Back
गणपती विसर्जनावर चिमुकली शांभवीची भावूक प्रतिक्रिया!
GMGANESH MOHALE
Sept 07, 2025 04:48:58
Washim, Maharashtra
वाशीम:
File:0709ZT_WSM_LITTLE_GIRL_CRIES
रिपोर्टर:गणेश मोहळे, वाशीम
अँकर : वाशीम येथील राम धनगर यांच्या घरी गणपती विसर्जनानंतर दोन वर्षांची चिमकुली शांभवी मखर रिकामे पाहून गोंधळली."गणपा बाप्पा कुठे गेले?" असा निष्पाप प्रश्न विचारत ती धाय मोकळून रडू लागली. विसर्जनाआधी तिने प्रेमाने बाप्पाला मोदक अर्पण केला होता. पालकांनी समजावत सांगितले की बाप्पा पुढच्या वर्षी पुन्हा येतील.मात्र तिच्या निरागसतेतून व्यक्त झालेलं बाप्पाप्रती ममत्व पाहून कुटुंबीय भावूक झाले.या घटनेतून गणेशोत्सव केवळ उत्सव नसून भावनिक बंध जपणारा सोहळा असल्याचं अधोरेखित झालं.
सध्या समाज माध्यमावर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय.
14
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
GMGANESH MOHALE
FollowSept 08, 2025 13:19:21Washim, Maharashtra:
वाशिम:
File:0809ZT_WSM_HUSBAND_WIFE_MURDER
रिपोर्टर:गणेश मोहळे, वाशिम
अँकर: वाशिमच्या मंगरूळपीर तालुक्यातील कोठारी गावात पतीनं कुऱ्हाडीनं वार करत पत्नीची हत्या करून स्वतः आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडलीये.हीम्मत महादेव धोंगडे याने पत्नी कल्पना वर धारदार कुऱ्हाडीने वार करून तिची हत्या केली आणि त्यानंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली. धोंगडे दाम्पत्याला दोन मुली आणि एक मुलगा आहे. रागाच्या भरात झालेल्या कृत्यामुळे ही तीनही मुलं अनाथ झालीत.धोंगडे दाम्पत्याचा सुरुवातीला संसार सुरळीत सुरू होता.मात्र, हीम्मत धोंगडे हा व्यसनाधीन झाल्यानं अलीकडे घरात वाद वाढले होते.आज दुपारी किरकोळ वादानंतर हीम्मतने प्रथम पत्नीची कुऱ्हाडीने वार करून हत्या केला. त्यानंतर काही वेळातच घरातच स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे कोठारी गावात हळहळ व्यक्त होत आहे.
14
Report
SMSATISH MOHITE
FollowSept 08, 2025 13:08:09Nanded, Maharashtra:
Satish Mohite
Slug - Ned_OBCMeeting
Feed on - 2C
--------------------------
Anchor - मराठा आरक्षणा संदर्भात सरकारने काढलेल्या जी आर चा निषेध करण्यासाठी नांदेड जिल्ह्यातील 16 तालुक्यात आणि नंतर संभाजीनगर मध्ये मोठा मोर्चा काढण्याचा निर्णय नांदेडमध्ये झालेल्या सकल ओबीसी परिषदेत घेण्यात आला. भाजप सरकारने ओबीसी च्या पाठीत खंजीर खूपसल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. सरकारने जी आर माघे घरून ज्या नव्याने कुणबी नोंदी देण्यात आल्यात त्या रद्द करण्याची मागणी करण्यात आली. सरकारच्या निर्णयाविरोधात नांदेड जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून आणि नंतर नांदेडमध्ये मोर्चे काढण्याचे बैठकीत ठरवण्यात आले. त्यानंतर जिल्हा स्तरावर मोर्चे काढण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये एकत्रित महामोर्चा काढण्याचा निर्णय परिषदेत घेण्यात आला. येत्या 17 सप्टेंबर रोजी नांदेडच्या पालकमंत्र्यांना झेंडा वंदन करू दिले जाणार नाही, एकाही मंत्र्याला नांदेडमध्ये फिरू दिले जाणार नाही असा इशारा सकल ओबीसी कडून देण्यात आला.
