Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nagpur416005
मनसेने NIT अधिकाऱ्याला फासले, भ्रष्टाचाराचे आरोप!
AKAMAR KANE
Jul 31, 2025 08:17:52
kolhapur, Maharashtra
2c ला व्हिडिओ जोडला आहे ( काळ फासतानाचा असतानाचा व्हिडिओ असाइनमेंटच्या नंबर वर व्हाट्सअप केला आहे ) खूप वेळा प्रयत्न करून 2c ला जोडल्या गेल्या नाही ------- नागपूर - नागपूर सुधार प्रन्यास (NIT) अधिकाऱ्याला मनसे च्या कार्यकर्त्यानी फासल काळ सुरज चव्हाण नावाच्या स्थापत्य अभियांत्रिकी सहायक पदावर असलेल्या अधिकाऱ्याला काळ फासल NIT अधिका-यावर भ्रष्टाचाराचे आरोप करत मनसेने आंदोलन केले मनसे च्या नावाने घोषणाबाजी करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय असो च्या घोषणा देत काळ फासल आणि गळ्यात हार घातला
14
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
SMSATISH MOHITE
Aug 01, 2025 04:47:00
Nanded, Maharashtra:
Satish Mohite Slug - Ned_Hospital Feed on - 2C ----------------------------- Anchor - नांदेडच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात एका वृद्धाच्या पायाला उंदराने कुरतडल्याची घटना ताजी असतानाच आता ग्रामीण रुग्णालयात उंदीर महिला रुग्णाच्या अंगावर फिरत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. कंधार येथिल ग्रामीण रुग्णालयातील हा व्हिडिओ आहे. एक महिला रुग्ण बेडवर झोपलेली असताना उंदीर तिच्या अंगावर फिरत आहे. दुसऱ्या रुग्णच्या एका नातेवाईकाने हा व्हिडिओ मोबाईलमध्ये रेकॉर्ड केलाय. या रुग्णालयात एकच उंदीर नाही अनेक उंदीर फिरत असल्याचे व्हिडिओ मध्ये दिसत आहे. ग्रामीण रुग्णलयातील महिला वार्डात उंदरांचा सुळसुळाट दिसत असल्याने आरोग्य यंत्रणा किती ढिसाळ झाली आहे याचा प्रत्यय पुन्हा एकदा आलाय. आरोग्य यंत्रनाच सलाइनवर असल्याचे दिसून येत आहे. आता आरोग्यमंत्री या प्रकारावर काय उत्तर देतील हे पाहावे लागणार आहे. -------------------------
7
Report
PTPRATHAMESH TAWADE
Aug 01, 2025 04:32:25
Nala Sopara, Maharashtra:
Date-1aug2025 Rep-prathamesh tawade Loc-nalasopara Slug-NALASOPARA DRUGS Feed send by 2c Type-AVB Slug- नालासोपाऱ्यात १८ लाखांचे अमली पदार्थ जप्त नायजेरियन नागरिकाला अटक अँकर - नालासोपाऱ्यात तुळींज पोलिसंकडून अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या एका नायजेरियन नागरिकाला अटक करण्यात आली आहे. यावेळी त्याच्या कडून १८ लाख ४३ हजारांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले. नालासोपारा पूर्वेच्या सेंट्रल पार्क परिसरात एक व्यक्ती अमली पदार्थांच्या विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. याबाबत पोलिसांनी तपास करत चुक्वू एमेका जॉन पॉल (४८) या नायजेरियन नागरिकाला अटक केली. यावेळी त्याच्याकडून ९ लाख ५२ हजार किंमतीचे मेफेड्रॉन (एम. डी.), ८ लाख ९१ हजार किंमतीचे एमडीएमए नावाचा अमली पदार्थ असा एकूण १८ लाख ४३ हजारांचा माल जप्त करण्यात आला. पॉल हा मूळचा नायजेरियन असून नवी मुंबईच्या खारघर येथे वास्तव्यास होता. त्याच्या विरोधात तुळींज पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत. byte - विजय जाधव , पोलिस निरीक्षक , तुळींज पोलिस ठाणे.
