Back
दौंड तालुक्यात रात्री चोरी, पती-पत्नीवर धारदार हल्ला!
JMJAVED MULANI
Aug 19, 2025 07:07:02
Baramati, Maharashtra
JAVED MULANI
SLUG 1908ZT_DAUNDBOR
FILE 4
दौंड तालुक्यातील बोरीऐंदी
गावात रात्रीच्या वेळी दोन ठिकाणी चोरी
पती-पत्नीवर धारदार शस्त्राने वार करत जीवे मारण्याचा प्रयत्न..
दौंड तालुक्यातील बोरीऐंदी
गावात रात्रीच्या वेळी दोन ठिकाणी चोरी
पती-पत्नीवर धारदार शस्त्राने वार करत जीवे मारण्याचा प्रयत्न..
Anchor - दौंड तालुक्यातील बोरीऐंदी गावात मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास तीन चोरांनी 2 ठिकाणी चोरी केली. यातील एका घरातील पती-पत्नीला जिवे मारण्याचा प्रयत्न करीत, डोक्यात हातावर धारदार शस्त्राने तसेच राॅडने मारहाण केली आहे .
दीड ते दोन लाख रुपये रोख व पाच तोळे सोने चोरी करून धमकी देऊन पसार झाले असल्याची प्राथमिक माहिती... या घटनेची माहिती मिळताच यवत पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यवत पोलिसांकडून या चोरीच्या घटनेचा तपास सुरू आहे.
12
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowAug 19, 2025 09:11:54Ambernath, Maharashtra:
बदलापूर सकाळपासून 38 मिलिमीटर पावसाची नोंद
मात्र उल्हास नदी अजूनही इशारा पातळीच्या खाली
अनेक सखल भागात पाणी शिरलं ,पालिका प्रशासन सज्ज
Bdl ulhas river
Anchor बदलापुरात सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू असून आता पर्यत शहरात 38 मिलिमीटर मिलिमिटर पावसाची नोंद झाली आहे , कात्रप, हेंद्र पाडा, बदलापूर रेल्वे स्थानक परिसरातील सखल भागात पाणी साचले आहे. मात्र बदलापूर शहरातून वाहणाऱ्या उल्हास नदी अजूनही इशारा पातळी खालून वाहत आहे सध्या उल्हास नदीची पाणी ही 14.50 मीटर आहे . नदीची इशारा पातळी ही 16.50 मीटर तर धोक्याची पातळी ही 17.50 मीटर आहे सध्या उल्हास नदी ही पातळी ही 14.80 मीटर वरून वाहत आहे , पालिकेचे मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांनी उल्हास नदिववर जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला. सतर्कता म्हणून पालिका प्रशासनाने अग्निशमनदलाला 24 तास सज्ज राहण्यास सांगितला आहे ,तसेच दोन हजार नागरिकांची राहण्याची तसंच जेवणाची व्यवस्था ही करण्यात आली असल्याचं मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांनी सांगितलं
Byte मारुती गायकवाड मुख्याधिकारी कुळगाव बदलापूर नगरपरिषद
चंद्रशेखर भुयार बदलापूर
0
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowAug 19, 2025 09:11:01Pune, Maharashtra:
Reporter name : Chaitralli Raajapurkar
Location : Maval
File name : 1908ZT_MAVAL_BHUSHI_DAM
Total files : 01
Headline : भुशी धरणाच्या पायऱ्यांवरील पाण्याचा प्रवाह वाढला
भुशी धरणाच्या पायऱ्यांवर जाण्यास पर्यटकांना मज्जाव
भुशी धरण परिसरात पोलिसांचा बंदोबस्त
Anchor :
मावळ तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे लोणावळ्याला देखील पावसाने झोडपले आहे. पुणे जिल्हयाला रेड अलर्ट दिला आहे. घाटमाथ्यावर वर देखील पावसाची तुफान बॅटिंग सुरू आहे. लोणावळ्यातील भुशी धरण देखील आता ओसंडून वाहत आहे. मुसळधार पावसामुळे लोणावळ्यात पर्यटकांनी गर्दी केली आहे. मात्र भुशी धरणाने रौद्र रूप धारण केल्यामुळे पोलिसांनी भुशी धरणाच्या पायऱ्यांवर जाण्यास मज्जाव केला आहे. त्यामुळे आता अनेक पर्यटकांचा हिरमोड झाला आहे. पर्यटकांनी भुशी धरणाच्या पायऱ्यांवर जाऊन कोणती दुर्घटना घडू यासाठी लोणावळा पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
0
Report
ABATISH BHOIR
FollowAug 19, 2025 09:01:34Kalyan, Maharashtra:
कल्याण डोंबिवली महानगरपालिका ने लावले आहेत दिखाव्या पूर्ती संक्शन पंप.
