Back
शरद पवार यांच्या वक्तव्याने राजकारणात खळबळ माजवली!
ADANIRUDHA DAWALE
Aug 10, 2025 06:48:12
Amravati, Maharashtra
Feed slug :- AMT_BONDE_BYTE चार फाईल आहे
रिपोर्टर :– अनिरुद्ध दवाळे, अमरावती 9503131919
भाजप खासदार अनिल बोंडे बाईट
ऑन शरद पवार/संजय राऊत
शरद पवार यांचं वक्तव्य हास्यास्पद आणि खरे देखील आहे...
निवडणूक जेव्हा लढवतो तेव्हा प्रत्येकाकडे मांत्रिक येतात.. तांत्रिक येतात, कोणी म्हणतात मतदारसंघ बांधून देऊ, मंत्रांनी कोणी मशीन बांधून देऊ म्हणतात कोणी म्हणतात.. आम्ही मतदानावर प्रभाव टाकून देऊ सांगतात..
तसेच ते लोक उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याकडे गेले असतील ते की आम्ही मशीन सुद्धा बांधून देऊ असे म्हणतात..
निवडणुकीच्या काळामध्ये पैसे कमावणाऱ्यांच्या अशा अनेक टोळ्या असतात.. पवार साहेबांचं आयुष्य राजकारणात गेले आहे
त्यांच्या काळात अनेक लोक आले असतील मंत्र तंत्र आणि बांधणारे..
शरद पवारांनी तेव्हाच या लोकांना तातडीने पोलीस स्टेशनला देणे गरजेचे होतं
कारण अशी फसवीगिरी करणारे जे भामटे असतात.. त्या भामट्यांना पकडना खऱ्या नेत्याचा काम आहे
तेव्हा सांगितलं नाही आणि आता दहा महिन्यानंतर ते सांगत आहे..
राहुल गांधींच्या फोकनाळ्यामध्ये हो हो करण्यासाठी शरद पवार साहेब हे म्हणतात की अस झाल आहे..
12 बॉम्बस्फोट झाले आणि 13 सांगतात.. शरद पवार साहेब पुन्हा खोटे बोलत आहे..
संजय राऊत स्वतः धनगर यांना भेटायला गेले का स्वतः भेटले त्यांनी सांगितलं पाहिजे
संजय राऊत ने मनावर घेतलं की त्याचा चंचू प्रवेश कुठेही होतो
ऑन कबुतरखाना जैन समज
जैन समाज हा संवेदनशील आहे अतिशय शांतता प्रिय समाज आहे
सगळ्या प्राण्यांवर प्रेम करणारा हा जैन समाज आहे
चाकू काढण्यासारखे प्रकार त्यांच्या समाजाकडून कधीच होऊ शकत नाही कोणी त्यांना भडकवत नाही
ऑन एकनाथ शिंदे...
संजय राऊत यांना काही काम नाही त्यांना ज्या कल्पना येतात हे जे मनात विचार येतात ते सकाळी 9 वाजताच्या भोंग्यातून समजते
तुम्ही ते लोक पसरता रात्रीचे विचार सकाळी 9 वाजता सांगतात
रात्री संजय राऊत यांना जे जे सुचते ते सकाळी बोलतात.. तुम्ही का महत्व देता नऊ वाजताच्या भोंग्याला हे मला माहीत नाही
ऑन यशोमती, नितीन गडकरी
मी गडकरी साहेबांचा इंटरव्यू बघितला नाही.. मतदार यादी चुका होतात.. ती निवडणूक आयोग एस आर आय कडून दूर करतात
आज बिहारमध्ये 48 लाख मत बात करण्यात आली.. 18 लाख मय्यत मते निघाली..
14
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SMSarfaraj Musa
FollowAug 10, 2025 11:50:10Sangli Miraj Kupwad, Maharashtra:
स्लग - जयंत पाटलांचे छत्रपती,शाहू,फुले, आंबेडकर व साठेंचे विचार केवळ मतांच्यासाठी - डॉ. महेशकुमार कांबळे.
