Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Buldhana443001
क्या शेतकऱ्यांच्या आत्महत्येनंतरच सरकार जागृत होते?
MNMAYUR NIKAM
Jul 30, 2025 06:17:20
Buldhana, Maharashtra
शेतकऱ्यांचा जीव गेलावतेचाच सरकारला जागविले का शेतकरी कन्येचा रोहित पवारांना सवाल Anchor - बुलढाणा जिल्ह्याच्या चिखली तालुक्यातील भरोसा येथे काल राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे युवा नेते रोहित पवार यांनी आत्महत्या ग्रस्त शेतकरी दांपत्याचे घरी भेट दिली या वेळी शेतकरी कन्येने थेट रोहित पवार यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला हा विडिओ सध्या समाज माध्यमावर व्हायरल होत आहे शेतकऱ्याचा जीव गेल्यावरच सरकारला जाग येते का शेतकऱ्याने शेतकऱ्याचे घरी मिठ असते तर तेल नसते तेलाला भाव काय आहे असा प्रश्न शेतकरी कन्येने रोहित पवार यांना विचारला आणि त्यांना अनुत्तरित केलं एकंदरीत यातून शेतकरी आत्महत्येनंतर नेत्यांचे दौरे त्यांचे घरी होतात मात्र आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याला काहीच भेटत नाही हा प्रश्न समोर आला आहे
14
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
PTPRAVIN TANDEKAR
Jul 31, 2025 02:17:55
Bhandara, Maharashtra:
Pravin Tandekar Gondia Slug - 3107_GON_MLA_VISIT FILE - 5 VIDEO अनुसूचित जमाती कल्याण समितीने घेतला आरोग्य विभागाचा आढावा... देवरी येथील आदिवासी विकास प्रकल्प कार्याला दिली भेट.. Anchor : महाराष्ट्र शासनाची अनुसूचित जमाती कल्याण समिती गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे. दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांनी आदिवासी भाग असलेल्या देवरी येथे भेट दिली यावेळी आरोग्य विभागाचा आढावा घेतला तसेच आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय देखील भेट घेतली यावेळी नागरिकांनी अनेक समस्या मांडत प्रशासनाच्या कामाबद्दल नाराजी व्यक्त केली.. तर या कोणत्या समस्या असतील त्या समस्या शासनाकडे मांडण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन यावेळी समितीचे सदस्यांनी दिले... BYTE - आमदार दौलत दरोडा
2
Report
PPPRAFULLA PAWAR
Jul 31, 2025 02:17:29
Raigad, Maharashtra:
स्लग - बनावट व्हीआयपी पास विकून लाखोंची कमाई ...... खालापूर टोलनाक्यावरील सिक्युरिटी गार्डचा गोरखधंदा उघड ......... खालापूर पोलिसांनी ठोकल्या बेड्या ....... अँकर - मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरील खालापूर टोल नाक्यावर सुरक्षा रक्षक म्हणून काम पाहणाऱ्या तरुणाने बनावट व्हीआयपी पास तयार करून काहीना विकले असल्याचे समोर आलंय. ओंकार महाडिक असं त्याचं नाव असून झटपट श्रीमंत होण्याच्या नादात त्याने हा गोरखधंदा सुरू केला होता. त्याच्या विरोधात खालापूर पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. त्याला 2 जुलै पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. टोलनाक्यावर मोफत व्हीआयपी पासवरून प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाल्याचे टोल कंपनी अधिकाऱ्यांच्या लक्षात आले. त्यांनी शोध घेतला असता काही वाहन चालकांकडील पास बनावट असल्याची धक्कादायक निदर्शनास आली. यात ओंकार महाडिक याचं नाव समोर आलं. ओंकार याने असे बनावट पास विकून लाखो रुपयांची कमाई केल्याचा पोलिसांना संशय आहे.
