Back
राजू शेट्टींचा इशारा: शक्तीपीठासाठी मोजणीला टाळा ठोकण्याचा इशारा!
SMSarfaraj Musa
Aug 15, 2025 13:03:32
Sangli Miraj Kupwad, Maharashtra
स्लग - यापुढे शक्तीपीठसाठी मोजणी झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयाला टाळे ठोकू - राजू शेट्टी.
अँकर - यापुढे शक्तीपीठ महामार्गासाठी शेतकऱ्यांच्या जमिनींची मोजणी करण्याचा प्रयत्न केल्यास जिल्हाधिकारी कार्यालयाला टाळे ठोकू,असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टींनी दिला आहे.स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने शक्तीपीठ बाधित शेतकऱ्यांचा महामेळावा सांगलीच्या बुधगाव मध्ये पार पडला.यावेळी खासदार विशाल पाटील यांच्यासह विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.या निमित्त बोलताना राजू शेट्टींनी शक्तीपीठ महामार्गाचा घाट सरकार भांडवलदारांच्या साठी घालतोय,मात्र यापुढे या शक्तीपीठला तीव्र विरोध केला जाईल,रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत शक्तीपीठ विरोधात लढू,असं देखील राजू शेट्टींनी यावेळी स्पष्ट केले आहे.
बाईट - राजू शेट्टी - माजी खासदार.
14
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
ABATISH BHOIR
FollowAug 15, 2025 14:32:55Kalyan, Maharashtra:
प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मागणीसाठी खोणी ग्रामस्थांचे कल्याण तहसील कार्यालयाबाहेर आमरण उपोषण
जोपर्यंत प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी जागा दिली जात नाही तोपर्यंत आमरण उपोषण सुरूच राहणार
सरपंच हनुमान ठोंबरे यांचा इशारा
Anchor :- डोंबिवली जवळील खोणी गावातील ग्रामस्थांनी खोणी गावात प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मागणीसाठी स्वातंत्र्य दिनाच्या दिवशीच आमरण उपोषण सुरू केले आहे . कल्याण तहसील कार्यालय बाहेर कोणी गावचे सरपंच ग्रामस्थांनी स्वातंत्र्य दिनाच्या दिवशीच आमरण उपोषण सुरू केले खोणी तसेच आजूबाजूच्या 20 ते 25 गावात प्राथमिक आरोग्य केंद्राची सुविधा नाही 25 ते 30 हजार नारिकांची लोकवस्ती असून सुद्धा प्राथमिक आरोग्य सकेंद्रासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे अनेकदा जागा मागितले मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप कोणी गावचे सरपंच होऊ
हनुमान ठोंबरे यांनी केलाय . जोपर्यंत प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी जागा दिली जात नाही तोपर्यंत आमरण उपोषण सुरूच राहणार असल्याचे देखील हनुमान ठोंबरे यांनी स्पष्ट केले .
Byte.. हनुमान ठोबरे
सरपंच
2
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowAug 15, 2025 14:17:01Shirur, Maharashtra:
Feed 2C
Slug: Bhimashankar Traffic
File:03
Rep: Hemant Chapude(Bhimashankar)
ब्रेक
भिमाशंकर/पुणे
- बारा ज्योतिर्लिंग भिमाशंकर मध्ये भाविकांची मांदियाळी
- 15 ऑगस्ट आणि सलग सुट्ट्या आल्याने भाविकांची मोठी गर्दी
- १० किलोमीटर पर्यंत दोन्ही बाजूने वाहनाच्या रांगा
- दर्शनासाठी भाविकांची मोठ मोठ्या रांगा...
प्रतिनिधी हेमंत चापुडे
झी मिडीया भिमाशंकर पुणे...
7
Report
MNMAYUR NIKAM
FollowAug 15, 2025 14:16:49Buldhana, Maharashtra:
बुलढाणा ब्रेकींग ..
गावठाण रस्त्यासाठी आडोळ खुर्द ग्रामस्थांचे जलसमाधी आंदोलन ..
आंदोलन कर्ते विनोद पवार यांनी घेतली जलसमाधी .
पोलिसांसमोरच पूर्णा नदीत मारली उडी ..
विनोद पवार गेले नदीच्या पाण्यात वाहून. .
जिगाव प्रकल्पामध्ये आडोळ गावाचे होत आहे पुनर्वसन .
शेकडो ग्रामस्थ जिगाव प्रकल्पावर पोहचले ..
