Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Sindhudurg416812

2014 में राज ठाकरे पर नितेश राणे का धमाकेदार बयान

UPUmesh Parab
Sept 17, 2025 12:36:35
Oros, Maharashtra
मंत्री नितेश राणे byte --- on राज ठाकरे --- 2014. पूर्वीची पाकिस्थान बाबतची आपल्या देशाची परिस्थिती त्यानंतर मोदी सरकारने घेतलेले असंख्य निर्णय तेव्हा आपल्या देशाकडे वाकड्या नजरेने बघायची कोणाची हिम्मत झाली नाही. आपल्या देशातील नक्षलवादी कारवाया शून्यावर गेलेल्या आहेत. आपल्या देशाकडे कोण वाकड्या नजरेने बघत नाही असा धाक नरेंद्र मोदींच्या सरकारच्या माध्यमातून निर्माण झालेले आहे. काही लोकांना नरेंद्र मोदींच काम आवडत कधी आवडत नाही उद्या नक्की आवडेल त्या आवडलेल्या ट्विट साठी थांबा on सामना --- सामना कोण नेमक वाचत त्याची कोण दखल घेत, सामनामध्ये येणाऱ्या बातम्या किंवा अग्रलेख याला समाजामध्ये काही वजन नसल्यामुळे त्याची दखल आम्ही घेत नाही. On मीना ताई ठाकरे --- अशा घटना आपल्या राज्यात होताच कामा नये अशा भूमिकेचा मी आहे. मीना ताई ठाकरे केवळ बाळासाहेबांच्या पत्नी नाही तर सर्वांच्या मा समान होत्या. त्यांना वेगळा एक सन्मान होता केवळ शिवसैनिक नाही तर राज्यातील प्रत्येक नागरिक त्यांना सन्मान देत होते. अशा महान लोकांकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांना कठोर शिक्षा दिली पाहिजे. पुन्हा असं करण्याची त्यांची हिंमत झाली नाही पाहिजे असं करताना त्यांचे हात कापले पाहिजेत. बाळासाहेबांच्या घरातील कुठल्याही व्यक्तीबाबत असं होत असेल तर त्याला शिक्षा दिली जाईल.. Byte -- नितेश राणे, मंत्री
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
SGSagar Gaikwad
Sept 17, 2025 13:00:43
Nashik, Maharashtra:Feed send by 2c Reporter-sagar gaikwad Slug-nsk_chain_snatching_pkg अँकर - नाशिकमध्ये सध्या गुन्हेगारीने चांगलंच डोकं वर काढल्याच बघायला मिळत असताना अशातच शेअरमार्केटमध्ये तोटा झाल्याने तसेच गर्लफ्रेंडला पैशांची गरज असल्याने दोन उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलांनी चक्क एका वृद्ध महिलेची सोनसाखळी चोरल्याचं पोलीस तपासात समोर आलय. गेल्या काही महिन्यांपासून अल्पवयीन गुन्हेगार आणि युवकांच्या गुन्हेगारांचे प्रमाण वाढताना दिसत आहे.... Vio/01 - (महिलेची सोनसाखळी चोरतांनाचे CCTV..).. नाशिकच्या रामवाडी या गजबजलेल्या परिसरात 11 सप्टेंबरला दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास दोन चोरट्यांनी नंदिनी नायक या 65 वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून त्यांच्या गळ्यातील अडीच तोळ्याची सोनसाखळी लंपास केली होती. हा सर्व थरार सिसीटिव्ही कॅमेरात कैद झाला होता.. श्रद्धा पार्क या अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या नंदिनी नायक या 65 वर्षीय महिला बाजारातून काही वस्तूंची खरेदी करत घराकडे निघाल्या, घराच्या दरवाजाचे लॉक उघडत असतांनाच चेहऱ्याला मास्क लावलेले दोन चोर त्यांच्या मागोमाग पायऱ्या चढत आले, काकू काकू म्हणत पत्ता विचारण्याचा त्यांनी बहाणा केला. त्यानंतर प्यायला पाणी मागताच काकुंनी घरातून पाणी आणले आणि काही सेकंदातच चोरांनी आजूबाजूच्या परिस्थितीचा अंदाज घेतला आणि काकूंचे तोंड दाबत त्यांचे अडीच तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र खेचले.. चोराचा टी शर्ट पकडत काकूंनी जोरदार प्रतिकार केला, आरडाओरड केली मात्र चोरटे पळून जाण्यात झाले यशस्वी झाले होते.. यानंतर या महिलेने परिसरात आरडाओरड सुरू केली आणि हा प्रकार समोर आला.... बाईट- नंदिनी नायक, तक्रारदार Vio/02 या घटनेनंतर घाबरलेल्या अवस्थेत असलेल्या नायक यांनी तात्काळ पंचवटी पोलीसांशी संपर्क साधला. पोलीस घटनास्थळी दाखल झाले, काकूंना त्यांनी धीर दिला आणि गुन्हा दाखल करत चोरांच्या शोधासाठी पथके रवाना केली होती. दरम्यान मंगळवारी सकाळी उपनगर परिसरात सीसीटीव्हीत दिसणाऱ्या चोरांच्या शरीरयष्टीशी मिळते जुळते दोन युवक गुन्हे शाखा एकच्या पथकाला दिसून येताच त्यांची पोलीसांनी चौकशी केली आणि त्यांनी वृद्ध महिलेच्या सोनसाखळी चोरीची कबुली दिली. प्रथमेश उशीर आणि जोएल म्हस्के अशी या आरोपींची