अँकर - राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटलांचे छत्रपती,शाहू,फुले,आंबेडकर व साठे यांचे विचार केवळ मतांच्यासाठी असल्याचा आरोप आंबेडकरी चळवळीचे नेते डॉ महेशकुमार कांबळे यांनी केलाय.आमदार जयंत पाटील यांच्या मतदारसंघात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे जन्मगाव आहे.पण तरी देखील गेल्या 40 वर्षात जयंत पाटलांनी आमदार मंत्री असून देखील अण्णाभाऊ साठेंचा स्मारक करू शकले नाहीत,कारण जयंत पाटलांचे राजकारण हे स्वार्थाचे आहे,त्यामुळेच आत्तापर्यंत जॉईंट पाटलांनी अण्णाभाऊ साठेंचे स्मारक केलं नाही असा आरोप देखील महेश कांबळेंकडून करण्यात आला आहे.इस्लामपूर मध्ये अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक करावं यासाठी एक ऑगस्टपासून मातंग समाज व सह विविध संघटनांकडून आंदोलन करण्यात आलं होतं,त्यानंतर जयंत पाटलांनी आंदोलनाची दखल घेत,अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा उभारण्याची घोषणा केली आहे, यावरून महेश कांबळे यांनी जयंत पाटलांच्यावर टीका केली आहे.
बाईट - डॉ.महेशकुमार कांबळे - नेते, आंबेडकर चळवळ ,सांगली.
0
Report
SMSATISH MOHITE
FollowAug 10, 2025 11:50:00Nanded, Maharashtra:
Satish Mohite
Slug - Ned_PoliceCar
Feed on - 2C
----------------------------------
Anchor - संशयित कारचा पाठलाग करताना पोलिसांची गाडी पलटून तीन पोलीस कर्मचारी जखमी झाले. नांदेडमध्ये ही घटना घडली. बारड येथील महामार्ग पोलीस चौकी समोर वाहनांची तपासणी सुरु असताना एका इंडिका विस्टा कारमधून लाल रंगाचे पाणी निघत असल्याने पोलिसांना संशय आला. पोलिसांनी गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला असता कार भरधाव वेगात निघून गेली. पोलिसांनी गाडीचा पाठलाग सुरु केला. संशयित गाडी गावाकडील छोट्या रस्त्याकडे वळाली. गाडीचा पाठलाग करत असताना पोलिसांचे टाटा सुमो वाहन उलटले. गाडीतील तीन पोलीस कर्मचारी जखमी झाले. दरम्यान संशयित गाडीला तोरणतांडा येथील ग्राणास्थानी पकडले. गाडीचालक आणि अन्य एकाला पकडण्यात आले. या गाडीमध्ये गोमांस आढळले.
-----------------------------
0
Report
TTTUSHAR TAPASE
FollowAug 10, 2025 11:49:50Satara, Maharashtra:
TUSHAR TAPASE
1 FILE
SLUG NAME -SAT_HAKE_PAWAR
साताऱ्यातील फलटण येथील जावली येथील एका कार्यक्रमात ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी शरद पवारांची ओळख दगाबाज नेता म्हणून असल्याचे सांगितलं
*बाईट: लक्ष्मण हाके पॉईंटर*
निवडणुका जिंकण्याचे तंत्र आत्मसात केलेला हा नेता आहे. शरद पवारांची ओळखच दगाबाज नेता ही आहे. सांगायचे एक आणि करायचं एक असे शरद पवार आहेत
ओबीसींच्या बाजूने गळा काढतात त्यावेळी ते ओबीसींच्या विरोधामध्ये षडयंत्र रचत असतात पवार साहेबांचं राज्यकारण म्हणजे एका बाजूला जरांगे नावाच्या बबड्याला फिरवणारे त्याचा आंदोलन उभं करणारे अशी त्यांची ओळख आणि तेच ओबीसींच्या बाजूने मंडळ यात्रा सुरू करत आहेत
जरांगे पाटील यांनी लाखो कुणबी सर्टिफिकेट काढून ओबीसींचे पंचायत राज मधील आरक्षण असो किंवा शिक्षण आरक्षण उध्वस्त केले आहे.
शरद पवारांचा ही मंडळ यात्रा काढून नेमका काय उद्देश आहे.
मंडल आयोगाच्या 38 योजनांपैकी दोन योजना भारतीय व्यवस्थेत लागू झाले आहेत.
शरद पवारांनी संपूर्ण महाराष्ट्र ओरखडून खाल्ला जवळच्या नातेवाईकांव्यतिरिक्त कोणाला किंमत दिली नाही.
ज्याप्रमाणे इच्छाधारी नागा प्रमाणे शरद पवार वेटोळे घालून बसले आहेत.
जरांगेंचं आंदोलन उभे राहतंय तर ओबीसी मध्ये फुट कशी पाडायची ही फोडा आणि जोडा ही राजनीती शरद पवार यांची आहे.
शरद पवार ईस्ट इंडिया कंपनी प्रमाणे वागतात..
महाराष्ट्रातील ओबीसी आणि भटक्या विमुक्त जातींचं अंतकरण समजून घ्यायला हवं होतं. तुम्ही निवडणुका जिंकण्याचं व्याकरण समजून घेतले
शरद पवार हे दगेबाज नेते आहेत
ओबीसी बांधवांना आवाहन करतो की अशा दगाबाज नेत्यांना खड्यासारखे बाजूला करा.
*ओबीसी आणि मराठा समाजामध्ये देवेंद्र फडणवीस वाद तयार करत आहेत या मनोज जरांगे पाटील यांच्या विधानावर लक्ष्मण हाके यांचे उत्तर*
मनोज जरांगे पाटील देवेंद्र फडणवीस यांच्या विषयी काहीही बोलतात. फडणवीसांचा अपमान म्हणजेच महाराष्ट्राचा अपमान... त्यामुळे त्यांनी त्यांच्या पात्रतेनुसार आणि कुवतेनुसार बोलावे.
लाखो कुणबी सर्किट मुळे ओबीसी आरक्षण उध्वस्त होणार असेल तर तुम्ही या ओबीसी आरक्षणाच्या बाजूने उभे रहा.
यापुढे पंचायतराजच्या निवडणुकीमध्ये गावोगावी बोगस कुणब्याची सर्टिफिकेट 25 हजारापासून पाच लाखापर्यंत ही सर्टिफिकेट जरांगेंच्या पिलावळीने काढलीत आणि ओबीसी आरक्षण संपवल आहे. मराठा बांधव ओबीसी मध्ये समाविष्ट झाला तर शिक्षणामध्ये नोकऱ्यांमध्ये निवडणुकीमध्ये गावच्या सरपंच की मध्ये फडणवीस टिकतील का
याविषयी फडणवीस यांनी ठाम भूमिका घ्यावी लागेल. जरांगेंच्या भूमिकेला बळी पडला तर ओबीसी या पुढील काळात मोठं जन आंदोलन उभारेल
29 ऑगस्टला मुंबईला येण्यासाठी मराठ्यांना जरांगे यांनी आवाहन केलं तरी ओबीसी ची एक संघर्ष यात्रा आम्ही काढणार आहोत... भटक्या विमुक्त जाती जमाती आणि ओबीसी एक आहेत 27% आणि एसबीसी चे दोन टक्के असे मिळून 29 टक्के आरक्षण ओबीसींचे आहेत. याचा आम्ही प्रसार करणार आहोत
4
Report
SMSarfaraj Musa
FollowAug 10, 2025 11:49:11Sangli Miraj Kupwad, Maharashtra:
स्लग - सांगलीत भाजपाचा काँग्रेससह विशाल पाटलांना धक्का..माजी महापौर सह विशाल पाटलांचे कट्टर समर्थकांचा उद्या भाजप प्रवेश..
अँकर - सांगलीमध्ये भाजपाने खासदार विशाल पाटलांसह काँग्रेसला पुन्हा खिंडार पाडले आहे.खासदार विशाल पाटलांचे कट्टर समर्थक नगरसेवक मनोज सरगरसह काँग्रेसच्या माजी महापौर आणि नगरसेविकेचा भाजपा प्रवेश उद्या सांगली मध्ये होणार आहे.भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व पालकमंत्री चंद्रकांत पाटलांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश सोहळा पार पडणार आहे.यामध्ये माजी महापौर कांचन कांबळे,नगरसेविका शुभांगी साळुंखे, नगरसेवक मनोज सरगर आणि काही काँग्रेसचे नेते भाजपात प्रवेश करणार आहेत.
