Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Jalna431213

नांदेडमध्ये विष्णुपुरी प्रकल्पाचे दहा दरवाजे उघडले, गोदावरी नदीत विसर्ग!

NMNITESH MAHAJAN
Aug 18, 2025 13:19:04
Jalna, Maharashtra
FEED NAME : 1808ZT_NANDED_VISHNUPURI(1 FILE) नांदेड :विष्णुपुरी प्रकल्पाचे दहा दरवाजे उघडले..१ लाख ४ हजार क्यूसेस वेगाने गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग.. नदी काठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा अँकर - नांदेड जिल्ह्यात मागील तीन ते चार दिवसा पासून सातत्याने पाऊस सुरु आहे. विष्णुपुरी प्रकल्प शंभर टक्के भरल्याने प्रकल्पाचे दहा दरवाजे उघडण्यात आले आहे. विष्णुपुरी प्रकल्पातुन जवळपास १ लाख ४ हजार क्यूसेस इतक्या वेगाने गोदावरी नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरु आहे. गोदावरी नदी दुथडी भरून वाहत असून गोवर्धन घाट येथील स्मशानभूमी च्या काठापर्यंत पाणी पोहचले आहे. सद्या विष्णुपुरी प्रकल्पात पाण्याची आवक सुरु आहे, त्यामुळे प्रकल्पाचे आणखी काही दरवाजे उघडण्याची शक्यता आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात दरवाजे उघडण्याची पहिली वेळ आहे. दरम्यान गोदावरी नदी दुथडी भरून वाहत असल्याने जिल्हा प्रशासनाने नदी काठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे....
12
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
JMJAVED MULANI
Aug 18, 2025 15:45:24
Baramati, Maharashtra:
JAVEDMULANI SLUG 1808ZT_INDAPURINDRESHWR FILE 5 इंदापूरच्या इंद्रेश्वर महादेव मंदिरात श्रावणातील चौथ्या सोमवारी फुलांची आरास ... भाविकांची गर्दी... Anchor:- पुणे जिल्ह्यातील इंदापूरच्या ग्रामदैवत इंद्रेश्वर महादेव मंदिरात श्रावणातील चौथ्या सोमवारी मंदिराच्या गाभाऱ्यात चौरसाकृती रंगीबेरंगी फुलांची आकर्षक आरास साकारण्यात आलीय . सोमवारी १८ ऑगस्ट रोजी इंद्रेश्वर मंदिरात पहाटेपासूनच अभिषेक घालण्यात आला. ग्रामदैवत श्री इंद्रेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने शास्त्रीय अभंग वाणीची अभंग संध्या हा कार्यक्रम गायक निखिल कुलकर्णी व तबलावादक महेशकुमार झगडे यांची सुरेल मैफिल पार पडलीय दिवसभराच्या काळात इंदापूर तालुक्यातील अनेक गावातील आलेल्या भक्तिभावाने इंद्रेश्वर महादेवाचे दर्शन घेत होते. मंदिराच्या संपूर्ण गाभाऱ्यात विविध रंगीबेरंगी फुलांनी स्वस्तिक तसेच आकर्षक सजावट करण्यात आली होती. सकाळपासूनच लहानांपासून मोठ्यांपर्यंत भाविक रांगेत उभे राहून दर्शन घेत होते.
