Back
गणपती विसर्जनानंतर कोकणवासीयांचा परतीचा प्रवास सुरू!
PPPRANAV POLEKAR
Sept 03, 2025 05:03:23
Ratnagiri, Maharashtra
रत्नागिरी- गौरी गणपतीचे विसर्जन झाल्यानंतर आता कोकणवासी यांचा परतीचा प्रवास
कोकण रेल्वेच्या आज पासून अनंत चतुर्दशी पर्यंतच्या सगळ्या गाड्या हाऊसफुल
गणपती स्पेशल रेल्वे गाड्यांना देखील आजपासून मोठी गर्दी
गणपतीसाठी परतीच्या 350 हून अधिक रेल्वेच्या फेऱ्या
सात दिवस गणपतीची कोकण वासियांची मनोभावे सेवा
14
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
YKYOGESH KHARE
FollowSept 04, 2025 15:01:49Nashik, Maharashtra:
Nsk_halganesh
Feed by mojo
Anchor देशाची हवाई सुरक्षा सांभाळणाऱ्या तसेच मी सुख होईल यांचं देखभाल दुरुस्ती करणाऱ्या ओझरच्या हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड ने सुद्धा गणेशोत्सवात भाग घेतला आहे नाशिक शहरात भालेकर मैदानावर त्यांनी पहेलगाममध्ये झालेल्या हल्ल्याचं प्रतिनिधिक नाट्य सादर केल आहे. हे करताना हवाई दलाने कशा पद्धतीने याचा सामना केला हे दाखवत सिंदूर मोहिमेची प्रात्यक्षिकच सादर करण्याचा प्रयत्न यामधून केला आहे. थेट मिग विमान आणून लोकांना लष्करी ताकद दाखवत देश लष्करी सामर्थ्यामध्ये बळकट होत असल्याचे प्रचिती यामध्ये येतेदाखवण्याचा प्रयत्न केला आहे . संपूर्ण नाशिक मध्ये त्यामुळे हा देखावा देशभक्ती शी संबंधित असल्याने लोकांचा आकर्षण ठरला आहे.
13
Report
YKYOGESH KHARE
FollowSept 04, 2025 15:01:44Nashik, Maharashtra:
Nsk_mumbainakaganesh
Feed by mojo
Anchor नाशिक शहरात मुंबई नाका या सर्कलवर युवक गणेशोत्सव मंडळाने जयपुर मंदिराचा देखावा साकारला आहे. जयपुर वास्तुकलेसाठी प्रसिद्ध आहे. विविध प्रकारचे मंदिर किल्ले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात तशीच वास्तू महिनाभर काम करून उभारण्याचं कलाकुसर आपल्याला इथे पाहायला मिळते. यामध्ये गणेशाची मूर्तीही आकर्षक पद्धतीने सजावट करण्यात आलेली आहे. एकूणच इथे करण्यात आलेली दिव्यांची रोषणाई सर्वच नाशिककरांची येताना जाताना लक्ष वेधून घेत आहे. गेल्या चौपन वर्षापासून प्रत्येक वर्षी वेगवेगळी सजावट या ठिकाणी केली जाते इतकच नाही तर वर्षभर विविध सामाजिक कार्यामांद्वारे युवक मित्र मंडळ सातत्याने कार्यरत असतं.
14
Report
AAASHISH AMBADE
FollowSept 04, 2025 14:18:37Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--- 0409ZT_CHP_POLICE_MARCH
( single file sent on 2C)
टायटल:-- ईद ए मिलाद आणि गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर चंद्रपुरात पोलीसांचा रूट मार्च, 5 आणि 6 सप्टेंबर रोजी दोन्ही मिरवणूक मार्गावर मोठा पोलीस बंदोबस्त असेल तैनात, चंद्रपूरकरांनी सण- सोहळा शांततेत पार पडण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन
अँकर:--ईद ए मिलाद आणि गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर चंद्रपुरात पोलीसांनी आज रूट मार्च काढला. शहराच्या मुख्य मार्गांवरून फिरून हा मार्च दाताळा मार्गावरील रामसेतू पुलाखाली असलेल्या इरई नदीच्या काठावरील गणेश विसर्जन स्थळी पोचला. 5 आणि 6 सप्टेंबर रोजी दोन्ही मिरवणूक मार्गावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात राहणार आहे. यात 1 अपर पोलीस अधिक्षक, 4 उपविभागीय पोलीस अधिकारी , 40 पोलीस अधिकारी, 800 कर्मचारी आणि 250 गृहरक्षक दलाचे जवान यांचा समावेश आहे. एकूण 1200 हुन अधिक पोलीस अधिकारी- कर्मचाऱ्यांसह यंत्रणा सज्ज राहणार आहे. चंद्रपूरकरांनी सण- सोहळा शांततेत पार पडण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन पोलीस दलाने केले आहे.
