Back
ED ने अनिल पवार यांच्या नाशिक प्लॉटची पाहणी, कायदा पळवण्याचा संशय!
YKYOGESH KHARE
Jul 30, 2025 06:54:56
Nashik, Maharashtra
nsk_edreidwkt
fed by live u 51
नाशिक
* ED कडून माजी आयुक्त अनिल पवार यांच्या नाशिकच्या जागेची पाहणी
* काल ED पथकाने पांडवलेणीच्या पायथ्याशी असलेल्या अनिल पवार यांच्या प्लॉट ची केली पाहणी
* ED ने कागदोपत्री केली अनिल पवार यांच्या नाशिकच्या प्लॉटची जप्ती
* पाथर्डी परिसरात पांडवलेणीच्या निसर्गरम्य ठिकाणी अनिल पवार यांचा 413 स्क्वेअर मीटर प्लॉट
* अनिल पवार यांनी कायद्याची पळवाट शोधत केला प्लॉट आपल्या नावे
* पवार यांच्या बागलाण आणि सटाणा येथील मालमत्तेची देखील काल ED कडून झाली चौकशी
14
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PTPRAVIN TANDEKAR
FollowJul 31, 2025 02:32:47Bhandara, Maharashtra:
Pravin Tandekar Bhandara
Slug - 3107_BHA_SNAKE
FILE - 2 VIDEO
चक्क एटीएम मशिन मध्ये विषारी साप.... सर्प मित्रांनी सापाला पकडून नैसर्गिक अधिवासात दिले सोडून
Anchor :- अबब चक्क एटीएम मशिन मध्ये नाग साप पाहून धक्काच बसला. भंडारा जिल्ह्याच्या पिंपळगाव झंझाड येथील एटीएम मशिन मध्ये चक्क नाग साप आढळून आला. बँकेत साप दिसताच कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली होती. लगेच सर्पमित यांना पाचारण करण्यात आले. सर्प मित्र यांनी घटनास्थळी पोहचत ज्या ठिकाणी रोकड ठेवली जाते तो बॉक्स बाहेर काढला व सापाला पकडून नैसर्गिक अधिवासात सोडून दिल. मात्र एटीएम मशिन मध्ये विषारी साप असल्याचं काळातच काही काळ कर्मचाऱ्यांमध्ये भीती पसरली होती.
0
Report
SGSagar Gaikwad
FollowJul 31, 2025 02:32:41Nashik, Maharashtra:
Feed send by 2c
Reporter-sagar gaikwad
Slug-nsk_khandani
हॉटेल व्यवसायात अडथळा निर्माण करून सात लाखांची खंडणी मागणाऱ्या शिवसेना (ठाकरे गट) महिला पदाधिकाऱ्यांसह पतीविरोधात गुन्हा
अँकर
नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरातील फॅमिली रेस्टॉरंट अॅण्ड बार सुरु ठेवण्यासाठी सात लाख रुपये खंडणीची मागणी करत धमकी दिल्याप्रकरणी शिवसेना (ठाकरे गट)च्या महिला पदाधिकाऱ्यासह तिच्या पतीविरोधात इंदिरानगर पोलीस ठाण्यात पंढरीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय... याबाबत हॉटेल मालक आशुतोष कृष्णा गडलिंग यांनी गुन्हा दाखल केलाय... हे रॉयल लिस्टो फॅमिली रेस्टॉरंट अॅण्ड बार चालवतात. ७ ते १४ जुलैदरम्यान, संशयित श्रृती यतिन नाईक व तिचा पती यतिन नाईक यांनी संगनमत करून व्यवसायात अडथळा निर्माण केला. हॉटेलमुळे त्रास होतो, असे सांगत त्यांनी ग्राहक व वेटरची अडवणूक केली. हॉटेल सुरु ठेवायचे असल्यास सात लाख रुपये खंडणी द्यावी लागेल, अन्यथा हॉटेल बंद पाडू, अशी धमकी दिली....या प्रकरणी बारचालकाने तातडीने पोलीस ठाणे गाठत दोघांविरोधात गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस करत आहे....
