Back
श्रावण सोमवारी औंढा नागनाथ मंदिरात भाविकांची धूम, गर्दीने गजबजले!
GDGAJANAN DESHMUKH
Aug 11, 2025 01:00:28
Parbhani, Maharashtra
अँकर - देशातील 12 ज्योतिर्लिंगापैकी आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या हिंगोलीच्या औंढा नागनाथ मंदिरात श्रावण महिन्यातील तिसऱ्या श्रावण सोमवारी भाविकांची दर्शनासाठी अलोट गर्दी झालीय. रविवारी मध्यरात्रीपासूनच भाविक येथे दाखल होऊ लागले होते. शासकीय पूजेनंतर मध्यरात्री 2 वाजता पासून मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले. बम बम भोले,श्री नागनाथ महाराज की जयच्या घोषणांनी मंदिर परिसर दणाणून गेलाय. श्रावण मासातील प्रत्येक सोमवारी औंढा नागनाथाला कडधण्याची शिवामूठ वाहिली जाते,आज तिसऱ्या सोमवारी मुगाची शिवामूठ वाहिली जाणार आहे. येथील मंदिरात श्रावण मासानिमित्ताने दुरून दुरून अनेक कावड यात्रा दाखल होत असतात हजारो भाविक अनवाणी पायाने दर्शनासाठी मंदिरात दाखल होत असतात. भाविकांच दर्शन लवकरात लवकर व्हावं यासाठी मंदिर प्रशासनाच्या वतीने उपाययोजना करण्यात आल्या आहेत. औंढा पोलिसांनी मंदिरात उत्तम बंदोबस्त लावलाय...
बाईट- पद्माक्ष पाठक पुजारी
बाईट- महानंदा जगताप -भाविक
बाईट- द्वारकाबाई जाधव - भाविक
14
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PNPratap Naik1
FollowAug 11, 2025 03:34:20Kolhapur, Maharashtra:
Kop Mahalaxmi Murti Savardhan
Feed :- Live U
Anc :- साडेतीन शक्तीपीठा पैकी महत्त्वाचे पीठ असणाऱ्या करवीर निवासिनी अंबाबाई देवीच्या मूर्तीवर आज आणि उद्या रासायनिक संवर्धन प्रक्रिया राबवली जाणार आहे. मूर्तीच्या अनेक भागांमध्ये झिज झाल्याने संवर्धन प्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. काही दिवसापूर्वी भारतीय पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी अंबाबाई देवीच्या मूर्तीचे परीक्षण केले होते, त्यामध्ये देवीचे नाक, होट, हनुवटी आणि इतर भाग जिझ झाल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर भारतीय पुरातत्व विभागाने आज आणि उद्या तातडीने संवर्धन प्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार विशेष संवर्धन तज्ञाकडून आजपासून दोन दिवस मूर्तीवर संवर्धन प्रक्रिया राबवून मूर्तीचे संवर्धन केले जाणार आहे. पुरातत्व विभागाने यापूर्वीच संवर्धन प्रक्रिया दर दोन वर्षांनी राबवणं आवश्यक असल्याचे निरीक्षण नोंदवले होते त्याप्रमाणे ही संवर्धन प्रक्रिया राबवली जात आहे. दरम्यान ही संवर्धन प्रक्रिया होणार असल्याने देवीच्या मुख्यमूर्तीचे दर्शन भक्तांना होणार नाही, त्यामुळे देवस्थान समितीने उत्सव मूर्ती भक्तांच्या दर्शनासाठी ठेवणार आहे.. अवघ्या काही वेळेतच हि संवर्धन प्रक्रिया होणार असल्याने अनेक भक्तांनी सकाळीच अंबाबाई देवीच्या मुख्य मूर्तीचे दर्शन घेतले.