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Aug 18, 2025 15:03:45
Jalna, Maharashtra:
FEED NAME : 1808ZT_JALNA_GORANTYAL(7 FILES) जालना :भाजप नेते कैलास गोरंट्याल यांच्यासह त्यांच्या पत्नी माजी नगराध्यक्षा संगिता गोरंट्याल यांना सोशल मीडियावर शिविगाळ शिविगाळ करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल करून अटक करा कैलास गोरंट्याल यांची पोलीस अधिक्षकांकडे मागणी सायबर पोलिसांकडेही केली तक्रार अँकर :जालन्यातील भाजप नेते आणि माजी आमदार कैलास गोरंट्याल यांच्यासह त्यांच्या पत्नी माजी नगराध्यक्षा संगिता गोरंट्याल यांना सोशल मीडियावर एकाने शिविगाळ केलीये.तेजू नावाचं हे अकाऊंट असून रहिम तांबोळी नावाच्या एका व्यक्तीने सोशल मीडियावर गोरंट्याल यांच्याविषयी अपशब्द वापरले आहेत. त्यामुळं सोशल मीडियावर शिविगाळ करणाऱ्याला तात्काळ अटक करावी यासाठी गोरंट्याल यांनी पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केलीये.सायबर सेलकडे देखील तक्रार करण्यात आलीय. ही पोस्ट करण्या मागे कोण आहे याचीही चौकशी पोलिसांनी केली पाहिजे अशी मागणी गोरंटयाल यांनी केलीय. दरम्यान शिविगाळ करणाऱ्याला अटक न केल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असा ईशारा गोरंट्याल यांनी दिला आहे.दरम्यान ज्याने हे कृत्य करायला भाग पाडलं त्याच्या अंगात 50 जणांचं रक्त असल्याचा खळबळजनक आरोप गोरंटयाल यांनी केलाय. बाईट- कैलास गोरंट्याल, नेते, भाजप
5
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Aug 18, 2025 15:02:16
Bhimashankar, Maharashtra:
Feed 2C Slug: Bhimashankar DCM Shonde File:07 Rep: Hemant Chapude(Bhimashankar) भीमाशंकर एकनाथ शिंदे बाईट - भीमाशंकरचं दर्शन घेण्यासाठी लाखो शिवभक्त येत असतात. ही परंपरा कैक वर्षांपासून सुरुये. त्याप्रमाणे मी सुद्धा शेवटच्या श्रावणी सोमवारी दर्शन घेत असतो. खऱ्या अर्थाने धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी ही परंपरा सुरु केली होती, ती परंपरा सुरु असल्याचं मला आनंद आहे, समाधान आहे. श्रावण महिन्यात देशभरात असंच वातावरण पहायला मिळतं. मी लाखो शिवभक्तांपैकी एक आहे. - इथले रस्ते मी पाहिले, चांगला रस्ता आपण करु. 280 कोटींचा विकास आराखडा तयार केलेला आहे. भक्तांची गैरसोय होणार नाही, याची काळजी सरकार नक्की घेईल. *ऑन अतिवृष्टीमुळं संकट* - वरुणराजाचे आगमन झालेलं आहे. आज भीमाशंकर कडे साकडं घालतो. आमचा बळीराजा सुखी होऊ दे, संकटातून मुक्त कर, त्यांना सुख समाधानाचे दिवस येऊ दे. *ऑन शिवभोजन थाळी निधी* - ज्या काही अडचणी आहेत, ते सरकार दूर करेल. सर्व सामान्यांना न्याय देईल. *ऑन रोहित पवार भरष्टाचाराचे आरोप* - भीमाशंकर ने सर्वांना सदबुद्धी आणि सुबुद्धी द्यावी. Byte: एकनाथ शिंदे (उपमुख्यमंत्री) प्रतिनिधी हेमंत चापुडे झी मिडीया भिमाशंकर पुणे..
10
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Aug 18, 2025 14:47:53
Raigad, Maharashtra:
स्लग - अंबा नदीने ओलांडली धोक्याची पातळी ...... पुराचे पाणी नागोठणे शहरात शिरण्यास सुरुवात ..... व्यापाऱ्यांची आवराआवर, नागरिकांची धावपळ ....... अँकर - अंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून पुराचे पाणी नागोठणे शहरात शिरण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे नागरिकांची धावपळ सुरू झाली आहे. शहरातील एसटी बस स्थानक, टेम्पो स्टँड, भाजी मार्केट, कोळीवाडा परिसर पाण्याखाली गेल्याने नागरिक सतर्क झाले असून व्यापाऱ्यांनी सामानाची आवरा आवर करायला सुरुवात केली आहे. बसस्थानकात पाणी आल्याने एसटी बसची वाहतूक शहरा बाहेरून सुरू होती. नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे असं आवाहन नागोठणे ग्रामपंचायतीने केलं आहे.
