Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Osmanabad413501

राणा जगजीत सिंह पाटील यांची अद्भुत मदत, आंदोलकांसाठी तेरणा मेडिकल कॉलेजमध्ये व्यवस्था!

DPdnyaneshwar patange
Sept 01, 2025 04:16:50
Dharashiv (Osmanabad), Maharashtra
धाराशिव DHARA_MLA_HELP मुंबईमध्ये आंदोलनासाठी गेलेल्या आंदोलकांची नेरूळ येथील तेरणा मेडिकल कॉलेजमध्ये राहण्या, खाण्याची व्यवस्था. भाजपा आमदार राणा जगजीत सिंह पाटील यांनी केली ही व्यवस्था. आंदोलकांना थेट मदत करणारे आमदार राणा जगजीत सिंह पाटील हे भाजपाचे एकमेव आमदार. अँकर धाराशिव जिल्ह्यातील लाखो मराठा बांधव आंदोलनासाठी मुंबईकडे गेले आहेत . त्यांच्या राहण्याची व खाण्याची व्यवस्था नेरूळ येथील तेरणा मेडिकल कॉलेजमध्ये करण्यात आली आहे. भाजपा आमदार राणा जगजीत सिंह पाटील यांनी ही व्यवस्था केली आहे. या ठिकाणी सध्या हजारो मराठा बांधव मुक्कामी आहेत. त्यांची खाण्याची व झोपण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.आंदोलकांना मदत करणारे राणा जगजीत सिंह पाटील हे एकमेव भाजप आमदार आहेत. गैरसोय टाळण्यासाठी तेरणा मेडिकल कॉलेजमध्ये या असे आवाहन आमदार राणा जगजीत सिंह पाटील यांनी केले आहे. Byte आंदोलक
6
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
PTPRAVIN TANDEKAR
Sept 01, 2025 06:02:18
Bhandara, Maharashtra:
Pravin Tandekar Gondia Slug - 0109_GON_RESCUE FILE - 1 VIDEO 1 IMAGE पिकअप वाहनासह दोघे नाल्याच्या पुरात वाहून गेले.... पिकअप वाहन दगडाला अडकल्याने लोकांनी दोराच्या मदतीने वाचवले दोघांचे प्राण.... गोंदियाच्या सालेकसा तालुक्यातील जांभळी गावाजवळील घटना.... Anchor : सालेकसा तालुक्याला लागून असलेल्या छत्तीसगड राज्यात मुसळधार पाऊस पडला असून, महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवरील बेवारटोला धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी ओव्हरफ्लो होऊ लागले आहे. त्यामुळे सालेकसा तालुक्यातील कुआढास नाल्याला मोठा पूर आला. या पुरात जांभळी गावाजवळील पुलावरून जात असलेली पिकअप गाडी अचानक वाहून गेली. मात्र, ती दगडाला अडकल्याने मोठा अनर्थ टळला. स्थानिक ग्रामस्थांनी शर्थीचे प्रयत्न करून गाडीत असलेल्या दोन युवकांना सुखरूप बाहेर काढले. नाल्याच्या दोन्ही काठावरून दोरी टाकून शर्थीने बचावकार्य केले. त्यांच्या प्रयत्नांमुळे दोन्ही युवकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले....
0
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Sept 01, 2025 06:02:11
Beed, Maharashtra:
बीड: राजुरीजवळ विटा वाहतूक करणारा टेंपो पलटला, चार मजूर गंभीर Anc- रस्त्यावरील खड्डा चुकविताना विट वाहतूक करणारा टेम्पो पलटी झाला. घटना पाटोदा तालुक्यातील राजुरी परिसरात घडली आहे. या भीषण अपघातात चार मजूर गंभीर जखमी झाले आहे. टेम्पो पलटी झाल्यानंतर चालक अडकला होता. त्याला जेसीबीच्या सहायाने बाहेर काढण्यात आले. त्याच रस्त्यावरून वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी जात होते, पदाधिकाऱ्यांनी प्रसंगाधावून मदत केल्याने मजुरांचे प्राण वाचले. राजुरी परिसरात रस्त्यावरच अनेक खड्डे पडल्याने असे अनेक अपघात पाहायला मिळतात. रस्त्याची डागडुजी करावी अशी मागणी जोर धरत आहे.