0
Report
VKVISHAL KAROLE
FollowAug 11, 2025 03:34:15Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:
csn high court av
feed attached
ANCHOR : निवडणुकीत बनावट मतदारांच्या मुद्यावरून काँग्रेस आक्रमक झाली असतानाच, बीड जिल्ह्यातील आष्टी नगर पंचायत निवडणुकीत आढळून आलेल्या बोगस मतदारांवरून औरंगाबाद खंडपीठाने बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना १४ ऑगस्टपर्यंत शपथपत्र दाखल करण्याचे निर्देश दिले आहे. आष्टी येथे १ नोव्हेंबर २०२३ च्या प्रारूप यादीमध्ये जवळपास ५५० मतदारांची नावे बनावट असल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते राम सूर्यभान खाडे, नदीम शेख व इतरांनी केल्या होत्या. त्यानुसार चौकशी झाली आणि बनावट मतदार असल्याचा अहवाल शासकीय पातळीवर तयार करण्यात आला. पण कोणतेही फौजदारी कारवाई झाली नसल्याने औरंगाबाद खंडपीठात फौजदारी याचिका दाखल करण्यात आलेली आहे. यावर झालेल्या सुनावणीवेळी १४ ऑगस्टपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांनी शपथपत्र दाखल केले नाही तर शासनाचे काही म्हणणे नाही, असे गृहीत धरून पुढील निर्णय घेण्यात येईल, असे निर्देश खंडपीठाने दिले आहेत. तर पुढील सुनावणी २६ ऑगस्ट रोजी ठेवली आहे.
0
Report
VKVISHAL KAROLE
FollowAug 11, 2025 03:34:02Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:
Csn water issue av
Feed attached
पावसाळ्याचे सव्वादोन महिने उलटले आहेत. या कालावधीत मराठवाड्यातील मोठ्या प्रकल्पांत आज सरासरी ८० टक्के पाणीसाठा आहे. असे असले, तरी अपेक्षित मुसळधार पाऊस न पडल्याने विभागातील मध्यम आणि लघु प्रकल्पांत केवळ ४० टक्केच जलसाठा जमा झालेला आहे. मराठवाड्यात जायकवाडीसह ११ मोठे प्रकल्प आहेत. माजलगाव वगळता उर्वरित सर्वच प्रकल्पांत सरासरी ८० टक्के जलसाठा असल्याची माहिती जलसंपदा विभागाने दिली. मोठ्या प्रकल्पांत पुरेसा जलसाठा असला तरी मध्यम आणि लघु प्रकल्पांत मात्र अत्यल्प पाणी आहे. या प्रकल्पांवरच गावखेड्यांची तहान भागविण्यात येते. तसेच पशू, पक्ष्यांच्या चाऱ्या, पाण्याची सोय होत असते. यामुळे लघु आणि मध्यम भरावे ही अपेक्षा असते..
जालन्यातील ७ प्रकल्पांत २६ टक्के जलसाठा जमा आहे. बीड जिल्ह्यातील १६ धरणांत ६१ टक्के आणि लातूर जिल्ह्यातील ८ धरणांत १९ टक्के आणि धाराशिवमधील १७ प्रकल्पांत ५५ टक्के पाणी आहे. नांदेड जिल्ह्यात ९ मध्यम प्रकारची धरणे आहेत. यात आज ४५ टक्के पाणी जमा आहे. परभणी जिल्ह्यातील २ प्रकल्पांत ५४ टक्के जलसाठा आहे , छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये 61 टक्के तर हिंगोलीत अवघा अठरा टक्के पाणीसाठा आहे...
0
Report
JJJAYESH JAGAD
FollowAug 11, 2025 03:32:09Akola, Maharashtra:
Anchor : अकोला जिल्ह्यातील गावंडगाव येथे एका २१ वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडलीय..दारूच्या नशेत या युवकाने आत्महत्या केल्याचा आरोप गावकऱ्यांनी केलाय..
