Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Solapur413304

अतिवृष्टि से किसान बर्बाद, जयंत पाटील: 50 हजार प्रति एकड़ राहत चाहिए

SKSACHIN KASABE
Sept 25, 2025 08:48:08
Pandharpur, Maharashtra
25092025 Slug - PPR_JAYANTPATIL_FLOOD file 05 -- Anchor - राज्यात अतिवृष्टी झाली आहे. शेतकऱ्यांना मदत नको तर नुकसान भरपाई द्या. दसरा दिवाळी पूर्वी शेतकऱ्यांना एकरी पन्नास हजार मदत करा, राष्ट्रवादी काँग्रेस एसपी नेते जयंत पाटील यांची राज्य सरकार कडे मागणी राज्यात ज्या भागात अतिवृष्टी झाली तिथे झालेले नुकसान फार मोठे आहे. शेतातील पिके उध्वस्त झाली आहेत. जनावरे वाहून गेली. शेत जमीन घरे शेती पंप याचे प्रचंड नुकसान झाले आहे. नुकसान भरपाई तर द्याच पण या शेतकऱ्यांची कर्ज माफ करावी सर्व खाजगी आणि सरकारी बँकांना आदेश द्यावेत म्हणजे त्यांना पुन्हा कर्ज मिळेल. तर शेतकरी उभा राहून यातून बाहेर पडेल अशी मागणी जयंत पाटील यांनी केली - Byte - जयंत पाटील
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
AAASHISH AMBADE
Sept 25, 2025 10:46:43
Chandrapur, Maharashtra:Feed slug:--- 2509ZT_CHP_SUICIDE_1_2_3_4 टायटल:- चंद्रपूर जिल्ह्यातील नवरगाव येथे १९ वर्षीय विद्यार्थ्याने केली आत्महत्या, एमबीबीएस प्रवेशासाठी गोरखपूरला होणार होता रवाना, खोलीत सापडलेल्या सुसाईड नोटमध्ये लिहिले ,मला डॉक्टर व्हायचे नाही., कुटुंब आणि परिवाराला धक्का अँकर:-  चंद्रपूर जिल्ह्यातील नवरगाव येथे १९ वर्षीय विद्यार्थ्याने आत्महत्या केली. एमबीबीएसला प्रवेश घेण्यासाठी हा विद्यार्थी गोरखपूरला जाणार होता. त्याच्या खोलीत सापडलेल्या सुसाईड नोटमध्ये , "मला डॉक्टर व्हायचे नाही." असे लिहिले आहे.  व्ही. ओ. १) अनुराग अनिल बोरकर या १९ वर्षीय विद्यार्थ्याने कठोर परिश्रम करून तिसऱ्या प्रयत्नात नीट परीक्षा उत्तीर्ण केली. तो एमबीबीएस प्रवेशासाठी गोरखपूरला जाणार होता. निघण्याच्या आदल्या रात्री त्याने घरीच खोलीत पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली. अनुरागने 2025 च्या नीट UG परीक्षेत 99.99 टक्के गुणांसह ओबीसी श्रेणीत १४७५ वा क्रमांक मिळवला होता. त्याच्या यशाचे सर्वत्र कौतुक झाले. डॉक्टर होण्याचे त्याचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार होते. मात्र त्याच्या आत्महत्येमुळे हे स्वप्न अपूर्ण राहिले. या घटनेने गावावर शोककळा पसरली आहे. कुटुंबाला धक्का बसला आहे. त्याच्यावर कुठलाही दबाव नव्हता असे सांगत वडील शोकमग्न आहेत.  बाईट १) अनिल बोरकर, अनुरागचे वडील व्ही.ओ. २) अनुरागचे कुटुंब सधन आहे.  त्याच्या वडिलांचे कृषी केंद्र आहे. त्यांचे इतरही व्यवसाय आहेत. वडील स्थानिक व्यापारी संघटनेचे प्रमुख देखील आहेत. कुटुंबात शिक्षणाचे वातावरण आहे. त्याची धाकटी बहीण जेईईची तयारी करत आहे. त्याने तालुक्यातील सर्वोत्तम शाळेत नर्सरी ते दहावीपर्यंत शिक्षण घेतले. त्यानंतर, त्याने अकरावी, बारावी आणि नीटसाठी नागपूरमधील एका महाविद्यालयाची निवड केली. अनुरागला त्याच्या दोन प्रयत्नांमध्ये अपेक्षित निकाल मिळाले नाहीत. तिसऱ्या वेळी, त्याने कठोर परिश्रम केले आणि नीटचा किल्ला सर केला. अनुरागचे दहावीचे शिक्षक त्याची अभ्यासू वृत्ती आणि मनमिळावू स्वभाव विसरू शकत नाहीयेत. बाइट १)  गुंजन धामेजा, अनुरागच्या शिक्षिका व्ही.