मोठा पोलिस बंदोबस्त . .
प्रशासनाने अचानक गावठाण रस्ता बदलल्याने ग्रामस्थ झाले आक्रमक ..
जिगाव प्रकल्पात जवळ जलसमाधी आंदोलन करणारे दोन आंदोलन वाहून गेले.
एकाला पोलिसांनी वाचवलं दुसरा अद्याप बेपत्ता.
Anchor -
पश्चिम विदर्भातील महत्त्वकांक्षी असलेल्या जिगाव प्रकल्पात अनेक गावं पुनर्वसित झाली आहेत त्यातील जळगाव जामोद तालुक्यातील आडोळ या गावाचं पुनर्वसनासाठी पुनर्वसन विभागाने रस्ता प्रस्तावित केला होता व तो गावकऱ्यांना मान्य होता मात्र नंतर पुनर्वसन विभागाने तो रस्ता रद्द करून नवीन रस्त्याचा प्रस्ताव गावकऱ्यांसमोर ठेवला मात्र नवीन रस्ता गावकऱ्यांना मान्य नसल्याने त्यांनी आज जुन्या रस्त्याच्या मागणीसाठी जलसमाधी आंदोलन पुकारलं होतं आज पूर्णा नदीला मोठा पूर आलेला असल्याने या ठिकाणी आंदोलक व पोलिसांमध्ये झटापट होऊन दोन आंदोलनकर्त्यांनी पूर्ण नदीच्या पुरात उड्या घेतल्या मात्र त्यातील एक विनोद पवार नामक आंदोलक वाहून गेल्याने या ठिकाणी जमा आक्रमक झालेला आहे अतिरिक्त पोलीस अधीक्षक मोठा फौज फाटा घेऊन या ठिकाणी पोहोचले आहेत...
6
Report
PNPratap Naik1
FollowAug 15, 2025 13:47:34Kolhapur, Maharashtra:
Story :- Kop Kurundwad Paani
Feed :- 2C
Anc:- कोल्हापूर जिल्ह्यातील कुरुंदवाड शहराला नळ पाणीपुरवठा मंजूर करा, या मागणीसाठी सर्वपक्षीय कृती समितीचे साखळी उपोषण सुरू आहे. त्याला आज स्वातंत्र्य दिनी 115 दिवस पूर्ण होतात, परंतु स्थानिक लोकप्रतिनिधी, आमदार, प्रशासन याकडे दुर्लक्ष केले असून आता मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आमची दखल घेऊन नळ पाणीपुरवठा योजना मंजूर करावा अशी मागणी आंदोलकांनी ककेलीय. कुरुंदवाड शहराला स्वच्छ मुबलक पाणी पुरवठा व्हावा यासाठी 2014 मध्ये 14 कोटींचे नळ पाणी पुरवठा योजना मंजूर झाली. त्यानंतर या योजनेचे 14 टक्केच काम तीन वर्षात झाले त्यानंतर ही योजना रखडली आहे.
Byte :- प्रफुल्ल पाटील, आंदोलक
Byte :- राजू आवळे, आंदोलक
6
Report
AAASHISH AMBADE
FollowAug 15, 2025 13:16:36Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--- 1508ZT_CHP_BJP_CM_RAKHI
( single file sent on 2C)
टायटल:-- चंद्रपूर मतदार संघातल्या भाजप महिला आघाडीच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ३० हजार राख्या पाठवून दिला विश्वासाचा संदेश
अँकर:-- भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगर महिला आघाडीच्या वतीने आज शहरातील जैन भवन येथे रक्षाबंधन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या सोहळ्यात चंद्रपूर मतदारसंघाच्या वतीने पालकमंत्री प्रा. अशोक उईके यांच्या मार्फत तब्बल ३० हजार राख्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविण्यात आल्या. भगिनींनी मुख्यमंत्री यांच्याप्रती असलेला विश्वास, प्रेम आणि संरक्षणाची भावना या उपक्रमातून व्यक्त केली. कार्यक्रमाला आदिवासी विभाग मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. प्रा. अशोक उईके, चंद्रपूर मतदारसंघाचे आमदार किशोर जोरगेवार यांची मंचावर उपस्थिती होती. मुख्यमंत्री स्वतः महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि सुरक्षिततेसाठी कटिबद्ध आहेत. राज्य सरकार महिलांच्या शिक्षण, आरोग्य, स्वावलंबनासाठी विविध उपक्रम राबवत आहेत असे पालकमंत्री यावेळी म्हणाले. या कार्यक्रमात लहान मुलींपासून ते ज्येष्ठ महिलांपर्यंत सर्वांनी राखी बांधून सणाचे महत्त्व अधोरेखित केले. अल्पसंख्यांक महिला आघाडीच्या वतीने ही 2 हजार राख्या मुख्यमंत्री यांना पाठविण्यात आल्यात.
