Back
पेणमध्ये वीजेच्या लपंडावाने गणेशमूर्तीकारांचा धाडस गेला!
PPPRAFULLA PAWAR
FollowJul 23, 2025 04:08:02
Raigad, Maharashtra
स्लग – वीजेच्या लपंडावाने गणेशमूर्तीकार हैराण .......... वारंवार खंडीत वीज पुरवठयाचा व्यवसायावर परीणाम ....... महावितरणला साकडे घालूनही उपयोग शून्य .........
अँकर – पेण मध्ये सुरू असलेल्या वीजेच्या लपंडावाने गणेशमुर्ती व्यावसायिक पुरते वैतागले आहेत. दिवसातून तीन ते चार तास वीज पुरवठा बंद होत असल्याने कामावर परीणाम होत आहे. पेणमध्ये दरवर्षी लाखो गणेशमूर्ती तयार होतात. परंतु पीओपीच्या गणेशमूर्तीवरील बंदीच्या कारणास्तव काम मंदावले होते. आता कामाला वेग आला असला तरी वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने अपेक्षित काम साधता येत नसल्याची मूर्तीकारांची तक्रार आहे. याबाबत महावितरण कडे पाठपुरावा करून देखील काहीच परीणाम होत नसल्याचे त्यांचं म्हणणं आहे.
बाईट – सचिन समेळ, मूर्तीकार
14
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
DSDM Seshagiri
FollowJul 23, 2025 14:18:59Hyderabad, Telangana:
Father Booked for Assaulting Minor Daughter
Written by: DM Seshagiri, Hyderabad
Telangana / Khammam:
A case has been registered at the Burgampahad Police Station against Miriyala Ramesh, an employee at ITC Sarapaka, for allegedly assaulting his minor daughter, Limsica (9 years, 5 months), by kicking her and subjecting her to physical and psychological abuse.
The incident came to light when Child Helpline 1098 received a distress call at around 10:10 AM on July 21, 2025, reporting that a young girl was being assaulted by her father. The caller stated that the child was being kicked and was undergoing both physical and emotional trauma.
Following the call, immediate intervention was initiated. ICDS Supervisor Ms. Sakkubai, in coordination with the Child Welfare Committee (CWC) and Operation Muskaan Team, conducted a field inquiry. During the visit to the family’s residence at Sarapaka village, near HP Petrol Bunk, it was found that the child was not at home. Further inquiries revealed that Limsica had been taken to Kurivi to her maternal grandmother’s house by her mother, Bhavani.
Upon contacting the mother via video call, she confirmed that the assault occurred on July 20, 2025, at around 11:00 AM. She alleged that her husband, Ramesh, kicked their daughter and had been abusive and negligent, causing the child mental and physical suffering. She also shared a video of the assault with CHL Case Worker Bhavani over WhatsApp as evidence.
Based on these findings, ICDS Supervisor Ms. Sakkubai filed a formal complaint, upon which a case was registered and an investigation is underway.
The police are treating this as a Child Abuse case and have begun legal proceedings against the accused.
Date of Incident: July 20, 2025 (11:00 AM)
Date Reported: July 21, 2025 (10:10 AM)
Victim: Limsica, Age 9 years 5 months (DOB: 14-02-2016), 4th Class Student
Accused: Miriyala Ramesh (Father)
Complainant: Ms. Sakkubai, ICDS Supervisor
Mother’s Name: Bhavani
Address: First house in the line near HP Petrol Bunk, Sarapaka Village, Burgampahad Mandal, Bhadradri Kothagudem District
Authorities Involved: Child Helpline 1098, CWC, ICDS, Operation Muskaan Team
Evidence: Video clip shared by mother
CWC Byte:
CWC Member Sadiq Pasha confirmed the intervention and stated that the committee will ensure legal action is pursued diligently to protect the child’s rights and wellbeing.