10
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Aug 18, 2025 14:47:41
Satara, Maharashtra:
TUSHAR TAPASE 3 FILES slug name -SAT_RICKSHAW_POLICE सातारा - साताऱ्यात आज एक धक्कादायक प्रकार घडला आहे. दारुच्या नशेत बेभान झालेल्या रिक्षाचालकाने थेट महिला पोलीस कॉन्स्टेबललाच रिक्षासोबत फरफटत नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हा संपूर्ण थरार साताऱ्यातील मध्यवर्ती ठिकाण म्हणजेच खंडोबा माळ येथून मार्केट यार्ड पर्यंत सीसीटीव्हीत कैद झाला आहे. विओ 1-मद्यधुंद अवस्थेत रिक्षा चालवणाऱ्या चालकाला अटकाव करण्याचा प्रयत्न महिला पोलिसांनी केला. मात्र याच दरम्यान चालकाने अचानक रिक्षा वेगात चालवत महिला पोलीस कॉन्स्टेबलला फरफटत नेले. या घटनेत त्या गंभीर जखमी झाल्या असून त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.याच दरम्यान बेभान रिक्षाने ६ ते ७ दुचाकी व चारचाकींना धडक दिली. संतप्त नागरिकांनी रिक्षाचालकाला पकडून चोप दिला. घटनेची माहिती मिळताच सातारा पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि आरोपी चालकाला ताब्यात घेतले. या घटनेमुळे साताऱ्यात एकच खळबळ उडाली आहे.
13
comment0
Report
YKYOGESH KHARE
Aug 18, 2025 14:47:32
Nashik, Maharashtra:
nsk_cylinderblast Anchor - चांदवड तालुक्यातील मंगरूळ येथे पत्र्याच्या घरामध्ये ठेवलेला गॅस सिलेंडर अचानक स्फोट झाला. या स्फोटाचा आवाज इतका मोठा होता की परिसरातील नागरिक भयभीत होऊन घराबाहेर धावले.सुदैवाने या दुर्घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र घराचे मोठे नुकसान झाले असून घरातील साहित्याची नासधूस झाली आहे. घटनेनंतर गावकऱ्यांनी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवले..
13
comment0
Report
YKYOGESH KHARE
Aug 18, 2025 14:47:22
Nashik, Maharashtra:
nsk_alert fed by 2C Breaking image attached नाशिक शहरात जलसंपदा विभागाचा नागरिकांसाठी अचानक अलर्ट जारी पावसाचा जोर वाढल्यास गंगापूर धरणातून केव्हाही पाणी सोडण्याचा जलसंपदा विभागाने वर्तविला धोका पाणी सोडावे लागल्यास गोदावरीची पातळी अचानक वाढू शकते गोदाकाठावरील सर्व गावांना आणि व्यावसायिकांना सतर्कतेचा इशारा येणाऱ्या तीन दिवसात केव्हाही सोडले जाऊ शकते धरणातून पाणी
11
comment0
Report
ABATISH BHOIR
Aug 18, 2025 14:47:11
Kalyan, Maharashtra:
डोंबिवली अंबनापूर बदलापूर रस्त्याला नदीचा स्वरूप.. डोंबिवली एमआयडीसी अंबरनाथ बदलापूरला जोडणाऱ्या रस्त्यावरती कटाई नाका ते नेवाळी परिसरातील दोन्ही बाजूला रस्त्याला नदीचा स्वरूप रस्त्यावरती गुडघाभर पाणी साचल्याने अनेक गाड्या बंद पडल्या
13
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Aug 18, 2025 14:31:04
Jalna, Maharashtra:
FEED NAME : 1808ZT_NANDED_BFLO_DEATH(1 FILE) नांदेड :मुक्रमाबाद गावात पुराच्या पाण्यात बुडून 50 म्हशी दगावल्या,शेतकऱ्याचं 50 लाख रुपयांचं नुकसान,जिल्ह्यातील 200 जनावरे वाहून गेल्यानं शेतकऱ्यांचं दीड ते दोन कोटी रुपयांचं नुकसान अँकर :नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील मुक्रमाबाद गावात पुराच्या पाण्यात बुडून 50 म्हशी दगावल्या आहेत.या म्हशींचा पाण्यात बुडून मृत्यु झाल्यानंतर यातील काही म्हशी या वाहून गेल्या आहेत.यामध्ये या शेतकऱ्याचं 50 लाख रुपयांचं नुकसान झालं आहे.