Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Sangli416416

सांगली में कौटुंबिक विवाद ने दी मौत, पति ने पत्नी पर धारदार हथियार से हमला

SMSarfaraj Musa
Sept 28, 2025 10:36:05
Sangli Miraj Kupwad, Maharashtra
स्लग - कौटुंबिक वादातून पतीकडून पत्नीचा निर्घृण खून अँकर - कौटुंबिक वादातून एका पतीने पत्नीचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना सांगली मध्ये घडली आहे. कोमल एडके वय वर्ष 27 असा मृत विवाहितेचे नाव असून खुनाच्या घटनेनंतर पती प्रशांत एडके हा पोलीस ठाण्यात हजर झाला आहे. शहरातल्या शांतीनगर या ठिकाणी पती-पत्नी राहत होते या दोघांच्या मध्ये कौटुंबिक कानातून वादावादीचा प्रकार घडला त्यातून संतापलेल्या प्रशांत एडके यांने धारधार शस्त्रांनी वार करत पत्नी कोमल याची हत्या केली. तुझी म्हणजे कौटुंबिक कानातून सतत वाद होत असल्याने मृत कोमल हे आपल्या माहेरी मलकापूर या गावी निघून गेली होती आणि त्यानंतर कालच प्रशांत याने समजूत काढून पत्नी कोमल हिला घरी आणलं होतं. मात्र दोघांमध्ये पुन्हा वादाचा प्रकार घडला आणि त्यातून पती प्रशांत यांनी पत्नी कोमलचा निर्गुण खून केला आहे. घटनेची नोंद सांगली शहर पोलीस ठाण्यामध्ये झाली असून अधिक तपास शहर पोलीस करत आहेत. बाईट - विमला एम - पोलीस उपअधीक्षक- सांगली शहर.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
PPPRASHANT PARDESHI
Sept 28, 2025 12:34:56
Dhule, Maharashtra:ANCHOR - धुळे जिल्ह्यात पाऊसाने कहर केला आहे. सततच्या पाऊसामुळे पिकांची नाही भरून निघणारी हानी झाली आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यात लोहगाव, वसमाने परिसरात भेट देऊन अति पाऊसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. केळी, पपई, कापूस, ऊस, मका, या पिकांचे कापणीला आले असताना प्रचंड नुकसान झाले आहे. अद्यापही पाऊस थांबलेला नाही. हातादोंडाशी आलेला घास हिरवाला गेल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. त्यांना धीर देत पालकमंत्री जयकुमार रावल यांनी शासन शेतकऱ्यांना सर्वोतोपारी मदत करेल असे आश्वासन दिले. यावेळी सोबत जिल्हा कृषी अधीक्षक सूरज जगताप, तहसीलदार संभाजी पाटील उपस्थित होते. कृषी आणिअहसून यंत्रनेला तात्काळ सर्व पंचनामे वेळेत करण्याचे आदेश पालकांमंत्री रावल यांनी यावेळी दिले. byte - जयकुमार रावल, पालकमंत्री, धुळे. प्रशांत परदेशी, धुळे.
