Back
सांगली महापालिकेचा तुघलकी फर्मान: दुकान बंद ठेवण्याची नोटिसा!
SMSarfaraj Musa
Aug 14, 2025 00:47:14
Sangli Miraj Kupwad, Maharashtra
स्लग - सांगली महापालिकेचा तुघलकी फर्मान..बाजार परवाना घ्या,परवाना मिळेपर्यंत दुकान बंद ठेवा,अन्यथा दुकान सील करू..
अँकर - सांगलीतील व्यापाऱ्यांना महापालिकेकडून तुघलकी फर्मान जारी करण्यात आला आहे.महापालिकेचा बाजार परवाना घ्या,आणि तो परवाना मिळेपर्यंत दुकान बंद ठेवा,अन्यथा दुकान सील करू, अशा थेट नोटिसा पालिका प्रशासनाकडून पाठवण्यात आल्या आहेत.यावरून व्यापारी आक्रमक झाले असून ऐन सणासुदीच्या तोंडावर महापालिकाच्या नोटीसा म्हणजे खंडणी वसुलीचा प्रकार असल्याचा आरोप करत महापालिकेचे आयुक्त सत्यम गांधी यांच्याकडून बजावण्यात आलेल्या नोटिसा बेकायदेशीर असून या बाजार परवान्यावर व्यापाऱ्यांकडून बहिष्कार घालण्यात येत असल्याचे व्यापारी एकता संघटनेचे अध्यक्ष समीर शहा यांनी जाहीर केला आहे.
बाईट - समीर शहा - अध्यक्ष - व्यापारी एकता असोसिएशन,सांगली.
14
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SKSACHIN KASABE
FollowAug 14, 2025 03:34:36Pandharpur, Maharashtra:
14082025
Slug - PPR_BIKE_MOBILE_CRIME
file 01
-----
Anchor - करमाळा पोलीस स्टेशन मधील अधिकाऱ्यांनी विविध तीन गुन्ह्यातील चोरीला गेलेल्या वस्तूंचा जलद गतीने शोध लावलेला आहे. वेगवगेळ्या ठिकाणी दोन मोटरसायकल आणि एक मोबाईल चोरीला गेला होता. याबाबत गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या काही दिवसातच पोलिसांना या चोरट्यांपर्यंत जाण्यात यश मिळाले आहे. सोबतच त्यांनी चोरी केलेल्या दोन मोटरसायकल आणि एक मोबाईल सुद्धा हस्तगत करण्यात आलेला आहे.
0
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowAug 14, 2025 03:34:28Khed, Maharashtra:
Feed 2C
Slug: Khed Aadhar Pawlana
File:01
Rep: Hemant Chapude(Khed)
Anc: स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधन आधार पावलांना संस्थेच्या वतीने पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील वाडा येथील आदिवासी भागातील जिल्हा परिषदेच्या शाळेच्या विद्यार्थ्यांना बुटाचे (शुज) चे वाटप करण्यात आले 110 विद्यार्थ्यांना बुट वाटप करत चिमुकल्यांच्या अनवाणी पायांना आधार देण्याच काम आधार पावलाना संस्थेने केलंय,गेली दहा वर्ष आधार पावलाना संस्था हा सामाजिक उपक्रम राबवितेय, आजपर्यंत जिल्हा परिषदेच्या 47 शाळांमध्ये 1600 बुटांचे वाटप करण्यात आले असून यावर्षी वाडा जिल्हा परिषदेची शाळेची निवड करण्यात आली आहे.आदिवासी लहान मुलांना परिस्थिती अभावी विना पायतान शाळेत येण्याची वेळ लागू नये या भावनेतून ही संस्था दरवर्षी आदिवासी भागात काम करत असून चिमुकल्या मुलांना बुट मिळाल्यानंतर त्यांच्या चेहय्रावर एक वेगळाच आनंद पाहायला मिळाला.
प्रतिनिधी हेमंत चापुडे
झी मिडीया खेड पुणे...
