Back
प्रतापगड जागतिक वारसा स्थळांमध्ये, अभिमानाची बाब!
TTTUSHAR TAPASE
FollowJul 12, 2025 14:05:50
Satara, Maharashtra
TUSHAR TAPASE
2 FILES
SLUG NAME -SAT_EKNATH_SHIND
छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्श डोळ्यासमोर ठेवून गेल्या तीन वर्षापासून महायुतीच्या माध्यमातून हा प्रयत्न सुरू होतात.. ही मोठी अचीवमेंट आहे..
जागतिक वारसा स्थळांच्या यादीत सातारा जिल्ह्यातील प्रतापगड चा समावेश झाल्यामुळे जागतिक पर्यटक त्याचबरोबर बाकी किल्ल्यांचा समावेश झाल्यामुळे ही गोष्ट गौरवाचे आणि अभिमानाची बाब आहे..
छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य कीर्ती, चरित्र साता समुद्र पार पोहचलो..
byte - एकनाथ शिंदे
(पॉलिटिकल नको म्हणाले)
12
Share
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PPPRAFULLA PAWAR
FollowJul 12, 2025 17:30:19Raigad, Maharashtra:
स्लग - जुन्या मुंबई पुणे महामार्गावर अपघात ..... अपघातात दोन महिला ठार चौघे जखमी ......
अँकर - जुन्या मुंबई महामार्गावर खोपोलीजवळ बोरघाटात झालेल्या अपघातात दोन महिला जागीच ठार झाल्या तर तिघेजण जखमी झाले. बोरघाटातून पुण्याकडे चाललेल्या ट्रकच्या चालकाने एचओसी ब्रीजजवळ अचानक ब्रेक दाबल्यामुळे ट्रकमधील लोखंडी पाईप बाहेर आले आणि ते मागून चाललेल्या कार आणि दुचाकीवर धडकले या अपघातात कारमधील एक आणि दुचाकीवरील एक महिला ठार झाली. तर चौघे जखमी झाले. जखमींवर खोलीतील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हेल्प फाउंडेशन सह सर्व यंत्रणांनी मदत करून या मार्गावरील वाहतूक सुरळीत केली आहे.
0
Share
Report
SMSATISH MOHITE
FollowJul 12, 2025 17:01:35Nanded, Maharashtra:
Satish Mohite
Slug - Ned_Delivery
Feed on - 2C
-----------------------------
Anchor - रुग्णवाहिकेला येण्यास विलंब झाल्याने 9 महिण्याच्या गर्भावतीला नाईलाजाने ऑटोतून प्रवास करावा लागला. पण ऑटोतून जात असताना प्रसूतीकळा असह्य झाल्याने रस्त्यातच प्रसूती झाली. नांदेड जिल्हयातील मुखेड तालूक्यातील ही घटना घडली. मेथी या गावातील 22 वर्षीय अश्विनी नालापले ह्या महिलेला सकाळी 8 वाजेच्या सुमारास प्रसुतीवेदना सूरू झाल्या. नातेवाईकानी रुग्णवाहिकेसाठी 108 क्रमांकवर फोन केला. पण रुग्णवाहिका उपलब्ध झाली नाही. महिलेच्या वेदना वाढत असल्याने नातेवाईकांनी नऊ महिन्याच्या गर्भवती महिलेला घेऊन ऑटोतून प्रवास सूरू केला. मात्र रस्त्यात प्रसूती कळा वाढल्या. त्यामूळे नात्यातील महिलानी होनवडज फाट्याजवळ ऑटो थांबवला. रस्त्यालगच्या शेतात साडीचा आडोसा देउन गर्भवती महीलेची प्रसुती करण्यात आली. महिलेने मुलाला जन्म दिला. मात्र या ठीकानी आई आणि बाळाची नाळ तोडण्याची व्यवस्था नव्हती. स्थानिकांनी रुग्णवाहिका मागवून तातडीने आई आणि बाळाला मुखेड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. बाळ आणि बाळंतीण दोघेही सुखरूप आहेत. दरम्यान या घटने नंतर ग्रामीण भागातील आरोग्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. कारण मेथी या गावापासून येवती आणि होनवडज ही आरोग्य उपकेंद्र जवळ आहेत. मात्र या केंद्रात सुविधा उपलब्ध नाहीत. त्यामुळे आरोग्य सेवेसाठी या भागातील नागरिकांना तालुक्याच्या ठिकाणी जावं लागत आहे.
