Back
उमरी तालुक्यातील ऑनर किलिंगचा व्हिडीओ व्हायरल, हृदयद्रावक दृश्ये!
SMSATISH MOHITE
Aug 28, 2025 11:21:31
Nanded, Maharashtra
Satish Mohite
Slug - Ned_ViralVideo
Feed on - 2C
---------------------------------
Anchor - नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यात ऑनर किलिंगच्या घटनेतील एक व्हिडीओ व्हायरल झालाय. उमरी तालुक्यातील गोळेगाव येथे पित्यानेच विवाहित मुलीला आणि तिच्या प्रियकराला ठार करून दोघांचा मृतदेह विहिरीत फेकून दिला होते. 25 ऑगस्ट रोजी ही घटना घडली होती. विवाहित प्रेयसीला भेटण्यासाठी बोरजूनी येथील लखन भंडारे गोळेगाव येथे गेला होता. विवाहितेच्या सासरच्या मंडळींनी दोघांना एकत्र पकडले होते. मुलीच्या वडिलांना बोलावण्यात आले होते. दोघांना परत बोरजूनी येथे घेऊन जाताना वाटेत संजीवनी आणि लखन ला मारहान करून विहिरीत फेकन्यात आले होते. घटनेपूर्वी प्रियकर आणि प्रेयसीची त्यांच्या नातेवाईकाणीच गावात धिंड काढल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. दोघांचे हात दोरीने बांधत गावात धिंड काढण्यात आल्याचे या व्हिडीओमध्ये दिसत आहे. दोघांची हत्या करून विवाहितेचे वडील स्वतःच पोलीस ठाण्यात हजर झाले होते.
------------
13
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SMSATISH MOHITE
FollowAug 28, 2025 14:17:03Nanded, Maharashtra:
Satish Mohite
Slug - Ned_Student
Feed on - 2C
-------------------------
Anchor - पुराच्या पाण्यामुळे पलीकडे अडकून पडलेल्या विद्यार्थ्यांना मानवी साखळी करून सुखरूप काढण्यात आले. नांदेड जिल्हयातील नायगाव तालुक्यातील कोलंबी येथील हळदा रोडवर पाणी आल्याने विद्यार्थी अडकून पडले होते. नायगाव तालुक्यात सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. अनेक भागात अतिवृष्टी झाली आहे त्यामुळे नदी नाल्याना पूर आलाय. या पुरात हाळदा - कोलंबी मार्गावर स्कूल बस अडकली होती. बस मध्ये 18 विद्यार्थी, एक शिक्षक आणि चालक होता. या सर्वांना पुराच्या पाण्यातुन बाहेर काढण्यात आले. स्थानिक नागरिक आणि आणि प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी मानवी साखळी करून या सर्व विध्यार्थाना सुरक्षितपणे बाहेर काढले.
------------------------
6
Report
KJKunal Jamdade
FollowAug 28, 2025 13:50:17Shirdi, Maharashtra:
Shirdi News Flash
जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील बाईट पॉईंटर्स -
ऑन मनोज जरांगे -
मनोज जरांगे यांना न्यायालयाने परवानगी दिली..
आमचीही त्यांचेशी चर्चेची तयारी...
उद्या मनोज जरांगे मुंबईत आल्यानंतर धोरण ठरेल...
ऑन राहुल गांधी -
राहुल गांधी यांनी धोरण ठरवाव..
ओबीसीत मराठ्यांना आरक्षण देवू...
ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही हि सरकारची अगोदर पासुन भुमिका ..
ऑन विरोधी पक्ष आरक्षण भुमिका -
शरद पवार , उद्धव ठाकरे , कॉग्रेसचे पुढारी बोलायला तयार नाही...
त्यांनी चुप्पी साधू नये , त्यांचेवर दायित्व होत त्यांनी तेव्हा केल नाही...
सर्व ओबीसी बांधवांना विनंती की संघर्ष यात्रा काढू नये...
ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही...
ऑन जरांगे सरकार चर्चा -
उद्या समितीची बैठक होणार नाही , उद्या संध्याकाळपर्यंत ठरेल केव्हा जरांगे यांचेशी बोलायच...
