Back
कल्याण पोलिसांनी घरफोडी प्रकरणातील तीन आरोपींना पकडले!
ABATISH BHOIR
Aug 30, 2025 13:00:10
Kalyan, Maharashtra
कल्याण पोलिसांची मोठी कामगिरी, घरफोडी प्रकरणातील तीन आरोपी अटकेत..
१६.५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत.
Anc : कल्याण पूर्व येथील वालधुनी परिसरात एप्रिल महिन्यामध्ये एका घरात घरफोडी झाली होती, अज्ञात चोरट्यांनी घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून बेडरूम व किचनमधील कपाट उचकटले आणि १२ लाख ६९ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने आणि मौल्यवान वस्तू चोरून नेल्या होत्या, या प्रकरणी, महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता, सीसीटीव्ही फुटेज द्वारे आरोपींचा शोध सुरू केला, आरोपी हा लाल-काळ्या रंगाच्या स्कुटीवरून आल्याचे निष्पन्न झाले, तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा मार्ग काढला असता, ते नालासोपारा परिसरात लपले असल्याचे उघड झाले,
पोलिसांनी सापळा रचून मुख्य आरोपी साजिद अकबर शेख, (३४) याला अटक केली, त्याची चौकशी केल्यावर त्याने त्याचे साथीदार सावेज शेख, आणि चोरीच्या मालाची विल्हेवाट लावणारे ऋषिकेश चौधरी, व प्रीती कदम, यांची नावे सांगितली, पोलिसांनी लगेचच ऋषिकेश चौधरी आणि प्रीती कदम, यांना अटक केली, तर सावेज शेख, अद्याप फरार आहे, पोलीस त्याचा शोध घेत आहेत,
या प्रकरणांमधील एकूण मुद्देमालाची किंमत, सुमारे ₹ १६,५०,०००/- हस्तगत केला आहे,
बाईट...आतूल झेंडे, कल्याण, DCP
13
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PNPratap Naik1
FollowAug 30, 2025 17:30:26Kolhapur, Maharashtra:
Kop Ganeshwadi PKG
Feed:- Live U
Anc :- कोल्हापूर जिल्ह्यातील गणेशवाडीचे पेशवे कालीन मंदिर 20 दगडी खांबावर उभं आहे, 17 व्या शतकात पेशवेकालीन हरीभट्ट पटवर्धन यांनी हे मंदिर उभारण्यासाठी योगदान दिल्याचा उल्लेख गणेश कोष ग्रंथात आढळतो, कृष्णा नदीच्या काठावर वसलेल्या या मंदिराची निर्मिती गाव वसन्याआधी झाली असल्याचं गावकरी सांगतात तर महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमा भागातील भाविकांच्यासाठी 'देवाचं गाव' म्हणून देखील गणेशवाडीचा बाप्पा प्रसिद्ध आहेत.
VO 1: - 17 व्या शतकाचा काळ हा पेशवाई राजवट मानला जातो. याच काळात महाराष्ट्रात अनेक गणेश मंदिर पेशव्यांनी उभी केली, 1750 ते 56 या काळात बांधण्यात आलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्याच्या गणेशवाडी गावातील हे मंदिर 1756 साली बांधण्यात आलं आहे. पेशवेकालीन सुभेदार हरिभक्त पटवर्धन हे गणेशभक्त होते, नित्य नियमाने पटवर्धन गणपतीपुळ्याच्या देवाची वारी करायचे, मात्र कोकण सोडून आल्यानंतर ही वारी चुकेल याची चिंता पटवर्धनांना लागली होती, याच दरम्यान गणेशाने दृष्टांत देत कृष्णाकाठी बुरुजाखाली आपलं वास्तव्य असल्याचं स्वप्नात येऊन सांगितल्याची आख्यायिका गणेशवाडीचा इतिहास सांगणाऱ्या 'गणेश कोष' या ग्रंथात आढळते तर गावकऱ्यांनीही गावाची निर्मिती होण्याआधीच या मंदिराची निर्मिती झाल्याचं सांगितलं.
