Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Palghar401404

पालघरच्या रस्त्यावर खड्डे! आमदार गावितांचा धक्कादायक आरोप!

HPHARSHAD PATIL
Jul 25, 2025 04:32:15
Palghar, Maharashtra
पालघर _ मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाच्या व्हाईट टॅपिंगचा मुद्दा पालघर जिल्हा नियोजन समितीमध्ये चांगलाच गाजला. या राष्ट्रीय महामार्गावर तलासरी ते दहिसर दरम्यान वीस हजार मध्ये खड्डे असल्याचं आरोप पालघर आमदार राजेंद्र गावित यांनी केला आहे. शिवाय पालकमंत्री गणेश नाईक यांनीही सदर रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचं मान्य केले आहे.मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर जवळपास सहाशे कोटी अधिक खर्च करून काँक्रिटीकरण करण्यात आलं आहेत. बाईट _ गणेश नाईक पालकमंत्री पालघर.
14
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
SRSHRIKANT RAUT
Jul 26, 2025 03:50:03
Yavatmal, Maharashtra:
Anchor : यवतमाळ जिल्ह्यातील काही भागांमध्ये अति पावसामुळे शेतामध्ये पाणी साचले आहे. विहिरी पूर्णतः भरल्या असून त्यामुळे शेत जमीन चिबडली आहे. या चिबडलेल्या शेत जमिनीतील पिके पिवळी पडायला लागली असून, या ठिकाणी फवारणी करणे आणि जमिनीतील पाण्याचा निचरा करणे देखील अवघड ठरत आहे. परिणामी पिकांची वाढ खुंटण्याची भीती शेतकऱ्यांना आहे.
0
Report
AAABHISHEK ADEPPA
Jul 26, 2025 03:49:26
Solapur, Maharashtra:
सोलापूर ब्रेकिंग - सोलापुरात ए आय तंत्रज्ञानाच्या मदतीने डॉक्टरांनी केली हृदयाची यशस्वी शस्त्रक्रिया - सोलापुरातील एसीएस हॉस्पिटलमध्ये एआय तंत्रज्ञानाच्या मदतीने करण्यात आली हृदयाची शस्त्रक्रिया - पाच डॉक्टरांच्या चमूने ए आय तंत्रज्ञानाचा वापर करत तीन रुग्णांची केली यशस्वी शस्त्रक्रीया - सदरचा शस्त्रक्रियेत आयव्हस, रोटाअब्लेशन बायफरगेशन, अँजीओप्लास्टी, अल्ट्रा लो कॉन्ट्रॅक्ट आदी पद्धतींचा करण्यात आला वापर - तंत्रज्ञानाच्या मदतीमुळे उपचारादरम्यान रुग्णांना देखील कमीत कमी त्रास बाईट - डॉ. सिद्धांत गांधी बाईट - ऑपरेशन झालेले रुग्ण
1
Report
VBVAIBHAV BALKUNDE
Jul 26, 2025 03:48:06
Latur, Maharashtra:
लातूर ... AC ::- सातव्या वेतन आयोगातील वेतन त्रुटी आणि कंत्राटी भरतीच्या, पदनाम बदलाच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेचे राज्यव्यापी कामबंद आंदोलन सुरु केले होते.  जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाहीत, तोपर्यंत माघार नाही असा पवित्रा आरोग्य परिचारिकांनी घेतला होता. परिचारिकांच्या कामबंद आंदोलनाचा परिणाम रुग्ण सेवेवर झाला होता. ५० टक्के शस्त्रक्रिया पूढे ढकलण्यात आल्या होत्या. शिवाय नियमित उपचारासाठी दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्याही कमी करण्यात आली होती. या आंदोलनाची दखल घेवून वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीप यांनी सर्व मागण्या मान्य केल्या. त्यामुळे परिचारिकांचा संप आता मागे घेण्यात आला आहे.
4
Report
HPHARSHAD PATIL
Jul 26, 2025 03:47:52
Palghar, Maharashtra:
पालघर - मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग गुजराती पाट्या लावणाऱ्या हॉटेल व्यवसायिकांना अखेर उशिरा शहाणपण सुचलं आहे . ज्या ठिकाणी गुजराती पाट्या होत्या त्या ठिकाणी पाट्या मराठीत केल्या आहेत . गुजराती भाषेतील पाट्या टाकून त्यावर मराठी पाट्या लावलेल्या दिसत आहेत. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील डहाणूतील चारोटी जवळील काठीयावाडी हॉटेल ने आपल्या पाट्या बदलल्या आहेत.गुजराती पाट्यांच्या बातमीनंतर मनसेने काही ठिकाणी हॉटेल व्यवसायकाना भेटून पाट्या काढण्यासाठी सांगितले होते.