मुंबईत आल्यावर चर्चा होईल अशी अपेक्षा...
एका आंदोलनकर्त्यांचा मृत्यू झाल्याची घटना आहे त्यात सरकारकडून काय मदत देता येईल त्यासाठी प्रयत्न करू...
14
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowAug 28, 2025 13:48:22Dhule, Maharashtra:
ANCHOR - नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर शहरात पावसाचा कहर पाहायला मिळत आहे. शहरातील देवलफडी परिसरात अनेक घरातील पावसाचा पाणी शिरल असून, लाखोंचे साहित्य वाहून गेले आहे. पाणीचा निचरा होत नसल्याने घरात चार ते पाच फुटांपर्यंत पाणी साचले आहे. रस्त्याना तलावाचे रूप मिळाले असून, जनजीवन पूर्ण विस्कळीत झाले आहे. नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी तहसीलदार दत्तात्रय जाधव घटनास्थळी दाखल झाले असून, बचाव कार्य वेगात सुरु आहे. पाणीचा निचरा होण्यासाठी जेसीबीच्या सहाय्याने साचलेल्या पाण्याचा मार्ग मोकळा केला जात आहे. चार ते पाच फुटांपर्यंत पाणी घरात शिरल्याने संसार उपयोगी साहित्य खराब झाले असून, जनजीवन पूर्ण विस्कळीत झाले आहे.
प्रशांत परदेशी, नंदुरबार.
12
Report
ABATISH BHOIR
FollowAug 28, 2025 13:46:18Kalyan, Maharashtra:
कल्याण पश्चिम संदीप हॉटेल जवळ घटना..
दुचाकीवर असलेल्या " माई लेकीला "
भरधाव गाडीची धडक..
गाडी चालक पसार, अपघातात आई लेक जखमी, खाजगी रुग्णालयात उपचार सुरू,
Anc : कल्याण पश्चिम संदीप हॉटेल जवळ एका भरधाव गाडीने दुचाकीवर असलेल्या माई लेकीला जोरदार धडक दिली, या धडकेत माई लेकी गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे, धडक दिल्यानंतर हा गाडी चालक मात्र पसार झालाय, जखमी महिलेचे नाव रेखा पाटील, आणि कांचन पाटील, असे मुलीचे नाव आहे, रेखा पाटील, यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे, तर कांचन पाटील, यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे, या घटनेमुळे या भरधाव गाडी चालवत नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या गाडी चालकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे,
Vo रेखा पाटील, या आपल्या कुटुंबासह कल्याण पश्चिमेकडील खडकपाडा परिसरात राहतात त्या पोळी भाजी केंद्रावर स्वयंपाक करण्याचं काम करतात, आज दुपारच्या सुमारास रेखा पाटील, या काम आटपून घरी निघाल्या होत्या, याचवेळी त्यांची मुलगी कांचन पाटील, आपल्या आईला कामावरून घरी दुचाकी घेऊन जात असताना संदीप हॉटेल जवळ पोहोचतात एका भरधाव गाडीने त्यांच्या दुचाकीला धडक दिली, या धडकेत रेखा पाटील, आणि कांचन पाटील, दोघे गंभीर जखमी झाले, असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे, तर या घटनेनंतर हा गाडी चालक पसार झालाय,
बाईट, रेखा पाटील, जखमी,
14
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowAug 28, 2025 13:05:58Raigad, Maharashtra:
स्लग - दीड दिवसांच्या बाप्पांना भावपूर्ण निरोप .....
रायगड जिल्ह्यात विसर्जन मिरवणुका सूरू ........जिल्ह्यात १२ सार्वजनिक तर २५ हजार ५३९ खाजगी गणेश मूर्तींचे होणार विसर्जन
अँकर - दीड दिवसांचा पाहुणा असलेल्या गणपतींना आज निरोप देण्यात आला. आपल्या लाडक्या बाप्पाची मनोभावे सेवा केल्यानंतर आज गणपतींचे विसर्जन करण्यात आले. रायगड जिल्ह्यात १२ सार्वजनिक तर २५ हजार ५३९ खाजगी इतक्या दीड दिवसांच्या गणेश मूर्तींचे विसर्जन होत आहे. सायंकाळी विसर्जन मिरवणुका सुरू झाल्या. पारंपारिक खालू बाजा आणि ढोल ताशा, डी जेच्या तालावर ठेका धरत लहान थोर मंडळी, महिला गुलाल उधळत मिरवणुकीत सहभागी झाले होते. पारंपारिक लेझिम नृत्य सुरू होते. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष सुरू होता. अधून मधून पावसाच्या सरी कोसळत होत्या मात्र गणेश भक्तांचा उत्साह तसुभरदेखील कमी होत नव्हता.
