Back
मालेगाव बॉम्बस्पोट निकाल: हिंदुत्वाला आतंकवाद ठरवण्याचा प्रयत्न!
KJKunal Jamdade
Jul 31, 2025 07:35:13
Shirdi, Maharashtra
Shirdi News Flash
*जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील बाईट ऑन मालेगाव बॉम्बस्पोट निकाल -*
हिंदुत्वाला आतंकवादी ठरवण्या चा प्रयत्न झाला...
त्यामुळे कोट्यावधी लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या...
निकालाची उत्सुकता सर्वांनाच आहे...
भगवा रंग हा हिंदू संस्कृतीचे आणि अध्यात्माचे प्रतीक....
त्याला बदनाम करण्याचा प्रयत्न झाला...
निश्चितपणे न्याय मिळेल अशी अपेक्षा....
Byte - राधाकृष्ण विखे पाटील
14
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PPPRANAV POLEKAR
FollowAug 01, 2025 03:33:25Ratnagiri, Maharashtra:
ब्रेकिंग :
प्रशासनाच्या वादात चिपळूणचे नागरिक वेठीस....नाट्यमय वादाची जिल्हाभर चर्चा.
चिपळूण मध्ये नगर परिषद आणि महावितरणच्या आपसातील वादात शहर 3 तास अंधारात.....व्यापारी वर्गाचा प्रशासनाच्या विरोधात संताप.
महावितरणची 22 लाखांची थकबाकी राहिल्यामुळे नगर परिषदेचा वीजपुरवठा महावितरण कडून खंडित.
तर वीजपुरवठा खंडित केल्याच्या रागातून नगर परिषदेने महावितरण कडून थकीत कराचे कारण देत सब स्टेशन केलं सील...
दोघांच्या वादात महावितरणचा सब स्टेशन मध्ये दुरुस्तीसाठी जाण्याचा मार्गच बंद झाल्यामुळे शहरातील नागरिकांसह व्यापाऱ्यांना बसला मोठा फटका. जवळपास तीन तासांहून अधिक काळ शहरातला वीजपुरवठा राहिला खंडित.
महावितरण आणि नगर परिषदेचा वाद पोचला थेट पोलिस स्टेशन मध्ये.जिल्हाधिकाऱ्यांच्या मध्यस्थीनंतर प्रकरण तात्पुरते निवळले.
प्रशासनात तू तू मैं मैं....नागरिकांची गोची.
0
Report
PNPratap Naik1
FollowAug 01, 2025 03:33:18Kolhapur, Maharashtra:
Kop Amababai
File
Anc :- अंबाबाई मंदिर व परिसर पुनर्विकास आराखडाच्या भूसंपादनासाठी राज्य सरकारने समिती स्थापन केली आहे. या समितीच्या अध्यक्षपदी अपर मुख्य सचिवांची नेमणूक करण्यात आली आहे. यामध्ये जिल्हाधिकारी आणि महानगरपालिका आयुक्तांचाही समावेश करण्यात आलाय. भूसंपादनाचे अन्य पर्याय वापरून कशाप्रकारे भूसंपादन करावे याचे धोरण ठरवणे आणि भूसंपादनाचा खर्च कमी करणे असे या समितीचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
0
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowAug 01, 2025 03:32:37Ambegaon, Maharashtra:
Feed 2C
Slug: Malin Adivare Waterfall
File:02
Rep: Hemant Chapude (Ambegaon)
Anc: आंबेगाव तालुक्याच्या अडिवरे परिसरात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे उंचकड्याच्या डोंगरावरून पांढरे शुभ्र धबधबे खळखळून वाहू लागलेत,हिरवागार निसर्ग बहरलाय दाट धुके दाटून येताय, पावसाच्या हि जोरदार सरी कोसळताय,हे सार विलोभनीय दृश्य मन प्रसन्न करून टाकतंय,या मनमोहर दृश्यांचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी
Wkt: हेमंत चापुडे(प्रतिनिधी)
प्रतिनिधी हेमंत चापुडे
झी मिडीया आंबेगाव पुणे..
