Back
नांदेडमध्ये तरुणीचे अपहरण, आरोपीची पोलीसांनी धिंड काढली!
SMSATISH MOHITE
Jul 31, 2025 09:21:30
Nanded, Maharashtra
Satish Mohite
Slug - Ned_Parade
Feed on - 2C
---------------------------
Anchor - नांदेड शहरात भरदिवसा तरुणीचे अपहरण करणाऱ्या आरोपीची पोलीसांनी धिंड काढली. काल नांदेड शहरातील रेल्वे स्टेशन परिसरातून दोघांनी एका तरुणीचे अपहरण केले होते. मुलीला बळजबरीने उचलून दुचाकीवरुन नेतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. दरम्यान काही तासात पोलीसांनी त्या तरुणीची सुखरुप सुटका केली होती. 23 वर्षीय आरोपी महोमद खाजा आणि अन्य एक अल्पवयीन आरोपीला वजिराबाद पोलीसांनी अटक केली. आज आरोपी महोमद खाजा याला बेड्या ठोकून रेल्वे स्टेशन परिसरात त्याची धिंड काढण्यात आल.. ज्या ठिकाणाहून आरोपी महोमद खाजा याने तरुणीचे अपहरण केले होते त्याच भागात त्याला बेड्या ठोकून पोलीसांनी रस्त्याने फिरवले.
-----------------
14
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PPPRAFULLA PAWAR
FollowAug 01, 2025 06:51:20Raigad, Maharashtra:
स्लग - रस्त्यावरील खड्ड्यात साचलेल्या चिखलात बसून आंदोलन ...... कर्जत तालुक्यातील रस्त्यातील खड्डे बुजवण्याची मागणी ......
अँकर - कर्जत तालुक्यातील सर्व रस्ते खड्डे मुक्त करावेत या मागणी साठी सामाजिक कार्यकर्ते रमेश कदम यांनी अनोखं आंदोलन सुरू केलं आहे. कर्जत कोंदीवडे मार्गावरील तमनाथ इथं रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात बसून ते आंदोलन करताहेत. खड्ड्यात साचलेल्या चिखलात त्यांनी बस्तान मांडलं आहे. रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे नागरिकांना प्रचंड त्रास होतोय त्याकडे यंत्रणांचे दुर्लक्ष होत असल्याचा कदम यांचा आरोप आहे.
0
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowAug 01, 2025 06:48:16Solapur, Maharashtra:
सोलापुर ब्रेकिंग – सरसंघचालक मोहन भागवत को पकड़कर लाने का आदेश मिला था - महबूब मुजावर
( Mobile Whatsup Live For Hindi & Dibet Show )
मालेगांव बम विस्फोट की जांच के दौरान मुझे मोहन भागवत को पकड़कर लाने का आदेश दिया गया था।
मुझे राज्य में किसी भी अधिकारी को जांच के लिए चुनने की पूरी छूट दी गई थी।
लेकिन मैंने वह आदेश नहीं माना, इसलिए मुझ पर झूठा केस डाला गया।
उस समय एटीएस प्रमुख परमबीर सिंह मेरे सीनियर थे।
सात–आठ साल बाद मैं इस केस से बेकसूर साबित हुआ, ऐसा भी महबूब मुजावर ने कहा।
Whatsup Live -
महबूब मुजावर – मालेगांव बम विस्फोट मामले के रिटायर्ड एटीएस (ATS) अधिकारी।
3
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowAug 01, 2025 06:48:11Beed, Maharashtra:
बीड: परळीजवळ शिवशाही - ॲपेरिक्षाचा अपघात, रिक्षाचालकाचा मृत्यू...