Byte :- बळवंत गोरवडे, माजी सरपंच
VO 2 :- कर्नाटक- महाराष्ट्र सीमा परिसरात मिळणारा कुरुंद या जातीच्या दगडांनी अखंड कोरीव काम केलेलं हे मंदिर स्थापत्य शास्त्राचा उत्कृष्ट नमुना आहे, अडीच दशकांपूर्वी मंदिराची स्थापना झाल्याचा उल्लेख आढळतो. तर मंदिराच्या स्थापनेनंतर 12 बलुतेदारांना सोबत घेत पेशव्यांनी पूर्वीचे गणेशपुर आणि आताची गणेशवाडी स्थापन केल्याचं गावकरी सांगतात. फेब्रुवारी महिन्यातील माघी गणेश जयंतीला मोठा उत्सव गावकरी एकत्र मिळून साजरा करतात तर पेशवेकालीन सुभेदार पटवर्धनांचे वारसदारही या सर्व कार्यक्रमांना आवर्जून हजेरी लावतात.. जुन्या मंदिराचा गावकऱ्यांनी जिर्णोद्वार केला असून 269 वर्षाच्या या मंदिराचे महत्व ओळखून महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील लाखो गणेश भक्त दर महिन्याच्या संकष्टीला दर्शनासाठी येतात.
Byte :- स्वप्नील तासगावे, ग्रामस्थ
VO 3 :- मंदिरातील गाभाऱ्यात शाळीग्राम पाषाणात कोरलेली आकर्षक गणेश मूर्ती आहे, सुमारे अडीच ते तीन फूट असलेल्या भगव्या रंगातील दगडाच्या या गणेश मूर्तीचे आकर्षक रूप भाविक डोळ्यात साठवून घेतात तर मूर्तीचे बोलके डोळे भक्तांची तहानभूक हरपून भक्तीत तल्लीन करतात. शिरोळ तालुक्यातील गणेशवाडीचं हे पेशवेकालीन मंदिर गणेश भक्तांसाठी जणू देवाचं घर मानले जात.. महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवर असलेल्या गणेशवाडी गावची लोकसंख्या सुमारे 7 हजारच्या घरात असून साडेतीन हजार हेक्टर शेतीपैकी फक्त 400 हेक्टर शेती महाराष्ट्रात तर उर्वरित सर्व शेती कर्नाटकच्या भागात असल्याने कर्नाटकी सूर या गावकऱ्यांमध्ये पाहायला मिळतो . कोल्हापूर सह सांगली, बिजापूर, बेळगावसह कर्नाटकातील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या या बाप्पाच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या गणेशवाडीला कानडी भाषेत देवरहळळी म्हणजेच देवांचं गाव म्हणूनही ओळखलं जातं.
Byte :- प्रशांत भूषिंगे, ग्रामस्थ
VO 4 :- शिरोळ तालुक्यातील गणेशवाडीच्या या बाप्पांच्या नित्यनेमाची पूजा गावातील काने कुटुंबीय करतात. तर गणेश जयंती माघी गणेश जयंती गणेश चतुर्थी आणि संकष्टीला एकगावातील 12 बलुतेदार मिळून गणपती बाप्पा चरणी एकरूप होतात. 20 खांबांवर उभा असलेल्या या मंदिराला आकर्षक कळस ही गावकऱ्यांनी लोकसहभागातून बांधला आहे.
प्रताप नाईक झी 24 तास कोल्हापूर
13
Report
ABATISH BHOIR
FollowAug 30, 2025 17:00:08Kalyan, Maharashtra:
कल्याण शीळ रोड वरती ट्राफिक जाम..
वाहनाच्या लांबच लांब रांगा..
कल्याण शिळरोडवरगेल्या दोन तासापासून कल्याण शीळ रोड वरती मोठ्या प्रमाणात ट्राफिक जाम यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा फटका बसला आहे.वाहनाचा लांबच लांब रांग कामावरून घरी परतणाऱ्या चाकरमान्यांना याचा नाहक त्रास सहन करावा लागला आहे.