Byte - ओबीसी समन्व्यक
Byte - ओबीसी समन्व्यक
---------------------------
14
Report
SKSudarshan Khillare
FollowSept 08, 2025 13:04:48Lasalgaon, Maharashtra:
अँकर:-
ईद-ए-मिलादुन्नबीच्या निमित्ताने आज लासलगाव शहरात भव्य जुलूस काढण्यात आला. मुस्लिम बांधवांनी पैगंबर हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त एकत्र येत श्रद्धा, भाईचारा आणि ऐक्याचा संदेश दिला जुलूसामध्ये लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी उत्साहाने सहभाग घेतल्याने आनंद आणि उत्साहाचे वातावरण होते या वेळी डेजीवर धार्मिक गीते, नात, आणि भाईचाऱ्याचे संदेश देण्यात आले ठिकठिकाणी शीतपेय व खाद्यपदार्थांचे स्टॉल लावून जुलूसाचे स्वागत केले जुलूसावेळी पोलिस प्रशासनाने विशेष बंदोबस्त ठेवला होता
12
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowSept 08, 2025 13:04:05Bhandara, Maharashtra:
भंडाऱ्यातील रावणवाडी परिसरात आढळला दुर्मिळ चाबूक विंचू..
Anchor - ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लबचा सरीसर्प संशोधक विवेक बावनकुळे हा भंडारा जिल्ह्यातील रावणवाडी जंगल परिसरात फिरायला गेला असता संध्याकाळ च्या सुमारास ऐक वेगळा प्रकारचा विंचू रस्ता ओलांडताना त्याला दिसला. त्याने जवळून बघतील असता नवीन प्रकारची चाबकासारखी बारीक शेपूट असलेली विंचू प्रजाती आढळली असून याविषयी काही उल्लेख सापडेल म्हणून बराच शोध घेतला पण याचा कुठेही उल्लेख विदर्भ, मराठवाड्यात मिळाला नाही. या घटनेची माहिती ग्रीन फ्रेंड नेचर चे कार्यवाह प्रा. अशोक गायधने यांना दिली असता मुंबई बी.एन. एच. एस मध्ये कार्यरत असलेले 'इसाक किहिमकर' सर यांना विचारले असता हा व्हीप स्कोर्पिओन हा विंचू काही वर्षा पूर्वी पश्चिम घाटात आढळलयाची माहिती आहे. मात्र चाबूक विंचू पश्चिम महाराष्ट्र मध्ये आढळल्याच यापूर्वी उल्लेख माहिती आहे. दुर्मिळ विंचू पश्चिम महाराष्ट्र वगळता बाकीच्या महाराष्ट्रच्या भागात तसेच प्रथमच हा दुर्मिळ विंचू भंडारा जिल्हात आढळल्याबदल सरीसृप संशोधकात आंनद व्यक्त केला जात आहे.