नावे असून प्रथमेशचं वय 22 तर जोएलचे वय 19 वर्ष आहे. या दोघांपैकी एक जण हा इंजीनियरिंग शिक्षण घेत असून तर दुसरा मुंबईत एस वाय बी ए चे शिक्षण घेत होता... शेअर ट्रेडिंगमध्ये तोटा झाल्याने तसेच    गर्लफ्रेंडला पैसे द्यायचे म्हणून त्यांनी हा सगळा प्लॅन रचल्याचं पोलीस तपासात समोर आलय.. बाईट - चंद्रकांत खांडवी, पोलीस उपायुक्त Vio/03 नाशिकमध्ये सध्या गुन्हेगारीने चांगलंच डोकं वर काढलंय. खून, जीवघेणे हल्ले, लूटमार, चोरी अशा घटनांमध्ये मोठी वाढ होताना पहिला मिळत आहे... विशेष म्हणजे गुन्हेगारीमध्ये 15 ते 25 वयोगटातील मुलांचा वाढता सहभाग बघायला मिळत असून यामागे रिल्स, सोशल मिडीया, शेअर मार्केट, व्यसन अशी अनेक कारणे दिसून येत आहे.... या कारणांकडे जर लक्ष दिलं तर अल्पवयीन मुलांसह युवकांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना पाहायला मिळते...
0
comment0
Report
SMSATISH MOHITE
Sept 17, 2025 12:50:29
Nanded, Maharashtra:Satish Mohite Slug - Ned_Accident Feed on - 2C --------------------------- Anchor - ट्रकने चार ते पाच दुचाकी आणि काळी पिवळी टॅक्सीला जोरदार धडक दिली. अपघातात जवळपास 25 जण जखमी झाले असून 4 जण गंभीर जखमी आहेत. नांदेड जिल्ह्यातील मुखेड शहरात बाऱ्हाळी नाका येथे दुपारी चार वाजेच्या दरम्यान हा अपघात घडला. ट्रकचे ब्रेक फेल झाल्याने हा अपघात घडल्याची माहिती आहे. नांदेडकडून येणाऱ्या एका ट्रकने बाऱ्हाळी नाक्याजवळ येताच एका दुचाकीला चिरडले, दुचाकीचे पुढचे चाक निखळून पडले. या नंतर ट्रकने रस्त्यावरील इतर 3 ते चार दुचाकी आणि एका काळी पिवळी गाडीला धडक दिली. धडकेमुळे गाडी पलटी झाला. या गाडीमध्येही प्रवाशी होते. त्यानंन्तर डिव्हायडर ला धडकून ट्रक थांबला. ब्रेक फेल झाल्याने चालकाचा ताबा सुटल्याचा एक व्हिडीओ समोर आलाय. या अपघातात दुचाकीवरील चार जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमीवर मुखेड येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ट्रक चालकाला पोलीसांनी अटक केलीये. ---------------------
1
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Sept 17, 2025 12:35:54
Jalna, Maharashtra: FEED NAME | 1709ZT_CSN_SATTAR(18 FILES) छत्रपती संभाजीनगर : आमदार अब्दुल सत्तार यांनी केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी राज्य शासन नुकसानग्रस्तांच्या पाठिशी ; शेतकऱ्यांनी धीर धरावा :अब्दुल सत्तार अँकर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यात गेल्या दोन दिवसात झालेल्या अतिवृष्टीत मोठ्या प्रमाणावर नदी-नाले काठावरील गावं तसेच  शेतीपिकांचे नुकसान आणि रस्ते, पूल बाधित झाले आहेत. त्यामुळे प्रशासनाने योग्य समन्वय ठेवून तातडीने वस्तुनिष्ठ पंचनामे पूर्ण करावेत. नुकसानीचे पंचनामे करुन बाधितांना तातडीने मदत करण्यासाठी शासनास अहवाल सादर करावा अशा सुचना आमदार अब्दुल सत्तार यांनी शासकीय यंत्रणेला दिले. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री,कृषी मंत्री यांना याबाबत माहिती दिली असून आपत्ती व्यवस्थापनाचे अधिकारी सतर्क असून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी धीर धरावा राज्य शासन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे आमदार अब्दुल सत्तार म्हणाले. आमदार अब्दुल सत्तार यांनी बाधित क्षेत्राची पाहणी करून नुकसानीचा आढावा घेतला. सत्तार यांनी सिल्लोड तालुक्यातील बोरगाव सारवणी, बोरगाव बाजार, सावखेडा खुर्द ,सावखेडा बुद्रुक ,आमठाणा ,पेंडगाव, देऊळगाव बाजार, चिंचवण इत्यादी गावात पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला बाईट : अब्दुल सत्तार, आमदार,सिल्लोड
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Sept 17, 2025 12:18:47
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - सोलापुरातील बार्शी तालुक्यात मराठा समाज पुन्हा एकदा आक्रमक, मनोज जरांगे पाटलांचे फोटो शासकीय कार्यालयात लावण्याच्या मागणीसाठी करण्यात येतय उपोषण ( WKT ) - सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात मराठा समाज पुन्हा एकदा आक्रमक - मनोज जरांगे पाटील यांचे फोटो शासकीय कार्यालयात लावण्याच्या मागणीसाठी करण्यात येते उपोषण - बार्शीतील तहसील कार्यालयाच्या बाहेर गेल्या तीन दिवसांपासून मराठा समाजाचे सुरूय उपोषण - जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत उपोषण न सोडण्याचा आंदोलकांचा निर्धार याविषयीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अभिषेक आदेप्पा यांनी.... ( WKT )