ओ. ३) बोरकर कुटुंबाने अनुरागच्या नीट उत्तीर्ण होण्याचा आनंद साजरा केला होता. अनुरागने स्वतः त्याच्या इंस्टाग्राम बायोमध्ये "एमबीबीएस विद्यार्थी" असे लिहून भविष्यात यशस्वी डॉक्टर होण्याच्या दिशेने भक्कम पाऊल टाकले होते. परंतु त्याने आत्महत्येसारखे टोकाचा निर्णय  घेतला याबद्दल हळहळ व्यक्त होत आहे. तज्ञांच्या मतानुसार  कुटुंबात आजकाल फक्त बोलणे आणि ऐकणे हाच संवाद समजला जात आहे. जर आपण स्पष्टपणे बोललो आणि नंतर एक मध्यम मार्ग शोधला तर या घटना टाळता येतील. बाइट ३) डॉ. विवेक बांबोळे, मानसोपचारतज्ज्ञ व्ही.ओ. ४) पोलिस या प्रकरणाची चौकशी करत आहेत. या प्रकरणात सापडलेल्या सुसाईड नोटची चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे, तर मोबाईल रेकॉर्डचीही तपासणी सुरू आहे. या आत्महत्येमागे आणखी काही कारण आहे का? दबावाला तोंड देऊ न शकणे, त्याच्या आवडीच्या क्षेत्रात जाऊ न शकल्याचे शल्य मग निराशेचा झालेला स्फोट, हे विषय पुन्हा एकदा केंद्रस्थानी आले आहेत. ---------PTC------- आशीष अम्बाडे  झी २४ तास   चंद्रपूर 
0
comment0
Report
SMSATISH MOHITE
Sept 25, 2025 10:21:34
Nanded, Maharashtra:Satish Mohite Slug - Ned_FloodWKT Feed on - 2C ------------------------------ Anchor - नांदेड जिल्ह्यात पुर परिस्थिती कायम असून सर्वच नदी नाल्याना पुर आल्याने पिकं पाण्याखाली गेली आहेत. अर्धापूर तालुक्यातील मेंढला नदीला पुर आल्याने नदिकाठची शेकडो हेक्टरवरील शेती पूर्ण पाण्याखाली गेली आहेत. तीन दिवसापासून पिक पाण्याखाली असल्याने सोयाबीन, ऊस, हळद, तूर ही सर्वच पिकं उद्वस्त झाली आहे. नांदेड जिल्ह्यात 6 लाख 48 हेक्टर वरील पिकांचे नुकसान झाले आहे. हवामान खात्याने आणखी तीन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवल्याने शेतकरी आणखी चिंतेत सापडले आहेत. सगळ्या शेतामध्ये गुडघाभर पाणी साचलेले आहे. सरकारला ओला दुष्काळ जाहीर कारण्यासाठी आणखी काय परिस्थिती पाहायची आहे असा सवाल शेतकरी विचारताहेत. शेतकऱ्यांना धीर द्यायचा असेल तर कमीत कमी हेक्टरी 50 हजार रुपये मदत देण्याची मागणी शेताकऱ्यांनी केलीये. त्यांच्याशी बातचित केलीये आमचे प्रतिनिधी सतिश मोहिते यांनी. WKT --------------
0
comment0
Report
YKYOGESH KHARE
Sept 25, 2025 10:21:10
Nashik, Maharashtra:Nsk_potholepkg Feed by live u 51 (nsk_khaddepkg) परवा पाठविले आहे त्याचा वापर करणे. यामध्ये केस स्टडी add केली आहे Anchor राज्यात सध्या वाईन कॅपिटल असलेलं नाशिक शहर पॉटहोल कॅपिटल म्हणून ओळख बनली आहे. ठीक ठिकाणी पडलेल्या खड्डे सध्या मंदिरांच्या नगरी मध्ये येणारे पर्यटक आणि नाशिककर यांच्यासाठी डोकेदुखी ठरली आहे. Vo 1 हे खड्डे आहेत राजीव गांधी महापालिका इमारतीच्या परिसरातील रस्त्यावर...पालिकेजवळून अवघ्या दीड किमी रस्त्यात 226 खड्ड्यात वाहनधारक अडकत असल्याचे समोर आले आहे.. हा सर्व्हे तयार केला आहे राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या माजी नगरसेवक हेमलता पाटील यांनी..... टिळकवाडी चौक आंबेडकर चौक सिद्धार्थ नगर ते श्रद्धा पेट्रोल पंप हा शहरातला महत्त्वपूर्ण प्रतिष्ठित परिसराला जोडणारा रस्ता.. महापालिका परिसरातील याच रस्त्यावरील हे खड्डे प्रशासनाला दिसत नसतील तर शहरात काय अवस्था असेल याचा विचार आपण करू शकता... Bytr हेमलता पाटील माजी नगरसेविका Vo 2 बांधकाम विभाग सर्व काही आलबेल असल्याची भूमिका दाखवत आहे. अखेर गिरीश महाजन यांनी स्वतः पाहणी केली आणि अल्टिमेटम दिलाय Byte गिरीश महाजन vo 2 विशेष म्हणजे गेल्या सहा