Back
वर्ध्यात भाजपची महत्त्वाची बैठक, मुख्यमंत्री फडणवीसांचा मार्गदर्शन!
MAMILIND ANDE
Jul 28, 2025 06:15:09
Wardha, Maharashtra
वर्धा
SLUG- 2807_WARDHA_BHOYAR_121
- वर्ध्यात भाजपची विदर्भस्तरीय बैठक
अँकर- वर्ध्यात आज भाजपचे विदर्भस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली आहेय..या बैठकीला विदर्भातील सर्व भाजप आमदार आणि खासदार उपस्थित राहणार आहेय..मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मार्गदर्शन करणार आहेय..वर्धेचे पालकमंत्री पंकज भोयर यांच्याशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी मिलिंद आंडे...
feed live ने दिल आहे
14
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
APAMOL PEDNEKAR
FollowJul 28, 2025 12:35:56Mumbai, Maharashtra:
Anchor : जेव्हीएलआर वर पवई येथे रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात पडून दुचाकीस्वार लालू कांबळे यांचा मृत्यू झाला आहे. लालू कांबळे हे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे सक्रिय कार्यकर्ते होते. या मुळे आरपीआय आक्रमक झाली असून जिथे अपघात झाला तिथे मोठ्या संख्येने जमून आरपीआय ने आंदोलन केले. रस्त्यावर बसून ठिय्या आंदोलन करीत पालिका प्रशासनाचा निषेध केला. या घटनेतील दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी, कांबळे यांच्या कुटुंबाला सरकारने मदत करावी आणि मुंबई चे खड्डे पूर्णपणे बुजवावे अशी मागणी आरपीआय च्या आंदोलकांनी केली.
byte : आरपीआय कार्यकर्ते
0
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowJul 28, 2025 12:33:46Bhandara, Maharashtra:
Pravin Tandekar Bhandara
Slug - 2807_BHA_SENA_BJP_VAD
FILE - 5 VIDEO
महायुती मध्ये शिवसेना शिंदे गटाच्या पाठीत खंजीर खुपसला.... शिंदे गटाचा भाजपा वर अप्रत्यक्ष टीका.... स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वबळावळ लढणार.....
Anchor :- भंडारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकी च्या निकालानंतर महायुतीमध्ये मिठाचा खडा पडला आहे. महायुतीत शिवसेना शिंदे गटाला 4 उमेदवार दिले होते. त्यापैकी एक उमेदवार विजयी झाला आहे. एक निकाल लागणे बाकी असून दोन उमेदवाराला जाणूनबुजून हरविण्यात आले आहे. महायुती मध्ये शिवसेना शिंदे गटाला हरविण्याचा घाट रचला गेला आहे. त्यामुळे या पुढे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिंदे गट स्वबळावळ लढणार आहे. महायुतीत आमच्या पाठीत खंजीर खुपसल गेल आहे. अप्रत्यक्ष रित्या भाजपने दगा दिला असल्याची टीका शिवसेना शिंदे गटाने पत्रकार परिषदेत केली आहे...
BYTE :- संजय कुंभलकर, शिवसेना शिंदे गट संपर्क प्रमुख भंडारा गोंदिया
0
Report
AKAMAR KANE
FollowJul 28, 2025 12:33:32kolhapur, Maharashtra:
Ngp Chess Fukey 121
live u ने फीड पाठवले
---------------
महाराष्ट्र बुद्धिबळ असोसिएशन विश्वविजेते पद मिळवल्यानंतर दिव्या देशमुखला 11 लाखांचे पारितोषिक घोषित केल आहे.. नागपूरला तिचा भव्य स्वागत करणार येणर आहे... यावेळी महाराष्ट्र बुद्धिबळ असोसिएशनचे अध्यक्ष आमदार परीणय फुके यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अमर कामे यांनी
0
Report
JMJAVED MULANI
FollowJul 28, 2025 12:22:34Baramati, Maharashtra:
JAVED MULANI
SLUG 2807ZT_BARAMATIPKG
BYTE 4
बारामतीत भीषण अपघातानं गेला एकाच कुटुंबातील तिघांचा बळी.... तर तिघांच्या मृत्यूच्या धक्क्यांना आजोबांनी ही प्राण त्यागले.... एकाच कुटुंबातील चौघांच्या मृत्यून गाव हळहळल.... आचार्य कुटुंबावर दुःखाचा डोंगर......