0
Report
VKVISHAL KAROLE
FollowJul 31, 2025 02:31:30Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:
Csn zambad bail av
photo attached , use high court shots
अजिंठा नागरी सहकारी बँकेत २००६ ते ऑगस्ट २०२३ या कालावधीत ९७.४१ कोटींच्या अपहाराबाबत अटक असलेले माजी आमदार सुभाष झांबड यांचा जामीन अर्ज औरंगाबाद खंडपीठाने फेटाळून लावला. रिझर्व्ह बँकेच्या निर्देशावरून विशेष लेखापरीक्षक सहकारी बँक यांनी क्रांती चौक ठाण्यात झांबड यांच्यासह इतरांवर गुन्हा दाखल आहे. प्रकरणात संबंधितांनी ३६ जणांच्या बोगस ठेवी दाखवून बोगस कर्ज वितरित केल्याचा आरोप आहे. सोबतच झांबड यांच्या सोहम मोटर्स व झांबड कन्स्ट्रक्शन यांच्या बँक खात्यामध्ये भ्रष्टाचाराची रक्कम भरणा केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. दरम्यान, झांबड यांनी बँकेचे चेअरमन असल्याचा गैरफायदा घेत स्वतःच्या संस्थेत निधी फिरवल्याचे सरकारी वकील यांनी निदर्शनास आणून दिले.
0
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowJul 31, 2025 02:31:26Solapur, Maharashtra:
सोलापूर ब्रेकिंग - रात्री चोरीला गेलेल्या चार महिन्यांचा बाळाचा पोलिसांनी आठ तासात लावला शोध
- शहरात रात्री चोरीस गेलेल्या चार महिन्यांच्या बाळाचा पोलिसांनी आठ तासात लावला शोध
- सोलापुरातील हत्तुरे वस्ती परिसरातून एका महिलेसह रिक्षाचालकाला अटक
- शबाना शेख आणि मुन्ना शेख या बाळ चोरणाऱ्यांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या
- चार महिन्यांच्या चिमुकल्याचा केवळ आठ तासात शोध घेतल्याने फौजदार चावडी पोलिसांचे सर्वत्र कौतुक
- चार महिन्यांचे बाळ त्याच्या आईवडिलांकडे सुपूर्द तर दुसरीकडे उत्तम कामगिरीबद्दल पोलीस आयुक्तांकडून शोध पथकाचा सत्कार
0
Report
MNMAYUR NIKAM
FollowJul 31, 2025 02:31:18Buldhana, Maharashtra:
Drone vis सौजन्य - अमोल धनोकर
श्री संत गजानन महाराज मायदेशी परतले.....
Anchor - श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचे आज खामगावकडून शेगावकडे प्रस्थान झाले आहे. हजारो भक्तांच्या अलोट गर्दीत ही पालखी १७ किलोमीटरचा प्रवास पायी करत असून,आषाढी एकादशी साजरी करून मायदेशी परतणाऱ्या श्री संत गजानन महाराजांच्या पालखीने आज सकाळी खामगावहून शेगावकडे प्रस्थान केले. हा १७ किलोमीटरचा पायी प्रवास करण्यासाठी हजारो भक्तांनी मोठी गर्दी केली आहे. "गण गण गणात बोते च्या गजरात भक्त मोठ्या उत्साहात पायदळ वारीत साम झाले आहेत. भक्तांसाठी ठिकठिकाणी सोयीसुविधा
पालखी मार्गावर भक्तांसाठी ठिकठिकाणी पाणी, चहा, नाश्ता आणि फराळाची व्यवस्था करण्यात आली आहे. स्थानिक ग्रामस्थ आणि स्वयंसेवकांनी या व्यवस्थेसाठी पुढाकार घेतला आहे, ज्यामुळे वारकऱ्यांना कोणताही त्रास न होता आपला प्रवास पूर्ण करता येत आहे. ही पालखी दुपारपर्यंत शेगाव येथे पोहोचेल अशी अपेक्षा आहे. महाराजांच्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. या सोहळ्याचा थेट आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मयूर निकम यांनी
Wkt - मयूर निकम, प्रतिनिधी
0
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowJul 31, 2025 02:31:14Bhandara, Maharashtra:
Pravin Tandekar Bhandara
Slug - 3107_BHA_BHARTI_CANCEL
FILE - 4 VIDEO
अखेर कोर्टाच्या आदेशाने पोलीस पाटील भरती प्रक्रिया रद्द.... मॅट न्यायालयाचा निर्वाळा
Anchor : भंडारा उपविभागात दि. १६ मार्च २०२३ रोजी घेण्यात आलेल्या पोलिस पाटील पदभरती प्रक्रियेत झालेल्या अनियमितते विरुध्द अन्याय झालेल्या उमेदवारांनी मॅट कोर्ट मध्ये प्रकरण दाखल केले होते. त्या प्रकरणाचे मॅटन्यायालयाने निर्णय देत भरती प्रक्रिया रद्द केली व अन्याय झालेल्या उमेदवारांना न्याय मिळवून दिला, अशी माहिती प्रहार जनशक्ती पक्षाचे भंडारा जिल्हाप्रमुख अंकुश वंजारी यांनी पत्रपरिषदेत दिली.
