Back
पुण्यात आमदार सदाभाऊ खोत यांना गोरक्षकांची धक्काबुक्की!
JJJAYESH JAGAD
Aug 26, 2025 02:16:42
Akola, Maharashtra
Anchor : पुण्यातील द्वारकाधीश गोशाळेजवळ आमदार सदाभाऊ खोत यांना धक्काबुक्की करण्यात आल्याची घटना घडली आहे. खोत यांनी गोरक्षकांबाबत केलेल्या वक्तव्यानंतर हा प्रकार घडल्याचे समजते.
यावेळी गोरक्षक आक्रमक झाले आणि त्यांनी आमदारांना लक्ष्य करत धक्काबुक्की केली. एका निवडून आलेल्या आमदारावर अशा प्रकारचा हल्ला होणे गंभीर असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस ( अ. प ) चे आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे.मिटकरी यांनी या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी हा प्रकार निंदनीय असल्याचे सांगत निषेध नोंदवला आहे.
Byte : अमोल मिटकरी , राष्ट्रवादी काँग्रेस ( अ. प ) आमदार
15
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SGSagar Gaikwad
FollowAug 26, 2025 05:30:10Nashik, Maharashtra:
Feed send by TVU 51
Reporter-sagar gaikwad
Slug-nsk__pothole_wt
नाशिक शहरात पावसामुळे पडले मोठे मोठे खड्डे...
अँकर
नाशिक मध्ये होत असलेल्या पावसामुळे शहराभरातील अनेक रस्ते खड्डेमय झाल्याचं पाहायला मिळतंय.... शहरातील अनेक रस्त्यात मोठमोठे खड्डे पडत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत... या खड्ड्यांमुळे नाशिककर हैराण झाले असून या खड्ड्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरी करून करण्यात येते... तर होऊ घातलेल्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अनेक मंडळांनी गणेश उत्सव हा खड्डे मुक्त व्हावा असं नाशिक महानगरपालिकेला सांगितलं असताना महापालिका आयुक्तांनी याबाबत सकारात्मक भूमिका दाखवत गणेश उत्सवाच्या आधीच नाशिक हे खड्डे मुक्त होईल असं सांगितलं होतं.... मात्र प्रत्यक्षात नाशिक शहरातील अनेक भागात मोठ-मोठे खड्डे पाहायला मिळतात... यामुळे नागरिकांना कंबर दुखी पाठ चुकीचा त्रास होताना पाहायला मिळतोय... तर अनेक वाहनांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचं नागरिकांनी सांगितलं... या रस्त्यांकडे पाहिलं तर रस्त्यात खड्डे ही खड्ड्यात रस्ते अशी परिस्थिती निर्माण झाली आहे... या संदर्भात पेठ रोड परिसरात पडलेल्या खड्ड्यांच्या येथून आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड यांनी....
use wkt with byte
0
Report
GMGANESH MOHALE
FollowAug 26, 2025 05:19:12Washim, Maharashtra:
वाशिम:
File:2608ZT_WSM_ST_BUS_APP
रिपोर्टर: गणेश मोहळे,वाशिम
अँकर : प्रवाशांना एसटी बसचे अचूक लोकेशन मोबाईलवर कळावे यासाठी राज्य सरकारने स्वतंत्र अँप लाँच करण्याची घोषणा केली होती.१५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिना पासून हे अँप सुरू करण्याचे आश्वासन दिले गेले होते.मात्र प्रत्यक्षात अद्याप हे अँप सुरू झालेले नसल्याने प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.गणेशोत्सव, नवरात्र,दसरा, दिवाळी अशा सणासुदीच्या काळात एसटी बसमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी असते.अनेकदा बस उशिरा धावल्याने प्रवाशांना अनावश्यक प्रतीक्षा करावी लागते.या गैरसोयी टाळण्यासाठी आणि प्रवाशांना वेळापत्रक व बसचे लोकेशन उपलब्ध करून देण्यासाठी हे अँप विकसित करण्यात आले आहे.मात्र तांत्रिक कारणांचा दाखला देत सरकारकडून अँप कार्यान्वित करण्याची नवी डेडलाईन जाहीर करण्यात आलेली नाही.त्यामुळे प्रवाशांची गैरसोय कायम असून त्यातून नाराजी वाढत आहे.