0
Report
VKVISHAL KAROLE
FollowAug 14, 2025 03:33:09Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:
Csn encroachment av
Feed attached
हर्सूल रस्त्यावरील बाधित मालमत्तांना महापालिकेने दिलेल्या नोटीसची मुदत १३ ऑगस्ट रोजी संपली आहे. त्यामुळे आता पाडापाडीची कारवाई १५ ऑगस्टनंतर होणार आहे. कारवाईपूर्वी महापालिका आणि पोलिस प्रशासनाची संयुक्त बैठक होणार आहे. त्यात कारवाईची तारीख ठरवली जाणार आहे. महापालिकेने शहरातील जुन्या आणि नवीन विकास आराखड्यातील मंजूर रस्त्यांचे रुंदीकरण सुरू केले आहे. आतापर्यंत मुख्य ५ आणि अंतर्गत १ अशा ६ रस्त्यांवर मोहीम राबवली आहे. यात साडेचार हजारहून अधिक बेकायदा बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली आहेत. बांधकाम परवानगी आणि गुंठेवारी असलेल्या मालमत्तांना यातून वगळण्यात आले आहे.
0
Report
KPKAILAS PURI
FollowAug 14, 2025 03:32:47Pune, Maharashtra:
pimpri help
kailas puri Pune 14-8-25
feed by 2c
Anchor - .... संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज मंदिरात सुवर्ण कलशारोहनाचा कार्यक्रम पार पडतोय. याच कार्यक्रमासाठी पहिलीत शिकणाऱ्या श्रीमंत करांडे या छोट्या भक्ताने साठवलेले पैसे माऊलींच्या चरणी अर्पण करत भक्तीला वयाची मर्यादा नसते हे दाखवून दिल. या चिमूरड्याने केलेल्या या कृतीच सर्वांकडून कौतुक होत आहे. माऊलींच्या चरणी या भक्ताने दाखवलेल्या भक्ती नंतर मंदिर देवस्थानकडून या चिमुरड्याचं कौतुकही करण्यात आला.
0
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowAug 14, 2025 03:32:29Solapur, Maharashtra:
सोलापूर ब्रेकिंग - सोलापुरातील जुना तुळजापूर नाका परिसरातल्या ओढ्यात आडकली कार
- सोलापूर शहरात गेल्या तीन ते चार दिवसांपासून मुसळधार पाऊस, सोलापूर जवळील नदी नाले झाले तुडुंब
- सोलापुरातील जुना तुळजापूर नाका परिसरातल्या ओढ्यात आडकली कार
- नागरिकांनी धक्का देत कारला काढले बाहेर
- जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून पावसाची जोरदार हजेरी
- सोलापुरातील तुळजापूर नाका येथे ओढ्याला पाणी आल्यामुळे अडकली कार
- ओढ्याची पाण्याची पातळी वाढल्यामुळे ग्रामस्थांना ढकलत कार काढावी लागली बाहेर
0
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowAug 14, 2025 03:32:21Dhule, Maharashtra:
ANCHOR - आक्रमक आदिवासी नेते तथा माजी मंत्री पद्माकर वळवी राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. नुकतीच त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतल्या असून, लवकरच राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. पद्माकर वळवी यांनी काँग्रेसला सोडचिट्टी देत भाजपात प्रवेश केला होता, मात्र आदिवासींच्या प्रश्नांवरून तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विरोधात टीका केल्यामुळे भाजपला देखील रामराम केला होता. पद्माकर वळवी गेल्या काही काळापासून राजकारणापासून लांब होते, मात्र पुन्हा राजकारणात सक्रिय होत असून लवकरच राष्ट्रवादीत अधिकृत प्रवेश करणार आहेत. पद्माकर वळवी राष्ट्रवादी प्रवेश करणार असल्याने राष्ट्रवादीला एक आदिवासी मोठा चेहरा मिळणार आहे. पद्माकर वळवी मूळ राष्ट्रवादी अजित पवार गटाची नंदुरबार जिल्ह्यात ताकद वाढणार आहे.
प्रशांत परदेशी, नंदुरबार.