13
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowAug 30, 2025 15:45:39Shirur, Maharashtra:
Feed 2C
Slug: Shikrapur Firing
File:03
Rep: Hemant Chapude(Shikrapur)
शिक्रापूर / पुणे
ब्रेक
पुणे नगर रस्त्यावरील मलठण फाटा येथे चोराचा शोध घेण्यासाठी आलेल्या सातारा पोलिसांवर चोरांकडून हल्ला... पुणे ग्रामीण पोलिसांच्या शिक्रापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मलठण फाटा परिसरात घडली घटना... आरोपींकडून पोलिसांवर हल्ला... स्वसंरक्षणार्थ पोलिसांकडून गोळीबार... एक आरोपी गंभीर जखमी तर एक जण फरार झाल्याची प्राथमिक माहिती...
प्रतिनिधी हेमंत चापुडे
झी मिडीया शिक्रापुर पुणे...
14
Report
SRSHRIKANT RAUT
FollowAug 30, 2025 15:16:06Yavatmal, Maharashtra:
यवतमाळच्या बोरी अरब येथील अडाण नदीच्या पुराचे पाणी पुलावरून वाहत असताना त्यातून मार्ग काढण्याचे धाडस एका व्यक्तीच्या जीवावर बेतले आहे. विठल पत्रे असे या व्यक्तीचे नावं आहे, अडाण नदीवर असलेल्या छोट्या पुलावरून पुराच्या पाण्याचा प्रवाह सुरु होता, तरी देखील या व्यक्तीने पाण्यातुन रस्ता पार करण्याचा प्रयत्न केला, हा आत्मघाती प्रकार बघून स्थानिक युवकाने त्याला वाचविण्याचा प्रयत्न देखील केला मात्र ऐकण्याच्या मनस्थितीत नसलेल्या या व्यक्तीचा तोल जाऊन तो नदीत वाहून गेला.
14
Report
SMSarfaraj Musa
FollowAug 30, 2025 14:33:31Sangli Miraj Kupwad, Maharashtra:
स्लग - माझा प्रॉब्लेम,मी मंगळसूत्र चोरांच्या विरोधात लढत नाही,जयंत पाटलांचा गोपीचंद पडळकरांवर घणाघाती पलटवार
अँकर - माझा प्रॉब्लेम आहे,मी मंगळसूत्र चोरांच्या विरोधात लढत नाही,अश्या शब्दात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटलांनी भाजप आमदार गोपीचंद पडळकरांच्या निशाणा साधलाय,तसेच मुद्दा मत चोरीचा आहे,त्यामुळे जिथे मत चोरी झाली तिथे आधी राजीनामा द्यावा,असा टोला देखील आमदार जयंत पाटलांनी,गोपीचंद पडळकर यांना लगावला आहे. काही दिवसांपूर्वी आमदार गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटलांना राजीनामा देण्याचे आव्हान करत जयंत पाटलांच्या मतदारसंघात त्यांच्या विरोधात निवडणूक लढवण्याची भूमिका देखील जाहीर केली होती,यावरून जयंत पाटलांनी गोपीचंद पडळकरांवर हा पलटवार केला आहे,ते सांगलीमध्ये ख्रिश्चन व मुस्लिम अधिकार परिषद कार्यक्रम दरम्यान बोलत होते.
साऊंड बाईट - जयंत पाटील - आमदार राष्ट्रवादी काँग्रेस ( SP )
बाईट - गोपीचंद पडळकर - आमदार - भाजपा.
13
Report
KJKunal Jamdade
FollowAug 30, 2025 14:19:21Shirdi, Maharashtra:
Anc - साईबाबांच्या दर्शनासाठी जगभरातून भाविक शिर्डीत दाखल होतात.यंदा गणेशोत्सवाच्या निमित्ताने या पवित्र नगरीत भाविकांसाठी आणखी एक दिव्य अनुभव खुला झाला आहे. शिर्डीतील ओम साईनगर मित्र मंडळातर्फे तब्बल 30 फूट उंच आणि 35 फूट रुंद अशी भव्य आदियोगी शिवप्रतिमा साकारण्यात आली असून हा देखावा सध्या गणेशभक्त व साईभक्तांसाठी मोठे आकर्षण ठरत आहे.गेल्या 15 वर्षांपासून ओम साईनगर मित्र मंडळ शिर्डीत गणेशोत्सव उत्साहात आणि वैविध्यपूर्ण देखाव्यांनी साजरा करत आहे.यंदा तमिळनाडूतील कोयंबटूर येथील वेलियंगिरी पर्वतरांगांच्या पायथ्याशी उभारलेल्या ईशा योग केंद्रातील आदियोगी शिवप्रतिमेवर आधारित देखावा साकारण्यात आला आहे.या देखाव्याच्या ठिकाणाहून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी...
