Back
महिलांनी चंद्रपूरमध्ये रेल रोको, वाहतूक कोंडीवर उठवला आवाज!
AAASHISH AMBADE
Aug 16, 2025 12:19:56
Chandrapur, Maharashtra
Feed slug :--- 1608ZT_CHP_RAIL_ROKO
( single file sent on 2C)
टायटल:--- चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्घुस शहरात महिलांनी केले रेल रोको व चक्का जाम आंदोलन
अँकर:-- चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्घुस येथील जी-39 रेल्वे फाटक व अपूर्ण रेल्वे उड्डाणपुलामुळे निर्माण झालेल्या वाहतूक कोंडी व अपघातांच्या समस्येविरोधात आज महिलांनी रेल रोको आणि चक्का जाम आंदोलन केले. गेल्या तीन-चार वर्षांपासून उड्डाणपुलाचे काम अपूर्ण असून रेल्वे फाटक वारंवार बंद राहते. त्यामुळे शाळकरी मुले, रुग्णवाहिका, महिलांची सुरक्षितता तसेच नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. वाहतूक कोंडी, जड ट्रक प्रवाह, वायू प्रदूषण आणि वेळेचा अपव्यय याला नागरिक त्रस्त झाले आहेत. यापूर्वी ३ ऑगस्ट रोजी झालेल्या बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांनी १५ दिवसांत काम पूर्ण करण्याचे लिखित आश्वासन दिले होते, परंतु ते पाळले गेले नाही. आंदोलकांनी तत्काळ पूल पूर्ण करणे, फाटक बंद करण्यावर उपाययोजना, चौकात पोलिस बंदोबस्त व खड्डे दुरुस्ती अशी मागणी केली आहे.
आशीष अम्बाडे
झी मीडिया
चंद्रपूर
12
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PPPRAFULLA PAWAR
FollowAug 16, 2025 14:17:43Raigad, Maharashtra:
स्लग - माणगाव येथील दहीहंडी उत्सवात मंत्री भरत गोगावले यांनी धरला ठेका ..... गोगावले यांनी नॅपकिन फडकावताच चाहत्यांचा जल्लोष ......
अँकर - रायगडच्या माणगाव इथं आयोजित दहीहंडी उत्सवात मंत्री भरत गोगावले यांनी ठेका धरला. कोकणातील दहीहंडी उत्सवातील परंपरेनुसार हातात गदा
घेत फेर धरत नाच केला. त्याचवेळी गोगावले यांनी आपल्या हातातील नॅपकिन फडकावताच त्यांच्या चाहत्यांनी एकच जल्लोष केला. याच दहीहंडी उत्सवात भरत गोगावले यांच्या फोटो बरोबर फिक्स पालकमंत्री असा मजकूर लिहिलेले फलक झळकले आहेत.
4
Report
KJKunal Jamdade
FollowAug 16, 2025 13:47:42Shirdi, Maharashtra:
Shirdi News Flash
ह्रदय पिळवून टाकणारी घटना...
*बायको नांदायला येत नाही म्हणुन बापाने आपल्या चार अपत्यांसह संपवले जीवन...*
*राहाता तालुक्यातील को-हाळे शिवारात विहिरीत ढकलून स्वत: केली आत्महत्या...*
अरुण काळे ( वय 30 वर्ष ) राहणार चिखली कोरेगाव , तालुका श्रीगोंदा याने आपली एक मुलगी आणि तीन मुलांसह केली आत्महत्या...
एक हात आणि एक पाय दोरीने बांधलेल्या अवस्थेत विहिरीत आढळला अरुण काळे यांचा मृतदेह...
स्वत: हात पाय बांधुन आत्महत्या केल्याची शक्यता...
शिवानी अरुण काळे ( वय 8 ) , प्रेम अरुण काळे ( वय 7 ) वीर अरुण काळे ( वय 6 ) , कबीर अरुण काळे ( वय 5 ) अशी मयतांची नावे...
वडील अरुण काळे यांचेसह दोन बॉडी बाहेर काढण्यात यश , दोघांचा शोध सुरू...
*वादा - वादीमुळे बायको आठ दिवसांपुर्वी येवला येथे गेली होती माहेरी...*
घटना स्थळापासुन काही अंतरावर सापडली मोटारसायकल...
