Back
वसई कळब बीचवर आढळला रहस्यमय कंटेनर, स्थानिकांमध्ये खळबळ!
PTPRATHAMESH TAWADE
FollowJul 22, 2025 07:04:13
Vasai-Virar, Maharashtra
Date-22july2025
Rep-prathamesh tawade
Loc-vasai
Slug-VASAI BEACH
Feed send by 2c
Type-Av
Slug- वसई कळब बीचवर कंटेनर आढळल्याने खळबळ
अँकर - आज सकाळच्या सुमारास वसईतील कळंब समुद्रकिनारी एक मोठा कंटेनर समुद्रातून वाहून आल्याचे आढळून आले. या घटनेमुळे किनाऱ्यावर स्थानिक नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली.
हा कंटेनर समुद्राच्या भरतीसोबत किनाऱ्यावर आला असून त्याच्या आत काय आहे, याची माहिती अद्याप मिळालेली नाही. स्थानिक मच्छीमारांनी ही बाब तातडीने स्थानिक पोलिस आणि प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. प्रशासनाने तत्काळ घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला आहे.
सुरक्षा दृष्टीकोनातून नागरिकांनी कंटेनरच्या आसपास न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पोलीस आणि तटरक्षक दलाने घटनास्थळी बंदोबस्त वाढवला असून, कंटेनरच्या मूळ स्रोताची चौकशी सुरू आहे.
अधिकृत माहिती मिळेपर्यंत नागरिकांनी संयम बाळगावा व अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन स्थानिक प्रशासनाने केले आहे.
14
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
MNMAYUR NIKAM
FollowJul 22, 2025 12:36:31Buldhana, Maharashtra:
ब्रेकिंग न्यूज
देऊळगाव कुंडपाळ धरणाला तडा; मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता!
लोणार तालुक्यातील देऊळगाव कुंडपाळ येथील धरणाला तडा गेल्याने पाणी मोठ्या प्रमाणात वाहत आहे.
रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे ही स्थिती उद्भवली आहे.
मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता असून, धरणातील पाणी गावात शिरून मोठी हानी होऊ शकते.
गावकऱ्यांनी प्रशासनाला तत्काळ लक्ष देऊन धरणाची दुरुस्ती करण्याची विनंती केली आहे.
प्रशासनाने या गंभीर परिस्थितीची दखल घेऊन तात्काळ उपाययोजना करणे अत्यंत आवश्यक आहे.
2
Report
NMNITESH MAHAJAN
FollowJul 22, 2025 12:36:02Jalna, Maharashtra:
FEED NAME : 2207ZT_JALNA_DEATH(3 FILES)
जालना : खाली पडलेल्या विद्युत तारेला स्पर्श झाल्याने शेतकऱ्याचा मृत्यू
अँकर : शेतात फवारणीसाठी गेलेल्या शेतकऱ्याला खाली पडलेल्या विजेच्या तारेचा स्पर्श झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना जालन्यातील परतूर तालुक्यातील मसला शिवारात घडली.40 वर्षीय संदीप भालेकर असं मृत्यूमुखी पडलेल्या शेतकऱ्याचं नाव आहे.संदीप भालेकर हे सोयाबीन पिकावर धुर फवारणी करत असतांना त्यांचा खाली पडलेल्या विद्युत तारेला स्पर्श झाला.त्यामुळे जागेवरच त्यांचा मृत्यू झाला.दरम्यान या घटनेला महावितरणच जबाबदार असून महावितरणनं मयताच्या कुटुंबातील एकाला नोकरी देण्याची मागणी नातेवाईकांनी केलीय.
बाईट : मयताचे नातेवाईक
4
Report
SMSATISH MOHITE
FollowJul 22, 2025 12:30:59Nanded, Maharashtra:
Satish Mohite
Slug - Ned_Cemetery
Feed on - 2C
-----------------------
Anchor - अंत्यसंस्कारासाठी गावात जागा नसल्याने दुसऱ्या गावात मृतदेह नेणाऱ्या ग्रामस्थाना तिथल्या गावक-र्यांनी जोरदार विरोध केला. दोन्ही गावातील शेकडो ग्रामस्थ आमनेसामने आल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.
नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद तालुक्यातील मनुर आणि संगम या दोन गावात हा वाद झाला. मनुर गावात स्मशानभूमीसाठी जागा नसल्याने जवळच असलेल्या संगम या गावात स्मशानभूमीसाठी महसूल विभागाने जागा निश्चित केली. परंतु ही जागा स्मशानाभूमीसाठी देण्यास संगम गावाचा विरोध आहे. आज मनुर येथील एका व्यक्तीचे निधन झाले. अंत्यविधी करण्यासाठी मनुरचे गावकरी संगमच्या गायरान जमीन इकडे जात असताना संगम गावच्या गावकऱ्यांनी तीव्र विरोध केला. यावेळी दोन्ही गावचे गावकरी आपापसात भिडले. मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी मागवण्यात आला. पोलीस बंदोबस्तात संगमच्या गायरान जमिनीवर अंत्यविधी पार पडला. सध्या परिस्थिती नियंत्रणात असली तरी तणावपूर्ण परिस्थिती आहे.
--------------
8
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowJul 22, 2025 12:03:16kolhapur, Maharashtra:
नागपूर
बाइट - बच्चू कडू, शेतकरी नेते
On माणिकराव कोकाटे
- माणिकराव कोकाटे यांना कोणी निवडून दिले, आणि कोणी मंत्री केले हा प्रश्न आहे..
- कृषी खात्याला पैसे मागून थकले, गृह खात जलसंपदा खात आहे त्यापेक्षा मोठा आहे कृषी खात फक्त 9000 कोटीचा आहे कोकाटे यांचा विधान हे फार मोठा आहे.... एक प्रकारे मुख्यमंत्री यांना कोकाटे यांनी शिवी दिली आहे. माणिकराव कोकाटे पहिल्यांदा खरं बोलले त्यामुळे त्यांचे आभार मानले पाहिजे... यारमीची जाहिरात सचिन तेंडुलकर करतो, सचिन तेंडुलकर यांच्या जाहिरातीतूनच माणिकराव कोकाटे यांना धाडस मिळाला असेल...
- सरकार जवळ पैसा कमी आहे म्हणून ते रेल्वे खेळत होते... मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात पैसे नाही पण शक्तिपीठ महामार्ग मेट्रो सुरू करायला कोणी सांगितलं होतं... मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दुष्काळाची वाट पाहून कर्जमाफी करण्याचा विधान करत असतील तर, वाईट गोष्ट आहे...
- शेती मालाला भाव नव्हता म्हणून आम्ही कर्जमाफी मागत आहे... माणिकराव कोठारी कोकाटे यांची फजिती झाले भिक मागितल्याशिवाय पर्याय नसल्यामुळे ते भीक मागत आहे.
- महाराष्ट्राची अवस्था पाहिली तर प्रत्येक जिल्ह्यात सरकारला हत्तीशी घेऊन जे आकाजिल्ह्या चालवत आहे, या सगळ्यांमध्ये कृषी मंत्राला हे वेतन आवरू शकत नसेल तर सामान्य माणसाची काय अवस्था असेल...
- या रमी खेळामुळे किती लोक देशोधडीला लागले... इतक्या मोठ्या आज प्रमाणात आत्महत्या होऊन तो खेळ का बंद होत नाही... क्रिकेटर सिने स्टार हे जाहिराती करतात त्यांना लाज का वाटत नाही... हे जाहिरात करणारे भिकारचोटा पेक्षाही भिकार चोट आहे... निधीच नाही असे माणिकराव कोकाटे बोलले आहे... अर्थमंत्री पक्षाचे नेते अजित पवार आहे... भिकाऱ्याचा अवस्थेत कोण आहे....शासनातील मंत्रीच भिकारी म्हणत असले तर आता स्पष्ट झालं आहे..
