Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nagpur440001
नागपुरात दहीहंडी उत्सव: गोविंदांचा जल्लोष आणि धडाक्यात साजरा!
AKAMAR KANE
Aug 16, 2025 02:32:10
Nagpur, Maharashtra
Ngp Dahihandi celebration live u ने फीड पाठवले ------- राज्याची उपराजधानी नागपुरातही दहीहंडीचा उत्सव रात्रीपासूनच धडाक्यात साजरा करण्यात येतोयं... ब डकस चौक मित्र मंडळातर्फे आयोजित दहीहंडी उत्सवात शेकडो गोविंदानी सहभाग घेतला.... पाच गोविंद पथकांमध्ये दहीहंडी फोडण्याकरता चूरस होती..
12
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
VBVAIBHAV BALKUNDE
Aug 16, 2025 04:46:40
Latur, Maharashtra:
लातूर ब्रेकिंग न्यूज.... AC ::- तेरणा प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे प्रकल्प शंभर टक्के भरले आहे. पाणीपातळी नियंत्रित करण्याच्या दृष्टीने तेरणा धरणावरील दहा दरवाजे प्रत्येकी दहा सेंटीमीटरने उघडण्यात आले आहेत. या माध्यमातून निम्न तेरणा नदीपात्रात तीन हजार आठशे सहा क्यूसेक्स इतका पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर लातूर जिल्ह्यातील औसा आणि निलंगा तालुक्यातील तेरणा नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नदीकाठच्या शेतकऱ्यांनी आपली जनावरे आणि शेतीमाल तातडीने सुरक्षित ठिकाणी हलवावेत, असे प्रशासनाकडून आवाहन करण्यात आलं आहे. दरम्यान, मांजरा नदीला ही पूर आल्याने नदी दुथडी भरून वाहत आहे. नागरिकांनी अनावश्यकपणे नदीकाठावर गर्दी करू नये, अशा सूचना प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
0
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Aug 16, 2025 04:46:33
Beed, Maharashtra:
बीड: बीड जिल्ह्यात पावसाचा हाहाकार;शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान, शेतामध्ये तलावात स्वरूप Anc : बीड जिल्ह्यात दोन दिवसांपासून मुसळधार पावसाने अक्षरशः पावसाने थैमान घातले आहे.. बीडच्या माजलगाव तालुक्यातील कोथाळा,साळेगाव,मोगरा, गावासह परिसरातील तब्बल पंधरा गावात अतिवृष्टी सदृश्य पाऊस झाला आहे. मध्यरात्री झालेल्या पावसाने शेताला तळ्याचे स्वरुप आले आहे. परिसरातील शेकडो एकरवरील पिके पाण्याखाली गेले आहेत. तर अनेक नद्या ओसंडून वाहत आहेत..जिल्ह्यातील सर्वच प्रकल्प भरून वाहतायेत. नदीच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने माजलगाव तालुक्यातील चार गावांचा संपर्क तुटला आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
0
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Aug 16, 2025 04:46:01
Amravati, Maharashtra:
Feed slug :- AMT_BANK_ATTACK दोन फाईल आहे रिपोर्टर :– अनिरुद्ध दवाळे, अमरावती 9503131919 धक्कादायक अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर सायबर अटॅक; बँकेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी अकरा वाजता बोलावली संचालकांची तातडीची बैठक अँकर :– अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर सायबर अटॅक झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे. अमरावती तालुक्यातील बडनेरा आणि धामणगाव रेल्वे तालुक्यातील मंगरूळ दस्तगीर येथील शाखेवर हा सायबर अटॅक झाला आहे. जिल्हा बँकेच्या इतरही शाखा सायबर हल्लेखोरांच्या रडारवर असल्याचे पाहायला मिळत आहे. हल्लेखोरांनी बँकेच्या संगणक प्रणालीत प्रवेश करून विंडो होल्डरवर फाईल तयार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बँकेच्या नेटवर्कची हल्लेखोरांकडून माहिती मिळवल्याची भीती असून सायबर अटॅक झाल्यामुळे जिल्हा बँकेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी अकरा वाजता संचालकांची तातडीची बैठक बोलावली आहे.
