Back
खामगावात दलित तरुणाला मारहाण: भीम आर्मीची आक्रमकता वाढली!
MNMAYUR NIKAM
Jul 27, 2025 12:33:40
Buldhana, Maharashtra
खामगावात दलित तरुणाला मारहाण प्रकरण: भीम आर्मी आणि आरपीआय आक्रमक, उद्या खामगाव बंदची हाक
Anchor - खामगाव शहरात रोहन पैठणकर या दलित तरुणाचं अपहरण करून त्याला नग्न करून मारहाण करण्यात आल्याच्या गंभीर घटनेनंतर आता दलित संघटना आक्रमक झाल्या आहेत. आज भीम आर्मीचे अध्यक्ष दीपक केदार आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष सचिन खरात यांनी अकोला येथील रुग्णालयात जाऊन रोहनची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी खामगावात येऊन अतिरिक्त पोलीस अधीक्षक आणि पोलीस उपअधीक्षक यांची भेट घेऊन दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली. या घटनेतील सर्व आरोपींवर मोका (MCOCA) आणि युएपीए (UAPA) कायद्यानुसार कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करत खामगाव शहर पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आलं आहे. यावेळी हजारो आंबेडकरी अनुयायांनी जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला.
भीम आर्मीचे अध्यक्ष दीपक केदार यांनी पोलीस उपअधीक्षक आणि तपास अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली. "स्थानिक आमदारांचा तुमच्यावर दबाव आहे का? तात्काळ कारवाई करणार आहात का?" असे प्रश्न विचारत त्यांनी प्रशासनाला धारेवर धरलं.
या घटनेच्या निषेधार्थ उद्या, खामगाव शहर बंदची हाक दलित ...संघटनांनी दिली आहे. सध्या पोलीस स्थानक परिसरात मोठा जमाव जमलेला असून तणावाची परिस्थिती आहे.
Byte - दीपक केदार, भीम आर्मी
14
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AAABHISHEK ADEPPA
FollowJul 27, 2025 14:47:51Solapur, Maharashtra:
सोलापूर ब्रेकिंग - सोलापुरात गोलघुमट एक्सप्रेसच्या धडकेत दोन जणांचा जागीच मृत्यू तर एकावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू
- सोलापुरात रेल्वेच्या धडकेत दोन नागरिकांचा मृत्यू तर एक जण जखमी
- सोलापूर जिल्ह्यातील माढा रेल्वे स्टेशनच्या अलीकडे एक किलोमीटर अंतरावर घडली घटना
- रेल्वेच्या धडकेत दोन जणांचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती तर एका व्यक्तीला उद्यान एक्सप्रेस ने उपचारासाठी सोलापूर शासकीय रुग्णालयात करण्यात आले दाखल
- गोलघुमट एक्सप्रेस पंढरपुरातून सोलापूरकडे येत असताना घडली घटना
- घटना नेमके कशामुळे घडली याचा पुढील तपास रेल्वे पोलीस करीत आहेत
6
Report
SRSHRIKANT RAUT
FollowJul 27, 2025 14:19:02Yavatmal, Maharashtra:
Anchor : यवतमाळच्या गोधणी मार्गावरील स्वास्तिक प्लाझा या इमारतीतील तिसऱ्या मळ्यावर आग लागली. ए प्लस फिजिक्स ट्यूटोरियल मध्ये लागलेल्या या आगी नंतर एकच धावपळ उडाली. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली होती.
आगीत क्लासेस मधील साहित्य जळून खाक झाले. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाने प्रयत्न करून ही आग आटोक्यात आणली.