14
Report
JJJAYESH JAGAD
FollowAug 28, 2025 13:05:49Akola, Maharashtra:
Anchor : अकोल्यात हिंदू-मुस्लिम एकोप्याच उदाहरण पाहायला मिळालं आहेय.. शहरातिल आगामी सण उत्सव लक्षात घेता अकोल्यात ऐतिहासिक असा निर्णय घेण्यात आलाय...यासाठी हिन्दू-मुस्लीम गठबंधन करण्यात येवून श्री गणेशोत्सव व ईद-ए मिलादुन्नबी समन्वय समिती गठीत करण्यात आली आहेय..अकोला शहरातील गणेश मंडळाचे गत 132 वर्षांपासून सुयोग्य संचालन व व्यवस्थापन करणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ व ईद-ए मिलादुन्नबी जुलूस कमिटीच्या पाधिकाऱ्यांच्या समन्वय कमिटीच्या झालेल्या बैठकीत एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलं...श्री विसर्जन मिरवणूक 6 सप्टेंबर आणि ईद-ए- मिलादुन्नबीचा जुलूस 5 सप्टेंबरला येत आहेय.या दोन्ही उत्सवाचं मार्ग एकच असल्याने आणि दोन्ही उत्सवात एकाच दिवसाच अंतर असल्यामुळे एकतेच उदाहरण देत मुस्लिम बांधवांनी मोठं मन करीत ईद-ए-मिलादून्नबीचा जुलूम तीन दिवसानंतर म्हणजेच 19 सप्टेंबर रोजी आपल्या पारंपारिक मार्गाने निघणार असल्याची घोषणा केली आहेय...तर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ तथा ईद-ए-मिलादून्नबी जुलूस कमिटीच्या वतीने हा निर्णय घेण्यात आलाय..दोन्ही समाजाच्या वतीने समाजात सामंजस्य, शांती व सौहार्दता निर्माण होऊन हिंदू -मुस्लिमांने हे दोन्ही सण आनंदाने पार पाडता यावे यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय..
13
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowAug 28, 2025 12:50:46Beed, Maharashtra:
बीड: सलग दुसऱ्या दिवशीही बीडमध्ये दमदार पाऊस; मुसळधार पावसानं नागरिकांची तारांबळ..!
Anc: आठ दिवसांच्या विश्रांतीनंतर बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा दमदार आणि जोरदार पावसाने हजेरी लावलीय. जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह तर शहर आणि परिसरात तुफान पाऊस बरसला आहे. त्यामुळे पावसानं नागरिकांची तारांबळ उडालीय. हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार काल मध्यरात्रीपासून बीड जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली.. सकाळपासून विश्रांती घेतलेल्या पावसाला मागील पाऊण तासापासून पुन्हा झोडपण्यास सुरुवात झाली. या पावसानं खरिपांच्या पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे पाणी प्रकल्पाची पाणी पातळी वाढण्यास देखील मदत होणार आहे.
14
Report
LBLAILESH BARGAJE
FollowAug 28, 2025 12:49:39Pune, Maharashtra:
रिपोर्टर:- लैलेश बारगजे
स्लग:- पाऊस
फीड 2C
Anc:-
अहिल्यानगर शहरात मोठ्या प्रतीक्षेनंतर जोरदार पावसाने हजेरी लावली. सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते तर सायंकाळी जोरदार पावसाला सुरुवात झाली. पावसामुळे शहरातील सखल भागात पाणी साचलं आहे. पाऊस पडल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला. त्यामुळे उकाड्यापासून नागरिकांची सुटका झाली. तर गेल्या काही दिवसांपासून राज्यात सर्वत्र पाऊस पडत असताना अहिल्यानगर जिल्ह्यात मात्र पावसाने दडी दिली होती. मात्र आज सायंकाळी जिल्ह्यातील अनेक भागात पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे शेतकऱ्यांना देखील दिलासा मिळाला आहे. मे महिन्यात अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली होती. त्यानंतर जूनच्या सुरुवातीला पाऊस पडला. त्यानंतर मात्र कमी अधिक प्रमाणात पाऊस पडला आहे.