Anchor_पुण्याच्या बारामतीत रविवारी सकाळी सव्वा कशा सुमारास झालेले एका भीषण अपघाताने आख कुटुंब उध्वस्त झालंय. मूळचा इंदापूर तालुक्यातील संसार येथील असणाऱ्या मात्र सध्या बारामतीत रहिवाशी असणाऱ्या आचार्य कुटुंबातील एकाच वेळी चौघांचा मृत्यू झाल्याने मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे पाहूयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट.....
Vo 1 _ बारामती मधील ओंकार आचार्य आपल्या दुचाकीवरून मधुरा आणि सई या दोन्ही मुलींना घेऊन घराकडे निघाले होते. दरम्यान महात्मा फुले चौकात त्यांच्या दुचाकीला भरधाव डंपर ने धडक दिली. या अपघातात घटनास्थळीच ओंकार आचार्य यांचा मृत्यू झाला. तर सई आणि मधुरा या दोन चिमुकल्यांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बारामतीत घडली.या घटनेनंतर आचार्य कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.या घटनेचा धक्का सहन न झाल्याने आणि अपघातात आपला मुलगा आणि दोन्ही नातींनी जीव गमावल्याने 24 तासाच्या आतच ओंकार आचार्य यांचे वडील राजेंद्र आचार्य यांचही निधन झाले. यामुळे आचार्य कुटुंबावर मोठा आघात झाला आहे...
गेल्या काही दिवसांपासून राजेंद्र आचार्य हे आजारी होते. बारामतीतील खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांना अपघाताच्या घटनेच्या आधी म्हणजे शनिवारी रात्री डिस्चार्ज देण्यात आला होता. त्यांची प्रकृती तशी नाजूक होती, मात्र कालच्या घटनेने प्रचंड धक्का बसलेल्या राजेंद्र आचार्य यांनी आज शेवटचा श्वास घेतला. आज पहाटे त्यांनीदेखील इहलोकीची यात्रा संपवली.
हा विकासाच्या भयावह वेगाला आणि कलियुगातल्या दशरथाला शापच म्हणावा लागेल काल ओंकार आणि त्याची मुलगी सई व माधुरी यांचा बळी घेणारा हायवा डंपरच्या चालक दशरथ होता. पुराणकाळात देखील दशरथाला श्रावणबाळाच्या आई वडिलांनी शाप दिला होता. सध्याही धावपळीचे युग आहे दशरथाने आपल्या श्रावणबाळाचे प्राण घेतले हा विरह सहन न झाल्याने त्या बापाने देखील प्राण सोडला..!
बारामतीतच नव्हे तर राज्यात विकास भयावह वेगाने वाहतो आहे. दीडविताच्या पोटासाठी भाकरीचा चंद्र शोधताना प्रत्येक जण जीवाच्या आकांताने धावपळ करतो आहे आणि तोच वेग दुसऱ्याचा जीव घेतो आहे. निष्काळजीपणा दुसऱ्याच्या जीवावर बेततो हे माहीत असूनही बारामतीत अनेक घटना घडूनही हायवा डंपरच्या वेगावर कोणाचेही नियंत्रण राहिलेले नाही.
Vo 2_ एका अपघातामुळे घरातील चौघांचा बळी गेला अक्ख कुटुंबच उध्वस्त झालं खंडोबा नगर परिसरातील नागरिक आक्रमक झाले. त्यांनी बारामती मधील महात्मा फुले चौकात ठिय्या आंदोलन केलं. तातडीने महात्मा फुले चौकासह बारामतीत आवश्यक ठिकाणी गतिरोधक बसवावेत याशिवाय रहदारी या ठिकाणी पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी यासह इतर मागण्या ग्रामस्थांनी लावून धरल्या....