मनोज सरगर हे खासदार विशाल पाटलांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जायचे,तर कांचन कांबळे या मदन भाऊ गट समर्थक आहेत.त्यांचा हा पक्ष प्रवेश आगामी महापालिकेच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पखासदार विशाल पाटील आणि काँग्रेसला मोठा धक्का मानला जात आहे.
बाईट - मनोज सरगर - नगरसेवक, विशाल पाटील समर्थक-सांगली.
4
Report
KJKunal Jamdade
FollowAug 10, 2025 11:45:41Shirdi, Maharashtra:
Anc - आम्हाला पोरा बाळांवर बोलायला लावू नका.. पोरा बाळांना सांगा काळ खूप मोठा आहे, काळजीपूर्वक जा.. असा टोला बाळासाहेब थोरात यांनी सुजय विखे यांना लगावला होता.त्या वक्तव्याला सुजय विखे यांनी जोरदार प्रतिउत्तर दिलं."जर पोरांबाळांवर बोलायचं नव्हतं , तर विधानसभेत माझ्यावर का बोललात..? अमोल खताळला खबरी का म्हणालात..? सुजय विखेंना काट्यात लपला का म्हणालात..? तेव्हा आम्ही पोरंबाळ नव्हतो , पण पराभवानंतरच पोरंबाळ झालो का..? आणि लक्षात ठेवा , एका पोराबाळानेच तुमचा पराभव केलाय असे उत्तर देत बाळासाहेब थोरात यांना चांगलचं सुनावले...
बाळासाहेब थोरात ऑन सुजय विखे
मी राधाकृष्ण विखेंवर बोलू शकतो सुजय विखेंवर काय बोलायचं.....?
आम्हाला पोरा बाळांवर चर्चा करायला नका लावू....
*पोरा बाळांना सांगायचंय काळ खूप मोठा आहे ,काळजीपूर्वक जा.......*
काँग्रेसनेते बाळासाहेब थोरात यांचा सुजय विखेंना सल्ला...
सुजय विखे बाईट ऑन बाळासाहेब थोरात पोरंबाळ टीका
ते मोठे नेते ते सल्ला देण्यासाठीच आहे..
जी भूमिका ते आज घेताय तीच भूमिका त्यांनी विधानसभेवेळी घेतली पाहिजे होती...
जर पोराबाळांवर बोलायचं नव्हतं तर विधानसभेच्या प्रत्येक भाषणात माझ्यावर का बोलले..?
का..तुम्ही अमोल खताळ ला खबरी म्हणाले...?
सुजय विखेला आम्ही पळवून लावलं काट्यात लपला..का म्हणाले..?
तेव्हा आम्ही पोरंबाळ नव्हतो...
तुमचा पराभव झाला तर आम्ही पोरंबाळ झालो...
माननीय थोरात साहेब आम्ही आमचा सन्मान करतो...
आम्हाला पोरंबाळ म्हणण्याची चूक तुम्ही केली म्हणून एका पोरंबाळानेच तुमचा पराभव केला...
मुलांमध्ये युवाशक्ती प्रचंड , सर्वसामान्य माणूस आमदार होऊ शकतो...
हे त्यांना आजही पचत नाही...
काळ प्रदीर्घ आहे , हे मान्य करायला आम्ही तयार...
आमचे मागील ४० वर्ष संघर्षात गेले , पुढचे ४० वर्ष आम्ही संघर्ष करत राहणार...
जी परिस्थिती येईल ती हाताळायला आम्ही समर्थ आहोत...
सुजय विखेंचे बाळासाहेब थोरात यांनी केलेल्या मुलांबाळांच्या वक्तव्यावर जोरदार उत्तर...
bite - सुजय विखे माजी खासदार
2
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowAug 10, 2025 11:02:58Ambernath, Maharashtra:
शिवसेनेत गेलेल्या नगरसेवकांच्या ऑफिसबाहेर घोषणाबाजी
मनसे कार्यकर्त्यांनी नोटा दाखवत केली घोषणाबाजी
आता तुम्ही निवडून येऊनच दाखवा!