जिल्ह्यात तब्बल 200 जनावरे वाहून जाऊन जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं अंदाजे दिड ते 2 कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे.वाहून गेलेल्या जनावरांची प्रत्यक्ष आकडेवारी अजूनही समोर आलेली नसली तरी प्रशासनाकडून माहिती घेण्याचं काम सुरू आहे.मूक्रमाबाद गावात सध्या पुरजन्य परिस्थिती असून सततच्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे.दरम्यान 50 म्हशींचा पुराच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्यानं शेतकऱ्याचं तब्बल 50 लाख रुपयांचं नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
5
comment0
Report
PNPratap Naik1
Aug 18, 2025 14:30:27
Kolhapur, Maharashtra:
Kop Ashim Sarode PC Feed:- Live U Anc:- राजकीय सोयीसाठी पडलेली बहुसदस्यीय प्रभाग रचना रद्द करावी अशी मागणी वकील असीम सरोदे यांनी केली आहे... ते आज कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते... सत्तेत असलेल्या आणि सत्तेत नसलेल्या सर्वच राजकीय पक्षांनी आपल्या राजकीय हेतूने प्रभाग पाडून घेतले, त्यामुळं वार्डात एक मत आणि एक नगरसेवक ही पद्धत बाजूला पडली...प्रभाग पडणं हे राज्य सरकारच्या अधिकारात येत असलं तरी त्याचा हेतू वेगळा आहे. आपल्या सोयीच्या उमेदवारासाठी सोयीनुसार प्रभाग पडून घेतले जातात त्यामुळे एखाद्या वार्डात प्रामाणिकपणे समाजसेवा करणारा कार्यकर्ता बाजूला पडतो. शिवाय बहुसदस्यीय प्रभागात कुणावर कुठली जबाबदारी हे स्पष्ट केलेले नसते, त्यामुळं जनतेने कुणाकडे दाद मागायची हा देखील प्रश्न निर्माण होतो...शिवाय महाराष्ट्र सोडून देशातील कोणत्याही राज्यात बहुसदस्यीय प्रभाग रचना नाही असेही सरोदे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिलीय. Byte:- असीम सरोदे, वकील
12
comment0
Report
PNPratap Naik1
Aug 18, 2025 14:30:06
Kolhapur, Maharashtra:
Kop Gokul Yachika Feed:- Live U Anc:- आत्ता एक महत्वाची बातमी कोल्हापूर सर्किट बेंच मधून. कोल्हापूर सर्किट बेंचच्या कामकाजाच्या पहिल्या दिवशी कोल्हापूर दुध उत्पादक संघ अर्थात गोकुळ दुध संघ बरखास्त करावे त्याचबरोबर संचालक मंडळाकडून वसुली करावी यासाठी याचिका दाखल करण्यात आली आहे. मंगळवारी या याचिके संदर्भात सुनावणी होणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यात असणाऱ्या महादेव सहकारी व्यावसायिक दुध संघाचे संचालक प्रकाश बेलवाडे यांनी ही याचिका दाखल केलीय. सन २०२१ -२२ सालाच्या आर्थिक वर्षाच्या लेखापरीक्षणात अनेक त्रुटी दाखवण्यात आल्या आहेत, पण त्यामध्ये कोणत्याही पद्धतीच्या सुधारणा संचालक मंडळाने केल्या नाहीत असा आरोप याचीकर्ते प्रकाश बेलवाडे यांनी केलाय. Byte:- प्रकाश बेलवाडे, याचीकाकर्ते
12
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Aug 18, 2025 14:16:29
Jalna, Maharashtra:
FEED NAME : 1808ZT_NANDED_BODY_FOUND(5 Photos) नांदेड : ब्रेकिंग हसनाळ येथून वाहून गेलेल्या 5 पैकी 3 महिलांचे मृतदेह सापडले अँकर : नांदेड जिल्ह्यातील हसनाळ येथून वाहून गेलेल्या 5 पैकी 3 महिलांचे मृतदेह सापडले आहेत.तर 2 जण अजूनही बेपत्ता आहे.त्यामुळे आणखी 2 दोघांचा शोध सुरू आहे. आतापर्यंत ललिता भोसले,गंगाबाई मादळे, भीमाबाई मादळे या तीन महिलांचे मृतदेह सापडले  आहेत.काल रात्री पुराच्या पाण्यात या तीन महिला वाहून गेल्या होत्या.त्यांचा शोध सकाळपासून सुरू होता.दरम्यान वाहून गेलेल्या आणखी दोघांचा शोध सुरू आहे.