4
Report
AAABHISHEK ADEPPA
Aug 01, 2025 04:18:12
Solapur, Maharashtra:
सोलापूर ब्रेकिंग - शेतकऱ्यांचे थकीत ऊस बिल देण्याच्या मागणीसाठी जनहित शेतकरी संघटनेने अधिकाऱ्यांना घातला घेराव - सोलापुरात जनहित शेतकरी संघटनेकडून थकीत बिलावरून प्रादेशिक सहसंचालक कार्यालयात अधिकाऱ्याला घेराव घालत केलं आंदोलन - सोलापूर जिल्ह्यातील थकीत साखर कारखान्याच्या बिलावरून जनहित शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केल आंदोलन - अधिकाऱ्यांसमोर घोषणाबाजी करत साखर कारखाना विरोधात कारवाई करण्याची करण्यात आली मागणी - येत्या आठ दिवसात फसवणूक केलेल्या कारखान्या विरोधात गुन्हे दाखल न झाल्यास तीव्र आंदोलनाचा दिला इशारा..
3
Report
PNPratap Naik1
Aug 01, 2025 04:02:04
Kolhapur, Maharashtra:
पत्नी समजून दुसऱ्याच महिलेवर अंत्यसंस्कार, कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर इथली धक्कादायक घटना कोल्हापूर ( प्रताप नाईक ) कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर इथं स्वतःची पत्नी समजून दुसऱ्याच महिलांवर अंत्यसंस्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. संबंधित महिलेवर अंत्यसंस्कार केल्यानंतर पत्नी गावात हजर झाली आणि त्यानंतर अंत्यसंस्कार झालेली महिला कोण याचा शोध सुरू झालाय. बेवारसपणे सापडलेल्या महिलेच्या गालावर असलेल्या तिळावरून संबंधित पतीने बेवारस मृतदेह आपल्याच पत्नीचा असल्याचं पोलिसांना सांगितलं होतं, त्यानंतर हा सर्व प्रकार घडला आहे. याबाबत अधिक ची माहिती अशी जयसिंगपूर शहरातून 37 वर्षीय महिला बेपत्ता झाली होती. तिच्या पतीने पोलिसात पत्नी बेपत्ता असल्याची फिर्याद दिली होती. यानंतर दहा दिवसांनी सांगली जिल्ह्यातील बामणी नदीपात्रात एका महिलेचा सडलेला मृतदेह पोलिसांना आढळून आला. त्यानंतर पोलिसांनी ज्या पतीने पत्नी हरवल्याची फिर्याद दिली होती त्या पतीला संबंधित महिलेची ओळख पटवण्यासाठी बोलावून घेतलं. त्यावेळी संबंधित पतीने महिलेच्या गालावरील तीळ आणि नेसलेली साडी पाहून आपलीच पत्नी असल्याचे पोलिसांना सांगितले. त्यानंतर सर्व कुटुंबीयांनी मिळून त्या माहिलेवर अंत्यसंस्कार केले. बुधवारी सकाळी या महिलेचे रक्षा विसर्जन देखील पार पडले. यादरम्यान कुटुंबीय, पै पाहुण, मित्र मंडळी दुःखात असताना अचानक संबंधित पतीची पत्नी बचत गटाचा कर्जाचा हप्ता भरण्यासाठी घरी हजर झाली.. त्यावेळी सर्वांनाच धक्का बसला. यावेळी या महिलेला आपण समजून पत्नीने दुसऱ्याच महिलेवर अंत्यसंस्कार केल्याची माहिती मिळताच ती पत्नी पुन्हा घरातून निघून गेली. त्यामुळे अंत्यसंस्कार केलेली महिला नक्की कोण असा प्रश्न उपस्थित राहिला. पोलिसांना या संदर्भात माहिती मिळताच ते देखील खडबडून उठले, त्यांनी संबंधित महिलेला शोधून ती जिवंत असल्याची खात्री केली, पण त्यानंतर जयसिंगपूर पोलिसांनी अंत्यसंस्कार झालेल्या महिलेचा शोध सुरू केलाय. पण बेवारस आणि सडलेल्या अवस्थेत असलेल्या मृतदेहाच्या गालावरील एका तीळाने पती, पत्नी, कुटुंबीय आणि पोलिसांची चांगलीच भंबेरी उडाली आहे.