मनसे उपजिल्हाध्यक्ष शैलेश शिर्के यांचा इशारा
Anchor : मनसेतून शिवसेनेत गेलेल्या माजी नगरसेवकांच्या ऑफिसबाहेर आज मनसेच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत निषेध नोंदवला. हे नगरसेवक नोटांसाठी गेल्याचा आरोप।करत मनसे कार्यकर्त्यांनी नोटा दाखवत घोषणाबाजी केली.
Vo : मनसेचे शहराध्यक्ष कुणाल भोईर, जिल्हा संघटक संदीप लकडे, शहर संघटक स्वप्नील बागुल आणि माजी नगरसेविका अपर्णा भोईर।हे चार।माजी नगरसेवक शनिवारी मनसेला रामराम करत शिवसेनेत गेले. यानंतर रविवारी मनसे पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत या सर्वांचा निषेध केला. या सर्वांच्या ऑफिसबाहेर जाऊन घोषणाबाजी करत मनसेच्या कार्यकर्त्यांनी नोटा दाखवून घोषणाबाजी केली. यानंतर हे चौघेही पुढच्या निवडणुकीत कसे निवडून येतात ते आम्ही बघू, असं म्हणत कुणालाही प्रचाराला आणलं तरी तुम्हाला पाडणारच, असा इशारा मनसे उपजिल्हाध्यक्ष शैलेश शिर्के यांनी दिला. यावेळी जिल्हाध्यक्ष बंडू देशमुख, विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष धनंजय गुरव, माजी नगरसेवक दत्ता केंगरे, प्रशांत नलावडे यांच्यासह मनसेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते.
Byte : शैलेश शिर्के, उपजिल्हाध्यक्ष, मनसे
चंद्रशेखर भुयार , अंबरनाथ
9
Report
SKSACHIN KASABE
FollowAug 10, 2025 11:02:41Pandharpur, Maharashtra:
10082025
slug - PPR_MODNIMB_BUS
file 04
----
Anchor - माढा तालुक्यातील सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावरील मोडनिंब बस स्थानकात राज्य परिवहन महामंडळाची अक्कलकोट ते बारामती बस पावसामुळे झालेल्या चिखलात अडकली .मनसे पदाधिकाऱ्यांनी स्वखर्चातून जेसीबी मदतीने काढली. यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष प्रशांत गीड्डे यांनी राज्य परिवहन महामंडळाने तातडीने बस स्थानकाची आणि परिसराची दुरुस्ती करावी अन्यथा मनसे स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा दिला
10
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowAug 10, 2025 11:00:19Solapur, Maharashtra:
सोलापूर ब्रेकिंग : शरणू हांडे अपहरण प्रकरणातील 7 व्या आरोपीला 2 दिवसांची पोलीस कोठडी
शरणू हांडे अपहरण प्रकरणातील 7 व्या आरोपीला 2 दिवसांची पोलीस कोठडी
आरोपी समर्थ वासुदेव भैरी याला दोन दिवसांची पोलीस कोठडी मंजूर
आरोपी समर्थ भैरी देखील शरणू हांडे याचे अपहरण करण्यासाठी गाडीत होता असा आरोप
दरम्यान या अपहरण प्रकरणातील सर्व 7 आरोपी 12 ऑगस्ट पर्यंत राहणार पोलीस कोठडीत
11
Report
KJKunal Jamdade
FollowAug 10, 2025 10:45:47Shirdi, Maharashtra:
Anc - अहिल्यानगर जिल्ह्यातील आदिवासी बहूल असणाऱ्या अकोले तालुक्यात काल आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.. विशेष म्हणजे महायुतीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी दोन वेगवेगळ्या आदिवासी दिन साजरे केले... उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रॅली नंतर बाजारतळ या ठिकाणी जाहिर सभा पार पडली.. मात्र याचवेळी सभा सुरू असताना राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार डॉक्टर किरण लहामटे यांची रॅली देखील त्या परिसरातून जात होती... एकीकडे शिंदे यांचे भाषण सुरू असताना डीजेचा आवाज देखील येत होता.. त्यावेळी एकनाथ शिंदेंनी भाषणात याचा उल्लेख देखील केला...तो आपलाच भाऊ आहे ना असा उल्लेख देखील केला...सभा संपल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा परतीचा मार्ग तोच असल्याने पोलिसांनी रस्ता मोकळ्या करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आणि त्याच दरम्यान आदिवासी आणि पोलिसांमध्ये झटापट झाली अस ट्विट रोहित पवार यांनी केलय..मात्र लाठीचार झाला नसून रस्ता मोकळा करण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर केल्याचं राष्ट्रवादी अजित पवार गटाचे विद्यमान आमदार डॉक्टर किरण लहामटे यांनी स्पष्ट केलय.