14
comment0
Report
MAMILIND ANDE
Aug 18, 2025 14:00:19
Wardha, Maharashtra:
वर्धा SLUG- 1808_WARDHA_CONG_PC वर्ध्यात हजारोंची नावे मतदार यादीत दोनदा ग्रामीण भागात नाव असणारे अनेक शहरी मतदार राज्यघटना म्हणते एक व्यक्ती एकच मत मग निवडणूक आयोगाची घोडचूक नाही का? काँग्रेसचे राष्ट्रीय समन्वयक शैलेश अग्रवाल यांचा संतप्त सवाल अँकर : वर्धा जिल्ह्यात विविध मतदार संघात मतदारांची नावे दोन ते तीन ठिकाणी असल्याची बाब काँग्रेसचे राष्ट्रीय समन्वयक शैलेश अग्रवाल यांनी पत्रकार परिषद घेत समोर आणली आहे. वर्धा जिल्ह्यातील केवळ वीस टक्के मतदार याद्याची छाननी केली असता साडेचार हजार मतदार हे मतदार यादीत दोनदा नावं असलेले आढळून आले आहे. सुमारे 16 हजार मतदार हे मायग्रेट झाले असतांनाही मतदार यादीत दोनदा नावं असलेले आढळून आले आहे.  केवळ वीस टक्के छाननी केल्यावर हा घोड आढळून आला असल्याचे शैलेश अग्रवाल यांनी सांगितले आहे. वर्धा जिल्ह्यातील वर्धा, आर्वी, हिंगणघाट विधानसभा मतदार संघात हा घोड सर्वाधिक आहे. म्यॅन्युअल पीडीएफ डेटा मधून हा घोड समोर आला आहे. एकाच माणसाचं एकाच बूथवरती वेगवेगळ्या ठिकाणी नाव आहे.  एकाच व्यक्तीचं एकाच मतदारसंघात दोन तीन वेगवेगळ्या बुथवर नाव आहे, एकाच व्यक्तीचं ग्रामीण क्षेत्रात सुद्धा मतदार यादीत नाव आहे आणि शहरीक्षेत्रात नगरपालिका क्षेत्रात सुद्धा त्याचं नाव आहे. वेगवेगळ्या इपीक नंबर सोबत सारखे नाव आहे. एकाच नावाचे दोन तीन वेगवेगळे इपीक नंबर आहेत. काही ठिकाणी तर मृत व्यक्तीचे नाव देखील मतदार यादीत असल्याची बाब काँग्रेसने पत्रकार परिषद घेत समोर आणली आहेय. बाईट - शैलेश अग्रवाल, राष्ट्रीय समन्वयक, किसान सेल, काँग्रेस
12
comment0
Report
KJKunal Jamdade
Aug 18, 2025 13:52:26
Shirdi, Maharashtra:
Anc - शनिवारी रात्री संगमनेर शहरालगत असणाऱ्या घुलेवाडी गावात सुरू असलेल्या कीर्तनावेळी काहीजणांनी आक्षेप घेत गोंधळ घातला.. यानंतर हभप संग्राम बापू महाराज भंडारे यांना मारहाण झाल्याचा गुन्हा संगमनेर शहर पोलिसात दाखल झाला.. याप्रकरणी निषेध करण्यासाठी आज झालेल्या आंदोलनात शिवसेना ( शिंदे गट ) आमदार अमोल खताळ यांच्यासह भाजप अध्यात्मिक सेलचे अध्यक्ष तुषार भोसले देखील सहभागी झाले.. यावेळी मारहाण करणारे कार्यकर्ते बाळासाहेब थोरात यांचे असल्याचा आरोप करण्यात आला असून तुषार भोसले यांनी देखील थोरात यांच्यावर टीका केलीय.. तर थोरात यांनी खोटे गुन्हे दाखल करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप केलाय..आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आजी माजी आमदार समोरा समोर येणार असल्याने भविष्यात हा वाद वाढण्याची शक्यता आहे.. V/o - संगमनेर शहराजवळ असणाऱ्या घुलेवाडी गावातील हनुमान मंदिरात हरिनाम सप्ताहाच आयोजन करण्यात आले आहे.. शनिवारी राजगुरुनगर येथील हभप संग्राम बापू महाराज भंडारे यांचे कीर्तन होते.. मात्र कीर्तन सुरू असताना महाराजांनी सध्याच्या राजकीय घडामोडींवर महाराजांनी भाष्य केल्याने काही जणांनी विरोध केला..यावरून बराच वेळ गोंधळ झाल्याने महाराज देखील कीर्तन अर्धवट सोडून निघून गेले.. यानंतर या प्रकरणी संगमनेर पोलिस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल झाला..