10
Report
PPPRANAV POLEKAR
Aug 01, 2025 04:01:33
Ratnagiri, Maharashtra:
फुणगुस येथे पुन्हा त्याच ठिकाणी अपघात, ट्रक दरीत कोसळला गुगल मॅपने केला पुन्हा घात संगमेश्वर तालुक्यातील फुणगुस येथील अवघड वळणावर पुन्हा त्याच ठिकाणी सकाळी 10 वाजता दुसरा अपघात झाला आहे. गोव्याहून वसईकडे जाताना गुगल मॅप द्वारे फुणगुस मार्गे हा ट्रक चालला होता. फुणगुस येथील अवघड वळणार गाडीवरील ताबा सुटल्याने अपघात झाला. सुदैवाने चालकाने गाडीतून उडी मारल्यामुळे जीवितहानी टळली. दोन दिवसापूर्वी याच ठिकाणी केमिकल टँकरचा अपघात झाला होता. 15 दिवसातील हा तिसरा अपघात आहे. वारंवार घडणाऱ्या या अपघाताने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. सविस्तर वृत्त असे की, पार्लेजी पेपर रॅपिंग रोल घेऊन ट्रक (एम एच 48 जीबी 2930) घेऊन गोव्याहून वसईकडे चालला होता. यामध्ये 7 टन माल होता. फुणगुस येथे आला अवघड वळणावर चालकाचा ताबा सुटला आणि ट्रक थेट 30- 40 फूट खोल दरीत कोसळला. यावेळी चालकाने गाडीतून उडी मारल्याने बचावला. अपघाताच्या मोठ्या आवाजाने ग्रामस्थानी धाव घेतली आणि मदत केली. चालकाला दरीतून वरती आणत पाणी दिले. ग्रामस्थ किरण भोसले, साहीम खान, प्रशांत थुळ, सुभाष लांजेकर, जमीर नाईक,गावातील ग्रामस्थ यांनी मदत केली. यापूर्वी दोन दिवसापूर्वी देखील अशीच घटना घडली होती त्यावेळेला गावातील ग्रामस्थ किरण भोसले आणि साहिल खान दोन दिवस अहोरात्र मेहनत घेतली.
7
Report
MMMahendrakumar Mudholkar
Aug 01, 2025 04:01:18
Beed, Maharashtra:
बीड : वाहतूक पोलिसांची संयुक्त कारवाई, वाहनधारकांच्या कागदपत्रांची केली तपासणी Anc : बीड जिल्हा वाहतूक विभाग, परळी शहर पोलीस आणि संभाजीनगर पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकाने परळी शहरात राणी लक्ष्मीबाई टॉवर चौकात वाहनधारकांवर धडक कारवाई केली. दुचाकी, चारचाकी आणि ऑटो रिक्षा यांच्यावर लक्ष केंद्रित करत, वाहनचालकांचे ड्रायव्हिंग लायसन्स, वाहनांची कागदपत्रे, तसेच पूर्वी केलेले दंड तपासण्यात आले. वाहतूक शिस्तीचा भंग करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करत नागरिकांमध्ये शिस्तीचे भान ठेवण्याचा प्रयत्न या कारवाईतून करण्यात आला आहे.
8
Report
HCHEMANT CHAPUDE
Aug 01, 2025 04:00:20
Shirur, Maharashtra:
Feed 2C Slug: Shirur Peacock Dance File:01 Rep: Hemant Chapude(Shirur) Anc :-नाच रे मोरा आंब्याच्या वनात... या बालकवींची ओळ शिरुर तालुक्यातील चांडोह गावच्या माळरानावर खऱ्या अर्थानं जिवंत झाल्यासारखी वाटलीय.. Vo :- हिरवं गार माळरान, पावसाच्या सरी पडताच चांडोह येथे एका खुल्या शेतमळ्यात मोराने थाटात आपला पिसारा फुलवला आणि वाऱ्याच्या तालावर मोहक नृत्य सुरु केलंय शंभर रंगांनी नटलेला हा निसर्गकलाकार जणू पावसाचं स्वागतच करतच होता. हा विडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून, निसर्गप्रेमींसाठी हा एक अविस्मरणीय अनुभव ठरत असुन मोराच्या नृत्याने जिवंत दृश्य उभं केलं, जिथे प्रत्येक थेंबात आणि प्रत्येक पिसाऱ्यात सौंदर्य खुललं...! प्रतिनिधी हेमंत चापुडे झी मिडीया शिरूर पुणे...