Wkt kunal jamdade
14
Report
SMSarfaraj Musa
FollowAug 30, 2025 13:49:25Sangli Miraj Kupwad, Maharashtra:
स्लग - मराठा आरक्षण बाबत सरकारने तोडगा काढावा - आमदार जयंत पाटील
अँकर - मनोज जरांगे- पाटलांच्या आंदोलनाबाबत सरकारने तोडगा काढावा आणि तो निघेल,अशी अपेक्षा बाळगूया,असं
मत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी व्यक्त केले आहे.तसेच आंदोलकांची गैरसोय होऊ नये यासाठी सरकार आणि प्रशासनाने ही योग्य ती खबरदारी घ्यावी.हा काही राजकीय प्रश्न नाही, त्यामुळे यावर जास्त बोलणे उचित नाही,मात्र आशा आहे की सत्तेमध्ये बसलेले लोक काहीतरी तोडगा काढतील,असंही मत आमदार जयंत पाटील यांनी व्यक्त केले आहे,ते सांगली मध्ये आयोजित ख्रिश्चन व मुस्लिम अधिकार परिषद कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते.
बाईट - जयंत पाटील - आमदार- राष्ट्रवादी काँग्रेस ( Sp )
14
Report
SKSudarshan Khillare
FollowAug 30, 2025 13:46:38Yeola, Maharashtra:
अँकर :
मालेगाव में मतदाता सूची में एवेंजर्स फिल्म के काल्पनिक खलनायक 'थैनोस' का फोटो वाला पहचान पत्र दिखने वाला एक वीडियो वायरल हो गया है। पहचान पत्र पर अलग नाम, उम्र और अधूरा पता था, इस पर सवाल उठने लगे हैं कि ये फोटो सूची में कैसे आया। इस घटना के बाद मतदाता सूची में चल रहे तकनीकी गड़बड़ी पर नेटिज़न्स ने आलोचना की है।.
कांग्रेस पार्टी के नेता राहुल गांधी ने हाल ही में मतदाता सूची में होने वाली गड़बड़ी का प्रदर्शन किया था, और इसी बीच मालेगाव से एक वीडियो वायरल हुआ है। इस वीडियो में एवेंजर्स फिल्म के थैनोस का पहचान पत्र दिखाई दे रहा है, जिस पर सोशल मीडिया पर यह सवाल उठ रहे हैं कि हॉलीवुड फिल्म का खलनायक महाराष्ट्र में मतदान करने कैसे आ सकता है।
*इसका अवलोकन हमारे नासिक के प्रतिनिधि सुधर्शन खिल्लारे ने किया है।*
*और साथ मे मालेगाव के पूर्व विधायक आसिफ शेख इनकी बाईट*
12
Report
YKYOGESH KHARE
FollowAug 30, 2025 13:15:58Nashik, Maharashtra:
Nashik breaking
- *सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणातील अधिकाऱ्यांनी घेतली साधू महंतांची भेट*
- *त्रंबकेश्वर येथील शैव आखाड्यांच्या साधू महंतांची भेट घेत केली चर्चा*
- आगामी कुंभमेळा संदर्भात होणारे काम आणि इतर अडचणी संदर्भात संदर्भात जाणून घेतले मत
- प्राधिकरणाचे अध्यक्ष प्रवीण गेडाम सह वरिष्ठ अधिकारी होते उपस्थित
- रस्ते,पाणी ,आलेल्या कुंभ ला येणाऱ्या साधू संतांची राहण्याची व्यवस्था सह कुंभमेळा मध्ये होणाऱ्या अमृत स्नान बाबत झाली चर्चा
12
Report
SKSACHIN KASABE
FollowAug 30, 2025 13:15:17Pandharpur, Maharashtra:
30082025
Slug - PPR_DUPLICATE_DOCTOR
file 01
----
Anchor - पंढरपूर तालुका पोलिसांनी तालुक्यात रुग्णांवर अनधिकृत पणे उपचार करणाऱ्या राजस्थान हरियाणातील तीन तोतया डॉक्टरांना अटक केलं आहे
पंढरपूर तालुक्यातील रोपळे गावामध्ये गोविंदा प्रजापती, जाहीरखान, आसिफ दिन मोहम्मद हे राजस्थान ,हरियाणा मधील राहणारे लोक वैद्यकीय उपचार करत असल्याची माहिती मिळाली.त्यांच्याकडे कोणतीही अधिकृत वैद्यकीय प्रमाणपत्र मिळून आले नाही .त्यांच्याकडील साहित्याची तपासणी केली असता मोठ्या प्रमाणात इंजेक्शन साठी वापरण्यात येणाऱ्या बाटल्या इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे.