Vo 1 : पातूर तालुक्यातील
गावंडगावात येथे एका २१ वर्षीय तरुणाने दारूच्या नशेत गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा आरोप करीत गावात तीव्र संतापाची लाट उसळली आहेय.. गावकरी, विशेषत: महिलांचा आरोप आहे की पोलिसांच्या छत्रछायेखाली अवैध दारू विक्री उघडपणे सुरू आहेय..गावात सहज दारू मिळते, आणि तक्रार करणाऱ्यांची नावेच विक्रेत्यांना सांगून त्यांना धमक्या व शिवीगाळ दिली जाते असा आरोप गावकऱ्यांनी केलाय..रुपेश ज्ञानदेव राठोडने (२१, रा. गावंडगाव, ता. पातूर, जि. अकोला) गावाच्या शेवटी असलेल्या घराजवळ साडीच्या दोऱ्याने लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली..या युवकाच्या आत्महत्येनंतर पोलिस आणि दारू विक्रेतांवर गावकऱ्यांनी संताप व्यक्त केलाय..
Byte : इंदुबाई जाधव , अंगणवाडी सेविका.
Byte : संतोष हिरामण राठोड , तंटामुक्ती अध्यक्ष
Vo 2 : ग्रामपंचायत सदस्य, सरपंच आणि गावकऱ्यांनी अनेकदा पोलिसांकडे अवैध दारू बंद करण्यासाठी तक्रार केली मात्र दारूचा धंदा बंद झालाच नसल्याचं गावकऱ्यांच म्हणणं आहेय..मात्र पोलिसांनी ही आत्महत्या कर्जबाजारी आणि नैराश्यातून झाली असल्याचं म्हंटलंय..तर अवैध दारू विरुद्ध वेळोवेळी पोलिस कारवाई करत असल्याचंही पोलिसांच म्हणणं आहेय..
Byte : रवींद्र लांडे , चान्नी पोलीस
ठाणेदार..
Final Vo : अकोला जिल्हा पोलीस अधीक्षकांनी ‘मिशन उडान’ अंतर्गत व्यसनमुक्तीसाठी कारवाई सुरू आहेय , तरीमात्र या गावकऱ्यांच्या मते ग्रामीण भागात त्याचा कोणताही परिणाम दिसून येत नाही..या उलट ठाणेदारच या मिशनला सुरुंग लावत असल्याचा आरोप आता गावकरी करत आहेय..त्यामुळे पोलिस अधीक्षकांचा ' मिशन उडान ' ग्रामीण भागात ' उडान ' भरणार का हे पाहणे आता महत्वाचे राहणार आहेय.
जयेश जगड,
झी मीडिया,
अकोला
0
Report
AKAMAR KANE
FollowAug 11, 2025 03:18:03kolhapur, Maharashtra:
2c ला व्हिडिओ जोडला आहे
-===
नागपूर
* बाईकवर मृतदेह घेऊन जातानाच व्हायरल व्हिडीओ*
- अपघातात मरण पावलेल्या पत्नीचा मृतदेह दुचाकीवर बांधून नेतानाचा व्हिडीओ व्हायरल... मदत मागूनही मदत न मिळाल्याने हतबल पतीने मृतदेह दुचाकीवरून नेण्याचा घेतला निर्णय..
- माणुसकीला लाज आणणारा प्रकार नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गावर घडली...
- ग्यारसी अमित यादव अस मृतक महिलेचे नाव तर, अमित यादव पतीचे नाव आहे,
- देवलापार पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मोरफाटा परिसरात दुपारी साडे तीन वाजताच्या सुमारास मागून वेगात आलेल्या ट्रकने कट लागल्याने पत्नी पडून ट्रकच्या चाकाखाली आली. यात पत्नीचा मृत्यू झाला.
- भरधाव ट्रकच्या धडकेत पत्नीचा मृत्यू झाला, कोणीही वाहन थांबवायाला तयार नव्हत....माणुसकी दाखवायला तयार नाही...
- यावेळी हतबल पती अमित यादवने डोळ्यांतून अश्रू पुसत हात जोडून वाहनांना थांबविण्याचा प्रयत्न केला...