13
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowSept 08, 2025 12:45:58Amravati, Maharashtra:
Feed slug :- AMT_BAPPA_ACCIDENT दोन फाईल आहे
रिपोर्टर :– अनिरुद्ध दवाळे, अमरावती 9503131919
अमरावतीत गणपती विसर्जनाला लागल गालबोट; विसर्जन मिरवणुकीत वाहन पलटी, १०-१२ जण जखमी
अँकर :– अमरावतीत गणपती विसर्जनाला गालबोट लागलं असून अमरावती जिल्ह्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत वाहन पलटी झाल्याने १०-१२ जण जखमी झाले आहे. अमरावती–कुऱ्हा मार्गावरील मार्डी येथे गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान मोठा अपघात झाला असून या अपघातात गणेश मूर्ती वर्धा नदीकडे जात असताना अचानक पलटी झाली त्यामुळे या वाहनात बसलेले १० ते १२ गणेशभक्त जखमी झाले असून मार्डी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
9
Report
SNSWATI NAIK
FollowSept 08, 2025 12:45:47Navi Mumbai, Maharashtra:
story slug - ओ एन जी सी मद्ये आग
FTP slug - nm ongc fier
shots - fier
reporter - swati naik
navi mumbai
anchor- उरण मधील ongc च्या प्लांट मद्ये दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास आग लागली होती ,खाडीकिनारी असलेल्या हेलिप्याड जवळ ही आग लागली पण सुदैवाने यात कोणाला दुखापत झाली नाही , ओ ऐन जी सी च्या अग्नीशमन दलाने मात्र अथक प्रयत्न करू। ही आग नियंत्रण मिळवले आहे , अशी माहिती उरण तहसीलदार डॉ उद्धव कदम यांनी दिली ।
gf
13
Report
SKSudarshan Khillare
FollowSept 08, 2025 12:34:55Yeola, Maharashtra:
अँकर:-
ईद-ए-मिलादनिमित्त येवला शहरात मुस्लिम बांधवांच्या वतीने शहरातील मुख्य रस्त्यावरून मिरवणूक काढण्यात आली. मोहम्मद पैगंबरांच्या जन्मदिनानिमित्त शहरात धार्मिक उत्साह, भाईचारा आणि एकतेचं दर्शन घडवणारी ही मिरवणूक सर्वांचे लक्ष वेधून घेतले.मिरवणुकीची सुरुवात आयना मशिदीपासून करण्यात येऊन हातात झेंडे, पैगंबरांविषयी घोषणाबाजी करत मुस्लिम बांधवांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला .
बाईट: सलीमोद्दीन मिसबाही - शहर काझी
13
Report
SNSWATI NAIK
FollowSept 08, 2025 12:34:35Navi Mumbai, Maharashtra:
story slug -: वनमंत्री गणेश नाईकांनी अधिकाऱ्यांना सुनावले खडेबोल.
महाराष्ट्र के वनमंत्री ने अधिकारियो को सुनाये बोल
ftp slug - nm bjp ganesh naik
shots-
reporter- swati naik
navi mumbai
Anchor -: धरण क्षेत्रात असलेल्या बंगल्यानमुळे धरणाचे पाणी अशुद्ध होत असून यावरून वनमंत्री गणेश नाईक यांनी अधिकाऱ्याला थेट केस करण्याची धमकी दिलेय. माथेरान माचीप्रबळ या दोन डोंगराच्या मध्ये वसलेले हे मोरबे धरण शुद्ध पाण्याचं म्हणता लाज वाटली पाहिजे आपल्याला अश्या शब्दात अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढलेय. गेल्यावर्षी बोललो होतो तुम्ही फक्त नोटीसा दिल्या. कायदा आणि नियमांचे पालन नाही केलं तर भोगावं लागतं. या बाबतीत मी तुमच्यावर केस टाकेन आणि जनतेला सांगेल हे तुम्हाला खोटं सांगतात शुद्ध पाणी आहे म्हणून. आमच्या तलावात वस्ती करुन राहणाऱ्यांच मलमूत्र पाण्यात येतं याची आपल्याला शरम वाटली पाहिजे आणि या शहराचा नागरिक म्हणून मलाही लाज वाटते अशी सडकून टीका वनमंत्री गणेश नाईक यांनी केलेय.