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Aug 16, 2025 04:32:56
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:
Csn rain loss av Feed attached यात दोन व्हिडिओ पाणी साचलेले आहे उर्वरित व्हिडिओ पाणी ओसरलेले आहे एकाच जागेचे आहे छत्रपती संभाजी नगरच्या नारेगाव परिसरात काल रात्री मुसळधार पाऊस झाला संध्याकाळपासूनच पावसानं जोर धरला होता त्यामुळे परिसरात नाल्याच्या काठच्या घरांवर पाणी साचलं होतं बाजूलाच गॅरेज असल्याने काही गाड्या सुद्धा या पाण्यात बुडाल्या आणि त्यामुळे नुकसान झालं दरम्यान रात्रीतनं पाणी आता ओसरली आहे मात्र परिसरात बऱ्यापैकी नुकसान झाल्याचे दिसतय
2
comment0
Report
VBVAIBHAV BALKUNDE
Aug 16, 2025 04:31:43
Latur, Maharashtra:
लातूर ब्रेकिंग न्यूज... स्किप्ट ::- लातूरमध्ये बालविवाह रोखण्यात पोलिसांना यश.....सजग नागरिकाच्या वेळीच दिलेल्या माहितीमुळे हा बालविवाह थांबवण्यात यश....मुला-मुलींच्या पालकांना समज देत पोलीसांनी बजावल्या नोटीसा.... AC ::- लातूर शहरात होणारा एक बालविवाह पोलिसांनी वेळीच थांबवला आहे. कायद्याने बालविवाहाला सक्त मनाई असतानाही अजूनही काही ठिकाणी लपूनछपून अशा घटना घडत आहेत. पण यावेळी एका सजग नागरिकाच्या सतर्कतेमुळे आणि पोलिसांच्या तातडीच्या कारवाईमुळे एका निष्पाप मुलाचं आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून वाचलं आहे. एका नागरिकाने पोलीसांना शहरातील १२ नंबर परिसरात बालविवाह होत असल्याची माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. वेळेत हस्तक्षेप करत त्यांनी हा बालविवाह थांबवला. त्याचबरोबर मुला-मुलींच्या पालकांना समज देत नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. आता या प्रकरणात पालकांना बालकल्याण समितीसमोर हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
0
comment0
Report
PTPRATHAMESH TAWADE
Aug 16, 2025 04:30:49
Virar, Maharashtra:
Date-16august2024 rep-prathamesh tawade loc-virar slug-VIRAR HANDI feed send by 2c type-aV स्लग- विरार मध्ये सूर्योदय ग़ोविंदा पथकाकडून हंडी फोडून श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा अँकर- वसई विरार च्या शहरी भागांसह ग्रामीण भागात दहिहंडीचा मोठा ऊत्साह पाहायला मिळत आहे .. विरार पूर्वेच्या सुर्योदय गोविंदा पथकाच्या वतीने सालाबादप्रमाणे यंदाही मध्यरात्री गोविंदांना दुखापत होऊ नये यासाठी देवाकडे गाऱ्हाणे घालून १२ वाजता दहीहंडी फोडून श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा करण्यांत आला.. वसई विरार मध्ये काल संध्याकाळपासून पावसाचे सावट आहे.. या भर पावसात एकावर एक पाच थर रचून ही हंडी फोडण्यात आली…मधयरात्री हा थरार पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी पाहायला मिळाली…
0
comment0
Report
MNMAYUR NIKAM
Aug 16, 2025 04:16:12
Buldhana, Maharashtra:
सलग सुट्ट्यांमुळे संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी शेगावात मोठी गर्दी Anchor - श्रावण महिना, १५ ऑगस्ट आणि त्यानंतर आलेल्या सलग सुट्ट्यांमुळे विदर्भाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेगाव नगरीत भाविकांची प्रचंड गर्दी झाली आहे. श्री संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी राज्यभरातून मोठ्या संख्येने भाविक दाखल झाले आहेत. या गर्दीमुळे शेगावमधील सर्व भक्तनिवास आणि खासगी हॉटेल्स हाउसफुल झाल्याचं चित्र आहे .श्री गजानन महाराज संस्थानच्या वाहनतळावरही वाहनांची मोठी रांग लागली असून, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या गाड्यांनी हे वाहनतळ पूर्ण भरले आहे. सलग सुट्ट्यांमुळे भाविकांना महाराजांच्या दर्शनाचा लाभ घेण्याची संधी मिळाली आहे. यामुळेच शेगावातील वातावरण उत्साहाने भारले आहे. ही गर्दी लक्षात घेता, संस्थानच्या वतीने भाविकांच्या सोयीसाठी विशेष व्यवस्था करण्यात येत आहे.
