Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Thane400601

भिवंडीत ओबीसींच्या न्यायासाठी आंदोलन, शेकडो बांधवांचा सहभाग!

UJUmesh Jadhav
Sept 04, 2025 08:31:37
Thane, Maharashtra
भिवंडीत ओबीसीं समाजाच्या न्याय मागण्यासाठी आंदोलन... शेकडो ओबीसी बांधव आंदोलनात सहभागी... शासनाला दिले निवेदन... ॲंकर... राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने राज्यात उपोषण, धरणे व मोर्चे इत्यादी मार्गाने सरकारचे लक्ष ओबीसी समाजाच्या मागण्यांकडे वेधण्यासाठी महाराष्ट्रात आज ओबीसी बांधव ऐकवटले असून राज्यातील विविध शासकीय कार्यालयात निवेदन सादर करण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर भिवंडी व शहापूर तालुक्यातील ओबीसी बांधवांनी भिवंडी प्रांत व तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढत तहसीलदार यांना निवेदन सादर केले. या वेळी ओबीसी समाज बांधवांनी विविध प्रकारच्या घोषणा देत आपला आवाज सरकार पर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करत आहेत. पूर्ण भिवंडी नगरी दणाणून सोडली आहे‌ राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या सभेत खालील ठराव पारित करण्यात आले असून या ठरावातील खालील मागण्या राज्य सरकारनी त्वरित पूर्ण कराव्यात याकरिता राष्ट्रीय ओबीसी महासंघाद्वारे नागपूर येथील संविधान चौकात ३० ऑगस्ट २०२५ पासून साखळी उपोषण सुरु आहे. निवेदनात खालील मागण्यांवर शासनाने सहानुभूतीपूर्वक विचार करून त्या पूर्ण कराव्यात अशी आर्तसाद ओबीसी समाजाने राज्य सरकारला घातली आहे. सदरचे निवेदन राज्याचे राज्यपाल , मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना सादर करण्यात आले आहे. ৭) मराठा जातीचा ओबीसी संवर्गात समावेश करण्यात येऊ नये व सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात येऊ नये. २) अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतक-यांना त्वरीत नुकसान भरपाई देण्यात यावी. ३) ओबीसी मुलांना व्यावसायीक अभ्यासक्रमास १०० टक्के शिष्यवृत्ती लागु करण्यात यावी. ४) गुणवंत मुलांमुलीना परदेशात उच्च शिक्षणासाठी देण्यात येणारी शिष्यवृत्ती ७५ विद्याथ्यांची संख्या वाढवुन २०० विद्यार्थी करण्यात यावी. ५) महाज्योती या संस्थेकरीता एक हजार कोटी रूपयांची तरतुद करण्यात यावी, शासन निर्णय दिनांक २८ आक्टो. २०२१ च्या नुसार ज्या प्रमाणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी च्या शासन निर्णयानुसार समाजातील संस्थाना कामात प्राधान्य देण्यात येते, त्याप्रमाणे महाज्योतीची कामे ओबीसी, जिजा, भज व विशेष मागास प्रवर्गातील संस्थेला रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी प्राधाण्य देण्यात यावे. ६) म्हाडा व सिडको तर्फे बांधुन देण्यात येणाऱ्या घरकुल योजनेत ओबीसी संवर्गाकरीता आरक्षण लागु करण्यात यावे. ७) नागपुर येथे तयार असलेले उच्च व तंत्र विभागाचे स्व. यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दी वर्षानिमीत बांधलेले २०० मुलींचे तयार वसतीगृह तसेच नागपुर येथे स्व. वसंतराव नाईक जन्मशताब्दी वर्षानिमीत्त तयार असलेले २०० मुलांचे वसतीगृह ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी संवर्गातील विद्यार्थ्यांच्या वसतीगृहासाठी ओबीसी बहुजन कल्याण विभागाकडे हस्तांतरीत करून शासन निर्णयान्वये इतर मागासवर्ग बहुजन कल्याण विभागामार्फत मुलांचे व मुर्तीचे वसतीगृह सुरू करण्यात यावे. ८) ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी आर्थिक विकास महामंडळा मफित असलेली थेट कर्ज योजनेची मर्यादा १ लाख व १५ लाख रुपये कर्ज मर्यादेच्या योजनेसाठी, तसेच गहाण खतामध्ये फक्त शेतीची अट असून ती शिथिल करण्यात यावी घर., प्लॉट, दुकान इत्यादी बार्षीचा समावेश व्हावा जामीनदार घेतांना केवळ सरकारी. नौकरच असावा ही अट शिथिल करण्यात यावी, ५०० सीवील स्कोरची अट शिथिल करुन लाभ धारकांना अटच नसावी. ९) शामराव पेजे आर्थिक विकास महामंडळ, अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ या धर्तीवर इतर मागास आर्थिक विकास महामंडळाला अँड जनार्दन पाटील ओबीसी आर्थिक विकास महामंडळ असे नाव द्यावे. १०) प्रत्येक शहर व तालुका स्तरावर ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी विद्याथ्यांसाठी सुसज्ज ग्रंथालय सुरु करण्यात यावे. ११) डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभुषण पुरस्कार आणि आदिवासी सेवक पुरस्कार याप्रमाणे डॉ पंजाबराव देशमुख ओबीसी समाजसेवक पुरस्कार जाहीर करण्यात यावा. १२) अनुसूचित जातीजमाती प्रमाणे ओबीसी, विजा, भज व विशेष मागास प्रवर्ग शेतकरूयांना १०० टक्के सवलतीवर राज्यात योजना शुरु करण्यात याव्यात. १३) ओबीसी आर्थिक विकास महामंडळाला एक हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात यावी व महामंडळाच्या सर्व मंजूर योजना स्वरीत सुरु करण्यात याव्यात. १४) ओबीसी, वीजा, भज व विमाप्र समुदायातील पीएचडी संशोधक विद्यार्थ्यांची तीन वर्षांपासून प्रलंबित असणारी फेलोशिप त्वरित अदा करण्यात यावी. बाईट- आंदोलक
13
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
SMSATISH MOHITE
Sept 04, 2025 11:50:16
Nanded, Maharashtra:
Satish Mohite Slug - Ned_OBCAgitation Feed on - 2C ----------------------------- Anchor - नांदेडमध्ये सकल ओबीसी समाजातर्फे सरकारने काढलेल्या जी आर विरोधात निषेध आंदोलन करण्यात आले. जरांगे पाटील यांच्या दबावाला बळी पडून सरकारने जी आर काढला. यावेळी आंदोलकानी मुख्यमंत्री आणि सरकार विरोधात घोषणाबाजी केली या जी आर मुळे ओबीसी च्या आरक्षणात घुसखोरी होणार असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. हा जी आर तात्काळ रद्द करावा अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे दिली. जी आर रद्द न केल्यास मोठे आंदोलन उभारण्याचा इशारा देण्यात आला. Byte - सकल ओबीसी आंदोलक Byte - सकल ओबीसी आंदोलक -------------
0
comment0
Report
AKAMAR KANE
Sept 04, 2025 11:46:45
kolhapur, Maharashtra:
Ngp Sawe Visit live u ने फीड पाठवले ------- उपोषण मागे घेतले त्याविषयी संपूर्ण शॉटस आणि बबनराव तायवाडे यांचा 121 आणि परिणय फुके यांचा 121 ---------- नागपूर राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे संविधान चौकात सुरू असलेले साखळी उपोषण आज मागे घेण्यात आले. ओबीसी कल्याण विभागाचे मंत्री अतुल सावेने महासंघाच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केल्यानंतर 14 पैकी 12 मागण्या मान्य करण्यात आल्या. त्यानंतर हे उपोषण मागे घेण्यात आले.तर दोन मागण्यांकडे कॅबिनेट स्तरावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे गेल्या सहा दिवसांपासून सुरू असलेले राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे साखळी उपोष ची आज सांगता करण्यात आली. यावेळी सरकारचे प्रतिनिधी म्हणून ओबीसी कल्याण विभागाचे मंत्री अतुल सावे यांनी आश्वासन दिले तर आमदार परीणय फुके उपस्थित होते तर राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी यांनी पाणी पीत साखळी उपोषण थांबत असल्याचे जाहीर केल ------ बाईट बबनराव तायवाडे, अध्यक्ष, राष्ट्रीय ओबीसी महासंघ 121 केलाय ------- बाईट आ परिणय फुके,(121 केलाय ) ------ खालील मागण्या होत्या 1. मराठा जातीचा ओबीसी संवर्गात समावेश करण्यात येऊ नये व सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात येऊ नये. 3) गुणवंत मुलांमुलीना परदेशात उच्च शिक्षणासाठी देण्यात येणारी शिष्यवृत्ती 75 विद्यार्थ्यांची संख्या वाढवुन 200 विद्यार्थी करण्यात यावी. 