Byte - डॉ . उबेद तुमानी
आरोग्य अधिकारी , मुखेड
Byte - कमल चिंतलवाड, नातेवाईक
--------------------
8
Share
Report
AKAMAR KANE
FollowJul 12, 2025 15:35:43kolhapur, Maharashtra:
Ngp 2c ला व्हिडिओ जोडले आहे
------
नागपुर मे एक कार्यक्रम के दौरान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी ने शिक्षा विभाग के प्रॉब्लेम के बारे मे बताते हुए चल रे कुछ गलत चिजो पर टिप्पणी की
गडकरी ने कहा है की, सत्ता, संपत्ती, ज्ञान और सौंदर्य से व्यक्ती को अहंकार होता है.. जब ये सब बाते आ जाती है तो उस व्यक्ती को लगता है की वो बहुत शयाना है, और वो अपने असेंरटीव्ह स्वभाव के साथ दूसरो पर थोपता है. इससे कोई बडा नही बनता.
गडकरी ने कहा कि वो तिसरी बार सांसद चुनकर आया है. इस चुनाव मे उन्होंने सोचा था वो कोई पोस्टर, बैनर नही लगायेंगे, ना किसीं को खाना खिलायेंगे, जात-पात की राजनीती नही करनी.. जिसको देना है वोट दे, अन्यथा ना दे.. वो अपने वसुलो के साथ चलेंगे..
शिक्षा विभाग के बारे बोलते हुए गडकरी ने कहा की, प्रॉब्लेम तो है..टीचर के अप्रुव्हल के लिए माल-पानी देना पडता है, अँपॉइंटमेंट के लिए भी पैसे मांगनेवाले है..
शिक्षा का सार्वत्रीकरण होना चाहिये.... और शिक्षा की गुणवत्ता भी मेंटेन होना चाहिए
शिक्षा विभाग के अधिकरी क्या- क्या करते उन्हें सब मालूम है, फिर जेल जाते है अधिकारी...
गडकरी ने कहा की, लोग उनसे पुछते है की, इतनी प्रॉब्लेम है तो रोड कैसे बनते है, तब वो उन्हे कहते है की,
There are some people's who covert problems into opportunity and some people's who convert opportunity into problems...
जब तूमको नौकरी मिली है इसका मतलब तुम्हारी परीक्षा है, तुम गधे को घोडा कैसे बना सकते हो... ये मत गिनाओ की ये गधा ही है, सुधर नही सकता... अरे सुधर नही सकता इसिलिए तुम्ह बुलाया गया है..