0
comment0
Report
MAMILIND ANDE
Sept 01, 2025 06:01:57
Wardha, Maharashtra:
वर्धा ब्रेकिंग SLUG-0109_WARDHA_EX_MP_TADAS मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्यात येऊ नये महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे अध्यक्ष तथा माजी खासदार रामदास तडस यांची भूमिका निवडणुका आल्या की आरक्षणाचे आंदोलन सुरू होते शरद पवार हे आंदोलनाला खतपाणी घालत असल्याची रामदास तडस यांची टीका ओबीसीचे बारा टक्के आरक्षण वाढवून द्यावे अँकर : मराठा समाजाच्या आरक्षणाला आमचा विरोध नाही पण ओबीसी मधून आरक्षण देण्यात येऊ नये अशी ठाम भूमिका महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे अध्यक्ष तथा माजी खासदार रामदास तडस यांनी मांडली आहेय. मराठा समाजाने मुंबईत आंदोलन सुरू केले. ज्या ज्यावेळी निवडणुका येतात त्या त्या वेळी हे आंदोलन केलं जाते. विशेष म्हणजे महाराष्ट्रात तसेच देशात ओबीसी समाजाची संख्या अधिक आहे. त्यामुळे जनगणनेवर आधारित आरक्षण दिले गेले पाहिजे. महाराष्ट्र ज्यावेळी स्थिर राहते त्यावेळी जाती जातीत झगडे लावण्याचे काम पवार साहेब करतात. पवार साहेबांची आता सत्ता नाही आणि येणारही नाही. जेव्हा निवडणुका येते तेव्हा आंदोलन केले जाते असा आरोप देखील रामदास तडस यांनी केला आहे. वर्ध्यात माध्यमाना प्रतिक्रिया देताना रामदास तडस यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहेय. विवो : त्यांना वेगळे आरक्षण द्यावे, पण ओबीसी मधून आरक्षण देऊ नये, सरकारने जे काही धोरण करायचे असेल ते वेगळे आरक्षण धोरण करावे.. पण ओबीसीच्या ताटातून देणे संयुक्तिक नाही. कारण या देशात ओबीसी समाज सत्तर टक्के आहे आणि 352 जाती आहे. त्यामुळे ओबीसीला आणखी बारा टक्के आरक्षण वाढवून द्यावे तरच ओबीसी समाजाला न्याय मिळेल. पवार साहेबांनी काल असे म्हटलं होतं की तामिळनाडू मध्ये आरक्षण दिलं गेलं आणि कोर्टात ते टिकलं. महाराष्ट्र सरकारला केंद्राची मान्यता घ्यावी लागते. मी तर त्याहीपलीकडे जाऊन सांगतो की जातीय जनगणनेच्या आधारावर आरक्षण द्यावं. आम्हाला आताच तर कमी आरक्षण आहे ओबीसीला. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण द्यावं पण ओबीसी मधून देऊ नये. जर तसे झाले तर ओबीसी समाजाचा लढा मोठा राहिल. नागपूर येथे ओबीसी समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे. त्याला माझा पाठिंबा आहे. महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेची मागणी होती की, जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे, त्याला सुरुवात झाली आहे. कोणाची संख्या किती हे लवकरच कळणार आहे. कोणाला कीती आरक्षण दिले गेले पाहिजे हे देखील त्यातून कळणार आहे. असे यावेळी माजी खासदार तडस यांनी म्हटले आहेय. बाईट : रामदास तडस, अध्यक्ष,प्रांतिक तैलिक महासभा तथा माजी खासदार
0
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Sept 01, 2025 06:01:45
Khed, Maharashtra:
Feed 2C Slug: Khed Hake Sadavarte Rogor File:02 Rep: Hemant Chapude(Khed) *खेड /पुणे* *सदावर्ते आणि हाके साठी रोगरची बाटली घेऊन मराठा आंदोलक मुंबईच्या दिशेने निघालेत* पुण्याच्या खेड तालुक्यातून मुंबई मध्ये असलेल्या मराठा बांधवांसाठी जेवणाचा शिधा घेऊन जात असताना मराठा बांधवाकडून सदावर्ते आणि हाकेसाठी काळजी घेण्याचा प्रयत्न करण्यात आलाय . सदावर्ते यांची दृष्टी खराब झाली असून त्याचे डोळे दुरुस्तीसाठी त्यांना रोगरची बाटली घेऊन मराठा आंदोलक मुंबईच्या दिशेने निघालेत रोगाच्या बाटलीतील औषध घेतल्यानंतर मराठ्यांकडे पाहण्याची दृष्टी बदले आणि हाके च्या मनामध्ये विकृती निर्माण झालीय त्यांनी सुद्धा या रोगर चे दोन तीन घोट घ्यावेत मनातील बुद्धी मधे परिवर्तन होईल विषानेच विष उतरविले जाते म्हणून सदावर्ते आणि हाके यांनी रोगर घ्यावे आणि मराठ्यांच्या विषयी मनातील विष बाहेर निघावे अशी प्रतिक्रियाता मराठा आंदोलकांनी दिली Byte: अंकुश राक्षे (मराठा समन्वयक ) प्रतिनिधी हेमंत चापुडे झी मिडीया खेड पुणे...
