Back

"वयोवृद्धांचा धक्का ठरला उपयोगी, बंद पडलेली एस.टी. बस पुन्हा झाली सुरू!"
Kolpewadi, Maharashtra:
सुरेगावमध्ये कोपरगावहून आलेली एस.टी. बस अचानक बंद पडल्याने प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला. मात्र या वेळी धावून आले ते गावातील चार ते पाच वयोवृद्ध! झुकलेली पाठ, डोळ्यांवर चष्मा आणि हातात काठी… तरीही त्यांनी थेट बसला धक्का देत सुरू करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या पाठोपाठ काही युवकही पुढे सरसावले आणि काही क्षणांतच बसने हालचाल सुरू केली. या कृतीमुळे "वय म्हणजे आकडा" हे पुन्हा सिद्ध झालं. गावात आणि सोशल मीडियावर या वयोवृद्धांचं भरभरून कौतुक होत आहे.
14
Report