Back
महिला होमगार्ड खून प्रकरण: आरोपी मैत्रीणला पुन्हा तीन दिवसांची कोठडी!
MMMahendrakumar Mudholkar
Aug 26, 2025 03:02:01
Beed, Maharashtra
बीड: महिला होमगार्ड खून प्रकरण, आरोपी मैत्रीण महिलेला पुन्हा तीन दिवसांची पोलिस कोठडी
Anc- प्रेम प्रकरणातून होमगार्ड महिलेचा गळा दाबून खून करण्यात आला होता. याप्रकरणी मैत्रीण वृंदावनी फरतळे या आरोपीस पोलिसांना अटक केली आहे. पहिल्या वेळी चार दिवसाची पोलिस कोठडी मिळाली होती. मात्र तपासात आणखीन बरीच माहिती निष्पन्न व्हायची आहे, यासाठी न्यायालयाने पुन्हा एकदा तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
14
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
MMMahendrakumar Mudholkar
FollowAug 26, 2025 06:03:53Beed, Maharashtra:
बीड: गेवराईतील हाके पंडित राड्यानंतर जिल्हा प्रशासन अलर्ट; जिल्ह्यात जमावबंदी आदेश जारी, पुढील 15 दिवस विविध आंदोलने निदर्शनावर बंदी
Anc:मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनापूर्वीच काल बीडच्या गेवराई मध्ये ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके आणि आमदार विजयसिंह पंडित समर्थकांत राडा झाला होता. याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यात अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. निवासी जिल्हाधिकाऱ्यांनी आज मध्यरात्रीपासूनच बीड जिल्ह्यात पुढील पंधरा दिवस जमावबंदीचे आदेश जारी केले आहेत. पुढील पंधरा दिवस कुठलेही आंदोलन निदर्शने होणार नाहीत. एवढेच नाही तर पाच पेक्षा अधिक जमाव एकत्रित येण्यास देखील मज्जाव घालण्यात आला आहे. या दरम्यान प्रतिबंधात्मक कारवाई झुगारण्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देखील पोलीस प्रशासनाने दिला आहे.
1
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowAug 26, 2025 06:03:45Pune, Maharashtra:
Reporter name : Chaitralli Raajapurkar
Location ; Maval
File.name : 2608ZT_MAVAL_EWAY_TRAFFIC
Total files : 01
Headline -पुणे-मुंबई एक्सप्रेस हायवेवर काही काळ वाहनांच्या रांगा
Anchor:
पुणे-मुंबई एक्सप्रेस हायवेवर काही वेळ वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या होत्या. अमृतांजन पुलाजवळ एक अवजड वाहन बंद पडले होते. त्यामुळे मुंबईकडे जाणाऱ्या दोन लेन बंद ठेवण्याची वेळ आली होती. एकाच लेन वरुन वाहतूक सुरु होती, परिणामी वाहतूक मंदावली अन लांबचलांब रांगा लागल्या होत्या. अर्धा तासात अवजड वाहन बाजूला घेण्यात आलं, त्यानंतर वाहतूक पूर्ववत झाली..
4
Report
AKAMAR KANE
FollowAug 26, 2025 06:03:37kolhapur, Maharashtra:
2c ला बाईट जोडला आहे
-------
नागपुर
बाईट - पंकज भोयर, राज्यमंत्री.( भंडारा नवे पालकमंत्री... वर्धेला अगोदरच आहे )
- मला भंडारा जिल्ह्याची पालकमंत्रीपदाची अतिरिक्त जवाबदारी दिल्या बद्दल, मुख्यमंत्री यांचे आभार मानतो.
- वर्धा जिल्ह्यात केलेल्या कामामुळे मला भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्रीपद दिले असावे. सर्वाना सोबत घेऊन जिल्ह्याचे महत्वपूर्ण प्रश्न अभ्यास करून निकालाची काढण्याचा प्रयत्न असेल.
- तुझ्या सरकार नेहमीच धान उत्पादक शेतकऱ्यांच्या बाजूने उभा राहिलेला आहे... येणारा काळातही प्रलंबित समस्या असतील तर प्रशासनासोबत आढावा बैठक घेऊन त्या सोडवण्यात येईल..