4
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Aug 16, 2025 04:01:12
Solapur, Maharashtra:
सोलापूर ब्रेकिंग - जागतिक अवयवदान दिनानिमित्त जनजागृती फेरीत 3000 विद्यार्थ्यांचा सहभाग - जागतिक अवयव दिनानिमित्त सोलापुरात काढण्यात आली जनजागृती रॅली - जागतिक अवयवादानाच्या जनजागृती फेरीत 3000 विद्यार्थ्यांचा सहभाग - सोलापुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या वतीने आयोजन जनजागृती रॅलीचे आयोजन - दरम्यान अंगदान जीवनदान संजीवनी या जनजागृती महाभियानाचे देखील करण्यात आले उद्घाटन - अवयवदान निमित्त काढण्यात आलेल्या जनजागृती रॅलीत वैद्यकीय कॉलेजचे विद्यार्थी, विविध सामाजिक संस्था सहभागी
2
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Aug 16, 2025 04:01:07
Akola, Maharashtra:
Anchor : कृष्ण जन्माष्टमी उत्सवानिमित्त अकोला जिल्ह्यातील अकोट शहरात धार्मिक आणि सांस्कृतिक वातावरण पाहायला मिळाले. शहरातील श्रीकृष्ण मंदिर तिरंगी रोषणाईने उजळून निघाले असून, मंदिर परिसर आकर्षक विद्युत सजावटीमुळे देखणे भासत आहे..भगवान श्रीकृष्णाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. सकाळपासूनच महिलांनी व पुरुषांनी मंदिरात जाऊन दर्शन घेतले. श्रीकृष्ण जन्मोत्सवाचे औचित्य साधून भजन, कीर्तन, पूजाअर्चा यांसह विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते..रात्री मंदिराच्या तिरंगी रोषणाईचे आणि विद्युत सजावटीचे दर्शन घेण्यासाठी नागरिकांनीही मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.
7
comment0
Report
SNSWATI NAIK
Aug 16, 2025 04:00:58
Navi Mumbai, Maharashtra:
story slug - खान्देशवेर रेल्वे स्थानकात पाणी रेल्वे स्थानक मे पानी FTP slug - nm railway water logging shots- reporter- swati naik navi mumbai anchor- पनवेल मद्ये रात्रभर पडत असलेल्या पावसामुळे खान्देश्वर, रेल्वे स्थानक मद्ये पाणी साचले होते .सकाळी कामाला जाणाऱ्या चाकरमान्यांना या पाण्यातून वाट काढावी लागली आहे. gf- ================
4
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Aug 16, 2025 04:00:48
Jalna, Maharashtra:
FEED NAME : 1608ZT_NANDED_NO_ROAD(1 FILE) नांदेड : रस्त्याअभावी नागरिकांचा पाण्यातून बैलगाड्या घेऊन प्रवास,व्हिडियो व्हायरल अँकर : नांदेड जिल्हयातील लोहा तालुक्यातील गांधीनगर या वस्तीला ये-जा करण्यासाठी रस्ताच नाही.त्यामुळे ग्रामस्थांना ओढ्याच्या पुरातून मार्ग काढत गाव गाठावे लागते.स्थानिकांनी रस्त्याच्या मागणीसाठी अनेकदा आंदोलने केली. मात्र या वस्तीच्या रस्त्याकडे कुणीही लक्ष दिलेलं नाही... काल झालेल्या दमदार पावसानंतर या ग्रामस्थांनी ओढ्याच्या पाण्यातून बैलगाड्याच्या मदतीने प्रवास केलाय.. या घटनेचे व्हीडिओ बनवत स्वतः गावकऱ्यांनी प्रशासनाला पाठवले आहेत.. किमान आता तरी रस्त्याची सोय करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली...
3
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Aug 16, 2025 03:48:20
Jalna, Maharashtra:
FEED NAME : 1608ZT_JALNA_POLICE_BYTE(2 FILES) जालना : आंदोलकांनी महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या अंगावरही रॉकेल टाकलं,त्यामुळे बळाचा वापर केला,आंदोलकाच्या कंबरेत लाथ घालणाऱ्या उपविभागीय अधिकाऱ्याचा खुलासा अँकर : जालन्यात पंकजा मुंडे यांना निवेदन देण्याचा प्रयत्न करणाऱ्या आंदोलकाच्या कंबरेत लाथ घालणाऱ्या उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी अखेर खुलासा केला आहे.आंदोलकाने स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्यानं त्याला ताब्यात घेताना महिला पोलिसांच्या अंगावर देखील त्यांनी रॉकेल टाकलं त्यामुळे बळाचा वापर केल्याचं उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी म्हटलं आहे.पंकजा मुंडे जालना दौऱ्यावर असताना पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी एका आंदोलकाच्या कमरेत पाठीमागून येऊन लाथ घातली.हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर जालना पोलिसांविरोधात राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. बाईट : अनंत कुलकर्णी, उपविभागीय पोलीस अधिकारी, जालना