3) महाज्योती या संस्थेकरीता एक हजार कोटी रूपयांची तरतुद करण्यात यावी, शासन निर्णय दिनांक 28 आक्टो. 2021 च्या नुसार ज्या प्रमाणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी च्या शासन निर्णयानुसार समाजातील संस्थाना कामात प्राधान्य देण्यात येते, त्याप्रमाणे महाज्योतीची कामे ओबीसी, विजा, भज व विशेष मागास प्रवर्गातील संस्थेला रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी प्राधाण्य देण्यात यावे. 5) म्हाडा व सिडको तर्फे बांधुन देण्यात येणा-या घरकुल योजनेत ओबीसी संवर्गाकरीता आरक्षण लागु करण्यात यावे. 6) नागपुर येथे तयार असलेले उच्च व तंत्र विभागाचे स्व. यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दी वर्षानिमीत्त बांधलेले 200 मुलींचे तयार वसतीगृह तसेच नागपुर येथे स्व. वसंतराव नाईक जन्मशताब्दी वर्षानिमीत्त तयार असलेले 200 मुलांचे वसतीगृह ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी संवर्गातील विद्यार्थ्यांच्या वसतीगृहासाठी ओबीसी बहुजन कल्याण विभागाकडे हस्तांतरीत करून शासन निर्णयान्वये इतर मागासवर्ग बहुजन कल्याण विभागामार्फत मुलांचे व मुलींचे वसतीगृह सुरू करण्यात यावे. 7) ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी आर्थिक विकास महामंडळा मफित असलेली थेट कर्ज योजनेची मर्यादा 1 लाख व 15 लाख रुपये कर्ज मर्यादेच्या योजनेसाठी, तसेच गहाण खतामध्ये फक्त शेतीची अट असून ती शिथिल करण्यात यावी घर., प्लॉट, दुकान इत्यादी बाबींचा समावेश व्हावा जामीनदार घेतांना केवळ सरकारी. नौकरच असावा ही अट शिथिल करण्यात यावी, 500 सीबील स्कोरची अट शिथिल करुन लाभ धारकांना अटच नसावी. 9) शामराव पेजे आर्थिक विकास महामंडळ, अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ या धर्तीवर इतर मागास आर्थिक विकास महामंडळाला अँड जनार्दन पाटील ओबीसी आर्थिक विकास महामंडळ असे नाव द्यावे. 8) प्रत्येक शहर व तालुका स्तरावर ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज ग्रंथालय सुरु करण्यात यावे. 9) डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभुषण पुरस्कार आणि आदिवासी सेवक पुरस्कार याप्रमाणे डॉ पंजाबराव देशमुख ओबीसी समाजसेवक पुरस्कार जाहीर करण्यात यावा. 10) अनुसूचित जातीजमाती प्रमाणे ओबीसी, विजा, भज व विशेष मागास प्रवर्ग शेतकरुयांना 100 टक्के सवलतीवर राज्यात योजना सुरु करण्यात याव्यात. 11) ओबीसी आर्थिक विकास महामंडळाला एक हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात यावी व महामंडळाच्या सर्व मंजूर योजना त्वरीत सुरु करण्यात याव्यात. 12) ओबीसी, वीजा, भज व विमाप्र समुदायातील पीएचडी संशोधक विद्यार्थांची तीन वर्षापासून प्रलंबित असणारी फेलोशिप त्वरित अदा करण्यात यावी. 13) अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतक-यांना त्वरीत नुकसान भरपाई देण्यात यावी. (बैठक) 14) ओबीसी मुलांना व्यावसायीक अभ्यासक्रमास 100 टक्के शिष्यवृत्ती लागु करण्यात यावी. (बैठक)
3
comment0
Report
GMGANESH MOHALE
Sept 04, 2025 11:35:45
Washim, Maharashtra:
वाशिम: File:0409ZT_WSM_GANAPATI_COLLECTION रिपोर्टर:गणेश मोहळे, वाशिम अँकर: वाशिमच्या कारंजा येथील गोपाल आणी नरेंद्र खाडे या बंधूंनी 'मोरया आम्हा तुझा छंद' या नावाने अनोखा छंद जोपासला आहे. त्यांनी दहा हजारांहून अधिक गणेशाची चित्रकात्रणे आणि शेकडो गणपती मूर्तींचा संग्रह केला आहे.एका लग्नपत्रिकेवरील सोनेरी गणपतीपासून सुरू झालेला त्यांचा हा छंद आज जगभरातील २२देशांतील गणेशमूर्तींच्या चित्रांपर्यंत पोहोचला आहे.राशीनुसार गणेशरूपे,विषयांनुसार तयार केलेली चित्रे, बाल गणेश,ध्यानस्थ गणेश, लॅपटॉपवर काम करणारा गणेश अशा अनोख्या व सूक्ष्म कलाकृती या संग्रहात आहेत.त्यांच्या प्रदर्शनांना मोठा प्रतिसाद मिळाला असून, ‘एक ऊब जाणीवेची’ संस्थेसाठी त्यांनी ५० हजारांचा निधीही संकलित केला.आज 'गणपतीवाले खाडे बंधू' म्हणून त्यांची राज्यभर ओळख आहे. श्रद्धा, कल्पकता आणि सामाजिक भान या तिन्हींचा संगम असलेला त्यांचा संग्रह अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. बाईट: गोपाल खाडे