- *गणेशोत्सवा सोबत नागरिक सर्वसामान्य नागरिकांच्या भावना आहे... सण उत्सवात अश्या पद्धतीचा मोर्चा काढणे नक्कीच चुकीच आहे. पोलीस प्रशासन परिस्थिती हाताळले जाईल...*
- दोन समाजात तेढ निर्माण होणे ही बाब चांगली बाब नाही त्यामुळे शांततेच्या मार्गाने तोडगा निघेल.
- स्वतःच्या प्रसिद्धी मिळण्यासाठी अशा पद्धतीने खालच्या स्तरावर जाऊन टीका करणे हे योग्य नाही... भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता चुकीचे शब्द सहन करणार नाही. अशा पद्धतीने पुन्हा त्यांनी वक्तव्य केले भारतीय जनता पार्टी नक्कीच त्याचे उत्तर देईल...
-
4
Report
NMNITESH MAHAJAN
FollowAug 26, 2025 06:03:18Jalna, Maharashtra:
FEED NAME : 2608ZT_JALNA_HAKE(3 FILES)
*जालना, ओबीसी नेते लक्ष्मण हाके बाईट पॉइंटर*
पोलिसांनी आम्हाला लवकरात लवकर अटक करून जेलमध्ये टाकावं...
गेवराईत लक्ष्मण हाके यांच्यासह 14 जणांवर दाखल झालेल्या गुन्ह्यांवर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची प्रतिक्रिया....
पोलीस प्रशासनाने आम्हाला जेलमध्ये टाकावं पण आम्ही ओबीसी आरक्षण बचावाची लढाई थांबवणार नाही...
विजयसिंह पंडित यांच्या माणसांवर गुन्हे दाखल झाले आहेत, ते माणसं कोण आहेत हे बघा, त्यांची हिस्ट्री बोलते; विजयसिंह पंडित वाळू चोर आहे या वक्तव्यावर हाके यांची प्रतिक्रिया...
ओबीसींची भूमिका इथल्या कायद्यांच्या विरोधात कधीही नव्हती आणि नसणार: हाके
ओबीसीचं आरक्षण जात असताना आम्ही कायदा व सुव्यवस्था पाळणारी माणस आहोत...
न्याय, हक्क आणि लोकशाही मार्गाने महाराष्ट्र सरकारला जी भाषा समजते त्या भाषेत आम्ही आमचं ओबीसींचं आंदोलन उभा करू: हाके
आम्ही मनोज जरांगे यांच्या मुंबई दौऱ्याला रिक्शन देऊ: हाके
Byte लक्ष्मण हाके, ओबीसी नेते
1
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowAug 26, 2025 06:00:49Latur, Maharashtra:
लातूर ब्रेकिंग न्यूज...
स्किप्ट ::- 70 वर्षिय वृद्धेला भरधाव कारने 15 किलोमीटर फरफटत नेले.... वृद्ध महिलेचा मृत्यू , जळकोट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल....
AC ::- नांदेड बिदर हायवेवर जळकोट तालुक्यातील पाटोदा गावाजवळील वळणावर उलटी आली म्हणून गाडीतुन उतरलेल्या चिमाबाई तानाजी बाचीपळे या महिलेला नांदेडहून उदगीरकडे जाणाऱ्या इंडीका कारने फरफटत नेले. मुलगा शोधत राहीला मात्र आई सापडली नाही. जळकोट उदगीर रोडवर रक्ताचे डाग दिसल्याने पुढे जाऊन पाहिले असता निर्वस्त्र अवस्थेत आईचा मृतदेह मिळाला. मुलगा विठ्ठल तानाजी बाचीपळे यांच्या तक्रारीवरून इंडीका कार चालकाविरोधात जळकोट पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
0
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowAug 26, 2025 05:48:11Latur, Maharashtra:
लातूर ब्रेकिंग न्यूज....
स्किप्ट ::- अहमदपूर तालुक्यातील खंडाळी गावात एकाच कुटुंबातील पाच जणांना अन्नातून विषबाधा....