बाईट १) मुम्मका सुदर्शन, पोलीस अधिक्षक,।चंद्रपूर
आशीष अम्बाडे
झी मीडिया
चंद्रपूर
13
Report
AAASHISH AMBADE
FollowSept 04, 2025 14:01:05Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--- 0409ZT_CHP_RAJY_UTSAV_1_2
( 2 file sent on 2C)
टायटल:-- चंद्रपुरात सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने प्रियदर्शिनी, सांस्कृतिक सभागृहात गणेशोत्सव राज्योत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन, गणेशोत्सव थीम आधारित भजन, गायन व विविध सांस्कृतिक कार्यक्रमाची चंद्रपूरकरांना मेजवानी
अँकर:--चंद्रपुरात सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने प्रियदर्शिनी सांस्कृतिक सभागृहात गणेशोत्सव राज्योत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. हा राज्योत्सव अधिक लोकांपर्यंत पोचावा यासाठी गणेशोत्सव थीम आधारित भजन, गायन, नृत्य नाटिका आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी चंद्रपूरकरांना मिळाली.
बाईट १) संजय पवार, उपविभागीय अधिकारी, चंद्रपूर
------ सांस्कृतिक कार्यक्रमांची झलक-----
आशीष अम्बाडे
झी मीडिया
चंद्रपूर
14
Report
SKShubham Koli
FollowSept 04, 2025 13:35:58Thane, Maharashtra:
*राष्ट्रवादी अजित पवार गट प्रवक्ते आनंद परांजपे बाईट पॉइंटर*
*ऑन अजित दादा वायरल व्हिडिओ*
- महिला यांना झापले चुकीची बातमी
- ips अधिकाऱ्याला उपमुख्यमंत्री अजित दादा कोण असे विचारत असेल तर चुकीचे
- शेतकऱ्यांची बाजू ऐकणे लोकप्रतिनिधींचे कर्तव्य
- शेतकऱ्यांची बाजू ऐकून घेऊ पर्यंत थांबवावे अशी मागणी होती
- गावातील शेतकरी तहसीलदाऱ्याच्या कारवाई विरुद्ध एकवटले होते
- शेतकऱ्यांची बाजू ऐकून घेऊ पर्यंत कारवाई थांबवावी असे निर्देश दिले होते
- कार्यकर्ता चुकला असेल तर त्यावर कारवाई करा असा त्यांचा स्वच्छ स्वभाव आहे
*ऑन obc आंदोलन*
- मुख्यमंत्री फडणविसांनी स्पष्ट केले आहे भुजबळ यांची नाराजी दूर करू
- मंत्रिमंडळात त्वरित obc समाजासाठी उपसमिती नेमण्यात आली
- उपसमितीत बावनकुळे,गणेश नाईक पंकजा मुंढे दत्त भरणे , छगन भुजबळ, गुलाबराव पाटील, असे नेते आहेत
- मराठा विरुद्ध obc असा संघर्ष महायुती सरकार होऊ देणार नाही
*ऑन संजय राऊत*
- छगन भुजबळ obc समजाबद्दल आवाज उठवत असतात
- अजित पवार यांच्या सांगण्यावरून मुख्यमंत्री फडणवीस यांनी भुजबळ यांना मंत्रिपद दिले
- भांडुप च्या भोंग्याने स्वतःच्या पक्षावर लक्ष द्यावे
*ऑन मिलिंद देवरा पत्र*
- एकनाथ शिंदे त्या पत्रवाबद्दल सहमत असतील असं वाटत नाही
- गुहखात्याच्या मार्फत शांतपणे संयमाने नीटपणे हाताळले आहे
- मुंबई महाराष्ट्रची राजधानी आहे, प्रतेकाला आंदोलन करण्याचा अधिकारी
*ऑन ओबीसी आरक्षण*
- कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले
- जीआर चा अभ्यास करू वकिलांमाफत समजाऊन घेऊ
*ऑन जीएसटी*
- देशाचे पंतप्रधान यांनी देशाच्या नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे
- शाळेतील पेंसिल वह्या कंपास यावर झिरो gst केला आहे करावे तेवढे कौतुक कमी आहे
*ऑन शेती जीएसटी*
- शेतीच्या भरपूर साहित्यावरील जीएसटी कमी केला आहे
- मोठा फायदा शेतकऱ्यांना होणार, आत्मनिर्भर होण्यासाठी मदत होणार
*ऑन पक्षप्रवेश*
- आव्हाड उत्तर देतील
- गेलेल्या माणसांना बोलून त्यांना जास्त महत्व देणार नाही
- जे पक्ष सोडून गेले आहेत त्यावर ठाण्यातील कलाकार, नकलाकार भूमिका मांडतील (आव्हाडांना टोला)
14
Report
SKShubham Koli
FollowSept 04, 2025 13:18:19Thane, Maharashtra:
*ठाणे फ्लॅश*
*तोल गेल्याने रेल्वे मधून युवक थेट विटावा खाडीत पडला*
मुलुंड ते कळवा दरम्यान रेल्वेनी प्रवास करत होता...
मात्र ठाण्यातील विटावा खाडी जवळ ट्रेन येताच त्याचा तोल गेला आणि तो थेट खाडीत पडला...
युवक कळव्यातील, गोलाई नगर येथे राहणार आहे 19 वर्षाचा हा तरुण मुलुंड वरून कळव्याच्या दिशेने ट्रेननी प्रवास करत होता...
घटनेची माहिती मिळताच
तरुण युवकाचा शोध अग्निशमन दलाचे जवान, आपत्ती दलाचे जवान व स्थानिक मच्छीमार 2 बोटीच्या सहाय्याने शोध घेत आहे...
14
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowSept 04, 2025 13:18:10Ambernath, Maharashtra:
उल्हासनगरच्या महिला आणि बाल सुधारगृहातून सहा अल्पवयीन मुलींच पलायन
चार मुलीना पोलिसांनी घेतले ताब्यात
सुधारगृहाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
Anchor उल्हासनगरच्या महिला आणि बाल सुधारगृहातून सहा अल्पवयीन मुलींनी पलायन केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे .यापैकी चार मुलीना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, दोन मुलींचा शोध सुरु आहे. विशेष म्हणजे, काही महिन्यांपूर्वीही या सुधारगृहातून आठ मुलींनी सुरक्षा भिंत ओलांडून पलायन केले होते. त्यामुळे सुधारगृहाच्या सुरक्षेवर आणि व्यवस्थापनावर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. पलायन केलेल्या मुलींनी परत आल्यानंतर पोलिसांना दिलेल्या जबाबात, “आम्हाला इथे राहायचं नाही म्हणून आम्ही आपल्या घरी निघालो” असे सांगितले. मात्र यामागे केवळ घराची ओढ नसून सुधारगृहातील अनेक गैरसोयीही उघड झाल्या आहेत. उल्हासनगरचे डीसीपी सचिन गोरे यांनी माहिती देताना सांगितले की, दुपारच्या वेळी सुरक्षारक्षक जेवणासाठी गेले असताना मुलींनी मुख्य प्रवेशद्वाराची चावी घेऊन पलायन केले. दरम्यान, अल्पवयीन मुलींच्या सलग पलायनाच्या घटनांमुळे सुधारगृहाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकरणाची चौकशी सुरु असून, प्रशासन आणि महिला बालविकास विभागाकडून योग्य ती कारवाई करण्याची मागणी होत आहे.