9
Report
GMGANESH MOHALE
FollowAug 16, 2025 13:31:05Washim, Maharashtra:
वाशिम:
File:1608ZT_WSM_FATAL_COW_ATTACK_CCTV
रिपोर्टर: गणेश मोहळे,वाशिम
अँकर: वाशिमच्या कारंजा शहरात मोकाट जनावरांचा उच्छाद सुरू असून त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. आज घडलेल्या एका घटनेने या समस्येची गंभीरता अधोरेखित झाली आहे.शाळकरी मुलगी व तिची आई तिला शाळेत सोडायला जात असताना अचानक एका मोकट गाईने त्यांच्यावर हल्ला केला.तर त्यांना वाचविणाऱ्या गेलेल्या नागरिकांवर देखील गाईने हल्ला केला आहे.या घटनेमध्ये मुलगी व आई या दोघीही गंभीर जखमी झाल्या असून सदरील जीवघेणी घटना ही सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे या घटनेनंतर नागरिकांमध्ये मोठी दहशत पसरली आहे.वाढत्या मोकाट जनावरांच्या समस्येकडे नगरपालिका प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
9
Report
NMNITESH MAHAJAN
FollowAug 16, 2025 13:17:56Jalna, Maharashtra:
FEED NAME :1608ZT_NANDED_PAINGANGA(6 FILES)
नांदेड :पैनगंगा नदीला महापूर, माहुर येथील धानोडा पुलावरुन वाहतेय पाणी ,माहुर शहराचा संपर्क तुटला
अँकर :नांदेड जिल्हयातील माहुर येथे देखील ढगफुटी सारखा पाऊस झाला .. शिवाय पैनगंगा नदीत पाण्याची आवक देखील मोठ्या प्रमाणात वाढली .. त्यामूळे पैनगंगा नदीला पुर आला .. माहुर येथील धानोडा येथील पुलावरुन पैनगंगेचे पाणी वाहत आहे . त्यामूळे हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला.. वाहतूक बंद असल्याने माहुर शहराचा संपर्क तुटलाय ...
12
Report
JJJAYESH JAGAD
FollowAug 16, 2025 12:46:54Akola, Maharashtra:
Anchor : हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार अकोल्यात गेल्या तीन तासांपासून पावसाने हजेरी लागावली आहे. या पावसामुळे कोरडवाहू परिस्थितीत असलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून पिकांना नवसंजीवनी मिळणार आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे परिसरात वातावरणात कमालीचा गारवा निर्माण झाला आहे. पावसामुळे नागरिकांनाही उकाड्यापासून दिलासा मिळाला असून सर्वत्र समाधानाचे वातावरण आहे.
13
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowAug 16, 2025 12:30:47Raigad, Maharashtra:
स्लग - अलीबागच्या कुर्डुस मधील विहिरीवरची दहीहंडी .... गोविंदाचे आकर्षण ठरतेय ही आगळी वेगळी हंडी ...... 33 वर्षांची अनोखी परंपरा .....
अँकर - अलीबागच्या कुर्डुस गावातील विहिरीवरची दहीहंडी अलीकडे गोविंदांसाठी आकर्षण ठरलं आहे.
सामान्यपणे दहीहंडी ही एकावर एक मानवी मनोरा रचून पारंपारिक पद्धतीने फोडली जाते. परंतु अलिबाग तालुक्यातील कुर्डुस गावात देऊळ आळीमध्ये दहीहंडी फोडण्याची आगळी वेगळी परंपरा पहायला मिळते. गावच्या मध्यभागी असलेल्या विहिरीवर ही दहीहंडी बांधली जाते. गोविंदा विहिरीच्या काठावरून उंच उडी मारून ही हंडी फोडतात. यावर्षी देखील ही विहिरीवरची दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदांनी गर्दी केली होती. विजेत्या गोविंदांना गदा आणि चषक देऊन सन्मानित करण्यात आले. गावात काहीतरी वेगळं करायचं या हेतूने ग्रामस्थानी 33 वर्षांपूर्वी सुरू केलेली ही विहिरीवरची दहीहंडी गोविंदाचे आकर्षण ठरलं आहे. ही हंडी पाहण्यासाठी आजुबाजूच्या गावातील नागरिकांनी देखील गर्दी केली होती.