AC ::- अहमदपूर तालुक्यातील खंडाळी गावात एकाच कुटुंबातील पाच जणांना अन्नातून विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. स्वयंपाक करताना नजरचुकीने भाजीत पाल पडल्याने हा प्रकार घडल्याचं समजतं. रात्रीच्या जेवणादरम्यान सर्वांनी भाजी खाल्ल्यानंतर एका ताटात पाल दिसून आली. त्यानंतर सर्वांची प्रकृती अचानक बिघडली. तातडीने त्यांना ग्रामीण रुग्णालय अहमदपूर येथे दाखल करण्यात आलं असून उपचार सुरू आहेत. बाधितांमध्ये तीन महिला, एक पुरुष आणि अंदाजे तेरा वर्षीय मुलीचा समावेश आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार आता सर्वांवर उपचार सुरू आहेत. आणि डॉक्टरांच्या निगराणीखाली त्यांना ठेवण्यात आलं आहे.
बाईट ::- डॉक्टर जयप्रकाश केंद्रे
6
Report
AAASHISH AMBADE
FollowAug 26, 2025 05:46:39Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--- 2608ZT_CHP_CHHOTA_MATKA
( single file sent on 2C)
टायटल:-- चंद्रपूरच्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील सीएम अर्थात छोटा मटका वाघाचा जगण्यासाठी संघर्ष, गंभीर जखमी अवस्थेत देखील करतोय पाळीव जनावरांची शिकार
अँकर :- चंद्रपूरच्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील प्रसिद्ध आणि पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्र असलेला सीएम अर्थात छोटा मटका नावाचा वाघ गंभीर जखमी अवस्थेत आढळून आलाय. महिनाभरापूर्वी ब्रह्मा नावाच्या वाघाशी झालेल्या झुंजीनंतर तो जखमी झाला. ब्रम्हा वाघाला त्याने ठार केले असले, तरी मटकासुद्धा त्यात गंभीर जखमी झालाय. त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याने त्याला नीट चालताही येत नसल्याचे दिसून आले. अशा परिस्थितीत तो शिकार कशी करणार, असा प्रश्न निर्माण झाला. परिणामी तो उपासमारीने मरू शकतो, हे वन विभागाच्या लक्षात आल्यानंतर त्याच्यावर पाळत ठेवली जात आहे. अशातच त्याने एका गायीची शिकार केली. हे चित्र आशादायी असले, तरी ही शिकार करताना त्याच्या पायाची जखम आणखीच गंभीर झाली. आता तो जगण्यासाठी अक्षरशः संघर्ष करीत आहे. त्यामुळे त्याला वाचवण्याचे प्रयत्न केले जात आहेत. डॉक्टर आणि विभागाची एक टीम या वाघावर सतत लक्ष ठेवून आहे. तज्ज्ञ आणि डॉक्टरांची टीम जो काही सल्ला देईल, त्यानुसार पुढील कार्यवाही केली जाणार आहे. दुसरीकडे, या वाघाला वाचवण्यासाठी वनविभागाने प्रामाणिक प्रयत्न करावे, अशी वन्यजीवप्रेमींची मागणी आहे.
बाईट १) प्रभूनाथ शुक्ल, क्षेत्र संचालक ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्प
बाईट ३) कवडू लोहकरे, वन्यजीवप्रेमी
आशीष अम्बाडे
झी मीडिया
चंद्रपूर
5
Report
SGSagar Gaikwad
FollowAug 26, 2025 05:30:10Nashik, Maharashtra:
Feed send by TVU 51
Reporter-sagar gaikwad
Slug-nsk__pothole_wt
नाशिक शहरात पावसामुळे पडले मोठे मोठे खड्डे...