Anc..कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने सकल भागामध्ये पाणी साचते त्या ठिकाणी महानगरपालिकेने दहा ठिकाणी संक्शन पंप लावल्याचे सांगण्यात येत असले तरी कल्याणच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात पाणी चा निचरा काढण्यासाठी पंप आणून ठेवलेला आहे मात्र तो पंप बंद स्थितीतच आहे त्यामुळे कल्याणच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातील रस्त्यावरती पाणी साचलेले दिसत आहे हे पंप देखाव्यापूर्वती लावलेले आहेत का असे नागरिक प्रश्न विचारत आहे.
byte.. नगरीक
0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowAug 19, 2025 09:01:22Ambernath, Maharashtra:
बदलापूरतील शनीनगर परिसरातील लोखंडी पूल गेला वाहून
पूल वाहून गेल्याचे दृश्य झाले मोबाईल कॅमेऱ्यात कैद
Anchor बदलापुरातील हेंद्रे पाडा परिसरातील शनीनगर भागातील नाल्यावरील लोखंडी पूल हा वाहून गेला , गेल्या काही दिवसांपासून या नाल्यावर नवीन पुलाचे काम सुरू आहे .त्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात हा पूल बांधण्यात आला होता. मात्र आज नाल्याला आलेल्या पाण्यामुळे हा लोखंडी पूल वाहून गेला, हा पूल वाहून जातांनाचा व्हिडिओ मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाले आहे. हा पूल बंद करण्यात आल्याने सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाहीये
चंद्रशेखर भुयार , बदलापूर
0
Report
LBLAILESH BARGAJE
FollowAug 19, 2025 09:01:08Pune, Maharashtra:
रिपोर्टर:- लैलेश बारगजे
स्लग:- वाहून गेलेल्या पुलासाठी ग्रामस्थ आक्रमक
फीड 2C
Anc:-
अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील जोहरापूर – देवटाकळी या रोडवरील पूल दोन दिवसांपूर्वी वाहून गेल्यामुळे परिसरातील संतप्त ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांनी नदीत उतरून आंदोलन केल आहे. वाहून गेलेला पूल तात्काळ दुरुस्त करावा यासाठी ग्रामस्थ नदीतील पाण्यात बसून आंदोलन करत आहेत. दोन गावांना जोडणारा हा पूल प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत बांधण्यात आलेला होता, पूल वाहून गेल्याला दोन दिवस उलटूनही संबंधित बांधकाम विभागाचे अधिकारी अद्याप घटनास्थळी फिरकले देखील नाहीत त्यामुळे ग्रामस्थांचा रोष वाढला आहे. या रोड अभावी शेतकऱ्यांचे वाहतूक मार्ग पूर्णपणे खंडित झाले आहेत. शेतकरी आणि गावकर्यांना दुसऱ्या लांब पल्ल्याच्या रस्त्यावरून ये जा करावी लगत आहे. त्यामुळे शासनाने तातडीने पूल आणि रस्ता दुरुस्त करून द्यावा, अशी मागणी संतप्त शेतकऱ्यांनी केली आहे.
बाईट:-ग्रामस्थ
0
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowAug 19, 2025 09:00:55Dhule, Maharashtra:
ANCHOR - पोलीस निरीक्षकावरती हल्ला प्रकरणी शिरपूर शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून, सात संशयतांना ताब्यात घेण्यात आलेले आहे. शिरपूर तालुक्यातील दहिवद परिसरात एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्यानंतर, मूक मोर्चा काढण्यात आला होता. हा मोर्चा संपल्यानंतर काही लोकांनी रास्ता रोको आंदोलन सुरू केले. या आंदोलकांना समजवण्यासाठी केलेल्या पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात ते जखमी झालेले आहेत. याप्रकरणी शिरपूर शहर पोलीस ठाण्यामध्ये हल्लेखोरण विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यातील 7 संशयित हे पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत संशयतांना ताब्यात घेतल असून, शिरपूर शहरासह तालुक्यांमध्ये सध्या शांततेचा वातावरण आहे. पोलिसांनी संवेदनशील ठिकाणी बंदोबस्त तैनात करून ठेवलेला आहे.
byte - किशोर परदेशी, पोलीस निरीक्षक
प्रशांत परदेशी, धुळे.