6
Report
VKVISHAL KAROLE
FollowAug 26, 2025 05:18:57Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:
csn water supply av
feed attached
पाण्याचे टप्पे आता एक दिवसाने कमी; सणासुदीत संभाजीनगरकरांना 'बाप्पा' पावला
ANC : छत्रपती संभाजीनगर शहरासाठी वाढीव पाणीपुरवठा सुरू झाल्याने सणासुदीच्या काळात नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. जायकवाडी ते नक्षत्रवाडीदरम्यान टाकलेल्या ९०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीतून मिळणाऱ्या पाण्यामुळे शहराला आता १७० एमएलडी पाणी उपलब्ध होत आहे. यामुळे पाणीपुरवठ्याचे टप्पे एका दिवसाने कमी झाले आहेत. फारोळा येथील जलशुद्धीकरण केंद्राचे जलपूजन नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यामुळे ऐन सणासुदीच्या काळात शहरवासीयांना जास्त प्रमाणात पाणी मिळू शकणार आहे...
4
Report
SRSHRIKANT RAUT
FollowAug 26, 2025 05:17:52Yavatmal, Maharashtra:
यवतमाळ जिल्ह्यात लाडक्या गणरायाची आतुरता गणेश भक्तांना लागली असून जिल्ह्यात 2513 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून श्रींची स्थापना केली जाणार आहे. आगमन व मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस दलाने बंदोबस्ताचे नियोजन केले आहे, 31 पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी बंदोबस्तासाठी सज्ज झाले आहे. जिल्ह्यात 56 संवेदनशील ठिकाणी असून पुसद मध्ये एक अति संवेदनशील ठिकाण म्हणून नोंद आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांचा विशेष वॉच राहणार आहे. ऑपरेशन प्रस्थान अंतर्गत आदर्श गणेश मंडळ स्पर्धा, डीजे मुक्त मिरवणूक व विविध सामाजिक उपक्रमांसाठी पुरस्कार देण्याची योजना देखील पोलीस दलाकडून आखण्यात आली आहे.
3
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowAug 26, 2025 05:17:38Pune, Maharashtra:
Reporter name : Chaitralli Raajapurkar
Location : Maval
File name : 2608ZT_MAVAL_EWAY_GARDI
Total files : 05
Headline : गणेशोत्सवासाठी गावाला निघालेल्या कोकणवासीयांची पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवरील टोल नाक्यावर गर्दी
Anchor :
गणेशोत्सव साजरा करण्यासाठी अनेक कोकनवासीय हे मुंबई कडून आपआपल्या गावी निघाले आहे. त्यामुळे पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवर वाहतूक ही काहीशी धीम्या गतीने सुरू आहे. पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवरील उर्से टोल नाक्यावर देखील वाहनांच्या काही प्रमाणात रांगा लागल्या आहेत. मुंबई कडून सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागात जाण्यासाठी हे कोकण वासीय निघाले असल्याने ही गर्दी पहायला मिळत आहे. याच उर्से टोल नाका परिसरातून आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधी चैत्राली राजापूरकर यांनी...
Wkt Chaitralli (file no.05)
2
Report
PPPRANAV POLEKAR
FollowAug 26, 2025 05:04:14Ratnagiri, Maharashtra:
ब्रेकिंग
मुंबई गोवा महामार्गावर खवटी गावानजिक अपघात
खाजगी आराम बस आणि मारुती इको कार मध्ये झाला अपघात
इको कार मधील तीन जण गंभीर जखमी
दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान
मुंबई गोवा महामार्ग रहदारीने गजबजला
गणेशोत्सवासाठी हजारो वाहने महामार्गावरून धावत आहेत
3
Report
GMGANESH MOHALE
FollowAug 26, 2025 05:04:01Washim, Maharashtra:
वाशिम:
File:2608ZT_WSM_YELLOW_MOSAIC
रिपोर्टर: गणेश मोहळे,वाशिम
अँकर:वाशिम जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले होते. त्यानंतर आता सोयाबीन पिकावर येल्लो मोझॅक या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. या रोगामुळे सोयाबीनची पानं पिवळी पडत असून पीक कोमेजून सुकत आहे.अतिवृष्टीतून जेवढं पीक वाचलं होतं, त्यातदेखील उत्पादनात मोठी घट होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे आधीच नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसमोर आता या नव्या संकटामुळे चिंता वाढली आहे.
