Back
जळगाव में ठाकरे गुट से बीजेपी में बड़ा प्रवेश; महाजन-लढ़्ढा समेत कई नेता शामिल
WJWalmik Joshi
Nov 01, 2025 11:07:07
Jalgaon, Maharashtra
जळगाव – ठाकरेंच्या शिवसेनेला आज मोठा धक्का बसला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील अनेक पदाधिकारी, माजी नगरसेवक आणि शेकडो शिवसैनिकांनी आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. हा प्रवेश सोहळा राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत जल्लोषात पार पडला. या प्रवेश सोहळ्यात जळगाव शहराच्या दोन माजी महापौरांनी अधिकृतरीत्या शिवसेनेला रामराम ठोकत भाजपाचा झेंडा हाती घेतला. यामध्ये माजी महापौर जयश्री महाजन आणि माजी महापौर नितीन लढ्ढा यांचा समावेश आहे. तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान चेअरमन सुनील महाजन यांनी देखील आपल्या समर्थकांसह भाजप प्रवेश केला. महाविकास आघाडीच्या वतीने नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत जयश्री महाजन यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून उमेदवारी दिली होती. मात्र, निवडणुकीनंतर पक्षातील वाढत्या अंतर्गत मतभेदांमुळे आणि स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांमधील नाराजीनंतर त्यांनी अखेर भाजपात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. या कार्यक्रमात जळगाव शहरातील शिवसेनेचे अनेक माजी नगरसेवक, पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात भाजप प्रवेश केला. या प्रसंगी मंत्री गिरीश महाजन यांनी नवीन कार्यकर्त्यांचे स्वागत करताना म्हटले, या प्रवेशानंतर जळगावमधील राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता आहे. ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आता संघटनात्मक आव्हान निर्माण झाले असून, भाजपासाठी मात्र हा मोठा राजकीय लाभ मानला जात आहे. गिरीश महाजन पत्रकार परिषद, गिरीश महाजन ऑन भाजप पक्ष प्रवेश, जळगाव शहरातील सूचना ठाकरे गटाचे सर्व प्रमुख पदाधिकारी दोन माजी महापौर व 14 ते 15 नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. महापालिकेच्या गेल्या निवडणुकीत 74 पैकी 57 नगरसेवक भाजपची निवडून आले होते या वेळेला महाराष्ट्रामध्ये आम्ही विक्रम करू व सर्वात जास्त नगरसेवक जळगाव महापालिकेमध्ये महायुती विक्रम करणार. गिरीश महाजन ऑन जळगाव महापालिका महायुती, जळगाव महापालिका निवडणुकीत महायुतीतील पक्षांचा आम्ही योग्य सन्मान करू जागा देण्याबाबत अद्याप चर्चा झालेली नाही. महायुतीबाबत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याशी चर्चा केली त्यामुळे महायुतीबाबत इथे कुठेही अडचण नाही. महाराष्ट्रात महायुतीबाबत सर्वात आधी एकमत हे जळगाव मध्ये. पाचोरा मध्ये आमदार किशोर पाटील यांनी स्वतंत्र लढण्याची भूमिका घेतली आहे त्यामुळे येथे स्वतंत्र लढण्याचा निर्णय आम्हालाही करावा लागला. जळगाव महापालिका निवडणुकीत महायुतीतील पक्षांचा आम्ही योग्य सन्मान करू जागा देण्याबाबत अद्याप चर्चा झालेली नाही. गिरीश महाजन ऑन जुने कार्यकर्ते नाराज. शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना पक्षात घेतल्याने कुठल्याही कार्यकर्त्यांची नाराजी नाही. सर्वात सुखर प्रवेश प्रक्रिया ही जळगाव मध्ये झाली, कुणाचीही नाराजी नाही. कुणाला काही वाटत असेल तर सर्वांचा आम्ही शंकेचे निरसन करू. जुने कार्यकर्ते असो वा नवे सर्वांना आम्ही न्याय देऊ. ज्यांनी बंडखोरी केली त्यांनाही पक्षात प्रवेश देणार जे कोणी राहिलेले आहेत तेही लवकरच पक्ष प्रवेश करणार. प्रमुख पदाधिकाऱ्यांचे समर्थक यांना पक्षा त घ्यावं लागेल. गिरीश महाजन ऑन महापालिकेच्या पार्श्वभूमीवर तडजोड. शिवसेनेच्या माजी महापौरांना पक्षात घेण्याबाबत कुठलीही तडजोड केलेली नाही. जळगाव जिल्हा हा भाजप व ओरिजनल शिवसेनेवर प्रेम करणारा जिल्हा आहे. सुरेश दादा जैन हे शिवसेनेत नंतर आले , जळगाव हा भाजपचा गड आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी राज्यात चुकीच्या गोष्टी पसरवल्या गेल्या मात्र जळगाव जिल्ह्यातील दोन्हीही लोकसभेच्या जागा या तीन लाखांच्यावर निवडून आल्या. जळगाव जिल्हा हा भाजप व महायुतीचा गड असल्याने आमच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून ठाकरे गटाचे माजी महापौर व नगरसेवकांनी भाजप प्रवेश केला. जुनी नवीन असा कुठलाही वाद दिसणार नाही सर्वजण एकमताने काम करतील. पक्षात गटबाजी बंडखोरी कोणी करणार नाही. गिरीश महाजन ऑल विधानसभा बंडखोरी.
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
MKMukesh Kumar
FollowNov 01, 2025 14:15:220
Report
RNRajesh Nilshad
FollowNov 01, 2025 14:10:330
Report
AMALI MUKTA
FollowNov 01, 2025 14:10:190
Report
VPVEDENDRA PRATAP SHARMA
FollowNov 01, 2025 14:10:080
Report
NPNavratan Prajapat
FollowNov 01, 2025 14:09:540
Report
AKAshwani Kumar
FollowNov 01, 2025 14:09:410
Report
RKRaj Kishore
FollowNov 01, 2025 14:09:220
Report
BDBabulal Dhayal
FollowNov 01, 2025 14:09:040
Report
RKRakesh Kumar Bhardwaj
FollowNov 01, 2025 14:08:040
Report
RKRakesh Kumar Bhardwaj
FollowNov 01, 2025 14:07:570
Report
BDBabulal Dhayal
FollowNov 01, 2025 14:07:480
Report
RKRAJESH KUMAR
FollowNov 01, 2025 14:07:360
Report
JPJai Pal
FollowNov 01, 2025 14:07:180
Report
DIDamodar Inaniya
FollowNov 01, 2025 14:07:110
Report
ASAkhilesh Sharma
FollowNov 01, 2025 14:07:000
Report