Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Satara415001

साताऱ्यातून मुंबईकडे निघाले मराठा आंदोलनाचे समर्थक!

TTTUSHAR TAPASE
Aug 26, 2025 08:18:12
Satara, Maharashtra
TUSHAR TAPASE 4 FILES SLUG NAME -SAT_MARATHA सातारा - मुंबई येथील आझाद मैदानावर 29 ऑगस्ट ला होणाऱ्या मराठा आंदोलनासाठी साताऱ्यातून मराठा समाज आज मुंबईचा दिशेने निघाला आहे.मराठा आरक्षणा साठी मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी सातारा जिल्हातील मराठा बांधव आझाद मैदान, मुंबई चा दिशेने आजच निघाले आहेत.यावेळी शिवतीर्थ येथे एक मराठा लाख मराठा अशा घोषणा मराठा समाज्याच्या वतीने देण्यात आल्या.यावेळी बोलताना नितेश राणे आणि लक्ष्मण हाके यांच्यावर जोरदार टीका केली आहे. बाईट्स
14
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
JJJAYESH JAGAD
Aug 26, 2025 12:04:57
Akola, Maharashtra:
Anchor : सन २०१९ पूर्वीच्या वाहनांसाठी सरकारने एचएसआरपी (High Security Registration Plate) नंबर प्लेट बंधनकारक केली आहे. या कामासाठी महाराष्ट्रातील केवळ तीन ठेकेदारांना कंत्राट देण्यात आले असून या माध्यमातून भाजप सरकारला आर्थिक लाभ मिळत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये मोठा भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप करीत आज अकोल्यात काँग्रेसतर्फे प्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.गाडीच्या नंबर प्लेट बसवण्यासाठी नागरिकांकडून प्रत्येकी पाचशे रुपये वसूल केले जात असल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे. ही जनतेची उघड लूट असून याचा तीव्र निषेध करण्यात आले.. आंदोलनानंतर प्रादेशिक परिवहन अधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले. Byte : निखिलेश दिवेकर, माजी उपमहापौर.
0
comment0
Report
JMJAVED MULANI
Aug 26, 2025 11:35:26
Baramati, Maharashtra:
JAVEDMULANI SLUG 2608ZT_BARAMATINAGARPARIS FILE53 बारामती नगरपरिषदेची अनधिकृत बांधकामावर कारवाई Anchor_ बारामती नगरपरिषदेने अनधिकृत बांधकामावर कारवाई केली आहे. बारामती नगरपरिषद हद्दीतील तानाई नगर येथील बांधकाम परवानगी व्यतिरीक्त केलेले अनाधिकृत बांधकाम बारामती नगरपरिषदेकडून पाडण्यात आलेय. आज पहाटेची या कारवाईला सुरुवात करण्यात आली.मुख्याधिकारी पंकज भुसे यांच्या आदेशानुसार या बांधकामाचा काही भाग पाडण्यात आला.मात्र याला स्थानिकांनी विरोध दर्शवला आहे.
11
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Aug 26, 2025 11:19:24
Shirur, Maharashtra:
Feed 2C Slug: Shirur School Students Ganpati File:01 Rep: Hemant Chapude(Shirur) Anc :शिरूर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वसेवाडी येथील विद्यार्थिनींनी कवायतीतून गणेशाची आकर्षक प्रतिकृती साकारली. या अनोख्या आणि कलात्मक सादरीकरणात एकूण २१५ मुलींनी सहभाग घेतला. या आगळ्या-वेगळ्या उपक्रमाचे परिसरात सर्वत्र जोरदार कौतुक होत आहे. प्रतिनिधी हेमंत चापुडे झी मिडीया शिरूर पुणे...