14
Report
SMSATISH MOHITE
FollowJul 27, 2025 14:17:08Nanded, Maharashtra:
Satish Mohite
Slug - Ned_Flood
Feed on - 2C
--------------------------
Anchor - ओढ्याला आलेल्या पुरात अडकलेल्या ग्राम पंचायत सदस्याने झाडावर चढून आपला जीव वाचवला. नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील ही घटना आहे. पुराच्या पाण्यात अडकलेले ग्रामपंचायत सदस्य सुभाष मुरमुरे सुखरूप बाहेर आले. काल झालेल्या मुसळधार पावसामुळे हदगाव तालुक्यात पूर आला होता. वाडी येथील ग्रामपंचायत सदस्य व शेतकरी सुभाष मुरमुरे ओढ्याच्या पाण्यात अडकले होते. त्यांनी एका झाडावरून दुसऱ्या झाडावर चढत मार्ग काढला आणि सुरक्षित बाहेर आले. त्यांच्या या सुटकेचा थरार मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला आहे. आज तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
-----------------------
11
Report
SKSudarshan Khillare
FollowJul 27, 2025 12:47:36Lasalgaon, Maharashtra:
अँकर :- कांद्याचे बाजार भाव वाढल्यानंतर ग्राहकांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारच्या ग्राहक संरक्षण विभागामार्फत यंदा तीन लाख मॅट्रिक टन कांदा खरेदीचे उद्दिष्ट असून नाफेड, एनसीसीएफ मार्फत कांद्याची दोन जुलैला खरेदी सुरू झाली आहे ही कांद्याची खरेदी 28 जुलै पर्यंत पूर्ण करण्याची मुदत खरेदी करणाऱ्या सहकारी संस्थेला देण्यात आली आहे मात्र कांदा विक्रीसाठी नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचा कांदा अद्यापही बाकी असल्याने नाफेड एनसीसीएफने कांदा खरेदीसाठी मुदतवाढ देण्याची मागणी शेतकरी करत आहे
बाईट :- विजय विनायक भडांगे (कांदा उत्पादक शेतकरी
14
Report
PPPRANAV POLEKAR
FollowJul 27, 2025 12:33:27Ratnagiri, Maharashtra:
Raj उद्धव भेट
वैयक्तिक संबंध टिकवन आणि भाऊ म्हणून एकत्र येणे नक्कीच त्यात काहीच गैर नाही
राज ठाकरे यांनी कुठेही आम्ही एकत्र येऊन असा उल्लेख केलेला नाही
शुभेच्छा द्यायला जाणं म्हणजे दोघांचे पक्ष एकत्र येणं असं काही अर्थ होत नाही
शिवसेना उबाठाचे ते पक्षप्रमुख आहेत ना, शेवटी त्याच्याने शिवसेना अधिकृत त्याचाने होत नाही
शिवसेना प्रमुख हे फक्त बाळासाहेबहोते आणि राहतील
आणि बाळासाहेबांचा वारसा जर पुढे कोण येत असेल तर ते एकनाथ शिंदे साहेब आहेत
On रेव्ह पार्टी
रेव पार्टीमध्ये जे कोणी होते त्यांच्यावर कायद्यानुसार कारवाई केली जाईल
जे कोणी याच्यात दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई केली जाईल यांच्यात कुठेही राजकारण आणण्याचा प्रश्न येत नाही- योगेश कदम
आज उबाटाच्या माध्यमातून फक्त एकनाथ शिंदे यांच्याच मंत्र्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न - योगेश कदम
14
Report
SGSagar Gaikwad
FollowJul 27, 2025 12:30:53Nashik, Maharashtra:
feed send by 2c
reporter-sagar gaikwad
slug-nsk_paksh_pravesh
Nashik break
- सुनील बागुल मामा राजवाडे यांचा भाजपमध्ये प्रवेश
- सुनील बागुल यांच्या सहा मामा राजवाडे श्रमिक सेनेचे अजय बागुल, बाळासाहेब पाठक, मनीष बागुल यांचा भाजप मध्ये प्रवेश
- ठाकरे गटाचे उप जिल्हाप्रमुख गुलाब भोये यांच्या सह शेकडो कार्यकर्त्यांचा प्रवेश
- मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत नाशिक मध्ये झाला शक्ती प्रदर्शन करत पक्षप्रवेश