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Sept 01, 2025 06:00:32
Akola, Maharashtra:
Anchor : अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील तळेगाव बाजार येथील शेतकरी व सामाजिक कार्यकर्ते रविंद्र मगर यांनी आपल्या निवासस्थानी महालक्ष्मीची स्थापना केली आहे.यावेळी त्यांनी ज्येष्ठा गौरी समोर ग्रामीण भागाचे दर्शन घडविणारा देखावा सादर केला आहे.या देखाव्यात ग्रामीण महिलांचे दैनंदिन कामकाज पाणी भरणे, शेतीतील मदत, घरगुती कामे अशा विविध चलित दृश्यांद्वारे मांडण्यात आले आहेत. पारंपरिक ग्रामीण जीवनशैलीचे प्रतिबिंब असलेल्या या देखाव्यामुळे पाहणाऱ्यांना खऱ्या ग्रामीण संस्कृतीची अनुभूती मिळत आहे. रविंद्र मगर यांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही सामाजिक व सांस्कृतिक संदेश देणारा देखावा साकारला असून, गावकऱ्यांसह अनेक भाविक या देखाव्याला भेट देऊन कौतुक व्यक्त करत आहेत.
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Sept 01, 2025 05:19:54
Washim, Maharashtra:
वाशिम: File:0109ZT_WSM_GAURI_DECORATION रिपोर्टर:गणेश मोहळे,वाशिम अँकर :गणेशोत्सव आणि गौरीपूजन हे सण केवळ धार्मिक श्रद्धेचे प्रतीक नसून कलेचा,सृजनशीलतेचा आणि पारंपरिकतेचा संगम घडवून आणणारे मानले जातात.काल गौरीचे आगमन झाले असून घरोघरी स्थापना करण्यात आली आहे.वाशीम च्या शेलूबाजार येथील पांडुरंग व जयश्री बेद्रे दाम्पत्याने यंदाच्या गौरीपूजनासाठी "समुद्र तळाचे दृश्य या संकल्पनेवर आधारित आकर्षक देखावा साकारला आहे.जलचर प्राणी,शंख-शिंपले,प्रवाळ खडक व उसळणाऱ्या लाटांचे चित्रण करून त्यांनी भक्तांना एक अद्वितीय अनुभव दिला आहे.पारंपरिक हस्तकला व आधुनिक तंत्रज्ञानाचा संगम या देखाव्यात दिसून येतो.याआधी त्यांनी गोवर्धन पर्वत, ग्रह-नक्षत्रे व अमरनाथ गुहेचे देखावे साकारले होते.महिनाभराहून अधिक परिश्रमाने साकारलेला हा देखावा भक्तीभाव,कला आणि पर्यावरण संदेश देणारा ठरत असून,बेद्रे दाम्पत्याच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. बाईट : जयश्री बेद्रे, बाईट : पांडुरंग बेंद्रे,
1
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Sept 01, 2025 05:18:56
Akola, Maharashtra:
Anchor : अकोल्यातही अनेक गणेश मंडळांनी सुंदर झाक्या साकारल्यायेत. अकोल्यातील न्यू राधाकिशन प्लॉट भागातील रिद्धी-सिद्धी गणेशमंडळ शहरात प्रसिद्ध आहेय ते देखावे आणि झाक्यांसाठी... २९ वर्षांची परंपरा या मंडळांनी आजही जोपासली आहे. वेगवेगळ्या क्षेत्रातील १५१ तरूण या मंडळाचा कारभार पुढे नेतायेत. यावर्षी या गणेशमंडळानं अमरनाथचा देखावा निर्माणाचा देखावा साकारलाय..मंडळाच्या अध्यक्षांसोबत खास बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी जयेश जगड यांनी..