केंद्रीय मंत्री नितिन गडकरी कहां की *विनम्रता कैसी होनी चाहिए फिल्म अभिनेता अमिताभ बच्चन कि उन्होंने देखी* एक वाक्य का जिक्र करते हुए केंद्रीय मंत्री गडकरी ने कहा कि एक कार्यक्रम में वो अमिताभ बच्चन के साथ बैठे थे ,तभी एक छोटा लड़का और लड़की मंच पर आते हैं ,अमिताभ बच्चन उठकर हाथ जोड़कर उन्हें मंच पर बुलाए, गडकरी ने कहा कि वो बैठे रहे, बाद संकोच वस खड़े हुए, बाद में वो गए, गडकरी ने कहा कि बाद मे उन्हें ध्यान में आया कि छोटे लड़कों के लिए भी इतनी बड़ा अभिनेता कितना विनम्र है,
केंद्रीय मंत्री नितिन गडकरी ने कहा कि जब भविष्य का भारत निर्माण करना है, तो स्वाभाविक रूप से भविष्य का भारत कैसे निर्माण करना है, आज के विद्यार्थियों को आप क्या पढ़ावो गे, इसके ऊपर उसका परिणाम होगा,हमारा इतिहास, हमारे संस्कृति और विरासत जो है, वह देश तक सीमित नहीं है, *हम यह कहते कि मानव जाति का कल्याण हो और सबसे बड़ी समस्या यह है, विश्व युद्ध के कगार पर विश्व खड़ा है, हमारा देश गौतम बुद्ध की भूमि है, जिन्होंने इस देश को सत्य ,अहिंसा एक प्रकार से मानवता का संदेश दिया है, विश्व गुरु बनने की हममे क्षमता भी है, यह बनने के लिए भविष्य की हमें जो पीढ़ी निर्माण करनी है, उसको किस तरीके से हम निर्माण कर रहे हैं ,उस पीढ़ी के कार्य, करतूत के आधार पर हमारे देश का मूल्यांकन होने वाला है*, इसलिए स्वाभाविक रूप से शिक्षा ही महत्वपूर्ण है,
13
Share
Report
LBLAILESH BARGAJE
FollowJul 12, 2025 15:07:30Pune, Maharashtra:
रिपोर्टर:- लैलेश बारगजे
स्लग:-खासदार लंके उपोषण सोटले
फीड 2C
Anchor
अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके यांच दोन दिवसांपासून सुरू असलेलं उपोषण आज त्यांनी मागे घेतला आहे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक वसंत पंढरकर यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर खासदार लंके यांनी उपोषण मागे घेतला आहे नगर मनमाड राष्ट्रीय महामार्गाच रखडलेले काम तात्काळ सुरू करावा या मागणीसाठी खासदार लंके यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केल होत यावर्षी या महामार्गाची नव्याने निविदा काढली आणि कामाचा कार्यारंभ आदेश काढून देखील प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेल नव्हतं. लंके उपोषणाला बसल्यानंतर ठेकेदाराने काम सुरू केला असून महामार्गावरील चार ठिकाणी प्रत्यक्ष काम सुरू झालं आहे याची खात्री पटल्यानंतर आणि ठेकेदाराने निविदेमध्ये सांगितल्या प्रमाणे काम करणार असल्याच लेखी दिल्यानंतर खासदार लंके यांनी आपला उपोषण मागे घेतला आहे
बाईट:- निलेश लंके, खासदार राष्ट्रवादी SP
13
Share
Report
AKAMAR KANE
FollowJul 12, 2025 14:32:46kolhapur, Maharashtra:
2c ला व्हिडिओ जोडले आहे
------
- छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश करण्यात आल्याचा
नागपुरात जल्लोष साजरा करण्यात आला
भाजप नागपूर शहरचा वतीने महाल परिसरात छत्रपती शिवाजी महाराज चौकात यावेळी फटाके फोडून,ढोल ताशा वाजवत, मिठाई वाटप करत जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करण्यात आल.
1
Share
Report
SRSHRIKANT RAUT
FollowJul 12, 2025 14:05:58Yavatmal, Maharashtra:
Anchor :
On भाजप प्रदेशाध्यक्ष वक्तव्य
मुंबई महानगरपालिका भाजपच्या तावडीत जाणार नाही, कारण मुंबईतील मराठी माणूस पेटून उठला आहे. तुम्ही जे सगळ्यांना आंदन देता, ते मराठी माणसाला कळलं आहे. भाजपने महाराष्ट्राला लाचार करून ठेवलं आहे. 106 हुतात्म्यांनी प्राणाहुती देऊन मिळवलेली मुंबई तुम्ही कोणाच्या तरी हाती देत आहे, हे मराठी माणसाला कळलं असून हेच भाजपचं दुटप्पी धोरण असल्याची टीका शिवसेना युबीटीचे खासदार अरविंद सावंत यांनी केली. 2017 साली शिवसेनेचा महापौर झाला यात भाजपचे उपकार नाहीत, उलट शिवसेनेचेच अनंत उपकार भाजपवर आहेत शिवसेना देशभरात वाढली असती, आजही केरळ ते कन्याकुमारी आणि गुजरात पर्यंत शिवसेनेच्या शाखा आहेत. तिथे बाळासाहेबांचा फोटो आहे, आणि उद्धव ठाकरे यांना मानणारे शिवसैनिक आहेत. जे निष्ठावान आहेत. भाजप मित्रांना मारण्यात पारंगत आहे, इंग्रजांची नीती घेऊन जन्माला आलेली ही लोकं आहेत, शिडीवर चढायचं आणि त्या शिडी ला लाथ मारायची अशी वृत्ती आणि नीती ही भाजपची असल्याची टीका अरविंद सावंत यांनी केली.
