Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Thane421301

कल्याण पश्चिमात भीषण आग: ज्वलनशील केमिकलचा साठा स्फोटक ठरला!

ABATISH BHOIR
Jul 12, 2025 01:30:54
Kalyan, Maharashtra
कल्याण पश्चिम वसंत व्हॅलीतील परिसरात भीषण आग डी मार्ट शेजारील नवीन इमारतीच्या गोडाऊनला लागली आग मध्यरात्री सुमारे १ ते २ वाजण्याच्या सुमारास लागली आग गोडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणावर ज्वलनशील केमिकलचे ड्रम साठा असल्याने आग लागताच जोरदार स्फोट होत आगीने काही क्षणांतच रौद्र रूप धारण केले. अग्निशामक दलाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल होत. दिड ते दोन तासाच्या प्रयत्न करत आग आणली आटोक्यात . सुदैवाने जीवितहानी टळली Anc..कल्याण पश्चिमेतील वसंत व्हॅली परिसरात मध्य रात्री दोन च्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. डी मार्टच्या शेजारी सुरू असलेल्या एका नव्या इमारतीच्या गोडाऊनमध्ये ही आग लागली. विशेष म्हणजे या गोडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणावर केमिकलचे ड्रम साठवण्यात आले होते. त्यामुळे आग लागताच मोठा स्फोट झाला आणि आगीने रौद्र रूप धारण केले. आगीच्या तीव्रतेमुळे संपूर्ण परिसरात धुराचे लोट पसरले. आगीची माहिती मिळताच अग्निशामक दल तात्काळ घटनास्थळी धाव घेत सुमारे एक तास युद्धपातळीवर काम करत या आगीवर नियंत्रण मिळवले या आगीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही रात्रीची वेळ असल्यामुळे गोडाऊनमधील कामगार बाहेर पडल्यामुळे मोठा अनर्थ टळला. मात्र या आगीत मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्याचे प्राथमिक अंदाज आहे.
14
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

Advertisement
Advertisement
Back to top