0
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowAug 19, 2025 09:00:45Solapur, Maharashtra:
सोलापूर ब्रेकिंग - सीना नदीची पाणी पातळी वाढल्याने नदीकाठची शेती गेली वाहून ( WKT )
- सोलापूर जिल्ह्यातील अतिवृष्टीचा खरीप पिकांना मोठा फटका
- दक्षिण सोलापूर तालुक्यातून वाहणाऱ्या सीना नदी पात्राच्या शेजारील उसाची शेती गेली वाहून
- हाताशी आलेलं पीक पाण्यात वाहून गेल्याने बळीराजा हतबल
- जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांची शेती गेली वाहून तर शेतात मोठ्या प्रमाणात साचले पाणी
याच विषयाचा दक्षिण सोलापूर तालुक्यातून आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अभिषेक आदेप्पा यांनी... ( WKT )
0
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowAug 19, 2025 09:00:22Raigad, Maharashtra:
स्लग - रायगड जिल्ह्यात घरावर दरड कोसळून महिलेचा मृत्यू
मुरूड तालुक्यातील मिठेखार गावातील घटना, पहाटेच्या सुमारास घरावर कोसळली दरड
विठाबाई गायकर असे 75 वर्षीय मृत महिलेचे नाव
मुरूड तहसीलदार यांच्यासह महसूल यंत्रणा घटनास्थळी
अँकर - रायगड जिल्ह्यात घरावर दरड कोसळून वृध्द महिलेचा मृत्यू झाला. मुरूड तालुक्यातील मिठेखार गावातील ही आज सकाळची घटना आहे. विठाबाई गायकर असे मृत महिलेचे नाव आहे. दुर्घटनेनंतर मुरूड तहसीलदार आणि महसूल यंत्रणा घटनास्थळी पोहोचली आहे. तर नागरिकांनी तहसीलदारांसमोरच या घटनेबाबत संताप व्यक्त केला.
0
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowAug 19, 2025 09:00:13Dhule, Maharashtra:
ANCHOR - नंदुरबार जिल्ह्यातील चारी नगरपालिकांच्या प्रारूप प्रभाग रचना पूर्ण झाल्यात. प्रभाग रचना पूर्ण झाल्याने आता हरकती मागवण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील नंदुरबार, नवापूर, शहादा आणि तळोदा नगरपालिकेच्या प्रभागात वाढ झाली आहे. प्रभाग रचना पूर्ण झाली असून या चारी नगरपालिकेमध्ये आता हरकती मागवण्यात येणार आहे. नंदुरबार येथील चारी नगरपालिकेच्या प्रभागांमध्ये वाढ झाली आहे त्यामुळे नगरसेवकांचे देखील संख्या वाढणार आहे नंदुरबार नगरपालिकेत अंतर्गत वीस प्रभाग झाले आहेत त्यामुळे ४२ नगरसेवक राहणार आहेत. त्यामुळे आता सर्व लक्ष हरकतींकडं राहणार आहेत. हरकतींची प्रक्रिया झाल्यानंतर राज्य निवडणूक नगरपालिकेच्या माहिती दिली जाणार आहे त्यामुळे नगरपालिकेच्या निवडणुकीच्या मार्ग काही प्रमाणावर मोकळा झाला आहे.
प्रशांत परदेशी, नंदुरबार.
0
Report
KJKunal Jamdade
FollowAug 19, 2025 08:34:37Shirdi, Maharashtra:
संगमनेर / अहिल्यानगर
*काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात प्रेस पॉईंटर्स*
वारकरी संप्रदाया मध्ये असताना काही पथ्य पाळले पाहिजे..
अशा व्यक्तींनी राजकीय भाष्य नाही केले पाहिजे..
कोणाला ठेस लागेल अस वाक्य कोणी करता कामा नये..
मात्र ते पाळले जात नाही हे दुर्दैव..
