Back
कोल्हापुर में स्वबळावर चुनाव? मुश्रीफ की आक्रामक चेतावनी
PNPratap Naik1
Sept 25, 2025 07:45:57
Kolhapur, Maharashtra
Kop NCP Swabal Nara
Feed:- 2C &
Feed Name
1) Mum NCP AP Pakshpravesh (2309) ( यामध्ये हसन मुश्रीफ यांचा Sound Byte आहे)
2) Kop NCP Swabal PKG
( यामध्ये नीलम गोऱ्हे यांचा बाईट आहे)
3) Kop Mahadik Byte (2C)
( यामध्ये धनंजय महाडिक यांचा बाईट आहे)
Headline :- ज्या ठिकाणी आमचं जमणार नाही त्या ठिकाणी आम्ही स्वबळावर - राष्ट्रवादीचे नेते मंत्री हसन मुश्रीफ आक्रमक. खासदार धनंजय महाडिक आणि शिवसेना आमदार क्षीरसागर यांच्या अधिक जागा मागणी वरून मुश्रीफ आक्रमक.
Anc:- कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने महायुतीमध्ये सगळं काही अलबेल आहे असं दिसत नाही. भाजपा खासदार धनंजय महाडिक आणि शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर हे अधिक जागा मिळायला हव्यात अशी आक्रमक भूमिका मांडली आहे. पण ही भूमिका मांडत असताना राष्ट्रवादी पक्षाला जमेत धरले नाही त्यामुळे गेल्या वीस वर्षापासून कोल्हापूर महानगरपालिकेत सत्तेत असणाऱ्या राष्ट्रवादी पक्ष आक्रमक झालाय. राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तटकरे यांच्यासमोरच मैत्रीपूर्ण लढतीचे संकेत दिलेत.
Sound Byte:- हसन मुश्रीफ, मंत्री
(((( आज मी विश्वास देऊ इच्छितो तटकरे साहेबांना येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये युती म्हणून निवडणुका लढवणार आहोत, पण ज्या ठिकाणी आमचे जमणार नाही त्या ठिकाणी आम्ही स्वबळावर कोणत्याही मित्र पक्षांवर टीका न करता आम्ही निवडणुका लढवू आणि कोणत्याही परिस्थितीत सगळ्या नगरपालिका असतील महानगरपालिका असतील किंवा जिल्हा परिषद असतील यावर युतीचा झेंडा फडकवण्याचा आमचा प्रयत्न असेल.)))
VO 1:- नेहमी संयमी भूमिका मांडणारे मंत्री हसन मुश्रीफ यांनी कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीत स्वबळावर निवडणूक लढवण्याचे संकेत दिलेत. घडलही तसंच... भाजपचे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांनी मागील निवडणुकीत भाजप आणि ताराराणी आघाडीचे 34 उमेदवार निवडून आले होते, त्यामुळे त्या जागा आम्ही लढवणारच आहोत, पण ज्या 29 जागा काँग्रेसने जिंकल्या त्यामधील आणखी 12 जागा हव्यात अशी आग्रही मागणी केली आहे. इतकच नाही तर मागील निवडणुकीत शिवसेनेचे 4 जागा निवडून आले असताना आमदार राजेश क्षीरसागर हे 30 जागा मागत असतील तर आम्ही किती जागेवर दावा करायचा असा प्रश्न देखील महाडिक यांनी उपस्थित केलाय.
Byte:- धनंजय महाडिक, राज्यसभा खासदार
VO 2:- धनंजय महाडिक यांची ही आक्रमक भूमिका राष्ट्रवादीचे नेते मंत्री हसन मुश्रीफ यांना पचलेली नाही. इतकच नव्हे तर कोल्हापूर शहराचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी तीसहून अधिक जागा कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीत लढणार अशी घोषणा केली आहे. या दोन्ही नेत्यांच्या भूमिका हसन मुश्रीफ यांना आवडलेल्या नाहीत, त्यामुळेच मुंबईमध्ये झालेल्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात हसन मुश्रीफ यांनी आक्रमक भूमिका मांडत काही ठिकाणी स्वबळाचा नारा दिला. इतकच नव्हे तर हा नारा देण्याची वेळ का आली हे देखील बोलून दाखवले.