महिन्यांमध्ये नाशिक महापालिकेने खड्डे बुजवण्यासाठी जवळपास 77 कोटी रुपये खर्च केले आहेत.. मात्र तरीही शहरातील खड्डे मात्र कायम आहेत . महाजनांनी पाच तास बैठक घेत महापालिका बांधकाम विभागाची झाडाझडती घेतली आहे त्यात धक्कादायक रस्ते बांधणीचा गैरव्यवहार समोर आला आहे. एम एस आर डी सी च्या पंधरा अधिकाऱ्यांचे पथक आता या खर्चाच ऑडिट करतेय मात्र तरीही खड्डे कधी बुज विले जातील असा प्रश्न नाशिक कर यांना पडला आहे Byte नाशिककर नाशिककर Vo 3 पर्यटनाची नगरी असलेल्या नाशिकचा विकास या खड्ड्यांमुळे खड्ड्यांमध्येच अडकला आहे आणि त्याबरोबर नाशिककरांचा श्वासही... अनेकांचे मृत्यू होऊनही लक्षात येत नसेल तर राज्य सरकारने महापालिकेच्या कारभाराकडे बारकाईने लक्ष देण्याची गरज आहे
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Sept 25, 2025 10:16:27
Jalna, Maharashtra: FEED NAME : 2509ZT_JALNA_FARMER(FEED SEND BY WHATTS APP PERSONNEL) जालना : अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई द्या मंठा परतूर तालुक्याला अतिवृष्टी बाधितांच्या यादीत समाविष्ट करा मंठा ,परतूर तालुक्यातील शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयात घुसले जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनाबाहेर शेतकऱ्यांचा घोषणाबाजी करत ठिय्या जिल्हाधिकाऱ्यांसोबत चर्चेला जाताना शेतकऱ्याकडे असलेल्या बाटलीत ज्वलनशील पदार्थ,शेतकऱ्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात अँकर :अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई द्या अशी मागणी करत जालन्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात अचानक शेतकरी घुसले.मंठा परतूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी घोषणाबाजी सुरु करत सरसकट नुकसान भरपाईची मागणी केली आहे. या शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात घुसून जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनाबाहेर ठिय्या मांडला आहे.तसेच जिल्हा नियोजन समिती सभागृहात देखील शेतकरी जाऊन बसले.मात्र जिल्हाधिकारी चर्चेसाठी न आल्यानं पोलीस आणि शेतकरी यांच्यात बाचाबाची झालेली पाहायला मिळाली.जिल्हाधिकारी चर्चेसाठी तयार झाल्यानंतर जिल्हाधिकारी यांनी शेतकऱ्यांना त्यांच्या दालनात बोलाऊन घेतलं. यावेळी एका शेतकऱ्याला एका छोट्या कॅनमध्ये ज्वलनशील पदार्थ घेऊन जाताना पोलिसांनी ताब्यात घेतलं.त्यामुळे जालन्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयात राडा पाहायला मिळाला.दरम्यान मि पाण्याची बाटली घेऊन जात होतो,ज्वलनशील पदार्थ नाही असा दावा या शेतकऱ्यानं केला आहे.अंकुश काकडे असं पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या शेतकऱ्याचं नाव आहे. तर या शेतकऱ्यावर गुन्हा दाखल केल्यास आम्ही आत्मदहन करून घेऊ असा ईशारा आंदोलक राजेश मोरे यांनी दिला आहे बाईट : अंकुश काकडे,ताब्यात घेतलेला शेतकरी बाईट : राजेश मोरे आंदोलक
0
comment0
Report
SKSudarshan Khillare
Sept 25, 2025 10:03:47
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Sept 25, 2025 10:01:32