- *माणिकराव कोकाटे यांनी सरकारला भिकारी म्हटल आहे.. त्यामुळे ही वास्तविकता असावी, या भीकारीच्या रांगेत कोण आहेत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सर्व सरकार या रांगेत आहे. माणिकराव कोकाटे यांनी कृषी विभागाची वास्तविकता मांडली आहे. तर रम्मी खेळामुळे किती लोकांचे बळी गेलं आहे...*
- *माणिकराव कोकाटे बेताल वक्तव्य करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांना सरकार कसं काय पचवून घेत माहिती नाही... आणि त्यांनी सरकारला भिकारी म्हटलं आहे. त्यामुळे तुमच्या आमच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे. सरकार भिकारी म्हणजे राज्य भिकारी आणि माणिकराव यांनी एका शब्दात राज्याची गरिमा काढली...*
7
Report
SRSHRIKANT RAUT
FollowJul 22, 2025 11:44:46Yavatmal, Maharashtra:
PKG
Anchor : पती व एका मुलाचे अकस्मात निधन झाल्यानंतर सासरच्यांनी विधवा सुनेचा १ लाख २० हजारात सौदा केला. गुजरात मधील एका व्यक्तीने तिला विकत घेऊन दोन वर्ष शोषण केले. व तिच्यापासून मुलगा झाल्यानंतर या महिलेला गावात आणून सोडून दिले. यवतमाळच्या आर्णी पोलिसांकडून बेपत्ता व्यक्तींची शोधl मोहीम सुरु असताना हा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे.
VO 1 : यवतमाळच्या आर्णी पोलिसांपुढे आपबीती सांगत असलेली ही महिला तिच्या बेपत्ता मुला मुलीचा शोध घेण्याची विनंती करीत आहे. या महिलेच्या पती व एका मुलाचे अकस्मात निधन झाले. त्यामुळे एक मुलगा व मुलीचा सांभाळ ती करीत होती. दरम्यान कामधंदा मिळेल असे सांगून तिची नणंद व नदोई ने तिला मध्यप्रदेश मध्ये नेले. तिथे तिला गुजरातच्या पोपट चौसाने या व्यक्तीला एक लाख २० हजार रुपयात विकले. त्याने गुजरात मध्ये नेऊन तिच्याशी विवाह केला. तब्बल दोन वर्षे तिचे शोषण केले, व तिच्यापासून पुत्रप्राप्तीनंतर तिला गावात आणून सोडून दिले. दरम्यान पोलिसांनी पीडित महिलेची सासू, सासूचा दुसरा नवरा, दीर नणंद व नंदोई यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
बाईट : नितीन सुरडकर : पोलीस निरीक्षक
VO 2 : विधवा मुलगी व नातवंड बेपत्ता आहे म्हणून पीडितेच्या आई-वडिलांनी २०२३ साली पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्या अनुषंगाने तिचा शोध सुरू होता, दरम्यान ही लापता महिला पोलिसांना गावातच मिळाली, तिची विचारपूस केली असता सासरच्या मंडळींनी केलेला तिचा घात समोर आला. तिचा एक मुलगा व मुलगी सध्या कुठे आहे, हे तिला माहित नाही. पोटच्या दोन्ही मुलांना बघण्यासाठी तिचा जीव कासावीस आहे.
बाईट : पीडित महिला
VO 3 : या निराधार महिलेच्या अवस्थेचा गैरफायदा घेऊन सासरच्या मंडळींनी पैशांसाठी तिचा सौदा केला. त्यांनी नातवंडांचे काय केले हे तपासात पुढे येईल. ग्रामीण व दुर्गम भागातील अनेक महिला मुलींची अशाच पद्धतीने परप्रांतात विक्री केल्या चे अनेक प्रकार यवतमाळ जिल्ह्यात घडले आहेत. याबाबत ठोस पावलं उचलण्याची गरज व्यक्त होत आहे.