संतप्त जमावाकडून बसवर दगडफेक
Anc- बीडहून नांदेड कडे निघालेल्या शिवशाही बस आणि ॲपेरिक्षाचा भीषण अपघात झाला. अपघातात रिक्षाचालक जागीच ठार झाला आहे. घटना परळीच्या पांगरी गावाजवळ घडली आहे. शेतात मजूर सोडून परतत असताना ॲपेरिक्षाला शिवशाही बसने जोराची धडक दिली यात रिक्षा चालकाचा जागीच मृत्यू झाल्याने जमाव संतप्त झाला. जमावाकडून शिवशाही बसवर दगडफेक देखील करण्यात आली. घटनेनंतर तब्बल दीड तास वाहतूक ठप्प होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली आहे.
1
Report
AAASHISH AMBADE
FollowAug 01, 2025 06:48:02Chandrapur, Maharashtra:
Feed slug :---
( 3 file sent on 2C)
टायटल:-- चंद्रपूरच्या व्हॉईस ऑफ मेलोडी ऑर्केस्ट्राचा सुवर्ण महोत्सव, एकाहून एक सरस गाण्यांनी साजरा झाला सुवर्णमहोत्सव, जुन्या जाणत्या आणि नव्या गायकांनी देखील सादर केली गीतं, विदर्भभर गाजलेल्या या ऑर्केस्ट्राने गाजविलेल्या सुवर्णकाळाची
अँकर:--चंद्रपूरच्या व्हॉईस ऑफ मेलोडी ऑर्केस्ट्राचा सुवर्ण महोत्सव सुरेल कार्यक्रमाने साजरा करण्यात आला. शहरातील प्रियदर्शिनी सभागृहात आयोजित कार्यक्रमात एकाहून एक सरस गीतं सादर करण्यात आली. या वाद्यवृंदात काम केलेल्या जुन्या जाणत्या आणि नव्या गायकांनी देखील उत्तमोत्तम गाणी सादर केली. विदर्भभर गाजलेल्या या ऑर्केस्ट्राने गाजविलेल्या सुवर्णकाळाची आठवण उपस्थितांना या निमित्ताने झाली. व्हॉईस ऑफ मेलोडी या ऑर्केस्ट्रा ने चंद्रपूर व अन्य जिल्ह्यात संगीताचे असंख्य यशस्वी कार्यक्रम दिले आहेत. हा ऑर्केस्ट्रा आपल्या गाण्यांची विशेष शैली व सुमधुर सादरीकरणासाठी प्रसिद्ध आहे. या कार्यक्रमात ऑर्केस्ट्राच्या वरिष्ठ सदस्य आणि कलाकारांचा सत्कार करण्यात आला. जन समर्थन लाभलेल्या एखाद्या ऑर्केस्ट्राने गाठलेल्या या टप्प्याचे कौतुक करण्यासाठी सभागृह तुडुंब भरले होते.
बाईट १) बंडू देठे, ऑर्केस्ट्रा संयोजक
----------गाण्याचे अंश-------
आशीष अम्बाडे
झी मीडिया
चंद्रपूर
4
Report
PNPratap Naik1
FollowAug 01, 2025 06:20:52Kolhapur, Maharashtra:
Kop Jotiba Pedha
Feed :- 2C
Anc :- दख्खनचा राजा जोतिबा डोंगरावर असणाऱ्या चोपडाई देवीच्या श्रावण षष्ठी यात्रेत तब्बल 400 किलो वजनाचा भेसळयुक्त पेढा, बर्फी आणि हलवा जप्त करण्यात आलाय. अन्न आणि औषध प्रशासनाने ही कारवाई केली आहे. जोतिबा डोंगरावर वारंवार भेसळयुक्त पेढे सापडत असल्याने भक्तांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचं यावरून सिद्ध होत आहे. सांगली जिल्ह्यातील डफळापुर इथल्या उत्तम शिंदे यांच्याकडून खरेदी केलेला पेढा, बर्फी आणि हलवा सदाशिव वारेकर गणेश वारेकर पोपट वाडेकर आणि फारुख वझरवाट