Sound Byte:- हसन मुश्रीफ, मंत्री
((((( जिल्हा मध्यवर्ती बँकेचे काही संचालक आम्ही परदेश दौऱ्यावर गेलो होतो, गेल्या दोन-तीन दिवस कोल्हापूर जिल्ह्याच्या वर्तमानपत्राच्या बातम्या वाचल्या.. एक आहेत भारतीय जनता पक्षाचे खासदार दुसऱ्या आहेत शिवसेना शिंदे गटाचे आमदार.. कोल्हापूर महानगरपालिकेच्या 81 जागा आहेत , त्यांनी दोघांनी वाटणी करून घेतली आहे. पण दर वेळेला गेल्या 20 वर्षापासून सत्तेत असणाऱ्या राष्ट्रवादी पक्षाला त्यांनी जागा शिल्लक ठेवलेले नाहीत, तो ऐंशी जागा मागतोय आणि हो 80 जागा मागतोय.. त्यांचे किती निवडून आले होते याचा उल्लेख मी करणार नाही.. पण ज्या वेळेला आम्ही नेते मंडळी बसू त्यावेळेला त्यावर ठरवू.. जागा अधिक मागण्याचा अधिकार त्यांना आहे.. पण तिसरा मित्र पक्ष आहे हे त्यांना विसर पडला आहे.. त्यांनी ते विसरता कामा नये ))))
VO 3:- राष्ट्रवादी पक्ष गेल्या वीस वर्षापासून कोल्हापूर महानगरपालिकेत सत्तेत आहे. अस असताना भाजपा आणि शिवसेना शिंदे गट जागेच्या मागणीमध्ये आक्रमक भूमिका मांडत आहेत.. त्यामुळेच हसन मुश्रीफ यांनी एक प्रकारे जागावाटप योग्य झाले नाही तर आम्ही स्वबळावर निवडणुका लढवू असा थेट इशारा दिलाय. यावर शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी संयमाची भूमिका मांडत. पक्षाचे प्रमुख नेते यावर अंतिम निर्णय घेतील असं सांगून आम्ही महायुती म्हणून एकच आहे अशी भूमिका मांडली आहे.
Byte:- नीलम गोऱ्हे, उपसभापती
VO 4:- कोल्हापूर महानगरपालिकेत एकूण 81 जागा आहेत. या जागांमधील निम्म्या निम्म्या जागांवर भाजपा आणि शिवसेना शिंदे पक्षाने मागितल्या आहेत.. यावरूनच राष्ट्रवादीचे नेते मंत्री हसन मुश्रीफ यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे... त्यामुळे आगामी कोल्हापूर महानगरपालिका निवडणुका महायुती म्हणून भाजपा, शिंदे शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्रित निवडणुकीला सामोरे जाणार की स्वबळावर निवडणूक रिंगणात उतरणार हे पाहणं पाहणे महत्त्वाचे आहे..
प्रताप नाईक झी 24 तास कोल्हापूर.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AAASHISH AMBADE
FollowSept 25, 2025 10:46:430
Report
JJJAYESH JAGAD
FollowSept 25, 2025 10:39:240
Report
SNSWATI NAIK
FollowSept 25, 2025 10:30:180
Report
SMSATISH MOHITE
FollowSept 25, 2025 10:21:340
Report
YKYOGESH KHARE
FollowSept 25, 2025 10:21:100
Report
NMNITESH MAHAJAN
FollowSept 25, 2025 10:16:270
Report
SKSudarshan Khillare
FollowSept 25, 2025 10:03:470
Report
GMGANESH MOHALE
FollowSept 25, 2025 10:01:320
Report
JJJAYESH JAGAD
FollowSept 25, 2025 09:50:360
Report
PNPratap Naik1
FollowSept 25, 2025 09:48:000
Report
AKAMAR KANE
FollowSept 25, 2025 09:47:520
Report
SRSHRIKANT RAUT
FollowSept 25, 2025 09:46:070
Report
AKAMAR KANE
FollowSept 25, 2025 09:45:500
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowSept 25, 2025 09:33:350
Report
SMSamruddhi M Kolhe
FollowSept 25, 2025 09:23:424
Report