0
comment0
Report
SKSACHIN KASABE
Sept 28, 2025 12:33:22
Pandharpur, Maharashtra:28092025 Slug - PPR_VITTHAL_SAMITI FILE 01 ----- Anchor - गोर गरीब शेतकरी कष्टकरी जनतेचा देव विठू माऊलीचा पूर बाधित आणि अतिवृष्टीने खचलेल्या शेतकऱ्यांच्या पाठीवर मायेचा हात, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती एक कोटी रुपयांची मदत पूर बाधित अतिवृष्टी झालेल्या शेतकऱ्यांना देणार राज्यातील विविध भागांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली असून नागरिकांना मोठ्या संकटांना सामोरे जावे लागत आहेत. या परिस्थितीत मदतीचा हात पुढे करण्याचे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी राज्यातील सर्व देवस्थानांना केले आहे. या आवाहनास प्रतिसाद देत तसेच सामाजिक उत्तरदायित्व व मानवतावादी भूमिकेतून श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने मुख्यमंत्री सहायता निधीस एक कोटी रुपयांची मदत व त्याचबरोबर पुरग्रस्त नागरिकांना श्रींच्या प्रसादरूपाने महावस्त्रे वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगीतले. मंदिर समिती कडून पुरग्रस्त नागरिकांना फुड पॅकेट वाटप करत आहे. पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या, लाडूप्रसाद उपलब्ध करून देण्यात येत आहे. मंदिर समितीकडून यापूर्वीही राज्यावर आलेल्या आपत्तीच्या काळात मदत केली गेली आहे. विशेष म्हणजे सन 2013, 2015, 2018 व 2020 या काळातही मंदिर समितीमार्फत मुख्यमंत्री सहायता निधीस प्रत्येकी 1 कोटी रुपयांची मदत करण्यात आली होती ----- Byte - गहिनीनाथ महाराज औसेकर, सह अध्यक्ष श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती, पंढरपूर
0
comment0
Report
UJUmesh Jadhav
Sept 28, 2025 12:33:04
Thane, Maharashtra:भिवंडीमध्ये सुरू असलेल्या संततधार पावसामुळे सखल भागात साचले पूराचे पाणी.. ॲंकर.. काल रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे शहरातील अनेक सखल भागात पाणी साचले आहे. अंजूर फाटा, मुख्य बाजारपेठ आणि तीन बत्तीसह आसपासच्या परिसरात रस्ते पाण्याखाली गेले आहेत. ज्यामुळे रहिवाशांची मोठी गैरसोय होत आहे. पाणी साचल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. पूराचे पाणी दुकानात शिरत असल्याने दुकानदारांचे नुकसान होत आहे. असाच जर का पाऊस सुरू राहिला तर दुकानात पाणी शिरण्याची शक्यता आहे. त्यामुळे बाजारात दुकाने लावलेले दुकानदार काळजीत आहेत. गिर्‍हाईक तर ह्या पाण्यातून येऊ शकत नाही पण पाणी वाढलेच तर मालाचे काय आणि कसे करायचे. त्याच बरोबर खाडी किनारी राहणाऱ्या नागरिकांना मनपा आयुक्त व अतिदक्षता विभागाने सतर्क रहाण्याच्या सूचना दिल्या आहेत. पाण्याची धोक्याची पातळी वाढल्यास नागरिकांनी सुरक्षित स्थळी स्थलांतरित व्हावे. अशा प्रकारची सूचना प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Sept 28, 2025 12:31:16
Akola, Maharashtra:Anchor : अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील उमई-जांभा रोडवर आज सकाळी भीषण घटना घडली. दिपक वानखडे (वय ४२) या व्यक्तीची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली असून श्रीराम वानखडे हे गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे उमई व जांभा परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.पोलिसांच्या माहितीनुसार, गजानन मानकर (वय ३५) या युवकाने जुन्या वादातून ही हत्या केल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. घटनेनंतर पोलिसांनी अवघ्या एका तासाच्या आत आरोपीला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे सावट पसरले आहे. पोलीस प्रशासनाने नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. Byte : श्रीधर गुट्टे, पोलिस निरीक्षक.
