Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
RaigadRaigad

अलिबागेत 1000 आदिवासी जोडप्‍यांचा सामुहिक विवाह सोहळा!

PPPRAFULLA PAWAR
Jul 23, 2025 02:32:27
Raigad, Maharashtra
स्लग - एक हजार आदिवासी जोडपी अडकली विवाह बंधनात अलिबागेत पार पडला सामुहिक विवाह सोहळा अँकर – अलिबाग तालुक्‍यातील पांडवादेवी येथे आदिवासी जोडप्‍यांचा सामुहिक विवाह सोहळा आयोजीत करण्‍यात आला होता. या कार्यक्रमात 1 हजार आदिवासी जोडपी विवाह बंधनात अडकले. मुलनिवासी आदिवासी कातकरी समाज विकास सेवा संस्‍थेने या उपक्रमाचे आयोजन केले होते. हरिव्‍दार येथील डॉ. भगवती नंदा आखाडयाच्‍या महामंडलेश्‍वर यांनी या उपक्रमाचे कौतुक केलं.
14
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
NMNITESH MAHAJAN
Jul 23, 2025 10:04:34
Jalna, Maharashtra:
FEED NAME | 2307ZT_JALNA_FRMR_DEMAND (7FILES) जालना : जिल्ह्यातील 8 महसूल मंडळात अतिवृष्टी, पंचनामे करण्याची शेतकऱ्यांची मागणी,जमिनीही गेल्या खरडून, आमदार बबनराव लोणीकरांकडून नुकसानग्रस्त मंठा,परतूर भागात पाहणी, अंबड, घनसावंगी तालुक्यातही नुकसान अँकर | जालना जिल्ह्यातील 4 तालुक्यात गेले दोन दिवस मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे.मंठा,परतूर,अंबड आणि घनसावंगी तालुक्यात जोरदार पाऊस झालाय.या चार तालुक्यातील 8 महसूल मंडळात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यानं पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून पिकं पाण्याखाली आलीयत.तर मंठा आणि परतूर तालुक्यात नद्या,नाले आणि ओढ्याशेजारी असलेल्या जमिनी खरडल्या गेल्यानं शेतकऱ्यांना चांगलाच फटका बसलाय.या नुकसानीचे पंचनामे करावेत अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.परतुरचे आमदार बबनराव लोणीकर यांनी नुकसान झालेल्या परतूर आणि मंठा भागातील पिकांची पाहणी केली असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्याचं आश्वासन दिलं आहे. बाईट : उत्तम मुर्तडकर,शेतकरी(टी शर्ट घातलेले शेतकरी) बाईट | बबनराव लोणीकर, आमदार,परतूर-मंठा मतदार संघ
9
Report
SNSWATI NAIK
Jul 23, 2025 10:03:23
Navi Mumbai, Maharashtra:
story Slug -: जुईनगर मध्ये 2500 किलो मोफत चिकनचे वाटप, नागरिकांची मोठी गर्दी. जुईनगर मे 2500 किलो चिकन बाटे ftp slug - nm chicken destrubet shots - reporter - swati naik navi mumbai Anchor -: नवी मुंबईतील जुईनगर येथे आषाढ महिन्यातील शेवटचा बुधवार निमित्त नागरिकांना 2500 किलो मोफत चिकनचे वाटप करण्यात येतंय. उद्या पासून अमावस्या लागणार असून त्यानंतर श्रावण सुरु होणार असल्याने नागरिक आज गटारी साजरी करतायत. जुईनगर विभागातील माजी नगरसेवक विशाल ससाणे यांच्यातर्फे जुईनगर विभागातील नागरिकांसाठी प्रत्येकी एक किलो चिकन मोफत वाटण्यात येत असून चिकन घेण्यासाठी नागरिकांनी देखील तोबा गर्दी केलेली पहायला मिळत आहे. बाईट -: विशाल ससाणे
8
Report
SKSACHIN KASABE
Jul 23, 2025 10:02:55
Pandharpur, Maharashtra:
23072025 slug - PPR_SANT_NAMDEV_PAYRI feed on 2c file 03 ----- Anchor - विठोबाचे लाडके भक्त संत नामदेव महाराज यांच्या 675 व्या संजीवन सोहळ्यानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संत नामदेव पायरी येथे समाधीची आरती आरती केली. यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या सह संत नामदेव यांचे वंशज उपस्थित होते. संत नामदेव , संत जनाबाई यांच्या सह नामदेव कुटुंबातील १४ जणांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या समोरील भागात समाधी घेतली. तीच जागा संत नामदेव पायरी म्हणून ओळखली जाते. संत नामदेव पायरी जवळ आरती झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नामदास कुटुंबातील संत पूजन केले.