*नाशिक : सुनील बागुल ,भाषण*
- मंत्री गिरीश महाजन आमदार मंगेश चव्हाण ज्यांनी माझ्यासाठी बरेच दिवस प्रयत्न केले ते बाळासाहेब सानप
- मला पाच प्रश्न विचारले ,मी भाजप मध्ये पाच वर्षे काम केले
- मला भाऊंना विचारले सर्व आमदार सर्व पदाधिकारी ,rss यांची NOC आहे का विचारले मी सांगितले आहे मला असे वाटले mpsc पास झालो
- भाजप मध्ये प्रवेश करणे सोपे नाही ,पोलिस रेकॉर्ड बघितले जाते , जन मत विचारले जाते बॅगराऊंड चेक केले जाते
- मी भाजप साठी कटिबद्ध राहील
*मंत्री गिरीश महाजन भाषण -*
- आज आपलेबमित्र नेते सुनील भाऊ मामा राजवाडे अनेक नावे आहेत ,
- मी आलो त्यावेळी बाहेर दोन पट लोक उभे मला यायला जागा नव्हती
- आज सुनील यांचा प्रवेश आता परत जाऊ नका (कार्यकर्त्यांचा खालून आवाज सुनील बागुल यांना चांगली जागा द्या संधी द्या )
- आपले बडगुजर या ठिकाणी आले त्यांच्या सोबत अनेक आले अजून पुढच्या आठवड्यात बघा
- अध्यक्ष यांच्या पासून सगळ्यांना वाटत आहे आपण भाजप मध्ये यावे भारत मोदी नावाचे वलय आहे ,जगात कुठेही जा एकच गाणे वाजत आहे नरेद्र मोदी , इंडिया ,भारत
- ही वर्ष महत्त्वच आहे , काही लोक येत बोलून जात काही सकाळ पासून बोलता
- *बडगुजर आले ,बागुल आले ,मामा आले , आता अध्यक्ष कोण गीते त्यांना आपल्याला घ्यायचे नाही आता हाऊस फुल* उबठा बद्दल , उद्धव ठाकरेंचा बड्डे मला काही बोलायचे नाही
- आपण सर्व क्षेत्र पुढे , मोदींनपुढे काँग्रेस मध्ये पर्याय आहे का ,मोदींना बाजूला करून राहुल गांधी चालतील का लहान मुलाला विचारले तरी तो नाही सांगेल
- खऱ्या अर्थाने आता गरिबी मुक्त होत आहे , अनेक योजना आहेत
- प्रत्यकाला घर जेवढी जागा लागेल तेवढी घ्या संजय कर पैसे देणार ,आता सोलर पॅनल तास भर लागेल एवढ्या योजना आहेत ,गरिबांची काळजी घेणारे सरकार सत्तेवर आले आहे त्यामुळे सगळ्यांना वाटते भाजप मध्ये जावे
- सगळ जग आपल्याकडे अपेक्षेने बघत आहे
- पाकिस्तान त्रास द्यायचं ,चीन ,बांगलादेश आपल्याकडे डोळे करून बघायचे पण आता मोदीजी आलेत
- आपल्याला पुन्हा नाशिक पालिका निवडून आणण्याचे आहे ,कुंभमेळा करायचा आहे आपली यावेळी जबाबदारी मोठी आहे
- प्रयगराज सारखी गर्दी नाशिक मध्ये होईल आपल्याला तयारीला लागायचे आहे
- आपल्यात वाद विवाद नसले पाहजे
- १२२ मधून १०० चा नगरसेवकांचा आकडा आपल्याला कार्याचा आहे
- जे वाचाळवीर आहेत ,सकाळ पासून बडबड करतात त्यांना आपल्याला बघायचे त्यांचे आकडे किती
- आपल्याला रेकॉर्ड करायचे आहे एवढे नगरसेवक आपल्याला निवडूण आणायचे आहेत
13
Report
TTTUSHAR TAPASE
FollowJul 27, 2025 12:30:19Satara, Maharashtra:
TUSHAR TAPASE
1 FILE
SLUG NAME -SAT_MARDHE_BRIDGE
साताऱ्याच्या पश्चिम भागात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे कृष्णा नदीची पाणीपातळी वाढली असून मर्ढे गावाचा कृष्णा नदीवरील पूल पाण्याखाली गेला आहे... धोम धरणातून मध्यरात्री सात हजार क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग कृष्णा नदीपात्रात सुरू केल्यामुळे मर्ढे येथील मुख्य दळणवळणाचा पूल पाण्याखाली गेला आहे. सातारा जिल्हा प्रशासनाने या पुलावरून कोणीही प्रवास करू नये पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवाहन केले आहे...