3
Report
NMNITESH MAHAJAN
FollowJul 23, 2025 13:45:46Jalna, Maharashtra:
FEED NAME | 2307ZT_JALNA_JARANGE(15 FILES)
जालना | ब्रेकिंग
ज्ञानेश्वरी मुंडे- मनोज जरांगे यांच्यात महादेव मुंडे हत्या प्रकरणी चर्चा
एवढ्या क्रूर पद्धतीने राक्षसांनी सुद्धा कुणाला मारल्याचे पुरावे नाही,अशा पद्धतीने महादेव मुंडे यांची हत्या-जरांगे
आरोपींना पकडण्यासाठी उशिर का.? जरांगे यांचा सवाल
अँकर | महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी आज मनोज जरांगे यांची भेट घेतली आहे. अंतरवाली सराटी येथे ही भेट झाली.या भेटीत मुंडे आणि जरांगे यांच्यात महादेव मुंडे हत्ये प्रकरणी तपासबाबत चर्चा देखील झाली.दोन दिवसांपूर्वीच जरांगे यांनी ज्ञानेश्वरी मुंडे यांची परळी येथे त्यांच्या घरी जाऊन भेट घेत त्यांच्या पाठीशी नेहमी उभं राहणार असल्याचं सांगितलं होतं.त्यांनतर राज्य सरकारनं महादेव मुंडे यांच्या हत्येप्रकरणी एसआयटी चौकशीची घोषणा केली.दरम्यान या घोषणेनंतर तसेच आजच समोर आलेल्या पोस्ट वॉर्टम अहवालानंतर ज्ञानेश्वरी मुंडे यांनी जरांगे यांची भेट घेतली.मला महादेव मुंडे हत्या प्रकरणात तपासाचं आश्वासन मिळतं पण पुढे काहीच होत नसल्याची तक्रार त्यांनी जरांगे यांच्याकडे केली.दरम्यान या भेटीनंतर ज्ञानेश्वरी मुंडे यांनी प्रतिक्रिया दिलीय.मनोज जरांगे माझ्या पाठीशी उभे असल्यानं मला न्याय मिळेल ,त्यांनी माझ्या पाठीशी असंच उभं राहावं अशी प्रतिक्रिया ज्ञानेश्वरी मुंडे यांनी दिली तर राक्षसांनी सुद्धा एवढ्या क्रूर पध्दतीने कुणाला मारल्याची नोंद जुन्या कोणत्याही ग्रंथात नाही.महादेव मुंडे यांना मारल्यानंतर त्यांना जीवे मारल्याचा पुरावा दाखवण्यासाठी त्यांच्या अंगावरील मास काढून नेल्याचा आरोप जरांगे यांनी केलाय.या प्रकरणात आरोपींना पकडण्यासाठी एवढा उशिर का होतोय असा सवाल जरांगे यांनी उपस्थित केलाय.
बाईट : ज्ञानेश्वरी मुंडे
बाईट मनोज जरांगे
10
Report
MNMAYUR NIKAM
FollowJul 23, 2025 13:19:28Buldhana, Maharashtra:
बुलढाण्यात अतिक्रमण हटवताना ग्रामस्थांचा पोलिसांवर भीषण हल्ला; अनेक पोलीस जखमी, जिल्ह्यात खळबळ
anchor - बुलढाणा जिल्ह्यातील मोहेगाव येथे अतिक्रमण काढण्याच्या कारवाईदरम्यान ग्रामस्थांनी पोलिसांवर हल्ला चढवला. या हल्ल्यात एसआरपीएफ जवान नंदकिशोर उदावणे आणि पोलीस कॉन्स्टेबल राजेश मानकर हे गंभीर जखमी झाले असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अनेक दिवसांपासून चिघळलेला अतिक्रमण प्रश्न आणि गावकरी-प्रशासन यांच्यातील तणाव यामुळे परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली असली तरी, जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे....
12
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowJul 23, 2025 13:00:25Latur, Maharashtra:
लातूर ब्रेकिंग न्यूज...
AC ::- कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांची पदावर राहण्याची लायकी नाही… सरकार महाराष्ट्रात दडपशाहीचं राजकारण करतंय… अशी जोरदार टीका करत करुणा शर्मा - मुंडे यांनी थेट रस्त्यावर उतरून आंदोलनाचा इशारा दिला आहे .छावा संघटनेचे विजयकुमार घाडगे यांना झालेल्या मारहाणीनंतर करुणा मुंडे यांनी त्यांची भेट घेतली. यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली.
