जिल्हा न्यायालय निकाल देत नाही तोपर्यंत प्रक्रिया थांबते - जेव्हा निवडणूक अधिकाऱ्यांना नोटीस प्राप्त झाली त्या क्षणाला निवडणूक प्रक्रिया थांबायला पाहिजे होती - आज अधिकाऱ्यांच्या वतीने न्यायालय समोर सुनावणी आजच्या आज घेण्याची मागणी करण्यात आली.. चिन्ह अलोटमेंट करण्यासाठी आजच्या आज सुनावणी घेण्याची मागणी - जल्लोष केला, फुगड्या खेळलात, अंगावर बसलात, फटाके उडवलात हे सगळं तुम्ही केलं... आता खालची माणसं खांद्यावर घेऊन बोकांडी घ्या - सरस्वती शिंदे यांनी अतिशय उत्साहात विड्रॉल केल्याचे सांगितलं... - पाटलीन बाई बिनविरोध झाल्याचा जल्लोष तुम्ही केला तुम्ही उघड्या खेळल्या आता तुम्ही - जे लोक तुम्हाला खांद्यावर बसून नाचले आता त्या लोकांना खांद्यावर घेऊन नाचा - कारण निवडणुक बिनविरोध झालेली नाही. - अरोनी निवडणुकीचा विड्रॉल बेकायदेशीर रित्या केलेला आहे. - हा निवडणूक अधिकारी निवडणूक अधिकारी म्हणून राहण्याच्या पात्रतेचा नाही. - राज्याच्या निवडणूक आयुक्तांवर राज्य निवडणूक आयोगावर एक प्रश्नचिन्ह उभा राहिला आहे.
111
comment0
Report
PTPRATHAMESH TAWADE
Nov 25, 2025 14:49:53
158
comment0
Report
SGSagar Gaikwad
Nov 25, 2025 14:36:57
Nashik, Maharashtra:इगतपुरी त्रंबकेश्वर च्या माजी आमदार निर्मला गावित यांचा नाशिकच्या कर्मयोगी नगर येथे अपघात झालाय. या अपघातात निर्मला गावित गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर मुंबई नाका परिसरात असलेल्या सुयश हॉस्पिटल येथे उपचार सुरूये. हा अपघाताचा संपूर्ण थरार सीसीटीव्हीत कैद झालाय. अपघातानंतर २४ तास उलटूनही कारचालक ताब्यात न आल्यानं घातपात की अपघात अशी शंका अपघात ग्रस्त माजी आमदार निर्मला गावित यांनी उपस्थित केलीये. तर या संपूर्ण प्रकरणात अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सीसीटीव्हींद्वारे कार चालकाचा शोध घेतला जातोय. कारचा नंबर दुसर असल्याने कारचालकाचा शोध घेण्यास अडथळा निर्माण होतोय, तर हा घातपात नसून अपघाताच असल्याचा दावा अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्रसिंह राजपूत यांनी केलाय. तर संशयित आरोपीचा शोध सुरू असून लवकरच निष्पन्न होईल असा विश्वास नाशिक पोलिसांनी व्यक्त केलाय.
195
comment0
Report
PPPRANAV POLEKAR
Nov 25, 2025 14:30:38
Ratnagiri, Maharashtra:लोकेशन : गुहागर सिंधुदुर्ग और रायगड में बघू नका....पण, युतीची संकल्पना प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांनी मांडली होती,म्हणूनच ती युती माझ्या जिल्ह्यात टिकवता आली हे भाग्य माझ्यासारखं दुसरं कोणाचं असू शकत नाही. कोकणात रायगड सिंधुदुर्ग मध्ये भाजप शिवसेनेच्या फिस्कटलेल्या युतीवरून उदय सामंत यांच्या भाष्य. मालवण च्या राजकारणकडे पाहू नका, पण..... ज्या पद्धतीने मालवण मधील एका सभेत उमेदवारांनी मंदिरात भ्रष्टाचार न करण्याची आणि लोकांना त्रास न देण्याची देवासमोर शपथ घेऊन प्रचाराचा शुभारंभ केला. अशा पद्धतीची शपथ देवळात झाली तर महाराष्ट्र सुधारायला वेळ लागणार नाही. राजकारणात देवाला ओढण्यापेक्षा देवाच्या समोर चांगले संकल्प केले तर पुढे जाऊ : उदय सामंत
174
comment0
Report
VBVAIBHAV BALKUNDE
Nov 25, 2025 13:04:07