यांनी श्रावण षष्ठी यात्रेनिमित्त विक्रीसाठी आणला होता. त्या मालाची विक्री शंभर रुपये पाव किलो प्रमाणे सुरू होती. यावेळी जोतिबा डोंगरावरील माजी ग्रामपंचायत सदस्य सुनील नवाळे यांना हा माल भेसळुकत असल्याचा संशय आला, त्यांनी तात्काळ अन्न आणि औषध प्रशासनाच्या पथकाला यासंदर्भात माहिती दिली. यानंतर अन्न आणि औषध प्रशासनाने हा माल जप्त करून तपासणी केली. त्यावेळी हा सर्व माल भेसळयुक्त असल्याचे स्पष्ट झाले. अन्न आणि औषध प्रशासनाने याचे नमुने तपासणीसाठी पाठवले असून उर्वरित भेसळयुक्त पेढे आणि बर्फी ट्रॉलीने भरून डम्पिंग ग्राउंड मध्ये टाकण्यात आला. जप्त केलेल्या पेढे बर्फीच्या बॉक्सवर कोणतीही उत्पादन तारीख किव्हा एक्सपायर डेट नव्हती. पण या घटनेच्या निमित्ताने जोतिबा डोंगरावर वारंवार स्वतःच्या फायद्यासाठी व्यापारी भेसळयुक्त पेढे बर्फी आणि खवा विक्रीसाठी आणून भक्तांच्या जीवाशी खेळत असल्याचे दिसून आल आहे. त्यामुळे अन्न आणि औषध प्रशासनाने फक्त जुजबी कारवाई करून गप्प बसू नये तर डोंगरावर मॉक ड्रिल राबवत भेसळयुक्त पेढे, बर्फी आणि खवा विक्री करणाऱ्या व्यापारांच्या कठोर करणे अपेक्षित आहे, अन्यथा भेसळयुक्त प्रसाद भाविकांच्या जीवावर बेतायला वेळ लागणार नाही.
Byte :- सुनील नवाळे माजी ग्रामपंचायत सदस्य
7
Report
DPdnyaneshwar patange
FollowAug 01, 2025 06:02:12Dharashiv (Osmanabad), Maharashtra:
धाराशिव
DHARA_TULJA_MANDIR
आज पासून 10 ऑगस्ट पर्यंत तुळजाभवानी देवीचं धर्मदर्शन बंद.
व्हीआयपी आणि पेड दर्शन ही बंद.
मंदिराच्या जीर्णोद्धार कामामुळे देवीचं धर्मदर्शन बंद.
भक्तांना घेता येणार फक्त देवीच मुखदर्शन
पुरातत्व विभाग आणि मंदिर संस्थान चा निर्णय.
अँकर
धाराशिव_ महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या भक्तांसाठी आता एक महत्त्वाची बातमी. आज पासून पुढील दहा दिवस म्हणजे दहा ऑगस्ट पर्यंत महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी चे धर्म दर्शन बंद असणार आहे. भक्तांना आई तुळजाभवानीच फक्त मुखदर्शन घेता येईल. त्याचबरोबर व्हीआयपी व पेड पास दर्शन देखील बंद करण्यात आल आहे. प्रसिद्धी पत्र काढून मंदिर संस्थांन ने ही माहिती दिली आहे. तुळजाभवानी मंदिराच्या गाभाऱ्याला तडे गेल्याने त्याच्या दुरुस्तीचे काम सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे . नवरात्र उत्सवापूर्वी हे काम पूर्ण करण्याचं मंदिर संस्थांनच नियोजन आहे. पुरातत्त्व विभाग आणि मंदिर संस्थान कडून ाभार्याला प्लास्टर करण्याच काम सध्या सुरू आहे. त्यामुळे भक्तांना देवीचे धर्म दर्शन बंद करण्यात आले आहे . देवीच्या अभिषेक व इतर नित्य पूजा सुरूच राहतील.