7
Report
SKSACHIN KASABE
Jul 23, 2025 09:39:59
Pandharpur, Maharashtra:
23072025 slug - PPR_CM_BYTE file 02 ---- Anchor - राज्यपाल हे संवैधानिक आहेत. राज्यपालांना कोणत्याही राजकीय वादात ओढण चुकीच आहे.असे स्पष्ट मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पंढरपुरात व्यक्त केले. मराठी भाषेवरून राज्यात वाद सुरू आहे या वादामध्ये राज्यपालांनी उडी घेतली होती मला मारले तर मी मराठीत कसे सांगायचे असे मत राज्यपाल आणि व्यक्त केले होते यावर राज्यपालांच्या वक्तव्यावर विरोधकांनी टीका केली होती त्यानंतर आता मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना राजकीय वादात ओढणी चुकीचे आहे. राज्यपाल बोलतात ते योग्यच बोलतात. अचे स्पष्ट मत व्यक्त केले आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज संत नामदेव महाराज संजीवन समाधी सोहळ्यासाठी पंढरपुरात आले आहेत यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना राज्यपालांच्या वक्तव्यावर मत व्यक्त केले. पंढरपुरात विकास आराखडा तयार केला जाणार आहे. पंढरपूरचा विकास करणे म्हणजे चोरी नाही कोणतीही गोष्ट लपून-छपून केली जाणार नाही ा संदर्भात जे बाधित होणार आहेत त्यांच्याशी मी चर्चा करायला तयार आहे परंतु कोणत्या पुढार्‍यांशी चर्चा करण्याची गरज नसल्याचे यावेळी त्यांनी स्पष्ट केले. माझ्या जन्मदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या त्याला तेवढ्याच अर्थानं बघितलं पाहिजे. आम्ही एकमेकांचे राजकीय विरोधक आहोत वैरी नाही. माझ्या जन्मदिवसाच्या निमित्ताने त्या शुभेच्छा होत्या त्याला चुकीचा अर्थ काढू नये अन्यथा आपण कुठल्यातरी चुकीच्या संस्कृतीला पुढे नेत आहोत असे होईल -------- Byte - देवेंद्र फडणवीस
8
Report
SKSACHIN KASABE
Jul 23, 2025 09:38:22
Pandharpur, Maharashtra:
23072025 Slug - PPR_CM_DARSHAN feed on 2c file 01 ---- Anchor - आषाढी एकादशी नंतर 17 दिवसांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी यांचे दर्शन घेतले. यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे उपस्थित होते. यानंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडून सत्कार करण्यात आला सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांच्या सह सदस्य उपस्थित होते.