कोणाला ठेच लागेल अस वक्तव्य राज्यघटनेत देखील नाही..
घुलेवाडीला नेमकं काय घडले हे सर्वांनी पाहिले पाहिजे..
त्या दिवशी नकारात्मक कीर्तन सुरू असल्याने त्याला विरोध केला..
*खोट्या केसेस करण्याचे उद्योग सुरू झाले आहे*
काही कीर्तनकार अशी वक्तव्ये करतात..
पोलिस दबावाखाली काम करत आहे..
*मी महात्मा गांधी नाही पण त्यांच्या सारखे बलिदान होणार असेल तर लोकशाहीसाठी अस बलिदान मिळण्यात मला आनंद*
ऑन तुषार भोसले
वारकरी संप्रदायामध्ये आम्ही राहिलेलो आहे..
आम्हीच अनेकदा अनेक धार्मिक कार्यक्रम साजरे केले..
आमही कोणाचा द्वेष करत नाही..
त्यांचा केवळ सत्तेसाठी चाललेला खेळ आहे..
*विधानसभे अगोदर देखील असेच प्रयत्न केले गेले.. दंगली भडकविण्याचे काम केले गेले... आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्याची सुरुवात संगमनेर मधून झाली असे वाटते*
*आम्ही सांगण्याची गरज नाही गृहमंत्र्यांनी यात लक्ष घालून कारवाई केली पाहिजे*
ऑन राजकीय पातळी
देशाची राजकीय पातळी खाली गेलीय..
धनगड कुठे गेले माहित नाही..
राज्याच्या पातळीबाबत तर राजकारणाचा तळ गाठला गेलाय...
ऑन महाभियोग प्रस्ताव -
निवडणूक आयोगाची प्रेस एकली तर गंमत वाटते..
त्यांनीच आता एखादा पक्ष स्थापन केला पाहिजे..
राजकीय पक्षासारखं वक्तव्य ते करतात..
त्यांच्याकडे तयार ड्राफ्ट आला होता तो वाचून दाखवला...
आजही आम्हाला सेशन यांची आठवण येते..
निवडणूक आयोग आणि निवडणूक कशी असावी हे त्यांनी दाखवून दिले..
ऑन राज उद्धव युती
आम्ही त्याबाबतीत अजून भेटणार आहोत..
त्या चर्चेतून पुढे कसे जायचे हे आम्ही ठरवू..
भाजपची कार्यपद्धती आम्हाला मान्य नाही..
त्यामुळे आम्ही महाविकास आघाडी एकत्रित बसून चर्चा करू..
ऑन संगमनेर शांतताभंग -
संगमनेरचा विकास तोडण्यासाठी काम सध्या सुरू...
पहिल्यांदा फ्लेक्स फाडण्यासारख्या घटना घडल्या..
युवकांची दिशाभूल करून त्याचा वापर केला जातोय..
*तिथले व्हिडिओ समोर आले त्यात कुठेही हल्ला झालेला नाही.. हल्ला झाला अस कोणी दाखवलं आणि माझे कार्यकर्ते असतील तर मी देखील चौकशी करेल*
bite - Balasaheb thorat ,
4
Report
KJKunal Jamdade
FollowAug 19, 2025 08:33:15Shirdi, Maharashtra:
sangmner News Flash
On महाभियोग
निवडणूक आयोगाची प्रेस एकली तर गंमत वाटते..
त्यांनीच आता एखादा पक्ष स्थापन केला पाहिजे..
राजकीय पक्षासारखं वक्तव्य ते करतात..
त्यांच्याकडे तयार ड्राफ्ट आला होता तो वाचून दाखवला...
आजही आम्हाला सेशन यांची आठवण येते..
निवडणूक आयोग व निवडणूक कशी असावी हे त्यांनी दाखवून दिले..
ऑन मंत्री संजय शिरसाठ आरोप
राज्यात अनेक मंत्र्यांचे घोटाळे , नेमकं कोणत्या घोटाळ्याबद्दल बोलायचं हा प्रश्न...
रोहित पवार हे आमदार आहेत त्यांनी जर आरोप केले असतील तर शासनाने ह्या आरोपांची चौकशी केली पाहिजे...
मंत्री संजय शिरसाट यांच्यावर रोहित पवार यांनी केलेल्या आरोपांवर बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रिया...
ऑन राज उद्धव युती
आम्ही त्याबाबतीत अजून भेटणार आहोत..
