Back
जालना: पोलीस उपनिरीक्षकाच्या मुलीचं अपहरण, आरोपींना अटक!
NMNITESH MAHAJAN
Aug 10, 2025 13:31:37
Jalna, Maharashtra
FEED NAME ; 1008ZT_JALNA_CRIME(1 FILE)
जालना : उत्तर प्रदेशातील पोलीस उपनिरीक्षकाच्या मुलीचं अपहरण करणाऱ्या आरोपींना पोलिसांनी केली अटक
अँकर :उत्तर प्रदेशातील पोलीस उपनिरिक्षकाच्या 16 वर्षाच्या मुलीचं अपहरण करणाऱ्या दोन आरोपींना जालन्यातील चंदनझिरा पोलिसांसह उत्तर प्रदेश पोलिसांनी अटक केली आहे.अय्याज अन्सारी आणि फैजान अन्सारी अशी आरोपींची नावं आहेत.जालन्यात ही कारवाई करण्यात आली आहे.उत्तर प्रदेशातील मैनपुरी कोतवाली पोलीस ठाण्यात 16 वर्षाच्या मुलीचं फूस लावुन अपहरण करण्यात आल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील आरोपी मुलीला घेऊन जालन्यात आले असल्याची माहिती उत्तर प्रदेश पोलिसांनी जालना पोलिसांना दिली होती.या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.आरोपींना चंदनझिरा परिसरातून ताब्यात घेऊन अटक करण्यात आली.दरम्यान 16 वर्षाच्या मुलीसह आरोपींना उत्तर प्रदेश आणि पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे.
14
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PTPRATHAMESH TAWADE
FollowAug 10, 2025 17:00:32Vasai-Virar, Maharashtra:
Date-10aug2025
Rep-prathamesh tawade
Loc-vasai
Slug-VASAI RADA
Feed send by 2c
Type-AV
Slug- वसईत जागर स्त्री शक्तीचा" या कार्यक्रमा दरम्यान राडा
आयोजक आणि पोलिसांमध्ये मोठा राडा
A NC : वसईत महिला सुरक्षा सन्मान समिती द्वारा आयोजित "जागर स्त्री शक्तीचा" या कार्यक्रमा दरम्यान आयोजक आणि पोलिसांमध्ये मोठा राडा झाला आहे. या कार्यक्रमात प्रमुख वक्ता म्हणून काजल हिंदुस्तानी यांनी हजेरी लावली असता त्या ठिकाणी पोलीस पोहोचले. त्यावेळी पोलिसांचं आत मध्ये काय काम आहे असं सांगून आयोजकांनी पोलिसांना हॉलमधून बाहेर काढले. त्यावेळी
आयोजक आणि पोलिसांमध्ये बाचा - बाची झाली. वसई पश्चिमेच्या अंबाडी रोड परिसरातील श्री स्वामीनारायण मंदिर येथे महिला सुरक्षा सन्मान समिती द्वारा आयोजित "जागर स्त्री शक्तीचा" हा कार्यक्रम आयोजित केला होता. सध्या पोलिसांना बाहेर काढून काजल हिंदुस्तानी यांचा कार्यक्रम सुरू आहे. तर बाहेर मोठा पोलीस फोर्स फाटा तैनात आहे.
14
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowAug 10, 2025 16:16:16Beed, Maharashtra:
बीड: महाजनवाडीची स्मशानभूमी बनली ठेकेदारांसाठी कुरण? स्मशानभूमी गावापासून दूर असल्याने गावकरी करतायेत उघड्यावर अंत्यसंस्कार..!
Anc: बीड जिल्ह्यात एकीकडे 656 गावात स्मशानभूमीची सोय नसल्याने मृतदेहाची विटंबना होत असल्याचा प्रकार अनेकदा समोर आला. तर दुसरीकडे बीड तालुक्यातील महाजनवाडी गावात आठ वर्षांपूर्वी स्मशानभूमी उभारण्यात आली. परंतु स्मशानभूमीचे अंतर अडीच किलोमीटर असल्याने या स्मशानभूमीत अद्याप पर्यंत एकही अंत्यसंस्कार झाले नाहीत.