14
Report
TTTUSHAR TAPASE
FollowJul 27, 2025 12:21:00Satara, Maharashtra:
TUSHAR TAPASE
SLUG NAME - SAT_KOYNA_UPDATE
सातारा - कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्यामुळे धरणातील पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी कोयना धरणातून विसर्ग वाढविण्यात आला आहे.कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे ५ फुटांवरून ६ फुट ६ इंचीपर्यंत उघडून २९,६४६ क्युसेक विसर्ग कोयना नदीपात्रात सोडण्यात आला आहे.कोयना धरण पायथा विद्युतगृहाचे दोन्ही युनिट सुरू असून त्याद्वारे २१०० क्युसेक विसर्ग सुरू आहे. असा एकूण *३१७४६ क्युसेक* विसर्ग सुरू करण्यात आला आहे.त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
14
Report
ABATISH BHOIR
FollowJul 27, 2025 12:19:28Kalyan, Maharashtra:
कल्याण जवळील टिटवाळा रायते येथील फार्म हाऊसवर राडा.
उल्हासनगर शिवसेना शिंदे गटाच्या युवा सेना पदाधिकाऱ्यांनी दोन जणांना बेदम मारहाण..
मारहाणीत दोन जण गंभीर जखमी..
गाणं लावण्याच्या वादातुन शिंदे गटाच्या पदाधिकार्याने साथीदारांसह केली तरुणाला हातोडी ,लाकडी दांडके ,हॉकी स्टिकने मारहाण
टिटवाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल 48 तास उलटले आरोपी मात्र अद्याप पसार.
राजकीय दबावमूळे आरोपी फरार असल्याचे जाधव याचा आरोप..
Anchor :- गटारी अमावस्या निमित्त टिटवाळा जवळील रायते येथील आदित्य फार्म हाऊसवर पार्टी होती. या पार्टी दरम्यान गाणं लावण्यावरून दोन गटात वाद झाला .या वादातून उल्हासनगर शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवक भुल्लर महाराज याचा मुलगा व युवा सचिव आणि त्याचे साथीदारांसह एका तरुणाला व एका मित्राला हातोडी ,लाकडी दांडके व हॉकी स्टिकने बेदम मारहाण केली . या मारहाणीत करण जाधव हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर कल्याणच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर या प्रकरणी टिटवाळा पोलीस ठाण्यात विकी भुल्लर ,हैप्पी भुल्लर , सनि भुल्लर,मुकेश यादव,सचिन शेवाळे,मनि अण्णा,रमु ,डँनि विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . आरोपींमधील विकी भुल्लर हा उल्हासनगर येथे शिवसेना शिंदे गट युवासेनेचा पदाधिकारी आहे . .घटनेला तीन दिवस उलटले मात्र अद्यापही आरोपी पोलिसांच्या हाती लागले नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे .
Vo...गटारी अमावस्या निमित्त सर्वत्र जोरदार दारू पार्ट्या झोडल्या जात होत्या . टिटवाळा जवळील रायते येथील आदित्य फार्म हाऊस येथे देखील गटारी अमावस्या निमित्त करण जाधव हे आपल्या मित्रांसह पार्टी करण्यासाठी गेले होते . रात्रीच्या सुमारास फार्मर्स वर गाणे लावण्यावरून करण जाधव याचा दुसऱ्या गटासोबत वाद झाला .हा वाद पाहताच फार्म हाऊसच्या मालकाने दोन्ही गटाला फार्म हाऊस बाहेर जाण्यास सांगितले. याच दरम्यान उल्हासनगर शिवसेना शिंदे गट युवा सेनेचा पदाधिकारी
विकी भुल्लर हा आपल्या साथीदारांसह या फार्म हाऊसवर आला. करण जाधव आणि विकी भुल्लर यांच्यात पुन्हा वाद झाला . विकी भुल्लर याने आपल्या साथीदारांसह करण जाधव वर हल्ला चढवला .विकी भुल्लर आणि त्याच्या साथीदारांनी करण जाधव याला हॉकी स्टिक, लाकडी दांडके, तसेच हातोड्याने बेदम मारहाण केली या मारहाणीत करण जाधव हा गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी कल्याण मधील खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे .तर याप्रकरणी टिटवाळा पोलीस ठाण्यात विकी भुल्लर याच्यासह हैप्पी भुल्लर , सनि भुल्लर,मुकेश यादव,सचिन शेवाळे,मनि अण्णा,रमु ,डँनि विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला मात्र घटनेला 48 तास उलटून गेले तरी एकाही आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आले नाही त्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे याबाबत फिर्यादी जखमी करून करण जाधव याने पोलीस राजकीय दबाव पोटी आरोपींना अटक करत नसल्याचा आरोप केलाय .तर याबाबत टिटवाळा पोलीस ठाण्यातील संपर्क साधला असता त्यांनी संबंधित प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत असल्याचे सांगण्यात आले आहे.