रस्ता मोकळा करण्यासाठी पोलिसांनी आदिवासींना लोटलं.. मला सांगितलं असत तर रस्ता मोकळा करून दिला असता.. आमदार डॉ. किरण लहामटे यांनी प्रतिक्रिया दिलीये...या झटापटीचा मी निषेध व्यक्त करतो मला सांगितलं असतं तर रस्ता मोकळा करून दिला असता असं वक्तव्य लहामटे यांनी केलय...
बाईट - डॉ. किरण लहामटे, विद्यमान आमदार, अकोले विधानसभा मतदारसंघ, राष्ट्रवादी, अजित पवार गट...
12
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowAug 10, 2025 10:45:22Beed, Maharashtra:
बीड: वैद्यनाथ बँकेची निवडणूक; आमदार धनंजय मुंडेनी केले मतदान
Anc- वैद्यनाथ बँकेच्या 13 जागांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. सकाळपासूनच मतदानाला सुरुवात झाली असून मतदान प्रक्रिया सध्यांतरी उस्फूर्तपणे पार पडत आहे. परळीचे आमदार धनंजय मुंडे यांनी देखील मतदानाचा हक्क बजावला आहे. थोड्याच वेळापूर्वी पंकजा मुंडेंनी देखील मतदान केले होते. दरम्यान 12 ऑगस्ट रोजी मतमोजणी होणार असून या निवडणुकीत कोण बाजी मारेल याकडे मराठवाड्याचे लक्ष लागले आहे.
14
Report
JJJAYESH JAGAD
FollowAug 10, 2025 10:32:02Akola, Maharashtra:
Anchor : नागपूर–पुणे वंदेभारत एक्सप्रेसला रेल्वे मंत्रालयाची मंजुरी मिळाल्यानंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या वेगवान रेल्वे सेवेला हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला..विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्राला थेट जोडणारी ही गाडी सुरू झाल्यामुळे, विशेषतः विदर्भातून पुण्यात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठी सोय होणार आहे..देशात सर्वात लांब पल्ल्याची ही वंदे भारत एक्सप्रेस गाडी आहेय , मात्र आज ठिकठिकाणी गाडीचे स्वागत असल्याने पहिल्याच दिवशी ही रेल्वे सुमारे एक तास उशिराने धावत आहे..अकोल्यात भाजपाचे खासदार अनुप धोत्रे , तसेच भाजपा आमदार रणधीर सावरकर यांच्या वतीने वंदेभारत एक्सप्रेसचे अकोला रेल्वे स्थानकावर उत्साहात स्वागत करण्यात आले.