On संजय शिरसाट प्रकरण -
संजय शिरसाठ यांना अब्रू असेल तर नुकसानीचा दावा करावा, लाचारांना अब्रू असते का, ही कमरेखाली वाकलेली लोकं आहेत असा टोला शिवसेना युबीटी खासदार अरविंद सावंत यांनी लगावला आहे. यांना अब्रू असती तर सुरत, गुवाहाटी, गोव्याला पळाले नसते. अब्रू नसल्यामुळेच हे लोक पळत सुटले आहेत.
असेही सावंत म्हणाले.
बाईट : अरविंद सावंत
On पश्चिम विदर्भ दौरा -
शिवसेना निवडणुका डोक्यात ठेवून फिरत नसून 80 टक्के समाजकारण हे शिवसेनेचे कार्य आहे. शिवसैनिकांनी नाउमेद न होता हा वारसा पुढे नेला पाहिजे. जय पराजयाची चिंता न करता, हार न मानता काम करत राहायचे. असा संदेश देण्यासाठी पश्चिम विदर्भाचा दौरा करतोय असे अरविंद सावंत यांनी सांगितले.
शिंदेंकडे गेलेले आता परत शिवसेनेत येत आहेत. आमिष आणि भाई दाखवून जे लाचारांच्या फौजेत गेले त्यांना काही मिळालं नाही. जाताना त्यांनी विचारलं नाही त्यामुळे येताना त्यांच्या स्वागताला उभे राहण्याची गरज नाही. ज्यांना यायचं ते येतील असेही सावंत यांनी स्पष्ट केले.
बाईट : अरविंद सावंत
On मुंडेची तिसरी कन्या राजकारणात -
प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे हे युतीचे शिल्पकार होते, शिवसेनाप्रमुखांना ते भेटत राहत. मात्र शिवाजी राजांना फसविणारे होते हे संभाजी राजांना कळालं. तसं शिवसेना प्रमुखांना फसवलं हे आमच्या संभाजी राजांना कळालं आहे. त्यामुळे त्यांच्यापासून चार हात दूर आहोत याचा आनंदच आहे असे अरविंद सावंत म्हणाले.
12
Share
Report
TTTUSHAR TAPASE
FollowJul 12, 2025 14:03:58Satara, Maharashtra:
TUSHAR TAPASE
2 FILES
SLUG NAME -SAT_SHINDE_121
सातारा - माझ्या सारख्या सामान्य कार्यकर्त्याचा नावाची प्रदेशाध्यक्ष पदासाठी चर्चा सुरू आहे हे माझे भाग्य आहे.15 जुलैला ते जाहीर होईल.मला जर संधी मिळाली तर नक्कीच पक्ष वाढविण्यासाठी मी प्रयत्न करेन.माझा लोकसभेला,विधानसभेला पराभव होऊनदेखील मला संधी मिळते आहे हे माझं भाग्य असल्याचे शशिकांत शिंदे यांनी सांगितले आहे त्याच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी तुषार तपासे यांनी
121
2
Share
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowJul 12, 2025 14:03:22Junnar, Maharashtra:
Feed 2C
Slug: Junnar Kalu Waterfall Rescue
File:01
Rep: Hemant Chapude(JUNNAR)
पुण्यातील काळू धबधब्यावर अडकलेल्या पर्यटकाची सुटका.*
Anc:देशात प्रसिद्ध असलेल्या माळशेज घाटातील खिरेश्वर हद्दीतील काळू धबधब्याच्या पाण्याच्या प्रवाहात अडकलेल्या पर्यटकाला वाचविण्यात यश आलंय,
काळू धबधबा हा पाच टप्यांत खोल दरीत कोसळत असतो.त्याच्या पहिल्या टप्प्याच्या ठिकाणी एक पर्यटक हा पाय घसरून पडल्याचे स्थानिकांनी सांगितले.