6
comment0
Report
VBVAIBHAV BALKUNDE
Aug 26, 2025 11:16:25
Latur, Maharashtra:
लातूर ब्रेकिंग न्यूज..... स्किप्ट ::- लातूर महापालिकेची प्लास्टिक बंदीची मोहीम चौथ्या दिवशीही सुरू... महापालिकेच्या पथकाने विविध ठिकाणी छापा टाकून जवळपास सातशे किलो प्लास्टिकचा साठा केला जप्त.... AC ::- लातूर शहर महापालिकेने शहरात प्लास्टिक बंदीची मोहीम अधिक तीव्र केलीय.... महापालिकेच्या पथकाकडून आज चौथ्या दिवशी लातूर शहरातील महात्मा बसवेश्वर चौक परिसरातील विविध ठिकाणी छापा टाकून जवळपास सातशे किलो प्लास्टिकचा साठा जप्त केलाय.... महापालिकेच्या वतीने गेल्या तीन दिवसांपासून शहरात प्लास्टिक बंदीची मोहीम राबविण्यात येत असून, या मोहिमेंतर्गत आतापर्यंत जवळपास दोन हजार किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले असून, जवळपास तीन लाखांचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती महापालिका उपायुक्तांनी दिलीय... दरम्यान, महापालिकेची ही मोहीम यापुढेही अशीच सुरू राहणार असल्याची माहितीही त्यांनी दिली... बाईट ::- पंजाब खानसोळे, उपआयुक्त, लातूर महापालिका
10
comment0
Report
SKShubham Koli
Aug 26, 2025 11:06:18
Thane, Maharashtra:
शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख हेमंत पवार यांच्यासह शिवसैनिकांनी दिवंगत नेते धर्मवीर आनंद दिघे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शक्ती स्थळावर केले अभिवादन...* *शिवसेना शहर प्रमुख हेमंत पवार byte pointers* * आम्ही दिघे साहेब यांच्या सोबत अहोरात्र काम केलं आहे * ३१ डिसेंबर ल रक्तदान शिबीर आनंद दिघे यांनी सुरू केले त्याची परंपरा एकनाथ शिंदे आणि आम्ही सुरू ठेवलेली आहे * ऍडमिशन च्या बाबतीत साहेबांचा हातखंडा होता * ठाणे हा काँग्रेस चा बालेकिल्ला होता तो साहेबांनी शिवसेनेचा केला * चिंतामणराव आणि प्रकाश परांजपे यांना खासदारकी ला चार वेळा निवडणून आणण्यात दिघे साहेबांचा मोठा वाटा होता * प्रत्येक आमदार खासदार त्यांनी बनवले स्वतः काही झाले नाहीत. कोणत्याही प्रशासकीय पद त्यांनी घेतला नाही * त्यावेळी टीका व्हायची प्रति न्यायालय ठाण्यात चालत . न्याय माझ्या भगिनींना मिळाला पाहिजे यासाठी दिघे साहेब मागे हटत न्हवती * ग्रामीण भागात भगवा झेंडा लावला तर तो काढला जायचा अशा ठिकाणी दिघे साहेब कुठेही कमी पडले नाहीत * *त्यांच्यासाठी दिघे साहेबांनी अहोरात्र खस्ता खाल्ल्या घरादारावर तुळशी पत्र ठेवलं त्यांना त्यांची किंमत कळली नाही(राजन विचारे यांना टोला)* * आमचे सर्व कार्यकर्ते जनसामान्यांना काहीतरी देण्यासाठी झटत असतात * नुसती भाषण करून काही होत नाही * तुम्हाला लोकांनी नाकारलं का? * आमचे म्हस्के साहेब कसे निवडून आले कार्यकर्त्यांच्या जीवावर आणि एकनाथ शिंदे यांच्या कामामुळे निवडणुन आले * *त्यांना मला एवढंच सांगायचं आहे ते म्हणतात ना ओन्ली कमळ पहिले घरामध्ये दोन गट आहेत ते एकत्र करा ( गणेश नाईक यांना टोला)* * *ओन्ली कमळ होत तर मंदा म्हात्रेना पाडण्यासाठी स्वतः च्या मुलाला का उभ केलं?* * तुम्हाला युती मध्ये तुमच्या मुलाला तिकीट नाही मिळाली ही नाराजी आहे का? * भाजप चे सगळे नेते आम्ही युती म्हणून काम करत आहोत पण गणेश नाईक यांचे वयक्तिक चालले आहे * दूध का दूध पाणी का पाणी होईलच चार ते पाच महिन्यात * गडकरी मध्ये जनता दरबार मध्ये किती गर्दी होती * *लोकांची काम झाली पाहिजे काम एकच माणूस करतो शिंदे साहेब आमचा शाखाप्रमुख आमचा नगरसेवक ( गणेश नाईक यांच्या जनता दरबार वर टोला)* * ठाणे महापालिकेवर भगवा फडकवण्याचे स्वप्न पाहतोय आम्ही * *शिंदे साहेब आणि कार्यकर्त्यांच्या जीवावर आमचा भगवा फडकणार*