0
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowAug 01, 2025 03:31:56Solapur, Maharashtra:
सोलापूर ब्रेकिंग - सोलापुरातील होटगी गावात सराफाचे दुकान फोडून सात लाखांचा मुद्देमाल लंपास
- सोलापूर जवळील होटगी गावात चोरट्यांनी सराफाचे दुकान फोडले, सात लाख रुपयांचा मुद्देमाल केला लंपास
- सोलापूर रस्त्यावरील बेनक गणपती ज्वेलर्स रात्री साडेतीनच्या सुमारास दोन अज्ञात चोरट्यांनी फोडल्याची घटना
- सराफाच्या दुकानाचे शटर उचकटून सोने आणि चांदीचे दागिने नेले चोरून
- वळसंग पोलिसांकडून श्वान पथकाच्या माध्यमातून चोरट्यांचा मागावा घेण्याचा करण्यात आला प्रयत्न
- सराफ सिद्धाराम हुडे यांनी वळसंग पोलीस ठाण्यात दिली फिर्याद
- याप्रकरणी वळसंग पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल
Byte: अनिल सनगले, सहाय्यक पोलीस निरीक्षक, वळसंग पोलीस ठाणे
0
Report
PNPratap Naik1
FollowAug 01, 2025 03:31:49Kolhapur, Maharashtra:
Kop Chori
Feed :-2C
Anc :- कोल्हापूर जिल्ह्यातील कागल पंचतारांकित एमआयडीसी मध्ये सुरक्षा रक्षकाचे काम करणाऱ्या व्यक्तीने मित्राच्या मदतीने तेरा लाखाचे साहित्य चोरल्याचे प्रकरण समोर आले आहे. कागल मधील मेट्रो हायटेक टेक्स्टाईल पार्क मधून चोरट्यानी शिलाई मशीनचे 29 बॉक्स चोरले होते. चोरलेल साहित्य विक्रीसाठी नेत असताना कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने कारवाई करत तिघा जणांना अटक केली आहे. याप्रकरणी विजयकुमार सिंग, शफातुला खान, अफजल खान या तिघांना अटक करण्यात आली आहे.
0
Report
DPdnyaneshwar patange
FollowAug 01, 2025 03:17:29Dharashiv (Osmanabad), Maharashtra:
धाराशिव
DHARA_ATTACK_R1
खंडणीसाठी पवनचक्कीचा कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला,
हल्ल्यात कर्मचारी गंभीर जखमी .
पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
Anchor
धाराशिव- खंडणीसाठी हल्ल्याचं बीड जिल्ह्यातील लोन आता धाराशिव पर्यंत येऊन पोहोचला आहे. लोहारा तालुक्यातील पवनचक्की मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यावर खंडणीसाठी जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे. खंडणीसाठी गुंडांच्या टोळक्याने लाट्या काठ्याने या कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला केला यामध्ये तो गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत . लोहारा तालुक्यातील मोगा शिवारात नंदीपाठी ते धानोरी रस्त्यावर पवनचक्की प्रकल्प सुरू आहे या प्रकल्पावर काम करणाऱ्या विशाल विश्वनाथ पांचाळ या कर्मचाऱ्यावर लाट्या काठ्याने जीवघेणा हल्ला केला एवढेच नव्ह तर त्या ठिकाणी असलेल्या आणखी चार कर्मचाऱ्यांनाही बेदम मारहाण केली. या प्रकरणी लोहारा पोलिसांनी अजित मुसंडे, शंकर मुसांडे ,सुरत साळुंखे ,नरहरी बाबर विशाल जमादार यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून त्यांना ताब्यात देखील घेतला आहे या घटनेमुळे खंडणीसाठी हल्ला केल्याची घटना पुन्हा एकदा समोर आली आहे.
3
Report
SGSagar Gaikwad
FollowAug 01, 2025 03:17:13Nashik, Maharashtra:
Feed send by 2c
Reporter-sagar gaikwad
Slug-nsk_pankja_munde
पंकजा मुंडे दोन दिवस नाशिक दौऱ्यावर
अँकर
भाजपाच्या नेत्या मंत्री पंकजा मुंडे या आज आणि उद्या नाशिक दौऱ्यावर आहे आज दुपारी पंकजा मुंडे नाशिकला पोहोचणार आहे शहरातील क्रेडाईच्या एरोनॉमिक्स 2025 या कार्यक्रमाला त्या उपस्थित असतील यानंतर आमदार सीमा हिरे यांच्या निवासस्थानी जाणार आहे उद्या सकाळी त्रंबकेश्वर येथे त्रंबक राजाचे दर्शन घेऊन आयमा आणि निमा यांच्या उद्योग करांशी बैठक घेणार आहे... बैठक आटपून ते तपोवन येथील सांडपाणी प्रकल्पाची पाहणी करणार असल्याचा दौऱ्यात नमूद करण्यात आला आहे यानंतर ते रात्री बीडच्या दिशेने रवाना होणार आहे... पंकजा मुंडे यांचे दोन दिवस भरगच्च कार्यक्रम नाशकात असणार आहे..