5
Report
AKAMAR KANE
FollowAug 01, 2025 06:00:30kolhapur, Maharashtra:
नागपूर
Ngp CM bhagwat program
- कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्व विद्यालयाच्या अभिनव भारती आंतरराष्ट्रीय शैक्षणिक परिसरातील डॉ. केशव बळीराम हेडगेवार आंतरराष्ट्रीय शैक्षणिक भवनाचे लोकार्पण
- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते झाले
- या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी उपस्थित आहेत... तसेच मंत्री चंद्रकांत पाटील हे सुद्धा उपस्थित आहे....
live फ्रेम
5
Report
SRSHRIKANT RAUT
FollowAug 01, 2025 05:48:16Yavatmal, Maharashtra:
Anchor : यवतमाळ जिल्हा काँग्रेस अंतर्गत उफाळलेल्या दुफळीबाबत तोडगा काढण्यासाठी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी समन्वयक म्हणून माजी मंत्री सुनील केदार यांची नियुक्ती केली आहे. केदार लवकरच यवतमाळ मध्ये येऊन काँग्रेसच्या दुसऱ्या फळीतील नाराज नेते व पदाधिकाऱ्यांच्या भावना समजून घेणार आहेत. काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, आदिवासी मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष शिवाजीराव मोघे, आदिवासी मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष वसंत पुरके, वामनराव कासावार आदींवर स्थानिक नेत्यांनी हल्लाबोल करून हे नेते पराभूत काँग्रेसला नेस्तनाबूत करायला निघाले आहेत असा घणाघात केला होता. या नेत्यांचे चेहरे जनतेला पसंद नाही, पाडापाडीचे व गद्दारी करण्याचे राजकारण ज्यांनी केले ते काम करणाऱ्या पदाधिकारी कार्यकर्त्यांवरच पराभवाचे खापर फोडत आहेत, त्यामुळे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी वेळीच या नेत्यांना लाथ मारून हाकलावे, अन्यथा पक्षात मोठा स्फोट झाल्याशिवाय राहणार नाही असा इशाराही स्थानिक नेत्यांनी दिला होता.
साउंड बाईट : देवानंद पवार
9
Report
SGSagar Gaikwad
FollowAug 01, 2025 05:45:45Nashik, Maharashtra:
Feed send by 2c
Reporter-sagar gaikwad
Slug-nsk_wife_dance
- *पती पत्नीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना, अश्लील व्हिडिओ काढत पत्नीला नाचवले डान्सबारमध्ये...*
* *पती आणि त्याचा मित्र दोघांवर नाशिकच्या पंचवटी पोलिसांत गुन्हा दाखल, दोघे फरार पोलिसांकडून शोध सुरू ...*
अँकर
नाशिकमधून पती-पत्नीच्या नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना नाशिकच्या हिरावाडी येथे घडली आहे. पतीने पत्नीला गुंगीचे औषध देऊन तिचे अश्लील व्हिडिओ काढून ते व्हायरल करण्याची धमकी देत वेळोवेळी मारहाण आणि शिवीगाळ करून जबरदस्तीने डान्सबार मध्ये नाचण्यास भाग पाडले असे गंभीर आरोप पत्नीने केले आहे. पीडितीच्या तक्रारीनंतर नाशिकच्या पंचवटी पोलिसात पती आणि त्याच्या मित्रावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे... पुढील तपास पंचवटी पोलीस करत आहेत.