तीनही व्यक्ती विरुद्ध मेडिकल प्रॅक्टिशनर ॲक्ट 1956 कलम 15/2 आणि महाराष्ट्र प्रॅक्टिशनर ॲक्ट 1961 कलम 33 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
13
Report
GMGANESH MOHALE
FollowAug 30, 2025 13:04:03Washim, Maharashtra:
वाशिम :
File:3008ZT_WSM_BACHU_KADU_BT
रिपोर्टर:गणेश मोहळे, वाशीम
अँकर : वाशीमच्या कामरगाव येथे शेतकरी-शेतमजूर हक्क यात्रेच्या प्रारंभावेळी प्रहारचे माजी आमदार बच्चू कडूयांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर ठाम भूमिका मांडली.त्यांनी स्पष्ट केले की,शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सर्वांनी जात-धर्म बाजूला ठेवून एकत्र यायला हवे.शेतकरी, शेतमजूर आणि कष्टकरी यांचा प्रश्न हीच खरी पूजा आहे. कडू म्हणाले, "आरक्षणाच्या मागण्या योग्य आहेत, पण आधी शेतकऱ्याला कापूस, सोयाबीन व शेतीमालाला योग्य भाव मिळाला पाहिजे. शेतकऱ्यांना योग्य दर मिळाले, तर एवढा पैसा व ताकद निर्माण होईल की आपण आरक्षण देण्याइतकं सामर्थ्य उभारू शकतो.
स्टेज बाईट : बच्चू कडू,
14
Report
PNPratap Naik1
FollowAug 30, 2025 13:03:42Kolhapur, Maharashtra:
Kop Kshirsagar visit
Feed:- Live U
Anc :- काळम्मावाडी थेट पाईपलाईनचा पाणीपुरवठा सुरळीतपणे होत नाही, याला जबाबदार असणाऱ्या सर्वांवर कारवाई करण्याच्या सूचना आमदार राजेश क्षीरसागर यांनी कोल्हापूर महापालिका प्रशासनाला दिल्या... गेल्या आठवड्याभरापासून कोल्हापुरात पाणीटंचाई असल्यामुळे नागरिक त्रस्त आहेत... शिंगणापूर येथील पाणीपुरवठा उपसा केंद्राला भेट देऊन आमदार क्षीरसागर यांनी अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली... ऐन सणासुदीत नागरिकांना पाणी मिळत नाही त्यामुळे अधिकाऱ्यांना लाज वाटली पाहिजे अशा शब्दात आमदार क्षीरसागर यांनी संताप व्यक्त केला. प्रत्येक दिवाळीला थेट पाईपलाईनच्या नावाखाली अंघोळ करण्याऱ्यानी राजकारण करून नये असा अप्रत्यक्षपणे आमदार सतेज पाटील यांना टोला लगावला... सोमवारी संबंधित कंत्राटदारासोबत बैठक घेणार असल्याचही क्षीरसागर यांनी सांगितलं...