बाईट १) किशोर जोरगेवार, आमदार, चंद्रपूर
आशीष अम्बाडे
झी मीडिया
चंद्रपूर
13
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowAug 15, 2025 13:16:17Amravati, Maharashtra:
Feed slug :- AMT_RAIN_LOSS दहा फाईल आहे
रिपोर्टर :– अनिरुद्ध दवाळे, अमरावती 9503131919
अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस; रस्त्याला नदीचे स्वरूप, जीव वाचवण्यासाठी गावातील नागरिक चढले घरांच्या स्लॅपवर
कपाशी, सोयाबीन, तूर पिक पूर्ण पाण्याखाली, शेतकरी हवालदिल
अँकर :– अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे त्यामुळे चांदूर बाजार तालुक्यातील माधान गावातील रस्त्याला मोठ्या प्रमाणात नदीचे स्वरूप आले आहे. अनेक घरांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने घरातील जीवनाशक वस्तू व अन्न धान्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून जीव वाचवण्यासाठी गावातील नागरिक घरावरील स्लॅपवर चढले असून गावात सर्वदूर पाऊस झाल्याने पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कपाशी, सोयाबीन, तूर पिक पूर्ण पाण्याखाली गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
14
Report
SMSarfaraj Musa
FollowAug 15, 2025 13:15:28Sangli Miraj Kupwad, Maharashtra:
स्लग - शक्तीपीठ करायचा असेल तर,आधी राजीनामे द्या आणि शक्तीपीठ मुद्द्यावर निवडणूक जिंकून दाखवा - विशाल पाटलांचा महायुतीला आव्हान..
अँकर - शक्तिपीठ महामार्ग करायचा असेल तर आधी राजीनामे द्या,निवडणूक जिंकून दाखवा आणि मगच शक्तीपीठ करा,असे आव्हान अपक्ष खासदार विशाल पाटलांनी महायुती सरकारला दिले आहे.मतदान विरोधात जाईल म्हणून शक्तिपीठ करणार नाही,अशी घोषणा निवडणुकीपूर्वी केलं आणि निवडून आल्यावर आता शक्तिपीठ करणारच,अशी भूमिका घेतली जात आहे. मग जमिनी घेणारच असाल,तर राजीनामे द्या आणि शक्तीपीठ करणारच या मुद्द्यावर निवडणूक लढवून जिंकून दाखवा,असे आव्हान खासदार विशाल पाटलांनी महायुती सरकारला केला आहे.सांगलीच्या बुधगाव मध्ये पार पडलेल्या शक्तिपीठ बाधित शेतकरी मेळाव्या प्रसंगी ते बोलत होते.
साउंड बाईट - विशाल पाटील - खासदार, अपक्ष.
9
Report
MKManoj Kulkarni
FollowAug 15, 2025 13:03:01Mumbai, Maharashtra:
अँकर -- छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्त्यावरील ५.२५ किलोमीटर लांबीचे विहार क्षेत्र, चार पादचारी भुयारी मार्गचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण झालं.आज शुक्रवार १५ ऑगस्ट रोजी सायंकाळ पासून विहार क्षेत्र आणि भुयारी मार्ग मुंबईकरांसाठी खुला करण्यात आला.
मुंबई किनारी रस्ता (दक्षिण) प्रकल्पावरील ५.२५ किलोमीटर लांबीचे विहार क्षेत्र आहे.विहार क्षेत्रात जाण्यासाठी भुयारी मार्गात जाण्यासाठी पायऱ्या तसेच उतार मार्ग (रॅम्प) ची व्यवस्था आहे. तसेच सायकलस्वार व दिव्यांग येथे सहज प्रवेश करू शकतात.
विहार क्षेत्रावर सायकल ट्रॅकसह दिव्यांगांसाठी व्हिलचेअर सुविधा करण्यात आली आहे.
नागरिकांसाठी विरंगुळा तसेच शारीरिक तंदुरुस्तीच्या अनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिकेने विहार क्षेत्रावर विविध सोयीसुविधा दिल्या आहेत. विहार क्षेत्रावर सायकल ट्रॅक तयार करण्यात आला आहे. निसर्गसौंदर्यचा आनंद घेण्यासाठी आसनव्यवस्थेचीही सोय करण्यात आली आहे.
