Back
अकोला जिल्ह्यातील मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत!
JJJAYESH JAGAD
FollowJul 22, 2025 07:32:10
Akola, Maharashtra
10 फाईल्स आहेत...AVBB
Anchor : अकोला जिल्ह्यात अनेक दिवसांपासून पावसाने पाठ फिरवली आहे, मात्र अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातिल पारस परिसरात आज मुसळधार पावसाने हजेरी लावली आहेय.. दरम्यान या पावसामुळे परिसरातील जनजीवन विस्कळीत झालं आहेय.. सध्या या ठिकाणी नाल्याचा काम सुरू असून नाली बंद करण्यात आल्यामुळे पावसाचा पाणी नाल्यातून वाहून न जाता नागरिकांच्या घरात शिरलं असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहेय.. प्रत्यक्षदर्शियांनी हे ढगफुटी सदृश्य पाऊस असल्याचं म्हंटलंय आहेय.. या पावसाच्या पाण्यामुळे अनेक दुचाकी गाड्यांचा नुकसान झालं असून घराचं देखील मोठ्या नुकसान झाला आहेय..
Byte : ग्रामस्थ..
14
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
NMNITESH MAHAJAN
FollowJul 22, 2025 13:08:28Jalna, Maharashtra:
FEED NAME | 2207ZT_JALNA_RIVER (12 FILES)
जालना : ब्रेकिंग | मंठा शहराचा लिंबेवडगावशी असलेला संपर्क तुटला
पाटोदा साठवण प्रकल्पाच्या बँकवॉटरमुळे ग्रामस्थांना प्रवास करता येईना
आबाल वृद्धांचा बँक वॉटरच्या पाण्यातून पोहत जाऊन जीवघेणा प्रवास
पोहत असताना झाडाची फांदी पकडल्यानं वृद्ध वाहून जाताना थोडक्यात बचावला,
अँकर : जालन्यातील मंठा, परतूर तालुक्यात अतिवृष्टी सदृश्य पाऊस झालाय. या पावसामुळे मंठा तालुक्यातील पाटोदा साठवण तलावातील पाणी साठ्यात वाढ होऊन लिंबेवडगाव ते मंठा शहराचा संपर्क तुटला आहे.लिंबेवडगाव येथील दलित वस्तीतील नागरीकांना मंठा शहरात जाता येत नाहीय.त्यामुळे पाटोदा साठवण तलावाच्या बँक वॉटर मधून पोहत जाऊन महिला आणि आबाल वृद्धांना रस्ता पार करावा लागतोय.जिल्हा प्रशासनाने तातडीनं लिंबेवडगाव येथील ग्रामस्थांच्या रस्त्याचा प्रश्न सोडवावा अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा ईशारा वंचित बहुजन आघाडीसह ग्रामस्थांनी दिलाय.
