Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Ahmednagar423109

संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरात यांच्या समर्थनार्थ भव्य शांती मोर्चा!

KJKunal Jamdade
Aug 21, 2025 05:01:25
Shirdi, Maharashtra
Sangmner News Flash बाळासाहेब थोरात यांच्या समर्थनार्थ आज संगमनेर शहरात "शांती मोर्चा".. थोरात यांना धमकी देणाऱ्या कीर्तनकार संग्राम भंडारे यांच्यावर कारवाईची मागणी.. काही दिवसांपूर्वी बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात आमदार अमोल खताळ आणि भाजपा आध्यात्मिक आघाडीचे तुषार भोसले, हिंदुत्ववादी संघटनांनी काढला होता मोर्चा.. थोरात यांच्या समर्थनार्थ भव्य मोर्चाचे आयोजन.. संगमनेरात संग्राम भंडारे यांच्या कीर्तनावरून राजकारण तापलं... काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचा नथुराम गोडसे करू असं कीर्तनकार संग्राम भंडारे यांनी म्हणल्याने थोरात समर्थकानमध्ये संतापाचे वातावरण... काही वेळातच होणार शांती मोर्चाला सुरुवात.... थोरांताच्या कार्यालयाबाहेर गर्दी होण्यास सुरुवात... मोर्चा निघण्याच्या ठिकाणाहून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी... Wkt kunal jamdade
14
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
HPHARSHAD PATIL
Aug 21, 2025 18:15:16
Palghar, Maharashtra:
अँकर _ पालघर जिल्ह्यातील बोईसर औद्योगिक सुरक्षित अभावी पुन्हा एकदा चार कामगारांचा बळी गेलाय. कंपनी व्यवस्थापनाच्या निष्काळजीपणामुळे हे मृत्यू झाल्याचे आरोप मृतांच्या नातेवाईकांनी केले आहेत. vo -1. बोईसर तारापूर एमआयडीसीतील प्लॉट नंबर एफ 13 वर असलेल्या मेडली फार्मासिटिकल या कंपनीत दुपारी तीन वाजताच्या सुमारास वायू गळती झाल्याची घटना समोर आली आहे . नायट्रोजन रिएक्शन टॅंक मध्ये वायु गळती झाली असून यात आतापर्यंत चार कामगारांचा मृत्यू झाला झाला तर चार कामगार गंभीर जखमी झाले आहेत . या जखमी कामगारांवर सध्या बोईसर मधील शिंदे या खाजगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू करण्यात आले आहेत . एल बेंडोझोल नामक औषधाच उत्पादन घेणाऱ्या या कारखान्यात तीन वाजताच्या सुमारास वायू गळती झाली असून या वायुगळतीची बाधा आठ कामगारांना झाल्याचं सांगितलं जातय . मात्र यानंतर चार कामगारांचा रुग्णालयात नेण्याआधीच मृत्यू झाला असून चार कामगारांवर उपचार सुरू करण्यात आले आहेत. कल्पेश राऊत , बंगाली ठाकूर , धीरज प्रजापती आणि कमलेश यादव अशी मृतांची नावे असून रोहन शिंदे , निलेश हाडळ या दोन गंभीर जखमी कामगारांवर अति दक्षता विभागात उपचार सुरू आहेत . दरम्यान बोईसर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून सध्या बोईसर पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास केला जातोय . बाईट _ यतीश देशमुख _पोलिस अधीक्षक. vo _2 बोईसर तारापूर एमआयडीसी वायू गळती , कारखान्यांमध्ये घडणाऱ्या दुर्घटना असे प्रकार वारंवार सुरूच आहेत . दुर्दैवाने बोईसर तारापूर एमआयडीसीतील कारखान्यांकडून वेळेत फायर ऑडिट , स्ट्रक्चरल ऑडिट , तसंच कामगारांची योग्य काळजी घेतली जात नसल्याने अशा दुर्घटनांमध्ये कामगारांना आपला जीव गमवावा लागतोय . बाईट _ मृताचे नातेवाईक. vo _3 या मात्र संबंधित प्रशासन अशा गंभीर दुर्घटनांकडे दुर्लक्ष करत असल्याने या एमआयडीसीत दुर्घटनांची मालिका काही कमी होताना दिसत नाहीये . त्यामुळे या एमआयडीसीत काम करणाऱ्या कामगारांसह परिसरात राहणाऱ्या नागरिकांना आपला जीव मुठीत घेऊन राहावं लागत असल्याचे चित्र आहे . हर्षद पाटील झी 24 तास पालघर.