बाईट ::- करुणा मुंडे
12
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowJul 23, 2025 12:51:57Latur, Maharashtra:
लातूर ब्रेकिंग न्यूज
स्किप्ट ::- विजयकुमार घाडगे म्हणाले माझ्या जिवाला धोका....
Exclusive...
AC ::- विजयकुमार घाडगे यांनी पोलिसांना आता जाब विचारत ZEE 24 TAAS ला दिलेल्या मुलाखतीत पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. पोलिसांनी चुकीच्या पद्धतीने माझी तक्रार नोंदवून त्याला गोलमाल करून आरोपी सुरज चव्हाण याला सोडून दिलं आहे. त्यांने माझा जिव मारण्याचा प्रयत्न केलाय. आता तुम्ही त्याला सोडून दिल्यामुळे माझ्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. विजयकुमार घाडगे यांच्या शी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी वैभव बालकुंदे यांनी...
1 टु 1 ::- वैभव बालकुंदे रिपोर्टर
14
Report
JJJAYESH JAGAD
FollowJul 23, 2025 12:48:53Akola, Maharashtra:
Anchor : संभाजी ब्रिगेड (राजकीय) या संघटनेच्या माजी प्रदेश कार्याध्यक्षाला एका महिलेने चांगलाच चोप दिल्याचा प्रकार अकोल्यातील मूर्तिजापूर मध्ये घडला आहेय..गजानन पारधी असं चोप देण्यात आलेल्या माजी कार्याध्यक्षचे नाव आहेय.. या घटनेचा व्हिडिओ आता व्हायरल झाला आहेय.. मात्र हा व्हिडिओ नक्की कधीचा आहे याची पुष्टी झी 24 तास करत नाही..पारधी यांच्यावर महिलेकडून गंभीर आरोप करण्यात आले होते. दरम्यान या महिलेने चपलेने पारधी याला चांगलाच चोप दिला आहेय..
13
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowJul 23, 2025 12:46:19Parbhani, Maharashtra:
अँकर- हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यात नव्याने केलेल्या डांबर रोडचे निकृष्ट काम झालं असून सदर रस्ता चक्क हाताने उकरू लागलाय. सेनगाव तालुक्यातील आजेगांव ताकतोडा,नाकटेक मार्गे पिंपरी मन्नास पर्यंत झालेल्या डांबर रस्त्याचे काम निकृष्ट झाल्याचा आरोप करीत क्रांतीकारी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रस्त्याची पोलखोल केलीय, करोडो रुपये खर्च करून अशी बोगस रस्ते उभारून कंत्राटदार मालामाल होत असल्याचा आरोप या कार्यकर्त्यानी केलाय. या रस्त्याच्या कामाची चौकशी करून तात्काळ कार्यवाही करावी नाहीतर तेच बोगस डांबर जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात नेऊन टाकू असा ईशारा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिलाय...
बाईट- गजानन कावरखे- पदाधिकारी,क्रांतीकारी शेतकरी संघटना,हिंगोली
14
Report
SRSHRIKANT RAUT
FollowJul 23, 2025 12:01:57Yavatmal, Maharashtra:
Anchor : यवतमाळच्या पांढरकवडा शहरात शाळकरी व महाविद्यालयीन विद्यार्थीनींच्या छेडखानीचे प्रकार वाढले आहेत, मुलींची छेडखानी करणाऱ्या रोडरोमिओंचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी करीत पालक व नागरिकांनी पोलिस ठाण्यावर धडक देत ठिय्या आंदोलन केले. पांढरकवडा तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे फोफावले आहेत, त्यातून समाजकंटकांचा वावर वाढला आणि हेच टवाळखोर शाळा, महाविद्यालयात तसेच शिकवणी वर्गासमोर मुलींना रस्त्यात अडवून त्यांची छेड काढतात. परिणामी विद्यार्थिनींमध्ये दहशतीचे व असुरक्षिततेचे वातावरण आहे. या सडकछाप मजनूंचा बंदोबस्त करावा अशी मागणी पालकांनी केली आहे.