8
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowAug 01, 2025 05:30:31Amravati, Maharashtra:
Feed slug :- AMT_TAHASILADAR तीन फाईल आहे
रिपोर्टर :– अनिरुद्ध दवाळे, अमरावती 9503131919
तहसीलदार व मंडळ अधिकाऱ्याच्या अंगावर ट्रक चढविण्याचा प्रयत्न; हातुर्णा पेढी नदीपात्रातील घटना, ट्रकचालक व मजूर फरार
अँकर :- बडनेरा पोलिसस्टेशन अंतर्गत येणाऱ्या मौजा हातुर्णा नदीच्या पात्रामधील घाटामध्ये जाऊन अवैध रेतीच्या ट्रकची पाहणी करत असताना तहसीलदार व मंडळ अधिकाऱ्याच्या अंगावर ट्रक नेऊन त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना २० जुलैच्या मध्यरात्री घडली. २० जुलैच्या मध्यरात्री भातकुलीचे तहसीलदार अजित कुमार वेडे यांना गुप्त माहिती मिळाली की हातुर्णा वैधील पेढी नदीच्या पात्रामध्ये एक विना नंबरचा पांढऱ्या रंगाचा ४०७ मिनी ट्रक बदुसरा टाटा कंपनीचा मिनी ट्रकमध्ये आरोपी रेती भरून चोरून नेत आहे. या माहितीवरून तहसीलदार येडे यांनी सोबत महल अधिकारी राजेश दवणे यांना घेऊन दोघेही पेढी नदीपात्रात गेले. त्या ठिकाणी नदीमध्ये एक पांढरा रंगाचा नंबर प्लेट नसलेला ट्रक रेतीने भरलेला आढळून आला. तेथे असणान्या आरोपी ट्रकचालक साहेब खान पठाण (४५) रा. लालखडी अमरावती याला विचारपूस करीत असतानाच काही अंतरावर दुसरा टाटा एस कंपनीचा मिनी ट्रक आढळून आला. त्यामध्ये काही लोक रेती भरत होते.
तहसीलदार व मंडळ अधिकारी याना पाहताच ते लोक त्या ठिकाणावरून पळून गेलेः मात्र त्या ठिकाणी असलेला मिनी ट्रकसोबत घेण्याचे आदेश तहसीलदाराने त्या ठिकाणी असणाच्या ट्रकचालकाला देत असतानाच आरोपीने सदर ट्रक तहसीलदार अजितकुमार येडे व मंडळ अधिकारी यांच्या दिशेने वेगाने चालविला. ट्रक अंगावर आणत असल्याचे लक्षात येताच दोघांनीही समयसूचकता ठेवून ट्रकच्या बाजूला झाले. त्यामुळे सुदैवाने जीवितहानी झाली नाही मात्र ट्रकचालक पळून जाण्यात यशस्वी झाला. सदर घटनेची तक्रार मंडळाधिकारी संजय गोपाळराव दवणे यांनी बडनेरा पोलिसांना देऊन घटनास्थळी बोलाविले. त्यावरून बडनेरा पोलिसानी ट्रकचालकाविरूध्द सार्वजनिक संपत्ती नुकसान ३ सार्वजनिक प्रतिबंधक ७ असे विविध प्रकारचे बडनेरा पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहे. फरार आरोपीला शोधण्याची मोहीम पोलिसांनी सुरू केली आहे.
8
Report
GMGANESH MOHALE
FollowAug 01, 2025 05:20:40Washim, Maharashtra:
वाशिम :
File:0108ZT_WSM_CROP_INSURANCE
रिपोर्टर:गणेश मोहळे, वाशिम
अँकर: खरीपहंगाम २०२५ साठीच्या पिकविमा योजनेसाठी ३१ जुलै ही शेवटची तारीख निश्चित करण्यात आली होती.मात्र,शेतकऱ्यां कडून अपेक्षेप्रमाणे प्रतिसाद न मिळाल्यामुळे तसेच मागील दोन दिवसात मध्ये मध्ये तांत्रिक अडचण येऊन वेबसाईट बंद पडत होती त्यामुळे आता ही मुदत वाढवून१४ऑगस्टपर्यंत करण्यात आली आहे.गेल्या वर्षीच्या तुलनेत वाशिम जिल्ह्यात या योजनेतील शेतकरी व विमाअंतर्गत क्षेत्रात लक्षणीय घट झाली आहे. २०२४ मध्ये तब्बल ३ लाख ५३ हजार १० हेक्टर क्षेत्राचे पिकविमा संरक्षण करण्यात आले होते.पिक विम्याच्या निकषात बदल करण्यात आल्यामुळे मात्र यंदा ही संख्या मोठ्या फरकाने घटून अवघ्या १ लाख ६० हजार ६७३ हेक्टरवर आली आहे.