14
comment0
Report
SMSarfaraj Musa
Aug 21, 2025 16:45:33
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:
स्लग - कृष्णा नदीची पाणी पातळी स्थिरावू लागली! दिवसभरात अवघी दीड फुटाने झाली आहे वाढ.. अँकर - सांगली मध्ये कृष्णाकाठाला दिलासा मिळाला आहे,कृष्णा नदीचे पाण्याची पातळी आता स्थिरावत चाललेली आहे,अत्यंत संथ गतीने कृष्णा नदीची वाढ सुरू आहे,सकाळ पासून केवळ दीड फूट इतकी वाढ झाली आहे.सांगलीतील आयर्विन पूल या ठिकाणी रात्री नऊ वाजेपर्यंत 43.8 इंच इतकी पातळी झाली होती.कोयना धरणातून कमी करण्यात आलेला विसर्ग आणि नदी पाणलोट क्षेत्रात पावसाचा ओसरलेलं जोर,यामुळे आता कृष्णा नदीचे फुटा-फुटाने वाढणारी पाण्याची पातळी अत्यंत संथ गतीने वाढत आहे.रात्री नंतर हे पाणी स्थिर होईल असा,अंदाज व्यक्त करण्यात येत आहे,त्यामुळे कृष्णाकाठावर घोंगावणारे महापूराचे संकट तूर्त टळल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
14
comment0
Report
AKAMAR KANE
Aug 21, 2025 15:48:31
kolhapur, Maharashtra:
Ngp Ajit Pawar program live u ने फीड पाठवले ------ नागपूर उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस (AP ) पक्षाचे नेते अजित पवार यांनी नागपुरात पूर्व विदर्भातील जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांसोबत जिल्हावार आढाव बैठक घेतली त्यानंतर आता गणेशपेठ येथील राष्ट्रवादी कार्यालयबाहेर ते कार्यकर्त्यांना ते संबोधित करतील live फ्रेम ----------- प्रशांत पवार (राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष ) ( IMP --- *राष्ट्रवादीची नागपुरातील अवस्था आणि खंत मांडली* ) आम्ही फडणवीस आणि गडकरीकरता काम केले.. मात्रनागपुरात आम्हाला कोणी accept करत नाही --- एकही मंत्री आम्हाला नागपुरात आल्यावर सांगत नाही.(राष्ट्रवादीचे).. आम्हाला वाळीत टाकल्यासारखे वागवतात.. कुणीच सांगत नाही इंद्रनिल नाईकला प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले नागपुरचे आयुक्तही भेटायला तयार नसतात.. पोलीस प्रशासन मदत करत नाही .... आमच्या आंदोलनाला परवानगी देत नाही --राजेंद्र जैनही आमचे फोन घेत नाही (ते व्यासपीठवर उपस्थित आहे ) ---- आम्हाला हिणवतात.. आम्हाला नागपुरात 40 जागा द्या ---------------***------ अजित पवार ( नागपुरातील कार्यकर्त्यांच्या आणि पक्षातील पदाधिकाऱ्च्या कामाच्या पद्धतीवर व्यक्त केली नाराजी... आणि खडसावलं ) ---मी वर्धा जिल्ह्याचा आढाव घेतला... तिथे पक्षप्रवेश पण होता -- आज रात्री नागपुरातुन जाणार होतो --- प्रशांत पवार यांनी काही प्रश्न मांडले -- राजकीय जीवनात काम कसे करून घ्यायचे याचे नियम आहे --- नागपुरातील विजयगड (शासकीय बंगल्यावर) स्टाफ ठेवला आहे मात्र त्यांनी सांगितले की कार्यालयात