0
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowAug 01, 2025 03:17:08Solapur, Maharashtra:
सोलापूर ब्रेकिंग - सरसंघचालक मोहन भागवत यांना धरून आणण्याचा आदेश होता
- मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील एटीएसचे निवृत्त पोलीस अधिकारी महिबूब मुजावर यांचा मोठा गौप्यस्फोट
- सरसंघचालक मोहन भागवत यांना धरून आणण्याचा होता आदेश
- तपासासाठी राज्यातील कोणतेही कर्मचारी निवडण्याचे स्वातंत्र्य महिबूब मुजावर यांना देण्यात आले होते
- पण हा आदेश न पाळल्याने मला खोट्या गुन्ह्यात गोवण्यात आले
- त्यावेळी एटीएसचे मुख्य सूत्रधार परमबीरसिंह हेच माझे वरिष्ठ होते
- सात-आठ वर्षानंतर मी गुन्ह्यातून निर्दोष सुटलो असं देखील एटीएसचे माजी निवृत्त अधिकारी महिबूब मुजावर यांनी म्हटलं आहे
बाईट -
महिबूब मुजावर ( मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील एटीएसचे निवृत्त तपास अधिकारी )
0
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowAug 01, 2025 03:15:38Shirur, Maharashtra:
Feed 2C
Slug: Shikrapur Mashid Temple Bhonga
File:05
Rep: Hemant Chapude(Shikrapur)
Anc राज्यात भोंग्यांच्या मुद्द्यावरून वातावरण तापलेलं असताना शिरूर तालुक्यातील शिक्रापूर परिसरात मशिद आणि मंदिर, दोघांनीही स्वतःहून भोंगे उतरवत जो सामाजिक सलोखा दाखवला आहे, तो खरंच कौतुकास्पद आहे.या कृतीतून दोन्ही समुदायांनी एकमेकांच्या भावनांचा सन्मान करत, धार्मिक सौहार्द आणि सामाजिक बांधिलकीचा अत्यंत सुंदर संदेश दिला आहे. यामुळे केवळ स्थानिक पातळीवर शांतता राखली गेली नाही, तर इतर भागांसाठीही आदर्श निर्माण झाला आहे.
Byte राजाभाऊ मांढरे (ग्रामस्थ)
Byte: सिराजभाई ( ग्रामस्थ)
Byte: रमेश गडदे (सरपंच)
प्रतिनिधी हेमंत चापुडे
झी मिडीया शिक्रापुर पुणे...
0
Report
VKVISHAL KAROLE
FollowAug 01, 2025 03:15:09Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:
Csn encroachment av
Feed attached
छत्रपती संभाजीनगर मध्ये गेल्या १५ दिवसांपासून थांबलेली अतिक्रमण हटाव मोहीम महापालिका सोमवारपासून पुन्हा सुरू करणार आहे. आतापर्यंत सुमारे साडेचार हजार मालमत्तांवर कारवाई केली आहे. मनपाची कारवाई थांबलेली नाही. मार्किंग करणे सुरू आहे, नागरिकांना स्वतःहून अतिक्रमण काढून देण्यासाठी वेळ देणे, कायदेशीर प्रक्रियेचा अवलंब केला जात आहे असे याबाबत मनपाचे म्हणणे आहे...