बाईट- नितीन बाराहाते, पालक
बाईट-प्रिती पारखी, पालक
बाईट- बंट्टी जुवारे, पालक
14
Report
SMSarfaraj Musa
FollowJul 23, 2025 11:48:58Sangli Miraj Kupwad, Maharashtra:
स्लग - कर्णबधिरांसाठी राज्यातील पहिली रोबोटीक प्रशिक्षण कार्यशाळा मिरजेत सुरू...
अँकर - सांगलीच्या मिरजेत कर्णबधिरांसाठी महाराष्ट्रतील पहिली रोबोटिक प्रशिक्षण कार्यशाळा सुरू करण्यात आली आहे.भिडे मूकबधिर शाळा येथे ही रोबोटिक प्रशिक्षण कार्यशाळा सुरू झाली आहे.जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या हस्ते याचे उद्घाटन पार पडले.या रोबोटिक आणि एआय प्रशिक्षणामुळे कर्णबधिर मुलांना मुख्य प्रवाहात येण्यास मदत मिळणार असून मूकबधिर मुलं या क्षेत्रात आपलं करिअर करू शकतात,त्यामुळे रोबोटिक प्रशिक्षण या मुलांसाठी वरदान ठरू शकते,असे मत या वेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी
व्यक्त केले आहे.पुण्याच्या वुई ( WE )
फौंडेशनचा माध्यमातून ही कार्यशाळा संपन्न होत असून राज्यपातळीवरचा हा पहिला प्रयोग येथे प्रायोगिक तत्त्वावर पंधरा दिवसाचा प्रशिक्षण मूकबधिर विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे.
बाईट - दिनेश गडवीर - उपमुख्याध्यापक - रा.वि. भिडे कर्णबधिर शाळा - मिरज.
14
Report
TTTUSHAR TAPASE
FollowJul 23, 2025 11:48:12Satara, Maharashtra:
TUSHAR TAPASE
3 FILES
SLUG NAME -SAT_RAJE_RAJE
साताऱ्यात खासदार उदयनराजे भोसले यांची सातारा विकास आघाडी आणि मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची नगर विकास आघाडी या दोन आघाड्यांच्या मार्फत दरवेळी रंगतदार निवडणूक पाहायला मिळते.. सध्या सातारा नगरपालिकेवर खासदार उदयनराजे यांच्या सातारा विकास आघाडी ची सत्ता जरी असली तरी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने झालेले मनोमिलन आगामी सातारा नगरपालिका निवडणुकीत कायम राहणार का? हा प्रश्न उपस्थित होत आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या निमित्ताने खा.उदयनराजे यांनी सर्वांनी एकत्र येऊन बसाव अशी माझी मनापासून इच्छा असल्याचे स्पष्ट करत हा निर्णय मी एकटा घेणार नाही. स्थानिक पातळीवर राजकारण आणू नये. मी कधी आयुष्यात राजकारण केलेले नाही.मी जास्तीत जास्त लोकांची सेवा केली आहे. राजकारण करायला अक्कल लागत नाही. नगरपालिकेच्या साठी मनोमिलन झालं पाहिजे ही माझी इच्छा आहे. पण सध्या शिवेंद्रराजे बिझी आहेत कारण ते मिनिस्टर आहेत अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
बाईट - उदयनराजे भोसले
यावेळी शिवेंद्रराजे भोसले यांना नगरपालिका निवडणुकीच्या मनोमिलनाबद्दल विचारणा केली असता. त्यांनी मात्र हा सर्व निर्णय भाजप पक्षातील वरिष्ठांवर सोडलेला दिसतोय... यावेळी त्यांनी मी आणि उदयनराजे दोघेही भाजपाचे पदाधिकारी आहोत असे सांगून ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्था. नगरपालिका निवडणुकीबाबत देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण जे काही पक्ष निर्णय घेईल. त्यानुसार आम्ही या निवडणुकीला सामोरे जाणार अशी स्पष्ट प्रतिक्रिया यावेळी शिवेंद्रराजे यांनी दिली.