महाजनवाडी येथे आठ वर्षांपूर्वी 8 लाख रुपये खर्च करून स्मशानभूमी बांधण्यात आली. गावची लोकसंख्या जवळपास दोन हजार एवढी आहे. परंतु या स्मशानभूमीचे अंतर गावापासून अडीच किलोमीटरवर असल्याने स्मशानभूमी वापरातच आली नाही. त्यामुळे ग्रामस्थ पार्थिवावर गावाशेजारीच उघड्यावर अंत्यसंस्कार करतात. त्यामुळे ही स्मशानभूमी कंत्राटदाराच्या फायद्यासाठी उभारली का? असा सवाल ग्रामस्थ करत आहेत.
बाईट: ग्रामस्थ (2 byte)
14
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowAug 10, 2025 16:16:04Parbhani, Maharashtra:
अँकर- हिंगोलीच्या कळमनुरी नगरपालिकेच्या धोबी घाट येथील सार्वजनिक स्मशानभूमीत जाण्यासाठी मयताच्या नातेवाईकांना वाहत्या पाण्यातून असा मार्ग काढावा लागत असून मृत्यू नंतर नागरिकांना मरण यातना सहन कराव्या लागतायेत. कळमनुरी शहाराती राजेंद्र शर्मा यांचा मृत्यू झाल्या नंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमीत नेत असतांना अंत्ययात्रा अशी पाण्यात न्यावी लागली. साधारण पाऊस जरी या भागात झाला तर धोबी घाट परिसरातील ओढ्याला पूर येत असते त्यावेळी मग अंत्ययात्रा अशी पाण्यात वाट काढून न्यावी लागते. त्यामुळे धोबी घाट परिसरातील नाल्यावर पूल उभारावा अशी मागणी नागरिकांतून होत आहे...
14
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowAug 10, 2025 15:01:40Beed, Maharashtra:
BIG BREAKING EXCLUSIVE
बीड: जिल्हा कारागृहात गांजा वाटपावरून राडा, कारागृहातील कर्मचाऱ्यांना जीवे मारण्याच्या धमक्या; खोक्या ऊर्फ सतीश भोसलेसह तीन न्यायाधीन बंदयाविरोधात गुन्हा दाखल..
Anc- बीड जिल्हा कारागृह कोणत्या ना कोणत्या कारणावरून सतत वादाच्या भोवऱ्यात आहे. अज्ञात व्यक्तीने शनिवारी सकाळी जिल्हा कारागृहात गांजा भरलेला चेंडू फेकला.. आणि याच गांजा वाटपावरून चार न्यायाधीन बंदिवानात जोरदार राडा झाला. यावेळी कारागृह कर्मचाऱ्यांनी धाव घेत बंदिवानाच्या हातातील चेंडू ताब्यात घेतला. यावरून बंदिवानानी कर्मचाऱ्यानाच जीवे मारण्याची धमकी देत पुन्हा राडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कारागृह प्रशासनाने जिल्हाधिकारी यांच्यासह कारागृह वरिष्ठांनी माहिती दिली. त्याच अनुषंगाने आज पोलिस आणि जिल्हाधिकारी प्रशासनाकडून कारागृहात जाऊन पंचनामा करण्यात आला. यावेळी गांजा बंदिवानानीच मागितल्याचे स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी खोक्या ऊर्फ सतीश भोसले याच्यासह तीन जणांवर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खोक्याला वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत अटक करण्यात आली होती. त्याला जामीन देखील मिळाला होता. आता खोक्याचा नवा कारनामा समोर आल्यामुळे खोक्याच्या अडचणीत आता मोठी वाढ झाली आहे.
14
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowAug 10, 2025 14:15:40Latur, Maharashtra:
लातूर ब्रेकिंग न्यूज...
स्किप्ट ::- सोयाबीनला 6 हजार रुपये भाव द्यावा या मागणीसाठी उद्या देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्या प्रसंगी क्रांतिकारी शेतकरी संघटनेची पायी दिंडी काढणार.... पायी दिंडीला पोलिसांचा विरोध... 2013 ची आठवण करून देण्यासाठी पायी दिंडी काढणार असल्याची क्रांतिकारी शेतकरी संघटनेची माहीती ... प्रदेशाध्यक्षसह कार्यकर्ते एका तासांपासून पोलिसांच्या नजरकैदेत...
