Back
कास पठारावर दुर्मिळ फुलांचा बहर येण्याची वाट पाहत आहेत पर्यटक!
TTTUSHAR TAPASE
Aug 06, 2025 06:17:35
Satara, Maharashtra
TUSHAR TAPASE
3 FILES
SLUG NAME -SAT_KAAS
सातारा -जागतिक वारसा स्थळ असलेल्या कास पठारावर असून देखील दुर्मिळ फुलांचा बहर यायला सुरुवात झाली आहे.अद्याप पूर्ण पठार फुललं नसले तरी चवर,आभाळी जातीची फुले मोठ्या प्रमाणात फुलली आहेत.खरंतर सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात या पठारावर फुलांचा बहर येत असतो मात्र ऑगस्ट महिन्यात झालेला पाऊस आणि उन्हाची उघडीप न मिळाल्याने अजून देखील फुलांचा सडा निर्माण होऊ शकलेला नाही . त्यामुळे फुले पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना अजून काही काळ वाट पाहावी लागणार आहे. पावसाने उघडीप दिली तर पुढच्या पंधरा ते वीस दिवसात ही दुर्मीळ फुलं पर्यटकांना पाहता येणार आहेत याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी तुषार तपासे यांनी...
wkt
byte - सागर भोसले वन समिती कास
14
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
ADANIRUDHA DAWALE
FollowAug 07, 2025 03:30:30Amravati, Maharashtra:
Feed slug :- AMT_TIGER एक फाईल आहे
रिपोर्टर :– अनिरुद्ध दवाळे, अमरावती 9503131919
मेळघाटात एकाच वेळी पर्यटकांना दिसले पाच वाघ; धारणी मार्गावरील रोरा गावाजवळील घटना
अँकर :– मेळघाट मध्ये एकाच वेळी पाच पट्टेदार वाघांचे दर्शन झाल्याने पर्यटकांचा आनंद द्विगुणित झाला आहे. अमरावती–धारणी मार्गावरील रोरा या गावाजवळ जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांना प्रवास करताना एकाच वेळी पाच वाघांचे दर्शन झाले असून सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने मोठ्या प्रमाणात मेळघाटात पर्यटक गर्दी करत आहे. त्यामुळे सध्या मेळघाटात पर्यटकांची संख्या वाढत आहे. अशातच पर्यटकांना आता वाघांचे दर्शन होत आहे आल्याने पर्यटक आणखी वाढण्याची शक्यता आहे.
2
Report
YKYOGESH KHARE
FollowAug 07, 2025 03:21:15Nashik, Maharashtra:
Nsk_onionscam
Feed by 2C
Anchor नाशिक जिल्ह्यात नाफेडकडून नियुक्त सहकारी संस्थेकडून कांदा खरेदी प्रक्रियेत गोंधळ उडाल्याने संबंधित संस्थेची खरेदी थांबवण्यात आलीये. या संस्थेचे लॉगिन बंद करण्यासोबत खरेदी केलेल्या सहा कोटींचा कांदा ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. अवसायानात असलेल्या बालासाहेब ठाकरे सहकारी संस्थेने अर्ज करून खरेदीस सुरुवात केली होती. मात्र, या संस्थेवर प्रशासक असल्याचा गैरप्रकार आढळल्याने कारवाई करण्यात आलैये. जवळपास ५ हजार क्विंटलपैकी ८० टक्के खरेदी पूर्ण झाली असून सुमारे ६ कोटींचा कांदा या संस्थेच्या गोदामात असल्याची प्राथमिक माहिती आहे.. शिल्लक खरेदी थांबवून पुढील चौकशी सुरू आहे. संस्थेने नाफेडकडे स्पष्टीकरण मागवले असून ई-मेलद्वारे उत्तर देणार असल्याचे सूचित केले आहे.
