Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Washim444505

वाशिममध्ये पावसाने १३,१८८ शेतकऱ्यांचे पिकांचे नुकसान!

GMGANESH MOHALE
Jul 25, 2025 05:04:40
Washim, Maharashtra
वाशिम: File:2507ZT_WSM_CROP_DAMAGE रिपोर्टर:गणेश मोहळे, वाशिम अँकर : वाशिम जिल्ह्यात २२ आणि २३ जुलै ला झालेल्या मुसळधार पावसामुळे १३,१८८ शेतकऱ्यांच्या एकूण १५,०५९ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे.नैसर्गिक आपत्तीमुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचले असून, खारीपाच्या पिकांसह फळबागांवर पाणी फेरल्याने हिरवीगार शेती उध्वस्त झाली आहे.यामुळे शेतकऱ्यांचे आशेचे पीक मातीमोल होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.नुकसानग्रस्त भागात सध्या कृषी व महसूल प्रशासनाच्या वतीने पंचनामे सुरू आहेत. हवामानाची अनिश्चितता लक्षात घेता, नुकसानाची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.पंचनामे पूर्ण झाल्यानंतर शासनाकडे नुकसानभरपाईसाठी प्रस्ताव पाठवण्यात येणार आहे.त्यामुळे प्रत्यक्ष नुकसानभरपाई केव्हा मिळणार,याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
14
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
GMGANESH MOHALE
Jul 26, 2025 04:18:08
Washim, Maharashtra:
वाशिम: File:2607ZT_WSM_VANOJA_SCHOOL रिपोर्टर:गणेश मोहळे,वाशिम अँकर : वाशिमच्या रिसोड तालुक्यातील वनोजा परिसरात मागील तीन दिवसांपासून अधूनमधून संततधार पाऊस सुरू आहे.या पावसाचे पाणी जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात मोठ्या प्रमाणात साचले असून, यामुळे लहानग्या विद्यार्थ्यांना शाळेत येताना आणि जाताना चिखल व साचलेल्या पाण्यामुळे मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.स्थानिक प्रशासनाकडून अद्याप पाण्याचा निचरा करण्यासाठी कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही.त्यामुळे पालक आणि ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.उपाययोजना करण्याची मागणी केली जात आहे.
2
Report
TTTUSHAR TAPASE
Jul 26, 2025 04:17:54
Satara, Maharashtra:
TUSHAR TAPASE 2 FILES SLUG NAME -SAT_PACHGANI सातारा - पाचगणी टेबल लँडवर आढळणाऱ्या दुर्मीळ वनस्पतींचे रक्षण आणि संवर्धन व्हावे या साठी रानवा या संस्थेच्या माध्यमातून जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या उपस्थितीत पाचगणी पठारावर नष्ट झालेल्या दुर्मीळ वनस्पतींचे पुनर्रोपण करण्यात आले.यात निळी कासुडी, बडमूग, हिरवी निसुडी, पंद, निळा मिकी माऊस या दुर्मीळ वनस्पतींचे रोपण जिल्हाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी कार्यक्रमात सुधाकर नांगनुरे, अंकुर पटवर्धन, तहसिलदार सचिन मस्के, मुख्याधिकारी पंडीत पाटील, मुकेश कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते. पाचगणीतील जैवविविधता ही अनमोल असून तिचे संरक्षण आवश्यक आहे. या साठी या संस्थेने हे पुनर्रोपण आणि संगोपनाची जबाबदारी स्विकारत हा जैविक वारसा पुढील पिढ्यांपर्यंत टिकवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
3
Report
GDGAJANAN DESHMUKH
Jul 26, 2025 04:17:21
Parbhani, Maharashtra:
अँकर - हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील गिरगाव येथील जमिनी शक्तीपीठ राज्यमहामार्ग जात आहेत, हा सर्व केळी उत्पादन करणारा अत्यंत काळी कसदार असलेला सुपीक पट्टा आहे, या भागात शेतीतून सोन पिकते म्हणलं तर वावग ठरणार नाही,अशी सुपीक जमीन आम्ही शक्तीपीठ महामार्गाला देणारच नाही असा पवित्रा या भागातील शेतकऱ्यांनी घेत रस्त्यावर उतरून शक्तीपीठ महामार्गाला जोरदार विरोध दर्शविलाय. यावेळी अधिकार्याला निवेदन देऊन शेती मोजणी करण्यास शेतकऱ्यांनी विरोध दर्शवलाय...