5
Report
GMGANESH MOHALE
FollowAug 26, 2025 05:03:35Washim, Maharashtra:
वाशिम :
File:2608ZT_WSM_FARMER_SON_DEATH
रिपोर्टर:गणेश मोहळे, वाशिम
अँकर :वाशिमच्या मंगरुळपीर तालुक्यातील आसेगाव इथल्या शेतकऱ्याच्या मुलाचा रानडुकरांच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्यानंतर उपचारादरम्यान मृत्यू झालाय. सोहेल खान असं मृत तरुणाचं नाव आहे.५ ऑगस्ट रोजी सोहेल खान आणि त्याचा भाऊ सलमान खान हे दोघं सारसी येथील शेतामध्ये सोयाबीन पिकावर फवारणीसाठी गेले होते. काम आटोपून घरी परतत असताना रानडुकरांनी अचानक त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात सोहेल खान गंभीर जखमी झाला होता तर त्याचा भाऊ सलमान याला किरकोळ दुखापत झाली होती.गंभीर अवस्थेतील सोहेल खान याला प्रथम वाशिम येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र प्रकृतीत सुधारणा न झाल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्याला छत्रपती संभाजीनगर येथील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र २५ ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.गरीब कुटुंबातील या तरुणाच्या निधनाची बातमी समजताच आसेगाव गावात शोककळा पसरली.या हल्ल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
6
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowAug 26, 2025 04:49:21Raigad, Maharashtra:
स्लग - गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्यांची हजारो वाहने रस्त्यावर ........ 14 वर्षात पहिल्यांदाच कोकणवासीयांचा प्रवास सुखकर ....... वाहतुकीच्या योग्य नियोजनामुळे कोंडीतून सुटका ...... मुंबई गोवा महामार्ग कोंडीविना ......
अँकर - गणेशोत्सवासाठी कोकण वासिय मोठ्या संख्येने गावी निघाले आहेत . परंतु यंदा प्रथमच त्यांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला नाही. महामार्गावरील खड्डे आणि रखडलेली उड्डाण पुलांची कामं यामुळे ही कोंडी होत असते. मात्र यंदा पोलिसांच्या सुयोग्य नियोजनामुळे वाहतूक कोंडीतून कोकणवासीयांची सुटका झाली. मागील 4 दिवसांपासून हजारो वाहने कोकणात दाखल झाली मात्र रायगड जिल्ह्यात कुठंही वाहनांची कोंडी झाली नाही. महामार्गावरील सद्यस्थितीची माहिती देताहेत आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल पवार.
6
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowAug 26, 2025 04:45:15Ambernath, Maharashtra:
खासदार शिंदे आणि कलानी यांचा एकत्र प्रवास
उल्हासनगरातील राजकीय समीकरण बदलणार ?
Ulh kalani