8
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Aug 16, 2025 03:48:13
Solapur, Maharashtra:
सोलापूर ब्रेकिंग - ट्रम्प हे आपल्या देशाला धमक्या देतायत, आपल्यावर बॉसिंग करतायत - खा. प्रणिती शिंदे प्रणिती शिंदे बाईट पॉईंटर्स --- ऑन मशाल रॅली -- एका गरीब व्यक्ती पासून श्रीमंतपर्यंत समान असलेला मतांचा अधिकार चोरला जातोय मतदानाची जेव्हा चोरी होते तेव्हा यापेक्षा मोठा धोका लोकशाहीला काय असू शकतो व्होट चोरीच्या विरोधात आम्ही मशाल मोर्चा काढतोय हा विषय पक्षाचा नाही, संपूर्ण देशाचा हा विषय आहे ही स्वतंत्र्यची दुसरी लढाई आहे, कोणीतरी तुमच्या हिस्सासाठी लढत आहे, त्या लढाईला तुमच्या पाठिंब्याची गरज आहे या देशात एवढी मोठी चळवळ खूप वर्षांनी निर्माण झाली आहे ही लढाई लढायला सर्वानी तयार व्हा, या देशाला हुकूमशाहीच्या विळख्यातून, लोकशाही जी एका हुकूमशाहने आपल्या मुट्ठीत घेतली आहे देशाला मुक्त करा ऑन निवडणूक आयोग -- निवडणूक आयोग कोणतेही स्पष्टीकरण देतं नाही, ते पूर्णपणे सरकारच्या बाजूने कामं करतायत स्वतः भाजपचे खासदर म्हणतायत इतके फेक व्होट वाढलेत म्हणून आम्ही म्हणतोय की 2024 ची निवडणूक void (रद्दबातल) करा , ते पण ते करत नाहीत चोरी लपवण्याचे प्रयत्न सुरूय पण आम्ही दूध का दूध पाणी का पाणी केलंय ऑन पालकमंत्री जयकुमार गोरे -- जयकुमार गोरे यांच्याकडून इतकी मोठी घोडचूक कशी होऊ शकते मला माहिती नाही सोलापूर हे चार हुतात्माचे शहर आहे, आम्हाला त्याचा स्वाभिमान आहे पालकमंत्री यांच्यासाठी कदाचीत इतिहास हा फक्त 2014 पासूनच सुरु झाला असावा हा देशाचा महाराष्ट्र आणि सोलापूरचा इतिहास आहे तुम्ही ज्या जिल्हाचा प्रतिनिधित्व करता त्याबद्दल संपूर्ण माहिती असायलाच हवी जाणीवपूर्वक त्यांनी उल्लेख टाळला का हे पाहावं लागेल ऑन टेकस्टाईल उद्योग -- अमेरिका वारंवार टेरिफ वाढवत आहे, हा देश जागतिक पातळीवर इतका कमकऊत कधीच झाला नाही या सर्वांना फक्त हे केंद्र सरकार जबाबदार आहे. या देशाचे पंतप्रधान मोदी याला जबाबदार आहेत ट्रम्प हे आपल्या देशाला धमक्या देतायत, आपल्यावर बॉसिंग करतायत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्याला उत्तर देखील द्यायला तयार नाहीत आपली परदेश नीती पूर्णपणे अपयशी झाली आहे विदेश नीती ही केवळ फोटोपुरते नसते बाईट : प्रणिती शिंदे, काँग्रेस खासदार
6
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Aug 16, 2025 03:46:38
Solapur, Maharashtra:
सोलापूर ब्रेकिंग - सोलापूर शहरातील आदीला नदीच्या पाण्याचा प्रवाह वाढला, वसंत विहार परिसरातील अनेक नागरिकांच्या दारापर्यंत पाणी - गेल्या आठ दिवसांपासून सोलापुरात सुरू असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी पुरजन्य परिस्थिती - सोलापूर शहर परिसरातून वाहणाऱ्या आदीला नदीच्या पाण्याचा प्रवाह वाढला - आदिल नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने शहरातील वसंत विहार राजे गणपती परिसरात अनेक नागरिकांच्या दारात पाणीच पाणी - पाण्याचा प्रवाह आणखी सुरूच राहिला तर अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरण्याच्या शक्यतेने नागरिक चिंतेत - सोलापूर जिल्ह्यात पावसाने काहीशी विश्रांती घेतली मात्र पाण्याचा ओघ कायम
5
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Aug 16, 2025 03:46:15
Yavatmal, Maharashtra:
Anchor : यवतमाळ च्या पुसद परिसरात सतत तीन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे बोरगडी येथील नाल्याला पूर आला. या पुराचे पाणी शेतात शिरल्याने संपूर्ण शेती जलमय झाली. तर उभे पीक मातीत आडवे झाले. सोयाबीन, कापूस, हळद, तूर ह्या पिकांना पुराच्या पाण्याने जमीनदोस्त केल्याने शेतकरी प्रचंड मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. प्रशासनाने झालेल्या नुकसानाचे पंचनामे करून ताबडतोब मदत द्यावी अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी केली आहे.
5
comment0
Report
Independence Day
Advertisement
Back to top