2
Report
PPPRAFULLA PAWAR
Jul 26, 2025 03:47:27
Raigad, Maharashtra:
स्लग - पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ ..... सावित्री कुंडलिका नदीने ओलांडली इशारा पातळी ...... अँकर - रात्रभर कोसळत असलेल्या पावसाने महाड मध्ये पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. आता पावसाचा जोर कमी झाला असला तरी नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. महाडच्या सावित्री नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. तर रोहा शहराजवळून वाहणाऱ्या कुंडलिका नदीचे पाणी इशारा पातळीच्या वर आहे. त्यामुळे प्रशासन सज्ज आहे तसेच नदीकाठच्या गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
0
Report
SNSWATI NAIK
Jul 26, 2025 03:34:58
Navi Mumbai, Maharashtra:
story slug - गुगल मॅपच्या नादात गाडी पडली खाडीत बेलापूर जेट्टीवरील प्रकार : सागरी पोलिसांच्या सतर्कतेमुळे महिलेला जीवदान गुगल मॅप लगाया और गाडी समुद्र मे गिरी पुलीस ने बचाई जान ftp slug - nm googal map car accident shots- reporter - swati naik navi mumbai anchor : गुगल मॅपच्या आधारे उलवेला जाणारी भरधाव कार थेट खाडीत कोसळल्याची घटना मध्यरात्री बेलापूरमध्ये घडली. घटनेवेळी तिथे उपस्थित असलेल्या सागरी सुरक्षा पोलिसांनी वेळीच महिलेचे प्राण वाचवले. शिवाय क्रेनच्या साहाय्याने खाडीत पडलेली कार देखील बाहेर काढण्यात आली. गुगल मॅप लावून धावणाऱ्या वाहनांचे अपघात घडत असल्याचे प्रकार देशभरात घडत आहेत. अशीच घटना नवी मुंबईत देखील गुरुवारी मध्यरात्री (शुक्रवारी पहाटे १ वाजता) घडली आहे. एक महिला त्यांच्या कारने उलवेच्या दिशेने चालली होती. मात्र बेलापूर येथील खाडीपुलावर जाण्याच्या ऐवजी त्यांनी पुलाखालील मार्ग निवडला. यामुळे गुगल मॅपवर दिसत असल्याप्रमाणे तिथे सरळ रस्ता असल्याचे त्यांना वाटले. यामुळे त्यांची कार थेट ध्रुवतारा जेट्टीवर जाऊन खाडीत कोसळली. जेट्टीला सुरक्षा कठडा नसल्याने कार त्याठिकाणी न अडता थेट खाडीत पडली. हा प्रकार जवळच असलेल्या सागरी सुरक्षा पोलिसांच्या निदर्शनात आला. यामुळे सागरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली असता, कारमधील महिला वाहत जात असल्याचे दिसून आले. त्यांना गस्ती व रेस्क्यू बोटीच्या साहाय्याने बाहेर काढून प्राण वाचवण्यात आले. तर खाडीत पडलेली कार क्रेनच्या साहाय्याने बाहेर काढण्यात आली. गुगल मॅपवर रस्ता पाहत जात असताना रस्ता संपून पुढे जेट्टी असल्याचे न कळल्याने हा अपघात घडल्याचे महिलेने पोलिसांना सांगितले. दरम्यान सागरी सुरक्षा पोलिस चौकीच्या समोरच हि दुर्घटना घडल्याने वेळीच महिलेला मदत मिळून त्यांचे प्राण वाचले. gf- व्हेएडिओ आणि फोटो
2
Report
PPPRAFULLA PAWAR
Jul 26, 2025 03:34:34
Raigad, Maharashtra:
स्लग - पुराच्या पाण्यातून धोकादायक प्रवास ....... महाडमध्ये जीव धोक्यात घालून प्रवास ...... अँकर - महाडमध्ये पुरसदृश्य परिस्थिती असून प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. मात्र या परिस्थितीत काही नागरीक आपला जीव धोक्यात घालून पुराच्या पाण्यातुन प्रवास करताना दिसत आहेत. प्रशासनाने बॅरेगेट लावून रस्ता वाहतुकीसाठी बंद केला असला तरी देखील नागरीक पर्यायी मार्गाचा वापर करण्या ऐवजी पुराच्या पाण्यातुन धोकादायक प्रवास करतानाची ही दृष्य चिंता वाढवणारी आहेत
2
Report
SRSHRIKANT RAUT
Jul 26, 2025 03:34:28
Yavatmal, Maharashtra:
Anchor : यवतमाळच्या उमरखेड येथील स्वर्गीय भाऊसाहेब माने कार्बन क्रेडिट बँकेच्या वतीने पाच हजार वृक्ष लागवडीचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. कृषी शास्त्रज्ञ डॉक्टर विजय माने यांच्या संकल्पनेतून चातारी व ब्राह्मणगाव येथील कृषीपुत्रांना व शेतकऱ्यांना 5000 वृक्षांचे वितरण करण्यात आले. नारळ, फणस, केशर, आंबा, जांभूळ आणि विविध प्रजातींची उपयोगी रोपे श्रमदानातून विद्यार्थ्यांनी लागवड केली. या रोपांचे संगोपन करण्याची शपथ देखील त्यांना देण्यात आली आहे.