3
comment0
Report
SKSACHIN KASABE
Sept 01, 2025 05:18:37
Pandharpur, Maharashtra:
01092025 Slug - PPR_MARATHA_DEKHAVA file 01 ----- Anchor - गौरी गणपतीच्या सणावरही मराठा आरक्षण आंदोलनाची छाप पाहायला मिळत आहे. सोलापूरच्या अकलूज मधील सौ. सारिका प्रताप ढेरे यांनी गौराई समोर तुळजाभवानी गर्भगृहाची सजावट केली आहे. त्या समोर सरकारचे डोळे उघडू दे मराठा समाजाला आरक्षण मिळू दे असा आरक्षण विषयावर देखावा तयार केला आहे.
3
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Sept 01, 2025 05:02:21
Beed, Maharashtra:
बीड: सहा वर्षीय चिमुकलीवर अत्याचार, परळी हादरली Anc- मन सुन्न करणारी बातमी आहे, बीडच्या परळी मधून... रेल्वे स्थानक परिसरात कामाच्या शोधात आलेल्या एका कुटुंबातील सहा वर्षीय मुलीवर अत्याचार झाल्याच्या घटनेने बीड पुन्हा हादरले आहे. नराधमाने खाऊचे आमिष दाखवून रेल्वे स्थानक परिसरातील उड्डाण पुलाच्या खाली नेवून मुलीवर अत्याचार केला. घटना समाजातच पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीला अटक केली आहे. ऐन गौरी गणपतीच्या सणात अमानवी घटना घडल्याने संतापाची लाट उसळली आहे.
4
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Sept 01, 2025 04:31:39
Amravati, Maharashtra:
Feed slug :- AMT_AIRPORT चार फाईल आहे रिपोर्टर :– अनिरुद्ध दवाळे, अमरावती 9503131919 अखेर एअर अलायन्सची ठप्प झालेली अमरावती–मुंबई सेवा आज पासून पुन्हा सुरू; विमानातील तांत्रिक बिघाड दुरुस्त अँकर :– एअर अलायन्सची ठप्प झालेली अमरावती–मुंबई सेवा आज पासून पुन्हा सुरू झाली असून विमानातील तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्यात आला आहे. मागील दहा दिवसांपूर्वी विमानात तांत्रिक बिघाड आल्याने विमानसेवा तूर्तास बंद होती मात्र आता हा बिघाड दुरुस्त झाल्याने 1 आणि 5 सप्टेंबर रोजी संकेतस्थळावर विमानाचे बुकिंग झळकले आहे. केंद्र सरकारच्या उड्डाण या योजनेअंतर्गत अमरावती ते मुंबई ही विमानसेवा सुरू करण्यात आली आहे. आठवड्यातून सोमवार, बुधवार आणि शुक्रवार अशी विमानसेवा अमरावतीच्या बेलोरा विमानतळावरून आहे.
1
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Sept 01, 2025 04:31:28
Shirur, Maharashtra:
Feed 2C Slug: Bhimashankar Kondwal Waterfalls File:02 Rep: Hemant Chapude(Bhimashankar) Anc: सह्याद्रीच्या पर्वतरांगा परिसरातील घाटमाथ्यावर पावसाची जोरदार बँटींग सुरू असून मुसळधार पावसामुळे भिमाशंकर परिसरातील कोंढवळ धबधबा ओसांडून वाहतोय,या परिसरातील निसर्ग वैभव बहरलं असून मन प्रसन्न करून टाकणाय्रा या मनमोहक दृश्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी... Wkt: हेमंत चापुडे (प्रतिनिधी) प्रतिनिधी हेमंत चापुडे झी मिडीया भिमाशंकर पुणे...