अँकर
नाशिक मध्ये होत असलेल्या पावसामुळे शहराभरातील अनेक रस्ते खड्डेमय झाल्याचं पाहायला मिळतंय.... शहरातील अनेक रस्त्यात मोठमोठे खड्डे पडत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत... या खड्ड्यांमुळे नाशिककर हैराण झाले असून या खड्ड्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरी करून करण्यात येते... तर होऊ घातलेल्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अनेक मंडळांनी गणेश उत्सव हा खड्डे मुक्त व्हावा असं नाशिक महानगरपालिकेला सांगितलं असताना महापालिका आयुक्तांनी याबाबत सकारात्मक भूमिका दाखवत गणेश उत्सवाच्या आधीच नाशिक हे खड्डे मुक्त होईल असं सांगितलं होतं.... मात्र प्रत्यक्षात नाशिक शहरातील अनेक भागात मोठ-मोठे खड्डे पाहायला मिळतात... यामुळे नागरिकांना कंबर दुखी पाठ चुकीचा त्रास होताना पाहायला मिळतोय... तर अनेक वाहनांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचं नागरिकांनी सांगितलं... या रस्त्यांकडे पाहिलं तर रस्त्यात खड्डे ही खड्ड्यात रस्ते अशी परिस्थिती निर्माण झाली आहे... या संदर्भात पेठ रोड परिसरात पडलेल्या खड्ड्यांच्या येथून आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड यांनी....
use wkt with byte
1
Report
GMGANESH MOHALE
FollowAug 26, 2025 05:19:12Washim, Maharashtra:
वाशिम:
File:2608ZT_WSM_ST_BUS_APP
रिपोर्टर: गणेश मोहळे,वाशिम
अँकर : प्रवाशांना एसटी बसचे अचूक लोकेशन मोबाईलवर कळावे यासाठी राज्य सरकारने स्वतंत्र अँप लाँच करण्याची घोषणा केली होती.१५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिना पासून हे अँप सुरू करण्याचे आश्वासन दिले गेले होते.मात्र प्रत्यक्षात अद्याप हे अँप सुरू झालेले नसल्याने प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.गणेशोत्सव, नवरात्र,दसरा, दिवाळी अशा सणासुदीच्या काळात एसटी बसमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी असते.अनेकदा बस उशिरा धावल्याने प्रवाशांना अनावश्यक प्रतीक्षा करावी लागते.या गैरसोयी टाळण्यासाठी आणि प्रवाशांना वेळापत्रक व बसचे लोकेशन उपलब्ध करून देण्यासाठी हे अँप विकसित करण्यात आले आहे.मात्र तांत्रिक कारणांचा दाखला देत सरकारकडून अँप कार्यान्वित करण्याची नवी डेडलाईन जाहीर करण्यात आलेली नाही.त्यामुळे प्रवाशांची गैरसोय कायम असून त्यातून नाराजी वाढत आहे.
7
Report
VKVISHAL KAROLE
FollowAug 26, 2025 05:18:57Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:
csn water supply av
feed attached
पाण्याचे टप्पे आता एक दिवसाने कमी; सणासुदीत संभाजीनगरकरांना 'बाप्पा' पावला
ANC : छत्रपती संभाजीनगर शहरासाठी वाढीव पाणीपुरवठा सुरू झाल्याने सणासुदीच्या काळात नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. जायकवाडी ते नक्षत्रवाडीदरम्यान टाकलेल्या ९०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीतून मिळणाऱ्या पाण्यामुळे शहराला आता १७० एमएलडी पाणी उपलब्ध होत आहे. यामुळे पाणीपुरवठ्याचे टप्पे एका दिवसाने कमी झाले आहेत. फारोळा येथील जलशुद्धीकरण केंद्राचे जलपूजन नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यामुळे ऐन सणासुदीच्या काळात शहरवासीयांना जास्त प्रमाणात पाणी मिळू शकणार आहे...
8
Report
SRSHRIKANT RAUT
FollowAug 26, 2025 05:17:52Yavatmal, Maharashtra:
यवतमाळ जिल्ह्यात लाडक्या गणरायाची आतुरता गणेश भक्तांना लागली असून जिल्ह्यात 2513 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून श्रींची स्थापना केली जाणार आहे. आगमन व मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस दलाने बंदोबस्ताचे नियोजन केले आहे, 31 पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी बंदोबस्तासाठी सज्ज झाले आहे. जिल्ह्यात 56 संवेदनशील ठिकाणी असून पुसद मध्ये एक अति संवेदनशील ठिकाण म्हणून नोंद आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांचा विशेष वॉच राहणार आहे. ऑपरेशन प्रस्थान अंतर्गत आदर्श गणेश मंडळ स्पर्धा, डीजे मुक्त मिरवणूक व विविध सामाजिक उपक्रमांसाठी पुरस्कार देण्याची योजना देखील पोलीस दलाकडून आखण्यात आली आहे.