0
Report
VKVISHAL KAROLE
Jul 31, 2025 02:17:20
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:
Csn zp student issue av Feed attached राज्य सरकारने शाळेच्या पहिल्या दिवशी प्रत्येक विद्यार्थ्याला २ गणवेश आणि पाठ्यपुस्तके मोफत देण्याचे आदेश दिले होते. परंतु, शाळेच्या पहिल्या दिवसापर्यंत लाखो विद्यार्थ्यांना केवळ एकच गणवेश मिळाला. शाळा सुरू होऊन दीड महिना उलटला, पण अद्याप दुसरा गणवेश दिलेला नाही. विशेष म्हणजे राज्य शासनाकडून जिल्हा परिषदेला दुसऱ्या गणवेशासाठी  देण्यात आलेला निधी  पुरेसा नाही. गणवेशासाठी ५ कोटी ७२ लाख ३४४ गरज असताना अवघे २ कोटी रुपये निधी देण्यात आला आहे. म्हणजे ३०० रुपये प्रति विद्यार्थी असताना केवळ १०५ रुपयांवर बोळवण करण्यात आली आहे...दुसरा गणवेश विद्यार्थ्यांना केव्हा मिळणार, याविषयी स्पष्ट कोणतेही आदेश नाहीत. दुसऱ्या गणवेशासाठीच्या निधीचेही वितरण अद्यापपर्यंत झालेले नाही..'समग्र शिक्षा' अंतर्गत पहिली ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांना गणवेश देण्यात येतो. गेल्या वर्षी गणवेश शिवून देणार म्हणून गाजावाजा करण्यात आला. पण, वर्ष संपले तरी अजून मिळाला नाहीय
0
Report
VKVISHAL KAROLE
Jul 31, 2025 02:17:10
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:
Csn jayakwadi av Feed attached जायकवाडी धरणातून आज पाणी सोडण्यात येणार आहे. धरणाचे १८ दरवाजे अर्ध्या फुटाने उघडण्यात येणार आहेत. यामधून दहा हजार क्युसेक पाणी सोडण्यात येणार आहे. जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत दुपारी तीन वाजता जायकवाडीच्या पाण्याचे पूजन केले जाणार आहे. धरणातून ९४३२ क्युसेक इतक्या पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे. १९७९ नंतर पहिल्यांदाच जुलै महिन्यात जायकवाडीचे पाणी सोडण्यात येत आहे. जायकवाडी धरणात सध्या उपयुक्त पाणीसाठा १९५६ दलघमी तर एकूण पाणीसाठा २६९४ दलघमी इतका आहे. हे प्रमाण ९०.१३ टक्के इतके आहे. सध्या जायकवाडी धरणात १६२३० क्युसेक इतक्या पाण्याची आवक सुरू आहे.
0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Jul 31, 2025 02:03:19
Bhandara, Maharashtra:
Pravin Tandekar Bhandara Slug - 3107_BHA_TOBACCO FILE - 1 VIDEO एक लाख 20 हजार रुपयांचा सुगंधित तंबाखू केला जप्त....अड्याळमधील अशोक नगरातील प्रकार Anchor :- भंडारा जिल्ह्याच्या अड्याळ येथील अशोक नगर येथे स्थानिक गुन्हे शाखा भंडारा यांनी मोठी कारवाई करीत १ लाख २० हजार रुपये किमतीचा प्रतिबंधित सुगंधित तंबाखू आणि ५ लाख रुपये किमतीचे वाहन जप्त केले.पोलिसांनी मोहम्मद हसन जाकीर अली सय्यद (५४) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सय्यद याच्या घरावर व वाहनावर छापा मारून हा मुद्देमाल जप्त केला.अड्याळ परिसरात या प्रकारच्या प्रतिबंधित तंबाखूच्या विक्रीवर मागील काळातही अनेक कारवाई झाल्या आहेत.जिल्ह्यातील काही विक्रेते लपून-छपून तंबाखू विक्री करत असल्याच्या चर्चा सुरू आहे.विशेष म्हणजे याच दिवशी पोलिसांनी छत्तीसगडकडे जाणारा डोडा जप्त केला होता.स्थानिक गुन्हे शाखा व पोलिस विभागाने अशा प्रतिबंधित पदार्थावर कडक कारवाई करण्यास प्राधान्य दिले आहे.