Byte सचिन गोरे ,डीसीपी
चंद्रशेखर भुयार , उल्हासनगर
14
Report
PNPratap Naik1
FollowSept 04, 2025 12:49:05Kolhapur, Maharashtra:
Story : Kop IG Press
Feed :- Live U
Anc : कोल्हापूर परिक्षेत्रात गणेश विसर्जन मिरवणुकीची तयारी पूर्ण झाली आहे.. अनंत चतुर्थी दिवशी कोल्हापूर सांगली, सातारा ,सोलापूर आणि पुणे ग्रामीण पाचही विभागात जवळपास १४ हजार सार्वजनिक गणपतीचे विसर्जन होणार असल्याची माहिती कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी दिली आहे. विसर्जन मिरवणूक बंदोबस्तासाठी परिक्षेत्रात ७०० वरिष्ठ अधिकारी आणि 9 हजार पोलीस कर्मचाऱ्यांची कुमक तैनात करण्यात आली आहे. याशिवाय एस आर पी एफ आणि होमगार्डच्या तब्बल ५० तुकड्या परिक्षेत्रात बंदोबस्तासाठी असणार आहेत. इतकचं नाही तर विसर्जन मिरवणुकीवर सीसीटीव्ही आणि ड्रोन च्या माध्यमातूनही नजर असेल अशी माहिती देखील विशेष पोलीस महानिरीक्षक फुलारी यांनी दिली आहे.. गणेश आगमन मिरवणूक आणि गणेशोत्सव काळात आवाज मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या परिक्षेत्रातील 800 हून अधिक मंडळांवर कारवाई केल्याची माहिती सुद्धा सुनील फुलारी यांनी दिली आहे..
Byte : सुनील फुलारी , विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र
14
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowSept 04, 2025 12:36:56Ambernath, Maharashtra:
मोरीवली एमआयडीसीतून वायुप्रदूषण
परिसरात पसरला रासायनिक धूर
Amb gas leak
Anchor अंबरनाथच्या मोरीवली एमआयडीसी परिसरात रासायनिक धूर पसरला असून या धुराला प्रचंड दुर्गंधी येते आहे , एमआयडीसी मधील कंपन्यांमधून जाणून बुजून अशा प्रकारे पावसाळी वातावरणाचा फायदा घेऊन हा रासायनिक वायू सोडला जातोय, कल्याण बदलापूर महामार्गवर या रासायनिक वायू मुळे धुक्या सारखे वातावरण निर्माण झालं होतं त्यामुळे रस्यावर दृश्यमानता ही कमी झाली होती वारंवार या एमआयडीसीतील काही कंपन्यांमुळे येथील नागरिकांना वायू प्रदूषण त्रास सहन करावा लागत आहे सदर कंपन्यांवर प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे
चंद्रशेखर भुयार , अंबरनाथ
13
Report
AAASHISH AMBADE
FollowSept 04, 2025 12:20:39Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--- 0409ZT_CHP_OBC_GR_FIRE
( single file sent on 2C)
टायटल:-- राष्ट्रीय ओबीसी आयोग अध्यक्षांना जिल्ह्यात फिरू देणार नाही, हैद्राबाद गॅझेट आधार मुद्द्यावर भडकले ओबीसी, चंद्रपुरात ओबीसी विरोधी नव्या शासन जीआर ची ओबीसी कार्यकर्त्यांनी केली होळी, गांधी चौकात झालेल्या आंदोलनात महाविकास आघाडी घटक पक्षातील नेते कार्यकर्ते झाले सहभागी
अँकर:-- मराठा समाजाला ओबीसी घटकांच्या आरक्षणाचा लाभ देण्यास ओबीसी समाजाने जोरदार विरोध केला आहे. राज्य शासनाने हैदराबाद गॅझेटच्या आधारावर राज्यातील मराठा समाजाला नोंदी पाहून ओबीसी प्रमाणपत्रे देण्यासंदर्भात अध्यादेश जारी केला आहे. या मुद्द्यावर राज्यातील ओबीसी समाज भडकला आहे. त्याचे पडसाद संपूर्ण राज्यभर उमटले आहेत. चंद्रपुरात महाविकास आघाडीच्या घटक पक्षातील ओबीसी नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आज शहरातील गांधी चौकात नव्या जीआरची होळी केली. महाराष्ट्र शासनाने हा जीआर तातडीने मागे घ्यावा अशी मागणी या कार्यकर्त्यांनी केली. चंद्रपुरातच राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांचे वास्तव्य आहे. हा निर्णय मागे न घेतल्यास हंसराज अहिर यांना जिल्हा व राज्यात फिरू देणार नाही असा इशारा ओबीसी कार्यकर्त्यांनी दिलाय. हंसराज अहिर यांनीच आता राज्य सरकारला हा अध्यादेश मागे घेण्यासाठी आदेश द्यावेत अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली.