बाईट: मंत्री शिवेंद्रराजे भोसले
यामुळे उदयनराजेंनी जरी या मनोमिलनाबाबत सकारात्मकता दर्शवली असली तरी शिवेंद्रराजे यांनी मात्र हा निर्णय पक्षश्रेष्ठींवर सोडला आहे... यामुळे यापुढील काळात दोन्ही राजेंचे नगरपालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुकीच्या अनुषंगाने मनोमिलन होणार का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
14
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowJul 23, 2025 11:47:59Parbhani, Maharashtra:
अँकर- जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये हजेरी पटावरील विद्यार्थी संख्या कमी झाल्यावर शाळा बंद केल्या जात आहेत, आपली ही शाळा बंद पडू नये म्हणून परभणी जिल्ह्यातील एका जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक ज्ञानदानाच उत्तम कर्तव्य तर बजावतायेतच पण आता विद्यार्थ्यांचे सारथ्य ही करू लागलीयेत, त्यामुळे या शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या वाढून पालकांचा ही विद्यार्थ्यांना शाळेत ने आण करण्याचा प्रश्न मिटलाय. बघुयात यांसंदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट...
व्हीओ- गुरुर ब्रम्हा गुरुर विष्णू अस आपण शिक्षकांना म्हणत असतो,या उक्तीला साजेसे काम परभणीच्या पालम तालुक्यातील गुंज जिल्हा परिषद शाळेच्या दोन शिक्षकांनी सुरू केलंय,गोदावरी नदीच्या तीरावर वसलेल्या बाराशे लोकवस्तीच्या गुंज या गावाचे जागे अभावी छोटी छोटी तीन गाव झालीत,स्थलांतरीत झालेल एक गाव 2 किमी तर दुसर गाव 3 किमी दूर अंतरावल जाऊन वसलय,पण जिल्हा परिषदेची शाळा मात्र जुन्या गुंज गावातच आज ही आहे. त्यामुळे पालकांना आपल्या पाल्यांना 2 ते तीन किमी दूर असलेल्या शाळेत नेऊन सोडावे लागत होते,यामुळे पालकांचा वेळ आणि इंधनात पैसा जात होता,ज्यांची परिस्थिती नाही अशा पालकांचे मुलं तर शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर फेकली जात होती. यामुळे जिल्हा परिषद शाळेतील पटावरील संख्या कमी होत असल्याने या शाळेतील दोन शिक्षकांनी पालकांना विश्वासात घेऊन विद्यार्थ्यांना त्यांच्या घरून शाळेत नेण्याचा आणि परत घरी सोडण्याची हमी घेतलीय, विद्यार्थ्यांना पिकअप आणि ड्रॉप करण्यासाठी शिक्षकांनी अस जुगाड केलंय,यामुळे आता पालकांची मुलं शाळेत ने आन करण्याची चिंता मिटलीय...
बाईट- रुस्तुम लोखंडे- मुख्याध्यापक,गुंज-प्राथमिक जिल्हा परिषद शाळा
बाईट- सुनील राऊत- शिक्षक,गुंज,प्राथमिक जिल्हा परिषद शाळा,
व्हीओ- या शिक्षकांनी गुजरात येथून ट्रॉली मागवली,अर्थात यामध्ये गावकऱ्यांचा ही लोकसभाग आहेच, सदर ट्रॉली या शिक्षकाने स्वतःच्या बाईकला सेफ्टीपिन ने जोडून त्यातून या मुलांची मोफत वाहतूक सुरू केलीय. शिवाय ही ट्रॉली अपघातग्रस्त होऊ नये म्हणून ट्रॉली तयार करतांनाच ट्रॉलीची उंची कमी करण्यात आली असून ट्रॉलीची साडे तीन बाय पाच असा चौरस आकार बनवण्यात आलाय,यामुळे ही ट्रॉली वाहतूक करण्यासाठी सुरक्षित आहे. तरी सुद्धा अतिशय कमी स्पीडमध्ये शिक्षक दुचाकी हाकुन सुरक्षित रित्या विद्यार्थ्यांना शाळेत ने आन करीत असतात. त्यांच्या या उपक्रमशील प्रयोगामुळे शाळेत 8 विद्यार्थ्यांचे ऍडमिशन वाढले असून गुणवत्तापूर्ण शिक्षणामुळे इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घातलेले विद्यार्थी सुद्धा या शाळेत परत येत असल्याचे शिक्षक सांगतायेत...