2
Report
PTPRAVIN TANDEKAR
Jul 26, 2025 03:34:18
Bhandara, Maharashtra:
Pravin Tandekar Gondia Slug - 2607_GON_RED_ALERT FILE - 8 VIDEO हवामान विभागाचा रेड अलर्ट गोंदिया जिल्ह्यात दमदार पाऊसाची हजेरी बळीराजा सुखवाला शेती कामाना आले वेग Anchor :- हवामान विभागाने दर्शविलेल्या अंदाजा नुसार गोंदिया जिल्ह्यात काल रात्री पासून पाऊसाने दमदार हजेरी लावल्याने शेती कामाना वेग आले असून बळीराजा सुखवाला आहे. तर दुसरीकडे गोंदिया जिल्ह्याच्या सर्वच तालुक्यात पडत असलेल्या पाऊसामुळे ग्रामीण भागातील अनेक छोट्या नदी, नाले ओसंडून वाहत आहेत. ठीक ठीक सखोल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. हवामान विभागाने दर्शविलेल्या अंदाजानुसार अशाच पाऊस काही तास बरसला तर पूर परिस्थिती उद्भवेल. दुसरीकडे गोंदिया जिल्ह्यातील पुजारीटोला,शिरपूर आणी कालीसराळ धरण हे देखिल 60% च्या वर भरले असून धरण पातळी सुनिश्चित ठेवण्यासाठी पाटबंधारे विभागाने धरणी काही दारे 0.5 मिटरने उघडली असून नदी काठी असलेल्या गावकर्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे
1
Report
HCHEMANT CHAPUDE
Jul 26, 2025 03:34:10
Junnar, Maharashtra:
Feed 2C Slug: Junnar Mla Takrar File:02 Rep: Hemant Chapude(Junnar) Anc :- जुन्नरचे अपक्ष आमदार शरद सोनवणे यांना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नोटीस बजावली असुन नोटीस मिळाली खिशात ठेवली त्याचे काहीच होणार नसल्याचा दावा शरद सोनवनेंनी केलाय जुन्नर अपक्ष आमदार शरद सोनवने यांनी शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश करून पक्षांतरबंदी कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप करत अ‍ॅड. विजय कुऱ्हाडे यांनी दिलेल्या तक्रारीनंतर ही नोटीस देण्यात आली आहे. सचिवालयाकडून पाठवलेल्या नोटीसीला सात दिवसांत उत्तर देण्याचे आदेश सोनवणे यांना मिळाले आहेत. या प्रकरणात आमदारपद धोक्यात येऊ शकते मात्र मी युती सरकारचा संयोगी सदस्य असुन युती सरकारला पाठींबा दिलाय या प्रकरणी नोटीस मिळाले ते खिशात ठेवलेय त्याचे पाच वर्ष काहीही होणार नाही असं म्हणत विधानसभा अध्यक्षांच्या नोटीसावर भाष्य केलय... Byte :- शरद सोनवणे - अपक्ष आमदार (शिंदे गटात प्रवेश) प्रतिनिधी हेमंत चापुडे झी मिडीया जुन्नर पुणे...
1
Report
NMNITESH MAHAJAN
Jul 26, 2025 03:32:29
Jalna, Maharashtra:
FEED NAME | 2607ZT_JALNA_BRIDGE(2 FILES) जालना : पुराच्या पाण्यामुळे देवठाणा गावाजवळील पूल गेला वाहून,ग्रामस्थांमध्ये संताप अँकर :जालन्यातील मंठा तालुक्यातील देवठाणा गावाजवळील पुल मुसळधार पावसात वाहून गेला आहे.या घटनेमुळे कानडी गावाचा संपर्क तुटलाय. पूल वाहून गेल्यानं गावकऱ्यांनी पुलांचं काम निकृष्ठ दर्जाचं झाल्याचा आरोप केलाय.चार दिवसांपासून या भागात पावसानं दमदार हजेरी लावल्यानं नदीला आलेल्या पुरामुळे हा पूल वाहून गेलाय परिणामी नागरिकांमध्ये संताप पाहायला मिळतोय.