खाली शेकडो फुट खोल दरी व काळू नदीच्या अतिवेगवान पाण्याच्या प्रवाहात हा युवक अडकला असता.तेथे असलेल्या पर्यटकांनी त्याला दोरीच्या सहाय्यानेे सुखरूप बाहेर काढले.
प्रतिनिधी हेमंत चापुडे
झी मिडीया जुन्नर पुणे...
5
Share
Report
TTTUSHAR TAPASE
FollowJul 12, 2025 14:03:04Satara, Maharashtra:
TUSHAR TAPASE
4 FILES
SLUG NAME -SAT_JALLOSH
सातारा - प्रतापगड किल्ल्याला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळाल्यानंतर जिल्ह्यात आनंदाचे वातावरण पाहायला मिळालं आज सातारा जिल्हा प्रशासनाच्या वतीने साताऱ्यातील शिवतीर्थावर ढोल ताशे वाजवून तसंच छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आनंद व्यक्त करण्यात आला यावेळी सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले साताऱ्याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तुषार जोशी आणि सातारा जिल्हा परिषदेच्या सीईओ याशनी नागराजन उपस्थित होत्या
Byte : शंभूराजे देसाई
शिवेंद्रराजे भोसले
0
Share
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowJul 12, 2025 11:30:39Raigad, Maharashtra:
स्लग – रायगड जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी घेतला भातपिक लागवडीचा अनुभव ........ शेतकरयांना शेतीसाठी प्रोत्साहीत करण्याचा प्रयत्न .........
अँकर – सध्या कोकणात भात लागवडीची लगबग सुरू आहे. चिखलात उतरून भाताची रोपे लागवड करण्याचा अनुभव रायगड जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी घेतला. शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे यासाठी एक दिवस शेतकऱ्यांसाठी हा उपक्रम राबवण्यात आला. त्यात जिल्हा परिषद कृषी विभागाच्या वतीने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह सर्व विभागांच्या प्रमुख अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन भात पिक लागवडीत प्रत्यक्ष सहभागी होवून कार्यक्रम करुन शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले.
14
Share
Report
AAASHISH AMBADE
FollowJul 12, 2025 11:07:41Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--- 1207ZT_CHP_GANESH_MEET
( single file sent on 2C)
टायटल:--- पीओपी मूर्तींना अटींसह परवानगी, चंद्रपुरात गणेशोत्सवापूर्वी मनपाची मूर्तिकारांसोबत बैठक
अँकर:--- राज्यात गणपती बाप्पाच्या आगमनाची चाहूल लागली आहे. येत्या काही आठवड्यांत घराघरात आणि सार्वजनिक मंडळांमध्ये गणरायाचं स्वागत होणार आहे. याच पार्श्वभूमीवर चंद्रपूर महानगरपालिकेनंही गणेशोत्सवाच्या तयारीला सुरुवात केली आहे. महानगरपालिकेच्या वतीने गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांसोबत आणि मूर्तिकारांसोबत विशेष बैठक घेण्यात आली. या बैठकीत गणेशोत्सव काळात पाळावयाचे नियम, सार्वजनिक सुरक्षेपासून ते पर्यावरण, ध्वनीप्रदूषण आणि वाहतूक व्यवस्थेपर्यंत अनेक बाबींवर चर्चा करण्यात आली. शासन निर्णयानुसार काही अटी व शर्तींसह पीओपी म्हणजेच प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींच्या विक्रीस परवानगी देण्यात आली आहे. मागील काही वर्षांपासून पीओपी मूर्तींवर बंदी होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या अलीकडील निर्णयानुसार पर्यावरणीय अटींचे पालन केल्यास अशा मूर्तींची विक्री शक्य असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. महानगरपालिकेचे आयुक्त विपिन पालीवाल यांनी मूर्ती विक्रेत्यांना सूचना केल्या आहे. दुकानासमोर पीओपी मूर्ती म्हणून बोर्ड असावा या सोबतच पावती देत असताना त्या पावतीवर पीओपी मूर्ती म्हणून नमूद करावे अन्यथा फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची ताकीद दिली आहे.