जिल्ह्याध्यक्ष वा कोणी येत नाही (लोकांचे काम घेवून) -- राजेंद्र जी तुम्ही मला यादी द्या .. त्यांच्याकडून प्रशासनकडून(अधिक-र्याकडून काम करण्याचे सांगतो ) --- काम झाले नाही आम्ही काय करू असे तुम्ही --काम केले की की मते मिळतात असे नाही ... तुम्ही कोणता मुद्दा उचलता हे पण महत्वाचे ---मी सकाळी सहा पासून काम करतो.. आमच्या मतदारसंघात... कोण कायकलाल काम करतो सांगा -- वयक्तिक काम घेवून नको... -- ऑक्टोबर पर्यंत विदर्भातील सर्व जिल्हे कव्हर करणारं -- कार्यकर्त्याने आपली इमेज जपावी.. नाहीतर त्यामुळं माझ, पक्षाचे नाव खराब होइल.. महिलांचा सन्मान करा --कुणी माझ्या नावावर दुकानदारी करत असेल तर मी बंदोबस्त करेल --आपण चांगले कार्यकर्ते हेरले पाहिजे.... काही कार्यकर्ते असे असतात दिखावा करतात मात्र 50 मतं मिळत नाही -- काही पदाधिकारी काम करत नसल्याची तक्रार केली
14
comment0
Report
AKAMAR KANE
Aug 21, 2025 14:47:53
kolhapur, Maharashtra:
Ngp Ajit Pawar program live u ने फीड पाठवले ------ नागपूर उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस (AP ) पक्षाचे नेते अजित पवार यांनी नागपुरात पूर्व विदर्भातील जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांसोबत जिल्हावार आढाव बैठक घेतली त्यानंतर आता गणेशपेठ येथील राष्ट्रवादी कार्यालयबाहेर ते कार्यकर्त्यांना ते संबोधित करतील live फ्रेम
14
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Aug 21, 2025 14:46:55
Bhandara, Maharashtra:
Pravin Tandekar Gondia Slug - 2108_GON_FOOD_POISONING FILE - 2 VIDEO 4 IMAGE मुदत संपलेला जलजीरा खाल्ल्याने शालेय विद्यार्थिनींना विषबाधा.... 7 विद्यार्थिनींवर गोरेगाव रुग्णालयात उपचार सुरू... मध्यान भोजन केल्यानंतर मुलींनी शाळेलगतच्या दुकानातून जलजीरा खाल्याची माहिती... Anchor : गोंदियाच्या गोरेगाव तालुक्यातील पाथरी येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थिनींनी जलजीरा खाल्ल्याने विषबाधा झाल्याची घटना आज घडली... दुपारी शाळेत जेवण केल्यानंतर पाचव्या वर्गाच्या मुलींनी शाळेलगत असलेल्या दुकानातून जलजीरा घेतला व तो पिण्याच्या पाण्यात टाकून पिल्यानंतर त्यांना मळमळ, उलटी आणि पोटात दुखण्याचा त्रास झाला. एकाच वर्गातील 7 विद्यार्थिनींना एका सोबत पोटात दुखू लागल्याने शिक्षिकेने विद्यार्थिनींना विचारणा केली असता जलजीरा खाल्ल्याची माहिती विद्यार्थ्यांनी दिली. त्या जलजिराचे पॅकेट तपासले असता 2025 च्या जानेवारी महिन्यात त्याची मुदत संपल्याचे समोर आले.. त्यानंतर लगेच शिक्षकांनी सातही मुलींना गोरेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहे.. तर सध्या विद्यार्थिनींची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे....