6
comment0
Report
AKAMAR KANE
Aug 26, 2025 10:50:08
kolhapur, Maharashtra:
नागपूर पोलीस आयुक्त on पाळीव कुत्रे 2c ला बाईट जोडला आहे ------ नागपूर रविंद्र सिंघल पोलीस आयुक्त ( नागपूर पोलिस on मोकाट कुत्रे आणि पाळीव कुत्र्यांबाबत काढलेल्या मार्गदर्शक सूचना ) ----Sc सूचनेप्रमाणे आपण हे करत आहे.. भटके आणि पाळीव कुत्र्यांबद्दल सूचना आली आहे.. --निश्चित फीडिंग स्पॉटवरच अन्न खाऊ घालायचे आहे.. मनपा फीडिंग स्पॉट निश्चित करेल.. ---पाळीव कुत्रे यांना बाहेर फिरवायला नेताना जाळी लावावी.. ही sc च्या निर्णय प्रमाणे गाईडलाईन आहे.त्याप्रमाणे करू
8
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Aug 26, 2025 10:49:39
Khed, Maharashtra:
Feed 2C Slug: Khed Dog Story File:01 Rep: Hemant Chapude(khed) राजगुरुनगर /पुणे Anc... खेड तालुक्याचे ठिकाण असलेल्या राजगुरुनगर शहरात भटक्या कुत्र्यांच्या टोळ्यांनी उच्छाद मांडला आहे. गेल्या दोन दिवसांत पिसाळलेल्या कुत्र्यांनी अनेक नागरिकांना चावल्याच्या घटना घडल्या असून, यामुळे विशेषतः शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.मागील महिन्याभरात तब्बल २५० नागरिकांना कुत्र्यांनी चावल्याची नोंद आहे, तर एप्रिल २०२५ पासून आतापर्यंत तालुक्यातील एक हजाराहून अधिक जणांना कुत्र्यांच्या हल्ल्याचा सामना करावा लागला आहे, त्यामुळे शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे, नगरपरिषदेने उपयोजना कराव्यात अशी मागणी नागरिक करत आहे प्रतिनिधी हेमंत चापुडे झी मिडीया खेड पुणे...
9
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Aug 26, 2025 10:48:09
Satara, Maharashtra:
TUSHAR TAPASE 2 FILES SLUG NAME -SAT_PALAKMANTRI सातारा कराड :राज्यात प्रथमच राबविण्यात येत असलेल्या पालकमंत्री कार्यालय आपल्या दारी या उपक्रमाचा शुभारंभ लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारक दौलतनगर येथे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या उपक्रमातून पालकमंत्री कार्यालायाचे अधिकारी, कर्मचारी स्वत: नागरिकांच्या दारात जावून त्यांचे प्रश्न जाणून घेऊन ते प्रश्न सोडविण्यात येणार आहेत.... यावेळी शंभूराज देसाई यांनी नागरिकांच्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्यांचे या पालकमंत्री कार्यालयाच्या टीमच्या माध्यमातून नेमण्यात आलेल्या अधिकाऱ्यांकडून समस्यांचे निरसन केले जाणार असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली आहे पालकमंत्री शंभूराज देसाई
8
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Aug 26, 2025 10:47:16
Khed, Maharashtra:
Feed 2C Slug: Khed Layan Club File:01 Rep: Hemant Chapude(Khed) राजगुरूनगर /पुणे Anc... पुण्याच्या खेड तालुक्यातील लायन्स क्लब ऑफ राजगुरूनगर यांच्या वतीने शाडू मातीपासून पर्यावरण पूरक गणपती बनवण्याची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती यामध्ये चिमुकल्यामी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत अतिशय उत्साहात गणपती मूर्तीच प्रशिक्षण घेतले प्रतिनिधी हेमंत चापुडे झी मिडीया खेड पुणे...