0
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Sept 28, 2025 12:16:20
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या झरीजामणी तालुक्यातील मुकुटबन येथे सुरू असलेल्या आरसीसीपीएल सिमेंट कंपनीविरोधात भूमिपुत्रांनी सुरू केलेल्या आंदोलनाला पाठिंबा देत शिवसेना यु बी टी चे आमदार संजय देरकर व शिवसैनिकांना कंपनी कार्यालयावर धडक दिली. पोलिसांचा बंदोबस्त झूगारून शिवसैनिकांनी आक्रमक पवित्रा घेतला. रोजगाराच्या संधी, स्थानिकांना न्याय्य मोबदला, पर्यावरणीय प्रश्न तसेच इतर स्थानिक सुविधा या मागण्यांकडे आरसीसीपीएल कंपनीकडून वारंवार दुर्लक्ष होत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. या आंदोलनात महिलांसह तरुण व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. मागण्या पूर्ण न झाल्यास संघर्ष अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
0
comment0
Report
ABATISH BHOIR
Sept 28, 2025 12:16:08
Kalyan, Maharashtra:कल्याण नगर मार्गावरील शहाड पूल वाहतुकीसाठी आज रात्रीपासून १५ ऑक्टोम्बर पर्यंत बंद राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून देखभाल दुरुस्तीचे काम सुरु होणार पर्यायी मार्गावरून वाहतूक करण्याच्या वाहतूक विभागाच्या सूचना Anchor :- कल्याण नगर मार्गावरील शहाड पुलाचे दुरावस्था झाले होते या पुलावर पावलोपावली खड्डे पडले होते विविध राजकीय पक्षांनी संघटनांनी या खड्ड्यान विरोधात आंदोलन करत देखभाल दुरुस्तीची मागणी केली होती अखेर राष्ट्रीय महामार्ग विभागाने या पुलाची देखभाल दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे आज रात्री बारा वाजल्यापासून ते 15 ऑक्टोबर पर्यंत हा पूल देखभाल दुरुस्तीसाठी बंद राहणार आहे या पुलावरील वाहतूक या कालावधी दरम्यान बंद ठेवण्यात आली आहे एकंदरीतच या पुलावर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते त्यामुळे वाहन चालकांची गैरसोय होऊ नये यासाठी वाहतूक विभागाने पर्यायी मार्ग सुचवले असून याच पर्याय मार्गावरून वाहतूक करावी असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केलं आहे प्रवेश बंद - १) माळशेज कडुन कल्याणकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना ठाणे ग्रामीण हद्दीत डॅम फाटा, मुरबाड येथे 'प्रवेश बंद' करण्यात येत आहे. पर्यायी मार्ग सदरची वाहने ही ठाणे ग्रामीण हददीत डॅम फाटा, बदलापुर रोडने बदलापुर पालेगांव नेवाळी नाका मलग रोड लोढा पलावा/शिळ डायघर रोड/पत्रीपुल, कल्याण मार्गे इच्छीत स्थळी जातील. प्रवेश बंद - २) मुरबाड कडुन शहाड पुलावरून कल्याण कडे जाणा-या सर्व प्रकारच्या वाहनांना ठाणे ग्रामीण हददीत दहागांव फाटा (रायतागांव) येथे 'प्रवेश बंद' करण्यात येत आहे. पर्यायी मार्ग ठाणे ग्रामीण हद्दीतील दहागाव फाटा (रायतागाव) येथे वाहन डावीकडे वळत आहे. वाहोली गाव - मांजर्ली दहागाव एरंजाडगाव बदलापूर पालेगाव नेवाली नाका मानलग रोड, लोढा पलावा/शिल्देघर रोड/पत्रीपुल कल्याण मार्गे इच्छीत स्थळी जातील. प्रवेश बंद - ३) कल्याण कडुन मुरबाड कडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना कल्याण वाहतुक उपविभाग हददीत दुर्गाडी पुल येथे 'प्रवेश बंद' करण्यात येत आहे. पर्यायी मार्ग सदरची वाहने दुर्गाडी पुलावरून उजवी कडे वळुन पुढे गोविदवाडी बायपास पत्रीपुल चक्की नाका मार्गे नेवाळी पालेगांव बदलापुर मार्गे मुरबाडकडे इच्छीत स्थळी जातील. सदर पर्यायी मार्गावरुन जड-अवजड वाहनांना नमुद कालावधीत सकाळी ०६:०० ते सकाळी ११:०० वा. तसेच सायंकाळी १७:०० वा. ते २२:०० वा. पर्यत प्रवेश बंद राहील. wkt... आतिश भोईर कल्याण
0
comment0
Report
SKSACHIN KASABE
Sept 28, 2025 12:07:01