14
comment0
Report
YKYOGESH KHARE
Aug 21, 2025 14:32:10
Nashik, Maharashtra:
nsk_youthsucide feed by 2C Anc: मालेगावात आज दुपारी एक वाजेच्या सुमारास नवीन बस स्टँड समोरील नवीन झालेल्या उड्डाण पुलावरून एका माथेफिरू फिरत थोडा आक्रोश करत होता... लोकांनी त्याला  समजावन्याच्या प्रयत्न केला मात्र... सदर तरुण हा काहीतरी स्टंट करत असल्याचे समजते... नंतर थोड्या वेळाने त्याने डायरेक त्या उड्डाण पुलावरून उडी मारली... आणि एका ऍपे रिक्षाच्या कोपऱ्यावरून जाऊन तो तरुण थेट रस्त्यावर कोसळला... सदर तरुणाने 25 ते 30 फुटांवरून उडी मारली तरुण अत्यवस्थ आहे. ... त्याच्या खिशात काहीतरी नशा करणारी पुडी सापडल्याचे समजते... त्याचे वर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत...
14
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Aug 21, 2025 14:31:47
Yavatmal, Maharashtra:
PKG Anchor : यवतमाळच्या दारव्हा शहरात रेल्वे उडान पुलासाठी खोदलेल्या खड्ड्यातील पाण्यात बुडून चार मुलांचा मृत्यू झाल्याने नागरिकांनी रेल्वे प्रशासन संबंधित कंत्राटदार आणि रुग्णालय प्रशासनावर संताप व्यक्त केला आहे. पालकमंत्री संजय राठोड यांच्या मतदारसंघातच सुविधा व सुरक्षेची बोंबाबोंब असल्याचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. VO 1 : दारव्हा येथील रेल्वे स्टेशन परिसरात रेल्वे मार्गासाठी हा निर्माणाधीन पूल असून, त्याच्या पिलर साठी मोठा खड्डा खनलेला आहे, पावसामुळे या खड्ड्यात पाणी साचले होते. ज्यात बुडून रीहान खान, गोलु नारनवरे, सोम्या खडसन, वैभव बोथले ही दहा ते चौदा वर्षे वयोगटातील शाळकरी मुले बुडाली. वेळेत उपचार न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाला. नागरिकांनी या मुलांना बेशुद्ध अवस्थेत बाहेर काढले, परंतु दारव्हा येथील पन्नास खाटांचे उपजिल्हा रुग्णालय ट्रॉमा केअर युनिट येथे त्यांच्यावर उपचार होऊ शकले नाही परिणामी त्यांना यवतमाळमध्ये हलविण्यात आले. दरम्यान त्यांनी दम तोडला. बाईट : बिमोद मुधाणे : नागरिक सादिक शेख : नागरिक VO 2 : रेल्वे उडान पुल उभारणार्‍या कंत्राटदाराने तसेच रेल्वे प्रशासन आणि संबंधित जिल्हा प्रशासन यांनी देखील हलगर्जीपणा दाखविला. पावसाळ्यापूर्वीच अशी ठिकाणे बंदिस्त करण्याकडे त्यांनी दुर्लक्ष केले. परिणामी चार निरागस बालकांचा बळी गेला आहे. त्यामुळे हलगर्जीपणा करणाऱ्या सर्वांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. दरम्यान पोलिसांनी चारही बालकांच्या मृत्यूप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. बाईट : महेंद्र शेटे : नागरिक जनार्दन मुळे : पोलीस निरीक्षक VO 3 : पावसाळा आला कि अनेकांना पोहण्याचा मोह अनावर होतो. अशावेळी साचलेले पाणी दिसेल त्याठिकाणी अनेकजण डुबक्या मारत असतात. सुरक्षेची कोणतीही ठोस उपाय योजना न राबवता अशी ठिकाणे उघडीच पडलेली असतात. त्यामुळे दरवर्षी अनेकांचे जीव जातात. सतत मंत्रिपद असलेल्या दारव्हा सारख्या शहरात आरोग्यवस्थेचाही बोजवारा उडाला असल्याने लोकप्रतिनिधींनी देखील आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे. या घटनेनंतर तरी शासन, प्रशासनाचे डोळे उघडतील का याबाबत साशंकता व्यक्त होत आहे.