सोमवारपासून पोलिस प्रशासनाला सोबत घेऊन पुन्हा पूर्ण पूर्ण क्षमतेने कारवाई सुरू करण्यात येणार आहे. जालना रोड, पैठण रोड, दिल्ली गेट ते हसूल टी पॉइंट, रेल्वे स्टेशन ते महावीर चौक, जळगाव रोड या प्रमुख रस्त्यांवर मनपाने कारवाई केली आहे
0
Report
SGSagar Gaikwad
FollowAug 01, 2025 03:04:23Nashik, Maharashtra:
Feed send by 2c
Reporter-sagar gaikwad
Slug-nsk_cort
( नाशिक कोर्टाचे स्टॉक व्हिज्युअल्स वापरा )
न्यायमूर्ती अभय लाहोटी होणार नाशिकचे जिल्हा सत्र न्यायाधीश
अँकर
बॉम्बस्फोटाचा ऐतिहासिक निकाल देणारे मुंबईतील विशेष एनआयए कोर्टाचे न्यायमूर्ती अभय लाहोटी हे या निकालानंतर त्यांच्या गेल्या महिन्यात झालेल्या बदलीनुसार नाशिकच्या जिल्हा व सत्र न्यायाधीशपदी येत्या सोमवारी रुजू होणार आहे आहेत. मालेगाव येथे सन २००८ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात ६ नागरिकांचा मृत्यू होऊन १००हून अधिक नागरिक जखमी झाले होते. याप्रकरणी सुरुवातीला दहशतवादविरोधी पथकाने तपास करून साध्वी प्रज्ञासिंग यांच्यासह लष्करातील कर्नल प्रसाद पुरोहित याच्यासह १२ जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले. आरोपी केले. या गुन्ह्यात एटीएसने या संशयितांना अटक करून त्यांच्याविरोधात मोक्का अन्वये गुन्हा दाखल करून खटला चालविला होता. नंतर हा तपास राष्ट्रीय तपासी यंत्रणेकडे (एएनआय) वर्ग झाला होता.हा खटला मुंबईच्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश अभय लाहोटी यांच्या समोर चालविण्यात आला. वारंवार न्यायाधीशांच्या होणाऱ्या बदल्यांमुळे निकालाला होणारा विलंब लक्षात घेता न्याय विधी विभागाकडून न्या. लाहोटी यांच्यासमोरी नियमित सुनावणी करण्यात आली. या खटल्यात १६० साक्षीदार तपासून ११०० पानांचे निकालपत्र देण्यात आले. न्या. लाहोटी यांची नियमीत बदल्यांमध्ये गेल्या महिन्यातच नाशिक येथे जिल्हा सत्र न्यायाधीश एक या पदावर नियुक्ती झाली होती. मात्र, या निकालामुळे त्यांना मुदतवाढ देण्यात आली. आता हा निकाल लागल्यानंतर ते येत्या सोमवारपासून नाशिक जिल्हा न्यायालयात वर्ग एक सत्र न्यायाधीश व विशेष मोक्का न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून रुजू होणार आहे.....
3
Report
VKVISHAL KAROLE
FollowAug 01, 2025 03:04:18Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:
Csn mahapalika av
Feed attched
महापालिकेच्या आदेशानुसार रजिस्ट्री साठी आता बेबाकी प्रमाणपत्र किंवा पाणीपट्टी व मालमत्ताकराची भरलेली पावती अनिवार्य करण्यात आली आहे. यामुळे आता मनपाचे कर बुडवणाऱ्यांना चाप बसणार आहे.
राज्य शासनाने २७ जून २०२५ रोजी कलम ५ आणि ७ अंतर्गत आदेश दिला होता. त्यानुसार, कोणतीही शासकीय सेवा देताना संबंधित विभागांनी इतर विभागांच्या डेटाचा वापर करावा. अर्जदाराकडे थकबाकी असल्यास सेवा नाकारावी. या आदेशाची अंमलबजावणी करत महापालिकेने सर्व सेवा (मृत्यू प्रमाणपत्र वगळता) देताना बेबाकी प्रमाणपत्र बंधनकारक केले आहे.
महापालिका हद्दीतील खरेदी-विक्री, तारण, हस्तांतर यांसारख्या व्यवहारांमध्ये रजिस्ट्री आवश्यक असते. मात्र, अनेक व्यवहारांमध्ये थकबाकी, अपूर्ण माहिती आणि बनावट कागदपत्रे आढळत होती. त्यामुळे दस्त नोंदणीपूर्वी मालमत्तेवर कोणतीही थकबाकी नसल्याचा अधिकृत पुरावा आता बंधनकारक करण्यात आला आहे.
