Back
लक्ष्मण हाकेच्या ताब्यात घेतल्याशिवाय गृहविभाग झोपला का?
MMMahendrakumar Mudholkar
Aug 25, 2025 16:01:05
Beed, Maharashtra
बीड: लक्ष्मण हाके यांना तत्काळ ताब्यात घ्या, चॅलेंज केलं तरी गृहविभाग झोपलं का?-दिपक केदार
Anc : लक्ष्मण हाके यांच्या मध्ये आणि आमदार विजयसिंह पंडितांच्या कार्यकर्त्यांमध्ये गेवराईत राडा झाल्यानंतर ऑल इंडिया पॅंथर सेनेचे अध्यक्ष दिपक केदार यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
नागपूर वरून इशारा देऊन गेवराई मध्ये आला हा एक नियोजित कट आहे. आणि त्या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीत कायदा व सुव्यवस्था कशी बिघडेल हा प्रयत्न हाकेने केला आहे. नागपूर मध्ये सकाळी लक्ष्मण हाके धमकी देतो की मी गेवराई मध्ये चाललो तरी त्याला रोखले जात नाही हे कुणाच्या आशीर्वादाने..? मराठा आंदोलन रोखण्यासाठी येथे राडा करण्याचं, दंगल करण्याचं षडयंत्र रचलं जात आहे. आम्ही दोन दिवसांपासून सांगतोय हाके या प्रवृत्तीला लवकर रोखा तरीसुद्धा रोखलं जात नाही.
लक्ष्मण हाकेंना महाराष्ट्र पेटवायची सुपारी कोणी दिली? याचे उत्तर ग्रह विभागाने द्यावं अशी प्रतिक्रिया दिपक केदार यांनी दिली आहे. त्यामुळे लक्ष्मण हाके यांना तत्काळ ताब्यात घ्या असा आक्रमक पवित्रा दीपक.केदार यांनी घेतला आहे.
बाईट: दीपक केदार, ऑल इंडिया पँथर सेना
14
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SMSarfaraj Musa
FollowAug 25, 2025 17:05:39Sangli Miraj Kupwad, Maharashtra:
स्लग - हिंम्मत असेल तर जयंत पाटलांनी राजीनामा देऊन निवडणूक लढवावी,त्यांच्या विरोधात निवडणूक लढवायला तयार - आमदार गोपीचंद पडळकरांचे जयंत पाटलांना खुला आव्हान.
अँकर - हिंम्मत असेल तर जयंत पाटलांनी राजीनामा देऊन निवडणूक लढवावी,त्यांच्या विरोधात,त्यांच्या मतदारसंघात मी निवडणूक लढवायला तयार आहे,बघु काय होतंय,असे खुले आव्हान आमदार गोपीचंद पडळकर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांना दिले आहे.तसेच जयंत पाटील हिंदू विरोधी असून राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लढवण्याची हिंमत नाही, असा टोला देखील आमदार गोपीचंद पडळकर यांनी आमदार जयंत पाटलांना लगावला आहे.जयंत पाटलांकडून मत चोरीबाबत पडळकरांवर करण्यात केलेल्या अप्रत्यक्ष टिकेवरून गोपीचंद पडळकर यांनी हा पलटवार केला आहे.ते सांगलीच्या कवठेमंकाळ या ठिकाणी भाजपाचे किसान सेलचे प्रदेशाध्यक्ष संदीप गिड्डे यांच्यावतीने आयोजित दोस्ती दहीहंडी सोहळ्याच्या निमित्ताने बोलत होते.