14
Report
YKYOGESH KHARE
FollowJul 22, 2025 11:44:36Nashik, Maharashtra:
nsk_morcha
feed by 2C
vidoe 5
Anchor - मालेगाव येथील खाजगी रुग्णालयात मोहम्मद अथर खुर्शीद अहमद याने नर्सिंगचे शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन हिंदू आदिवासी मुलीवर केलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ आज मालेगावात '' नारीशक्ती ' मोर्चा काढण्यात आला..गांधी पुतळ्यापासून निघालेल्या या मोर्चाची सांगता अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय येथे करण्यात आली..यावेळी मोर्चातील सहभागी महिलांनी शंखनाद करत अत्याचार करणाऱ्याला फाशी द्या, ही केस फास्टट्रॅक कोर्टात चालवावी,महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी उपाययोजना कराव्या अशी मागणी केली तशा आशयाचे निवेदन यावेळी अपर जिल्हाधिकारी यांना देण्यात आले..मोर्चावेळी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता..
बाईट - मंजुषा कजवाडकर,
14
Report
YKYOGESH KHARE
FollowJul 22, 2025 11:43:37Nashik, Maharashtra:
nsk_malegainprotest
feed by 2C
video 5
Anc: मालेगाव तालुक्यातील डाबली परिसरात शेतकऱ्यांना वीज वितरण कंपनीच्या आडमुठेपणामुळे अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. शिवारात दोन फेज वीजपुरवठा चालू करावा. वेळापत्रकानुसारही वीजपुरवठा सुरळीत होत नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी वीज वितरण कंपनीच्या अजंग येथील कार्यालयास घेराव घालून तब्बल दोन तास ठिय्या आंदोलन केले. उपकार्यकारी अभियंता पी.एम पाटील यांना निवेदन देण्यात आले. उपस्थित शेतकऱ्यांनी दोन दिवसांत सुरळीत वीजपुरवठा न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा यावेळी दिला.
8
Report
TTTUSHAR TAPASE
FollowJul 22, 2025 11:43:12Satara, Maharashtra:
TUSHAR TAPASE
3 FILES
SLUG NAME -SAT_MAHA_KHADDE
सातारा: महाबळेश्वर हे राज्यातील एक प्रसिद्ध पर्यटनस्थळ असून देश विदेशातून पर्यटक या भागाला भेट देत असतात. सध्या या भागात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे महाबळेश्वर ते पाचगणी रस्त्यावरील वेण्णा लेक आणि लिंगमळा रस्त्यावर खड्डे पडल्यामुळे वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. महाबळेश्वर शहर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने वेण्णा लेक परिसरात रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात झाडे लावुन निषेध केला आहे. लवकरात लवकर रस्त्याची दुरुस्ती करा अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे
बाईट आंदोलक (ऊबाठा गट)
14
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowJul 22, 2025 11:40:45Bhandara, Maharashtra:
Pravin Tandekar Nagpur
Slug - 2207_NGP_KADU_121
FILE - 1 VIDEO
121 बच्चू कडू
माणिकराव कोकाटे यांनी सरकारला भिकारी म्हटला आहे.. त्यामुळे ही वास्तविकता असावी, या भीकारीच्या रांगेत कोण आहेत. मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्री, सर्व सरकार या रांगेत आहे. माणिकराव कोकाटे यांनी कृषी विभागाची वास्तविकता मांडली आहे. तर रम्मी खेळामुळे किती लोकांचं बळी गेलं आहे...
माणिकराव कोकाटे बेताल वक्तव्य करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांना सरकार कसं काय पचवून घेत माहिती नाही... आणि त्यांनी सरकारला भिकारी म्हटलं आहे. त्यामुळे तुमच्या आमच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे. सरकार भिकारी म्हणजे राज्य भिकारी आणि माणिकराव यांनी एका शब्दात राज्याची गरिमा काढली...
11
Report
SGSagar Gaikwad
FollowJul 22, 2025 11:39:01Nashik, Maharashtra:
feed send by 2c
reporter-sagar gaikwad
slug-nsk_protest
*नाशिक ब्रेकिंग...*
- कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या फोटोला जोडे मारून शरदचंद्र पवार पक्षाकडून आंदोलन...
- कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांची मंत्रिमंडळातून हाकलपट्टी करण्याची शरदचंद्र पवार पक्षाची मागणी...
- नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रवादी शहर शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून जोरदार घोषणाबाजी...
- विधिमंडळात माणिकराव कोकाटे यांच्या रमी खेळतानाचा व्हिडिओ नंतर विरोधकांकडून कोकाटे यांच्या विरोधात निदर्शने...
12
Report
SGSagar Gaikwad
FollowJul 22, 2025 11:38:12Nashik, Maharashtra:
Feed send by 2c
Reporter-sagar gaikwad
Slug-nsk_wada_Collapse
जुने नाशिक परिसरात असलेल्या चौक मंडईतील जुना वाडा कोसळल्याची घटना
अँकर
नाशिक शहरातील जुने नाशिक परिसरात असलेल्या चौक मंडईतील जुना वाडा कोसळल्याची घटना घडली आहे या घटनेत कुठलीही जीवित हानी झाली नसून परिसरातील नागरिकांच्या वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे जवळपास पाच ते सहा वाहने याखाली दबली गेल्याने मोठा आर्थिक नुकसान नागरिकांचा झाल आहे.. शहरातील जुन्या वाड्यांना महापालिकेकडून नोटिसा बजाविण्यात आल्या आहेत मात्र पुन्हा एकदा या धोकादायक आणि जुन्या वाड्यांचा प्रश्न या घटनेमुळे ऐरणीवर आलाय.
6
Report
AAASHISH AMBADE
FollowJul 22, 2025 11:37:24Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--- 2207ZT_CHP_NCP_SP_PROTEST
( single file sent on 2C)
टायटल:-- रमी प्रकरणात वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घ्या, चंद्रपुरात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयापुढे केली निदर्शने
अँकर:-- विधिमंडळात बसून असलेल्या व रमी खेळणाऱ्या कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राजकीय व संसदीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. राज्यभर या प्रकरणावर टीकेची जोड उठत आहे. चंद्रपुरात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. शेतकऱ्यांप्रती संवेदनशील नसलेल्या कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा आंदोलन कार्यकर्त्यांनी मागितला. हे सरकार शेतकरी हिताचे नसल्याची बाब आंदोलकांनी बोलून दाखविली.
बाईट १) बेबीताई उईके, शहर अध्यक्ष, रा. कॉ. शरद पवार गट
आशीष अम्बाडे
झी मीडिया
चंद्रपूर
14
Report
PPPRANAV POLEKAR
FollowJul 22, 2025 11:37:03Ratnagiri, Maharashtra:
अनिल परब अर्धवट वकील
योगेश कदम सभागृहात नसताना आरोप केले गेले, 35 ची नोटीस न देताच मंत्र्यावर आरोप हेच पहिल्यांदा चुकीचं- रामदास कदम
अनिल परब यांच्यावर हक्कभंग दाखल होणार-
योगेश कदम यांना राजकारणातून उध्वस्त करण्याचा पाप अनिल परब आणि उद्धव ठाकरे यांनी दापोलीत केले
अनिल परबानी मुख्यमंत्र्यांना भेटावस आणि जे काय आहे ते दाखवावे
हिम्मत असेल तर राजीनामा घेऊन दाखवच, रामदास कदम यांचं अनिल परब यांना आव्हान
आम्ही डान्सबार फोडणारे चालवणारे नाही - रामदास कदम
मंत्री झाल्यापासून योगेश कदमानी स्वतः डान्सबार बंद केलेत, म्हणून यांना हे सगळं खटकतंय -
आम्ही लोकांनाचे संसार उध्वस्त करणारे नाहीत संसार बसवणारे आहोत
कदम फॅमिला कसं बदनाम करता येईल, त्यांना कसं संपवता येईल याचा विडा उद्धव ठाकरेंनि उचलला आहे - ramdas kadam
13
Report
NMNITESH MAHAJAN
FollowJul 22, 2025 11:10:05Jalna, Maharashtra:
FEED NAME | 2207ZT_JALNA_BORDIKAR(10 FILES)
जालना : मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र योजनेचा शुभारंभ...