3
Report
SMSATISH MOHITE
Jul 26, 2025 03:32:22
Nanded, Maharashtra:
Satish Mohite Slug - Ned_Flood Feed on - 2C ---------------------------- Anchor - छोट्या पुलावरून वाहणाऱ्या पुराच्या पाण्यातून दुचाकी नेण्याच्या प्रयत्नात दुचाकिसह युवक वाहून गेला. सुदैवाने युवकाने एका झाडाला पकडल्याने त्याचे प्राण वाचले. पूर ओसरल्यावर त्याची दुचाकी गावाक-र्यांनी शोधून काढली. नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील ही घटना आहे. अप्पाराव पेठ परिसरात काल मुसळधार पाऊस झाला होता. गोंडजेवली गावाजवळील पुलावरून पुराचे पाणी वाहत होते. या पुरातून दुचाकी नेण्याचा प्रयत्न एका युवकाने केला. पाण्याच्या प्रवाहामुळे युवक दुचाकीसह वाहून गेला. सुदैवाने एका झाडाच्या फांदीला पकडल्याने युवक बचावला पण दुचाकी वाहून गेली. त्याची दुचाकी आज गावाकऱ्यांनी शोधून काढली. -----------------------
2
Report
AAABHISHEK ADEPPA
Jul 26, 2025 03:31:06
Solapur, Maharashtra:
सोलापूर ब्रेकिंग - दक्षिण सोलापूर तालुक्यात शेतात येत जात नसल्याच्या कारणावरून डोक्यात फरशी घालून नवऱ्याने केला पत्नीचा खून - सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यात नवऱ्याने केला पत्नीचा खून - हातुर गावातील आनंद तांडा च्या परिसरात घडली घटना - शेतात पत्नी येत जात नाही याचा राग मनात धरून फरशी डोक्यात घालून करण्यात आली हत्या - गौराबाई पाटील असे मृत महिलेचे नाव - यासंदर्भात विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत
4
Report
SMSATISH MOHITE
Jul 26, 2025 03:30:55
Nanded, Maharashtra:
Satish Mohite Slug - Ned_Dam_Drone Feed on - 2C --------------------------- Anchor - नांदेड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गोदावरी नदीवरील काळेश्वर उपास जलसिंचन प्रकल्पाच्या पाणीसाठ्यात वाढ झाल्याने नांदेडकरांच्या पिण्याच्या पाण्याची चिंता मिटलीये. चार दिवसांपूर्वी या प्रकल्पामध्ये केवळ 18 टक्के पाणीसाठा होता. पण दोन दिवसात प्रकल्पाच्या वरच्या बाजूला चांगला पाऊस झाल्याने प्रकल्प 87 टक्के भरला आहे. याच प्रकल्पाशेजारी महादेवाचे पुरातन काळेश्वर मंदिर आहे. आणि नव्यानेच जळवळच नांदेड जिल्ह्यातील पहिल्या केबल ब्रिजचे काम करण्यात आले आहे. त्यामुळे ड्रोन कॅमेऱ्याच्या नजरेतून गोदावरी नदी आणि विष्णुपुरी प्रकल्पाचे, सोबतच काळेश्वर मंदिर आणि केबल ब्रिजचे विहंगम दृश्य अत्यंत मनमोहक दिसत आहे. श्रावण महिन्यात इथला परिसराने हिरवगार शालू पांघरलाय. त्यामुळे हे दृश्य पाहून आपसूचकच ओठांवर श्रावण मानसी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहीकडे या कवितेच्या ओळी येतात. ---------------
0
Report
NMNITESH MAHAJAN
Jul 26, 2025 03:30:08
Jalna, Maharashtra:
FEED NAME | 2607ZT_JALNA_ORANGE_ALRT(5 FILES) जालना : जिल्ह्यात आज ऑरेंज अँलर्ट अँकर : जालना जिल्ह्यात हवामान विभागाने ऑरेंज अँलर्ट जारी केला आहे.काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.आतापर्यंत जालना,बदनापूर आणि जाफ्राबाद या तीन तालुक्यांनी अपेक्षीत सरासरी ओलांडली आहे.त्यामुळे खबरदारी घेण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे.
0
Report
Advertisement
Back to top