AC ::- उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. क्रांतिकारी शेतकरी संघटनेने सोयाबीनला 6 हजार रुपये भाव द्यावा या मागणीसाठी पायी दिंडी काढण्याचा निर्णय घेतला आहे. 2013 मध्ये याच मागणीसाठी स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी पायी दिंडी काढली होती. मात्र आता लातूर पोलिसांनी या दिंडीला परवानगी नाकारली असून केवळ निवेदन देण्यासाठी वेळ देण्याची तयारी दर्शवली आहे. तरीही शेतकरी संघटना दिंडी काढण्यावर ठाम असून पोलिसांनी त्यांना नजरकैदेत ठेवल्याचा आरोप प्रदेशाध्यक्ष राजीव कसबे यांनी केला आहे....
बाईट ::- राजीव कसबे ( प्रदेशाध्यक्ष क्रांतिकारी शेतकरी संघटना)
14
Report
JJJAYESH JAGAD
FollowAug 10, 2025 14:02:26Akola, Maharashtra:
Anchor : अकोला पातुर रोडवरील कापशी उड्डाण पुलावर टाटा सुमो व दुचाकीचा भीषण अपघात झाला असून या अपघातात दुचाकी चालकाचा उड्डाण पुलावरून खाली फेकल्या गेल्यामुळे मृत्यू झाल्याची घटना घडली..भरधाव येणाऱ्या चारचाकी गाडीने दुचाकीला मागून धडक दिली आणि दुचाकीस्वार हा उड्डाण पुलावरून खाली फेकल्या गेल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला..घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे..
14
Report
NMNITESH MAHAJAN
FollowAug 10, 2025 13:50:06Jalna, Maharashtra:
FEED NAME : 1008ZT_JALNA_DANVE_RAKHI(2 FILES)
जालना : रावसाहेब दानवे यांचं रक्षाबंधन, बहिणीच्या हातून बांधून घेतली राखी
अँकर : भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी आज रक्षाबंधन साजरं केलं.जालन्यातील चांदई एक्को गावामध्ये दानवे यांच्या बहीण राहतात.दरवर्षी दानवे त्यांची बहीण असलेल्या रुख्मणबाई तळेकर यांच्या हातून दानवे यांनी राखी बांधून घेतात.यंदाही दानवे यांनी रुख्मणबाई तळेकर यांच्या चांदई एक्को येथील घरी जाऊन राखी बांधून घेत रक्षाबंधन साजरं केलं.
14
Report
NMNITESH MAHAJAN
FollowAug 10, 2025 13:46:08Jalna, Maharashtra:
FEED NAME : 1008ZT_JALNA_GORANTYAL_BT(2 FILES)
जालना :ब्रेकिंग
शिवसेनेचे 4 आणि उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 4 असे 8 नगरसेवक माझ्या संपर्कात
या आठही नगरसेवकांचा भाजपात लवकरच प्रवेश होणार
माजी आमदार कैलास गोरंटयाल यांचा गौप्यस्फोट
भाजपचा महापौर व्हावा या मताचे लोक तयार झाले आहे आणि भाजपचाच महापौर होणार-गोरंटयाल यांचा दावा
अँकर :शिवसेनेचे 4 आणि उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 4 असे 8 नगरसेवक माझ्या संपर्कात असून या आठही नगरसेवकांचा लवकरच भाजपात लवकरच प्रवेश होणार असल्याचा गौप्यस्फोट जालन्याचे माजी आमदार कैलास गोरंटयाल यांनी केला आहे.भाजपचा महापौर व्हावा या मताचे लोक तयार झाले आहेत त्यामुळे भाजपचाच महापौर होणार असल्याचा दावा गोरंटयाल यांनी केला आहे.