बाईट : दीपक डोके,स्थानिक नेते,वंचित बहुजन आघाडी
7
Report
AAASHISH AMBADE
FollowJul 22, 2025 13:02:42Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--- 2207ZT_CHP_RAIN_SPELL
( single file sent on 2C)
टायटल:-- चंद्रपुरात दडी मारलेला पाऊस परतला, शहर- जिल्ह्यात मुसळधार पावसाच्या सरी ,बेपत्ता झालेल्या पावसाने चिंताग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा, धरणे- सिंचन प्रकल्प अद्याप निम्मेही भरले नसताना पावसाने दिला होता सुमारे दहा दिवसांचा खंड
अँकर:-- चंद्रपुरात दडी मारलेला पाऊस परतलाय. आज दुपारपासून शहर -जिल्ह्यात मुसळधार पावसाच्या सरी बरसल्या. बेपत्ता झालेल्या पावसाने चिंताग्रस्त शेतकऱ्यांना या जलधारांनी दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यातील धरणे आणि सिंचन प्रकल्प निम्मेही भरले नसताना पावसाने सुमारे दहा दिवसांचा खंड दिला होता. धान आणि सोयाबीन पेरणी करून शेतकरी उत्तम पावसाची वाट बघत असताना प्रत्यक्ष ऊन पडत होते. त्यामुळे पिके कोमेजून चालली होती. आजच्या पावसाने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
आशीष अम्बाडे
झी मीडिया
चंद्रपूर
4
Report
UPUmesh Parab
FollowJul 22, 2025 13:02:19Oros, Maharashtra:
अँकर --- महाराष्ट्र राज्यातील पहिले असलेल्या नापणे धबधब्या वरील काचेच्या पुलाचा मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा संपन्न झाला. वैभववाडी येथील नापणे धबधब्यावर सिंधुरत्न योजनेतून हा पूल बांधण्यात आला असून या पुलामुळे आंतरराष्ट्रीय दर्जाचे एक पर्यटन स्थळ निर्माण झाले असल्याचा विश्वास मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केलाय. या पुलाचे नयनरम्य दृश्य ड्रोनच्या माध्यमातून चित्रित केलंय विराज ढवण यांनी
byte --- नितेश राणे, पालकमंत्री सिंधुदुर्ग
ड्रोन सौजण्य --- विराज ढवण
4
Report
SMSATISH MOHITE
FollowJul 22, 2025 13:00:52Nanded, Maharashtra:
Satish Mohite
Slug - Ned_Cemetery
Feed on - 2C
-----------------------
Anchor - अंत्यसंस्कारासाठी गावात जागा नसल्याने दुसऱ्या गावात मृतदेह नेणाऱ्या ग्रामस्थाना तिथल्या गावक-र्यांनी जोरदार विरोध केला. दोन्ही गावातील शेकडो ग्रामस्थ आमनेसामने आल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.
नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद तालुक्यातील मनुर आणि संगम या दोन गावात हा वाद झाला. मनुर गावात स्मशानभूमीसाठी जागा नसल्याने जवळच असलेल्या संगम या गावात स्मशानभूमीसाठी महसूल विभागाने जागा निश्चित केली. परंतु ही जागा स्मशानाभूमीसाठी देण्यास संगम गावाचा विरोध आहे. आज मनुर येथील एका व्यक्तीचे निधन झाले. अंत्यविधी करण्यासाठी मनुरचे गावकरी संगमच्या गायरान जमीन इकडे जात असताना संगम गावच्या गावकऱ्यांनी तीव्र विरोध केला. यावेळी दोन्ही गावचे गावकरी आपापसात भिडले. मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी मागवण्यात आला. पोलीस बंदोबस्तात संगमच्या गायरान जमिनीवर अंत्यविधी पार पडला. सध्या परिस्थिती नियंत्रणात असली तरी तणावपूर्ण परिस्थिती आहे.
Byte - मनूर येथिल ग्रामस्थ
Byte - मनूर येथिल ग्रामस्थ
--------------
6
Report
AAASHISH AMBADE
FollowJul 22, 2025 13:00:37Gadchiroli, Maharashtra:
Feed slug :--- 1) 2207ZT_GAD_JOB_ORDER
2) Gad CM naxal rojgar
टायटल:-- गडचिरोलीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नक्षल पीडितांना थेट नोकरी नियुक्ती पत्रे
अँकर:-- गडचिरोलीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नक्षल पीडिताना थेट नोकरी देण्यात आली. मुख्यमंत्र्यांच्या आजच्या गडचिरोली दौऱ्यात त्यांनी एका कार्यक्रमात ही नियुक्तीपत्रे दिली. गेल्या काही वर्षात नक्षलवाद्यांनी मारलेल्या कुटुंबातील सदस्यांना थेट पोलीस शिपाई नोकरी देण्यात आली आहे . एकूण 23 जणांना थेट नियुक्तीपत्रे दिली जाणार आहेत. प्रत्यक्ष मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दोघांना अशी नियुक्तीपत्रे दिली गेली.