त्या चर्चेतून पुढे कसे जायचे हे आम्ही ठरवू..
भाजपची कार्यपद्धती आम्हाला मान्य नाही..
त्यामुळे आम्ही महाविकास आघाडी एकत्रित बसून चर्चा करू..
थोरात यांची प्रतिक्रिया
bite - बाळासाहेब थोरात
2
Report
PNPratap Naik1
FollowAug 19, 2025 08:32:44Kolhapur, Maharashtra:
Kop Bot Shifting
Feed:- 2C
Anc:- फिट येऊन बेशुद्ध पडलेल्या तरुणाला कोल्हापूर जिल्हा आपत्ती पथकाने बोटीतून रुग्णवाहिकेपर्यंत सुखरूप पोहचवले.कुंभी नदीला पूर आल्याने पन्हाळा तालुक्यातील गोटे गावातल्या शशांक नाईक या रुग्णाला उपचारासाठी घेऊन जाणे अशक्य बनले होते. पण जिल्हा आपत्ती व्यवस्थापन टीमने तत्काळ बोटी द्वारे त्याला प्रवाहाच्या दुसऱ्या बाजूला आणण्यात आले. तेथून रुग्णवाहिकेतून त्याला पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले
2
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowAug 19, 2025 08:32:33Solapur, Maharashtra:
सोलापूर ब्रेकिंग - बार्शीतील भोगावती नदीची पाणी पातळी वाढली, अनेक शेतामध्ये शिरले पाणी
- बार्शी शहर तालुक्यात जोरदार पाऊस, भोगावती नदीची पाणी पातळी वाढली..
- बार्शी तालुक्यात गेल्या आठ दिवसापासून पडत असलेल्या पावसामुळे नदी, नाले, ओढे भरून तुडुंब
- वैराग परिसरातून वाहणाऱ्या भोगावती नदीची पाणी पातळी वाढल्याने अनेकांच्या शेतात शिरलं पाणी.
- वैराग जवळील जवळगाव मध्यम लघु प्रकल्प भरल्यामुळे प्रकल्प ओव्हर फ्लो
- बार्शी तालुक्यात 18 दिवसात 163 मिलिमीटर पावसाची नोंद.
- बार्शी तालुक्यातील उडीद मूक पिकाची कापणी खोळंबली
2
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowAug 19, 2025 08:32:23Pune, Maharashtra:
Reporter name : Chaitralli Raajapurkar
Location : Maval
File.name : 1908ZT_MAVAL_HELICOPTER
Total files : 05
Headline -मुळशी तालुक्यातील सालतर गावात धुके व पावसामुळे खासगी हेलिकॉप्टरचे आपत्कालीन लँडिंग; सर्वजण सुखरूप
Anchor:
मुळशी तालुक्यातील शेवटचं टोक असलेल्या आंबवणेच्या सालतर गावात दाट धुके आणि मुसळधार पावसामुळे मोठी घटना टळली. पुण्यावरून मुंबईकडे जात असलेलं एक खासगी हेलिकॉप्टर भरकटलं आणि त्याला आपत्कालीन लँडिंग करावं लागलं. ही घटना सकाळी अकराच्या सुमारास घडली. हवामानाचा मोठा फटका बसला असला तरी सुदैवाने सर्व प्रवासी सुखरूप आहेत. आपत्कालीन परिस्थितीत गावकऱ्यांनी तातडीने धाव घेऊन मदत केली आणि त्यांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळल्याचं सांगितलं जातंय. अचानक झालेल्या या हेलिकॉप्टर लँडिंगमुळे परिसरात काही काळ खळबळ उडाली होती. ही घटना पर्वाची असून याबाबत मुळशी तहसीलदार विजयकुमार चौबे यांनी दुजोरा दिला आहे..
4
Report
PPPRANAV POLEKAR
FollowAug 19, 2025 08:32:14Ratnagiri, Maharashtra:
चिपळूणमधील बहादूरशेख नाका परिसरात पाणी
चिपळूण कराड रोडवर अचानक वाढलं पाणी
चिपळूण-कराड मार्गावरील वाहतूक ठप्प
अचानक पाणी वाढल्यामुळे महामार्ग केला बंद
चिपळूण वाहतूक पोलिसांनी केला वाहतुकीस मार्ग बंद
4
Report