बाईट १ - आयोजक ग्रामस्थ
बाईट २ - आयोजक ग्रामस्थ
13
Report
AAASHISH AMBADE
FollowAug 16, 2025 12:30:39Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--- 1608ZT_CHP_2_KIDS_DROWN
( single file sent on 2C)
टायटल:-- नदी पात्रात पोहायला गेलेल्या दोन मुलांचा नदीत बुडून मृत्यू , चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील घटना
अँकर:-- चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातल्या टेकरी नदीत पोहायला गेलेल्या दोन मुलांचा मृत्यू झाल्याची घटना शनिवार दुपारी घडली. जित वाकडे , आयुष गोपाले अशी मृतकाचे नावे आहेत .शालेय सुट्टीचा दिवस असल्याने नदीवर पोहण्यासाठी सिंदेवाही येथील काही मुले टेकरी गावाजवळील नदी घाटावर पोहण्यासाठी गेली होती. याच वेळी दोघांचा नदीच्या पाण्यात बूडून मृत्यू झाला. घटनेची माहिती प्राप्त होताच सिंदेवाही पोलीसांनी मृतकांचे शव पाण्यातून बाहेर काढल्यानंतर शवविच्छेदनासाठी सिंदेवाही ग्रामीण रुग्णालयात हलविले. या घटनेने वाकडे आणि गोपाले कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात दुर्दैवी घटनेमुळे शोक व्यक्त केला जात आहे. घटनेचा पुढील तपास सिंदेवाही पोलीस करीत आहेत.
आशीष अम्बाडे
झी मीडिया
चंद्रपूर
12
Report
GMGANESH MOHALE
FollowAug 16, 2025 12:30:20Washim, Maharashtra:
वाशिम :
File:1608ZT_WSM_RIVERS_FLOOD
रिपोर्टर:गणेश मोहळे,वाशिम
अँकर: वाशिम जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे.सोनखास गावाजवळील तामसी–सोनखास व आमानी-पांगरी रस्त्यावर असलेला पूल पाण्याखाली गेला आहे.दोन्ही पूल लहान असल्यामुळे नदीच्या पुराचे पाणी सहज जात नाही,परिणामी पुलालगतच्या शेतांचे मोठे नुकसान होत आहे.दरम्यान पुलावरून पाणी वाहत असल्याने सोनखास,तामसी,वाकद आणि शिरपूर, आमानी पांगरी या गावांना जोडणारा मार्ग वारंवार बंद पडतोय.त्यामुळे नागरिकांच्या ये-जा करण्यात मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत.
14
Report
ABATISH BHOIR
FollowAug 16, 2025 12:30:10Kalyan, Maharashtra:
आदित्य ठाकरे पॉईंटर..
रस्त्याची परिस्थिती पाहता लवकरच कल्याण डोंबिवली चा दौरा करणार
पलावा चा वर्ल्ड रेकॉर्ड पाहण्यासाठी लवकरच पुन्हा डोंबिवलीत येणार
महाराष्ट्राचे राजकारण पाहतात दोन्ही भाऊ एकत्र येण्याबाबत निर्णय घेतील
आजचा दिवस मी राजकारणावर बोलणार नाही आज फक्त बालिश लोकं राजकारणावर बोलतात
byre ... आदित्य ठाकरे
14
Report
AKAMAR KANE
FollowAug 16, 2025 12:20:39Nagpur, Maharashtra:
2c ला व्हिडिओ जोडला आहे
------
विदर्भात चंद्रपूर,गडचिरोली आणि यवतमाळ पावसाचा ऑरेंज अलर्ट
--- नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने दिला इशारा
-- गेल्या काचार दिवसात यवतमाळ जिल्ह्यात मुसळधार पाऊस होत असून आज पुन्हा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे
--= दरम्यान नागपुरातही दुपारनंतर पावसाच्या सरी कोसळत आहे
---- त्यामुळे उकाड्यापासून नागपूरकरांना थोडा दिलासा मिळाला आहे
13
Report
JMJAVED MULANI
FollowAug 16, 2025 12:20:12Baramati, Maharashtra:
JAVED MULANI
SLUG 1608ZT_INDAPURDOG
BYTE 2
इंदापुरात दहाहून अधिक नागरिकांना पिसाळलेल्या कुत्र्याने घेतला चावा....इंदापूर उपजिल्हा रुग्णालयात जखमेत दिली जाणारी अँटी रेबीज सिरम लसच नाही....गेल्या चार महिन्यापासून जखमेत दिली जाणारी लस नसल्याची धक्कादायक माहिती
Anchor_ पुण्याच्या इंदापूर शहरात आज सकाळपासून जवळपास 10 हून अधिक नागरिकांना एका कुत्र्याने चावा घेतलाय त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.या नागरिकांना इंदापूर उपजिल्हा रुग्णालयामध्ये प्राथमिक लसीकरण देखील करण्यात आली आहे.