बाईट _ आंदोलक,ग्रामस्थ
Vo 3_ एकाच कुटुंबातील चौघांचा गेलेला बळी आणि आक्रमक झालेले बारामतीकर पाहून प्रशासन ही नमलं अन् ग्रामस्थांच्या असणाऱ्या सर्व मागण्या क्षणात मान्य करत आवश्यक ठिकाणी तातडीने गतिरोधक बसवले जातील आणि हे काम रातोरात पूर्ण करू असं आश्वासनच उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांनी दिलं आणि जनतेच्या रागाला आवर घातली....
साऊंड बाईट _सुदर्शन राठोड उपविभागीय पोलीस अधिकारी
END VO _बारामतीत असे अपघात काय नवीन नाहीत यापूर्वी देखील असे अपघात बारामतीत घडले आहेत मात्र कालच्या या दुर्दैवी अपघातामुळे आणि प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे आख्खा एक कुटुंब उध्वस्त झालंय. त्यानंतर आता बारामती शहरातील आवश्यक ठिकाणी गतिरोधक घालण्यासाठी प्रशासनाने काम ही सुरू केलेय.उशिरा का असेना पण प्रशासनाला बुद्धी सुचली खरी पण यात नाहक आचार्य कुटुंबाचा बळी गेला याला जबाबदार कोण हा प्रश्न उरतोच ?
जावेद मुलाणी ,
झी 24 तास ,बारामती.
4
Report
JMJAVED MULANI
FollowJul 28, 2025 12:22:26Baramati, Maharashtra:
JAVEDMULANI
SLUG 2807ZT_INDAPURKETKESHWR
FILE 4
निमगाव केतकीच्या ग्रामदैवत श्री केतकेश्वर मंदिरात आकर्षक विद्युत रोषणाई..
Anchor:
इंदापूर तालुक्यातील
निमगाव केतकीचे ग्रामदैवत श्री केतकेश्वर महादेव मंदिरात श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारी आकर्षक विद्युत रोषणाई ,फुलांची आरास करण्यात आली होती.मंदिरात रात्री उशिरापर्यंत गावासह परिसरातील भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या.
केतकेश्वर मंदिरात सालाबाद प्रमाणे यंदाच्या वर्षी देखील समस्त गावकरी मंडळींच्या वतीने शंभू महादेवाच्या गाभाऱ्यात तसेच मंदिर परिसरात विविध फुलांची आकर्षक सजावट करण्यात आलीय. पिंडी वरती फुलांची सुंदर सजावट करण्यात आलीय... तसेच मंदिरामध्ये विविध लहान मोठ्या रंगीबेरंगी दिव्यांनी विद्युत रोषनाई करण्यात आली होती. सोमवारी पहाटेपासूनच मंदिरामध्ये विविध अभिषेक घालण्यात येत होते. गावात सह परिसरातील अनेक भाविक भक्तांनी दर्शनासाठी व ही आरास पाहण्यासाठी गर्दी केली होती.
3
Report
JMJAVED MULANI
FollowJul 28, 2025 12:22:18Baramati, Maharashtra:
JAVEDMULANI
SLUG 2807ZT_INDAPURINDRESHR
FILE 4
इंदापूरच्या इंद्रेश्वर महादेव मंदिरात श्रावणातील पहिल्या सोमवारी भाविकांची गर्दी.