2
comment0
Report
SNSWATI NAIK
Sept 04, 2025 11:32:11
Navi Mumbai, Maharashtra:
story slug - नवी मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग रचनेत मोठ्या प्रमाणात त्रुटी भाजप चा आरोप नवी मुंबई महानगरपालिका के प्रभाग रचना मे आक्षेप FTP slug - nm prbhaag rachna shots- reporter- swati naik navi mumbai Anchor -: नवी मुंबई मनपाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी जाहीर करण्यात आलेल्या प्रारूप प्रभाग रचनेत मोठ्या प्रमाणात त्रुटी असून एका पक्षाला फायदा होईल या दृष्टीने प्रभाग रचना करण्यात आल्याचा आरोप भाजपने केलाय. भाजपतर्फे आज मनपा अधिकाऱ्यांची भेट घेऊन प्रारूप प्रभाग रचने विरोधात आपल्या हरकती आणि सूचना नोंदविल्यात. कमीतकमी त्रुटी असलेला पर्यायी प्रारूप प्रभाग रचनेचा आराखडा यावेळी मनपा अधिकाऱ्यांना देण्यात आलाय. आम्ही केलेल्या हरकती आणि सूचना याची दखल घेऊन योग्य ती कारवाई होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला असून सकारात्मक निर्णय न झाल्यास प्रारूप प्रभाग रचने विरोधात न्यायालयात दाद मागणार असल्याची प्रतिक्रिया भाजपा नेत्यांकडून व्यक्त करण्यात आलेय. बाईट - संजीव नाईक -माजी खासदार बाईट - सागर नाईक - माजी महापौर
1
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Sept 04, 2025 11:31:38
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:
Csn vinod patil byte Feed attached मराठा आरक्षणाबाबत हैद्राबाद  गॅजेट जीआर बाबत आता टीका टिप्पणी सुरू आहे... त्यातच मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे यांनीही हे सरसकट आरक्षण नसल्याचे सांगितलंय नक्की हेच आमचे म्हणणे आहे आणि या जी आर मधून आरक्षण मिळणार नाही तर ही फक्त माहिती पुस्तिका आहे प्रक्रिया आहे हेच आम्ही संगतोय आणि हेच आज सीएम डिसीएम यांनी स्पष्ट केल्याचं विनोद पाटील म्हणाले, याबाबत जे म्हणताय गुलाल उधळू त्यांनीही याबाबत बोलावे असे पाटील म्हणाले... तर अभ्यासक चूक नाही ते समाजाला फसवत नाही तर ते मदतच करतात असे विनोंद पाटील म्हणाले... Byte विनोंद पाटील, मराठा आरक्षण आंदोलक
2
comment0
Report
MKManoj Kulkarni
Sept 04, 2025 11:30:15
Mumbai, Maharashtra:
अँकर -- मुंबईतून मेल, एक्सप्रेस रेल्वे मध्ये मागच्या ७ ते ८ वर्षापासून चोरी करणाऱ्या टोळीला गवर्नमेंट रेल्वे पोलिसांनी गजाआड केले आहे.या टोळीतील दोन जणांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून  १६ गुन्हे उघडकीस झाले त्यात एकूण  २२ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.यात ३१५ ग्राम सोने व रोख रक्कम आहे.- GRP पोलिसांनी केली कारवाई, कल्याणमध्ये टोळीच्या म्हरोक्याला केली अटक आहे.चार फरार आरोपींचा शोध पोलिस घेत आहेत. ही टोळी रेल्वेगाड्यांमध्ये झोपलेल्या प्रवाशांच्या खिसे व बॅग चोरी करायचे.गेल्या आठ वर्षापासून चोरी करत होते अशी माहिती रेल्वे पोलिस आयुक्त एम राकेश कलासागर यांनी दिली आहे. Byte -- एम राकेश कलासागर पोलिस आयुक्त लोहमार्ग मनोज कुळकर्णी  Feed send TVU 82 Slug -- GRP PC 
4
comment0
Report
SNSWATI NAIK
Sept 04, 2025 11:20:07
Navi Mumbai, Maharashtra:
story slug - पनवेल मध्ये जमिनावर बाहेर आलेल्या आरोपीचा पोलिसांवर हल्ला. FTP slug - panvel crime story shots- video ,police action byet- acp reporter- swati naik navi mumbai anchor - पनवेल मध्ये जमिनावर बाहेर आलेल्या आरोपीचा पोलिसांवर हल्ला केल्याची घटना बुधवारी रात्री घडली हत्येच्या गुन्ह्यातील आरोपी श्रवण महतो याने हा हल्ला केला , तुरुंगातून जामिनावर बाहेर आल्यावर आई - वडील ,भाऊ आणि भावाची मुले रहात असलेल्या मंगला निवास ,गोडसे अळी येथील फ्लॅट मध्ये जबरदस्ती घुसला होता आरोपी. सदर इमारत आपल्या मालकीची असून त्याने घरातील लोकांना कोयत्याचा धाक दाखवला होता, याबाबत पोलिसांना खबर मिळाली होती ,त्यानुसार पोलिसांनी आरोपीला बाहेर येण्याचे अपील केले यावेळी त्याने आपल्या पुतणी च्या गळ्याला कोयता लाऊन पोलिसांना धमकावत होता , अखेर पोलीस दरवाजा तोडून पोलीस फ्लॅट मध्ये गेले असता पोलिसांवर आरोपीने कोयत्याने केला भ्याड हल्ला.हल्ल्यात 4 पोलीस कर्मचारी जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हल्लेखोर आरोपीला पनवेल शहर पोलीसांनी ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरु आहे. बाईट- प्रशांत मोहिते - पोलीस उपायुक्त gf -
6
comment0
Report
ABATISH BHOIR
Sept 04, 2025 11:19:34
Kalyan, Maharashtra:
सर्व पक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समितीची केडीएमसी प्रभागरचनेवर हरकत महानगरपालिकेतून २७ गावे वगळण्याची मागणी कायम Anc..कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या वतीने आगामी निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचना आराखडा प्रसिद्ध करण्यात आला असून आज या प्रभाग रचनेवर हरकत घेण्याच्या शेवटच्या दिवशी सर्व पक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समितीने केडीएमसी प्रभागरचनेवर हरकत घेत महानगरपालिकेतून २७ गावे वगळण्याची मागणी कायम ठेवली आहे. याबाबत सुमारे साडेतीन हजार हरकती नोंदविण्यात आल्या.आहेत Vo..२७ गावांमध्ये प्रभाग रचनेस समितीने आधीच विरोध दर्शवला होता. तसेच ही बाब निवडणूक आयोग यांच्या निदर्शनास आणून देऊ असे केडीएमसी आयुक्तांनी आश्वासित केले होते. परंतु तसे केले नसल्याचे प्रदर्शित प्रारूप प्रभाग रचनेवरून आढळून येते. त्याविरोधात २७ गावांमध्ये प्रभाग रचना तर केलीच परंतु न्यायप्रविष्ट असलेले २७ गावातील क्षेत्रांची स्वतंत्र प्रभागाची आखणी करणे अपेक्षित असताना ते केले नाही. जेणे करून हे क्षेत्र वगळता त्याचे परिणाम हे महापालिकेमध्ये इतर क्षेत्रावर होऊ नयेत. संघर्ष समितीच्या मागणीस पाठिंबा देत या प्रभागरचनेविरोधात २७ गावतील जनतेने हजारोंच्या संखेने आपल्या हरकती नोंदवलेल्या आहेत. तरी २७ गावातील जनतेचे प्रतिनिधी म्हणून समितीचे म्हणणे गांभीर्याने घ्यावे व संबंधित सुनावणी मधे आम्हास ऐकून घ्यावे अशी मागणी सर्व पक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समितीने केडीएमसी आयुक्तांकडे केली आहे. बाईट.. सत्यवान म्हात्रे संघर्ष माहिती अध्यक्ष
6
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Sept 04, 2025 11:18:28
Beed, Maharashtra:
बीड : माजी जिल्हा परिषद सदस्य नारायण शिंदे याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल Anc- माजी जिल्हा परिषद सदस्य नारायण शिंदे याच्यावर महिला शिक्षिकेवर बलात्कार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिलेच्या तक्रारीनुसार, शिंदे याने लग्नाचे आमिष दाखवून वारंवार बलात्कार केला. याचबरोबर तब्बल एक कोटी दहा लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचाही आरोप करण्यात आला आहे. याबाबतची तक्रार शिवाजीनगर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली असून, पोलिसांनी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे. आरोपी नारायण शिंदे हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाशी संबंधित नेते आहेत. या प्रकरणामुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली असून, घटनेचा तपास बीड शिवाजीनगर पोलिस करत आहेत.