बाईट १) विपिन पालीवाल,आयुक्त, मनपा चंद्रपूर
आशीष अम्बाडे
झी मीडिया
चंद्रपूर
14
Share
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowJul 12, 2025 11:07:24Amravati, Maharashtra:
Feed slug :- AMT_RANA_VS_THAKARE दोन फाईल आहे
रिपोर्टर :– अनिरुद्ध दवाळे, अमरावती 9503131919
ठाकरे बंधू स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी व हिंदी मराठी मध्ये तेढ निर्माण करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत आहे – नवनीत राणा
अँकर :- ठाकरे बंधू यांनी घेतलेल्या मराठीच्या मुद्द्यावर माजी खासदार नवनीत राणा यांनी जोरदार टीका केली आहे. ठाकरे बंधू स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी व हिंदी मराठी मध्ये तेढ निर्माण करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत आहे असे नवनीत राणा म्हणाल्या आहे. मला शेवटच्या श्वासापर्यंत मराठीचा अभिमान राहील कारण मी या महाराष्ट्रात जन्माला आली. ज्या राज्यात तुम्ही राहतात ती भाषा सगळ्यात पहिली असते माझी जन्मभूमी व कर्मभूमीची भाषा मराठी असल्याने मी तिला समोर ठेवणार आहे. पण ज्या हिंदुस्तानात मी राहते त्या हिंदी भाषेला सुद्धा दुसऱ्या क्रमांकावर ठेवतो व आम्ही त्या भाषेचा सन्मान करतो. पण उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे स्वतःची राजकीय पोळी भाजण्याकरिता देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करतात तर मराठी व हिंदी भाषेत तेढ निर्माण करण्याचं काम करतात त्यांनी हे सांगाव की तुमचे मुलं मराठी शाळेत शिकले की हिंदी भाषेत शिकले असा सवाल भाजप नेत्या माजी खासदार नवनीत राणा यांनी अमरावतीमध्ये आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभामध्ये ठाकरे बंधूंना केला. तर बरेच नेते हे हिंदी आणि मराठी भाषेमध्ये वाद घालून महापालिकेची पोळी शिकण्याचा प्रयत्न करत आहे. असेही नवनीत राणा म्हणाल्या आहे.
साउंड बाईट :- नवनीत राणा, माजी खासदार भाजपा
14
Share
Report
MNMAYUR NIKAM
FollowJul 12, 2025 11:06:59Buldhana, Maharashtra:
पैंनगंगा आदिवासी आश्रम शाळेतील 13 विद्यार्थिनींना विषबाधा...
उपचारानंतर प्रकृतीत सुधारणा
Anchor - बुलढाणा तालुक्यातील येळगाव येथील पैनगंगा आदिवासी आश्रम शाळेतील 13 विद्यार्थिनींना काल रात्री कडी आणि भात खाल्ल्याने विषबाधा झाली, अचानक मुलींना उलट्या व जुलाबाचा त्रास सुरू झाल्याने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर उपचार करून रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे....आणि सर्व विद्यार्थिनींची प्रकृती स्थिर आहे..
13
Share
Report
SKSudarshan Khillare
FollowJul 12, 2025 11:06:53Yeola, Maharashtra:
अँकर:-
येवला तालुक्यातील अंदरसुल येथील नागेश्वर मंदिरातील दानपेटीवर चोरट्यांनी डल्ला मारत अंदाजे चार ते पाच हजाराची रोकड लंपास केल्याची घटना घडली असून ३ चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून गुरुपौर्णिमेनिमित्त भाविकांनी या दानपेटीत दान टाकले होते.तीच संधी साधत चोरट्यांनी दान पेटी फोडली असावी. तीन चोरटे चोरी करत असल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसत असून ह्या चोट्यांचा शोध पोलीस घेत आहे.
14
Share
Report