2
Report
MNMAYUR NIKAM
Jul 26, 2025 04:17:14
Buldhana, Maharashtra:
बुलढाणा.. स्टोरी - "तु गाय चोर है" , म्हणत तरुणाला बेदम मारहाण.. धर्म जाणून घेण्यासाठी काढले कपडे ... Anchor - बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव मध्ये गाय चोर असल्याच्या संशयावरून एका तरुणाला तीन युवकांनी बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे... यानंतर त्या दोन युवकांनी निर्लज्जपणाचा कळस गाठून त्याचा धर्म तपासण्यासाठी तरुणाचे कपडे उतरवून तू कुठल्या धर्माचा आहे, अशी सुद्धा विचारणा केली.. यामुळे खामगाव मध्ये खळबळ उडाली आहे.. खामगाव शहरातील शामल नगर भागात राहणाऱ्या रोहन पैठणकर या तरुणाला खामगाव मध्ये राहणाऱ्या आरोपी तीन युवक गब्बू गूजरीवाल, प्रशांत गोपाल संगेले, रोहित पगारीया यांनी बस स्थानकासमोर पत्ता विचारण्याच्या नावाखाली तरुणाला पकडून गाडीवर बसवले आणि त्याला वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन मारहाण केलीय .. दरम्यान त्याला तू गाय चोर आहेस, असे म्हणून युवकाला चापट बुक्क्या व लाथांनी जबर मारहाण केलीय .. त्यातील दोघांनी त्या तरुणाला त्याच्या अंगातील कपडे काढून त्याला तू हिंदू आहे की, मुस्लिम असे विचारले व अंगावरील संपूर्ण कपडे काढले.. पीडित युवकाने आरोपींना मारू नका म्हणता राहिला मात्र आरोपींनी त्याचे काहीही ऐकले नाही.. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी युबका विरोधात ॲट्रॉसिटी ॲक्ट सह विविध कलमानुसार गुन्हा दाखल केलेला आहे.. बाईट : रोहन पैठणकर. बाईट पीडिटाची आई
1
Report
VBVAIBHAV BALKUNDE
Jul 26, 2025 04:15:32
Latur, Maharashtra:
AC ::- धाराशिव येथून हासेगाव येथील एका नामांकित संस्थेत दाखल १७ वर्षांच्या एचआयव्ही संक्रमित मुलीवर अत्याचार झाल्याचा प्रकार समोर आला आहे. संस्थाचालक रवि बापटले यांच्यासह अन्य चौघांना हे प्रकरण दाबल्याचा, तर खासगी रुग्णालयातील डॉक्टरांनी पीडितेचा गर्भपात केल्याचा आरोप तक्रारीत केला आहे. या संदर्भात औसा पोलिसांत गुन्हा दाखल होताच रवि बापटले यांच्यासह 3 जणांना औसा पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती लातूरचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी दिली आहे. तर पीडीत मुलीला पुढे करून कोणीतरी माझ्या विरोधात हे शडयंत्र करत आहे. तपास यंत्रणांवर आमचा पूर्ण विश्वास आहे असे रवी बापटले यांनी‌ प्रतिक्रिया दिली आहे. बाईट ::- पोलीस अधीक्षक अमोल तांबे
0
Report
SKSudarshan Khillare
Jul 26, 2025 04:15:25
Yeola, Maharashtra:
अँकर:-ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणूक 2021 यावर्षी येवला तालुक्यातील निवडणुका दरम्यान जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे नाशिकचे अप्परजिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे यांनी तब्बल 59 सदस्यांना अपात्र केले आहे. यात काही सरपंच ,उपसरपंच यांचा देखील समावेश असून या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. यातील काही सदस्यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर ही कारवाई झाल्याने या कार्यवाहीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत .या संदर्भात तक्रारदार यांच्यासोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे यांनी..
0
Report
SNSWATI NAIK
Jul 26, 2025 04:15:16
Navi Mumbai, Maharashtra:
story slug - तुर्भे येथील केमिकल कंपनी ला आग तुर्भे मे कंपनी मे आग ftp slug - nm turbhe company fier shots- reporter- swati naik navi mumbai anchor - तुर्भे एमआयडीसी मधील रेश्मा ऑरगॅनिक केमिकल प्रायव्हेट ली कंपनी मद्ये पहाटे तीन वाजता आग लागली यावेळी एमआयडीसी आणि नवी मुंबई महापालिकेच्या अग्नीशमन दलाच्या दोन गाड्या दाखल होऊन आग नियंत्रणात आणली ,सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही
0
Report
GMGANESH MOHALE
Jul 26, 2025 04:04:26
Washim, Maharashtra:
वाशिम: File:2607ZT_WSM_APMC_CLOSED रिपोर्टर:गणेश मोहळे,वाशिम अँकर : वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीचे व्यवहार आज दुसऱ्या दिवशीही पूर्णपणे बंद राहणार आहेत.व्यापाऱ्यांकडून अडत्यांचे थकीत पैसे न मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.मागील काही दिवसांपासून शेतमाल खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांनी अडत्यांना पैसे दिलेले नाहीत. त्यामुळे अडत्यांनी शेतकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी बाजार समिती बंद ठेवण्याची मागणी केली होती.बाजार समिती प्रशासनाने ती मागणी मान्य करून आजही व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.या निर्णयाचा थेट फटका शेतकऱ्यांना बसणार असून आता त्यांना शेतमाल विक्रीसाठी खासगी व्यापाऱ्यां कडेच जावे लागणार आहे.