Anchor लोकसभा निवडण्कीत 'दोस्ती का गठबंधन' म्हणत ' कलानी गटाने शिवसेनेचे उमेदवार खासदार श्रीकांत शिंदे यांना दिलेला पाठिंबा हा केवळ निवडणुकीपुरताच मर्यादित राहणार असल्याचे बोलले जात होते. मात्र रविवारी उल्हासनगरात चालिया महोत्सवाच्या निमित्ताने शिंदे यांनी थेट ओमी कलानी यांच्या वाहनातून प्रवास केल्याने या मैत्रीचे उल्हासनगरत राजकीय पडसाद उमटायला कारणीभूत ठरत आहेत. हा प्रवास केवळ एका कार्यक्रमापरता मर्यांदित होता की, आगामी पालिका निवडणुकोच्या पार्श्वभूमीवर नव्या समीकरणाची नांदी होता, याबाबत राजकिय वर्तुळात चर्चां सुरू आहे, तर, भाजपमध्ये यामुळे अस्वस्थता वाढल्याचे बोलले जात आह. ओमीकलानी यांच्या नेतृत्वाखालील गटाने काही वर्षांपूर्वी भाजपला साथ देत उल्हासनगर महापालिकेवर सत्ता मिळवली होती, मात्र, अडीच वर्षातच भाजपसोबतचे संबंध ताणले गेले, त्यानंतर कलानी गटाने बंडखारी करत पुन्हा शिवसेने सोबत युती केल्याने महापौरपद शिवसेनेला मिळाला , तसच लोकसभा निवडणुकीत ही कलानी गटाने शिंदे यांना पाठिवा दिला त्यानंतर आत पालिका निवडणुकीच्या आधी
वाढत्या मैत्री मुळे भाजपमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे , त्यात महापालिका
निवडणुकीच्या तोंडावर शिंदे-कलानी यांची वाढती जवळीक भाजपसाठी डोकेदुखी ठरत आहे. अलीकडेच ओमी कलानी यांच्या' गटाने शहरातील समस्या घेऊन खासदार श्रीकांत शिं यांची भेट घेतली होती. भाजपा आमदार कुमार आयलानीं यांच्याविरोधात कलानी गट सातत्याने आक्रमक आहे. या मुळे हे नवे समीकरण महापालीका निवडणुकीत महत्वाचं ठरू शकते, तर, कलानी गट शिंदे गटात सोबत केला तर भाजपला ते महागात पडू शकत
चंद्रशेखर भुयार ,उल्हासनगर
4
Report
AAASHISH AMBADE
FollowAug 26, 2025 04:34:47Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--- 2608ZT_CHP_CYCLOTHON
( single file sent on 2C)
टायटल:-- चंद्रपुरात पोलीस दलाच्या वतीने फिट इंडिया सायकलिंग ड्राइव्ह उत्साहात संपन्न , मादक द्रव्य विरोधी अभियानात समाजाचाही सहभाग
अँकर:-- चंद्रपूरात आज सकाळी ‘आधा घंटा रोज, फिटनेस का डोज’ या संकल्पनेवर आधारित फिट इंडिया सायकलिंग ड्राइव्हचे आयोजन करण्यात आले. जिल्हा पोलिस दल, जिल्हा परिषद व क्रीडा विभागाच्या संयुक्त विद्यमाने छोटू भाई पटेल हायस्कूल ते पद्मापूर गेट पासून पोलिस सभागृह तुकूमपर्यंत ही सायकलथॉन घेण्यात आली. या उपक्रमात पोलिस अधिकारी-अंमलदार, पोलिस कुटुंबीय, शालेय विद्यार्थी तसेच गो ग्रीन सायकल ग्रुपच्या सदस्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. ‘से नो टू ड्रग्ज डोज – आधा घंटा रोज, फिटनेस का डोज’ हा संदेश देत फिटनेसला जीवनशैलीचा भाग बनविणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश होता. चंद्रपुरातील मादक द्रव्य विरोधी अभियानात पोलीस दलाच्या वतीने एकीकडे धाडसत्र राबवण्यात येत आहे तर दुसरीकडे तरुणाईला जागृत करण्यासाठी अशा पद्धतीने समाजाच्या साथीने फिटनेस उपक्रम देखील राबवण्यात येत आहेत.
बाईट १) ईश्वर कातकडे, अपर पोलीस अधिक्षक, चंद्रपूर
आशीष अम्बाडे
झी मीडिया
चंद्रपूर
3
Report
ABATISH BHOIR
FollowAug 26, 2025 04:34:31Kalyan, Maharashtra:
कल्याण फुल मार्केटमध्ये गर्दी
पावसाचा फटका फुल बाजारावर.भाव दुप्पट..