बाईट: कैलास गोरंटयाल,माजी आमदार
14
Report
PNPratap Naik1
FollowAug 10, 2025 13:18:31Kolhapur, Maharashtra:
Kop Tractor Black Box
Feed :- 2C
Anc :- आता विमानाप्रमाणेच ट्रॅक्टर ट्रॉलीला ब्लॅक बॉक्स लावावा लागणार केंद्र सरकारने हा नवा निर्णय घेतलाय. ब्लॅक बॉक्ससह जीपीएस लावणे बंधनकारक केल्याने त्याला कोल्हापुरातून पहिला विरोध करण्यात आलाय. विधान परिषदेचे गट नेते आमदार सतेज पाटील यांनी यांनी पत्रकार बैठक घेवून हा विरोध केलाय. देशातल्या 90 लाख ट्रॅक्टर, ट्रॉलीला निर्णय केला बंधनकारक कारण्यात आलाय. त्यामुळे सतेज पाटील यांनी सोशल मिडियावर हरकती नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्याचबरोबर ट्रॅक्टरला ब्लॅक बॉक्स बसवायची आयडिया कोणाच्या डोक्यातून आली हे कळायला मार्ग नाही. लोकांना आधीच हमीभाव नाहीये त्यात हा 25 हजारांपर्यंत आर्थिक बोजा येणार आहे असं देखील सतेज पाटील यांनी म्हटलंय. EDR आणि GPS ची ट्रॅक्टरला लावायची गरज काय आहे असा सवाल देखील सतेज पाटील यांनी उपस्थित केलाय.
Play Byte :- सतेज पाटील, नेते काँग्रेस
14
Report
SKSACHIN KASABE
FollowAug 10, 2025 13:17:14Pandharpur, Maharashtra:
10082025
Slug - PPR_KRANTI_MORCHA
file 01
-----
Anchor - राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांनी राज्यात मंडल यात्रा काढली आहे. यावर मराठा क्रांती मोर्चाने टीका केली आहे.
23 मार्च 94 रोजी शरद पवार यांनी शासन आदेश काढून मराठा समाजाचे आरक्षण वाटून टाकले. त्यामुळे शरद पवार यांनीच मराठा समाजावर नांगर फिरवला आहे. या गोष्टी समाजाला कळू द्याव्या त्यामुळे एक यात्रा काढावी अशी टीका मंडल यात्रेवर केली आहे.
----
Byte - धनंजय साखळकर, समन्वयक मराठा क्रांती मोर्चा
15
Report
DPdnyaneshwar patange
FollowAug 10, 2025 13:16:10Dharashiv (Osmanabad), Maharashtra:
धाराशिव
DHARA_TAYARI
मनोज जरांगे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई येथे 29 ऑगस्ट रोजी होणाऱ्या आंदोलनाची धाराशिव जिल्ह्यात जोरदार तयारी
जिल्ह्यात ठिकठिकाणी" चलो मुंबईचे" बॅनर, गावोगावी मराठा बांधवाच्या बैठका
Anchor
धाराशिव -मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी 29 ऑगस्ट रोजी मुंबई येथे जरंगे पाटलाच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या आंदोलनाची धाराशिव जिल्ह्यामध्ये जोरदार तयारी सुरू आहे. या आंदोलनाच्या तयारीसाठी जिल्ह्यात ठिकठिकाणी "चलो मुंबई " अशा आशयाचे बॅनर लावण्यात आले आहेत. जिल्ह्यातील गावोगावी सखल मराठा बांधवांच्या वतीने जनजागृतीसाठी बैठका घेण्यात येत आहेत. रिक्षा आणि फोर व्हीलर ला बॅनर लावण्यासाठी बॅनर प्रिंट केले जात आहेत. 27 ऑगस्टला धाराशिव जिल्ह्यातून अंतरवली सराटीकडे आंदोलनासाठी मोठ्या संख्येने मराठा बांधव रवाना होणार आहेत.
14
Report
JMJAVED MULANI
FollowAug 10, 2025 13:03:40Baramati, Maharashtra:
JAVED MULANI
SLUG 1008ZT_DAUNDCRIME
FILE 3
दौंडच्या वरवंड मध्ये वीट व मिक्सर ठोकळ्याने युवकाचा खून,, यवत पोलिसांची दोन दिवसांत घेतलं ताब्यात...