7
comment0
Report
AKAMAR KANE
Aug 26, 2025 10:32:44
kolhapur, Maharashtra:
2c ला shots आणि बाईट जोडले आहे ------ नागपूर नागपुरात कंत्राटदारांचे भीक मांगो आंदोलन केलेय.. कंत्राटदारांचे देयके वर्षभरापासून प्रलंबित असल्याने व शासन काही निर्णय घेत नसल्यामुळे संविधान चौकात कंत्राटदारांचे भीक मांगो आंदोलन.. काळ्या टीशर्ट घालून नोंदवला निषेध.. विदर्भातील शेकडो कंत्राटदार यांनी एकत्र येत केले आंदोलन शासनाने काम करून पैसे न दिल्यानं रस्त्याच्या कडेला उभे राहत केले भीक मांगो आंदोलन ------------------- बाईट --- आंदोलक कंत्रटदार
10
comment0
Report
UPUmesh Parab
Aug 26, 2025 10:20:45
Oros, Maharashtra:
अँकर ---- तळकोकणात गणेशोत्सवाच्या आनंदावर पावसाने विरजन टाकलेय. गणेशाच्या आगमनाला अवघे काही तास शिल्लक असतानाच पावसाने दमदार हजेरी लावलीय. गणेश चतुर्थीच्या आदल्यादिवशी गणेश भक्त मोठ्या प्रमाणात खरेदी करतात. बाप्पाच्या पूजेसाठी व नैवेद्यासाठी लागणारे बहुतांश साहित्य व पदार्थ गणेश चतुर्थीच्या पूर्व संध्येला खरेदी केले जाते. त्यासाठी बाजारात मोठ्या प्रमाणात गणेश भक्तांची गर्दी देखील पाहायला मिळते. मात्र सकाळपासुन रिमझिम पडणाऱ्या पावसाने दुपार पासून जोर धरलाय. मागील चार दिवस पावसाने उसंत घेतली होती. काही भागात कडक उन देखील पहायला मिळाले होते. मात्र बाप्पाच्या आगमनाच्या पूर्व संध्येला पावसाने हजेरी लावल्याने गणेश भक्तांना खरेदी करताना अडचणी निर्माण होत आहेत. पावसाचा जोर वाढल्याने ग्राहक कमी झाल्याने व्यापाऱ्यांचे देखील नुकसान झालेय. उद्याच्या दिवसात पावसाचे प्रमाण असेच राहिले तर मात्र घरोघरी आगमन होणाऱ्या बाप्पाच्या मूर्तीची ने आण करणे जोखमीचे ठरणार आहे.