ठिकठिकाणी हिरवळ विकसित करण्यात आली आहे.तसेच विविध प्रकारची फुलझाडे, शोभेची झाडे लावण्यात आली आहे.मुंबईकरांना हे पाहून आनंद झाला आहे.
याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मनोज कुळकर्णी यांनी
Wkt n Tiktak
मनोज कुळकर्णी
Feed send TVU ५०
Slug -- costal Warali Sea face Opening
13
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowAug 15, 2025 12:46:09Solapur, Maharashtra:
सोलापूर ब्रेकिंग - सोलापुरात शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत 40 वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू
- सोलापुरातून अत्यंत धक्कादायक घटना समोर
- घरात शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत पल्लवी प्रवीण सग्गम या 40 वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू
- घरातील एसीचा स्फोट झाल्यामुळे शॉर्टसर्किट झाल्याची प्राथमिक माहिती
- शहरातील जुन्या विडी घरकुल परिसरातील गाडगी नगरात घडली घटना
- सदर घटनेची नोंद सिव्हिल पोलीस चौकीत करण्यात आलीय
- सध्या मृतदेह शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत
13
Report
AAASHISH AMBADE
FollowAug 15, 2025 12:32:14Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--- 1508ZT_CHP_PAINTING_EXHI
( single file sent on 2C)
टायटल:-- चंद्रपुरात स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने सुरू झाली लक्षवेधी चित्रप्रदर्शनी, पॉप आर्ट प्रकारातील MH 34 हमारा चांदा चित्रप्रदर्शनीला चंद्रपूरकरांचा मोठा प्रतिसाद, जिल्ह्यातील ऐतिहासिक वास्तू आणि स्थळांचा चित्रांमधून मांडला पट, चित्रकार प्रवीण कावेरी यांनी उलगडल्या वास्तूंमधील रंगछटा
अँकर:--चंद्रपुरात स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने प्रियदर्शिनी सभागृहातील लता मंगेशकर कलादालनात एक लक्षवेधी चित्रप्रदर्शनी सुरू झाली. पॉप आर्ट प्रकारातील MH 34 हमारा चांदा चित्रप्रदर्शनीला चंद्रपूरकरांचा मोठा प्रतिसाद मिळाला. चंद्रपूर ही गोंड साम्राज्याची ऐतिहासिक राजधानी होती. या भागात गोंड शासकांनी बांधलेल्या शेकडो वास्तू आहेत. जिल्ह्यातील या ऐतिहासिक वास्तू आणि स्थळांचा पट चित्रकार प्रविण कावेरी यांनी या चित्रांमधूम मांडला. चित्रकार प्रवीण कावेरी यांनी उलगडलेल्या वास्तूंमधील रंगछटा बघून चंद्रपूरकर हरखून गेले. ही प्रदर्शनी 3 दिवस चालणार आहे.
बाईट १) प्रविण कावेरी, पॉप आर्टिस्ट
बाईट २) डॉ. दीपक भट्टाचार्य, स्थानिक नागरिक
आशीष अम्बाडे
झी मीडिया
चंद्रपूर
14
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowAug 15, 2025 12:16:23Raigad, Maharashtra:
स्लग – संजय राऊतांच्या टीकेवर मंत्री गोगावलेंचा पलटवार ......... मला ग्रामपंचायतीत तरी मान मिळाला तुम्हा तो देखील नाही......... मी लाकांमधून निवडून आलेला लोकप्रतिनिधी आहे ........
अँकर – रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा कायम असताना मंत्री भरत गोगावले यांनी महाडमधील बिरवाडी ग्रामपंचायत कार्यालयात ध्वजारोहण केले. त्यावरून खासदार संजय राऊत यांनी गोगावले यांच्यावर टीका केली होती.त्याला आता गोगावले यांनी उत्तर दिलंय. हा देशाचा तिरंगा तो कुठेही फडकावला तरी हरकत नाही. मी जनतेतून निवडून आलेला लोक प्रतिनिधी आहे. त्यामुळे तो मान मला मिळाला तुम्हाला तोदेखील मिळत नाही असा पलटवार मंत्री गोगावले यांनी संजय राऊत यांच्यावर केलाय.