गेल्या दोन महिन्यांत वाशिम जिल्ह्यात तीन वेळा अतिवृष्टी झाली आहे.अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी पिकविमा योजनेचा अधिक लाभ घ्यावा अशी अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्यांचा सहभाग घटल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.यावरून शासन व विमा कंपन्यांवरील शेतकऱ्यांचा विश्वास कमी होत असल्याचे संकेत मिळत आहेत.शासनाने योजनेची अंतिम मुदत वाढवून शेतकऱ्यांना एक संधी दिली असून, हवामानातील अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा,असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
14
Report
SMSATISH MOHITE
FollowAug 01, 2025 04:47:00Nanded, Maharashtra:
Satish Mohite
Slug - Ned_Hospital
Feed on - 2C
-----------------------------
Anchor - नांदेडच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात एका वृद्धाच्या पायाला उंदराने कुरतडल्याची घटना ताजी असतानाच आता ग्रामीण रुग्णालयात उंदीर महिला रुग्णाच्या अंगावर फिरत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. कंधार येथिल ग्रामीण रुग्णालयातील हा व्हिडिओ आहे. एक महिला रुग्ण बेडवर झोपलेली असताना उंदीर तिच्या अंगावर फिरत आहे. दुसऱ्या रुग्णच्या एका नातेवाईकाने हा व्हिडिओ मोबाईलमध्ये रेकॉर्ड केलाय. या रुग्णालयात एकच उंदीर नाही अनेक उंदीर फिरत असल्याचे व्हिडिओ मध्ये दिसत आहे. ग्रामीण रुग्णलयातील महिला वार्डात उंदरांचा सुळसुळाट दिसत असल्याने आरोग्य यंत्रणा किती ढिसाळ झाली आहे याचा प्रत्यय पुन्हा एकदा आलाय. आरोग्य यंत्रनाच सलाइनवर असल्याचे दिसून येत आहे. आता आरोग्यमंत्री या प्रकारावर काय उत्तर देतील हे पाहावे लागणार आहे.
-------------------------
14
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowAug 01, 2025 04:32:25Nala Sopara, Maharashtra:
Date-1aug2025
Rep-prathamesh tawade
Loc-nalasopara
Slug-NALASOPARA DRUGS
Feed send by 2c
Type-AVB
Slug- नालासोपाऱ्यात १८ लाखांचे अमली पदार्थ जप्त
नायजेरियन नागरिकाला अटक
अँकर - नालासोपाऱ्यात तुळींज पोलिसंकडून अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या एका नायजेरियन नागरिकाला अटक करण्यात आली आहे. यावेळी त्याच्या कडून १८ लाख ४३ हजारांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले.
नालासोपारा पूर्वेच्या सेंट्रल पार्क परिसरात एक व्यक्ती अमली पदार्थांच्या विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. याबाबत पोलिसांनी तपास करत चुक्वू एमेका जॉन पॉल (४८) या नायजेरियन नागरिकाला अटक केली.
यावेळी त्याच्याकडून ९ लाख ५२ हजार किंमतीचे मेफेड्रॉन (एम. डी.), ८ लाख ९१ हजार किंमतीचे एमडीएमए नावाचा अमली पदार्थ असा एकूण १८ लाख ४३ हजारांचा माल जप्त करण्यात आला. पॉल हा मूळचा नायजेरियन असून नवी मुंबईच्या खारघर येथे वास्तव्यास होता. त्याच्या विरोधात तुळींज पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
byte - विजय जाधव , पोलिस निरीक्षक , तुळींज पोलिस ठाणे.