Anc..लाडक्या बाप्पाचे आगमन फक्त काही तासांत होणार असून कल्याणच्या फुल मार्केटमध्ये उत्साह रंगला आहे. विविध रंगांची फुले, दूर्वा, केळीची पाने, जास्वंदी आणि इतर पूजेसाहित्य खरेदीसाठी नागरिक मोठ्या प्रमाणात बाजारात गर्दी पहायला मिळत आहे मात्र फुलांचे भावही दुप्पट झाल्यामुळे खरेदीवर परिणाम झालेला मिळत आहे त्यात प्लास्टिक ची फुल वापरत असल्याने याचा फटका फुल व्यापाऱ्यांना देखील बसला आहे याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी आतिश भोईर यांनी
Wkt... आतिश भोईर
Kalyan
7
Report
SMSATISH MOHITE
FollowAug 26, 2025 04:31:52Nanded, Maharashtra:
Satish Mohite
Slug - Ned_Murder
Feed on - 2C
-----------------------------
Anchor - विवाहित मुलीला भेटण्यासाठी आलेला तिच्या प्रियकराची आणि मुलीची हत्या करून दोघांचे मृतदेह विहिरीत टाकल्याची धक्कादायक घटना नांदेड जिल्ह्यात उघडकीस आलीये. उमरी तालुक्यातील बोरजुनी येथील रहिवाशी असलेल्या 19 वर्षीय संजीवनी कमळे आणि 17 वर्षीय लखन भंडारे याचे प्रेमसंबंध होते. गेल्या वर्षी संजीवनीचा विवाह गोळेगाव येथील एका तरुणासोबत लावून देण्यात आला होता. लग्नानंतरही त्यांचे भेटणे सुरु होते. काल सोमवारी लखन संजीवनीला भेटायला गोळेगाव येथे आला होता. दोघांना एकत्र पकडल्यानंतर सासरच्या मंडळींनी संजीवनीच्या आई वडिलांना आणि नातेवाईकांना बोलावून घेतले. संजीवनी चे वडील आणि संजीवनीच्या माहेरच्या नातेवाईकांनी गोळेगाव येथे येऊन दोघांना बेदम मारहाण करून हातापायाला दोरी बांधून मृतदेह बोरजुनी शिवारातील विहिरीत फेकून दिले. रात्री उशिरा दोघांचे मृतदेह विहिरीबाहेर काढण्यात आले. पोलिसांनी संजीवनीच्या वडिलांसह तीन आरोपीना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरु आहे.
Byte - अर्चना पाटील - अप्पर पोलीस अधीक्षक.
Byte - बालाजी भंडारे - मृत मुलाचे वडील
-------------
टीप - दोघांचेही फोटो ब्लर करावेत. मुलगा अल्पवयीन आहे 17 वर्षाचा
4
Report
GMGANESH MOHALE
FollowAug 26, 2025 04:31:39Washim, Maharashtra:
वाशिम:
File:2608ZT_WSM_SHEKH_ON_SULE
रिपोर्टर:गणेश मोहळे, वाशिम
अँकर: संतांच्या भूमीमध्ये ९० टक्के मटण नं खाणाऱ्या लोकांसमोर सुप्रिया सुळेंनी मटन खाण्याची भाषा करून शाकाहारी लोकांना डिवचण्याचं काम केलं याबाबत त्यांना जाब विचारला पाहिजे.अशी टीका माजी अल्पसंख्याख आयोग अध्यक्ष खाटीक समाजाचे नेते हाजी अराफत शेख यांनी केलीये.
नेमकं काय म्हणाले शेख...
राज्यातील एक मोठी नेता पुणे येथील कार्यक्रमात देवाची शपथ घेऊन सर्वांसमोर सांगते की मी मटण खाते ,तेथील 90 टक्के मटण न खाणारे लोक त्यांनी विचार करायला पाहिजे पुणे ही संतांची भूमी आहे तुकाराम महाराजांची भूमी आहे,ती मोठी महिला नेता जाहिर सांगते मी माळ घालत नाही मी मटण खाते माझे पती मटण खातात, माझा नवरा मटण खातो,कुठे काय बोलायचे हे संजय राऊत यांनी समजून घायला पाहिजे, आणि जे मटण न खाणारे लोक आहेत त्यांना डीवचण्याचे काम यांनी केले आहे की नाही याचे उत्तर संजय राऊत यांनाच विचारायला पाहिजे,असे माजी अल्पसंख्याख आयोग अध्यक्ष तथा मुस्लिम खाटीक समाजाचे नेते हाजी अराफत शेख हे वाशिम येथील मुस्लिम खाटीक कुरेशी समाज यांच्या मेळाव्या मार्गदर्शन करण्याकरिता आले असता बोलत होते.
बाईट:हाजी अराफत शेख,माजी अल्पसंख्याख आयोग अध्यक्ष
2
Report
VKVISHAL KAROLE
FollowAug 26, 2025 04:31:17Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:
csn petrol pump av
feed attached
छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर शहरातील आंबेडकर चौकात असलेल्या पेट्रोल पंपावर जमिनीवर पेट्रोल शिंपडून आग लावण्याची घटना समोर आली आहे. ही घटना काल रात्री घडली असून साडेनऊ वाजता ही घटना घडल्याची माहिती आहे.
तरुणाकडून पेट्रोल पंप पेटवून देण्याचा होता प्रयत्न
सुदैवाने पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्या लक्षात आल्याने त्याने आग विजवली
आगा लावणाऱ्या तरुणाने पळ काढला
घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे
1
Report