14
comment0
Report
SNSWATI NAIK
Aug 26, 2025 10:17:03
Navi Mumbai, Maharashtra:
story slug - ftp slug - byet- shots- reporter- swati naik navi mumbai story Slug -: बिवलकर कुटुंबियांना दिलेल्या जमिनीची आमदार रोहित पवार यांनी केली पाहणी, शिरसाटांचा राजीनामा घ्या अन्यथा भव्य आंदोलनाचा दिला इशारा. रोहित पवार आंदोलन FTP slug - nm ulwa rohit pawar aandolan byet- rohit pawar shots- swati naik navi mumbai Anchor -: राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार प्रकरणी चांगलेच आक्रमक झालेत. आज रोहित पवार यांनी भिवलकर कुटुंबीयांना देण्यात आलेल्या भूखंडाची पाहणी केली. तत्कालीन सिडको अध्यक्ष संजय शिरसाट यांनी तब्बल 5000 कोटी रुपयांची जमीन बेकायदेशीर रित्या बिवलकर कुटुंबीयांना दिली असून हा निर्णय रद्द करुन मंत्री संजय शिरसाट यांचा राजीनामा अनंत चतुर्थी पर्यंत घेण्याची मागणी करण्यात आलेय. याप्रकरणी बॅग भरून पुरावे मुख्यमंत्र्यांना दिले असून योग्य कारवाई न झाल्यास सिडको विरोधात भव्य मोर्चा काढण्याचा इशारा आमदार रोहित पवार यांनी दिलाय. बाईट -: रोहित पवार (आमदार)
14
comment0
Report
ABATISH BHOIR
Aug 26, 2025 10:15:16
Kalyan, Maharashtra:
गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा सज्ज अप्पर पोलीस आयुक्तांनी केले विसर्जन स्थळांची पाहणी Anchor :- गणरायाच्या आगमन अवघ्या काही तासांवर येऊन ठेपले आहे.उद्या लाडक्या बाप्पाच्या आगमन होणार आहे .त्यानंतर दीड ,पाच,सात ,गौरी गणपती ,सात दिवसांनी त्यानंतर अनंत चतुर्दशीला बाप्पाचे विसर्जन होणार आहे . गणेशाच्या आगमन आणि विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली मध्ये पालिका आणि पोलीस यंत्रणादेखील सज्ज झाली आहे . कल्याण डोंबिवली महानगर पालिकेने गणेश भक्तांचे विसर्जनाच्या वेळेस गैरसोय होऊ नये यासाठी कृत्रिम तलाव निर्माण केले आहेत त्याचप्रमाणे गणेश खाट येथे विसर्जनाची तयारी केली आहे . अप्पर पोलीस आयुक्त संजय जाधव यांनी देखील कल्याण डोंबिवली मधील विसर्जन स्थळांचे पाहणी केली डोंबिवली येथील गणेश घाट येथे त्यांनी विसर्जन स्थळाची पाहणी करत काय काय सोयी सुविधा आहेत ? उपाययोजना आहेत ? सुरक्षा यंत्रणा कशी आहे? याबाबत अप्पर पोलिस आयुक्त संजय जाधव यांच्या शी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी आतिश भोईर यांनी Wkt.. आतिश भोईर डोंबिवली
11
comment0
Report
SMSATISH MOHITE
Aug 26, 2025 09:47:54
Nanded, Maharashtra:
Satish Mohite Slug - Ned_DoubleMurder Feed on - 2C --------------------------- Anchor - विवाहित प्रेयसीला भेटण्यासाठी आलेल्या प्रियकरासह विवाहितेची हत्या करून मृतदेह विहिरीत फेकल्याची घटना नांदेड जिल्ह्यात उघडाकीस आलीये. हत्या करणारे मुलीचे वडील, काका आणि आजोबाना पोलिसांनी अटक केलीये. Vo - लग्न झाल्यानंतरही प्रेमसंबंध सुरु ठेवणे एका प्रेमीयुगुलाच्या जीवावर बेतले. प्रियकर प्रेयसीला भेटायला आल्यानंतर विवाहितेच्या सासरच्या मंडळींनी दोघांना पडकले. मुलीच्या वडिलांना बोलावण्यात आले. राग अनावर झालेल्या मुलीच्या पित्याने, काकाने आणि आजोबाने दोघांची हत्या करून त्यांचे मृतदेह विहिरीत फेकून दिले. ग्राफिक्स एकाच गावातील राहिवाशी असलेल्या संजीवनी आणि लखन चे होते प्रेमसंबंध