2
Report
PTPRAVIN TANDEKAR
Jul 31, 2025 02:03:11
Bhandara, Maharashtra:
Pravin Tandekar Bhandara Slug - 3107_BHA_MAVIM_ANDOLAN FILE - 2 VIDEO महिला व बाल विकास विभाग आणि महिला आर्थिक विकास महामंडळातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे जिल्हा कचेरी समोर एकदिवसीय धरणे आंदोलन Anchor ;- लोकसंचालित साधन केंद्रातील कर्मचाऱ्यांना मासिक मानधन व प्रशासकीय खर्चाकरिता 25 लाख रुपये निधी महाराष्ट्रातील सर्व लोकसंचालित साधन केंद्राला उपलब्ध करावे तसेच सीआरपी यांना उमेद प्रमाणे सहा हजार रुपये मासिक मानधन देण्यात यावे मावीम स्थापित प्रत्येक गटाला उमेद प्रमाणे तीस हजार रुपये प्रमाणे फिरता निधी उपलब्ध करून द्यावा प्रत्येक गटाला सात टक्के व्याजदर आणि बँक कर्ज उपलब्ध करून द्यावे अश्या विविध मागण्या करीता महिला व बालविकास विभाग आणि आर्थिक विकास महामंडळ सलग्नित असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे भंडाऱ्यात जिल्हा कचेरी समोर एक दिवसीय धरणे आंदोलन केलं आहे. Byte ;- वनमाला बावनकर
4
Report
VBVAIBHAV BALKUNDE
Jul 31, 2025 01:01:29
Latur, Maharashtra:
AC ::- लातूर शहरातून जाणाऱ्या रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील राजीव गांधी चौक ते महात्मा बसवेश्वर चौक या मार्गावर गेल्या महिनाभरापासून स्ट्रीट लाईट बंद आहेत...रात्रीच्या वेळेस गडद अंधाराचे साम्राज्य पसरते आणि त्याचा अपराधींनी फायदा घेत लुटमारी, मोबाईल हिसकावणे यांसारख्या घटना घडवायला सुरुवात केली आहे...महिलांना भीतीच्या सावटाखाली या मार्गावरून प्रवास करावा लागत आहे... रोजंदारीवर, ड्युटीवर जाणाऱ्या नागरिकांमध्येही भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे... प्रशासनाकडे वेळोवेळी तक्रारी करण्यात आल्या, मात्र काहीही हालचाल न झाल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं हातात टेंबे घेऊन मध्यरात्री आंदोलन केलं आहे... प्रशासनाचा निषेध नोंदवत मनसेने स्ट्रीट लाईट तत्काळ सुरू करण्याची मागणी केली आहे... बाईट ::- मनसैनिक
14
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Jul 31, 2025 01:01:22
Ambernath, Maharashtra:
उल्हासनगरात अंगावर ज्वलनशील पदार्थ घेऊन स्वतःला पटवून घेतलं सोसायटीच्या टेरेसवर केली आत्महत्या amb suicide Anchor उल्हासनगरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सोसायटीच्या टेरेसवर एका व्यक्तीने स्वतः च्या अंगावर ज्वलनशील पदार्थ अंगावर टाकून पेटवून घेतल्याची घटना घडली आहे. या घटनेत या त्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे Vo कॅम्प नंबर पाचच्या गांधी रोड भागातील लक्ष्मीनारायण पॅलेस या इमारतीच्या टेरेसवर हा प्रकार घडला. विजयकुमार भोजवानी असं मृत व्यक्तीचं नाव आहे. विजयकुमार भोजवानी हे याच सोसायटीमध्ये राहत होते. बुधवारी रात्री ते सोसायटीच्या टेरेसवर गेले होते. बऱ्याच वेळ झाला ते खाली आले नाही. पण, काही वेळानंतर सोसायटीच्या टेरेसवर आग लागल्याचं लोकांच्या लक्षात आलं. लोकांनी टेरेसकडे धाव घेतली असता विजयकुमार भोजवानी आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले होते घटनास्थळावरच ज्वलनशील द्रव पदार्थाची आणखी एक कॅन आढळून आली आहे ,मात्र त्यांनी आत्महत्या का केली हे मात्र समजू शकले नाही चंद्रशेखर भुयार,उल्हासनगर
11
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Jul 31, 2025 01:01:10
Ambernath, Maharashtra:
लोकनगरी मैदानातील अनधिकृत गाळे जमीनदोस्त! अंबरनाथ पालिकेच्या अतिक्रमण विभागाची कारवाई Amb amc action Anchor : अंबरनाथच्या लोकनगरी मैदानात पडदे लावून अनधिकृत गाळे उभारले जात होते . या गाळ्यांवर अंबरनाथ पालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने कारवाई करत नव्याने उभारलेले गाळे जमीनदोस्त केले. Vo : अंबरनाथ शहराचं प्रवेशद्वार असलेल्या लोकनगरी एमआयडीसी रोडवर एसार पेट्रोलपंपासमोर अनधिकृत गाळ्यांची रांग उभारण्यात आली आहे. या गाळ्यांवर कारवाई होत नसताना आता याच गाळ्यांच्या शेजारी भूमाफियांनी आणखी नवीन गाळे उभारायला सुरुवात केली होती. त्यानंतर अतिक्रमण विरोधी पथकाने अचानक याठिकाणी जाऊन नव्याने उभारले जात असलेले गाळे जमीनदोस्त केले. असं असलं, तरी जुने गाळे मात्र कायम असून त्यांच्यावर कारवाई कधी होणार? हा प्रश्न कायम आहे. चंद्रशेखर भुयार , अंबरनाथ
14
Report
SMSATISH MOHITE
Jul 31, 2025 01:01:00
Nanded, Maharashtra:
Satish Mohite Slug - Ned_Kidnapping Feed on - 2C --------------------------- Anchor - नांदेड शहरातील वर्दळीच्या रस्त्यावर भरदिवसा एका तरुणीचे जबरदस्तीने दुचाकीवर अपहरण करून दोन तरुण पसार झाल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली होती. नांदेड शहरातील रेल्वे स्थानकासमोरील रस्त्यावर एक तरुण तरुणीसोबत हुज्जत घालत होता. त्या तरुणाने तरुणीला जबरदस्तीने पकडून आपल्या मित्राच्या दुचाकीवर बसवले. त्यानंतर त्या तरुणीला दुचाकीवर घेऊन पसार झाल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. पोलीस तात्काळ सतर्क झाल्याने त्या अपहरणकर्त्यांनी काही अंतरावर तरुणीला सोडून पळ काढला. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक अबिनाशकुमार यांच्यासह पोलीस अधिकारी, कर्मचारी रस्त्यावर उतरले. तरुणीला अधिक माहिती विचारून काही तासात एका आरोपीला अटक करण्यात आली. अपहरण करण्यात आलेली तरुणी सहा महिन्यांपासून नांदेड रेल्वे स्थानकात भिक्षा मागून राहत आहे. अपहरण करणारे आरोपी आणि त्या तरुणीची ओळख आहे. काही कारणाने त्यांच्यात वाद झाला आणि दोघांनी तिला जबरदस्तीने दुचाकीवर बसवून नेल्याचे पोलिसांनी सांगितले. तरुणीची फिर्याद घेऊन पुढील तपास करण्यात येणार असल्याचे पोलीस अधीक्षक अबिनाशकुमार यांनी सांगितले. Byte - अबिनाशकुमार - पोलीस अधीक्षक, नांदेड. -----------------------
11
Report
YKYOGESH KHARE
Jul 30, 2025 17:45:14
Nashik, Maharashtra:
Breaking - nsk_ashimatrasnfer images 2 vidoe 2 - आयएएस अधिकारी अशिमा मित्तल यांची बदली - मित्तल आता जालन्याच्या नव्या जिल्हाधिकारी - मित्तल सध्या नाशिक जिल्हा परिषदेच्या सीईओ म्हणून होत्या कार्यरत - सीईओ पदाचा तात्पुरता कार्यभार विभागीय आयुक्त पाहणार - नाशिक जिल्हा परिषदेच्या सीईओ पदावर कुणाची वर्णी लागणार याकडं लक्ष
14
Report
NMNITESH MAHAJAN
Jul 30, 2025 17:30:44
Jalna, Maharashtra:
FEED NAME | 3007ZT_JALNA_TRANSFER(2 FILES) जालना : जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांची ठाण्याच्या जिल्हाधिकारीपदी बदली,आशिमा मित्तल जालन्याच्या नव्या जिल्हाधिकारी अँकर : जालन्याचे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांची ठाण्याच्या जिल्हाधिकारीपदी बदली करण्यात आली आहे.त्यांच्या जागी नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांची जालना जिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागानं मित्तल  यांच्या नियुक्तीचे आदेश काढले आहे.जालन्यात गाजलेल्या  2024 मधील अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याचा तपास जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली 8 सदस्यीय समितीने केला होता.यात दोषी आढळून आलेल्या 21 पेक्षा अधिक तलाठी,मंडळाधिकारी यांना निलंबित करण्याचे आदेश पांचाळ यांनी काढले होते.या घोटाळ्याचा तपास अजूनही सुरूच असताना पांचाळ यांची बदली झाल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