बाईट १) प्रदीप देशमुख, आंदोलक नेते
आशीष अम्बाडे
झी मीडिया
चंद्रपूर
14
Report
SRSHRIKANT RAUT
FollowSept 04, 2025 12:06:44Yavatmal, Maharashtra:
शंभर वर्षांपूर्वी लावलेल्या रक्तचंदनाच्या झाडाचा ५ कोटी रुपये मोबदला मिळावा असा दावा करणाऱ्या यवतमाळच्या शेतकऱ्याला आता मध्य रेल्वेच्या दाव्या मुळे मिळालेले एक कोटी रुपये व्याजासह परत देण्याची वेळ आली आहे. कारण झाड रक्तचंदनाचे नसून ते बिजासाल चे झाड असल्याचा दावा रेल्वे ने न्यायालयात केला. पुसदच्या खर्षी येथील शेतकरी केशव शिंदे यांनी त्यांच्या शेतातील झाड रक्तचंदनाचे असून ते वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वे प्रकल्पासाठी अधिग्रहित होत असल्याने त्याचे ५ कोटी रुपये मोबदला मिळावा असा दावा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल केला होता, न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार रेल्वे ने एक कोटी रुपये शेतकऱ्याला दिले. त्यातील ५० लाख रुपये काढण्याची परवानगी देखील दिली, तर उर्वरित ५० लाख मूल्यांकनानंतर देण्याचे आदेशात नमूद आहे. त्यानंतर आता या प्रकरणाला युटर्न मिळाला आहे, बंगळुरू येथील संस्थेकडून परीक्षणाचा अहवाल सादर करीत ते झाड रक्तचंदन नसून बिजासाल आहे. त्याची किंमत फक्त दहा हजार रुपये आहे. 10,000 रुपये कापून आम्हाला उरलेले पैसे परत हवे आहेत. असा अर्ज रेल्वे ने केला आहे. या मूल्यांकनावर शेतकऱ्यानं शंका उपस्थित केली आहे.
झाड बिजासालचं होतं तर मग अधिकाऱ्यांनी 2015 पासून आम्हाला का सांगितलं नाही? त्यांनी मोबदल्याच्या अवार्डमध्ये कागदपत्रांवर हे रक्तचंदन असल्याचं का म्हटलं? असे प्रश्न शेतकऱ्याने उपस्थित केले आहे. त्यामुळे आता या प्रकरणाच्या सुनावणी कडे लक्ष लागले आहे.
14
Report
SNSWATI NAIK
FollowSept 04, 2025 12:03:50Navi Mumbai, Maharashtra:
story Slug -: ऐरोलीत दगडूशेठ गणपतीची प्रतिकृती, भाविकांची मोठी गर्दी.
ganpati story
ftp slug - nm ganpati story
shots-
byet- ganesh deshmukh
reporter- swati naik
navi mumbai
Anchor -: ऐरोलीचा महागणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा करण्यात येतोय. मंडळाचे यंदाचे दुसरे वर्षं असून यावर्षी देखील दगडूशेठ गणपतीची प्रतिकात्मक मूर्ती बसविण्यात आलेय. हुबेहूब दगडूशेठ गणपतीची मूर्ती बसविल्याने ज्यांना प्रत्यक्ष पुण्याला जाने शक्य नाही अश्या भक्तांना प्रतिदगडूशेठ गणपतीचे दर्शन यामाध्यमातून होत आहे. मंडळातर्फे प्रसाद म्हणून बीजमोदक देण्यात येत असून पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यात येतोय. यागणेशोत्सवा संदर्भात मंडळाचे अध्यक्ष गणेश देशमुख यांनी अधिक माहिती दिलेय.