Vo :- भंडारा उपविभागात ४९ गावांसाठी दि. १६ मार्च २०२३ रोजी पोलिस पाटील पदभरती ची जाहिरात प्रसिद्ध झाली, त्या अनुषंगाने ४८ गावातून विविध आरक्षणातून उमेदवारांनी अर्ज दाखल केले. जाहिरातीतील जाहीरनामा प्रमाणे पदभरती होत नसल्यामुळे भरती प्रक्रिया दरम्यान वरिष्ठांना निवेदन व तक्रारी देण्यात आल्या होत्या. त्यावेळी तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. योगेश कुंभेजकर यांनी सकारात्मकता दाखवत तक्रारीची दखल घेऊन चौकशी समिती नेमून निष्पक्ष चौकशी करून तत्कालीन सरकारला अहवाल सादर केला होता. त्यानंतर सरकारने कार्यवाही केली व उपविभागीय अधिकारी रविंद्र राठोड, तहसीलदार भंडारा अरविंद हिंगे, तहसीलदार पवनी नीलिमा रंगारी यांना निलंबित करून निवड झालेल्या पोलिस पाटील यांना ४ जुलै २०२३ ला कार्यमुक्त करण्यात आले. त्याठिकाणी राज्यसरकारने त्यांची बाजूव्यवस्थितन मांडल्यामुळे दि. ५ ऑक्टोंबर २०२३ रोजी कार्यमुक्त पोलिस पाटील यांना रुजू आदेश करण्यात आले, त्या आदेशानुसार ते रुजू झाले. सदर भरती प्रक्रियेत उच्चतम गुण प्राप्त उमेदवारांना डावलून लेखी परीक्षेत कमी गुण असणाऱ्यांना तोंडी परीक्षेत निवड समितीने मर्जीतील गुण देऊन ४८ पैकी ३० उमेदवारांवर अन्याय केला. त्यामुळे या भरतीप्रक्रियेत आर्थिक देवाण घेवाण झाली अशी शंका होती व समाज माध्यमात चर्चा झाली व अन्याय धारक उमेदवार यांनी उच्चन्यायालय नागपूर खंडपीठ येथे याचिका दाखल केली. भरती प्रक्रियेतील निवड समिती ही चुकीची आहे. असा निर्णय देऊन प्रकरण मॅट न्यायालयात वर्ग करून ३ महिन्यात निर्णय द्या असा आदेश करण्यात आला. त्यांनी भक्कमपने बाजू मांडून पुरावे सादर केले. तेव्हा मॅट न्यायालयाने एक पाऊल पुढे टाकून भरती प्रक्रियेत उपविभागीय अधिकारी यांनी आर्थिक देवाणघेवा केलं असा ठपका ठेवत पोलिस पाटील भरती रद्द करण्याचे आदेश दिले.