बाईट- रामचंद्र काळे- पालक
बाईट-पिराजी काळे- पालक
व्हीओ- मागील दोन वर्षापूर्वी मुख्याध्यापक लोखंडे आणि राऊत सर हे बदली वर या शाळेत आल्यानंतर शाळेच्या गुणवत्तेत भर पडल्याचे ग्रामस्थ दिसून आले, शाळा आणि मुलाबद्दल शिक्षकांची असलेली आस्था बघून गावकर्यांनी सरांनी सुचवलेल्या या प्रस्तावाला आनंदाने परवानगी दिली.
पण शाळेत दोनच खोल्या असून पाच वर्ग आहेत, त्यापैकी शाळेतील एक खोली जीर्ण झाली असल्याने एकाच खोलीत पाच वर्ग शिकवावे लागतात किंवा मग अश्या पिवळ्या ताडपत्री खाली विद्यार्थ्यांच ज्ञानार्जन सुरू असते. शिवाय शाळेत पोचन्यापूर्वी खराब असलेला 300 मीटरचा रस्ता विद्यार्थ्यांना अडचणीचा ठरतोय. शिक्षणाच्या हक्कापासून विद्यार्थी वंचित राहू नयेत यासाठी येथील शिक्षक ज्ञानदाना वरोबर जोखीम घेवून विद्यार्थ्यांचे सारथ्य ही करीत आहेत,आता शिक्षण विभागाने याची सकारात्मक दखल घेऊन शाळेला भौतिक सोयी सुविधा पुरविण्याची खरी गरज आहे...
गजानन देशमूख,झी मीडिया,परभणी
14
Report
ABATISH BHOIR
FollowJul 23, 2025 11:47:39Kalyan, Maharashtra:
अशा लोकांना पकडून देऊन त्यांना मारहाण करूनच पोलिसांच्या स्वाधीन करा असे मनसैनिकांना आवाहन... माजी आमदार प्रकाश भोईर
जे त्या मुलीने केलं ते बरोबरच आहे आमचे याला समर्थन आहे.
हात सोडूनच वागलं पाहिजे..
मारहाण प्रकरणातील नवीन सीसीटीव्ही समोर आल्याच्या ट्विस्टवर मनसेचे माजी आमदार प्रकाश भोईर यांनी वक्तव्य केलं आहे की ज्या महिलेला या तरुणीने कानशिलात लावली आहे त्या महिलेने या तरुणीला मारहाण केली असती तर ही बाब वेगळी होती मात्र या तरुणांनी अशा पद्धतीने तरुणीला मारहाण करणे किती पद योग्य आहेत
मनसेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना सांगणे आहे की हात सोडूनच यांच्याशी वागलं पाहिजे मुलींना जे केलं आहे याला आमचे पूर्णपणे समर्थन आहे प्रतिक्रिया द्यावी असे सर्व मनसैनिकांना आमचे सांगणे आहे
Byte.. प्रकाश भोईर
माजी आमदार मनसे
14
Report
ABATISH BHOIR
FollowJul 23, 2025 11:47:32Kalyan, Maharashtra:
एमआयडीसीतील इरोसोल कापड प्रक्रिया कंपनीला लागली आग
कंपनीचे नाव एरोसेल प्रायव्हेट लिमिटेड
अग्निशमन दलाच्या 10 गाड्या दाखल व पाण्याचे टँकर घटनास्थळी दाखल
अग्निशामक दलाकडून युद्धपातळीवर आग विझवण्याचे काम सुरू
आग इतकी भीषण आहे की या आगे कंपनीमधील सामुग्री जुळून खाक
ट्रांसफार्मरला लागून कंपनीला आग प्राथमिक माहिती
अग्निशामक दल एमआयडीसी कर्मचारी पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल
आग इतकी भीषण आहे की पूर्ण परिसरात धुराचे लॉट पसरलेले आहे
या ठिकाणचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी आतिश भोईर यांनी.