14
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Aug 21, 2025 14:18:26
Jalna, Maharashtra:
FEED NAME : 2108ZT_NANDED_WOMEN(2 FILES) नांदेड :पुरात अडकलेल्या गर्भवती महिलेला बोटीच्या सहाय्याने सुखरूप बाहेर काढले अँकर - नांदेड जिल्हयातील हिमायतनगर तालुक्यातील सिरपल्ली गावात अडकलेल्या गर्भवती महिलेला बोटीच्या सहाय्याने सुखरूप बाहेर काढण्यात आले .. पैनगंगा नदी काठी अनेक गावात पाणी साचलय .. सिल्लोडा जवळच्या पुलावरुन पाणी वाहत असल्याने सिरपल्ली गावाचा संपर्क तुटला होता ... या गावातुन एका गर्भवती महिलेला उपचारासाठी आज दाखल करायचे होतं.. आज महसुल विभागाने बोटीच्या सहाय्याने महिलेला बाहेर काढले .. पुढील उपचारासाठी या महीलेला हिमायतनगर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलय.
14
comment0
Report
SKShubham Koli
Aug 21, 2025 13:50:56
Thane, Maharashtra:
6 फूटांच्या गणेशमूर्तीचे विसर्जन कृत्रिम तलावातच करावे – आयुक्त सौरभ राव गणेशमूर्ती विसर्जनासाठी ठाणे महापालिकेने विसर्जन व्यवस्थेत वाढ मा. उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे सहा फुटांपर्यंतच्या सर्व गणेश मूर्तींचे विसर्जन केवळ कृत्रिम तलावात करण्यात येणार आहे. तर, सहा फुटांपेक्षा जास्त उंचीच्या मूर्ती नैसर्गिक जलस्रोतात विसर्जित करता येणार आहे. त्यामुळे कृत्रिम तलाव व फिरत्या विसर्जन व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. गेल्यावर्षी पेक्षा दीड पट जास्तीची विसर्जन व्यवस्था केली असून हरित विसर्जन ॲपही ठाणे महापालिकेने तयार केले असल्याची माहिती महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिली आहे. यावर्षी 23 कृत्रिम तलाव, 77 टाकी विसर्जन व्यवस्था, 15फिरती विसर्जन केंद्र, 09 खाडी घाट विसर्जन व्यवस्था आणि 10 मूर्ती स्वीकृती केंद्र अशा एकूण 134 ठिकाणी विसर्जन व्यवस्था करण्यात आली आहे. खाडी घाट येथे फक्त 06 फूटाच्या वरील गणेशमूर्त्यांचे विसर्जन केले जाईल असेही आयुक्तांनी नमूद केले. विसर्जनाच्या ठिकाणी दोन सत्रात मनुष्यबळाची व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच घाट विसर्जनस्थळी क्रेन आणि वाढीव बार्ज ठेवण्यात येणार आहेत. तरी गणेशभक्तांनी विसर्जनस्थळी नेमण्यात आलेल्‌या कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे तसेच विसर्जनस्थळी देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करावे असेही आयुक्तांनी नमूद केले. हरित विसर्जन ॲपमुळे नागरीकांना त्यांच्या नजीक परिसरात कुठे विसर्जन व्यवस्था आहे, याची माहिती मिळणार आहे. तसेच ठामपाने फिरत्या विसर्जन व्यवस्थेबाबत तयार केलेले मार्गही दिले जाणार आहे. तरी नागरिकांनी हरित विसर्जन ॲपवर नोंदणी करावी व शासनाचे अनुपालन करण्यास सहकार्य करावे असे आवाहन आयुक्त सौरभ राव यांनी केले आहे.