बाईट १) देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
( bite sent via ngp liv u naming
Gad CM naxal rojgar)
आशीष अम्बाडे
झी मीडिया
गडचिरोली
8
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowJul 22, 2025 13:00:27Hingoli, Maharashtra:
अँकर- परभणीच्या पाथरी विधानसभा मतदारसंघातील अनेक महसूल मंडळात धगफूटीसदृश्य पाऊस झालाय, काही ठिकाणी घरात ही पाणी शिरले आहे,तर अनेक शेतात पावसाचे पाणी साचुन पीक पाण्याखाली गेली आहेत.
या गावांना राष्ट्रवादीचे आमदार राजेश विटेकर यांनी सोनपेठ व पाथरी तालुक्यातील अनेक गावांना भेट देऊन अतिवृष्टी ग्रस्त शेतीची पाहणी केली. सोनपेठ आणि पाथरी तालुक्यातील 5 महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झाले आहे. पाहणी नंतर जिल्हाधिकारी गावडे यांना फोन करून तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचना केल्या. पाथरी तालुक्यातील हदगावच्या इंदिरानगरात घरात पाणी शिरून नागरिकांच्या संसार उपोयोगी साहित्याचे मोठे नुकसान झालंय.
6
Report
MNMAYUR NIKAM
FollowJul 22, 2025 12:36:31Buldhana, Maharashtra:
ब्रेकिंग न्यूज
देऊळगाव कुंडपाळ धरणाला तडा; मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता!
लोणार तालुक्यातील देऊळगाव कुंडपाळ येथील धरणाला तडा गेल्याने पाणी मोठ्या प्रमाणात वाहत आहे.
रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे ही स्थिती उद्भवली आहे.
मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता असून, धरणातील पाणी गावात शिरून मोठी हानी होऊ शकते.
गावकऱ्यांनी प्रशासनाला तत्काळ लक्ष देऊन धरणाची दुरुस्ती करण्याची विनंती केली आहे.
प्रशासनाने या गंभीर परिस्थितीची दखल घेऊन तात्काळ उपाययोजना करणे अत्यंत आवश्यक आहे.
12
Report
NMNITESH MAHAJAN
FollowJul 22, 2025 12:36:02Jalna, Maharashtra:
FEED NAME : 2207ZT_JALNA_DEATH(3 FILES)
जालना : खाली पडलेल्या विद्युत तारेला स्पर्श झाल्याने शेतकऱ्याचा मृत्यू
अँकर : शेतात फवारणीसाठी गेलेल्या शेतकऱ्याला खाली पडलेल्या विजेच्या तारेचा स्पर्श झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना जालन्यातील परतूर तालुक्यातील मसला शिवारात घडली.40 वर्षीय संदीप भालेकर असं मृत्यूमुखी पडलेल्या शेतकऱ्याचं नाव आहे.संदीप भालेकर हे सोयाबीन पिकावर धुर फवारणी करत असतांना त्यांचा खाली पडलेल्या विद्युत तारेला स्पर्श झाला.त्यामुळे जागेवरच त्यांचा मृत्यू झाला.दरम्यान या घटनेला महावितरणच जबाबदार असून महावितरणनं मयताच्या कुटुंबातील एकाला नोकरी देण्याची मागणी नातेवाईकांनी केलीय.
बाईट : मयताचे नातेवाईक
4
Report
SMSATISH MOHITE
FollowJul 22, 2025 12:30:59Nanded, Maharashtra:
Satish Mohite
Slug - Ned_Cemetery
Feed on - 2C
-----------------------
Anchor - अंत्यसंस्कारासाठी गावात जागा नसल्याने दुसऱ्या गावात मृतदेह नेणाऱ्या ग्रामस्थाना तिथल्या गावक-र्यांनी जोरदार विरोध केला. दोन्ही गावातील शेकडो ग्रामस्थ आमनेसामने आल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.
नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद तालुक्यातील मनुर आणि संगम या दोन गावात हा वाद झाला. मनुर गावात स्मशानभूमीसाठी जागा नसल्याने जवळच असलेल्या संगम या गावात स्मशानभूमीसाठी महसूल विभागाने जागा निश्चित केली. परंतु ही जागा स्मशानाभूमीसाठी देण्यास संगम गावाचा विरोध आहे. आज मनुर येथील एका व्यक्तीचे निधन झाले. अंत्यविधी करण्यासाठी मनुरचे गावकरी संगमच्या गायरान जमीन इकडे जात असताना संगम गावच्या गावकऱ्यांनी तीव्र विरोध केला. यावेळी दोन्ही गावचे गावकरी आपापसात भिडले. मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी मागवण्यात आला. पोलीस बंदोबस्तात संगमच्या गायरान जमिनीवर अंत्यविधी पार पडला. सध्या परिस्थिती नियंत्रणात असली तरी तणावपूर्ण परिस्थिती आहे.
--------------
8
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowJul 22, 2025 12:03:16kolhapur, Maharashtra:
नागपूर
बाइट - बच्चू कडू, शेतकरी नेते
On माणिकराव कोकाटे
- माणिकराव कोकाटे यांना कोणी निवडून दिले, आणि कोणी मंत्री केले हा प्रश्न आहे..
- कृषी खात्याला पैसे मागून थकले, गृह खात जलसंपदा खात आहे त्यापेक्षा मोठा आहे कृषी खात फक्त 9000 कोटीचा आहे कोकाटे यांचा विधान हे फार मोठा आहे.... एक प्रकारे मुख्यमंत्री यांना कोकाटे यांनी शिवी दिली आहे. माणिकराव कोकाटे पहिल्यांदा खरं बोलले त्यामुळे त्यांचे आभार मानले पाहिजे... यारमीची जाहिरात सचिन तेंडुलकर करतो, सचिन तेंडुलकर यांच्या जाहिरातीतूनच माणिकराव कोकाटे यांना धाडस मिळाला असेल...
- सरकार जवळ पैसा कमी आहे म्हणून ते रेल्वे खेळत होते... मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात पैसे नाही पण शक्तिपीठ महामार्ग मेट्रो सुरू करायला कोणी सांगितलं होतं... मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दुष्काळाची वाट पाहून कर्जमाफी करण्याचा विधान करत असतील तर, वाईट गोष्ट आहे...
- शेती मालाला भाव नव्हता म्हणून आम्ही कर्जमाफी मागत आहे... माणिकराव कोठारी कोकाटे यांची फजिती झाले भिक मागितल्याशिवाय पर्याय नसल्यामुळे ते भीक मागत आहे.
- महाराष्ट्राची अवस्था पाहिली तर प्रत्येक जिल्ह्यात सरकारला हत्तीशी घेऊन जे आकाजिल्ह्या चालवत आहे, या सगळ्यांमध्ये कृषी मंत्राला हे वेतन आवरू शकत नसेल तर सामान्य माणसाची काय अवस्था असेल...
- या रमी खेळामुळे किती लोक देशोधडीला लागले... इतक्या मोठ्या आज प्रमाणात आत्महत्या होऊन तो खेळ का बंद होत नाही... क्रिकेटर सिने स्टार हे जाहिराती करतात त्यांना लाज का वाटत नाही... हे जाहिरात करणारे भिकारचोटा पेक्षाही भिकार चोट आहे... निधीच नाही असे माणिकराव कोकाटे बोलले आहे... अर्थमंत्री पक्षाचे नेते अजित पवार आहे... भिकाऱ्याचा अवस्थेत कोण आहे....शासनातील मंत्रीच भिकारी म्हणत असले तर आता स्पष्ट झालं आहे..