1
Report
SMSarfaraj Musa
Jul 26, 2025 04:04:18
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:
स्लग - राष्ट्रवादीचे जेष्ट नेते अण्णासाहेब डांगे यांनी धरली भाजपाची वाट ! 30 जुलै रोजी करणार दोन्ही मुलांसह भाजपात प्रवेश.. अँकर - राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते व माजी मंत्री अण्णासाहेब डांगे हे आता स्वगृही भाजपात परतणार आहेत.दोन्ही मुलांसह आण्णा डांगे यांनी भाजपा प्रवेशाचा निर्णय घेतला आहे.त्यांचे पुत्र व माजी नगराध्यक्ष चिमण डांगेसह अण्णासाहेब डांगे हे येत्या 30 जुलै रोजा भाजपामध्ये प्रवेश करणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अण्णासाहेब डांगे यांनी भेट देखील घेतली असून भेटीमध्ये पक्षप्रवेशाची चर्चा देखील झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.येत्या 30 जुलै रोजी अण्णासाहेब डांगे आपल्या समर्थक कार्यकर्त्यांसोबत भाजपामध्ये पक्षप्रवेश करणार आहेत.राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर डांगे यांनी भाजपा प्रवेशाचा मार्ग स्वीकारला आहे. त्यामुळे जयंत पाटील आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला हा मोठा धक्का मानला जात आहे.अण्णा डांगे यांनी 20 वर्षांपूर्वी भाजपाची साथ सोडली होती,मात्र आता पुन्हा स्वगृही परतण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.
4
Report
HCHEMANT CHAPUDE
Jul 26, 2025 04:04:07
Junnar, Maharashtra:
Feed 2C Slug: Junnar Sonavne Tribal Ministry Wad File:02 Rep: Hemant Chapude(Junnar) Anc: जुन्नर चे सत्ताधारी आमदार शरद सोनवणेंनी थेट मंत्र्यांबद्दल अपशब्द वापरलेत. आता मी मुख्यमंत्र्यांसमोर त्यांना उभं करणार आहे. सोबतच घोडेगाव प्रकल्प विकासाचे अधिकारी प्रदीप देसाईंची ही झाडाझडती करणार आहे. मंत्री आणि अधिकाऱ्यांवर संताप व्यक्त करताना सत्ताधारी आमदार सोनवणेंनी अपशब्द वापरलेत, याचा व्हिडीओ Zee 24 तास च्या हाती लागलाय. यामुळं जुन्नरमधून अपक्ष निवडून आलेले मात्र शिंदे गटात सहभागी झालेले सोनवणे मोठे अडचणीत आलेत.मात्र यावर प्रतिक्रिया देताना आमदार सोनवणे यांनी... माझा रोष आदिवासी प्रकल्प आधिकारी यांच्यावर असुन त्या आधिका-यांना पाठीशी घालणा-या मंत्र्यांवरही असल्याचा खुलासा आमदार सोनवनेंनी केलाय  Byte :- शरद सोनवणे- आमदार प्रतिनिधी हेमंत चापुडे झी मिडीया जुन्नर पुणे,..