14
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowAug 01, 2025 04:18:12Solapur, Maharashtra:
सोलापूर ब्रेकिंग - शेतकऱ्यांचे थकीत ऊस बिल देण्याच्या मागणीसाठी जनहित शेतकरी संघटनेने अधिकाऱ्यांना घातला घेराव
- सोलापुरात जनहित शेतकरी संघटनेकडून थकीत बिलावरून प्रादेशिक सहसंचालक कार्यालयात अधिकाऱ्याला घेराव घालत केलं आंदोलन
- सोलापूर जिल्ह्यातील थकीत साखर कारखान्याच्या बिलावरून जनहित शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केल आंदोलन
- अधिकाऱ्यांसमोर घोषणाबाजी करत साखर कारखाना विरोधात कारवाई करण्याची करण्यात आली मागणी
- येत्या आठ दिवसात फसवणूक केलेल्या कारखान्या विरोधात गुन्हे दाखल न झाल्यास तीव्र आंदोलनाचा दिला इशारा..
12
Report
PNPratap Naik1
FollowAug 01, 2025 04:02:04Kolhapur, Maharashtra:
पत्नी समजून दुसऱ्याच महिलेवर अंत्यसंस्कार, कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर इथली धक्कादायक घटना
कोल्हापूर ( प्रताप नाईक ) कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर इथं स्वतःची पत्नी समजून दुसऱ्याच महिलांवर अंत्यसंस्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. संबंधित महिलेवर अंत्यसंस्कार केल्यानंतर पत्नी गावात हजर झाली आणि त्यानंतर अंत्यसंस्कार झालेली महिला कोण याचा शोध सुरू झालाय. बेवारसपणे सापडलेल्या महिलेच्या गालावर असलेल्या तिळावरून संबंधित पतीने बेवारस मृतदेह आपल्याच पत्नीचा असल्याचं पोलिसांना सांगितलं होतं, त्यानंतर हा सर्व प्रकार घडला आहे.
याबाबत अधिक ची माहिती अशी जयसिंगपूर शहरातून 37 वर्षीय महिला बेपत्ता झाली होती. तिच्या पतीने पोलिसात पत्नी बेपत्ता असल्याची फिर्याद दिली होती. यानंतर दहा दिवसांनी सांगली जिल्ह्यातील बामणी नदीपात्रात एका महिलेचा सडलेला मृतदेह पोलिसांना आढळून आला. त्यानंतर पोलिसांनी ज्या पतीने पत्नी हरवल्याची फिर्याद दिली होती त्या पतीला संबंधित महिलेची ओळख पटवण्यासाठी बोलावून घेतलं. त्यावेळी संबंधित पतीने महिलेच्या गालावरील तीळ आणि नेसलेली साडी पाहून आपलीच पत्नी असल्याचे पोलिसांना सांगितले. त्यानंतर सर्व कुटुंबीयांनी मिळून त्या माहिलेवर अंत्यसंस्कार केले. बुधवारी सकाळी या महिलेचे रक्षा विसर्जन देखील पार पडले. यादरम्यान कुटुंबीय, पै पाहुण, मित्र मंडळी दुःखात असताना अचानक संबंधित पतीची पत्नी बचत गटाचा कर्जाचा हप्ता भरण्यासाठी घरी हजर झाली.. त्यावेळी सर्वांनाच धक्का बसला. यावेळी या महिलेला आपण समजून पत्नीने दुसऱ्याच महिलेवर अंत्यसंस्कार केल्याची माहिती मिळताच ती पत्नी पुन्हा घरातून निघून गेली. त्यामुळे अंत्यसंस्कार केलेली महिला नक्की कोण असा प्रश्न उपस्थित राहिला. पोलिसांना या संदर्भात माहिती मिळताच ते देखील खडबडून उठले, त्यांनी संबंधित महिलेला शोधून ती जिवंत असल्याची खात्री केली, पण त्यानंतर जयसिंगपूर पोलिसांनी अंत्यसंस्कार झालेल्या महिलेचा शोध सुरू केलाय. पण बेवारस आणि सडलेल्या अवस्थेत असलेल्या मृतदेहाच्या गालावरील एका तीळाने पती, पत्नी, कुटुंबीय आणि पोलिसांची चांगलीच भंबेरी उडाली आहे.
13
Report