Byte - राजेश क्षीरसागर, आमदार, कोल्हापूर उत्तर
13
Report
TTTUSHAR TAPASE
FollowAug 30, 2025 13:02:56Satara, Maharashtra:
TUSHAR TAPASE
6 FILES
SLUG NAME -SAT_DESAI_JARANGE
सातारा: तामिळनाडूमध्ये 72% पर्यंत आरक्षणाची मर्यादा वाढवलेली आहे हे विधान शरद पवार यांनी केलं होतं यावर पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी टीका केली असून पवार साहेबांच्या महाविकास आघाडीचे सरकार उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली 2019 ते 2022 साली महाराष्ट्रात होते त्यावेळी पवार साहेबांनी त्या मंत्रिमंडळाला हा निर्णय घ्यायला का नाही सांगितला, उद्धव ठाकरे पवार साहेबांना विचारल्याशिवाय तेव्हा काहीच करत नव्हते. पवार साहेब जे आता सांगताय तेव्हाच ते उद्धव ठाकरे यांच्या सरकारला सांगून उद्धव ठाकरे यांनी तेव्हाच केंद्राला अशी विनंती केली असती तर केंद्राने तेव्हा निर्णय काय घ्यायचा तो घेतला असता मात्र आता ते ही भूमिका घेत आहेत बघूया आता याच्यापुढे काय होतंय. असा प्रतिसवाल मंत्री शंभूराज देसाई यांनी केला आहे.
Byte शंभूराज देसाई
हैदराबाद गॅझेटियरचा चा अभ्यास करण्यासाठी 13 महिन्याचा काळ गेला असून आता याकरिता अधिक वेळ देणार नाही असं वक्तव्य मनोज जरांगे यांनी केल्यानंतर शंभूराज देसाई यांनी याच्याबाबत स्पष्टीकरण दिलं असून
*हैदराबाद गॅझेटीयर चा संदर्भात अभ्यास करण्यासाठी निवडणुका आणि आचारसंहिता याच्यामुळे विलंब झाला असं सांगितलंय*
सातारा: मी 13 महिन्यांपूर्वी मनोज दादांच्या सोबत चर्चेला गेलो होतो तेव्हा मनोज जरांगे यांनी सांगितलं होतं हैदराबाद गॅझेटीयर आहे असे लागू करा.तेव्हा तत्कालिन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं होतं एक उच्चस्तरीय कमिटी आम्ही तेलंगणा सरकारकडे पाठवले होते तेव्हा त्यांनी आमच्याकडे जे डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्ही शोधा असं सांगितलं होतं आम्ही तेव्हा एक वेगळी एजन्सी कामाला लावून तिथे डॉक्युमेंट्स स्कॅन करून त्याची तपासणी करून त्याचा संपूर्ण अभ्यास केला होता. हैदराबाद गॅझेट मध्ये कुणबी किती आहेत याचा आकडा यात दिलेला आहे मात्र यामध्ये कोणाचीही नाव नाहीत त्यामुळे मराठवाड्यातल्या सात जिल्ह्यातल्या गॅझेटर मधले नक्की झालेल्या नंबर मध्ये कोण कोण आहेत हे व्हेरिफाय करण्यासाठी एडवोकेट जनरल साहेबांना त्यांचं ओपिनियन आम्ही मागितलं होतं मात्र तेव्हा निवडणुका लागल्यामुळे काम थोडं थांबलं होतं आणि काम संततीने सुरू झाला होता. त्यामुळे या कामाला विलंब लागला असं मत शंभूराज देसाई यांनी व्यक्त केलंय
Byte शंभूराज देसाई
*आम्हाला दुसऱ्या कुणाच्या ताटातलं काढून इतर कोणाच्या ताटामध्ये द्यायचं नाही- मंत्री शंभुराजे देसाई यांचे मोठे विधान..*
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असताना मराठा आरक्षनाचा प्रश्न बऱ्याच प्रमाणात सोडवण्यात प्रशासन म्हणून आम्ही यशस्वी झालो.. काही प्रमाणात प्रश्न मध्ये काय त्याच्या चौकटीत बसवण्यात काही प्रमाणात उशीर लागत होता. दरम्यानच्या काळात दहा टक्के आरक्षण देण्यात आले होते.. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असताना दिलेलं आरक्षण उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना न्यायालयांमध्ये टिकू शकलं नाही.. पुन्हा जेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे झाल्यानंतर कोर्टामध्ये बाजू मजबूतपणे मांडली. मराठा समाजातील आरक्षणामध्ये बरेचसे प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असताना सोडवले आहेत. सवलतीचे प्रश्न, मराठा विद्यार्थ्यांचे वसतिगृहाचे प्रश्न, मराठा विद्यार्थ्यांच्या फ्री सवलतीचे प्रश्न, असे बरेचसे प्रश्न सोडविले आहेत.. आणि आत्ता काही प्रश्न राहिले आहेत त्यामध्ये देखील मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे लोकांनी देखील लक्ष घातला आहे.. त्यामुळे ही महायुतीची संयुक्त जबाबदारी आहे..