7
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowAug 07, 2025 03:21:09Pune, Maharashtra:
Reporter name : Chaitralli Raajapurkar
Total files : 05
File.name : 0708ZT_MAVAL_DEHUROAD
Total files : 04
Headline -देहूरोडकरांचा कॅन्टोन्मेंट हटवा, नगरपरिषद द्या मागणीसाठी 10 ऑगस्ट ला जनजागृतीसाठी भव्य मोर्चा
Anchor:
देहूरोड कॅन्टोमेंट बरखास्त करून स्वतंत्र नगरपरिषद करण्याची मागणी वाढू लागली असून देहूरोडकरांचा हा लढा आता थेट रस्त्यावर येणार असून येणाऱ्या 10 ऑगस्टला देहूरोड बंदची हाक देण्यात आली आहे. तसेच जुना पुणे मुंबई महामार्गावर सेंट्रल चौकात चक्का जाम आंदोलन करण्यात येणार असून देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड बरखास्त करून, नागरिक हिताची स्वतंत्र नगरपरिषद स्थापन करण्यासाठी आता देहूरोडकरांचा संयम संपला आहे. यासाठी 10 ऑगस्ट ला जनजागृतीसाठी भव्य मोर्चा, देहूरोड बंद, आणि मुंबई-पुणे हायवे रास्ता रोको आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. देहूरोड कॅन्टोन्मेंट कृती समितीने यासंदर्भात पोलीस आयुक्त विनायक कुमार चौबे, अपर तहसीलदार जयराज देशमुख, तसेच देहूरोड पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे यांना निवेदन दिलंय.
2
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowAug 07, 2025 03:17:52Solapur, Maharashtra:
सोलापूर ब्रेकिंग - सोलापुरात धो-धो पाऊस, चोवीस तासात 106.9 मिमी पावसाची नोंद
- सोलापुरात पावसाची तुफान बरसात
- यंदाच्या हंगामातील 106.9 मिमी उच्चांकाची नोंद
- मुसळधार पावसामुळे बाळे परिसरातील अनेक नागरिकांच्या घरात शिरले पाणी
- 9 ऑगस्ट पर्यंत सोलापूरला देण्यात आला येलो अलर्ट
- शहरातील नाना नानी पार्क, हुतात्मा उद्यान, वीणकर बाग अशी विविध उद्याने पाण्याखाली
6
Report
PNPratap Naik1
FollowAug 07, 2025 03:17:45Kolhapur, Maharashtra:
Kop Bibatya Dhasti
Feed :- Photo
Anc :- कोल्हापूर जिल्ह्यातील जाखले, घुणकी परिसरात सध्या बिबट्याची धास्ती वाढली आहे. जाखले गावाच्या परिसरात वनविभागाच्या कॅमेरा मध्ये हा बिबट्या कैद झालाय. हा बिबट्या झाडावर लटकवलेल्या कुत्र्याचा फडसा पाडताना चित्रीत झालाय. हा बिबट्या गेल्या काही दिवसापासून जाखले आणि घुणकी परिसरात वास्तव्यास असल्याचा दिसून येत आहे काही ठिकाणी उसाच्या शेतीत या बिबट्याच दर्शन झाले आहे. त्यामुळं नागरिक आणि शेतकऱ्यांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे. त्यामुळे वनविभागाने या बिबट्याला जेरबंद करावं अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
5
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowAug 07, 2025 03:17:39Pune, Maharashtra:
Reporter name : Chaitralli Raajapurkar
Location : Maval
File.Name : 0708ZT_MAVAL_KAMSHET_MSEB
Total files : 05
-कामशेत मध्ये वारंवार बत्तीगुल मुळे वीज ग्राहक हैरान
-वेळेत विजेची समस्या मिटली नाही तर मोर्चा काढून कामशेत बंद ची हाक
Anchor:
मावळ तालुक्यातील महत्वाची समजल्या जाणाऱ्या कामशेत बाजारपेठेत सतत होणाऱ्या लोडशेडिंगच्या समस्ये मुळे नागरिक हैरान झाले आहेत. पन्नास गावांची बाजारपेठ म्हणून कामशेत शहराची ओळख असून येथील नागरिक सध्या महावितरणच्या गलथान कारभारावर नाराज आहेत. महावितरणविषयी वेगवेगळ्या समस्या आणि तक्रारींबाबत आवाज उठविण्यासाठी कामशेतमध्ये वीज ग्राहक संघटनेच्या मावळ तालुका शाखेने बैठक घेतली. या बैठकीत अनेकांनी महावितरण बाबत नाराजी व्यक्त केली. वीज वापर कमी असूनही देयक जास्त रकमेचे येते. अनेक प्रकरणांमध्ये सवलत न देता वीज जोडणी तोडली जाते. तक्रारी केल्या तरी अधिकारी अरेरावीची भाषा वापरतात. वीजपुरवठा अचानक खंडित होतो. दुसरीकडे काही कंपन्यांनी काही वर्षे भरणा केला नाही तरी कारवाई होत नाही, असा आरोप स्थानिक कामशेत मधील नागरिक कसरत आहेत. तर कामशेत शहरासाठी महावितरण चं स्वतंत्र सबस्टेशन करण्याची मागणी जोर धरू लागली असून, येथील वीज समस्यासाठी खेड तालुक्यात जावं लागते त्यामुळे एक तर सब स्टेशन करा किंवा खोपोलीवरून येथे वीज प्रवाह सुरू करावा व जुन्या तारा बदली करण्याची मागणी या बैठकीत घेण्यात आली. अन्यथा कामशेत शहर 13 तारखेला बंद ठेवून महावितरण च्या विरोधात मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आलाय..येथील नागरिकांना होणारा वारंवार बत्तीगुल चा त्रास थांबला नाही तर कामशेत येथील महावितरण च्या कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा देण्यात आलाय...