14
Report
SGSagar Gaikwad
Jul 30, 2025 17:00:46
Nashik, Maharashtra:
Feed send by 2c Reporter-sagar gaikwad Slug-nsk_sp_byte 2008 साली मालेगाव मध्ये झालेल्या बॉम्ब स्फ़ोट चा निकालाच्या पश्वभूमीवर पोलीस सज.. बॉम्बे स्पोर्ट मध्ये सहा लोकांचा झाला होता मृत्यू अँकर 2008 साली नाशिकच्या  मालेगाव मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट खटलेचा निकाल उद्या लागणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर नाशिक ग्रामीण पोलीस सज्ज झाली आहे मालेगाव शहरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात  आली आहे. 2008 मध्ये मालेगाव मध्ये साखळी बॉम्बस्फोट झाले होते. याप्रकरणी साध्वी प्रज्ञा सिंग कर्नल प्रसाद पुरोहित सह जण संशयित आरोपी होते...याचा खटला कोर्टात सुरु होता तब्बल 17 वर्षांनी याचा निकाल लागणार आहे. निकाला नंतर कुठलीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील हे मालेगाव मध्ये विशेष लक्ष ठेऊन आहे .. बाईट : बाळासाहेब पाटील ( पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण )
14
Report
AKAMAR KANE
Jul 30, 2025 17:00:11
kolhapur, Maharashtra:
Ngp Chess fan live u ने फीड पाठवले ------ नागपूर फीडे वुमेन्स वर्ल्ड कप 2025 मध्ये विजेती ठरलेली वर्ल्ड चॅम्पियन बुद्धीबळपटू दिव्या देशमुखचे थोड्या वेळात नागपूरच्या विमानतळावर आगमन होणार आहे.. यावेळी महाराष्ट्र चेस असोसिएशन कडून तिचे नागपूर विमानतळावर स्वागत केले जाणार आहे.. नागपूरकर ही आपल्या या चॅम्पियन खेळाडूचे स्वागत करण्यासाठी विमानतळावर पोहचले आहेत.. यावेळी त्यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी अमर काणे यांनी
14
Report
AAASHISH AMBADE
Jul 30, 2025 16:46:22
Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--- 3007ZT_CHP_KATTA_MURDER ( single file sent on 2C)  टायटल:-- चंद्रपूर शहरातील जुनोना चौकातील विक्तूबाबा मठ परिसरात बंदुकीचा थरार, देशी कट्ट्यातून गोळ्या झाडून भावाची हत्या, बुद्धा टाक 45 असे मयताचे नाव, त्याच्या सख्ख्या भावानेच केली राहत्या घरी हत्या अँकर:--चंद्रपूर शहरातील जुनोना चौकातील विक्तूबाबा मठ परिसरात बंदुकीचा थरार बघायला मिळाला आहे. संध्याकाळी 7 वाजताच्या सुमारास देशी कट्ट्यातून गोळ्या झाडून भावाची हत्या करण्यात आली आहे. बुद्धा टाक 45 असे मयताचे नाव असून  त्याच्या सख्ख्या भावानेच राहत्या घरी ही  हत्या केली.  गोळ्या झाडून आरोपी भाऊ सोनू टाक फरार झालाय. या घटनेत आणखी एक आरोपी सामील असल्याचा संशय आहे. मयत आणि आरोपी यांच्यावर याआधी अनेक गुन्हे  दाखल आहेत. वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी पोचले आहेत. श्वान पथक, फॉरेन्सिक चमुच्या मदतीने घटनेचे धागेदोरे शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे. पोलिसांनी मृतदेह रुग्णालयात पाठवून घटनेचा तपास सुरू केलाय. जमिनीच्या वादातून हत्या झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर 
14
Report
Advertisement
Back to top