BYTE :- अंकुश वंजारी, जिल्हा अध्यक्ष प्रहार
BYTE :- वर्षा चांदेकर, तक्रारदार
0
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowJul 31, 2025 02:31:01Raigad, Maharashtra:
स्लग - मुंबई गोवा महामार्गाच्या कामात पेव्हर ब्लॉकचा वापर ...... खड्डे बुजविण्यासाठी तात्पुरती मलमपट्टी ......
अँकर - मुंबई गोवा महामार्गाच्या कामासाठी पुन्हा एकदा पेव्हर ब्लॉकचा वापर केला जातोय. महामार्गावरील खड्डे बुजविण्यासाठी हे पेव्हर ब्लॉक वापरले जात आहेत. सध्या महामार्गाची ठिकठिकाणी दुरवस्था झाली आहे. त्यावरून प्रवाशांमध्ये संतापाचे वातावरण आहे. गणेशोत्सव जेमतेम एक महिन्यावर आलाय. त्यामुळे चाकरमान्यांना खड्ड्यातून प्रवास करावा लागू नये यासाठी पेव्हर ब्लॉक टाकून ही तात्पुरती मलमपट्टी केली जात आहे. खड्डे बुजवून त्यावर ग्रीट टाकून पेव्हर ब्लॉक बसवले जात आहेत.
0
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowJul 31, 2025 02:17:55Bhandara, Maharashtra:
Pravin Tandekar Gondia
Slug - 3107_GON_MLA_VISIT
FILE - 5 VIDEO
अनुसूचित जमाती कल्याण समितीने घेतला आरोग्य विभागाचा आढावा... देवरी येथील आदिवासी विकास प्रकल्प कार्याला दिली भेट..
Anchor : महाराष्ट्र शासनाची अनुसूचित जमाती कल्याण समिती गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे. दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांनी आदिवासी भाग असलेल्या देवरी येथे भेट दिली यावेळी आरोग्य विभागाचा आढावा घेतला तसेच आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय देखील भेट घेतली यावेळी नागरिकांनी अनेक समस्या मांडत प्रशासनाच्या कामाबद्दल नाराजी व्यक्त केली.. तर या कोणत्या समस्या असतील त्या समस्या शासनाकडे मांडण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन यावेळी समितीचे सदस्यांनी दिले...
BYTE - आमदार दौलत दरोडा
4
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowJul 31, 2025 02:17:29Raigad, Maharashtra:
स्लग - बनावट व्हीआयपी पास विकून लाखोंची कमाई ...... खालापूर टोलनाक्यावरील सिक्युरिटी गार्डचा गोरखधंदा उघड ......... खालापूर पोलिसांनी ठोकल्या बेड्या .......
अँकर - मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरील खालापूर टोल नाक्यावर सुरक्षा रक्षक म्हणून काम पाहणाऱ्या तरुणाने बनावट व्हीआयपी पास तयार करून काहीना विकले असल्याचे समोर आलंय. ओंकार महाडिक असं त्याचं नाव असून झटपट श्रीमंत होण्याच्या नादात त्याने हा गोरखधंदा सुरू केला होता. त्याच्या विरोधात खालापूर पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. त्याला 2 जुलै पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. टोलनाक्यावर मोफत व्हीआयपी पासवरून प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाल्याचे टोल कंपनी अधिकाऱ्यांच्या लक्षात आले. त्यांनी शोध घेतला असता काही वाहन चालकांकडील पास बनावट असल्याची धक्कादायक निदर्शनास आली. यात ओंकार महाडिक याचं नाव समोर आलं. ओंकार याने असे बनावट पास विकून लाखो रुपयांची कमाई केल्याचा पोलिसांना संशय आहे.