Washim, Maharashtra:वाशिम :  File:2509ZT_WSM_BHUMIPUTR_MORCHA रिपोर्टर:गणेश मोहळे, वाशिम अँकर :वाशिम जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी भूमिपुत्र शेतकरी संघटनेतर्फे रिसोड तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला होता.या मोर्चात मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले.अतिवृष्टीमुळे खरीपातील सोयाबीन,कपाशी,उडीद, मूग मका यासह सर्वच पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.त्यामुळे पीकविमा तात्काळ देण्यात यावा, कर्जमाफी जाहीर करावी तसेच ओला दुष्काळ तातडीने घोषित करावा,या मागण्या तहसीलदार यांना निवेदन देऊन करण्यात आल्या.हा मोर्चा भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे अध्यक्ष विष्णूपंत भुतेकर यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला. बाईट:विष्णुपंत भूतेकर,भूमीपुत्र शेतकरी संघटना
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Sept 25, 2025 09:50:36
Akola, Maharashtra:Anchor : राज्य शासनातील विविध विभागांतील कर्मचारी व संघटनांनी भारत मुक्ती मोर्चाच्या नेतृत्वाखाली सरकारविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. संघटनांनी सरकारकडे अनेक महत्त्वाच्या मागण्या ठेवत तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली आहे.मुख्य मागण्यांमध्ये 2005 नंतर नियुक्त सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करणे, सर्व विभागांचे खासगीकरण थांबवणे, तसेच SC/ST/OBC बॅकलॉगची तत्काळ भरती करणे यांचा समावेश आहे.तसेच, शिक्षण व आरोग्य विभागातील रिक्त पदे कायमस्वरूपी भरणे, प्रलंबित प्रमोशनबाबत निर्णय घेणे आणि पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप (PPP) मॉडेल रद्द करून रुग्णालये पुन्हा सरकारी नियंत्रणाखाली आणणे या मागण्या पुढे करण्यात आल्या.याशिवाय, बांधकाम कामगारांसाठी लागू केलेला 12 तासांचा कामाचा निर्णय रद्द करून 8 तास नियम पुन्हा लागू करावा, अशीही संघटनांची ठाम मागणी आहे.या सर्व मागण्या तात्काळ मान्य न झाल्यास मोठ्या आंदोलनाचा इशारा भारत मुक्ती मोर्चा आणि संबंधित संघटनांनी सरकारला दिला आहे.
0
comment0
Report
PNPratap Naik1
Sept 25, 2025 09:48:00
Kolhapur, Maharashtra:Kop Puragrusth Help Feed:- Live U Anc:- कोल्हापूर शहरावर महापुराचे संकट आले होते त्यावेळी संपूर्ण राज्यभरातून मदत पोहोचली होती.आता कोल्हापूर प्रमाणे मराठवाड्यावर पुराचे संकट आले आहे.त्यामुळे मराठवाड्यातील नागरिकांच्या पाठीशी संपूर्ण महाराष्ट्र उभा राहिला आहे.कोल्हापूरकर नेहमीच मदतीच्या बाबतीत एक पाऊल पुढे असतात. मराठवाड्याला मदत करावी यासाठी काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्याकडून आवाहन करण्यात आलं होतं.त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. धान्याचे पॅकेट्स, शालेय वस्तू, औषधे, बिस्कीट इत्यादी वस्तू गोळा होण्यास सुरुवात झाली आहे. पुढच्या दोन दिवसांमध्ये ही मदत मराठवाड्याकडे पाठवली जाणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त दानशूर व्यक्तींनी मदत करावी असा आवाहन देखील करण्यात आलं आहे. Byte:- 1) सागर कोंडेकर, काँग्रेस कार्यकर्ता Byte :- 2) राजू वळीवडे, काँग्रेस कार्यकर्ता
0
comment0
Report
AKAMAR KANE
Sept 25, 2025 09:47:52
Nagpur, Maharashtra:Ngp Bjp Meeting live u ने फीड पाठवले ===---------------- नागपूर - *नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघ कॉंग्रेसच्या ताब्यात गेलेला गड पुन्हा मिळवण्यासाठी भाजप कंबर कसून कामाला लागली आहे. भाजपने आज पदवीधर मतदार संघ निवडणुकीच्या दृष्टीने तयारीसाठी महत्त्वपूर्ण बैठक प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृवात नागपुरात पार पडली... पूर्व विदर्भातील भाजपाचे सर्व प्रमुख नेते या बैठकीला उपस्थित होते*२०२० मध्ये काँग्रेसचे अॅड. अभिजित वंजारी यांनी भाजप नेते आणि माजी महापौर संदीप जोशी यांचा करत भाजपाला मोठा धक्का दिला होता... त्यामुळे भाजप पुन्हा एकदा आपला गड काबीज करण्याकरता कामाला लागली आहे... -