- शेवट पत्नीचा मृतदेह स्वतःच्या दुचाकीला बांधला आणि घरी मध्यप्रदेशला घेऊन जाण्याचा निर्णय घेतला.
- पती पत्नी हे माध्यप्रदेशच्या सिवनी, येथील रहिवासी आहे. ते मागील १० वर्षापासून पती अमित भुरा यादव (३५) याच्यासोबत कोराडी नजीकच्या लोणारा येथे राहत होते..,
- रक्षाबंधन असल्याने अमित मोटारसायकलने लोणारा येथून देवलापारमार्गे करणपूरला जात होता..
- सुरुवातीला मदतीची याचना करत कोणतही वाहन थांबले नाही, मात्र मृतदेह घेऊन जाताना अनेकांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला, नंतर मात्र भीतीने तो थांबायला तयार नव्हता...
- महामार्ग पोलिसानी त्याला अडवून ग्यारसीचा मृतदेह ताब्यात घेत उत्तरीय तपासणीसाठी नागपुरातील मेयो हॉस्पिटलमध्ये पाठविला.
-
4
Report
VKVISHAL KAROLE
FollowAug 11, 2025 03:17:50Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:
Csn new railway av
Feed attached
छत्रपती संभाजीनगर शहरासाठी आगामी ३ महिन्यांत मुंबईसाठी नवीन वंदे भारत एक्स्प्रेस सुरू होणार आहे. ही वंदे भारत एक्स्प्रेस सुरू होण्यासाठी स्टेशनवर पीटलाइन आणि सिकलाइनचे काम पूर्ण केले जाईल. सध्याची पीटलाइन १६ बोर्गीची आहे. त्यामुळे वंदे भारत एक्स्प्रेस १६ बोंगीची राहील. त्याबरोबरच स्टेशनवर नवीन २४ बोगींची पीटलाइनदेखील प्रस्तावित आहे, अशी माहिती रेल्वे प्रशासनसह खासदार डॉ भागवत कराड यांनी जाहीर केलीय.. सध्याच्या जालना-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसचा नांदेडपर्यंत विस्तार करण्यात येत आहे. त्यामुळे शहरातून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांना गैरसोयीला सामोरे जावे लागणार आहे. ही बाब लक्षात घेऊन केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे शहरातून मुंबईसाठी नवीन वंदे भारत एक्स्प्रेसची मागणी केली. त्यांनी आगामी ३ महिन्यांत ही रेल्वे सुरू करण्याचे आश्वासन दिले असल्याचे कराड यांनी सांगितले...
8
Report
PNPratap Naik1
FollowAug 11, 2025 03:16:35Kolhapur, Maharashtra:
Kop Matruling Darshan
Feed Live U
Anc :- श्रावणानिमित्त महाराष्ट्रातील ठीक ठिकाणच्या शिव मंदिराचे दर्शन आम्ही तुम्हाला घडवत आहोत. असंच दर्शन कोल्हापुरातील करवीर निवासिनी अंबाबाई देवीच्या गाभाऱ्याच्या वरती दुसऱ्या मजल्यावर असणाऱ्या मातृ लिंगचे दर्शन आज घडवत आहोत. हे मातृलिंग वर्षातून चार वेळाच भक्तांच्या दर्शनासाठी खुले केले जाते. त्यामुळे आज श्रावणानिमित्त मातृलिंगाचे दर्शन घेण्यासाठी भक्तांनी मोठी गर्दी केली आहे. मातृ लिंग म्हणजे शिवशक्तीचे प्रतीक मानले जातंय.
