Back
ठाणे में श्रमजीवी संगठन आत्मक्लेश से आत्मनिर्धार के विरोध का आक्रामक प्रदर्शन करेगा
UJUmesh Jadhav
Nov 06, 2025 01:16:47
Thane, Maharashtra
कातकरींच्या अस्तित्वासाठी श्रमजीवी संघटना करणार आत्मक्लेशातून आत्मनिर्धार.. ५ नोव्हेंबर पासून ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर देणार आत्मक्लेशातून आत्मनिर्धाराकडे लढा... ठाण्यात आत्मनिर्धार सुरु असताना श्रमजीवीच्या प्रत्येक गावा, पाड्यात उपवास करून सायंकाळी दारात लागणार आत्मक्लेशातून निर्धाराचा दिवा.... देश स्वातंत्र्याच्या शताब्दीच्या उंबरठ्यावर आहे. तर देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईपासून केवळ काही किलोमीटर अंतरावर राहणाऱ्या आदिम कातकऱ्यांच्या श्रमाचा अमानुष बाजार आहे. लहान मुलांचं बालपण खुडून नेलं जातंय तर त्यांच्या माणूस म्हणून जगणच नाकारलं जातंय. दारिद्र्य, अन्याय आणि प्रशासनाच्या दीर्घकालीन अंमलबजावणीतील दिरंगाईमुळे हा आदिम समाज खुले आम उध्वस्ततेच्या मार्गावर उभा आहे. श्रमजीवी संघटनेने या आदिवासी जमातीसाठी आत्मक्लेशातून आत्मनिर्धाराचे निर्णायक पाऊल उचले आहे. येत्या ५ ते ६ नोव्हेंबर दरम्यान ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या विदारक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर उत्तरदायित्वाची भावना म्हणून श्रमजीवी संघटनेचे अध्यक्ष रामभाऊ वारणा आणि संस्थापक विवेक पंडित तसेच संघटनेचे ज्येष्ठ पदाधिकारी आत्मक्लेशातून आत्मनिर्धार’ मौन पाळून साधणार आहेत.\nया अन्यायकारक आणि मानवी संवेदनांना चिरडून टाकणाऱ्या आजच्या विदारक परिस्थितीकडे शासन आणि समाजाचे लक्ष वेधण्यासाठी श्रमजीवी संघटनेचा ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 5 नोव्हेंबरला ‘आत्मक्लेशातून आत्मनिर्धार सुरु असताना संघटनेच्या प्रत्येक गावा पाड्यात प्रौढ सभासद दिवसभर उपाशी राहून आत्मक्लेश करुन सायंकाळी प्रत्येक गावा गावात, पाड्या - पाड्यात आपल्या घरा - दारात नव्या आत्मनिर्धाराचा प्रतिकात्मक दिवा लावला जाणार आहे.\nया ५-६ नोव्हेंबर २०२५ रोजी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर होणार आहे. शासनाने तात्काळ ठोस आणि परिणामकारक पावले उचलून कातकरी समाजाला माणूस म्हणून जगण्याचा आणि सन्मानाने उभं राहण्यासाठी अधिकारांची अंमलबजावणी करावी, अशी मागणी या लढ्यातून केली जाणार असल्याची माहिती श्रमजीवी संघटनेचे अध्यक्ष रामभाऊ वारणा यांनी दिलेली आहे. आत्मक्लेशातून आत्मनिर्धार केवळ संघर्ष नसून परागंदा होत असलेल्या समाजाच्या अस्तित्वासाठीचा ‘निर्धार’ आहे, अशी माहिती श्रमजीवी संघटनेने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिलेली आहे.
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
NMNilesh Mahajan
FollowNov 06, 2025 03:17:080
Report
MTMadesh Tiwari
FollowNov 06, 2025 03:16:570
Report
VKVishal Kumar
FollowNov 06, 2025 03:16:470
Report
RZRajnish zee
FollowNov 06, 2025 03:16:370
Report
SKSantosh Kumar
FollowNov 06, 2025 03:16:260
Report
VCVikash Choudhary
FollowNov 06, 2025 03:16:130
Report
ABAnnu Babu Chaurasia
FollowNov 06, 2025 03:16:040
Report
GPGYANENDRA PRATAP
FollowNov 06, 2025 03:15:440
Report
VCVikash Choudhary
FollowNov 06, 2025 03:15:30Noida, Uttar Pradesh:लखीसराय। डिप्टी सीएम विजय कुमार सिन्हा ने किया मतदान。
0
Report
GPGYANENDRA PRATAP
FollowNov 06, 2025 03:15:220
Report
SKSantosh Kumar
FollowNov 06, 2025 03:15:110
Report
SSSUNIL SINGH
FollowNov 06, 2025 03:10:330
Report
RKRishikesh Kumar
FollowNov 06, 2025 03:10:210
Report
NMNitesh Mishra
FollowNov 06, 2025 03:10:110
Report