4
Report
SGSagar Gaikwad
FollowAug 01, 2025 03:03:07Nashik, Maharashtra:
Feed send by 2c
Reporter-sagar gaikwad
Slug-nsk_mahasuldut
( नाशिकचे महसूल विभागाचे शॉट वापरा)
महाविद्यालयीन विद्यार्थी होणार आता महसूलदूत
अँकर
शासनाच्या योजना नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी नाशिक विभागीय आयुक्तालय महसूलदूत हा उपक्रम राबविणार आहे. ज्या महाविद्यालयीन युवक व युवतींना जनसंपर्काची आवड आहे, ते या उपक्रमात सहभागी होऊ शकतील. तालुक्याचे गाव किंवा जास्त लोकसंख्या असणाऱ्या गावांमध्ये ते काम करणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम यांच्याकडून देण्यात आलीये...महसूल विभागातर्फे १ ते ७ ऑगस्टदरम्यान जिल्ह्यात महसूल सप्ताह राबविण्यात येणार आहे. यानिमिताने आज दुपारी ४ वाजता उत्कृष्ट काम करणारे अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मानही केला जाईल. त्यांची आरोग्य तपासणीही होईल, सप्ताहात आज गौरव सोहळा, २ ऑगस्टला अतिक्रमित जागेचे पट्टे वितरण, ३ पाणंद व शिवरस्त्यांची मोजणी व दुतर्फा वृक्षारोपण, ४ छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान, ५ लाभार्थीच्या गृहभेटी घेऊन तांत्रिक अडचणी दूर करणे, ६ शासकीय जमिनींवरील अतिक्रमणे निष्कासन, ७ वाळू धोरणाची अंमलबजावणी हे उपक्रम करण्यात येणार आहे...
3
Report
VKVISHAL KAROLE
FollowAug 01, 2025 03:03:03Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:
Csn railway update av
Feed attched
संभाजीनगर येथून परभणीपर्यंत १७७किमी रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणासाठी केंद्र सरकारकडून २१७९ कोटींचा निधी मंजूर केला आहे. हा प्रकल्प आगामी चार वर्षांत पूर्ण होणार आहे. यामुळे मुंबई व हैदराबाद या शहरांमध्ये कमी वेळेत प्रवास शक्य होणार आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना येथील पिटलाइन, ड्रायपोर्ट, तसेच नव्याने होणाऱ्या जालना-जळगाव रेल्वेमार्गाला या दुहेरीकरणाचा मोठा फायदा होणार आहे. सध्या मनमाड ते संभाजीनगर या मार्गाचे ९३ किमी दुहेरीकरण सुरू आहे. त्यासाठी ९७० कोर्टीची तरतूद केली आहे. दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर ऑरिक सिटी, बिडकीन औद्योगिक वसाहत यासाठी हे दुहेरीकरण महत्त्वाचे आहे. औद्योगिक विकासासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधांमध्ये हा प्रकल्प मोलाची भर घालेल...
4
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowAug 01, 2025 03:02:44Solapur, Maharashtra:
सोलापूर ब्रेकिंग - सोलापुरातील नामांकित शाळेत दहावीच्या विद्यार्थ्यांनीचा 56 वर्षीय शिक्षकाकडून विनयभंग
- सोलापुरातील नामवंत खाजगी शाळेतून धक्कादायक प्रकार समोर
- खाजगी शाळेतील 56 वर्षीय शिक्षकाकडून दहावीच्या विद्यार्थिनीचा विनयभंग
- 19 एप्रिल ते 3 जुलैच्या दरम्यान शाळेच्या पार्किंग मध्ये घडला प्रकार
- विनयभंग करणाऱ्या शिक्षकाने धमकावल्याने विद्यार्थिनीने कोणाकडेही केली नव्हती तक्रार
- तुला काही ज्ञान नाही, तू काही कामाची नाहीस, तु दहावीला आहे, आता तु चांगली सापडली आहेस अशा अनेक प्रकारे पीडित विद्यार्थ्यांनीला देण्यात येत होती धमकी
- मात्र खाजगी शाळेच्या प्राचार्यांच्या ही बाब लक्षात येताच त्यांच्या सल्ल्याने गुन्हा दाखल
- सदरच्या प्रकाराबाबत सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत
4
Report