बाईट - गोपीचंद पडळकर - आमदार -
14
Report
ABATISH BHOIR
FollowAug 25, 2025 17:01:00Kalyan, Maharashtra:
कल्याण पूर्वेत नवज्योत मित्रमंडळातर्फे कल्याणच्या मोरया गणरायाचा आगमन
आगमन सोहळ्यात भाजप आमदार सुलभा गायकवाड सहभागी
भाजप आमदार सुलभा गायकवाड व महिला पदाधिकाऱ्यांनी बँडच्या तालावर धरला ठेका
14
Report
AKAMAR KANE
FollowAug 25, 2025 17:00:24kolhapur, Maharashtra:
नागपूर --
- नागपूरचा राजा चितार ओळीतुन मंडपाकडे मार्गस्थ
- नागपूरचा राजाचा यंदा शाही मिरवणुकित न जाता
साध्या पद्धतीने
- नागपूरचा राजा मंडळाचे आयोजक यांच्या परिवारात शोक असल्याने यंदा साध्या मिरवणुकीने राजाचे आगमन
- चतुर्थीला सकाळी विधिवत नागपूरच्या राजाची स्थापना मंडपात होणार
- सिंहासनावर आरूढ असलेली 11 फूट उंचीची नागपूरची राजाची मूर्ती असून यंदाचं मंडळाचे 29 वे वर्ष
14
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowAug 25, 2025 16:15:41Dhule, Maharashtra:
ANCHOR - धुळे जिल्ह्यात मुंबई आग्रा महामार्गावर बर्निंग ट्रकचा थरार पाहायला मिळाला. मध्यप्रदेश येथून धावलगिरी(कर्नाटक) राज्यात जाणाऱ्या कंटेनरला शॉर्ट सर्किटमुळे महामार्गावरील देवभाने फाट्याजवळ आग लागली, या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही, या गाडीत फक्त चालक खालिद खान उपस्थित होते. त्यांना कोणतीही ईजा झाली नाही, घटनास्थळी सोनगीर पोलीस व सोनगीर टोल नाक्यावरील कर्मचारी पोहचले. मात्र अग्निशमन बंब उपस्थित नसल्याने आग वाढत गेली, गाडीत 30 टन
पीठ भरलेल होत. या आगीत लाखो रुपयांच पीठ जळून खाक झाले आहे. सुदैवाने जीवेत हानी झाली नसले तरी वेळेवर अग्निशमन दलाचा बंब दाखल झाला असता, तर मोठी वित्त हानी टाळता आली असती. या आगेच्या घटनेमुळे काही काळ महामार्गावर वाहतूक प्रभावित झाली होती.
प्रशांत परदेशी, धुळे.
14
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowAug 25, 2025 14:33:10Parbhani, Maharashtra:
अँकर- परभणीच्या जिंतूर शहरातील साठे नगर परिसरात रविवार रात्री ९ वाजेच्या सुमारास कुरेशी समाजाच्या दोन गटामध्ये हाणामारी झाली. या हाणामारीत काहीजण जखमी झाल्याची माहीती आहे. कुरेशी समाजाच्या दोन गटात हा वाद झाला. जिंतूर ग्रामीण रुग्णालयात जखमींवर प्राथमिक उपचार करण्यात आले आहेत, पोलिसांच्या मध्यस्तीने वाद निवळलाय, या हाणामारीचा व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे. आपसी कारणाच्या वादाचे पर्यवसन हाणामारीत झालं,यावेळी मोठ्या संख्येने जमाव रस्टुअवर उतरला होता.
14
Report
AAASHISH AMBADE
FollowAug 25, 2025 14:17:59Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--- 2508ZT_CHP_SINDHI_MORCHA
( single file sent on 2C)
टायटल:-- अहमदाबादच्या शाळेत झालेल्या घटनेविरोधात चंद्रपुरात सिंधी समाज बांधवांनी काढला मूक मोर्चा ,जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेत याप्रकरणी कडक कारवाईची केली मागणी
अँकर:-- गुजरातच्या अहमदाबाद शहरात एका शाळेत सिंधी विद्यार्थ्यांची त्याच्या सहकाऱ्याने शाळेत सुरा भोसकून हत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण देशातील सिंधी समाज बांधवात संताप व्यक्त होत आहे. चंद्रपूर सिंधी पंचायत च्या वतीने आज शहरात मूक मोर्चा काढण्यात आला. सिंधी कॉलनीतील माता मंदिराजवळून मोर्चा गांधी चौक मार्गे मुख्य रस्त्यावरून जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला. या घटनेतील दोषींवर केलेली कारवाई न्यायपूर्ण नसून सरकारने तातडीने कठोर कारवाई करावी अशी मागणी मोर्चेकर्यांनी याप्रसंगी केली.