0
Report
SRSHRIKANT RAUT
FollowAug 14, 2025 03:32:11Yavatmal, Maharashtra:
Anchor : एसटी महामंडळाच्या यवतमाळ आगाराच्या बसेस मधून पाण्याचे फव्वारे उडत असल्याचा विडिओ प्रवाश्यांकडून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पावसाळ्यामध्ये ह्या बसेस ला गळती लागल्याने बस मध्ये पाणी साचल्याचे दृश्य आहे. यवतमाळ चंद्रपूर या बसमधील फ्लोअर मॅट मधून पाण्याचे फव्वारे उडत असून बस मध्ये पाणी साचत आहे, रस्त्यावर साचलेले पाणी बस मध्ये उडत असल्याने प्रवाश्यांचे कपडे खराब होत आहे.
0
Report
VKVISHAL KAROLE
FollowAug 14, 2025 03:32:03Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:
Csn mahapalika av
Feed attached
थकीत मालमत्ता कर व पाणीपट्टी वसुलीसाठी संभाजी नगर महापालिकेकडून राबवण्यात आलेल्या 'शास्ती से आजादी' विशेष मोहिमेला नागरिकांचा प्रतिसाद मिळत आहे. १५ जुलैपासून सुरू झालेली ही मोहीम १५ ऑगस्टपर्यंत चालणार आहे. मनपाने आतापर्यंत १३० कोटी रुपये वसूल झाले आहेत. विशेष म्हणजे बुधवारी एक दिवसात तब्बल ८ कोटी ६५ लाख रुपयांचा मालमत्ता कर वसूल झाला, तर १७ लाख रुपयांची पाणीपट्टी वसूल झाली आहे. आजपर्यंतची सर्वाधिक ही वसुली असून यापूर्वी ३१ मार्च २०२४ रोजी ७ कोटी २० लाख रुपयांची वसुली झाली होती.
0
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowAug 14, 2025 03:31:52Dhule, Maharashtra:
ANCHOR - नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्याच्या दुर्गम भागात भीषण अपघात झाला. धडगाव तालुक्यातील बिलगाव -गेंदा रस्त्यावर मोटरसायकलवरील ताबा सुटल्याने मोटरसायकल थेट पुलाखाली जाऊन पडली. मोटरसायकली सकट दोघे तरुण थेट बारा फूट पुलावरून थेट खाली पडले. मोटरसायकल पुलाखाली कोसळल्याने एकाचा जागीच मृत्यू तर दुसऱ्याचे प्रकृती चिंताजनक आहे. बिलगाव ते गेंदा रस्ता दरम्यान भरधाव मोटरसायकल वरील ताबा सुटल्याने हा अपघात घडला. अपघातात गंभीरित्या जखमी झालेल्या तरुणाला नंदुरबार जिल्हा रुग्णालयात रवाना केले असून, धडगाव ग्रामीण रुग्णालयात नातेवाईकांनी आक्रोश केला. सापड डोंगर रांगांमध्ये मुलांना सुरक्षित कठडे लावण्यात यावेत अशी मागणी केली जात आहे.
प्रशांत परदेशी, नंदुरबार.
0
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowAug 14, 2025 03:31:45Dhule, Maharashtra:
ANCHOR - धुळे जिल्ह्यामध्ये समाधानकारक पाऊस नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. पावसाचा मोठा खंड पडल्यामुळे पिकांची वाढ खुंटली आहे. पाऊस पडला नाही तर यंदाचा खरीप हंगाम पूर्णपणे वाया जाणार आहे. अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांचे डोळे आता आकाशाकडे लागलेले आहेत. जिल्ह्यात चार लाख हेक्टरपर्यंत खरीप पिकांची लागवड झालेले आहे. त्यातील दोन लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर कापूस लागवड करण्यात आलेले आहे. पावसाअभावी संपूर्ण पीक धोक्यात असून, शेतकऱ्यांचा खरीप हंगामातील खर्च वाया जाणार आहे. आता पाऊस आला तरी उत्पादक 50 टक्के कमी होणार आहे.
प्रशांत परदेशी, धुळे.