6
Report
SRSHRIKANT RAUT
FollowAug 11, 2025 03:16:30Yavatmal, Maharashtra:
AVB
Anchor : यवतमाळच्या अर्जुना गावात अवैध देशी दारूसह, गावठी दारू विक्री मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने त्रस्त महिलांनी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर धडक दिली. अवैध दारूविक्रीमुळे गावातील सामाजिक स्वास्थ बिघडले आहे, तरुण पिढी व्यसनाच्या आहारी गेली आहे, अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहे. लहान मुलांवर त्याचा विपरीत परिणाम होत आहे. महिला, मुली व व्यावसायिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे महिलांनी एकत्र येत अनेक वेळा प्रशासनाला निवदने दिली. मात्र त्याकडे दुर्लक्ष झाल्याने इतर अवैध व्यवसाय सर्रास सुरू झाले. अवैध दारू विक्री, जुगार, मटका, असे विविध अवैध व्यवसाय तत्काळ बंद करण्यात यावे अन्यथा
तीव्र आंदोलन केल्या जाईल असा इशारा महिलांनी दिला.
बाईट : सरपंच
4
Report
VKVISHAL KAROLE
FollowAug 11, 2025 03:16:21Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:
Csn mped av
Photo attached
ANC : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील सराईत गुन्हेगारावर छत्रपती संभाजीनगरचे पोलीस अधीक्षकानी कारवाई केलीय, गणेश शिंदे या आरोपीला एक वर्षासाठी हर्सूल कारागृहात स्थानबद्ध करण्याचे आदेश काढले आहेत, त्याच्यावर जबरी चोरी, बलात्कार, विनयभंग, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे आणि इतर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गुन्हेगारीला लगाम घालण्यासाठी ही कारवाई केल्याचं पोलिसांचे म्हणणे आहे...
5
Report
YKYOGESH KHARE
FollowAug 11, 2025 03:03:17Nashik, Maharashtra:
nsk_feriwkt
feed by live u 51 श्रावण सोमवार या सलग ने आलेले फीड यात टाकावे
anchor नाशिक जिल्ह्यात तिसऱ्या श्रावणी सोमवार निमित्ताने त्रंबकेश्वरमध्ये आज शिवभक्तांचा प्रदक्षिणावार सुरू आहे बस स्थानकावरून जाणाऱ्या या भाविकांचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांनी
5
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowAug 11, 2025 03:03:03Solapur, Maharashtra:
सोलापूर ब्रेकिंग - सोलापूर जिल्ह्यात ऑगस्ट महिन्याचा पहिल्या आठवड्यात तब्बल 63 मिमी पावसाची नोंद
Anc : सोलापूर जिल्ह्यात जून-जुलै महिन्याचा सरासरी पाऊस 197 मि.मी. असताना अवघा 149 मि.मी. तर ऑगस्ट महिन्यात मात्र नऊ दिवसांत तब्बल 63 मि.मी. म्हणजे 58 टक्के इतका पाऊस पडला आहे. सुरुवातीच्या दोन महिन्यांत पावसाने ओढ दिली असली तरी ऑगस्ट महिन्यात मात्र मागची भर भरुन निघेल इतका पाऊस आठवड्यात पडला आहे. यंदा पावसाळ्याचे चित्र बदलून गेले आहे. मे महिन्यात कोसळधारा कोसळल्या. जून आणि जुलै महिन्यात मात्र पावसाने चांगलीच ओढ दिली. मे महिन्यात 233 मि.मी. इतका पाऊस पडला होता. जून-जुलै महिन्यात सरासरी एकूण 197 मि.मी. पाऊस पडणे अपेक्षित असताना 149 मि.मी. इतकाच म्हणजे दोन महिन्यांच्या सरासरीच्या 75 टक्के इतकाच पाऊस पडला.
9
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowAug 11, 2025 03:02:56Shirur, Maharashtra:
Feed 2C
Slug: Bhimashankar Crowd
File:02
Rep: Hemant Chapude(Bhimashankar)
Anc: बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या ज्योतिर्लिंग भीमाशंकर येथे आज पहाटेची महापूजा झाल्यानंतर मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले असून देशाच्या कानाकडून लाखोंच्या संख्येने भावी भक्तांनी ज्योतिर्लिंग भीमाशंकराच्या दर्शनासाठी गर्दी केलीय, बम बम भोले च्या जय घोषाने मंदिर दुमदूमून गेलाय यावेळी भाविकांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी...