बाईट १) मनोहर तहलीयानी, सिंधी पंचायत सदस्य
बाईट २) रवी आसवानी, सिंधी पंचायत सदस्य
आशीष अम्बाडे
झी मीडिया
चंद्रपूर
14
Report
SKSudarshan Khillare
FollowAug 25, 2025 14:17:18Manmad, Maharashtra:
नांदगाव-मनमाड महामार्ग शास्त्रीनगर जवळ दोन दुचाकीची समोरासमोर धडक.. अपघातात 2 ठार 2 जण गंभीर जखमी..
अँकर :-मनमाड-नांदगाव महामार्ग शास्त्रीनगर जवळ दोन दुचाकीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात जणांचा जागीच मृत्यू झाला असून दिगंबर अहिरे आणि फकीर गांगुर्डे अशी दोघांची नाव आहे. या अपघातात इतर 2 जण गंभीर जखमी झाले असून त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
14
Report
SRSHRIKANT RAUT
FollowAug 25, 2025 14:02:58Yavatmal, Maharashtra:
यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड यांनी उमरखेड व महागाव तालुक्यातील पूरस्थिती संदर्भात घेतलेल्या आढावा बैठकीत अधिकाऱ्यांनी चुकीची माहिती दिल्याने पालकमंत्र्यांनी संबंधितांना धारेवर धरले. महसूल आणि जलसंपदा हे अतिशय महत्त्वाचे विभाग असतानाही या विभागाच्या अधिकाऱ्यांमध्ये एक मत नाही. आपत्ती व्यवस्थापन करताना अशीच परिस्थिती राहिल्यास गोंधळ उडाल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे संबंधितांना कारणे दाखवा नोटीस बनवण्याच्या सूचना पालकमंत्री संजय राठोड यांनी दिल्या.
15
Report
PPPRANAV POLEKAR
FollowAug 25, 2025 13:35:31Ratnagiri, Maharashtra:
वैभव खेडेकर -
सोशल मीडियावर माझ्यासह जिल्हाध्यक्ष यांचसोबत इतर दोघांना बडतर्फ केल्याचे पत्र वाचून अतिशय दुःख
हे पत्र म्हणजे माझ्या निष्ठेचे सर्टिफिकेट
अनेक आंदोलने, जेल किंवा प्रत्येक कार्यक्रमात माझा सहभाग राहिला...
कोकणात पक्षाची बीजे मी कोकणात रुजवली
खेड नगर परिषद माझ्या नेतृत्वात पंधरा वर्षे मनसेकडे.
मी पहिल्यांदा थेट नगराध्यक्ष झालो.
पक्ष म्हणून कोकणात आघात झाले तेव्हा मी लोकांसोबत राहिलो....
कोविड मध्येही देखील मी लोकांच्या सोबत होतो.
पक्ष रुजावा ही माझी भूमिका होती
भाजपच्या काही लोकांना भेटलो
म्हणून मी पक्षांतर करत असल्याच्या संशयावरून माझ्यावर कारवाई.
पण मी पक्षप्रवेश करणार नव्हतो...कार्यकर्त्याला तडीपारीची होणारी कारवाई थांबावी म्हणून मी नितेश राणे यांना भेटलो होतो
विकास होणे महत्वाचे असल्याने सत्ताधाऱ्यांना भेटायचो...त्यामुळेच माझ्यावर कारवाई झाली.