ANCHOR:— इंदापूरच्या ग्रामदैवत इंद्रेश्वर महादेव मंदिरात श्रावणातील पहिल्या सोमवारी दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केलीय... इंदापूर तालुक्यातील गावागावातून आलेले श्रद्धाळू मोठ्या भक्तिभावाने इंद्रेश्वर महादेवाचे दर्शन घेत आहेत... मंदिरात विविध रंगीबेरंगी फुलांनी आकर्षक सजावट करण्यात आली असून.. सकाळपासूनच लहानांपासून मोठ्यांपर्यंत भाविक रांगेत उभे राहून दर्शन घेत आहेत... संपूर्ण परिसर भक्तीमय वातावरणाने फुलून गेला होता.
3
Report
TTTUSHAR TAPASE
FollowJul 28, 2025 12:21:55Satara, Maharashtra:
TUSHAR TAPASE
1 FILE
SLUG NAME -SAT_RACE
ड्रोन सौजन्य: विश्वजीत साळुंखे, वाई
सातारा:माण तालुक्यातील दहिवडी येथे नामदार जयकुमार गोरे आयोजित सोन्या 50-50 केसरी बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते यासाठी राज्यभरातून 900 बैलगाडा स्पर्धकांनी यामध्ये सहभाग नोंदवला शेवटच्या राऊंडमध्ये झालेल्या बैलगाडा शर्यतीत कार्तिक आणि बकासुर ही बैल जोडी प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले असून ही बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी मोठ्या संख्येने बैलगाडा शर्यत प्रेमी दहिवडीमध्ये दाखल झाले होते... या बैलगाडा शर्यतीची ड्रोन द्वारे टिपलेली काही दृश्य
3
Report
LBLAILESH BARGAJE
FollowJul 28, 2025 12:02:19Pune, Maharashtra:
रिपोर्टर:- लैलेश बारगजे
स्लग:- शनि शिंगणापूर उपकार्यकारी अधिकारी आत्महत्या
फीड 2C
Anc :-
शनी शिंगणापूर देवस्थानचे माजी विश्वस्त आणि सध्या उप कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत असलेले नितीन शेटे यांनी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. सोमवारी सकाळी साधारण 8 वाजता ही बाब उघडकीस आली. दरम्यान त्याच्या आत्महत्येनंतर शनी शिंगणापूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. नितीन शेटे हे 2021 पासून शनी शिंगणापूर देवस्थानमध्ये उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होते. सध्या देवस्थानच्या नावाने चालवल्या जाणाऱ्या बनावट ऑनलाईन अँप प्रकरणी शनी शिंगणापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. या प्रकरणात अनेक पदाधिकाऱ्यांचे आणि पुजाऱ्यांचे जबाब पोलिसांनी नोंदवले आहेत. मात्र, नितीन शेटे यांना या चौकशीसाठी कधीही पोलिसांनी बोलावले नव्हते किंवा त्यांना समन्सही बजावण्यात आले नव्हते, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली आहे. त्यामुळे जर शेटे यांच्यावर चौकशीचा ससेमीरा नव्हता तर त्यांनी आत्महत्या कोणत्या कारणाने केली याबाबत पोलीस तपास करत आहे. खरंतर शेटे यांनी आत्महत्या केलेल्या ठिकाणाहून कोणतीही सुसाईड नोट मिळालेली नाही. त्यामुळे त्यांनी टोकाचं पाऊल नेमकं कोणत्या कारणामुळे उचललं, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पोलीस याप्रकरणाचा सखोल तपास करत आहे मात्र या घटनेमुळे संपूर्ण देवस्थान परिसरात शोककळा पसरली आहे.
बाईट:- सोमनाथ घार्गे - पोलीस अधीक्षक
2
Report
UPUmesh Parab
FollowJul 28, 2025 12:01:46Oros, Maharashtra:
सिंधुदुर्ग----- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अवैध दारू गोवा बनावट दारूच्या व्यवसाय विरोधात मनसे आक्रमक झालेली पाहायला मिळाली. कुडाळ राज्य उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांना चक्क गोवा बनावट दारूच्या बाटल्यांचा हार घालण्याचा प्रयत्न मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांनी केलाय. तर मला हलक्यात घेऊ नका असा इशारा यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांनी दिला.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अवैध दारू ड्रग्स, हा विषय गंभीर बनला आहे. यावर प्रशासन कारवाई करत नसल्याचे पाहायला मिळालं. यामुळेच मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांच्या माध्यमातून जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध गोवा बनावट दारूच्या विरोधात अधिकाऱ्यांकडून कारवाई होत नसल्याने मनसेने आक्रमक पवित्रा घेत. अधिकाऱ्यांना धारेवर धरलय.