14
Report
AAASHISH AMBADE
FollowAug 28, 2025 12:49:16Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--- 2808ZT_CHP_ROAD_ACCIDENT
( single file sent on 2C)
टायटल:-- चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यातल्या कापणगाव येथे महामार्गावर ट्रकची ऑटोला जोरदार धडक, प्रवासी ऑटो मधील 4 जणांचा जागीच मृत्यू तर 3 गंभीर आणि 1 किरकोळ जखमी
अँकर:--चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यातल्या कापणगाव येथे महामार्गावर ट्रकने ऑटोला जोरदार धडक दिली. प्रवासी ऑटो मधील 4 जणांचा यात जागीच मृत्यू झाला तर 3 जण गंभीर तर 1 किरकोळ जखमी झालाय. आटो राजुरा शहराकडून खामोना-पाचगाव येथे जात होता ट्रक गडचांदूर येथून राजुऱ्या कडे येत होता. कापणगाव येथे सर्विस रोड वरून हायवे वर ऑटो चढताच विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकने ऑटोला जोरदार धडक दिली. यामध्ये ऑटो चालक प्रकाश मेश्राम याच्यासह तीन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. राजुरा मतदारसंघाचे आमदार देवराव भोंगळे या मार्गावरून प्रवास करत होते. त्यांनी अपघातग्रस्तांना तातडीने मदत उपलब्ध करून दिली. प्रकाश मेश्राम (ऑटो चालक, 48/पाचगाव), रवींद्र बोबडे (48/पाचगाव), शंकर पिपरे (50/कोची) आणि वर्षा मांदाडे (50/खामोना) अशी मृतांची नावे आहेत. गंभीर जखमी असलेल्या तीन जणांना चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आलं आहे तर एक प्रवासी राजुरा येथे रुग्णालयात उपचारासाठी दाखल आहे.
आशीष अम्बाडे
झी मीडिया
चंद्रपूर
14
Report
SRSHRIKANT RAUT
FollowAug 28, 2025 12:33:37Yavatmal, Maharashtra:
यवतमाळच्या वणी नगरपालिकेवर शिवसेनेचे चंद्रपूर यवतमाळ लोकसभा समन्वयक माजी आमदार विश्वास नांदेकर यांनी धडक देऊन पालिकेतील अनियमित कामांबद्दल जाब विचारला, शहरात डेंग्यू मलेरियाची साथ पसरली आहे, पथदिवे बंद आहेत, शासनाचा निधी खर्च होऊनही अनेक कामे अपूर्ण आहे, शहरातील डुक्कर शहराबाहेर शेतकऱ्यांच्या शेत शिवारात सोडल्या जात आहे, या समस्यांवर मुख्याधिकाऱ्यांचे दुर्लक्ष असल्याचा आरोप शिवसेनेने केला. या समस्या आठ दिवसात सोडविण्याचा अल्टीमेटम शिवसेनेने दिला आहे.