बाईट : स्थानिक नागरिक (file no.02,03,04,05)
5
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowAug 07, 2025 03:17:27Raigad, Maharashtra:
स्लग — पोलादपूर तालुक्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई....... गोवा बनावटीचा ६ लाख रुपये किमतीचा दारू साठा जप्त........
अँकर — राज्य उत्पादन शुल्क विभागाने पोलादपूर तालुक्यातील दिविल गावात मोठी कारवाई केली आहे. सुमारे ६ लाख १५ हजार ५६० रुपये किमतीची गोवा बनावटीची विदेशी दारू जप्त केली आहे. गुप्त माहितीच्या आधारे अलिबागचे भरारी पथक अलिबाग व राज्य उत्पादन शुल्क विभाग महाड यांनी संयुक्त रित्या दिविल इथल्या बने घरावर छापा टाकला असता ५६ बॉक्स गोवा बनावटीची इंग्लिश दारू सापडली . आरोपी रुपेश मोरे याला राज्य उत्पादन शुल्क विभागाने ताब्यात घेतले असून दोन आरोपी फरार आहेत.
बाईट — सतीश गावडे
निरीक्षक राज्य उत्पादनशुल्क निरीक्षक
3
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowAug 07, 2025 03:15:20Pune, Maharashtra:
Reporter name : Chaitralli Raajapurkar
Location : Maval
File.Name : 0708ZT_MAVAL_FARMER
Total files : 03
Headline : मावळ मधील DRDO जमीन संपादन प्रकरणात वाढीव अनुदानासाठी दिल्लीत हालचाल
Anchor:
मावळमधील तळेगाव तसेच शेलारवाडी शेतकऱ्यांच्या DRDO मार्फत संपादित जमिनीप्रकरणी वाढीव पुनर्वसनाच्या मागणीला गती मिळाली आहे. भाजपा नेते रविंद्र भेगडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दोन दिवसांपूर्वी भेट घेऊन शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आवाज उठवला आणि मुख्यमंत्र्यांनी तत्काळ नवी दिल्लीत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना पत्र लिहून विनंती केली. या पार्श्वभूमीवर दिल्लीत केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहळ व सरंक्षण राज्यमंत्री संजय यांच्या उपस्थितीत बैठक झाली, ज्यात वडगाव मावळ न्यायालयाच्या आदेशानुसार शेतकऱ्यांना वाढीव अनुदान मिळावे यावर सखोल चर्चा झाली. या बैठकीला माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, किसान मोर्चा प्रदेशाध्यक्ष गणेश भेगडे, भाजप नेते रवींद्र भेगडे आणि शेतकरी यांचे प्रतिनिधी यांची उपस्थिती होती. शेतकऱ्यांच्या न्यायासाठी उचललेलं हे मोठं पाऊल लवकरच सकारात्मक निर्णय देईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
8
Report
SNSWATI NAIK
FollowAug 07, 2025 03:03:09Navi Mumbai, Maharashtra:
story slug - शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते विठ्ठल मोरे यांनी दिला पदाचा राजीनामा.
FTP slug - nm vitthal more
shots- photo
reporter-swati naik
navi mumbai
anchor -
शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते विठ्ठल मोरे यांनी दिला पदाचा राजीनामा.
माजी खासदार राजन विचारे यांच्यावर टीका करुन दिला राजीनामा.
मला विचारात न घेता नवी मुंबईतील पदाधिकारी नियुक्त केल्याने विठ्ठल मोरे नाराज.
जे काम हॉटेल वर धाडी टाकून एकनाथ शिंदे ना जमलं नाही ते काम एकनाथ शिंदे साठी राजन विचारे यांनी सहज करुन दाखवल्याची केली टीका.