मात्र माझ्याबद्दल संशय निर्माण केला गेला. याबद्दल मी राज ठाकरे यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला,पण मला अद्याप भेट भेटलेली नाही
संदीप देशपांडे आणि अविनाश जाधव यांच्या माध्यमातून मी भेटीचे अनेक प्रयत्न केले...पण त्याला यश आले नाही. हे माझं दुर्दैव
हे पत्र स्वतः साहेबांनी काढलं असत तर तो त्यांचा आदेश आल्याचा आनंद बाळगला असता.
पक्षाची शिस्त बिघडेल असे मी कधीच काम केले नाही.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत होतो म्हणून माझ्यावर अनेक कारवाया झाल्या....
पक्षासाठी केलेली माझी धडपड आज तोकडी पडली
पत्रकार परिषदेमध्ये वैभव खेडेकर भाऊक
तुम्ही कालही मनात होता आजही आहात आणि उद्याही राहाल....वैभव खेडकर
तीस वर्षे पक्ष म्हणून कुटुंबाशी जोडलो गेलो होतो.....आजच्या पत्रामुळे कौटुंबिक संबंधाला ब्रेक मिळाला
आजच पत्र पाहून धक्का बसला...अस पत्र मला कधीही अपेक्षित नव्हतं
हातात घेतलेलं शिवधनुष्य अर्धवट ठेवणार नाही...पुढील निर्णय घ्यावा लागेल.
अजून निर्णय घेतलेला नाही...वैभव खेडेकर
फिनिक्स पक्षाप्रमाणे मी पुन्हा उभारी घेईन....माझ्यावर अशा पद्धतीची वेळ येणार असेल तर बाकीच्या पदाधिकाऱ्यांनी विचार करण्याचीही वेळ
झालेली घटना नाकारता येत नाही....हे स्वीकारून मी पुढे जाईल.
मला अजिबात घाई नाही. मी योग्य वेळेची वाट पाहून निर्णय घेईल
लवकरच मेळावा घेणार....वैभव खेडेकर
चर्चा आणि संवाद झाले तर असे निर्णय घेण्याची वेळ येत नाही....पक्षाच्या धोरणावर वैभव खेडकर यांची टीका
राज ठाकरेंचा आमच्याकडे फोन नंबर नाही..केवळ msg करू शकतो असा नंबर आमच्याकडे
*बडतर्फ झाल्याचे समजल्या नंतर सर्वात पहिला फोन नितेश राणे यांचा आला....अनेकांनी मला धीर दिला*
14
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowAug 25, 2025 13:03:59Latur, Maharashtra:
लातूर PKG....
AC ::- लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील पानगाव येथील पणगेश्वर साखर कारखान्याच्या विक्रीच्या निर्णयावरून शेतकरी आणि कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. गोपीनाथ मुंडेंनी तारलं… पण पंकजा मुंडेंनी साखर कारखाना विक्री करून आम्हाला फसवलं" अशी भावना आता व्यक्त केली जात आहे.
VO 01 ::- पानगाव आणि पाथरवाडी येथील शेतकऱ्यांनी आपल्या 120 एकर जमीन पणगेश्वर साखर कारखान्यासाठी दिली. दिवंगत गोपीनाथ मुंडें यांच्या शब्दावर, त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून हा निर्णय घेतला गेला. या कारखान्याची जबाबदारी प्रज्ञाताई गोपीनाथ मुंडे या चेअरमन म्हणून सांभाळत होत्या. सुरुवातीला कारखाना चालूही झाला… मात्र आता कोणतीही पूर्वसूचना न देता कारखाना विक्रीचा निर्णय घेण्यात आल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. गोपीनाथ मुंडेंच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पानगावसह आजूबाजूच्या गावातील शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी या कारखान्यासाठी दिल्या होत्या. लोकनेत्याच्या स्वप्नासाठी आम्ही जमिनी दिल्या, मात्र त्या स्वप्नाचा शेवट विक्रीने झाला. आम्हाला विश्वासात घेतलं नाही आणि कारखाना विकला गेला. मंत्री पंकजा मुंडे यांनी आमचा विश्वास घात केलाय अशी भावना कर्मचारी आणि शेतकऱ्याने बोलून दाखवली आहे....