12
Report
MMMahendrakumar Mudholkar
Jul 23, 2025 09:33:01
Beed, Maharashtra:
बीड : महादेव मुंडे खून प्रकरणात वाल्मीक कराड, भावड्या कराड, श्री कराड, गोट्या गीते व राजा फड यांचा पीसीआर घ्या, बंगल्यावरून फोन आला आणि तपास थांबला या सर्व प्रकाराची चौकशी करा; ज्ञानेश्वरी मुंडे यांची मागणी अँकर : वाल्मीक कराडला एसपी साहेबांनी तात्काळ पी सी आर मध्ये घेतलं पाहिजे.. कारण बंगल्यावरून फोन आला आणि तपास थांबवला.. मग वाल्मीक कराड यानेच फोन केला आणि तपास थांबविला.. यामध्ये जो भावड्या कराड आहे त्याच्या नावे बारा गुंठे जागा आहे ती जागा माझे पती महादेव मुंडे खरेदी करणार होते.. याबरोबरच श्री कराड, गोट्या गीते आणि राजा फड या सगळ्यांचा पीसीआर घेतला पाहिजे.. आता जो जन आक्रोश होत आहे तो थांबवण्यासाठी ही कारवाई करणे गरजेचे आहे.. मुख्यमंत्र्यांनी देखील सभागृहात आश्वासन दिले आहे की कोणालाही पाठीशी घालणार नाही मग या प्रकरणात या सर्वांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करावी अशी मागणी महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी केली आहे.. बाईट : ज्ञानेश्वरी मुंडे, महादेव मुंडे यांच्या पत्नी
14
Report
SKSACHIN KASABE
Jul 23, 2025 09:32:53
Pandharpur, Maharashtra:
23072025 Slug PPR_VIRTUAL_GOGAL feed on 2c file 02 --- Anchor - राज्यात पहिल्यांदा व्हर्च्युअल रिॲलिटी गॉगल माध्यमातून श्री विठ्ठल रुक्मिणीची महापूजा पाहण्याचा अनुभवण्याचा उपक्रम शुभारंभ आज मंदिरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. व्हर्च्युअल वर्ल्ड कंपनी माध्यमातून श्री विठ्ठल रुक्मिणी यांची महापूजा मंदिर,गाभारा याचे 3D चित्रीकरण केले आहे. तसेच देवाची विविध रूपे दिसणार आहेत. व्हर्च्युअल रिॲलिटी गॉगल घातल्यानंतर भाविकांना साक्षात देवासमोर उभे असल्याचा अनुभव भाविकांना येतो. देशात उज्जैन , काशी विश्वेश्वर यानंतर महाराष्ट्रात प्रथमच पंढरपूर मध्ये या उपक्रमाचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांच्या उपस्थितीत झाला.
13
Report
KPKAILAS PURI
Jul 23, 2025 09:13:42
Pune, Maharashtra:
pimpri kumbhar kailas puri Pune 23-7-25 feed by 2c Anchor - वादग्रस्त निलंबित आयएएस अधिकारी पूजा खेडकर हिचा नॉन क्रिमिलियर दाखला नाशिकच्या उपविभागीय आयुक्तांनी रद्द केलाय... सुरुवातीपासून या प्रकरणाचा पाठपुरावा करणाऱ्या कुंभार यांनी याबाबत समाधान व्यक्त केलं. पूजा खेडकर प्रकरणात कारवाईला उशीर लागत असला तरी आज ना उद्या सर्व बाहेर पडेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. याच संदर्भात विजय कुंभार यांच्याशी बातचीत के लिए आमचे प्रतिनिधी कैलास पुरी यांनी....! kailas 1 to 1
13
Report
SMSATISH MOHITE
Jul 23, 2025 08:36:20
Nanded, Maharashtra:
Satish Mohite Slug - Ned_UBT_Contro Feed on - 2C --------------------------- Anchor - नांदेडमध्ये उद्धव ठाकरे सेनेतील वाद पदाधिकारी निवडीवरून चव्हाट्यावर आला. संपर्क प्रमुखासमोरच राडा घालण्यात आला. कालच्या राड्यानंतर माजी जिल्हाप्रमुख आणि माजी महानगरप्रमुखाची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली. काल मेळाव्यानिमित्त उद्धव ठाकरे सेनेचे संपर्कप्रमुख बबन थोरात नांदेडमध्ये आले होते. प्रमोद खेडकर यांना काढून दुसऱ्याला जिल्हाप्रमुखपद दिल्याने खेडकर यांनी बैठकीत चांगलाच राडा घातला. पोलीस अधीक्षक अबिनाशकुमार यांनी तात्काळ दाखल होत परिस्थिती नियंत्रणात आणली होती. संपर्कप्रमुख हे पैसे घेऊन पद वाटप करत असल्याचा आरोप खेडकर यांनी केला. संपर्कप्रमुख थोरात यांना शिवसेना स्टाईल चोप दिल्याचेही खेडकर म्हणाले. पण मला मारहाण झाली नाही, कार्यकर्त्यांमध्ये वाद झाल्याचे संपर्कप्रमुख बबन थोरात म्हणाले. पैसे घेतल्याचे आरोप नेहमी होतात असेही थोरात म्हणाले. दरम्यान या सर्व राड्यानंतर माजी जिल्हाप्रमुख प्रमोद खेडकर आणि माजी महानगरप्रमुख गौरव कोटगिरे यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. दैनिक सामनामधून ही हकालपट्टी आज जाहीर करण्यात आली. Byte - प्रमोद खेडकर - माजी जिल्हाप्रमुख यु. बी. टी. Byte - बबन थोरात - संपर्कप्रमुख यु. बी. टी. -----------------------------
14
Report
JJJAYESH JAGAD
Jul 23, 2025 08:36:06
Akola, Maharashtra:
Anchor : अकोल्याच्या बाळापूर तालुक्यातील पारस येथील मन नदीवरील बॅरेजचे दोन गेट 6100 क्यूसेक्सने उघडले आहेत. पातूर तालुक्यात जोरदार पाऊस झाल्याने मन नदीत पूर परिस्थिती निर्माण झाल्याने, ह्या बॅरेजचे दोन दरवाजे उघडण्यात आपले आहेत. काल पारस येथे ढगफुटी सदृशय पाऊस झाल्याने मोठे नुकसान झाले होते. तर आता काल रात्री झालेल्या पावसामुळे बॅरेजचे गेट उघडण्यात आले आहेत. नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
13
Report
SKSudarshan Khillare
Jul 23, 2025 08:08:31
Yeola, Maharashtra:
अँकर:- कृषिमंत्री विधान भवनात रमी खेळू शकतात तर आम्ही तहसील आवारात का नाही असा सवाल उपस्थित करत छावा क्रांतिकारी संघटना व छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी येवला तहसील कार्यालयाच्या आवारात प्रत्येक खेळून गांधीगिरी पद्धतीने कृषी मंत्र्यांचा शासनाचा निषेध व्यक्त केला तसेच लातुर येथे छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना झालेली मारहाणीच्या निषेधार्थ येवला तहसील कार्यालय आवारात पत्ते खेळत गांधीगिरी पद्धतीने आंदोलन केले याच आंदोलनाचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी यांनी सुदर्शन खिल्लारे यांनी
14
Report
NMNITESH MAHAJAN
Jul 23, 2025 08:07:47
Jalna, Maharashtra:
FEED NAME | 2307ZT_JALNA_NCP_DEMAND(8 FILES) जालना : माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेऊन त्यांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करा,राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे मागणी अँकर | कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेऊन त्यांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करा अशी मागणी राष्ट्रवादी शरद पवार पक्षानं जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन देऊन ही मागणी करण्यात आली.यावेळी पक्षाचे पदाधिकारी,कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. कृषिमंत्री कोकाटे सतत शेतकरी विरोधी वक्तव्य करत असून विधिमंडळात प्रश्नोत्तरांच्या तासात ते रमी खेळतात त्यांचं कामात लक्ष नाही.त्यामुळे अशा मंत्र्याला मंत्रिमंडळातून हकला अन्यथा आंदोलन करू असा ईशारा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आला आहे बाईट | निसार देशमुख, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष, जालना