4
Report
VKVISHAL KAROLE
FollowJul 31, 2025 02:17:20Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:
Csn zp student issue av
Feed attached
राज्य सरकारने शाळेच्या पहिल्या दिवशी प्रत्येक विद्यार्थ्याला २ गणवेश आणि पाठ्यपुस्तके मोफत देण्याचे आदेश दिले होते. परंतु, शाळेच्या पहिल्या दिवसापर्यंत लाखो विद्यार्थ्यांना केवळ एकच गणवेश मिळाला. शाळा सुरू होऊन दीड महिना उलटला, पण अद्याप दुसरा गणवेश दिलेला नाही. विशेष म्हणजे राज्य शासनाकडून जिल्हा परिषदेला दुसऱ्या गणवेशासाठी देण्यात आलेला निधी पुरेसा नाही. गणवेशासाठी ५ कोटी ७२ लाख ३४४ गरज असताना अवघे २ कोटी रुपये निधी देण्यात आला आहे. म्हणजे ३०० रुपये प्रति विद्यार्थी असताना केवळ १०५ रुपयांवर बोळवण करण्यात आली आहे...दुसरा गणवेश विद्यार्थ्यांना केव्हा मिळणार, याविषयी स्पष्ट कोणतेही आदेश नाहीत. दुसऱ्या गणवेशासाठीच्या निधीचेही वितरण अद्यापपर्यंत झालेले नाही..'समग्र शिक्षा' अंतर्गत पहिली ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांना गणवेश देण्यात येतो. गेल्या वर्षी गणवेश शिवून देणार म्हणून गाजावाजा करण्यात आला. पण, वर्ष संपले तरी अजून मिळाला नाहीय
2
Report
VKVISHAL KAROLE
FollowJul 31, 2025 02:17:10Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:
Csn jayakwadi av
Feed attached
जायकवाडी धरणातून आज पाणी सोडण्यात येणार आहे. धरणाचे १८ दरवाजे अर्ध्या फुटाने उघडण्यात येणार आहेत. यामधून दहा हजार क्युसेक पाणी सोडण्यात येणार आहे. जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत दुपारी तीन वाजता जायकवाडीच्या पाण्याचे पूजन केले जाणार आहे. धरणातून ९४३२ क्युसेक इतक्या पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे. १९७९ नंतर पहिल्यांदाच जुलै महिन्यात जायकवाडीचे पाणी सोडण्यात येत आहे.
जायकवाडी धरणात सध्या उपयुक्त पाणीसाठा १९५६ दलघमी तर एकूण पाणीसाठा २६९४ दलघमी इतका आहे. हे प्रमाण ९०.१३ टक्के इतके आहे. सध्या जायकवाडी धरणात १६२३० क्युसेक इतक्या पाण्याची आवक सुरू आहे.
4
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowJul 31, 2025 02:03:19Bhandara, Maharashtra:
Pravin Tandekar Bhandara
Slug - 3107_BHA_TOBACCO
FILE - 1 VIDEO
एक लाख 20 हजार रुपयांचा सुगंधित तंबाखू केला जप्त....अड्याळमधील अशोक नगरातील प्रकार
Anchor :- भंडारा जिल्ह्याच्या अड्याळ येथील अशोक नगर येथे स्थानिक गुन्हे शाखा भंडारा यांनी मोठी कारवाई करीत १ लाख २० हजार रुपये किमतीचा प्रतिबंधित सुगंधित तंबाखू आणि ५ लाख रुपये किमतीचे वाहन जप्त केले.पोलिसांनी मोहम्मद हसन जाकीर अली सय्यद (५४) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सय्यद याच्या घरावर व वाहनावर छापा मारून हा मुद्देमाल जप्त केला.अड्याळ परिसरात या प्रकारच्या प्रतिबंधित तंबाखूच्या विक्रीवर मागील काळातही अनेक कारवाई झाल्या आहेत.जिल्ह्यातील काही विक्रेते लपून-छपून तंबाखू विक्री करत असल्याच्या चर्चा सुरू आहे.विशेष म्हणजे याच दिवशी पोलिसांनी छत्तीसगडकडे जाणारा डोडा जप्त केला होता.स्थानिक गुन्हे शाखा व पोलिस विभागाने अशा प्रतिबंधित पदार्थावर कडक कारवाई करण्यास प्राधान्य दिले आहे.