बाईट धीरज परब जिल्हाध्यक्ष मनसे
5
Report
DPdnyaneshwar patange
FollowJul 28, 2025 11:49:01Dharashiv (Osmanabad), Maharashtra:
धाराशिव ब्रेकिंग
DHARA_SENA_MEET
धाराशिवमध्ये शिवसेनेच्या समन्वय बैठकीत गटबाजी उफाळली
माजी मंत्री तानाजी सावंत यांचा फोटो शिवसेनेच्या कार्यक्रमातून गायब
शिवसेना जिल्हाप्रमुखांकडून लावलेल्या बॅनर वर तानाजी सावंत यांना पुन्हा डाववले
तानाजी सावंत यांना डाववल्याने समर्थक नाराज
राजन साळवी यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेचे समन्वय बैठक, तानाजी सावंत समर्थक नाराज
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अगोदर शिवसेनेतील गटबाजी पुन्हा उघड.
9
Report
MAMILIND ANDE
FollowJul 28, 2025 11:48:12Wardha, Maharashtra:
*वर्धा*
FEED LIVE ने पाठविले आहे
SLUG- 2807_WARDHA_BAVAN_BYTE
चंद्रशेखर बावनकुळे बाईट
*बावनकुळे ऑन दिव्या देशमुख*
नागपूरची दिव्या देशमुख जागतिक विक्रम कमावलेला आहे महाराष्ट्राचा 14 कोटी जनतेच्या वतीने शुभेच्छा देतो आणि आमच्या नागपूरच्या भूमीचे नाव पुण्यभूमीचं नाव संपूर्ण जगात तिने उंच केल्याबद्दल मनापासून आभार मानतो
*बावनकुळे ऑन स्थानिक स्वराज्य संस्था*
भारतीय जनता पार्टी विदर्भ प्रदेशाच्या वतीने आमच्या सर्व आमदार खासदार मंत्री खास करून मुख्यमंत्री या मेळाव्याला होते बैठकीला होते स्थानिक स्वराज्य संस्थेचा रणसिंग फुकल आहे ला गेला संकल्प केला महाराष्ट्र मध्ये विदर्भामध्ये संपूर्ण नगरपालिका पंचायत समिती जिल्हा परिषद ग्रामपंचायत महायुतीचे उमेदवार निवडून येतील काँग्रेसचा चोपडासोप विदर्भात होईल आणि विदर्भ म्हणजे भारतीय जनता पार्टी महा युती सगळी जागा जिंकेल
*बावनकुळे ऑन निवडणूक*
भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ते 51% निवडणूक जिंकण्याची तयारी केली कोणी कितीही शक्ती एक झालं तरी 51 जिंकण्याची तयारी केली आहे
*बावनकुळे ऑन उद्धव ठाकरे सरकार*
उद्धव ठाकरे च्या सरकारची यादी काढली उद्धव ठाकरे च्या सरकारने कोविडच्या काळात सुद्धा कोविडनी मेलेल्या डोक्यावरच लोणी उद्धव ठाकरे सरकारच्या मध्ये भ्रष्टाचार अन्नजर दुराचार सुरू होता मी दाव्याने सांगतो देवेंद्र फडणवीस सरकार भ्रष्टाचा सपोर्ट करणार नाही आमच्या सरकारी पारदर्शक गती म्हणून लोकमुक हे सरकार आहे काही चुका झाल्या असतील पण त्या एका दिवशी दुरुस्त होत नाही आम्ही त्या दुरुस्त करू एखादी दुरुस्त करून आम्हाला त्या ठिकाणी पारदर्शी सरकार गतिमान सरकार चालवायचा आहे देवेंद्रजीचे सरकार देवेंद्र फडणवीस पारितोषिक सरकारला सोमवारी घेऊन समोर चालले आहेत परंतु देवेंद्रजी सहन करणार माननीय अजित दादांचा अजित दादांचा पक्ष्यांचे शिवसेनेचे एकनाथ शिंदे भारतीय जनता पार्टी मंत्र्यांनी केलेली चूक देवेंद्रजी सहन करणार नाही