- *माणिकराव कोकाटे यांनी सरकारला भिकारी म्हटल आहे.. त्यामुळे ही वास्तविकता असावी, या भीकारीच्या रांगेत कोण आहेत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सर्व सरकार या रांगेत आहे. माणिकराव कोकाटे यांनी कृषी विभागाची वास्तविकता मांडली आहे. तर रम्मी खेळामुळे किती लोकांचे बळी गेलं आहे...*
- *माणिकराव कोकाटे बेताल वक्तव्य करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांना सरकार कसं काय पचवून घेत माहिती नाही... आणि त्यांनी सरकारला भिकारी म्हटलं आहे. त्यामुळे तुमच्या आमच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे. सरकार भिकारी म्हणजे राज्य भिकारी आणि माणिकराव यांनी एका शब्दात राज्याची गरिमा काढली...*
7
Report
SRSHRIKANT RAUT
FollowJul 22, 2025 11:44:46Yavatmal, Maharashtra:
PKG
Anchor : पती व एका मुलाचे अकस्मात निधन झाल्यानंतर सासरच्यांनी विधवा सुनेचा १ लाख २० हजारात सौदा केला. गुजरात मधील एका व्यक्तीने तिला विकत घेऊन दोन वर्ष शोषण केले. व तिच्यापासून मुलगा झाल्यानंतर या महिलेला गावात आणून सोडून दिले. यवतमाळच्या आर्णी पोलिसांकडून बेपत्ता व्यक्तींची शोधl मोहीम सुरु असताना हा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे.
VO 1 : यवतमाळच्या आर्णी पोलिसांपुढे आपबीती सांगत असलेली ही महिला तिच्या बेपत्ता मुला मुलीचा शोध घेण्याची विनंती करीत आहे. या महिलेच्या पती व एका मुलाचे अकस्मात निधन झाले. त्यामुळे एक मुलगा व मुलीचा सांभाळ ती करीत होती. दरम्यान कामधंदा मिळेल असे सांगून तिची नणंद व नदोई ने तिला मध्यप्रदेश मध्ये नेले. तिथे तिला गुजरातच्या पोपट चौसाने या व्यक्तीला एक लाख २० हजार रुपयात विकले. त्याने गुजरात मध्ये नेऊन तिच्याशी विवाह केला. तब्बल दोन वर्षे तिचे शोषण केले, व तिच्यापासून पुत्रप्राप्तीनंतर तिला गावात आणून सोडून दिले. दरम्यान पोलिसांनी पीडित महिलेची सासू, सासूचा दुसरा नवरा, दीर नणंद व नंदोई यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
बाईट : नितीन सुरडकर : पोलीस निरीक्षक
VO 2 : विधवा मुलगी व नातवंड बेपत्ता आहे म्हणून पीडितेच्या आई-वडिलांनी २०२३ साली पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्या अनुषंगाने तिचा शोध सुरू होता, दरम्यान ही लापता महिला पोलिसांना गावातच मिळाली, तिची विचारपूस केली असता सासरच्या मंडळींनी केलेला तिचा घात समोर आला. तिचा एक मुलगा व मुलगी सध्या कुठे आहे, हे तिला माहित नाही. पोटच्या दोन्ही मुलांना बघण्यासाठी तिचा जीव कासावीस आहे.
बाईट : पीडित महिला
VO 3 : या निराधार महिलेच्या अवस्थेचा गैरफायदा घेऊन सासरच्या मंडळींनी पैशांसाठी तिचा सौदा केला. त्यांनी नातवंडांचे काय केले हे तपासात पुढे येईल. ग्रामीण व दुर्गम भागातील अनेक महिला मुलींची अशाच पद्धतीने परप्रांतात विक्री केल्या चे अनेक प्रकार यवतमाळ जिल्ह्यात घडले आहेत. याबाबत ठोस पावलं उचलण्याची गरज व्यक्त होत आहे.