एक वर्षापूर्वी संजीवनीचे लग्न लावून दिले लग्नानंतरही दोघांचे प्रेमासंबंध मुलीच्या सासरी भेटायला गेलेल्या दोघांना पकडले मुलीच्या वडिलांना सासरच्या मंडळींनी बोलावून घेतले राग अनावर झालेल्या मुलीच्या वडील, काका आणि आजोबाने दोघांची हत्या करून मृतदेह विहिरीत फेकले Mid WKT Vo - उमरी तालुक्यातील बोरजूनी येथील रहिवाशी असलेल्या 19 वर्षीय संजीवनी आणि 17 वर्षीय लखन भंडारे यांचे प्रेमसंबंध होते. गेल्या वर्षी संजीवनीचे लग्न गोळेगाव येथील युवकांशी लावून देण्यात आले. लग्न झाल्यानंतरही संजीवनी आणि लखन चे भेटणे सुरूच होते. सोमवारी दुपारी लखन संजीवनीच्या गावात तिला भेटण्यासाठी गेला. संजीवनीच्या सासरच्या लोकांनी दोघांना एकत्र पकडले. संजीवनीच्या वडिलांना बोलावून घेऊन मुलीला घरून जाण्यास सांगितले. दोघांना घेऊन जाताना त्यांना मारहाण करण्यात आली. या सर्व प्रकारामुळे गावात अपमान झाल्याच्या भावानेतून संजीवनीचे वडील, काका आणि आजोबानी दोघांना मारून त्यांचे हात दोरीने बांधून करकाळा शिवारातील विहिरीत फेकून दिले. आपल्या मुलाचा काही दोष नव्हता, मुलीनेच फोन करून त्याला बोलावून घेतल्याचे मयत मुलाच्या वडिलांनी सांगितले. Byte - बालाजी भंडारे - मयत मुलाचे वडील Vo - हत्या केल्यानंतर मुलीचे वडील मारोती सूरने स्वतःहून उमरी पोलीस ठाण्यात गेले. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी गेले. रात्री उशिरा दोघांचे मृतदेह विहिरीबाहेर काढण्यात आले. मुलीचे वडील मारोती सुरने, माधव सुरने आणि आजोबा लक्ष्मण सुरने या तिघांना पोलिसांनी अटक केलीये. Byte - अर्चना पाटील - अप्पर पोलीस अधीक्षक, नांदेड Vo - प्रेमसंबंधातुन घडलेल्या या घटनेमुळे नांदेड जिल्ह्यात खळबळ उडालीये. यात नेमकी चूक कुणाची? लग्न झाल्यानंतरही प्रेमसंबंध ठेवणाऱ्या प्रेमियुगुलाची? की प्रेमसंबंध माहिती असूनही इच्छेविरुद्ध मुलीचे लग्न लावून देणाऱ्या मुलीच्या कुटुंबाची? हे प्रश्न अनुत्तरित राहणार आहेत. -------------------------
13
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Aug 26, 2025 09:47:39
Beed, Maharashtra:
बीड: लक्ष्मण हाके यांनी नोटीसचे उल्लंघन केले, म्हणून कारवाई झाली... पोलिसांनी वेळीच हस्तपेक्ष केल्याने अनुचित प्रकार घडला नाही... पोलिस उपअधीक्षक नीरज राजगुरू यांची माहिती.... Anc- पोस्टरवरून वातावरण पेटल्यानंतर ओबीसी आंदोलन लक्ष्मण हाके यांनी मी बीडमध्ये येतोय असं आवाहन केलं होतं. त्यानंतर बीड पोलिसांनी तुम्ही गेवराईत येऊ नका यासाठी नोटीस बजावली. मात्र लक्ष्मण हाके यांनी प्रतिबंधात्मक नोटीसचे उल्लंघन करत गेवराई पोहोचले. मात्र पोलिसांनी वेळी हस्तक्षेप केला म्हणून कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. त्यानंतर काल झालेल्या राड्यानंतर लक्ष्मण हाके यांच्यासह तब्बल 14 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती गेवराईचे पोलीस उपाधीक्षक नीरज राजगुरू यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. गेवराई मधलं वातावरण सध्या सुरळीत आहे. कोणीही कायदा हातात घेऊ नये अन्यथा कारवाई करण्यात येईल. नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन देखील पोलिसांनी केले आहे. बाईट: नीरज राजगुरू, पोलिस उपअधीक्षक गेवराई
14
comment0
Report
Advertisement
Back to top