4
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowAug 26, 2025 05:17:38Pune, Maharashtra:
Reporter name : Chaitralli Raajapurkar
Location : Maval
File name : 2608ZT_MAVAL_EWAY_GARDI
Total files : 05
Headline : गणेशोत्सवासाठी गावाला निघालेल्या कोकणवासीयांची पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवरील टोल नाक्यावर गर्दी
Anchor :
गणेशोत्सव साजरा करण्यासाठी अनेक कोकनवासीय हे मुंबई कडून आपआपल्या गावी निघाले आहे. त्यामुळे पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवर वाहतूक ही काहीशी धीम्या गतीने सुरू आहे. पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवरील उर्से टोल नाक्यावर देखील वाहनांच्या काही प्रमाणात रांगा लागल्या आहेत. मुंबई कडून सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागात जाण्यासाठी हे कोकण वासीय निघाले असल्याने ही गर्दी पहायला मिळत आहे. याच उर्से टोल नाका परिसरातून आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधी चैत्राली राजापूरकर यांनी...
Wkt Chaitralli (file no.05)
6
Report
PPPRANAV POLEKAR
FollowAug 26, 2025 05:04:14Ratnagiri, Maharashtra:
ब्रेकिंग
मुंबई गोवा महामार्गावर खवटी गावानजिक अपघात
खाजगी आराम बस आणि मारुती इको कार मध्ये झाला अपघात
इको कार मधील तीन जण गंभीर जखमी
दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान
मुंबई गोवा महामार्ग रहदारीने गजबजला
गणेशोत्सवासाठी हजारो वाहने महामार्गावरून धावत आहेत
5
Report
GMGANESH MOHALE
FollowAug 26, 2025 05:04:01Washim, Maharashtra:
वाशिम:
File:2608ZT_WSM_YELLOW_MOSAIC
रिपोर्टर: गणेश मोहळे,वाशिम
अँकर:वाशिम जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले होते. त्यानंतर आता सोयाबीन पिकावर येल्लो मोझॅक या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. या रोगामुळे सोयाबीनची पानं पिवळी पडत असून पीक कोमेजून सुकत आहे.अतिवृष्टीतून जेवढं पीक वाचलं होतं, त्यातदेखील उत्पादनात मोठी घट होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे आधीच नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसमोर आता या नव्या संकटामुळे चिंता वाढली आहे.
6
Report
GMGANESH MOHALE
FollowAug 26, 2025 05:03:35Washim, Maharashtra:
वाशिम :
File:2608ZT_WSM_FARMER_SON_DEATH
रिपोर्टर:गणेश मोहळे, वाशिम
अँकर :वाशिमच्या मंगरुळपीर तालुक्यातील आसेगाव इथल्या शेतकऱ्याच्या मुलाचा रानडुकरांच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्यानंतर उपचारादरम्यान मृत्यू झालाय. सोहेल खान असं मृत तरुणाचं नाव आहे.५ ऑगस्ट रोजी सोहेल खान आणि त्याचा भाऊ सलमान खान हे दोघं सारसी येथील शेतामध्ये सोयाबीन पिकावर फवारणीसाठी गेले होते. काम आटोपून घरी परतत असताना रानडुकरांनी अचानक त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात सोहेल खान गंभीर जखमी झाला होता तर त्याचा भाऊ सलमान याला किरकोळ दुखापत झाली होती.गंभीर अवस्थेतील सोहेल खान याला प्रथम वाशिम येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र प्रकृतीत सुधारणा न झाल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्याला छत्रपती संभाजीनगर येथील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र २५ ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.गरीब कुटुंबातील या तरुणाच्या निधनाची बातमी समजताच आसेगाव गावात शोककळा पसरली.या हल्ल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
9
Report