Byte...करणं जाधव.
फिर्यादी
14
Report
SRSHRIKANT RAUT
FollowJul 27, 2025 12:18:17Yavatmal, Maharashtra:
AVB
Anchor : यवतमाळ जिल्हा काँग्रेस अंतर्गत मोठा भूकंप आला असून पक्षाच्या राज्यस्तरावरील नेत्यांविरोधात जिल्हा पातळीवरील नेत्यांनी एल्गार पुकारला आहे. स्थानिक स्वराज्य संस्था व सहकार क्षेत्रातील सर्व प्रमुख नेत्यांनी एकजूट बांधत काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, आदिवासी मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष शिवाजीराव मोघे, आदिवासी मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष वसंत पुरके आदींवर हल्लाबोल करून हे नेते पराभूत काँग्रेसला नेस्तनाबूत करायला निघाले आहेत असा घणाघात केला आहे. या नेत्यांनी सलग पराभवाची हॅट्रिक केली, मात्र खुर्ची न सोडता आपल्या नालायक मुलांना पुढे केले. या नेत्यांचे चेहरे जनतेला
पसंद नाही, पाडापाडीचे व गद्दारी करण्याचे राजकारण ज्यांनी केले ते काम करणाऱ्या पदाधिकारी कार्यकर्त्यांवरच पराभवाचे खापर फोडत आहेत, त्यामुळे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी वेळीच या नेत्यांना लाथ मारून हाकलावे, अन्यथा पक्षात मोठा स्फोट झाल्याशिवाय राहणार नाही असा इशाराही स्थानिक नेत्यांनी दिला. आता परिणामांची फिकिर नाही, यवतमाळातून भडकलेली आग विदर्भात पोहोचायला वेळ लागणार नाही असेही संकेत या नेत्यांनी दिले.
साउंड बाईट : देवानंद पवार
13
Report
JJJAYESH JAGAD
FollowJul 27, 2025 12:02:20Akola, Maharashtra:
Anchor : गाय चोरी केल्याचा कारणावरून बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथे एका तरुणाला निर्वस्त्र करून बेदम मारहाण केल्याचा आरोप बौद्ध समाजाच्या वतीने करण्यात आलाय..खामगाव मध्ये गाय चोर असल्याच्या संशयावरून तीन आरोपींनी या युवकाला बेदम मारहाण केल्याची घटना घडली होती यानंतर तक्रारीवरून शिवाजी नगर पोलिसांनी तिन्ही आरोपींवर गुन्हा दाखल केला..या मारहाणीत जखमी झालेल्या युवकावर अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू असून ऑल इंडिया पॅंथरचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक केदार यांनी रुग्णालयात भेट देऊन जखमी युवकाची विचारपूस केली..
यावेळी आरोपींवर गंभीर प्रकारचे गुन्हे दाखल करून त्यांना त्वरित अटक करण्याची मागणी करण्यात आली..
14
Report
JMJAVED MULANI
FollowJul 27, 2025 12:02:01Baramati, Maharashtra:
JAVED MULANI
SLUG 2707ZT_BARAMATIAXIDNT
FOTO 2
बारामतीत अपघात वडिलांसह दोन मुलींचा जागीच मृत्यू..