विठ्ठल मोरे यांच्या राजीनाम्या नंतर नवी मुंबईतील अनेक पदाधिकारी देखील राजीनामा देण्याच्या तयारीत.
निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना ठाकरे गटातील गटबाजी चव्हाट्यावर.
7
Report
KJKunal Jamdade
FollowAug 07, 2025 03:03:06Shirdi, Maharashtra:
Shirdi News Flash
*शिर्डी जवळील हॉटेल कल्पदीप रेस्टॉरंटच्या मालकावर अज्ञात पंधरा ते वीस तरूणांचा हल्ला...*
*हल्लेखोरांनी हॉटेलमधील महिला कर्मचाऱ्यांची अश्लील छेडछाड करण्याचा केला होता प्रयत्न...*
*हॉटेल मालकावर 15 ते 20 जणांनी केलेला हल्ला सीसीटीव्ही फुटेज मध्ये कैद..*
हॉटेल कल्पदीप रेस्टॉरंटचे मालक वैभव दिलीप भाटीया हे हस्तक्षेप करत हल्लेखोरांना करत होते समजावण्याचा प्रयत्न...
आम्हाला कशाला समजावतो असे सांगत हल्लेखोरांनी हॉटेल मालकाला केली बेदम मारहाण...
*हल्लेखोरांनी हॉटेलमधील काचेच्या वस्तूंसह टेबल खुर्च्यांची केली तोडफोड...*
हॉटेल मालकावर हल्ला करून हल्लेखोर फरार...
घटना घडल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल , अज्ञातांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू , सीसीटीव्हीच्या आधारे हल्लेखोरांचा शोध सुरू...
जखमी हॉटेल मालकावर साई संस्थानच्या सुपर रुग्णालयात उपचार सुरू...
Bite - वैभव भाटिया , हॉटेल कल्पदीप मालक
5
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowAug 07, 2025 03:02:07Pune, Maharashtra:
Reporter name : Chaitralli Raajapurkar
Location : Maval
File name : 0708ZT_MAVAL_MNS_TOLL
Total files : 02
Headline -सोमाटणे टोलचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
बेकायदेशीर टोल हटाव ची मागणी जोर धरू लागली
Anchor:
जुना पुणे मुंबई महामार्गावरील सोमाटणे टोल नाका अनधिकृत असल्याचा गंभीर मुद्दा मावळ मनसेने पुन्हा उचलला आहे. मनसेच्या शिष्टमंडळाने थेट लोणावळ्यातील एमएसआरडीसी आणि आयआरबीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करत स्थलांतराची मागणी लावून धरलीये. केवळ ३ किलोमीटरच्या प्रवासासाठी रोज लाखो वाहनचालक टोल भरतात. आणि या अनधिकृत टोलमधून दररोज २५ ते ३० लाखांचा महसूल कुठे जातो हा थेट प्रश्न उपस्थित केलाय. जर या अनधिकृत टोलवर कारवाई झाली नाही, तर मनसे स्टाईलने तीव्र आंदोलनाचा इशारा सुद्धा देण्यात आलाय. मात्र आशेची बाब म्हणजे टोल प्रशासनानं हे निवेदन स्वीकारून चर्चा सुरू केली आहे. तसेच पुणे मुंबई यशवंतराव चव्हाण एक्स्प्रेस वे वरील उर्से टोलनाका नवीन जागेत स्थलांतरानंतर उर्से ग्रामस्थांना वाटणारी असुरक्षितता त्यावरही प्रकाश टाकत हायमास्ट लाइट, तसेच पोलीस बंदोबस्त आणि बस थांब्याची मागणी लेखी स्वरूपात करण्यात आलीय.
9
Report
PNPratap Naik1
FollowAug 07, 2025 03:01:57Kolhapur, Maharashtra:
Kop BJP Baithak
Feed :- Live U ( 6 तारखेला फीड दिले आहे )
Anc :- आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका आणि महानगरपालिका निवडणुका निवडणुका एकत्रित लढणार असल्याचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. कोल्हापूर भाजपा कार्यालयामध्ये आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पूर्वनियोजन तयारी बैठक आयोजित करण्यात आली होती त्यामध्ये मंत्री चंद्रकांत पाटील यांनी नेते आणि पदाधिकारी यांना महायुती एकत्रित लढणार असल्याचे सांगितले आहे. यामध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष आणि महापौर भाजपाचेच होतील असा विश्वास व्यक्त केलाय.