3
Report
GDGAJANAN DESHMUKH
Jul 26, 2025 04:03:11
Parbhani, Maharashtra:
अँकर- हिंगोलीच्या औंढा तालुक्यातील गलांडी शिवारातील एका आखाड्यावर जबरी चोरीचा प्रकार उघडकीस आलाय. चोरट्यांनी आखाड्यावर धुमाकूळ घालीत कुठे दांपत्यास मारहाण तर कुठे लूट मार करीत सोन्या चांदीचे दागिने लंपास केलेत. गलांडी गाव शिवारातील राजेश्वर सदाशिव चौंडेकर यांच्या शेतातील आखाड्यावर राहत असलेले सालगडी देवबा अंभोरे आणि त्यांची पत्नी द्वारकाबाई अंभोरे घरात झोपलेले असतांना चोरट्यांनी लाथ मारून दार उघडले. या वृद्ध दांपत्याकंडील २४ ग्राम चांदी व पाच ग्रॅम सोन्याचे दागिने चोरट्यांनी पळवले, त्यानंतर सदर चोरटे तेथून जवळ असलेल्या रामराव पटवे यांच्या आखाड्यावर गेले. या चोरट्यानी रामराव पटवे आणि त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई पटवे यांना जबर मारहाण केली. मारहाणीत दोघेही गंभीर जख्मी झाले आहेत. जख्मी दाम्पत्यावर हिंगोली येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी सात पथक रवाना केली आहेत. या घटनेने खळबळ माजलीय...
4
Report
GMGANESH MOHALE
Jul 26, 2025 04:01:34
Washim, Maharashtra:
वाशिम: File:2607ZT_WSM_ADAN_DAM रिपोर्टर:गणेश मोहळे,वाशिम अँकर: वाशिम जिल्ह्यात सुरू असलेल्या दमदार पावसामुळे वाशिम जिल्ह्यातील सर्वात मोठ प्रकल्प असलेल्या अडाण धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होत आहे.त्या पार्श्वभूमीवर धरणातील पाणीसाठा नियंत्रणात ठेवण्यासाठी अडाण धरणाचे 2 द्वार दहा सेंटीमीटरने उघडण्यात आले असून, यातून 19.85 क्युमेक्स पाण्याचा विसर्ग अडाण नदीत सुरू आहे.ही धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत.त्यामुळे अडाण नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
2
Report
SRSHRIKANT RAUT
Jul 26, 2025 03:50:03
Yavatmal, Maharashtra:
Anchor : यवतमाळ जिल्ह्यातील काही भागांमध्ये अति पावसामुळे शेतामध्ये पाणी साचले आहे. विहिरी पूर्णतः भरल्या असून त्यामुळे शेत जमीन चिबडली आहे. या चिबडलेल्या शेत जमिनीतील पिके पिवळी पडायला लागली असून, या ठिकाणी फवारणी करणे आणि जमिनीतील पाण्याचा निचरा करणे देखील अवघड ठरत आहे. परिणामी पिकांची वाढ खुंटण्याची भीती शेतकऱ्यांना आहे.
4
Report
AAABHISHEK ADEPPA
Jul 26, 2025 03:49:26
Solapur, Maharashtra:
सोलापूर ब्रेकिंग - सोलापुरात ए आय तंत्रज्ञानाच्या मदतीने डॉक्टरांनी केली हृदयाची यशस्वी शस्त्रक्रिया - सोलापुरातील एसीएस हॉस्पिटलमध्ये एआय तंत्रज्ञानाच्या मदतीने करण्यात आली हृदयाची शस्त्रक्रिया - पाच डॉक्टरांच्या चमूने ए आय तंत्रज्ञानाचा वापर करत तीन रुग्णांची केली यशस्वी शस्त्रक्रीया - सदरचा शस्त्रक्रियेत आयव्हस, रोटाअब्लेशन बायफरगेशन, अँजीओप्लास्टी, अल्ट्रा लो कॉन्ट्रॅक्ट आदी पद्धतींचा करण्यात आला वापर - तंत्रज्ञानाच्या मदतीमुळे उपचारादरम्यान रुग्णांना देखील कमीत कमी त्रास बाईट - डॉ. सिद्धांत गांधी बाईट - ऑपरेशन झालेले रुग्ण
4
Report
VBVAIBHAV BALKUNDE
Jul 26, 2025 03:48:06
Latur, Maharashtra:
लातूर ... AC ::- सातव्या वेतन आयोगातील वेतन त्रुटी आणि कंत्राटी भरतीच्या, पदनाम बदलाच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेचे राज्यव्यापी कामबंद आंदोलन सुरु केले होते.  जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाहीत, तोपर्यंत माघार नाही असा पवित्रा आरोग्य परिचारिकांनी घेतला होता. परिचारिकांच्या कामबंद आंदोलनाचा परिणाम रुग्ण सेवेवर झाला होता. ५० टक्के शस्त्रक्रिया पूढे ढकलण्यात आल्या होत्या. शिवाय नियमित उपचारासाठी दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्याही कमी करण्यात आली होती. या आंदोलनाची दखल घेवून वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीप यांनी सर्व मागण्या मान्य केल्या. त्यामुळे परिचारिकांचा संप आता मागे घेण्यात आला आहे.
7
Report
Advertisement
Back to top