*बावनकुळे ऑन नागपूर बीयरबार*
माननीय मी आयुक्तांची बोललेलो आहे सायबर सेल शी बोललेलो आहे त्याचा रिपोर्ट माझ्याकडे येणार आहे तीन दिवस यामध्ये कारवाई झालेली दिसेल तीन दिवसात कारवाई झालेली दिसेल सायबर टीम काम करते पोलीस आयुक्त काम करत आहे एस पी ला देखील कामाला लावलेला आहे देवेंद्रजींनी देखील सूचना कोणत्या डिपारमेंट ची फाईल आणि बार प्रकरणात चौकशी सुरू झालेली आहे सायबर रेकॉर्ड काढणार आहे
6
Report
SMSATISH MOHITE
FollowJul 28, 2025 11:48:05Nanded, Maharashtra:
Satish Mohite
Slug - Ned_Rat_Hospital
Feed on - 2C
-----------------------------
Anchor - शासकीय रुग्णालयात शस्त्रक्रिया विभागात एका रुग्णाच्या पायाला चक्क उंदराने कुरतडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. रुग्णाच्या जीविताशी खेळण्याचा हा प्रकार नांदेडमध्ये उघडकीस आलाय.
Vo - शस्त्रक्रियेसाठी शासकीय रुग्णालयात दाखल झालेल्या एका रुग्णाच्या पायाला चक्क उंदराने कुरतडले. नांदेड मधील श्री गुरु गोबिंदसिंघजी शासकीय रुग्णालयात हा प्रकार घडला. 63 वर्षीय रमेश यन्नावार यांना मधुमेह आहे. त्यांच्या पायावरील एका शस्त्रक्रियेसाठी 20 जुलै रोजी ते रुग्णालयात भरती झाले होते. 21 जुलै च्या पहाटे साडेतीन चार दरम्यान त्यांच्या पायाला उंदीर कुरतडत होता. त्यांना अचानक जाग आल्याने उंदीर पळाला. त्यांनतरही तो उंदीर शस्त्रक्रिया विभागात फिरत होता. रुग्णाच्या नातेवाईकाने उंदीर फिरत असल्याचा व्हिडीओ मोबाईलमध्ये चित्रित केला.
Byte - रमेश यन्नावार - रुग्ण
Vo - शासकीय रुग्णालयाचा हा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आल्यावर नांदेड दक्षिणचे शिवसेनेचे आमदार आनंद बोनढारकर रुग्णालयात भेट देऊन पाहणी केली. रुग्णालयातील अस्वच्छता पाहून बोनढारकर यांनी धारेवर धरले. या घटणेबाबत बैठक घेउन दोषीवर कारवाई करण्यात येणार असल्याचे आमदार बोनढारकर म्हणाले.
Byte - आ. आनंद बोनढारकर
Vo - शस्त्रक्रिया विभागातील या घटणेबाबत जिल्हा शल्यचिकित्सक संजय पेरके यांच्याशी झी 24 तासने संपर्क केला. त्यांनी याबाबत कॅमेऱ्यावर बोलण्यास नकार दिला. उंदराना पकडण्यासाठी ट्रॅप लावण्यात आल्याचे पेरके म्हणाले. शस्त्रक्रिया विभागात उंदराने रुग्णाला चावा घेणे हा गंभीर प्रकार आहे. पण जिल्हा शल्य चिकित्सकांनी हात झटकण्याचा प्रयत्न केला. उंदराने रुग्णाच्या पायाला कुरतडल्याने नांदेडच्या शासकीय रुग्णालयाची अभ्रू वेशीला टांगल्या गेलीये. त्यामुळे या गंभीर बाबीकडे आरोग्य विभाग आणि आरोग्य मंत्र्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे.