6
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowJul 31, 2025 02:03:11Bhandara, Maharashtra:
Pravin Tandekar Bhandara
Slug - 3107_BHA_MAVIM_ANDOLAN
FILE - 2 VIDEO
महिला व बाल विकास विभाग आणि महिला आर्थिक विकास महामंडळातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे जिल्हा कचेरी समोर एकदिवसीय धरणे आंदोलन
Anchor ;- लोकसंचालित साधन केंद्रातील कर्मचाऱ्यांना मासिक मानधन व प्रशासकीय खर्चाकरिता 25 लाख रुपये निधी महाराष्ट्रातील सर्व लोकसंचालित साधन केंद्राला उपलब्ध करावे तसेच सीआरपी यांना उमेद प्रमाणे सहा हजार रुपये मासिक मानधन देण्यात यावे मावीम स्थापित प्रत्येक गटाला उमेद प्रमाणे तीस हजार रुपये प्रमाणे फिरता निधी उपलब्ध करून द्यावा प्रत्येक गटाला सात टक्के व्याजदर आणि बँक कर्ज उपलब्ध करून द्यावे अश्या विविध मागण्या करीता महिला व बालविकास विभाग आणि आर्थिक विकास महामंडळ सलग्नित असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे भंडाऱ्यात जिल्हा कचेरी समोर एक दिवसीय धरणे आंदोलन केलं आहे.
Byte ;- वनमाला बावनकर
7
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowJul 31, 2025 01:01:29Latur, Maharashtra:
AC ::- लातूर शहरातून जाणाऱ्या रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील राजीव गांधी चौक ते महात्मा बसवेश्वर चौक या मार्गावर गेल्या महिनाभरापासून स्ट्रीट लाईट बंद आहेत...रात्रीच्या वेळेस गडद अंधाराचे साम्राज्य पसरते आणि त्याचा अपराधींनी फायदा घेत लुटमारी, मोबाईल हिसकावणे यांसारख्या घटना घडवायला सुरुवात केली आहे...महिलांना भीतीच्या सावटाखाली या मार्गावरून प्रवास करावा लागत आहे...
रोजंदारीवर, ड्युटीवर जाणाऱ्या नागरिकांमध्येही भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे... प्रशासनाकडे वेळोवेळी तक्रारी करण्यात आल्या, मात्र काहीही हालचाल न झाल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं हातात टेंबे घेऊन मध्यरात्री आंदोलन केलं आहे...
प्रशासनाचा निषेध नोंदवत मनसेने स्ट्रीट लाईट तत्काळ सुरू करण्याची मागणी केली आहे...
बाईट ::- मनसैनिक
14
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowJul 31, 2025 01:01:22Ambernath, Maharashtra:
उल्हासनगरात अंगावर ज्वलनशील पदार्थ घेऊन स्वतःला पटवून घेतलं
सोसायटीच्या टेरेसवर केली आत्महत्या
amb suicide
Anchor उल्हासनगरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सोसायटीच्या टेरेसवर एका व्यक्तीने स्वतः च्या अंगावर ज्वलनशील पदार्थ अंगावर टाकून पेटवून घेतल्याची घटना घडली आहे. या घटनेत या त्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे
Vo कॅम्प नंबर पाचच्या गांधी रोड भागातील लक्ष्मीनारायण पॅलेस या इमारतीच्या टेरेसवर हा प्रकार घडला. विजयकुमार भोजवानी असं मृत व्यक्तीचं नाव आहे. विजयकुमार भोजवानी हे याच सोसायटीमध्ये राहत होते. बुधवारी रात्री ते सोसायटीच्या टेरेसवर गेले होते. बऱ्याच वेळ झाला ते खाली आले नाही. पण, काही वेळानंतर सोसायटीच्या टेरेसवर आग लागल्याचं लोकांच्या लक्षात आलं. लोकांनी टेरेसकडे धाव घेतली असता विजयकुमार भोजवानी आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले होते घटनास्थळावरच ज्वलनशील द्रव पदार्थाची आणखी एक कॅन आढळून आली आहे ,मात्र त्यांनी आत्महत्या का
केली हे मात्र समजू शकले नाही
चंद्रशेखर भुयार,उल्हासनगर
12
Report