ANCHOR — दौंड तालुक्यातील वरवंड गावच्या हद्दीत ५ ऑगस्ट रोजी एका युवकाचा वीट व सिमेंट मिक्सरच्या ठोकळ्याने डोक्यावर वार करून खून करण्यात आला होता. यवत पोलिसांनी केवळ दोन दिवसांत तपास उलगडत विनोद उर्फ नंदू दत्तात्रय रणधीर आणि गणेश उर्फ अक्षय तानाजी उमाटे या दोघांना अटक केली. फॉरेन्सिक तपास, सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी खून केल्याची कबुली दिली आहे. पुढील तपास यवत पोलीस करत आहेत...
14
Report
APAMOL PEDNEKAR
FollowAug 10, 2025 13:00:22Mumbai, Maharashtra:
शिवसेना चांदिवली विधानसभा विभागाच्या वतीने श्रावण मासानिमित्त भव्य कावडयात्रा
anchor : एकीकडे राज्यात आणि मुखतः मुंबईत मोठ्या प्रमाणात भाषिक वाद सुरू आहे. आशयात शिवसेना शिंदे गटाच्या वतीने राज्यात ठिकठिकाणी उत्तर भारतीयांचा मोठा सहभागी असलेली कावड यात्राचे आयोजन केले जात आहे. शिवसेनेचे चांदिवली विधानसभा विभागाचे आमदार दिलीप लांडे यांच्या नेतृत्वाखाली,
श्रावण मासाचे पावित्र्य लक्षात घेऊन भगवान शंकराच्या जयघोषात व भगव्या वातावरणात,
भव्य कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले होते.कुरल्याच्या छत्रपती शिवाजी महाराज तलाव ते काजूपाडा पाईप लाईन ते श्री शंभो महादेव मंदिर अशी ही कावड यात्रा काढण्यात आली होती. या कावडयात्रेत हजारो उत्तर भारतीय महिला भगवी साडी परिधान करून श्री शंभो महादेवाच्या पिंडीवर जलाभिषेक करण्यासाठी कलश घेऊन सहभागी झाले. तसेच शेकडो पुरुष हे भगवे कुर्ते परिधान
करून कावड घेऊन उपस्थित होते.या कावडयात्रे दरम्यान हिंदू देव-देवतांचे भगवान शंकर, श्रीराम, हनुमान आदी मुर्त्यासह चलतचित्र देखावा प्रदर्शित करण्यात आले.ही हिंदूंची संस्कृती असून कोण काय आरोप करतो या पेक्षा रामाचा धनुष्य शंकराची भक्ती आणि सनातन धर्म आमच्या मनात असल्याने सालाबादप्रमाणे आम्ही या कावड यात्रेचे आयोजन करीत असल्याचे आमदार दिलीप लांडे म्हणाले.
byte : दिलीप लांडे( चांदिवली विधानसभा शिवसेना आमदार)
14
Report
YKYOGESH KHARE
FollowAug 10, 2025 12:48:33Nashik, Maharashtra:
*Breaking... विशाल मोरे, मनमाड*
Anc: मनमाड जवळ पुणे-इंदौर महामार्गावर धावत्या ओव्हरलोड ट्रकचा थरार पाहवयाला मिळाला असून ट्रक मध्ये क्षमते पेक्षा जास्त माल भरलेला होता त्यामुळे ट्रक एका बाजूने झुकलेला असताना देखील चालकाने त्याची परवा न करता ट्रक चालवीत होता अखेर मनमाड पासून काही अंतरावर एका बाजूने तोल जाऊन धावता ट्रक पलटी झाला. सुदैवाने ट्रक डाव्या बाजूने पलटी झाल्यामुळे पुढील अनर्थ टळला. ट्रक पलटी झाल्यामुळे चालक जखमी झाला असून ट्रकचे देखील मोठे नुकसान झाले आहे विशेष म्हणजे एका बाजूने ट्रक झुकल्याचे पाहून त्याच्या मागे दुचाकी वरून चालणाऱ्या तरुणाने ट्रक पलटीचा थरार त्याच्या मोबाईल मध्ये कैद केला. व तो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ओव्हर लोड माल भरून अनेक ट्रक हायवे वरून धावत असतांना देखील पोलिस करतात तरी काय असा प्रश्न उपास्यत कला जात आहे.
14
Report