मात्र या घटनेनंतर एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. पिसाळलेला कुत्रा चावल्यानंतर जखमेत दिली जाणारी अँटी रेबीज सिरम ही लसच गेल्या चार महिन्यापासून इंदापूर जिल्हा रुग्णालयाकडे उपलब्ध नसल्याचं समोर आले आहे.
राज्याच्या कृषिमंत्र्याच्या तालुक्यातच पिसाळलेला कुत्रा चावल्यानंतर आवश्यक असणारी जखमेत देण्याची अँटी रेबीज सिरम ही लस गेल्या चार महिन्यांपासून इंदापूर उपजिल्हा रुग्णालयाकडे उपलब्ध नसल्यामुळे इंदापूरमध्ये आरोग्य सेवेचा पुरता बोजवारा उडाल्याचं समोर आलं आहे. याबाबत कृषीमंत्री आगामी काळात कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
बाईट _अक्षय कदम, जखमी नागरिक
13
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowAug 16, 2025 12:20:05Parbhani, Maharashtra:
अँकर- ईसापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मजसळधार पाऊस सुरू असल्याने धरणात पाण्याचा मोठ्या प्रमाणात येवा सुरू आहे. शिवाय ईसापूर धरणात 96 टक्के
जलसाठा झाल्याने धरणाचे नऊ वक्रव्दार 50 सेंटीमीटरने उचलून पैनगंगा नदीत पाणी सोडण्यात आले आहे. पैनगंगा नदीपात्रात 14 हजार 963 क्युमेंक्सने पैनगंगेत पाण्याचा विसर्ग सुरू असून नदीकाठच्या गावांना सतर्कते ईशारा देण्यात आलाय,पैनगंगेत सोडलेल्या पाण्यामुळे माळेगाव पुसद महामार्गावरील सिऊर येथील पैनगंगेच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने माळेगाव पुसद महामार्ग बंद पडून तीन तासापासून या मार्गावरील गावांचा संपर्क तुटलाय, शिवाय पुलाच्या दुतर्फा वाहने खोळंबुन वाहतूक बंद पडलीय...
14
Report
SMSarfaraj Musa
FollowAug 16, 2025 11:20:18Sangli Miraj Kupwad, Maharashtra:
स्लग - गोपीचंद पडळकर म्हणजे बेंन्टेक्सचे सोने ! आमदार रोहित पवारांचा गोपीचंद पडळकरांवर अप्रत्यक्ष निशाणा..
फुटर - सांगली जिल्ह्यातील भाजपात नवीन झालेले आमदार बेंन्टेक्स सोन्या प्रमाणे आहेत,अशी टीका आमदार रोहित पवारांनी भाजपा आमदार गोपीचंद पडळकरांवर अप्रत्यक्षपणे केली आहे.चंद्रकांतदादा पाटील भाजपातील खरे सोने आहेत,पण त्यांच्या पक्षातील बेंन्टेक्सच्या सोनेकडुन खालच्या लेव्हलवर जाऊन मोठ्या नेत्यांवर करण्यात येत आहे टीका.त्यामुळे चंद्रकांतदादा यांनी त्यांच्या पक्षातील बेंन्टेक्सच्या सोन्याला सांभाळावे ,अशी विनंती केल्याचा खोचक टोलाही आमदार रोहित पवारांनी लगावलाय.
बाईट - रोहित पवार - आमदार - राष्ट्रवादी काँग्रेस ( SP )
13
Report
GMGANESH MOHALE
FollowAug 16, 2025 11:20:03Washim, Maharashtra:
वाशिम:
File:1608ZT_WSM_HEAVY_RAIN_KINKHEDA
रिपोर्टर:गणेश मोहळे,वाशिम
अँकर: वाशिम जिल्ह्यात दुपारनंतर पावसाने जोर धरला असून वाशिम तालुक्यातील किनखेडा परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस होऊन मोठे नुकसान झाले आहे.अति पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचले तसेच काही घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे हाल झाले व घरगुती साहित्याचे नुकसान होण्याची शक्यता आहे.परिसरातील नद्या-नाल्यांना पूर आल्याने शेतजमिनींमध्ये पाणी घुसले असून सोयाबीन,कापूस,मूग व उडीद पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.वाशिम जिल्ह्याला हवामान विभागाने आधीच मुसळधार पावसाचा इशारा दिल्यामुळे प्रशासनाने नागरिक व शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
14
Report