0
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Sept 25, 2025 09:46:07
0
comment0
Report
AKAMAR KANE
Sept 25, 2025 09:45:50
Nagpur, Maharashtra:Ngp MIG 121 live u ने फीड पाठवले ----------------------------------------- भारतीय हवाई दलातील मिग -21 हे लढाऊ विमान निवृत्त होतेय... एकेकाळी भारतीय हवाई दलाचा कणा म्हणून या लढावऊ विमानाकडे पाहण्यात येत होतं... 1971 च्या युद्धात भारतीय वायुदलास करता मोलाची भूमिका या लढाऊ विमानाने पार पडली.... 1965 पासून आजतागायत या लढाऊ विमानाचा भारतीय हवाई दलाच्या अनेक मोहिमेत अग्रेसर पद्धतीने सहभाग राहिला आहे... मिग 21 लढाऊ विमानाची वैशिष्ट्ये, त्याची कामगिरी आणि मिग 21 नंतर भारतीय दलासमोर त्याची रिप्लेसमेंट आणि आव्हानांबाबत आमच्या प्रतिनिधींनी एअरवाईस मार्शल सूर्यकांत चाफेकर यांच्याकडून जाणून घेतले आहे... =------- बाईट --- एअर वाईस मार्शल सूर्यकांत चाफेकर,(TIKTak )
0
comment0
Report
VBVAIBHAV BALKUNDE
Sept 25, 2025 09:33:35
Latur, Maharashtra:लातूर ब्रेकिंग न्यूज.... स्किप्ट ::- लातूर जिल्हा पोलीस अधिकारी व कर्मचारी सहकारी पतसंस्थेने अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिला मदतीचा हात... आम्ही पोलीस आहोत, पण आधी शेतकऱ्याची लेकरं आहोत..... या भावनेतून १ लाख ११ हजार १११ रुपयांची केली मदत.... AC ::-  लातूर जिल्हा पोलीस अधिकारी व कर्मचारी सहकारी पतसंस्थेने अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात पुढे केला आहे. "आम्ही पोलीस आहोत, पण आधी शेतकऱ्याची लेकरं आहोत"... या भावनेतून १ लाख ११ हजार १११ रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला...मराठवाड्यातील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालं आहे. समाजाप्रती आपली जबाबदारी मानून ही मदत देण्यात आली असल्याचं पतसंस्थेकडून सांगण्यात आलं आहे...
0
comment0
Report
SMSamruddhi M Kolhe
Sept 25, 2025 09:23:42
Khopoli, Maharashtra:स्लग : खोपोली रेल्वे स्थानकाजवळ ट्रॅकवर जखमी अवस्थेत आढळले सचिन महेश दयाळ (४५) – अपघात की घातपात यावर सस्पेन्स. उपचाराकरिता MGM रुग्णालयात दाखल अँकर : रायगडच्या खोपोली रेल्वे स्थानकाजवळून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रेल्वे ट्रॅकवर सचिन महेश दयाळ नावाचे व्यक्ती हे जखमी अवस्थे मध्ये आढळून आलेत.दयाळ हे खोपोली मधील असून ते या रेल्वे स्थानक परिसरातील रुळावर जखमी अवस्थेत आढळून आलेत.तेथे ड्युटी बजावणाऱ्या एका मोटारमॅनच्या दक्षतेमुळे समोरून येणारी रेल्वे गाडी थांबवून त्यांना खोपोली स्थानकात आणण्यात आलं. मात्र वेळेत रुग्णवाहिका न मिळाल्यामुळे उपस्थित नागरिकांनी स्वतःच त्यांना जवळच्या रुग्णालयात पोहोचवण्याचा प्रयत्न केला. नेमके सचिन दयाळ ट्रॅकवर कसे आले? हा अपघात होता की घातपात? याबाबत अद्याप स्पष्ट झालेले नाही. पुढील उपचारासाठी त्यांना नवी मुंबई येथील कळंबोली मधील MGM रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आलं आहे.
4
comment0
Report
Navaratri 2025
Advertisement
Back to top