14
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Aug 21, 2025 13:48:05
Pune, Maharashtra:
रिपोर्टर लैलेश बारगजे स्लग:- संभाजी ब्रिगेड लक्षवेध आंदोलन फीड 2C Anc:- अहिल्यानगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संभाजी ब्रिगेडच्या वतीने शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर लक्षवेध आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, मराठा, धनगर आरक्षणाचा प्रश्न सोडवून जातीय तेढ रोखावा, दुध,कांदा अनेक कापसाला योग्य दर मिळावा, अतिवृष्टी झाल्याने ओला दुष्काळ जाहीर करावा तसेच निवडणुका बॅलेट पेपर वरच घेण्यात याव्यात अशा विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आलं. यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष राजेश परकाळे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालय समोर सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत सरकारला जाग यावी यासाठी भजन कीर्तन आंदोलन करण्यात आले. जर सरकारने याची तत्काळ दखल घेतली नाही तर यापुढे मंत्र्यांच्या गाड्या, घरासमोर लक्षवेध आंदोलन करण्याचा इशारा राजेश परकाळे यांनी दिला आहे. बाईट:- राजेश परकाळे, जिल्हाध्यक्ष संभाजी ब्रिगेड.
14
comment0
Report
SKSACHIN KASABE
Aug 21, 2025 13:15:54
Pandharpur, Maharashtra:
Slug - PPR_MODI_MEET file 02 ---- Anchor - सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि माढा लोकसभेचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. माढा लोकसभा मतदारसंघातील दुष्काळी भागासाठी वरदान असलेला तीन हजार 900 कोटी रूपयांचा नीरा देवघर प्रकल्पाचा समावेश केंद्रीय कृषी सिंचन योजनेत करण्याची मागणी केली. तसेच फलटण पंढरपूर रेल्वे बाबतही या भेटीत चर्चा झाली
14
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Aug 21, 2025 13:05:29
Yavatmal, Maharashtra:
AVB यवतमाळच्या वणी शहरातील मोकाट जनावरांचा भर रस्त्यात वावर आणि त्यामुळे वाढलेले अपघात या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ढोरकी आंदोलन करून सर्व मोकाट जनावरे नगरपरिषद कार्यालयात सोडले. मनसेचे शहराध्यक्ष अंकुश बोढे यांनी 'ढोरकी' बनून मोकाट जनावरे ढोल-ताशांच्या गजरात नगरपरिषद कार्यालयात आणली, यावेळी मुख्याधिकाऱ्यांसह कार्यालयीन कर्मचारी गोंधळून गेले. वारंवार तक्रारी करून व कोंडवाडे उपलब्ध असताना देखील कारवाई होत नसल्याने मनसेने हा आंदोलनात्मक पवित्रा घेतला. या आंदोलनामुळे ५ दिवसात समस्या सोडवण्याचे आश्वासन मुख्याधिकाऱ्यांनी मनसैनिकांना दिले. बाईट : अंकुश बोढे : शहर अध्यक्ष मनसे
14
comment0
Report
AKAMAR KANE
Aug 21, 2025 13:05:09
kolhapur, Maharashtra:
पाचपावली पोलीस स्टेशनचा संग्रहित व्हिडिओ पाठवला आहे तसेच पोलीस अधिकाऱ्याचा बाईट आहे --- नागपूर * *पूजेचा नग्न व्हिडिओ पाठवत महिलेसोबत अश्लील कृत्य करणाऱ्या भोंदूबाबावर नागपुरात गुन्हा दाखल....* * हबीबुल्ला मलिक उर्फ मामा असे आरोपी भोंदूबाबाचे नाव असून तो मूळचा पश्चिम बंगाल येथील आहे.. मात्र मागील वीस वर्षापासून नागपुरात स्थायीक झालेला आहे. त्यावर नागपूरच्या पाचपावली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.. * कुटुंबावरील संकट दूर करण्यासाठी महिलेसोबत ओळख वाढवून भोंदू बाबाने त्या महिलेच्या घरात प्रवेश मिळवला होता.. मी काळी जादू जाणतो म्हणुन महिलेला नग्न पूजा करत व्हिडिओ पाठविला.. * भोंदूबाबा गेल्या अनेक दिवसांपासून सदरील महिलेसोबत अश्लील कृत्य करत होता, तसेच महिलेला कुटुंबीयाला जीवे मारण्याची धमकी दिली.. * मात्र महिलेने हिंमत दाखवत पोलिसात तक्रार दिली. त्यानंतर गुन्हा दाखल करत भोंदूबाबाला अटक करण्यात आली आहे... * सदरील भोंदूबाबा त्याच्या भागात मामा म्हणून प्रसिद्ध आहे .. त्याच्या टार्गेटवर कष्टकरी व गरीब लोक असायचे. * तो नेहमी साधारण चहा टपरीवर थांबायचा आणि तेथे लोक घरातील समस्या बोलत असताना.मी काळी जादू करतो म्हणून त्यांना हेरायचा.. ----- बाईट पोलीस अधिकारी पाचपावली पोलीस स्टेशन
14
comment0
Report
ABATISH BHOIR
Aug 21, 2025 13:04:51
Kalyan, Maharashtra:
कल्याण शहरात मध्ये ट्राफिक जाम.. कल्याणच्या सर्व चौकांमध्ये ट्राफिक जाम.. एक तासापासून शहरामध्ये जाम.. कल्याण मध्ये एक तासापासून ट्राफिक जाम चा फटका नागरिकांना दुपार च्या वेळेस ट्राफिक जाम कल्याण शिलफाटा मार्ग, कल्याण भिवंडी मार्ग, कल्याण उल्हासनगर, कल्याण मुरबाड रोड सर्व रस्ते जाम शहरातील अंतर्गत रस्ते देखील जाम.झाल्याने कल्याण कर हैराण झाले आहे ट्राफिक पोलिसांचा शून्य नियोजन व कल्याण शहरात रस्त्यातील असलेले खड्यातचा फटका वाहन चालकांना. शहरातील सगळे रस्ते जाम..
14
comment0
Report
PNPratap Naik1
Aug 21, 2025 13:03:53
Belagavi, Karnataka:
बेळगाव शहरातील डॉ. आंबेडकर रस्त्यावर भाड्याच्या क्षुल्लक कारणावरून रिक्षाचालक आणि दोन महिला प्रवाशांमध्ये जोरदार राडा या वादाचे रूपांतर हाणामारीत महिलांनी रिक्षाचालकावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना रिक्षाचालकाने १५० रुपये भाडे सांगितले असता, महिलांनी नेहमीप्रमाणे ७०-८० रुपये देण्याची तयारी दर्शवली. यावरून दोघांमध्ये जोरदार वाद झाला. या वादानंतर संतप्त झालेल्या महिलांनी रिक्षाचालकाला शिवीगाळ करत मारहाण केल्याची रिक्षा चालकाची तक्रार. मोहम्मद अन्वर मकानदार असं रिक्षाचालकाचे नाव महिलासह इतरांनी केलेल्या या हल्ल्यात रिक्षाचालक जखमी, जखमी रिक्षाचालकाला उपचारासाठी बेळगावातील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले रिक्षा चालकाने भाड्यावरून वाद घातला आणि नंतर आपल्याला मारहाण केली अशी महिलांची देखील तक्रार.
14
comment0
Report
Advertisement
Back to top