आम्ही दुसऱ्या कुणाच्या ताटातलं काढून इतर कोणाच्या ताटामध्ये द्यायचं नाही हे महायुतीच्या दोन्हीही नेत्यांनी स्पष्ट भूमिका केली आहे..काय भूमिका घ्यायची जो काही निर्णय घ्यायचा आणि यापुढे जे सकारात्मकताणे एक पाऊल पुढे टाकायचा आहे याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित दादा घेतील....
byte -शंभूराज देसाई
13
Report
PNPratap Naik1
FollowAug 30, 2025 13:02:38Kolhapur, Maharashtra:
कोल्हापुर जिले के गणेशवाडी गाँव में स्थित पेशवाकालीन गणेश मंदिर 20 स्तंभों पर खड़ा है...
Story:- Kop Ganeshwadi Hindi PKG
Feed:- Live U
Anc :- कोल्हापुर जिले में रहे गणेशवाडी गांव को देवताओं का गाँव कहा जाता है। इस गांव में स्थापित गणेश जी का मंदिर 269 साल पुरातन है। कृष्णा नदी के किनारे बसे इस मंदिर की गणेश मूर्ति अद्भुत शिल्पकला और शालिग्राम पत्थर की हैं। यह मंदिर 20 पत्थर के स्तंभों पर खड़ा है।पेशवाकालीन शासक हरिभट्ट पटवर्धन ने 17 वीं शताब्दी में इस मंदिर का निर्माण किया है.
VO 1:- 17 वीं शताब्दी को पेशवा शासन काल माना जाता है। इस काल में पेशवाओं द्वारा महाराष्ट्र में कई जगह गणेश मंदिरों का निर्माण कराया गया था। कोल्हापुर जिले के गणेशवाडी गांव में भी 1750 से 1756 के बीच इस मंदिर का निर्माण किया गया. पेशवा-युग के सूबेदार हरिभक्त पटवर्धन गणेश के भक्त थे। पटवर्धन नियमित रूप से रत्नागिरि जिले के गणपतिपुले के देवता के दर्शन करने जाते थे, लेकिन कोंकण छोड़ने के बाद, पटवर्धन को चिंता हुई कि यह यात्रा छूट जाएगी। इस बीच उन्हके सपने में भगवान प्रकट हुए और उन्हें बताया कि वे कृष्णा नदी के तट पर एक मीनार के नीचे रह रहे हैं। जब पेशवाकालीन शासक हरिभट्ट पटवर्धन मीनार के नीचे जाकर देखा तब इस गणेश मूर्ति का दर्शन हुआ और उसके बाद यहां पर गणेश मंदिर बनाया गया।
Byte:- बलवंत गोरावड़े, पूर्व सरंपच गणेशवाडी
VO 2:- इस गांव के ग्रामीणों ने यह भी कहा कि यह मंदिर गाँव के निर्माण से पहले बनाया गया था। कर्नाटक-महाराष्ट्र सीमा क्षेत्र में पाए जाने वाले कुरुंद किस्म के निरंतर पत्थर से तराशा गया यह मंदिर स्थापत्य इंजीनियरिंग का एक उत्कृष्ट नमूना है। ग्रामीणों का कहना है कि मंदिर की स्थापना के बाद, पेशवाओं ने 12 बलूतेदारों के साथ मिलकर पूर्व गणेशपुर और वर्तमान गणेशवाड़ी की स्थापना की थी। आज फरवरी माह में माघी गणेश जयंती पर एक बड़ा उत्सव मनाते हैं, जबकि पेशवाकालीन सुभेदार पटवर्धन के उत्तराधिकारी भी इन सभी कार्यक्रमों में शामिल होते हैं। ग्रामीणों ने पुराने मंदिर का जीर्णोद्धार किया है और 269 साल पुराने इस मंदिर के महत्व को समझते हुए, महाराष्ट्र-कर्नाटक सीमा क्षेत्र से लाखों गणेश भक्त हर महीने दर्शन के लिए आते हैं, पूर्व सरपंच बलवंत गोरावड़े ने यह बात बताया।