Anchor बारामतीतील मोरगाव रस्त्यावरील महात्मा फुले चौकात भीषण अपघात झाला. या अपघातात वडील आणि त्यांच्या दोन चिमुकल्या मुलींसह तिघाजणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. एका डंपरला गाडी धडकून गाडी चाकाखाली गेल्याने तिघेही चेंगरले गेले.
वर्दळीच्या ठिकाणी डंपरच्या चाकाखाली दुचाकी सापडल्याने तिघेही चेंगरले. यात दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू झाला. (एम एच १६ सी ए ०२१२) या डंपरखाली ही दुचाकी चिरडली व अपघात झाला. या घटनेत ओंकार आचार्य (मूळ राहणार स सणसर तालुका इंदापूर सध्या रा. मोरगाव रोड बारामती) यांचा जागीच मृत्यू झाला.
ओंकार यांच्या दुचाकी वर दोन मुली होत्या. यामध्ये चार वर्षाची मधुरा व दहा वर्षाची सई या दोघीही गंभीर जखमी झाल्या होत्या. मात्र दवाखान्यात उपचारासाठी पोहोचवण्या पूर्वीच त्यांचाही मृत्यू झाला.एकाच कुटुंबातील तिघेही एकाच अपघातात गेल्याने संपूर्ण बारामतीत हळहळ व्यक्त केली जात आहे.
14
Report
SGSagar Gaikwad
FollowJul 27, 2025 11:32:28Nashik, Maharashtra:
feed send by 2c
reporter-sagar gaikwad
slug-nsk_chavhan_byte
मंगेश चव्हाण पॉइंट्स...
*On रेव्ह पार्टी*
- माहिती नाही मिळाली वस्तुस्थिती समोर आली आहे खडसेंच्या जावयाने रेव पार्टी आयोजित केली होती
- प्रत्येक गोष्टीकडे राजकीय दृष्ट्या बघता येत नाही
- त्यांनीच ती रूम बुक केली आहे
ते स्वतः त्या मित्रांसोबत गेले होते
त्या ठिकाणी मुली देखील आढळून आले आहेत
- अल्कोहोल आणि ड्रग्स याचे देखील
रिपोर्ट समोर येतील.
- खडसेंच्या जावयाला रूम बुक करायला कुठलाही सत्ताधारी नेत्याने सांगितलं नाही
- जावयांचे उद्योग काय परिवारातल्या लोकांचे उद्योग काय याकडे खडसेंनी बघितलं पाहिजे
- ड्रग्स च्या व्यवसायामध्ये ते देखील आहेत का अशी भीती आम्हाला वाटू लागली
- तिथे ज्या मुली होत्या त्यांच्यावर काही लैंगिक अत्याचार झाले आहेत का हे देखील तपासलं पाहिजे
- दिवसभर कार्यक्रमात असल्यामुळे त्याची मी सविस्तर माहिती घेतलेली नाही मात्र याची सविस्तर माहिती घेऊन मी पत्रकार परिषद घेणार .
14
Report
NMNITESH MAHAJAN
FollowJul 27, 2025 11:05:48Jalna, Maharashtra:
FEED NAME | 2707ZT_JALNA_CROP_WKT(2 FILES)
जालना | जिल्ह्यातील हजारो हेक्टरवरील पिकं पाण्याखाली
सोयाबीन,कपाशी,मका पिकांना फटका बसण्याचा अंदाज
पिकांच्या खोडापर्यंत पाणी साचल्यानं पिकं सडण्याची भीती,(वाक थ्रू)
अँकर : जालना जिल्ह्यात सर्वदूर मुसळधार पाऊस झालाय.या पावसामुळे जिल्ह्यातील हजारो हेक्टरवरील पिकं पाण्याखाली गेलीयत.सततच्या पावसामुळे सोयाबीन, मका आणि कपाशी बरोबरच खरीप पिकांमध्ये पावसाचं पाणी साचलंय.सलग 5 ते 6 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसा मुळे पिकांच्या खोडापर्यंत पाणी साचल्यानं ही पिकं सडण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये आहे आणि जालन्यातील पिकांच्या सद्यस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नितेश महाजन यांनी.
वाक थ्रू : नितेश महाजन,प्रतिनिधी, जालना
14
Report