बाईट ::- शेतकरी
बाईट ::- शेतकरी
VO 02 ::- पन्नगेश्वर साखर कारखाना तेवीस वर्षांनंतर दिवाळखोरीत गेला आणि त्याची विक्री झाली. विमल अॅग्रो कंपनीने विकत घेतलेल्या या कारखान्याच्या हंगामावेळी हा प्रकार उघड झाला. यामुळे शेतकरी व कर्मचाऱ्यांची देणी कोण फेडणार, असा प्रश्न सर्वांना पडला आहे. हा कारखाना काही काळ यशस्वीरित्या सुरु होता. मात्र, गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर कारखान्याच्या व्यवस्थापनावर परिणाम झाला आणि तो हळूहळू मोडकळीस आला. पंकजा मुंडेंनी कारखाना पुन्हा सुरु करण्याचे प्रयत्न केले, पण आर्थिक तोट्यामुळे किंवा व्यवस्थापन अडचणीमुळे तो यशस्वी झाला नाही. अखेर, मंत्री असतानाच त्यांनी हा कारखाना विक्री केला.या घटनेवर शेतकरी नाराजी व्यक्त करत आहेत
मंत्री असताना पंकजा मुंडेना कारखाना विकावा लागतो, हे दुर्दैव नाही का? आमच्या जमिनी दिल्या, पण आमच्याच परवानगीशिवाय हा निर्णय घेतला गेला. असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत...
बाईट ::- शेतकरी
बाईट ::- शेतकरी
VO 03 ::- हा प्रकल्प केवळ एक उद्योग नव्हता, तर शेकडो कुटुंबांच्या आर्थिक भविष्याशी जोडलेला होता. कारखान्यामुळे रोजगार, स्थानिक विकास आणि ऊस उत्पादकांसाठी एक स्थिर बाजार निर्माण झाला होता. त्यामुळे या विक्रीमुळे अनेकांची जीवनशैली आणि अर्थव्यवस्था डगमगली आहे. या प्रकरणात पंकजा मुंडेंनी स्पष्ट भूमिका मांडावी, अशी मागणीही शेतकरी करत आहेत. तसेच, जमिनी दिलेल्या शेतकऱ्यांना योग्य मोबदला किंवा पर्यायी मदत मिळावी, अशी मागणी होत आहे.
............
वैभव बालकुंदे
ZEE 24 तास लातूर...
14
Report
SNSWATI NAIK
FollowAug 25, 2025 13:02:59Navi Mumbai, Maharashtra:
story Slug -: मुंबईमध्ये धडकणाऱ्या मराठा आंदोलकांची नवी मुंबईच्या कृषी उत्पन्न बाजारात करण्यात आली व्यवस्था, मराठा समर्थकांकडून मार्केट आवाराचा आढावा.
मराठा आंदोलक जरांगे पाटील का नवी मुंबई मे खाने पिने की व्यवस्था
ftp slug - nm maratha
shots -
reporter - swati naik
navi mumbai
Anchor -: आरक्षणाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा मराठा समाज आक्रमक झालाय. गणेशोत्सवाच्या काळातच मनोज जरांगे पाटील यांनी थेट मुंबईत आंदोलनाचा इशारा दिलाय. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आंदोलनासाठी येणाऱ्या मराठा आंदोलकांची राहण्याची जेवणाची व्यवस्था करण्यात येणार आहे. मुंबई च्या दिशेने जाणारे आंदोलक 29 आणि 29 तारखेला नवी मुंबईमध्ये दाखल होणार आहेत. मराठा समाज आंदोलकांची व्यवस्था करत असला तरी त्याला प्रशासनाची साथ अद्याप लाभलेली नाही याच पाश्वभूमीवर उद्या नवी मुंबईमध्ये मराठा समाजाच्या माध्यमातून काढण्यात येणारी जनजागृती रॅली प्रशासनाने सहकार्य न केल्यास मनपा मुख्यालयाकडे काढण्याचा इशारा मराठा आंदोलकांनी दिलाय.