3
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Sept 01, 2025 03:46:33
Akola, Maharashtra:
Anchor : अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील पिंपळखुटा येथील करण वानखडे (वय 24) हा युवक काही दिवसांपूर्वी मन नदीच्या पाण्यात वाहून गेला होता. घटनेनंतर सुरू झालेल्या शोधकार्याला काल संध्याकाळपर्यंत काहीही यश आले नव्हते..दरम्यान, सुनील कल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली वंदे मातरम् आपत्कालीन शोध व बचाव पथक कुरणखेड यांनी मोठ्या प्रयत्नांनी शोध मोहीम सुरू ठेवली. अखेर घटनास्थळापासून सुमारे 5 किलोमीटर अंतरावर बुलढाणा जिल्ह्यातील शहापूर गावाजवळ करण वानखडे याचा मृतदेह सापडला.या शोधकार्यामुळे गावात दुःखाचे वातावरण निर्माण झाले असून, आपत्कालीन बचाव पथकाचे धाडसी प्रयत्न व तातडीने केलेल्या मदतीबद्दल ग्रामस्थांनी मनःपूर्वक आभार मानले आहेत.
6
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Sept 01, 2025 03:34:45
Yavatmal, Maharashtra:
यवतमाळच्या शिवांश गौरव आगाशे या इयत्ता चवथीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने गणपती बाप्पासाठी १८३ देशांचे ध्वज रंगवून देखावा सादर केला आहे. विशेष म्हणजे अवघ्या ९ वर्षांच्या शिवांशला या सर्व ध्वजांची ओळख असून त्या देशांची नावे मुखोद्गत आहेत. मुले पुस्तकांमधून कथा शोधत असताना, शिवांश मात्र संपूर्ण जग शोधत आहे. तो देशांबद्दल, तेथील संस्कृतींबद्दल देखील माहिती जाणून घेत आहे. त्याच्या या अद्वितीय कौशल्याचे सादरीकरण तो गणपती बाप्पा पुढे करीत असून विद्यार्थी वर्गाला ते प्रेरणादायी आहे. प्रत्येक देश त्याला आठवतो आणि त्यांचे झेंडे ओळखू शकतो. विद्येची, बुद्धीची देवता असलेल्या गणपती बाप्पाची शिवांश कडून होत असलेली ही आराधना बघून गणेश भक्त कुतूहल व्यक्त करीत आहेत. शिक्षण केवळ वर्गखोल्यांपुरते मर्यादित नाही तर ते उत्सव, कला आणि अगदी श्रद्धेतूनही चमकू शकते. यवतमाळच्या उबंटू शाळेत शिकणाऱ्या शिवांशच्या प्रतिभेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
3
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Sept 01, 2025 03:32:48
Akola, Maharashtra:
Anchor : अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील कमळगंगा नदीच्या पुरात वाहून गेलेल्या महिलेचा मृतदेह शोधण्यात आला आहे. मूर्तिजापूर तालुक्यातील कंझरा परिसरात 29 ऑगस्ट 2025 रोजी झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे कमळगंगा नदीला प्रचंड महापूर आला होता. या अचानक आलेल्या पुरामुळे शेतकरी आणि ग्रामीण नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले होते. दरम्यान, कंझरा ते आरखेड शिवारातून शेतीचे काम आटोपून घरी परतत असताना रेखा रमेश मते आणि त्यांची मुलगी साक्षी रमेश मते कमळगंगा नदी पार करताना पाण्याच्या प्रचंड लाटेत वाहून गेल्या. या भीषण दुर्घटनेत मुलगी साक्षी काटेरी झुडपाला अडकून थोडक्यात बचावली, मात्र आई रेखा मते वाहून गेल्या होत्या. आपत्कालीन शोध व बचाव पथक महिलेचा शोध घेत होते.या महिलेचा मृतदेह वीर भगतसिंग आपत्कालीन पथक (कुरणखेड), गाडगे महाराज पथक (पिंजर) व माँ चंडिका पथक (पैलपाडा) यांच्या संयुक्त प्रयत्नांतून शोधण्यात यश मिळाला..
8
comment0
Report
Independence Day
Advertisement
Back to top