Sound byte गणेश नाईक वनमंत्री
14
Report
NMNITESH MAHAJAN
FollowSept 08, 2025 12:33:01Jalna, Maharashtra:
FEED NAME | 0809ZT_JALNA_LAKHE_BYTE(3 FILES)
जालना : ज्याला घटना कळते त्यालाच शासन आदेशाचा अर्थ कळतो,ज्याला घटना कळत नाही ते अंगावर गुलाल उधळून घेतात-संजय लाखे यांची जरांगे यांच्यावर टिका
गुलाल अंगावर उधळून घेतल्यानं सत्य बदलत नाही,सत्य म्हणजे घटना
आपण कोणत्या मार्गाने चाललो हे समाजाला कळत नाही
नवीन जीआर नुसार मराठवाड्यातील एकही मराठा अर्ज करण्यासाठी पात्र नाही
प्रत्येक माणूस 5-50 हजारांना खपण्याची व्यवस्था राधाकृष्ण विखे पाटलांनी केलीय,यातील काही हिस्सा त्यांना मिळणार आहे
अँकर :ज्याला घटना कळते त्यालाच शासन आदेशाचा अर्थ कळतो,ज्याला घटना कळत नाही ते अंगावर गुलाल उधळून घेतात अशी टिका मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक संजय लाखे यांनी जरांगे यांच्यावर केलीय.जेसीबीने गुलाल अंगावर उधळून घेतल्यानं सत्य बदलत नाही,सत्य म्हणजे घटना असंही लाखे यांनी म्हटलंय.आपण कोणत्या मार्गाने चाललो हे समाजाला कळत नाही.नवीन जीआर नुसार मराठवाड्यातील एकही मराठा अर्ज करण्यासाठी पात्र नसल्याचं लाखे म्हणालेत.प्रत्येक माणूस 5-50 हजारांना खपण्याची व्यवस्था राधाकृष्ण विखे पाटलांनी केली असून यातील काही हिस्सा त्यांना मिळणार असल्याची टीका लाखे यांनी विखे पाटलांवर केलीय.
बाईट : संजय लाखे पाटील
11
Report
UJUmesh Jadhav
FollowSept 08, 2025 12:32:39Thane, Maharashtra:
भिवंडी..
ईद-ए-मिलादुन्नबी मिरवणुक उत्साहात...
ॲंकर...
मोहम्मद पैगंबर यांच्या १५०० व्या पुण्यतिथी आणि जयंती निमित्त भिवंडी शहरात आज पारंपरिक पद्धतीने ईद-ए-मिलादुन्नबी मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते.
सालाबाद प्रमाणे ह्या वर्षी शहरातील सर्व मुस्लिम बांधव आपल्या-आपल्या परिसरातून मिरवणुका काढून कोटर गेट मशीद येथे एकत्र आले. त्यानंतर येथून सामूहिक मिरवणूक काढून मामा-भांजा दर्गा येथे रात्री उशिरा विसर्जित होणार आहे. विशेष म्हणजे यंदा गणेश विसर्जन आणि ईद-ए-मिलाद या दोन मोठ्या उत्सवांच्या पार्श्वभूमीवर धार्मिक सलोखा टिकून राहावे. यासाठी मुस्लिम बांधवांनी दोन दिवस उशिराने ही मिरवणूकचे आयोजन केले आहे. या मिरवणुकीत शहरातील मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले असून, भिवंडी पोलिस परिमंडळ दोनच्या वतीने मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
14
Report
SKSACHIN KASABE
FollowSept 08, 2025 12:05:11Pandharpur, Maharashtra:
08092025
slug - PPR_MAHUD_EID
file 01
----
Anchor - मोहम्मद पैगंबर यांच्या जयंती निमित्ताने सांगोला तालुक्यातील महूद येथील मुस्लिम समाजाच्या वतीने भव्य जुलूस काढण्यात आला. यावेळी सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आलं होतं . मुस्लिम समाज आणि रजा ग्रुपच्या वतीने मुख्य चौकात सर्व नागरिकांना मिठाईचे वाटप करण्यात आले. महूद मध्ये काढण्यात आलेल्या जुलूस मध्ये उंट घोडेस्वार सहभागी झाले होते.यावेळी मोठी पुष्पवृष्टी करत नागरिकांनी या जुलूसचे स्वागत केलं
14
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowSept 08, 2025 12:04:09Beed, Maharashtra:
बीड : आमदार धनंजय मुंडेंकडून सुगावच्या आत्महत्याग्रस्त कुटुंबाला आधार, मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली
Anc : मराठा आरक्षणाच्या चळवळीत बीडच्या अंबाजोगाई येथील नितीन चव्हाण या तरुणाने समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचललं होतं. आज त्याच कुटुंबाला धीर देण्यासाठी आमदार धनंजय मुंडे स्वतः आत्महत्याग्रस्त कुटूंबाच्या घरी गेले. मुंडे यांच्या नाथ प्रतिष्ठानच्या वतीने एक लाख रुपयांची मदत देत, नितीन चव्हाण यांच्या दोन्हीही लहान मुलींच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी धनंजय मुंडेंनी स्वीकारत कुटुंबियांना मोठा आधार दिला आहे.