-----------------
6
Report
UPUmesh Parab
FollowJul 28, 2025 11:47:48Oros, Maharashtra:
- सिंधुदुर्गात महायुतीत तणाव
- भाजप पदाधिकाऱ्यांना शिवसेनेकडून पक्षप्रवेशाचे प्रलोभने दिली जात आहेत
- भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांची थेट मुख्यमंत्र्यांना व प्रदेशाध्यक्षाना पत्राद्वारे तक्रार
- शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांकडून भाजपा कार्यकर्त्यांना आर्थिक आणि विकासकामांच्या आश्वासनांचे प्रलोभन दिले जात असल्याचा आरोप
- कुडाळ-मालवण व सावंतवाडी मतदारसंघात शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष आणि सेना पदाधिकारी भाजपाच्या पदाधिकारी यांना आमिष दाखवले जात असल्याचा आरोप
byte -- प्रभाकर सावंत, भाजपा जिल्हाध्यक्ष सिंधुदुर्ग
feed on desk
9
Report
GMGANESH MOHALE
FollowJul 28, 2025 11:37:53Washim, Maharashtra:
वाशिम:
File:2807ZT_WSM_SOMAIYA_BYTE
रिपोर्टर:गणेश मोहळे,
अँकर:राज्यातील ४२ हजार खोटे जन्म दाखले शासनाने रद्द केलेअसून त्यापैकी ११ हजार मूळ प्रमाणपत्रे जमा झाली आहेत.उर्वरित प्रमाणपत्रे १५ ऑगस्टपर्यंत परत घेण्याचा आदेश दिला आहे.भाजप नेते किरीट सोमय्या आज वाशिम येथे आले असून त्यांनी सांगितले की, वाशिम जिल्ह्यात ५०% दाखले जमा झाले आहेत,उर्वरित दहा दिवसांत पूर्ण केले जातील.सोमय्या यांनी पुढे सांगितले की, पुण्यातील ३५२ मस्जिदींवर बेकायदेशीर भोंगे असून फक्त ५२ भोंग्यांना परवानगी आह.याचा पाठपुरावा करण्यासाठी ते लवकरच पुण्यात जाणार आहेत तसेच वाशिम जिल्ह्यातील मस्जिदींवरील अनधिकृत भोंग्यांवर कारवाई होईल,असेही त्यांनी स्पष्ट केले.
बाईट: किरीट सोमय्या, भाजपा नेते
8
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowJul 28, 2025 11:37:12Virar, Maharashtra:
Date-28july2025
Rep-prathamesh tawade
Loc-virar
Slug-VIRAR TEMPLE
Feed send by 2c
Type - AV
Slug- विरार फाट्याजवळील शेषनाग मंदिरात भाविकांची गर्दी
अँकर - श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारी विरार फाटा येथील प्रसिद्ध शेषनाग मंदिरात भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. सकाळपासूनच मंदिरात दर्शनासाठी भाविकांची रांग लागली होती आणि संध्याकाळपर्यंत भाविक दर्शनासाठी येतच होते.पावसाने आज विश्रांती घेतल्यामुळे भाविकांना दर्शनासाठी अडथळा न होता, सुरळीतपणे दर्शन घेता आले. मंदिर व्यवस्थापनाच्या वतीनेही योग्य ती व्यवस्था करण्यात आली होती. भक्तिभावाने भरलेल्या वातावरणात मंदिर परिसर फुलून गेला होता..
10
Report