Latur, Maharashtra:लातूरचे माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला आहे. गोजमगुंडे हे काँग्रेसचे माजी मंत्री अमित देशमुख यांचे अत्यंत विश्वासू आणि जवळचे सहकारी म्हणून ओळखले जातात. सन २०१९ ते २०२२ या काळात त्यांनी लातूर महानगरपालिकेचे महापौर म्हणून जबाबदारी सांभाळली होती. महापालिकेची निवडणूक तोंडावर असतांना त्यांनी केला हा अचानक प्रवेश काँग्रेसमध्ये मोठी खळबळ उडवला आहे. लातूर शहराचे महापौर होते आणि पक्ष संघटनात सक्रिय होते. त्यामुळे त्यांचा भाजप–महायुतीसोबतचा नवा राजकीय प्रवास काँग्रेस आणि आमदार अमित देशमुख यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
123
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Nov 25, 2025 12:06:28
Akola, Maharashtra:अकोला जिल्ह्यातील बाळापूर नगरपरिषद निवडणुकीत महिला आरक्षणाचा मोठा बोलबाला असताना, प्रचाराच्या बॅनरवर मात्र "महिला उमेदवार" बेपत्ता असल्याची गंमतशीर पण विचार करायला लावणारी परिस्थिती समोर आली आहे. शासन महिलांना राजकारणात पुढे आणण्यासाठी आरक्षण देते, पण इथे मात्र चित्र उलटं दिसत आहे. शहरात झळकत असलेल्या बॅनरवर नगराध्यक्षपदासाठी आरक्षित असलेल्या ओबीसी महिला उमेदवाराचा फोटो कुठेच नाही, उलट त्यांच्या पतींचे, वडिलांचे किंवा घरातील पुरुषांचे फोटो तळपत आहेत. त्यामुळे हा बॅनर नेमका कोणाचा प्रचार करतोय, महिलेचा की तिच्या घरातील पुरुष नेत्यांचा? असा प्रश्न मतदारांना पडू लागला आहे.पुरुषप्रधान संस्कृतीत महिला आरक्षण हा अडथळा तर ठरत नाही ना? असा चर्चेचा विषय गावोगावी रंगू लागला आहे. “उमेदवार कोण?” हा सोपा प्रश्न सोडवायलाच बॅनर पाहणाऱ्यांना आता अतिरिक्त प्रयत्न करावे लागत आहेत.यातला खरा ट्विस्ट असा की,महिला उमेदवार निवडून आल्यानंतर कामकाज कोण करणार? महिला की तिचे बॅनरवरील ‘प्रतिनिधी’ पुरुष? यावरही मतदारांमध्ये कुतूहल आणि संशय वाढू लागला आहे.निवडणूक प्रचारात उमेदवारांचा चेहरा महत्त्वाचा मानला जातो. पण या बॅनरनी मात्र नवाच ट्रेंड सेट केला आहे,उमेदवार गायब, आणि प्रचार मात्र फुल स्विंगमध्ये.
167
comment0
Report
ABATISH BHOIR
Nov 25, 2025 11:49:46
Kalyan, Maharashtra:केडीएमसी अधिकाऱ्यांच्या दालनातील एसी काढण्यासाठी आम आदमी पार्टीचे एसी फोडो आंदोलन शासन निर्णयानुसार एकही अधिकारी एसी कार्यालयासाठी पात्र नाही, Anc : शासन परिपत्रकानुसार कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा एकही अधिकारी त्यांच्या कार्यालयात एसी लावण्यास पात्र नसून केडीएमसी मुख्यालय तसेच इतर प्रभाग क्षेत्र कार्यालयांमध्ये शासन निर्णयाचे उल्लंघन करून एसी लावण्यात आल्या आहेत. या सर्व एसी काढून हा शासन आदेश निघाल्यापासून ते आतापार्यंत एसीचा वापर झालेले विद्युत बिल सबंधित अधिकाऱ्यांच्या पगारातून वसूल करण्याच्या मागणीसाठी केडीएमसी मुख्यालया बाहेर आम आदमी पार्टीच्या वतीने प्रतीकात्मक एसी फोडो आंदोलन करत निदर्शने करण्यात आली. वातानुकूलित यंत्रणा बसविण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या दि.२५ मे २०२२ रोजीच्या शासन निर्णयानुसार सातवे वेतन आयोग महाराष्ट्र नागरी सेवा सुधारित वेतन नियम २०१९ वेतन स्तर १ लाख ४४ हजार २०० ते २ लाख १८ हजार २०० च्या परिपत्रका नुसार कल्याण डोंबिवली महापालिकेत आयुक्तांसह कोणीही अधिकारी पात्र नसल्याने त्वरीत हे वातानुकूलित यंत्र काढून टाकण्याची मागणी आपने केली असल्याची माहिती आम आदमी पार्टीचे कल्याण डोंबिवली शहर अध्यक्ष ॲड. धनंजय जोगदंड यांनी दिली.
212
comment0
Report
Advertisement
Back to top