8
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowAug 07, 2025 03:01:52Pune, Maharashtra:
Reporter name : Chaitralli Raajapurkar
Location : Maval
File.name : 0708ZT_MAVAL_ROJGAR_YOJANA
Total files : 01
Headline -रोजगार हमी योजनेत सुधारणा व नवे उपक्रम
- समिती प्रमुख आमदार सुनील शेळके यांच्या अध्यक्षतेखाली समितीची मंत्रालयात बैठक
Anchor:
महाराष्ट्र विधानभवनात रोजगार हमी योजना समितीची महत्त्वपूर्ण बैठक समितीचे प्रमुख आमदार सुनील शेळके यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. मनरेगामध्ये सुधारणा, नव्या उपक्रमांची आखणी व ग्रामीण मजुरांच्या हितासाठी ठोस निर्णय या बैठकीत घेण्यात आले. या बैठकीला आमदार शंकर मांडेकर, बापूसाहेब पठारे, सुधाकर अडबाले, शिरीष नाईक यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. ग्रामीण रोजगारासाठी नव्या संधी आणि पारदर्शी अंमलबजावणीसाठी ही बैठक निर्णायक ठरली.
# रोजगार हमी समितीच्या बैठकीतील ठळक मुद्दे:
-मनरेगाच्या वेतनवाढीसाठी केंद्र सरकारकडे पाठवलेल्या प्रस्तावाचा सातत्याने पाठपुरावा करण्याचे निर्देश.
-बांबू, फळबाग लागवड, वृक्षारोपण, मृद व जलसंधारण यांसारख्या कामांवर आधारित राज्यस्तरीय स्पर्धा आणि उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांना पारितोषिकांची योजना.
-पायलट प्रकल्प राबवण्याचा निर्णय – नव्या रोजगार संधींसाठी उपक्रमशीलता.
-घरकुल योजनांना गती देण्याचे निर्देश, तसेच काम मंजुरीपूर्वी स्थानिक स्थळ पाहणी व लोकप्रतिनिधींचा सल्ला आवश्यक.
-रोपवाटिकेतील उत्पन्नातून मजुरांना आर्थिक लाभ मिळावा यासाठी जिल्हाबाहेर विक्रीस प्रोत्साहन.
6
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowAug 07, 2025 03:01:00Latur, Maharashtra:
लातूर ब्रेकिंग न्यूज...
स्किप्ट ::- अजित पवार यांच्या दौऱ्या वेळी बीडमध्ये शेतकरी नेते नजरकैदेत... छावाच्या विजयकुमार घाडगे पाटलांचा आरोप....
AC ::- बीडमध्ये दोन दिवस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दौऱ्यावेळी शेतकरी नेते आणि कार्यकर्त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आल्याचा गंभीर आरोप छावा संघटनेचे विजयकुमार घाडगे पाटील यांनी केला आहे. शेतकऱ्यांना नजरकैदेत ठेवून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न का केला जातोय ? असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला आहे . शेतकऱ्यांच्या मुलांना नजरकैदेत ठेवून नव्हे, त्यांचा हक्काचा आवाज ऐकून कर्जमाफी द्या... ते तुमचं स्वागत करतील अशा शब्दांत त्यांनी संताप व्यक्त केला आहे.
बाईट ::- विजयकुमार घाडगे पाटील
4
Report
AKAMAR KANE
FollowAug 07, 2025 02:47:41kolhapur, Maharashtra:
2c ला सोनेगाव ps संग्रहीत व्हिडिओ जोडले आहे
-------
आजारपण, वृद्धावस्था आणि एकटेपणाला कंटाळून नागपुरात वृद्ध दाम्पत्याने विष प्राशन केल्याचे समोर आले आहे...
या घटनेत 80 वर्षीय गंगाधर हरणे यांचा मृत्यू झाला आहे.. तर त्यांची पत्नी निर्मला हरणे (70 वर्ष) ह्या रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे..
नागपूरच्या सोनेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील समर्थ नगर परिसरात काल ही घटना घडली..
हरणे दांपत्यांचा मुलगा नोकरी निमित्ताने नागपूर बाहेर राहतो.. तर मुलगी विवाह झाल्यानंतर सासरी राहते.. त्यामुळे नागपुरातील घरात हरणे दांपत्य एकटेच राहत होते..
घटनेनंतर घरी मिळालेल्या सुसाईड नोटमध्ये वृद्धावस्था, आजारपण आणि एकटेपणाला कंटाळून आत्महत्या केल्याचे नमूद करण्यात आले आहे..
7
Report