9
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Sept 04, 2025 11:18:20
Pune, Maharashtra:
रिपोर्टर:- लैलेश बारगजे स्लग:- भटक्या कुत्र्यांची समस्या फीड 2C Anc:- अहिल्या नगर शहरामध्ये सर्वत्र मोकाट कुत्र्यांची समस्या वाढली आहे या मोकाट कुत्र्यांनी अनेक ठिकाणी लहान मुले आणि वृद्धांवर हल्ले करण्याचे प्रमाण देखील मागच्या काही दिवसांपासून वाढले आहेत महानगरपालिकेकडून मोकाट कुत्र्यांच्या निर्बीजीकरण करण्याची गती अतिशय कमी असल्यामुळे मोकाट कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे कुत्र्यांच्या निर्बीजीकरण करण्यासंबंधी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांच्या बाबतीत चर्चा करण्यासाठी महानगरपालिकेकडून स्वान प्रेमी, प्रभागातील लोकप्रतिनिधी आणि सामाजिक कार्यकर्ते यांची बैठक आयोजित करण्यात आली होती स्वानांचे निर्बीजीकरण करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली त्यानंतर शहरातील मोकाट कुत्र्यांच्या निर्बीजीकरण्याचा कार्यक्रम अधिक गतीने केला जाणार असल्याचं आयुक्त यशवंत डांगे यांनी म्हटला आहे तर सर्वोच्च न्यायालयाने मोकाट कुत्र्यांना हाताळण्या बाबतीत अनेक आदेश दिले आहेत मात्र मोकाट कुत्र्यांकडून नागरिकांवर होणाऱ्या हल्ल्याबाबत कुठलाही विचार केला गेला नाही त्यामुळे मोकाट कुत्र्यांना हाताळण्याबरोबरच मोकाट कुत्र्यांनी चावा घेतलेल्या नागरिकांनाही आर्थिक मदत मिळायला हवी अशी अपेक्षा माजी नगरसेवक निखिल वारे यांनी केली आहे बाईट:- यशवंत डांगे, आयुक्त महानगरपालिका बाईट:- निखिल वारे, माजी नगरसेवक बाईट:- अजिनाथ बरडे, नागरिक
4
comment0
Report
SNSWATI NAIK
Sept 04, 2025 11:11:02
Navi Mumbai, Maharashtra:
story slug - देशातील सर्वात मोठ्या कंटेनर टर्मिनल चे उदघाटन जेएनपीएल पर देश का सबसे बडा कंटेनर टर्मिनल FTP slug - nm jnpa new port byet- cm shots- reporter- swati naik navi mumbai anchor - केंद्र सरकारच्या बंदर, नौवहन आणि जलमार्ग मंत्रालयाच्या वतीने जवाहरलाल नेहरु पोर्ट पतन्यास अर्थात जेएनपीए पोर्ट पीएसए मुंबई टर्मिनलच्या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी याच्या हस्ते दूरद्रूश्य प्रणालीच्या मद्यमातून करण्यात आले यावेळी सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेन्स वोंग हे दूरद्रूश्य प्रणालीच्या माध्यामातून उपस्थित होते. केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री शांतनु ठाकूर, उपस्थित होते यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आजचा क्षण हा महाराष्ट्र्र आणि भारतासाठी साठी ऐतिहासिक असून , या बंदरा मुळे महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्था ला मोठा बुस्ट मिळाला असून ग्लोबल सप्लाय चेन मद्ये भारताची हिस्सेदारी वाढली आहे । बाईट- देवेंद्र फडणवीस - मुख्यमंत्री vo2 - यावेळी त्यांनी gst बद्दल आलेल्या निर्णयाचे स्वागत केले। तसेच मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण यावर भाष्य केले। देवेंद्र फडणवीस बाईट पॉईंटर माननीय उच्च न्यायल्याचा निर्देशनुसार दाखल