8
Report
SRSHRIKANT RAUT
Aug 01, 2025 03:47:50
Yavatmal, Maharashtra:
Anchor : यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड यांनी शिवसेना युबीटी आणि काँग्रेसला धक्का दिला आहे, नेर नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष पवन जयस्वाल यांना गळाला लावत त्यांनी नेर तालुक्यात शिवसेना युबीटीला खिंडार पाडले आहे. मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला. विधानसभा निवडणुकीत पवन जयस्वाल यांना उद्धव ठाकरेंनी राठोड यांच्या विरोधात उमेदवारी दिली होती, परंतु ऐन वेळेवर महाविकास आघाडीत ही जागा काँग्रेसला सुटली आणि जयस्वाल यांचा पत्ता कट झाला होता. तत्पूर्वी लोकसभा निवडणुकीत देखील शिवसेना युबीटी खासदार संजय देशमुख यांच्या सोबत जयस्वाल होते, मात्र आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टीने राठोडांनी मोठी खेळी करीत खासदार संजय देशमुख यांना हादरा दिला. अनेक जिल्हा परिषद सदस्य, तसेच माजी नगराध्यक्ष आणि बाजार समितीच्या संचालकांनी शिवसेना प्रवेश केला.
12
Report
GDGAJANAN DESHMUKH
Aug 01, 2025 03:47:18
Parbhani, Maharashtra:
अँकर- हिंगोली जिल्ह्यात वाळू माफियाने महसूल पथकावर हल्ला करीत त्यांच्या ताब्यात असलेला हायवा घेऊन पळाल्याची घटना घडलीय. सेनगाव येलदरी रोडवरील भानखेडा परिसरातील ही घटना असून उपविभागीय अधिकाऱ्यांनी तैनात केलेल्या महसूल पथकाने रात्री बाडे बारा वाजता अवैध वाळू उपसा करणारे वाळूने भरलेला हायबा ताब्यात घेतला होता. सदर हायवा पोलीस ठाण्यात घेऊन जात असताना पांढऱ्या आणि काळया चार चाकी मधून आलेल्या सहा वाळू माफियांनी महसूलच्या पथकाला दगडाने मारहाण करून हायवाच्या खाली उतरवले, त्यांच्या ताब्यात असलेला वाळू ने भरलेला हायवा घेऊन वाळू माफिया पसार झाले,या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून वाळू माफियांना किती मस्ती आली आहे,यांना नेमका कुनाचा वरदहस्त आहे, अशी चर्चा आज रंगलीय, ग्राम महसूल अधिकारी अजय चोरमारे यांच्या फिर्यादीवरून सेनगाव पोलीस ठाण्यात वाळू माफिया शुभम खिलारे नवनाथ राठोड आणि अज्ञात चार जनावर शासकीय कामात अडथळा केल्यासह ताब्यातील वाळू आणि वाहन मारहाण करून पसार झाल्याच्या कलमासह विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत...
9
Report
PPPRAFULLA PAWAR
Aug 01, 2025 03:46:33
Raigad, Maharashtra:
स्लग - नातवानेच केला वृद्ध आजोबांचा खून ...... म्हसळा शहरातील भरवस्तीतील घटना ....... अनोळखी व्यक्तीने खून केल्याचा रचला बनाव ....... पोलिसांनी ठोकल्या नातवाला बेड्या ...... अँकर - रायगडच्या म्हसळा शहरात नातवानेच वृध्द आजोबाचा धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शौकत परदेशी असे मृत आजोबाचे नाव आहे. तर खून करणारा नातू मोहंमद अली परदेशी याला पोलिसांनी अटक केली आहे. अनोळखी व्यक्तीने तोंडावर रुमाल बांधून घरात प्रवेश केला आणि आजोबांचा खून केला आपण त्याचा पाठलाग केल्याचा बनाव नातवाने रचला होता मात्र पोलिस चौकशीत आपणच खून केल्याची कबुली त्याने दिली आहे. थ्रिलर चित्रपट पाहून नातवाने हे कृत्य केल्याचं तपासात पुढे आलं आहे.
9
Report
PPPRANAV POLEKAR
Aug 01, 2025 03:33:25
Ratnagiri, Maharashtra:
ब्रेकिंग : प्रशासनाच्या वादात चिपळूणचे नागरिक वेठीस....नाट्यमय वादाची जिल्हाभर चर्चा. चिपळूण मध्ये नगर परिषद आणि महावितरणच्या आपसातील वादात शहर 3 तास अंधारात.....व्यापारी वर्गाचा प्रशासनाच्या विरोधात संताप. महावितरणची 22 लाखांची थकबाकी राहिल्यामुळे नगर परिषदेचा वीजपुरवठा महावितरण कडून खंडित. तर वीजपुरवठा खंडित केल्याच्या रागातून नगर परिषदेने महावितरण कडून थकीत कराचे कारण देत सब स्टेशन केलं सील... दोघांच्या वादात महावितरणचा सब स्टेशन मध्ये दुरुस्तीसाठी जाण्याचा मार्गच बंद झाल्यामुळे शहरातील नागरिकांसह व्यापाऱ्यांना बसला मोठा फटका. जवळपास तीन तासांहून अधिक काळ शहरातला वीजपुरवठा राहिला खंडित. महावितरण आणि नगर परिषदेचा वाद पोचला थेट पोलिस स्टेशन मध्ये.जिल्हाधिकाऱ्यांच्या मध्यस्थीनंतर प्रकरण तात्पुरते निवळले. प्रशासनात तू तू मैं मैं....नागरिकांची गोची.