याच मारहाणीचा निषेध करण्यासाठी हिंदुत्ववादी संघटनांनी नाशिक पुणे महामार्गावर दीड तास रास्ता रोखून धरत घटनेचा निषेध केलाय..यावेळी सेना आमदार अमोल खताळ यांच्यासह भाजप अध्यात्मिक सेलचे अध्यक्ष तुषार भोसले देखील सहभागी झाले होते.. यावेळी खताळ आणि भोसले यांनी थेट बाळासाहेब थोरात यांना टीकेचे लक्ष्य केले असून त्यांच्याच कार्यकर्त्यांनी गोंधळ घालून मारहाण केल्याचा आरोप केलाय.. अमोल खताळ बाईट ऑन बाळासाहेब थोरात चाळीस वर्षांपासून बिघडलेल्या संस्कृतीची आठ महिन्यात घडी बसायला सुरवात झालीय.. कीर्तन सुरू होण्याआधी यांनीच कर्मचाऱ्यांना तिथे जायला लावले.. पराभव झाल्याने संगमनेर अशांत करण्याचा प्रयत्न सुरू आहे.. त्यातून स्वतःच राजकीय पुनर्वसन करण्यासाठी धडपड सुरू आहे.. अफजल खान व औरंगजेब यांच्यावर बोलताना तुमचे बगलबच्चे महाराजांवर धावून जात असतील तर हे कायद्याचं राज्य आहे.. तुमच्या काळात पोलिसांवर हल्ले झाले होते.. मात्र आमच्या काळात समाजकंटकांवर कारवाई होणारच.. तुम्ही असा प्रयत्न करून पहा तुमच्यावर देखील कायदेशीर कारवाईसाठी आग्रह करू.. भाजप अध्यात्मिक सेल अध्यक्ष तुषार भोसले बाईट राज्यातील साधू महंत आणि कीर्तनकारांनी हिंदुत्वावर जागरूकता आणल्याने महायुतीला यश मिळाले हा रिपोर्ट राहुल गांधीपर्यंत गेलाय.. त्यामुळे राहुल गांधीनी हा प्रचार प्रसार बंद झाला पाहिजे असा आदेश पक्षाच्या नेत्यांना दिलाय.. आणि त्यामुळेच थोरातानी बगलबच्यांच्या मदतीने हा प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला.. मात्र संगमनेरच्या हिंदुत्ववाद्यांनी हा प्रकार हाणून पाडला.. राज्यात हा प्रयत्न पुन्हा केल्यास गाठ तुषार भोसलेंशी आहे.. राहुल गांधी जे संविधान घेऊन फिरतात त्या संविधानाने सर्वांना बोलण्याचा अधिकार.. कोणाच्या बापात हिंमत नाही की कीर्तन बंद पाडू शकतात.. बाळासाहेब थोरात बाईट ऑन महाराज धक्काबुक्की प्रकरण... संगमनेर तालुका शांतता व बंधुभाव असणारा तालुका.. हरिनाम सप्ताह हा वारकरी संप्रदायाचे विचार मांडण्याचे व्यासपीठ.. या ठिकाणी सर्व राजकीय पक्षाचे लोक येतात त्यामुळे राजकीय वक्तव्य नको... या व्यासपीठावरून राजकीय वक्तव्य केल्यानं काहींनी शांततेच्या मार्गाने विरोध केला.. मात्र त्यानंतर खोटे गुन्हे दाखल केले गेले.. माणसांमध्ये भेद निर्माण करून तालुक्यात दहशत निर्माण करण्याचा हा प्रयत्न.. संगमनेर तालुक्याचा विकास मोडण्यासाठी काही शक्ती प्रयत्न करत आहे.. विधानसभे आधी देखील असाच एक मोर्चा निघाला होता.. आता पुन्हा निवडणुका जवळ आल्याने आज मोर्चा काढण्यात येतोय.. नेमकं काय झालं हे समजून घेण्याची कोणाला गरज वाटत नाही.. आपल्या गावातील सुसंस्कृत संस्कृती व बंधुभाव टिकवण्याची जबाबदारी आता जनतेची...
13
comment0
Report
YKYOGESH KHARE
Aug 18, 2025 13:51:31
Nashik, Maharashtra:
nsk_proetst fed by 2C Anchor सटाणा शहरातील साक्री शिर्डी राष्ट्रीय महामार्गाच्या बंद पडलेल्या कामामुळे व रस्त्याच्या दूरावस्थेच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या वतीने रस्ता रोको आंदोलन सुरू करण्यात आलेला आहे जोपर्यंत रस्त्यावरील खड्डे बुजवण्यास सुरवात होत नाही तोपर्यंत रस्ता रोको आंदोलन सुरु ठेवण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे.
14
comment0
Report
Independence Day
Advertisement
Back to top