झाले आहे. जो काही निर्णय आहे तो उच्च न्यायल्याच्या निदर्शनास आणून घ्यावा लागेल. On आभार काही लोकं जाणीवपूर्क गैरसमज निर्णमान करतात आंम्ही जे राजकारण शिकलो. त्यामध्ये पथका अंतिम लक्ष नही है सिंहासन चढते जाना सब समाज को लिए साथ मे आगे है बढते जाना है आमचं ब्रीद वाक्य आहे. सगळ्यांना सोबत घेऊन आम्हाला पुढे जायचं आहे. मराठा समाज एक महत्वाचा समाज आहे. महाराष्ट्र जडणं घडनीतील एक मोठं योगदान दिलं आहे या समाजाचं कल्याण झालाच पाहिजे On वन नेशन वन टॅक्स प्रमाणे मोदींनी gst लागू केलाय छगन भुजबळ कुठे ही केबिनेट मधून कुठेही निघून गेलेले नाही त्यांच्यासोबत माझी चर्चा झाली आहे मी त्यांना आश्वस्त केलं आहे हा जो gr आपण काढलेला आहे त्यावर obc समाजावर कुठलाही परिणाम नाही हा पुरावयाचा gr आहे मराठवाड्यामध्ये इंग्रजंचं राज्य नव्हतं निझामच राज्य होतं. इंग्रजाच पुरावे इतर ठिकाणी मिळतात पण मराठवाड्यात नाही. मराठवाड्यातले पुरावे निझामाकडे म्हणजे हैद्राबाद मधरे मिळतात तिथले पुरावे आपण ग्राह्य धरले आहे जे खरे हक्कदार आहेत.. कोणालाही खोटं पणा करता येणार नाही. अनेक obc संघटनानी स्वागत केलं आहे. आमच्या मनात शंका नाही असं सांगितलं आहे. भुजबळ यांच्या मनातील शंका दूर करू इतरांच्याही मनातील शंका दूर करू Obc ना सुद्धा माहित आहे जो पर्यंत हे राज्य आहे तो पर्यत obc वर अन्याय होणार नाही. एका समाजाचं काढून दुसऱ्या समाजाला देणार असं होणार नाही. मराठ्यांच मराठ्यांना देणार obc च obc ना देणार कोणाचं काढून कोणाला देणार नाही दोन समाजाला एकमेकांसमोर कधी आणणार नाही. बाईट- देवेंद्र फडणवीस - मुख्यमंत्री
5
comment0
Report
AAASHISH AMBADE
Sept 04, 2025 11:00:23
Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--- 0409ZT_CHP_THREAD_GANESH ( single file sent on 2C)  टायटल:-- चंद्रपूरच्या तुकूम भागात तुकूमचा राजा छत्रपती गणेश मंडळाने साकारला 11 हजार सुताच्या रिळानी बनविलेला बाप्पा, अनोख्या रंगसंगतीने लक्षवेधी ठरलेल्या बाप्पाच्या दर्शनासाठी भक्तांची रीघ, दरवर्षी विविध रूपातील बाप्पा साकारून केली जाते गणेश सेवा     अँकर:-- चंद्रपूरच्या तुकूम भागात तुकूमचा राजा छत्रपती गणेश मंडळाने साकारलेला 11 हजार सुताच्या रिळानी बनविलेला बाप्पा आकर्षणाचे केंद्र ठरला आहे.  दरवर्षी या गणेश मंडळाच्या वतीने उत्तमोत्तम मूर्ती आणि सजावट करून गणेशोत्सव साजरा केला जातो. यंदा कापड शिवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सुताच्या रिळांच्या अनोख्या रंगसंगतीने हा बाप्पा लक्षवेधी ठरला असून बाप्पाच्या दर्शनासाठी भक्तांची रीघ लागली आहे. सुमारे महिनाभरापासून गणेश मंडळ कार्यकर्ते बाप्पाची थीम आणि रचना ठरविण्याच्या कामी लागतात. दरवर्षी विविध रूपातील बाप्पा साकारून कार्यकर्त्यांच्या हातून गणेश सेवा घडते. बाप्पाचा आशिर्वाद आणि कार्यकर्त्यांचे श्रम यामुळे हे शक्य होत असल्याची भावना मंडळ पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. बाईट १) नगाजी गनफाडे, पदाधिकारी, तुकूमचा राजा छत्रपती गणेश मंडळ आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर 