बाईट – भरत गोगावले, मंत्री
14
Report
ABATISH BHOIR
FollowAug 15, 2025 12:02:59Kalyan, Maharashtra:
मांसविक्री बंदीचा निर्णय : नॉर्थ कोरियाप्रमाणे देशाची वाटचाल हुमुकशाहीकडे - राष्ट्रवादी काँग्रेस नेते जितेंद्र आव्हाड यांची टिका
आपल्या देशाची वाटचाल ही नॉर्थ कोरियाप्रमाणे हुकुमशाहीकडे सुरू असल्याची टिका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केली. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने 15 ऑगस्टसाठी लागू केलेल्या मांस विक्री बंदीच्या निर्णयाचा निषेध करण्यासाठी ते आज कल्याणात आले होते. त्यावेळी येथील जय मल्हार उपहारगृहात झालेल्या काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या स्नेहभोजन कार्यक्रमामध्ये बोलताना त्यांनी हे भाष्य केले.
केडीएमसी प्रशासनाने 15 ऑगस्टसाठी लागू केलेल्या मांस विक्री बंदीच्या निर्णयावरून प्रचंड राजकीय गदारोळ सुरू झालाय. कल्याण, मुंबईपासून ते थेट दिल्लीच्या राजकीय वर्तुळातून त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. तसेच कल्याणातील खाटिक समाज आणि काँग्रेस पक्षाकडून आज सकाळी त्याविरोधात केडीएमसी मुख्यालयाबाहेर आंदोलनही करण्यात आले. याच निषेधात्मक आंदोलनाचा भाग म्हणून कल्याण जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांच्या पुढाकाराने मांसाहारी स्नेहभोजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. येथील जय मल्हार या उपहारगृहात झालेल्या या कार्यक्रमाला काँग्रेससह उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.
त्यावेळी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी शासन आणि प्रशासनावर सडकून टिका केली. आज 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन असून कोणी काय खावं आणि काय नाही हा ज्याचा त्याचा वैयक्तीक प्रश्न आहे. नॉर्थ कोरियामध्ये तेथील हुकुमशहा किम उन जोंग यांनी दिलेल्या केस कापण्याच्या निर्णयाची तुलना त्यांनी यावेळी केडीएमसीच्या मांसविक्री बंदीच्या निर्णयाशी केली. तसेच देशाची वाटचाल ही अशीच हुकुमशाहीकडे सुरू असल्याचे सांगत स्वातंत्र्यदिनीच नागरिकांच्या हक्कावर गदा आणण्याच्या या प्रवृत्तीचा तीव्र शब्दांत निषेध केला.
byte... जितेंद्र आव्हाड
aamdar
11
Report
NMNITESH MAHAJAN
FollowAug 15, 2025 12:02:54Jalna, Maharashtra:
FEED NAME : 1508ZT_NANDED_THEFT(2 FILES)
नांदेड : मनोज जरांगे पाटील यांच्या बैठकीत चोरट्याने मारले पाकीट,मराठा बांधवांनी दिला चोप
अँकर : नांदेडमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा समाजाच्या आढावा बैठकीत एका चोरट्याला मराठा बांधवांनी पकडुन चोप दिलाय. मराठा बांधवांचे चोरट्याने पैशाचे पाकीट पळवल्याचा आरोप आहे ..चोरी करताना एक चोरटा मराठा बांधवांच्या हाती लागलाय.त्यामुळे मराठा बांधवांनी चोरटयाला बेदम चोप दिला.. पोलिसांनी हस्तक्षेप करून या चोरट्याला ताब्यात घेतलय...
14
Report
JMJAVED MULANI
FollowAug 15, 2025 11:33:16Baramati, Maharashtra:
JAVEDMULANI
SLUG 1508ZT_INDAPURRAIN
FILE 4
इंदापूर शहरासह परिसरात पावसाची हजेरी...
Anchor: पुणे जिल्ह्यातल्या इंदापूर तालुक्यातील अनेक गावांसह शहरात पावसाने हजेरी लावली. मागील अनेक दिवसांपासून रिमझिम पाऊस दररोज येत असून ढगाळ वातावरण आहे. आज दुपारी पावसाने हजेरी लावली. उजनी धरण जरी 102 % झाल असला तरी
मागील अनेक दिवसापासून केवळ रिमझिम पाऊस पडत असून दमदार पाऊस इंदापूर तालुक्यात झालेला नाही. त्यामुळे जोरदार पावसाची आता पिकांना गरज भासू लागली आहे.
13
Report