Back

शेतात जाण्यासाठी देवखेडच्या शेतकऱ्यांचा जीवघेणा प्रवास; 600 फूट नदी पार करतात थर्माकोल वर
Khamgaon, Maharashtra:
बुलढाणा जिल्ह्यातल्या देवखेड येथील शेतकरी शेतात जाण्यासाठी चक्क थर्मकोल वर बसून शेतात जाण्यासाठी जीवघेणा प्रवास करतात. खडकपूर्णा नदीचे 600 फुटाचे पात्र पार करताना जीव मुठीत घेऊन आजपर्यंत प्रवास सुरू आहे मात्र प्रशासन शेतकऱ्यांचा या गंभीर समस्येकडे लक्ष द्यायला तयार नाही.याच गावातील शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या नदीवर पुलाचे काम करण्यात आले मात्र ठेकदाराने ते अर्धवट सोडल्याने आता शेती कशी करायची असा प्रश्न या शेतकऱ्यांना पडला आहे.
1
Report
कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी घेतले खाटू श्याम बाबांचे दर्शन
Khamgaon, Maharashtra:
बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव मध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये श्री खाटू श्याम बाबांच्या प्रेमींकडून भजन संध्याचे आयोजन करण्यात आले होते या भजन संध्या मध्ये महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनीही या भजन संध्याच्या कार्यक्रमांमध्ये आपली उपस्थिती दर्शवली सर्वप्रथम त्यांनी श्री खाटू श्याम बाबांचे दर्शन घेतले व भजन संध्या च्या कार्यक्रमांमध्ये ते सहभागी झाले.
3
Report
बुलढाणा जिल्ह्याला रेड अलर्ट; खामगावात सकाळपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात
Khamgaon, Maharashtra:
दिल्या पाच ते सहा दिवसापासून बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव मध्ये रिमझिम पाऊस सुरू आहे मात्र काल हवामान खात्याने बुलढाणा जिल्ह्याला रेड अलर्ट दिला त्यानंतर आज सकाळपासूनच खामगाव शहर व परिसरामध्ये मुसळधार पावसाला जोरदार सुरुवात झाली. गेल्या तीन ते चार तासांपासून खामगाव शहर व परिसरामध्ये मुसळधार पाऊस पडत असल्याने जनजीवन विस्कळीत झाल्याचे दिसून येत आहेत.
2
Report
खामगावात अभियंता दिवस, पदग्रहण समारंभ आणि आधुनिक बांधकाम साहित्याची भव्य प्रदर्शनी
Khamgaon, Maharashtra:
बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथे आज अभियंता दिवसाचे औचित्य साधून पदग्रहण समारंभ आणि आधुनिक बांधकाम साहित्याची मोफत भव्य प्रदर्शनी उत्साहात पार पडली. या सोहळ्याला महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री आकाश फुंडकर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.या प्रसंगी मंत्री फुंडकर यांनी अभियंते हे समाजाच्या विकासाचे खरे शिल्पकार असल्याचे सांगत, तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शाश्वत व आधुनिक बांधकामाची दिशा दाखवण्याचे आवाहन केले. नव्या पदाधिकाऱ्यांचा यावेळी पदग्रहण सोहळा संपन्न झाला.
1
Report
Advertisement