राज्याच्या सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या उपस्थितीत पार पडला कार्यक्रम...
एका महिन्यात एक लाख आणि वर्षभरात आठ लाख मोतीबिंदू ऑपरेशन करण्याचं टारगेट आम्ही ठेवलं आहे; बोर्डीकर यांची प्रतिक्रिया...
लाडकी बहीण योजना फक्त गरजू लाडक्या बहिणींसाठी आहे; बोर्डीकर यांची प्रतिक्रिया...
अँकर : जालन्यात मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र योजनेचा शुभारंभ करण्यात आलाय. राज्याच्या सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला आहे. एका महिन्यात एक लाख आणि वर्षभरात आठ लाख मोतीबिंदू ऑपरेशन करण्याचं टारगेट आम्ही ठेवलं आहे अशी प्रतिक्रिया बोर्डीकर यांनी यावेळी दिली. दरम्यान, राज्यातील सुमारे 10 लाखांपेक्षा जास्त लाडक्या बहिणींचे लाडकी बहीण योजनेचे अर्ज बाद झाले असून त्यांचा योजनेचा लाभ बंद झाला आहे. त्या विषयावर पण बोर्डीकर यांनी आपली प्रतिक्रिया देत लाडकी बहीण योजना फक्त गरजू लाडक्या बहिणींसाठी आहे असं म्हटलंय.
Byte मेघना बोर्डीकर, सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
11
Report
LBLAILESH BARGAJE
FollowJul 22, 2025 11:09:41Pune, Maharashtra:
रिपोर्टर:- लैलेश बारगजे
स्लग:- किरण काळे बलात्कार गुन्हा
फीड 2C
Anc:-
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अहिल्यानगर शहरप्रमुख किरण काळे यांच्या विरोधात अहिल्यानगरच्या कोतवाली बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आलाय..काळे यांना पोलिसांनी ताब्यात घेत अटक करण्यात आली आहे. एकवीस वर्षीय विवाहित महिलेच्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आलाय..पीडित महिला आणि तिचा पती यांच्यात होणारे सततचे वाद मिटवण्यासाठी पीडिता ही किरण काळे यांच्या संपर्कात आल्यानंतर अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आलाय...पीडित महिलेला मदत करण्याचे आमिष दाखवून शिवसेना UBT शहर प्रमुख किरण काळे यांनी वारंवार बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आलाय. काळे यांना आज कोर्टात करण्यात येणार असून पोलीस कस्टडी मागण्यात येणार असल्याचं पोलीस उपाधीक्षक अमोल भारती यांनी सांगितला आहे
बाईट:- अमोल भारती, पोलीस उपाधीक्षक
Anc:-
अहिल्यानगरचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख किरण काळे यांना बलात्काराच्या गुन्ह्यात अटक झाल्यानंतर खासदार संजय राऊत यांनी नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांच्यावर आरोप केले आहे. गेल्या आठ दिवसात किरण काळे यांनी चारशे कोटींचा घोटाळा बाहेर काढला, त्यामुळे त्यांना खोट्या गुन्ह्यात अटक केल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. यावेळी त्यांनी संग्राम जगताप यांचे नाव घेत टीका केली आहे. तर याला आमदार संग्राम जगताप यांनी प्रत्युत्तर देत राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. नेमका काय घोटाळा झाला आहे हे संजय राऊत यांनी समजून घेतलं पाहिजे त्यांनी जे आरोप केले आहे त्याप्रकरणी आम्ही कायदेशीर नोटीस पाठवणार असल्याचे संग्राम जगताप यांनी म्हटल आहे. तर गुन्हा खरा की खोटा हे पोलीस तपास करतील असं संग्राम जगताप यांनी म्हटलं आहे.
बाईट:- संग्राम जगताप, आमदार राष्ट्रवादी AP
16
Report