0
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowAug 14, 2025 03:31:22Amravati, Maharashtra:
Feed slug :- AMT_THILORI_RAIN पाच फाईल आहे
रिपोर्टर :– अनिरुद्ध दवाळे, अमरावती 9503131919
संततधार पावसाचा दर्यापूर तालुक्यातील थिलोरी गावाला फटका; संपूर्ण गाव पाण्याखाली, शेती पिकांचे नुकसान, लेंडी नाल्याला पूर
अँकर :– अमरावती जिल्ह्यात काल सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे शेतकरी सुखावला आहे. मात्र या पावसाचा फटका दर्यापूर तालुक्यातील थिलोरी लखापूर गावला बसला आहे. त्यामुळे संपूर्ण गाव पाण्याखाली गेले आहे. गावात सर्वत्र पाणीच पाणी शिरले असल्याने नदी, नाले तुडुंब भरून वाहत आहे. गावात सर्वत्र पाणीच पाणी झाल्याने शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान थिलोरी गावातील लेंडी नाल्याला मोठ्या प्रमाणात पूर आला असून नाल्याच्या काठावरील गावकऱ्यांनी सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. मात्र गावात प्रशासनाचा एकही अधिकारी कर्मचारी हजर नसल्याने गावकरी संताप व्यक्त करत आहे.
0
Report
VKVISHAL KAROLE
FollowAug 14, 2025 03:18:22Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:
Csn ladki bahin av
Collected officer feed attached
राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेतील सुमारे २६ लाख संशयित लाभार्थीच्या गृह चौकशीचे आदेश दिले आहेत. यामध्ये संभाजी नगर जिल्ह्यातील १ लाख ४ हजार अर्जाची फिजिकल पडताळणी अंगणवाडी सेविकांमार्फत सुरू करण्यात आली आहे. यामध्ये ८४ हजार अर्ज हे एकाच घरातील तीन किंवा अधिक महिलांचे असल्याचे तपासणीत समोर आली आहे, तर २० हजार अर्ज २१ वर्षांखालील किंवा ६५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या लाभार्थीचे आहेत. या सर्व अर्जदारांचा लाभ शासनाकडून थांबवण्यात आला आहे. लाडकी बहीण योजनेसाठी जिल्ह्यात १०,१५,८३४ अर्ज आले होते त्यापैकी ९,२४,३४८ अर्ज मंजूर झाले.
4
Report
KPKAILAS PURI
FollowAug 14, 2025 03:18:12Pune, Maharashtra:
pimpri palika
kailas puri Pune 14-8-25
feed by 2c
Anchor - स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या इमारतीवर आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. या विद्युत रोषणाईमुळे इमारत उजळून निघाली असून संपूर्ण परिसर या आकर्षक तिरंगी विद्युत रोषणाईमुळे तिरंगा मय झाला आहे. याच विद्युत रोषणाईची ही खास झलक...!
6
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowAug 14, 2025 03:18:05Beed, Maharashtra:
बीड:ओबीसी आरक्षण बचावासाठी लक्ष्मण हाकेंचा गाव पातळीवरील बैठकांवर जोर
Anc:मराठा आंदोलक मनोज जरांगें पाटील यांचे मराठा आरक्षणासाठी 29 ऑगस्ट रोजी मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन होणार आहे. त्यापूर्वीच ओबीसी आंदोलनकर्ते लक्ष्मण हाके यांच्याकडून ओबीसी जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. लक्ष्मण हाके मराठवाडा दौऱ्यावर असून त्यांनी बीड जिल्ह्यातून सुरुवात केली आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यात येऊ नये यासाठी त्यांनी एल्गार पुकारलाय. हाके यांनी गावागावातून बैठका घेण्यास सुरुवात केली असून बैठकींना उस्फुर्त प्रतिसाद मिळताना पाहायला मिळत आहे.
3
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowAug 14, 2025 03:17:56Dhule, Maharashtra:
ANCHOR - स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर धुळे तालुक्यातील आर्वी गावात भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. न्यू एज्युकेशन सोसायटीच्या वतीने दोनशे अकरा फूट तिरंगा रॅली काढण्यात आली. या रॅलीला माजी संरक्षणाचे मंत्री डॉक्टर सुभाष भामरे यांच्या हस्ते सुरुवात करण्यात आली, विद्यार्थ्यांमध्ये देश भावना जनजागृती व्हावी तसेच हरघर तिरंगा अभियानाच्या माध्यमातून ही रॅली काढण्यात आली होती. रॅलीत मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. रावेदरम्यान देशभक्तीपर गीतांनी संपूर्ण वातावरण देशभक्तीमय झाला होत.
प्रशांत परदेशी, धुळे.
4
Report