9
Report
PNPratap Naik1
Aug 01, 2025 03:33:18
Kolhapur, Maharashtra:
Kop Amababai File Anc :- अंबाबाई मंदिर व परिसर पुनर्विकास आराखडाच्या भूसंपादनासाठी राज्य सरकारने समिती स्थापन केली आहे. या समितीच्या अध्यक्षपदी अपर मुख्य सचिवांची नेमणूक करण्यात आली आहे. यामध्ये जिल्हाधिकारी आणि महानगरपालिका आयुक्तांचाही समावेश करण्यात आलाय. भूसंपादनाचे अन्य पर्याय वापरून कशाप्रकारे भूसंपादन करावे याचे धोरण ठरवणे आणि भूसंपादनाचा खर्च कमी करणे असे या समितीचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
8
Report
HCHEMANT CHAPUDE
Aug 01, 2025 03:32:37
Ambegaon, Maharashtra:
Feed 2C Slug: Malin Adivare Waterfall File:02 Rep: Hemant Chapude (Ambegaon) Anc: आंबेगाव तालुक्याच्या अडिवरे परिसरात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे उंचकड्याच्या डोंगरावरून पांढरे शुभ्र धबधबे खळखळून वाहू लागलेत,हिरवागार निसर्ग बहरलाय दाट धुके दाटून येताय, पावसाच्या हि जोरदार सरी कोसळताय,हे सार विलोभनीय दृश्य मन प्रसन्न करून टाकतंय,या मनमोहर दृश्यांचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी Wkt: हेमंत चापुडे(प्रतिनिधी) प्रतिनिधी हेमंत चापुडे झी मिडीया आंबेगाव पुणे..
11
Report
AAABHISHEK ADEPPA
Aug 01, 2025 03:31:56
Solapur, Maharashtra:
सोलापूर ब्रेकिंग - सोलापुरातील होटगी गावात सराफाचे दुकान फोडून सात लाखांचा मुद्देमाल लंपास - सोलापूर जवळील होटगी गावात चोरट्यांनी सराफाचे दुकान फोडले, सात लाख रुपयांचा मुद्देमाल केला लंपास - सोलापूर रस्त्यावरील बेनक गणपती ज्वेलर्स रात्री साडेतीनच्या सुमारास दोन अज्ञात चोरट्यांनी फोडल्याची घटना - सराफाच्या दुकानाचे शटर उचकटून सोने आणि चांदीचे दागिने नेले चोरून - वळसंग पोलिसांकडून श्वान पथकाच्या माध्यमातून चोरट्यांचा मागावा घेण्याचा करण्यात आला प्रयत्न - सराफ सिद्धाराम हुडे यांनी वळसंग पोलीस ठाण्यात दिली फिर्याद - याप्रकरणी वळसंग पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल Byte: अनिल सनगले, सहाय्यक पोलीस निरीक्षक, वळसंग पोलीस ठाणे
6
Report
PNPratap Naik1
Aug 01, 2025 03:31:49
Kolhapur, Maharashtra:
Kop Chori Feed :-2C Anc :- कोल्हापूर जिल्ह्यातील कागल पंचतारांकित एमआयडीसी मध्ये सुरक्षा रक्षकाचे काम करणाऱ्या व्यक्तीने मित्राच्या मदतीने तेरा लाखाचे साहित्य चोरल्याचे प्रकरण समोर आले आहे. कागल मधील मेट्रो हायटेक टेक्स्टाईल पार्क मधून चोरट्यानी शिलाई मशीनचे 29 बॉक्स चोरले होते. चोरलेल साहित्य विक्रीसाठी नेत असताना कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने कारवाई करत तिघा जणांना अटक केली आहे. याप्रकरणी विजयकुमार सिंग, शफातुला खान, अफजल खान या तिघांना अटक करण्यात आली आहे.
11
Report
Advertisement
Back to top