2
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Sept 17, 2025 11:50:25
Akola, Maharashtra:Anchor : अकोला जिल्ह्यातील मुर्तीजापूर-करंजा रोडवरील नाल्याला आज सकाळपासून आलेल्या पुरामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. सकाळपासून या भागात जोरदार पावसाने हजेरी लावल्यानं नदी-नाले तुडुंब भरून वाहत आहेत.पूराच्या पाण्याचा जोर एवढा वाढला की पुलावरून पाणी वाहू लागलं असून त्यामुळे वाहनांची ये-जा पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारची दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाने पुलावरून पाणी ओसंडत असताना नागरिकांनी येथेून मार्गक्रमण करू नये, असे आवाहन केले आहे. सध्या या मार्गावरील वाहतूक बंद असल्यामुळे वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत असून प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.
1
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Sept 17, 2025 11:47:40
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या उमरखेड मध्ये सकल ओबीसी समाजाने उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चाद्वारे धडक दिली. ओबीसी आरक्षणामध्ये कोणाचाही समावेश हा अन्यायकारक आहे लोकसंख्येच्या प्रमाणात ओबीसींना आरक्षण नसल्यामुळे ओबीसी आरक्षणाची मर्यादा वाढवण्याची गरज असताना शासनाने मराठा समाजाला ओबीसीत समाविष्ट करण्याचा मार्ग मोकळा केला आहे. हा समस्त ओबीसी बांधवांवर मोठा अन्याय आहे. हा अन्याय कदापिही खपवून घेणार नाही, असा इशारा देत सकल ओबीसी समाज आक्रमक झाल्याचे बघायला मिळाले. आधीच मर्यादित संधी असलेल्या ओबीसी समाजातील घटकांना आणखी मागे ढकलण्याचे हे षडयंत्र आहे. असा आरोप यावेळी करण्यात आला.
3
comment0
Report
SKShubham Koli
Sept 17, 2025 11:39:03
Thane, Maharashtra: मनपाडा इडन वूड्समध्ये बिबट्याचा हल्ला भटक्या कुत्र्यांमुळे धोका वाढला... ठाण्यातील मानपाडा येथील इडन वूड्स, खेवरा सर्कल परिसरात काल मध्यरात्री बिबट्याने हल्ला केला. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिक नागरिकांच्या मते, परिसरातील वाढती भटक्या कुत्र्यांची संख्या ही बिबट्यांच्या वस्तीमध्ये वावर वाढण्याचे मुख्य कारण ठरत आहे. अन्नाच्या शोधात बिबटे निवासी वसाहतींकडे वळत असल्याचा आरोप देखील नागरिकांनी केला आहे. निवासी संघटनांनी सरकारला तातडीने भटक्या कुत्र्यांसाठी स्वतंत्र झोन तयार करण्याची आणि त्यांचे स्थलांतर करण्याची मागणी केली असून नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
2
comment0
Report
AAASHISH AMBADE
Sept 17, 2025 11:38:34
Chandrapur, Maharashtra:Feed slug :--- 1709ZT_CHP_SUDHIR_BITE ( single file sent on 2C)  टायटल:-- मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर झालेल्या शाईफेकीचा भाजप नेते आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केला तीव्र निषेध, समाजकंटकांवर कठोर कारवाईची केली मागणी अँकर:--मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर लाल रंग फेकण्याच्या प्रकाराचा माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी तीव्र निषेध केला आहे. महाराष्ट्रात पुन्हा अशा घटना होणार नाही अशी शिक्षा समाजकंटकांना झाली पाहिजे असेही ते म्हणाले. स्व. मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना अशा प्रकारच्या घटनांबाबत एक जीआर काढण्यात आला होता, त्या जीआरचं पुन्हा अवलोकन करून जबाबदारी निश्चित करणे, अशा जागांच्या सुरक्षेची उत्तम व्यवस्था करणे याबाबत सरकार भविष्यात धोरण आखेल अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. बाईट १) सुधीर मुनगंटीवार, भाजप नेते आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर 
3
comment0
Report
Advertisement
Back to top