बाईट -: विनोद पोखरकर (मराठा समाज नवी मुंबई संघटक)
======================
14
Report
YKYOGESH KHARE
FollowAug 25, 2025 12:46:33Nashik, Maharashtra:
nsk_potholes
feed by 2C
anchor नाशिक पेठ रस्त्यावर करंजाळी घाटामध्ये मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्यामुळे वाहतुकीची कोंडी सातत्याने होत आहे. खड्डे इतके मोठ्या प्रमाणात आहेत की स्लीपर कोच सारख्या बसेस फसत आहेत तर अनेक छोटी मोठी वाहनांची नादुरुस्ती होत वाहने अडकत आहेत. परिणामी 24 ते 48 तास वाहन अडकत असल्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत कुठलाही पर्यायी रस्ता नसल्यामुळे अनेक वाहनधारकांना वाहने सोडून जावे लागतेय गेल्या दीड-दोन वर्षांपासून सुरू असलेल्या या अडचणींची राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने याकडे गंभीरतेने लक्ष देण्याची मागणी होत आहे
14
Report
YKYOGESH KHARE
FollowAug 25, 2025 12:46:05Nashik, Maharashtra:
Anc: मालेगाव तालुक्यातील खलाणे येथे जेसीबी दरीत कोसळून आगीत जळून खाक झाली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मधुकर जिभाऊ जाधव यांच्या बंगल्याच्या पाठीमागील भागात कोरा काढण्याचे काम सुरू होते. काम करताना ड्रायव्हरच्या दुर्लक्षामुळे जेसीबीचा तोल गेला आणि ती थेट दरीत कोसळली. कोसळताच मशीनला अचानक आग लागली. ड्रायव्हरने वेळेवर उडी मारून आपला जीव वाचवला. परंतु, काही क्षणांतच संपूर्ण जेसीबीला पेट लागून ती जळून खाक झाली. ग्रामस्थांनी सांगितले की, या अपघातात जीवितहानी टळली असली तरी संपूर्ण जेसीबी जळून खाक झाल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
14
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowAug 25, 2025 12:45:12Dhule, Maharashtra:
ANCHOR - गणेशोत्सवासाठी विविध आगारातील बसेस या कोकणात रवाना करण्यात आल्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. धुळे बस स्थानकावर प्रवाशांची प्रचंड गर्दी पाहायला मिळतेय. बस मिळत नसल्याने प्रवाशांचे हाल होत असून, याबद्दल प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. बसेस भेटत नसल्याने शेकडो प्रवासी बस स्थानकात अडकले आहेत. एसटी महामंडळाच्या वतीने कोकणासाठी धुळे विभागातून 325 बसेस पाठवण्यात आले आहेत. महामंडळाच्या वतीने विभागातून कोकणातील गणेश उत्सवासाठी 325 बसेस गेल्यामुळे धुळ्यातील बस स्थानकातून प्रवाशांना बसेस मिळत नाहीत. दोन ते तीन तासापासून प्रवासी बस स्थानकात ताटकळत उभे आहेत.बसेसची व्यवस्था करावी अशी मागणी प्रवाशांची आहे. गणेश भक्तांसाठी बसची व्यवस्था करण्याचा नियोजन करता वेळेस, स्थानिक प्रवाशांचा विचार करण्यात आला नसल्याचा आरोप करण्यात आला. एसटी प्रशासनाच्या नियोजन शून्य आणि भोंगळ कारभारामुळे प्रवाशांना नाहक मनस्तापाचा सामना करावा लागत आहे.
byte - प्रवाशी
प्रशांत परदेशी, धुळे.
14
Report