Byte:- बलवंत गोरावड़े, पूर्व सरंपच गणेशवाडी
VO 3:- शालिग्राम पत्थर में उकेरी गई आकर्षक गणेश मूर्ति है। लगभग ढाई से तीन फीट ऊँची केसरिया रंग के पत्थर से बनी इस गणेश मूर्ति का आकर्षक स्वरूप भक्तों की आँखों में बस जाता है, जबकि मूर्ति की भावपूर्ण आँखें भक्तों की प्यास बुझाकर उन्हें भक्ति में डुबो देती हैं। इस गांव को देवरहल्ली के नाम से प्रसिद्ध, जिसका अर्थ है भगवान का गाँव... महाराष्ट्र और कर्नाटक की सीमा पर स्थित गणेशवाड़ी गाँव की आबादी लगभग 7 हज़ार है। साढ़ेतीन हज़ार हेक्टेयर कृषि भूमि में से केवल 400 हेक्टेयर कृषि भूमि महाराष्ट्र में और शेष कृषि कर्नाटक में है। इसलिए, ग्रामीणों में कर्नाटक की गूंज देखी जा सकती है। गणेशवाड़ी, जो कोल्हापुर, सांगली, बीजापुर, बेलगाम और कर्नाटक के लाखों भक्तों का पूजा स्थल है।
Byte :- स्वप्नील तासगावे, ग्रामीण
Byte:- प्रशांत भूषिंगे, ग्रामीण
VO 4:- कन्नड़ में देवरहाली के नाम से भी जाना जाता है, जिसका अर्थ है भगवान का गाँव है। शिरोल तालुका के गणेशवाड़ी स्थित इस गणेशजी की दैनिक पूजा गाँव के काणे परिवार द्वारा की जाती है, जबकि गणेश जयंती, माघी, गणेश जयंती, गणेश चतुर्थी और संकष्टी पर गाँव के 12 बलूतेदार एकत्रित होकर गणपति बप्पा के चरणों में एकाकार होते हैं। ग्रामीणों ने बताया कि हर बारह साल में आने वाले महापर्वकाल में भी इस मंदिर में भक्तों की भारी भीड़ रहती है।
प्रताप नाइक, झी मीडिया कोल्हापुर।
14
Report
AAASHISH AMBADE
FollowAug 30, 2025 13:00:29Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--- 3008ZT_CHP_POLICE_MEET
( single file sent on 2C)
टायटल:-- नागपूरचे विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील यांच्या उपस्थितीत चंद्रपुरात गणेशोत्सव, ईद सणानिमित्त बंदोबस्ताबाबत आढावा बैठक, पाटील यांनी निमंत्रित नागरिकांशी साधला संवाद
अँकर:--आगामी काळात गणेश विसर्जन मिरवणूक आणि ईदेचा सण लागोपाठ आलाय. या अनुषंगाने गृह विभागाच्या वतीने तयारीसाठी बैठकांचे सत्र सुरू आहे. नागपूरचे विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील यांच्या उपस्थितीत चंद्रपुरात पोलीस विभागाच्या वतीने पोलीस मुख्यालयाच्या ड्रिल शेड येथे गणेशोत्सव, ईद सणानिमित्त बंदोबस्ताबाबत आढावा बैठक पार पडली. जिल्ह्यातील पोलीस अधिकारी आणि प्रमुख प्रशासकीय अधिकारी, शांतता समिती सदस्य यांची याप्रसंगी उपस्थिती होती. पाटील यांनी निमंत्रित नागरिकांशी संवाद साधला. सण हे आनंद साजरे करण्यासाठी असतात ,त्यात मर्यादा असावी. डीजे असो वा अन्य कुठलीही तक्रार मर्यादाभंग झाल्यास कायदा आपले काम करेल अशी भूमिका त्यांनी मांडली.
बाईट १) संदीप पाटील, विशेष पोलीस महानिरीक्षक, नागपूर परिक्षेत्र
आशीष अम्बाडे
झी मीडिया
चंद्रपूर
14
Report