Pandharpur, Maharashtra:पूर परस्थिती मधील नागरिकांना उपयोगी येण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीस 1 कोटीची मदत, -मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, राज्यातील विविध भागांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली असून नागरिकांना मोठ्या संकटांना सामोरे जावे लागत आहेत. या परिस्थितीत मदतीचा हात पुढे करण्याचे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी राज्यातील सर्व देवस्थानांना केले आहे. या आवाहनास प्रतिसाद देत तसेच सामाजिक उत्तरदायित्व व मानवतावादी भूमिकेतून श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने मुख्यमंत्री सहायता निधीस एक कोटी रुपयांची मदत व त्याचबरोबर पुरग्रस्त नागरिकांना श्रींच्या प्रसादरूपाने महावस्त्रे वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगीतले. मंदिर समिती प्रत्येकवेळी पुरग्रस्त नागरिकांना फुड पॅकेट वाटप करीत असते. ह्यावेळी जिल्हा प्रशासनास देखील आवश्यक ती मदत करण्यात येत असून, पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या, लाडूप्रसाद उपलब्ध करून देण्यात येत आहे. मंदिर समितीकडून यापूर्वीही राज्यावर आलेल्या आपत्तीच्या काळात मदत केली गेली आहे. विशेष म्हणजे सन 2013, 2015, 2018 व 2020 या काळातही मंदिर समितीमार्फत मुख्यमंत्री सहायता निधीस प्रत्येकी 1 कोटी रुपयांची मदत करण्यात आली होती. मंदिर समितीची सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली दि.26 सप्टेंबर रोजी सकाळी 11.00 वाजता दुरदृष्य प्रणालीद्वारे सभा संपन्न झाली. या सभेस सदस्या शकुंतलाताई नडगिरे, डॉ.दिनेशकुमार कदम, भास्करगिरी बाबा, संभाजी शिंदे, ह.भ.प.ज्ञानेश्वर देशमुख जळगांवकर, ॲड.माधवीताई निगडे, ह.भ.प.प्रकाश जवंजाळ, अतुलशास्त्री भगरे गुरुजी, ह.भ.प.शिवाजीराव मोरे तसेच कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, प्र. व्यवस्थापक पृथ्वीराज राऊत, लेखा अधिकारी मुकेश अनेचा उपस्थित होते. या सभेत शासन मान्यतेने मुख्यमंत्री सहायता निधीस 1 कोटीची मदत तसेच श्री रूक्मिणीमातेचा प्रसाद म्हणून महावस्त्रे वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली. ------ श्रीं विठ्ठल रूक्मिणी मातेच्या कृपेने संकटकाळात समाजाच्या सेवेसाठी पुढे येणे हीच खरी विठ्ठलभक्ती आहे. पुरग्रस्तांना मदत करणे ही मंदिर समितीचे सामाजिक व नैतिक कर्तव्य असून या आपत्तीमध्ये मंदिर समितीमार्फत प्रशासनास आवश्यक ती मदत करण्यात येत आहे. सह-अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर
0
comment0
Report
UJUmesh Jadhav
Sept 28, 2025 12:06:54
Thane, Maharashtra:ब्रेकिंग... भातसा नदीला पूर आल्याने वालकस जवळील पूल पाण्याखाली.... वालकस-बेहरे गावातील नागरिकांचा संपर्क तुटला... ॲंकर.... काल पासून मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे अनेक नद्यांना पूर आलेला आहे. संततधार कोसळणाऱ्या पावसामुळे भातसा नदीला ही पूर आला आहे. यामुळे कल्याण तालुक्यातील वालकस जवळील पूल पाण्याखाली गेलायं. यामुळे वालकस व बेहरे गावातील नागरिकांचा तीन दिवसांपासून शहराशी संपर्क तुटला आहे. पावसाचं प्रमाण सतत वाढतच आहे. तसेच भातसा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात देखील वाढ होत असल्याने धराणाचे स्वयंचलीत दरवाजे उघडल्याने धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होऊन भातसा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. यामुळे हा पूल लवकर ओसरणार नसल्याचे बोलले जात आहे. हा पूल यंदाच्या पावसाळ्यात पाचव्यांदा पाण्याखाली गेलाय. यामुळे येथील नागरिकांनी अतिशय बिकट परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. या ठिकाणी नवीन पुलाच्या निर्मितीचे काम सुरू असून ते संथ गतीने सुरू आहे, ते लवकरात लवकर पूर्ण व्हावे अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.