10
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Sept 04, 2025 10:48:33
Akola, Maharashtra:
Anchor : मराठा आरक्षणाच्या मागण्यांमधील आठ पैकी सहा मागण्या महाराष्ट्र सरकारने मान्य केल्यानंतर आता ओबीसी समाजाने याला जोरदार विरोध दर्शविला आहे. राज्य सरकारचा निर्णय हा ओबीसी समाजावर अन्यायकारक असल्याचा आरोप करण्यात आला असून सरकारने काढलेला जीआर तात्काळ रद्द करावा, अशी मागणी ओबीसी समाजाने केली आहे.या मागण्यांसाठी आज अकोला जिल्हाधिकारी कार्यालयावर ओबीसीच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने ओबीसी बांधव उपस्थित होते. संतप्त ओबीसी बांधवांनी महाराष्ट्र सरकारचा निषेध नोंदवित जीआरच्या प्रतींची होळी केली. मोर्चादरम्यान ओबीसी समाजाने सरकारला इशारा दिला की, त्यांचा हक्क अबाधित राहिला पाहिजे, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र केले जाईल. Byte : नारायण गव्हाणकर , ओबीसी नेते.
8
comment0
Report
GMGANESH MOHALE
Sept 04, 2025 10:48:22
Washim, Maharashtra:
वाशीम: File2:0409ZT_WSM_AKASH_FUNDKAR WSM_AKASH_FUNDKAR_ON_OBC रिपोर्टर:गणेश मोहळे,वाशिम अँकर: वाशीम येथे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी स्पष्ट केले की आठवड्याची कामाची मर्यादा ४८ तासच राहील. त्यापेक्षा जास्त काम ओव्हरटाईम मानले जाईल व त्यासाठी दुप्पट मोबदला दिला जाईल. अतिरिक्त काम घेण्यासाठी कामगारांची लेखी संमती आवश्यक असून सरकारची परवानगी घेतल्यानंतरच ते लागू होईल.कोणत्याही कामगारावर अन्याय होणार नाही याची हमी त्यांनी दिली.हैद्राबाद गॅझेटच्या पार्श्वभूमीवर ओबीसी समाजातील नाराजीबाबत बोलताना फुंडकर म्हणाले की, ओबीसी समाजावर अन्याय होणार नाही.यासाठी सरकारने ओबीसी उपसमिती स्थापन केली असून सर्व बाबींचा सखोल तपास करूनच पुढील निर्णय घेतला जाईल.कोणालाही विशेष सुविधा न देता समाजातील सर्व घटकांचा विश्वास जपत न्याय्य तोडगा काढण्यात येईल,असेही त्यांनी स्पष्ट केले. बाईट: आकाश फुंडकर, कामगार मंत्री
9
comment0
Report
DPdnyaneshwar patange
Sept 04, 2025 10:48:10
Dharashiv (Osmanabad), Maharashtra:
धाराशिव – DHARA_OBC_GR धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मराठा आरक्षणा जीआरची होळी . ओबीसी संघटनांनी केली जीआरची होळी Anchor धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ओबीसी समाजाच्या वतीने मराठा समाजाला देण्यात आलेल्या आरक्षणाच्या जीआरची होळी करण्यात आली. या वेळी जोरदार घोषणाबाजी करत जीआर तात्काळ रद्द करण्याची मागणी आंदोलकांनी केली. ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावे, अशी ठाम भूमिका यावेळी मांडण्यात आली. शिंदे समिती स्थापन झाल्यापासून जे कुणबी प्रमाणपत्र देण्यात आले ते तात्काळ रद्द करण्याची मागणीही आंदोलकांनी केली. जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यास जात असताना पोलिसांनी गेटवर अडवल्याने आंदोलक संतापले व घोषणाबाजी करण्यात आली. Byte: डॉ. स्नेहा सोनकाटे
10
comment0
Report
Advertisement
Back to top