कंपनीमध्ये सकाळपासूनच काम सुरू होते मात्र आज लागण्याची कळतात कर्मचारी बाहेर पडल्याचे माहिती आहे.
आजूबाजूच्या कंपन्या देखील खाली करण्यात आले आहे
आगीवर नियंत्रण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत
Wkt...आतिश भोईर
byte.. नामदेव चौधरी
अग्निशमन अधिकारी
14
Report
PNPratap Naik1
FollowJul 23, 2025 10:49:51Kolhapur, Maharashtra:
Kop KMC Drainage Ghotala
Feed :- Live U
Anc :- आत्ता एक मोठी बातमी कोल्हापूर महानगरपालीकेतून.. कोल्हापूर शहरात 85 लाखाचे ड्रेनेज घोटाळा झाल्याचे जवळपास सिद्ध झालंय. ड्रेनेज काम करणाऱ्या ठेकेदार प्रसाद वराळे याने पाचव्या टप्यातील काम न करताच 85 लाख रुपये उचलले असल्याचे थेट कबूल केलंय.. शिवसेनेचे जिल्हा समन्वयक सत्यजित कदम यांनी हा घोटाळा उघड केल्यानंतर महानगपालिकेने महानगरपालिका तात्कालीन शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत याच्यासह इतर तीन अभियंता यांच्याकडे देखील खुलासा मागवीला आहे. या अधिकाऱ्यांचा लेखी खुलासा केल्यानंतर महानगरपालिका ठेकेदार आणि संबंधित सूत्रधार याच्या विरोधात थेट फौजदारी कारवाई करणार असल्याचे महापालिका उपयुक्त रविकांत अडसूळ यांनी सांगितले आहे. तर दुसरीकडे प्रजासत्ताक सामाजिक सेवा संघटनेचे दिलीप देसाई यांनी कोल्हापूर महानगरपालिके मार्फत प्रशासक नेमल्यापासून आजपर्यंत झालेल्या सर्व कामाची चौकशी व्हावी अशी मागणी करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मेल पाठविला आहे..
Byte :- रविकांत अडसूळ, उपायुक्त कोल्हापूर महानगरपालिका
Byte :- सत्यजित कदम, शहर समन्वयक शिवसेना.
Byte :- दिलीप देसाई,प्रजासत्ताक सामाजिक सेवा संघटना.
14
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowJul 23, 2025 10:49:41Dhule, Maharashtra:
Anchor - केंद्र सरकारच्या कांद्याबाबतच्या वारंवार बदलणाऱ्या भूमिकेमुळे कांद्याचे दर कमी झालेले आहेत, ही परिस्थिती सुधारण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करीत असल्याचं म्हणून मंत्री जयकुमार रावल यांनी स्पष्ट केलेल आहे. कांद्याच्या निर्यात संदर्भात कुठलीही अडचण नाही आहे. कांद्याच्या निर्यात करण्यावर कुठलीच अडचण नाही नसल्याच्या राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी प्रतिक्रिया दिली, सरकार शेतकरी कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या बाजूने उभी असून निर्यात कुठलीच बंदी नाही आहे त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत नसून सरकार त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. पणन विभाग कंजूमर विभागाशी बोललो असून, जवळपास तीन लाख टन ची खरेदी सुरू केली आहे. मी केंद्रीय मंत्री जोशी यांच्याशी भेटून कांदा बाजार समितीतून खरेदी करता येणार का या संदर्भात विनंती आहे. यावर्षी कांदा मोठ्या प्रमाणावर आला आहे त्यामुळे कांद्याला जास्तीत जास्त भाव मिळावा यासाठी आम्ही केंद्रात मागणी केली आहे. त्यामुळे तीन लाख टन कांद्याची खरेदी सुरू झाली आहे कांद्याची तीन लाख क्विंटल खरेदी झाल्याने बाजारपेठ उठणार असल्याचं राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी कांदा संदर्भात सरकारची भूमिका मांडली,
बाईट :- पणन मंत्री जयकुमार रावल
प्रशांत परदेशी धुळे
14
Report