14
Report
SMSarfaraj Musa
Jul 23, 2025 08:07:25
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:
स्लग - अल्पवयीन मुलीवरील अत्याचार व आत्महत्या प्रकरणी आमदार गोपीचंद पडळकर आणि त्यांच्या बंधूची कॉल डिटेलची चौकशी करा - शिवसेना शिंदे गटाची मागणी.. अँकर - सांगलीच्या आटपाडी तालुक्यातल्या करणगणी येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार आणि आत्महत्या प्रकरणात आता भाजपा आमदार गोपीचंद पडळकर आणि त्यांच्या बंधूंच्या कॉल डिटेलची चौकशीची मागणी शिवसेना शिंदे गटाकडुन करण्यात आली आहे.काही दिवसांपूर्वी भाजपाने शिवसेना शिंदे गटाचे आमदार सुहास बाबर यांच्या कॉल डिटेल्सची चौकशी करण्याची मागणी केली होती आता या मागणीनंतर शिवसेना शिंदे गटाच्या युवा सेनेच्या आटपाडी तालुका प्रमुख मनोज-नांगरे पाटील यांनी आमदार गोपीचंद पडळकर आणि ब्रह्मानंद पडळकर यांच्या कॉल डिटेलची चौकशीची मागणी आटपाडी पोलिसांच्या कडे निवेदनाद्वारे केली आहे.अल्पवयीन मुलीवरील अत्याचार आणि आत्महत्या प्रकरणातील आरोपींना वाचवण्यासाठी राजकीय हस्तक्षेप झाला आहे का ? त्यासाठी गोपीचंद पडळकर आणि ब्रह्मानंद पडळकर या दोघा भावांच्या कॉल डिटेलची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी करण्यात आली आहे. बाईट मनोज नांगरे पाटील युवा सेना तालुकाध्यक्ष - शिवसेना, शिवसेना शिंदे गट केली आहे.
14
Report
ABATISH BHOIR
Jul 23, 2025 08:02:29
Kalyan, Maharashtra:
मराठी तरुणीला मारहाण आरोपीला दोन दिवसाची पोलीस कोठडी anchor-मराठी तरुणीला मारहाण करणाऱ्या आरोपी गोकुळ झा याला कल्याण न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. Vo- सुनावणी वेळी गोकुळ झा याने माझ्यावर चुकीची कारवाई म्हणत, माझ्या भावाला का ताब्यात घेतले असे सांगत त्याने न्यायालयात गोंधळ घातला. यावेळी न्यायाधीशांनी कायदेशीर प्रक्रियेत अडथळा आणण्याबाबत गुन्हा दाखल करण्याची तंबी दिल्यावर तो शांत झाला. यावेळी पोलिसांनी त्याची पोलिस कोठडीत रवानगी केली. Byte.. हरीश नायर..फिर्यादी वकील Byte.... संजय धनके.. आरोपी वकील.
14
Report
AKAMAR KANE
Jul 23, 2025 07:35:46
kolhapur, Maharashtra:
2c ला व्हिडिओ बाईट जोडले आहे ( एक बाईट आणि बाकीचे व्हिडिओ असानमेंटला व्हाट्सअप केले आहे ) ------ नागपुरात मध्यरात्री मुलींच्या वस्तीगृहात दोन अज्ञात घुसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय... त्यांनी विद्यार्थिनींचा विनयभंग करण्याचा प्रयत्नही केला - हिंगणा मार्गावरील आयसी चौकातील ओबीसी मुलींच्या शासकीय वसतिगृहातली घटना - दाराची कुंडी काढून आत शिरले आरोपी. वसतीगृहात सीसीटीव्ही, पुरेसी सुरक्षा व्यवस्था नाही - वसतीगृहात ६४ मुली राहतात एका मुलीचा मोबाईल घेऊनंही गेले होते आहेत - एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल - आरोपींना अद्याप अटक नाही... ----- बाईट -- पोलीस अधिकारी तक्रारदार मुलगी
14
Report
Advertisement
Back to top