13
Report
AAASHISH AMBADE
FollowAug 10, 2025 10:01:49Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--- 1008ZT_CHP_CANAL_BREAK
( single file sent on 2C)
टायटल:-- चंद्रपूर जिल्ह्यातील चिमुर तालुक्यातला चंदई कालवा फुटला, आधीच पाऊस काळ कमी असताना कालवा फुटल्याने लाखो लिटर शेत पिकांसाठीचे पाणी गेले वाया, या काळव्यामुळे सुमारे 6000 एकर परिसरात सिंचनाची होते सोय, प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे शेतकऱ्यांचे झाले नुकसान
अँकर:---- चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील रामदेगी परिसरात निमढेला तलावाला लागून चंदई कालवा आहे. रात्री हा कालवा फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले आहे. निमढेला तलावाचे पाणी चंदई कालव्याद्वारे 20 किलोमीटर पुढे जाते. तब्बल 6000 एकर भागातील शेती ओलीता खाली येते. या तलावाचे बांधकाम चाळीस वर्षांपूर्वी करण्यात आले असून शेतकऱ्यांनी प्रशासनाला वारंवार चंदई कालव्याची दुरवस्था अवगत केली. मात्र प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यामुळे रात्री अर्जुनी- झरी गावाजवळ वीस फूट लांब कालवा फुटला. या परिसरात पाऊस कमी पडल्यामुळे धान पिकावर संकट ओढवले आहे. त्यातच कालवा फुटल्याने धान पिकांना पाणी मिळणे कठीण झाले आहे. प्रशासनाने यावर तातडीने उपाययोजना करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
आशीष अम्बाडे
झी मीडिया
चंद्रपूर
13
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowAug 10, 2025 09:49:16Beed, Maharashtra:
बीड: बीड शहरात मुसळधार पावसाला सुरुवात
Anc- गेल्या दोन दिवसापासून बीड जिल्ह्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावली आहे. सकाळपासून पावसाने उघडीप दिली होती. मात्र दुपारी पुन्हा संतदाधर पावसाने मुसंडी मारली आहे. बीड शहरात अचानक मुसळधार पावसाला सुरूवात झाल्याने काही काळ जनजीवन विस्कळीत झाले होते. आज रविवार आहे. त्यामुळे चाकरमान्यांचा सुट्टीचा बेत असतो अशात पावसाने हजेरी लावल्याने बच्चे कंपनीच्या आनंदावर मात्र विरजण पडले आहे.
14
Report
PNPratap Naik1
FollowAug 10, 2025 09:48:03Kolhapur, Maharashtra:
Story :- Kop Ichal Hodi Spardha
Feed :- 2C
Anc :-- इचलकरंजी शहरात ऑगस्ट क्रांती दिना निमित्त होड्यांच्या शर्यती आयोजित करण्यात आल्या होत्या. शेतकरी तरुण व बेंदूर उत्सव मंडळाच्या वतीने ह्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत सांगलवाडीच्या तरुण मराठा बोट क्लबने सलग तिसऱ्या वर्षी प्रथम क्रमांक मिळवीला तर डिग्रज बोट क्लब डिग्रजने दुसरा, कवठेसारच्या युवा शक्ती बोट क्लबने तिसरा आणि डिग्रजच्या जय मल्हार बोट क्लबने चौथा क्रमांक मिळविला. या स्पर्धा पाहण्यासाठी पंचक्रोशीतील ग्रामस्थ नदीच्या दोन्ही बाजूला मोठ्या संख्येने हजेरी लावली होती.
14
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowAug 10, 2025 09:31:35Solapur, Maharashtra:
सोलापूर ब्रेकिंग - अक्कलकोट तालुक्यातील बोरी नदीमध्ये शेतकरी गेला वाहून
- अक्कलकोट तालुक्यात पावसाचा जोर वाढला, बोरी नदीची पाणी पातळी वाढली, शेतकरी गेला वाहून
- अक्कलकोट तालुक्यातील आंदेवाडी ते दुधनीला जोडणारा बोरी नदीवरील पूल गेला पाण्याखाली..
- बोरी नदीच्या आलेल्या पाण्यातून शेतकरी दुचाकीवरून जात असताना गेला वाहून
- बबलाद येथील रेवणसिद्ध श्रीमंत बिराजदार असे वाहून गेलेल्या शेतकऱ्याचे नाव..
- अक्कलकोट तालुका प्रशासनाकडून रेवणसिद्ध बिराजदार याची शोध मोहीम युद्ध पातळीवर सुरू..
- बोरी नदीकाठच्या गावांना तालुका प्रशासनाकडून देण्यात आला सतर्कतेचा इशारा..
13
Report