Wkt+121: प्रतिनिधी हेमंत चापुडे To भाविक
प्रतिनिधी हेमंत चापुडे
झी मिडीया भिमाशंकर पुणे
7
Report
VKVISHAL KAROLE
FollowAug 11, 2025 03:02:46Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:
Csn shirsath avb
Byte attched use file shots
संजय शिरसाट यांनी पुन्हा एकदा माध्यमांबाबत नाराजी व्यक्त केली, आता काय पाहायचं राहिले. माझ्या घरातील बॅगही पहिली..आपला बाप ही झाला, अशी वक्तव्य केली, संजय सिरसाट संभाजीनगर मधील बंजारा समाजातील एका कार्यक्रमात बोलत होते..
आजकाल आम्ही काही बोलल की त्याच्या बातम्या होतात.चॅनल वाले असे उभा आहेत की संजय सिरसाट यांच्या तोंडातून एखाद वाक्य निघू द्या झाले ना यार आता सगळे वाक्य आपल्या बापाच काय जात झालं आता बॅगही पहिली.. आत आणखी काय पहायचे आहे.काहीही करू शकतात चांगले काम तुमच्या समोर येणार नाहीत असे शिरसाठ म्हणाले...
बाईट : संजय शिरसाठ , पालकमंत्री छत्रपती संभाजीनगर
9
Report
VKVISHAL KAROLE
FollowAug 11, 2025 03:02:38Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:
Csn bjp mla avb
Feed attached
निवडणूक मध्ये 160 आमदार निवडून देण्याच वक्तव्य प्रकरणी शरद पवार यांची चौकशी करा अशी मागणी भाजप आमदार प्रशांत बंब यांनी केलीय,
60 वर्ष राजकारण करणाऱ्या पवार यांना लोक आठवत नाहीत हे अकलणीय आहे, अनके वर्षानंतर गावात गेल्यावर लोकांना नावानिशी ओळखणाऱ्या पवारांना ही दोन नाव आठवत नाहीत, हे दोन लोक देशद्रोही आहेत.माझा विश्वास नाही की त्यांना त्याचे नाव आणि पत्ता पवारांना आठवत नाहीत, असे बंब म्हणाले,
लोकसभेत असाच प्रकार तर नसेल केला, आता सौदा नसेल जमला म्हणून त्यांनी त्याच वक्तव्य केलं,
राहुल गांधी , शरद पवार याना भेटण्यासाठी आलेल्या लोकांची नोंद होते, मग ती 2 नावे पण असतील असे बंब म्हणाले याबाबत निवडणूक आयोगाने सुमोटो दखल घेऊन चौकशी करावी, वरिष्ठ पातळीवर चौकशी करावी अशी मागणी भाजप आमदार प्रशांत बंब यांनी केलीय...
Byte प्रशांत बंब
6
Report
SKSudarshan Khillare
FollowAug 11, 2025 03:00:30Chandwad, Maharashtra:
अँकर:-
नाशिकच्या चांदवड तालुक्यातील सोग्रस फाटा येथे गेल्या आठवड्यातील शुक्रवारी संध्याकाळच्या सुमारास टाटा कंपनीचा छोटा हत्ती वाहनाने भरधाव वेगाने शालेय विद्यार्थ्यांना धडक दिली यात दहावीत शिकणारा अक्षय महाले याचा दुर्दैवी मृत्यू झाला कठोर कारवाईसाठी नातेवाईक आणि ग्रामस्थांनी थेट मुंबई-आग्रा महामार्ग तब्बल साडेतीन तास आडवत मागणी केली होती मयत मुलाच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून याप्रकरणी वडनेर भैरव पोलीस ठाण्यात वाहन चालक मनोज रघुनाथ पवार यांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
6
Report