बाईट : विश्वास नांदेकर: माजी आमदार
14
Report
SNSWATI NAIK
FollowAug 28, 2025 12:20:09Navi Mumbai, Maharashtra:
story slug - सकल मराठा समाजाचे नवी मुंबई महापालिकेत घोषणाबाजी
महापालिका पर आंदोलन
FTP slug - nm nmmc maratha aandolan
shots-
reporter - swati naik
navi mumbai
Anchor - नवी मुंबई मद्ये मराठा आंदोलकांना विश्राती अंघोळ आणि शौचालय पाणी सुविधा पूरण्यासाठी महापालिका तसेच एपीएमसी आणि सीडको प्रशासनाने परवानगी मागितली परंतु मराठा आंदोलकांना प्रशासनाने कोणतेही सहकार्य करत नसल्याने आज सकल मराठा समाजाच्या कमिटी ने नवी मुंबई म्हाप्लीकेत जाऊन आंदोलन केले
Gf
13
Report
GMGANESH MOHALE
FollowAug 28, 2025 12:19:55Washim, Maharashtra:
वाशीम:
File:2808ZT_WSM_RAIN_28AUGUST
रिपोर्टर:गणेश मोहळे, वाशीम
अँकर: दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर आज वाशीम जिल्ह्यात पुन्हा एकदा पावसाने जोर धरला आहे. कारंजा,मंगरूळपीर,मालेगाव, वाशीम व मानोरा तालुक्यात ढगांचा गडगडाट व विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस सुरु आहे.या पावसामुळे सखल भागात पाणी साचून वाहतुकीस अडथळा निर्माण झाला असून सर्वसामान्यांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.खरीप पिके,भाजीपाला तसेच फळबागांना या पावसाचा फटका बसण्याची शक्यता व्यक्त होत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
14
Report
SMSATISH MOHITE
FollowAug 28, 2025 11:50:50Nanded, Maharashtra:
Satish Mohite
Slug - Ned_RescueWKT
Feed on - 2C
----------------------------
Anchor - मुसळधार पावसाचा नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्याला फटका बसलाय. नायगाव मधून वाहणाऱ्या ओढ्याला मोठा पूर आल्याने नायगावला पाण्याचा विळखा बसला आहे. शेकडो घरे पाण्याखाली गेली आहेत. रेसक्यु ऑपरेशन चालवून नागरिकांना पाण्याबाहेर काढले जात आहे. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सतीश मोहिते यांनी.
WKT
---------------
14
Report
TTTUSHAR TAPASE
FollowAug 28, 2025 11:45:11Satara, Maharashtra:
TUSHAR TAPASE
3 FILES
SLUG NAME -SAT_ATHVALE_JARANGE
सातारा - आठवले गटाच्या सक्षमीकरणासाठी महाबळेश्वर येथे राज्यस्तरीय विचार मंथन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराला केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी उपस्थिती लावली होती.या शिबिरात पक्ष वाढीच्या अनुषंगाने मंत्री आठवले यांनी आरपीआयच्या राज्यातून आलेल्या पदाधिकाऱ्यांना सूचना केला याबरोबरच मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला आरपीआय आठवले गटाचा पाठिंबा असल्याचे महाबळेश्वर येथील विचार मंथन शिबिरात एकमताने ठराव मंजूर देखील करण्यात आला असल्याचे मंत्री रामदास आठवले यांनी सांगितलं आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळाल पाहिजे हे आमची पहिल्यापासून भूमिका आहे. मात्र मनोज जरांगे पाटील यांची मागणी आहे की सर्व मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या. सर्व मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देणे शक्य नाही... मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी समाजावर अन्याय नको अशी आमची भूमिका आहे. एखादी बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत मनोज जारंगे यांनी घ्यावी
आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावरील टीका टाळावी असा सल्ला मनोज जरांगे पाटील यांना दिला आहे
बाईट; केंद्रीय मंत्री रामदास आठवले
*उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची युती म्हणजे फुसका बार; येणाऱ्या निवडणुकीत दोघेही पराभूत होणार:- केंद्रीय मंत्री रामदास आठवले*
सातारा - उद्धव आणि राज ठाकरे यांच्या युतीचा आमच्यावर कोणताही परिणाम होणार नाही. उलट त्यांच्या एकत्र येण्याने आम्हाला फायदा होणार आहे. मराठीच्या मुद्द्यावर हे दोघे एकत्र आले आहेत.. या मराठी मतांमध्ये सुद्धा 20 ते 22 टक्के मतं आमच्या बाजूने आहेत... हे दोघे एकत्र येणे म्हणजे दोघांचा फुसका बार आहे. यापुढील निवडणुकीत ते दोघे हारणार आहेत. येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत महायुतीचा झेंडा फडकेल असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला आहे
बाईट: केंद्रीय मंत्री रामदास आठवले
14
Report