14
Report
YKYOGESH KHARE
FollowJul 22, 2025 11:44:36Nashik, Maharashtra:
nsk_morcha
feed by 2C
vidoe 5
Anchor - मालेगाव येथील खाजगी रुग्णालयात मोहम्मद अथर खुर्शीद अहमद याने नर्सिंगचे शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन हिंदू आदिवासी मुलीवर केलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ आज मालेगावात '' नारीशक्ती ' मोर्चा काढण्यात आला..गांधी पुतळ्यापासून निघालेल्या या मोर्चाची सांगता अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय येथे करण्यात आली..यावेळी मोर्चातील सहभागी महिलांनी शंखनाद करत अत्याचार करणाऱ्याला फाशी द्या, ही केस फास्टट्रॅक कोर्टात चालवावी,महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी उपाययोजना कराव्या अशी मागणी केली तशा आशयाचे निवेदन यावेळी अपर जिल्हाधिकारी यांना देण्यात आले..मोर्चावेळी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता..
बाईट - मंजुषा कजवाडकर,
14
Report
YKYOGESH KHARE
FollowJul 22, 2025 11:43:37Nashik, Maharashtra:
nsk_malegainprotest
feed by 2C
video 5
Anc: मालेगाव तालुक्यातील डाबली परिसरात शेतकऱ्यांना वीज वितरण कंपनीच्या आडमुठेपणामुळे अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. शिवारात दोन फेज वीजपुरवठा चालू करावा. वेळापत्रकानुसारही वीजपुरवठा सुरळीत होत नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी वीज वितरण कंपनीच्या अजंग येथील कार्यालयास घेराव घालून तब्बल दोन तास ठिय्या आंदोलन केले. उपकार्यकारी अभियंता पी.एम पाटील यांना निवेदन देण्यात आले. उपस्थित शेतकऱ्यांनी दोन दिवसांत सुरळीत वीजपुरवठा न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा यावेळी दिला.
12
Report
TTTUSHAR TAPASE
FollowJul 22, 2025 11:43:12Satara, Maharashtra:
TUSHAR TAPASE
3 FILES
SLUG NAME -SAT_MAHA_KHADDE
सातारा: महाबळेश्वर हे राज्यातील एक प्रसिद्ध पर्यटनस्थळ असून देश विदेशातून पर्यटक या भागाला भेट देत असतात. सध्या या भागात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे महाबळेश्वर ते पाचगणी रस्त्यावरील वेण्णा लेक आणि लिंगमळा रस्त्यावर खड्डे पडल्यामुळे वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. महाबळेश्वर शहर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने वेण्णा लेक परिसरात रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात झाडे लावुन निषेध केला आहे. लवकरात लवकर रस्त्याची दुरुस्ती करा अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे
बाईट आंदोलक (ऊबाठा गट)
14
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowJul 22, 2025 11:40:45Bhandara, Maharashtra:
Pravin Tandekar Nagpur
Slug - 2207_NGP_KADU_121
FILE - 1 VIDEO
121 बच्चू कडू
माणिकराव कोकाटे यांनी सरकारला भिकारी म्हटला आहे.. त्यामुळे ही वास्तविकता असावी, या भीकारीच्या रांगेत कोण आहेत. मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्री, सर्व सरकार या रांगेत आहे. माणिकराव कोकाटे यांनी कृषी विभागाची वास्तविकता मांडली आहे. तर रम्मी खेळामुळे किती लोकांचं बळी गेलं आहे...
माणिकराव कोकाटे बेताल वक्तव्य करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांना सरकार कसं काय पचवून घेत माहिती नाही... आणि त्यांनी सरकारला भिकारी म्हटलं आहे. त्यामुळे तुमच्या आमच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे. सरकार भिकारी म्हणजे राज्य भिकारी आणि माणिकराव यांनी एका शब्दात राज्याची गरिमा काढली...
11
Report