Byte -: गणेश देशमुख अध्यक्ष
14
Report
SMSATISH MOHITE
FollowSept 04, 2025 11:50:16Nanded, Maharashtra:
Satish Mohite
Slug - Ned_OBCAgitation
Feed on - 2C
-----------------------------
Anchor - नांदेडमध्ये सकल ओबीसी समाजातर्फे सरकारने काढलेल्या जी आर विरोधात निषेध आंदोलन करण्यात आले. जरांगे पाटील यांच्या दबावाला बळी पडून सरकारने जी आर काढला. यावेळी आंदोलकानी मुख्यमंत्री आणि सरकार विरोधात घोषणाबाजी केली या जी आर मुळे ओबीसी च्या आरक्षणात घुसखोरी होणार असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. हा जी आर तात्काळ रद्द करावा अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे दिली. जी आर रद्द न केल्यास मोठे आंदोलन उभारण्याचा इशारा देण्यात आला.
Byte - सकल ओबीसी आंदोलक
Byte - सकल ओबीसी आंदोलक
-------------
14
Report
AKAMAR KANE
FollowSept 04, 2025 11:46:45kolhapur, Maharashtra:
Ngp Sawe Visit
live u ने फीड पाठवले
-------
उपोषण मागे घेतले त्याविषयी संपूर्ण शॉटस आणि बबनराव तायवाडे यांचा 121 आणि परिणय फुके यांचा 121
----------
नागपूर
राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे संविधान चौकात सुरू असलेले साखळी उपोषण आज मागे घेण्यात आले. ओबीसी कल्याण विभागाचे मंत्री अतुल सावेने महासंघाच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केल्यानंतर 14 पैकी 12 मागण्या मान्य करण्यात आल्या. त्यानंतर हे उपोषण मागे घेण्यात आले.तर दोन मागण्यांकडे कॅबिनेट स्तरावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे गेल्या सहा दिवसांपासून सुरू असलेले राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे साखळी उपोष ची आज सांगता करण्यात आली. यावेळी सरकारचे प्रतिनिधी म्हणून ओबीसी कल्याण विभागाचे मंत्री अतुल सावे यांनी आश्वासन दिले तर आमदार परीणय फुके उपस्थित होते तर राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी यांनी पाणी पीत साखळी उपोषण थांबत असल्याचे जाहीर केल
------
बाईट
बबनराव तायवाडे, अध्यक्ष, राष्ट्रीय ओबीसी महासंघ
121 केलाय
-------
बाईट
आ परिणय फुके,(121 केलाय )
------
खालील मागण्या होत्या
1. मराठा जातीचा ओबीसी संवर्गात समावेश करण्यात येऊ नये व सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात येऊ नये.
3) गुणवंत मुलांमुलीना परदेशात उच्च शिक्षणासाठी देण्यात येणारी शिष्यवृत्ती 75 विद्यार्थ्यांची संख्या वाढवुन 200 विद्यार्थी करण्यात यावी.
3) महाज्योती या संस्थेकरीता एक हजार कोटी रूपयांची तरतुद करण्यात यावी, शासन निर्णय दिनांक 28 आक्टो. 2021 च्या नुसार ज्या प्रमाणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी च्या शासन निर्णयानुसार समाजातील संस्थाना कामात प्राधान्य देण्यात येते, त्याप्रमाणे महाज्योतीची कामे ओबीसी, विजा, भज व विशेष मागास प्रवर्गातील संस्थेला रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी प्राधाण्य देण्यात यावे.
5) म्हाडा व सिडको तर्फे बांधुन देण्यात येणा-या घरकुल योजनेत ओबीसी संवर्गाकरीता आरक्षण लागु करण्यात यावे.
6) नागपुर येथे तयार असलेले उच्च व तंत्र विभागाचे स्व. यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दी वर्षानिमीत्त बांधलेले 200 मुलींचे तयार वसतीगृह तसेच नागपुर येथे स्व. वसंतराव नाईक जन्मशताब्दी वर्षानिमीत्त तयार असलेले 200 मुलांचे वसतीगृह ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी संवर्गातील विद्यार्थ्यांच्या वसतीगृहासाठी ओबीसी बहुजन कल्याण विभागाकडे हस्तांतरीत करून शासन निर्णयान्वये इतर मागासवर्ग बहुजन कल्याण विभागामार्फत मुलांचे व मुलींचे वसतीगृह सुरू करण्यात यावे.
7) ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी आर्थिक विकास महामंडळा मफित असलेली थेट कर्ज योजनेची मर्यादा 1 लाख व 15 लाख रुपये कर्ज मर्यादेच्या योजनेसाठी, तसेच गहाण खतामध्ये फक्त शेतीची अट असून ती शिथिल करण्यात यावी घर., प्लॉट, दुकान इत्यादी बाबींचा समावेश व्हावा जामीनदार घेतांना केवळ सरकारी. नौकरच असावा ही अट शिथिल करण्यात यावी, 500 सीबील स्कोरची अट शिथिल करुन लाभ धारकांना अटच नसावी.
9) शामराव पेजे आर्थिक विकास महामंडळ, अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ या धर्तीवर इतर मागास आर्थिक विकास महामंडळाला अँड जनार्दन पाटील ओबीसी आर्थिक विकास महामंडळ असे नाव द्यावे.
8) प्रत्येक शहर व तालुका स्तरावर ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज ग्रंथालय सुरु करण्यात यावे.
9) डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभुषण पुरस्कार आणि आदिवासी सेवक पुरस्कार याप्रमाणे डॉ पंजाबराव देशमुख ओबीसी समाजसेवक पुरस्कार जाहीर करण्यात यावा.
10) अनुसूचित जातीजमाती प्रमाणे ओबीसी, विजा, भज व विशेष मागास प्रवर्ग शेतकरुयांना 100 टक्के सवलतीवर राज्यात योजना सुरु करण्यात याव्यात.
11) ओबीसी आर्थिक विकास महामंडळाला एक हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात यावी व महामंडळाच्या सर्व मंजूर योजना त्वरीत सुरु करण्यात याव्यात.
12) ओबीसी, वीजा, भज व विमाप्र समुदायातील पीएचडी संशोधक विद्यार्थांची तीन वर्षापासून प्रलंबित असणारी फेलोशिप त्वरित अदा करण्यात यावी.
13) अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतक-यांना त्वरीत नुकसान भरपाई देण्यात यावी. (बैठक)
14) ओबीसी मुलांना व्यावसायीक अभ्यासक्रमास 100 टक्के शिष्यवृत्ती लागु करण्यात यावी. (बैठक)
14
Report
GMGANESH MOHALE
FollowSept 04, 2025 11:35:45Washim, Maharashtra:
वाशिम:
File:0409ZT_WSM_GANAPATI_COLLECTION
रिपोर्टर:गणेश मोहळे, वाशिम
अँकर: वाशिमच्या कारंजा येथील गोपाल आणी नरेंद्र खाडे या बंधूंनी 'मोरया आम्हा तुझा छंद' या नावाने अनोखा छंद जोपासला आहे. त्यांनी दहा हजारांहून अधिक गणेशाची चित्रकात्रणे आणि शेकडो गणपती मूर्तींचा संग्रह केला आहे.एका लग्नपत्रिकेवरील सोनेरी गणपतीपासून सुरू झालेला त्यांचा हा छंद आज जगभरातील २२देशांतील गणेशमूर्तींच्या चित्रांपर्यंत पोहोचला आहे.राशीनुसार गणेशरूपे,विषयांनुसार तयार केलेली चित्रे, बाल गणेश,ध्यानस्थ गणेश, लॅपटॉपवर काम करणारा गणेश अशा अनोख्या व सूक्ष्म कलाकृती या संग्रहात आहेत.त्यांच्या प्रदर्शनांना मोठा प्रतिसाद मिळाला असून, ‘एक ऊब जाणीवेची’ संस्थेसाठी त्यांनी ५० हजारांचा निधीही संकलित केला.आज 'गणपतीवाले खाडे बंधू' म्हणून त्यांची राज्यभर ओळख आहे. श्रद्धा, कल्पकता आणि सामाजिक भान या तिन्हींचा संगम असलेला त्यांचा संग्रह अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
बाईट: गोपाल खाडे
14
Report