14
Report
SKSudarshan Khillare
FollowSept 08, 2025 12:01:11Sinnar, Maharashtra:
अँकर :-
गेल्या काही दिवसापासून सिन्नर, तालुक्यातील मनेगाव ,दोडी दुशिंगवाडी, वावी परिसरात मेंढपाळ व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेळ्या मेंढ्या चोरी जात होत्या या पार्श्वभूमीवर सिन्नर, वावी तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील राहता पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले होते
दरम्यान
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कसून तपास करत राजस्थान राज्यातील रावल उर्फ राहुल बंजारा, या मुख्य आरोपीला ताब्यात घेतले असून त्याच्यासोबत आणखी सहा साथीदार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे यासह एक मारुती इको कार देखील पोलिसांनी जप्त केली असून पुढील तपास नाशिक ग्रामीण पोलीस करत आहेत
13
Report
TTTUSHAR TAPASE
FollowSept 08, 2025 10:17:47Satara, Maharashtra:
TUSHAR TAPASE
5 FILES
SLUG NAME -SAT_OBC_AGITATION
*सातारा*
सातारा - राज्य सरकारने मराठा समाजाला ओबीसी मधून मिळालेल्या आरक्षणाचा जीआर रद्द करावा या प्रमुख मागणीसाठी ओबीसी समाजाचा भव्य मोर्चा काढण्यात आला.. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून ओबीसी समाजाच्या वतीने शिवतीर्थ ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढून मराठा समाजाला काढलेल्या जीआर फाडून निषेध करण्यात आली. यावेळी राज्य शासनाचा ओबीसी समाजाच्या वतीने निषेध करण्यात आला.
बाईट - ॲड .महेश गोरे ओबीसी जिल्हाध्यक्ष
14
Report
GMGANESH MOHALE
FollowSept 08, 2025 08:26:50Washim, Maharashtra:
वाशिम:
File:0809ZT_WSM_JALJEEVAN_MISSION_WORK
रिपोर्टर:गणेश मोहळे,वाशिम
अँकर: जलजीवन मिशन अंतर्गत वाशिम जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये नळाद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यासाठी काही महिन्यांपूर्वी कामांना सुरुवात झाली होती.मात्र मागील चार-पाच महिन्यांपासून निधीअभावी ही कामे अर्धवट अवस्थेत थांबली आहेत. निधीअभावामुळे अपेक्षित पाणीपुरवठा सुरू न झाल्याने ग्रामस्थ पुन्हा पारंपरिक विहिरी,हांडे आणि टाक्यांवर अवलंबून राहण्यास बाध्य झाले आहेत.काही गावांत पाइपलाइनचे काम अपूर्ण राहिले आहे, तर अनेक ठिकाणी पंपिंग युनिटसाठी आवश्यक यंत्रणा अद्याप बसवण्यात आलेली नाही.रखडलेल्या निधीची उपलब्धता कधी होणार आणि थांबलेली कामे पुन्हा सुरू होणार कधी,याबाबत ग्रामस्थांमध्ये प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून ही रखडलेली कामं पूर्ण करण्याची मागणी केली जातं आहे.
14
Report