0
comment0
Report
UJUmesh Jadhav
Sept 28, 2025 12:02:31
Thane, Maharashtra:ब्रेकिंग... खडवली भातसा नदीला पूर... नदीने ओलांडली धोक्याची पातळी... पूराचे पाणी सखलभागात शिरले... भातसा नदीवरील पूल गेला पाण्याखाली... ॲंकर.... रात्री पासून मुसळधार कोसळणारऱ्या पावसामुळे खडवली येथील भातसा नदीला पूर आला आहे. यामुळे नदी पात्रातील पाणी पातळीत कमालीची वाढ झाली आहे. यामुळे नदीवरील पूल पाण्याखाली गेला आहे. नागरिकांच्या रहदारीचा प्रश्न निर्माण झालाय. खडवली ते पडघा वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. पूराचे पाणी सगळ भागात शिरू लागले आहे. खडवलीतील अनेक सखलभागात भातसाच्या पूराचे पाणी शिरले आहे. खडवली येथील आदिवासी आश्रम शाळेच्या परिसरात देखील पुराचे पाणी शिलाने या पूराच्या पाण्यातून वाट काढतांना आश्रम शाळेचे विद्यार्थी दिसून येत आहे. यामुळे प्रशासनाकडून नदीकाठच्या लोकांनी सतर्क रहाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
0
comment0
Report
UJUmesh Jadhav
Sept 28, 2025 12:01:22
Thane, Maharashtra:ब्रेकिंग..... काळू नदीवरील पूल पाण्याखाली... कल्याण ग्रामीण भागात पावसाची जोरदार हजेरी... नदी नाल्यांना आलाय पूर... काळू नदीच्या पाणी पातळीत वाढ नदीने ओलांडली इशारा पातळी... ॲंकर... रात्री पासून संततदार कोसळत असणाऱ्या मुसळधार पावसामुळे कल्याण ग्रामीण मधील नदी, नाले व ओढ्यांना पूर आला असून जागोजागी पावसाच्या पूराचे पाणी साचले असल्याचे पहावयास मिळते. कल्याण ग्रामीण भागातून वाहणाऱ्या रूंदे जवळील काळू नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने नदीवर असणारा पुल पाण्याखाली गेलाआहे. पावसाचा जोर असाच कायम रहायला तर काळू नदीच्या पूराच पाणी परीसरातील गावांत शिरण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. हा पूल पाण्याखाली गेल्याने तालुक्याच्या ग्रामीण भागातील १० ते १२ गावांचा शहराशी संपर्क तुटला आहे. तसेच काळू नदीवर वासुंद्री जवळ असणाऱ्या पूलाला देखील पाणी लागला असून हा ही पूल पाण्याखाली जाण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. तसेच गुरवली-टिटवाळा नदीवरील पुलाला देखील पाणी लागले आहे. हा पूल ही पाण्याखाली जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मात्र नदीला पूर आल्याने संपूर्ण जनजीवन विस्कळित झाले आहे. नदीकाठच्या गावातील लोकांना सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. भात शेती पाण्याखाली गेल्याने तालुक्याती भात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भिती व्यक्त केली जात आहे. यामुळे ओळाला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली जात आहे.
0
comment0
Report
Navaratri 2025
Advertisement
Back to top