Back
कोल्हापुरात सर्किट बेंच उद्घाटन: 42 वर्षांची लढाई संपली!
PNPratap Naik1
Aug 17, 2025 12:01:43
Kolhapur, Maharashtra
Kop Circuit Bench Inauguration
Feed :- Live U & Link
Anc :- कोल्हापुरात मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंचचे उद्घाटन दिमाखात पार पडले. देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा संपन्न झाला... या कार्यक्रमाला मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आणि न्यायाधीश देखील उपस्थित होते..कोल्हापुरातील मेरी वेदर मैदानावर सहा जिल्ह्यातील वकील आणि जनतेसाठी कार्यक्रम होतोय...या कार्यक्रमात कशा पद्धतीने मार्गदर्शन केलं जातं याकडं सगळ्यांच लक्ष लागलं आहे..
या कार्यक्रमाला खासदार शाहू महाराज, पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्यासह 6 जिल्ह्यातील मंत्री आणि लोकप्रतिनिधी उपस्थित आहेत... गेल्या 42 वर्षांपासून कोल्हापूरमध्ये सर्किट बेंच व्हावे यासाठी लढा सुरू होता... अखेर याला यश मिळाल्याने कोल्हापूरसह सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यातील नागरिकांना याचा फायदा होणार आहे.
14
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
GDGAJANAN DESHMUKH
FollowAug 17, 2025 17:45:40Parbhani, Maharashtra:
अँकर- हिंगोली जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसानंतर नदी नाले ओढ्यांना पूर आलाय. सेनगाव तालुक्यातील घोरदरी परिसरातील ओढ्यात शेतकरी वाहून गेल्याची घटना घडलीय,धोंडीराम घोगरे असं पुराच्या पाण्यात वाहून गेल्या शेतकऱ्याचे नाव असून तो कसकाय वाहून गेला ते समजू शकले नाही. एनडीआरएफचे पथकाने पाहणी करून ते सापडले नाहीत...
14
Report
KJKunal Jamdade
FollowAug 17, 2025 17:15:20Shirdi, Maharashtra:
Sangmner News Flash
कीर्तनाच्या कार्यक्रमात गोंधळ.. महाराजांना धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न..
संगमनेर शहराजवळील घुलेवाडी गावातील घटना..
हरिनाम सप्ताह निमित्ताने दररोज सुरू असते कीर्तन..
राजगुरुनगर येथील संग्राम महाराज भंडारे यांना धक्काबुक्की..
कीर्तन सुरू असताना हिंदुत्वावर बोलत असल्याने कीर्तन रोखले..
चार जणांसह अज्ञात आठ जणांवर गुन्हा दाखल...
संगमनेर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल...
चारचाकी वाहनाचे देखील नुकसान केल्याचा फिर्यादीत उल्लेख...
गोंधळ झाल्यानंतर संग्राम महाराज कीर्तन अर्ध्यावर बंद पडले...
*काल रात्रीची घटना आज दुपारी गुन्हा दाखल झालाय*
( धक्काबुक्की करणारे स्थानिक असल्याची माहिती असून यात थोरात विरुद्ध खताळ असा राजकीय वादामुळे घटना घडली असल्याची शक्यता असल्याची माहिती )
14
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowAug 17, 2025 17:15:12Dhule, Maharashtra:
ANCHOR - नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी आपली नियुक्ती होणारा असल्याच परस्पर जाहीर करणाऱ्या मंत्री गिरीश महाजन यांच्या या दाव्याला शिवसेनेचे मंत्री दादा भुसे यांनी मुश्किल उत्तर दिलेला आहे. नको त्या विषयांना जास्त महत्त्व दिलं जातं, असं भुसे यांनी सांगत या विषयाची संपूर्ण हवाच काढली. पालकमंत्री पद मिळाल्यावरच विकास काम करता येतील असं नाही असं भुसेनी सांगत महाजनांना कोपरखळी मारली. पालकमंत्री कोण असेल याबाबत विषय पक्षश्रेष्ठी ठरवतील त्याप्रमाणे कामं होईल असं भुसे यांनी सांगितलं आहे. मंत्री दादा भुसेंना गिरीश महाजन यांच्या दाव्याबद्दल विचारले असता, सुरुवातीला भुसे यांनी मिश्किल हास्य देत, गिरीश महाजन यांच्या वक्तव्याचा घेतलेला समाचार चर्चेचा विषय ठरला. सभ्य भाषात दादा भुसे यांनी गिरीश महाजन यांच्या महत्त्वकांक्षाची टर उडवल्याची ही चर्चा यावेळी ऐकायला आली. नाशिकच्या पालकमंत्री पदावरून मंत्री गिरीश महाजन यांनी धुळ्यात केलेल्या दाव्यानंतर मंत्री दादा भुसे यांनी यावर मिश्किलपणे हसून उत्तर दिल्याने पालकमंत्री पदावरून कोल्ड वर सुरू असल्याचाही दिसून आला. नाशिकच्या पालकमंत्री पदा संदर्भात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जो निर्णय घेतील तो सर्वांना मान्य असेल, आम्ही नको त्या गोष्टींना जास्त महत्त्व देत असतो, असं सांगतील. 15 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी मला अमरावती येथे ध्वजारोहणाची जबाबदारी दिली आणि ती मी पार पाडली, असं भुसेनी सांगतील, मात्र या सर्व चर्चा दरम्यान नाशिकच्या पालकमंत्री पदाचा दावा शिवसेनेने कायम ठेवलेला आहे हे भुसे यांच्या या वक्तव्यावरनं दिसून आला.
byte - दादा भुसे मंत्री
प्रशांत परदेशी, धुळे.
14
Report
GMGANESH MOHALE
FollowAug 17, 2025 15:45:17Washim, Maharashtra:
वाशिम :
File:1708ZT_WSM_BENDADI_RIVER
रिपोर्टर:गणेश मोहळे,वाशिम
अँकर:वाशिमच्या मालेगाव तालुक्यात झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे नदी-नाल्यांना मोठा पूर आला आहे.रिधोरा– राजुरा मार्गावरील बेंदाडी नदीला पूर आल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे.अचानक आलेल्या पुरामुळे वाहनधारकांसह नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अतिवृष्टीमुळं सुकांडा,कुरुळा,राजुरा,डव्हा या गावातील खरीपाच्या पिकांना फटका बसला आहे.
14
Report
NMNITESH MAHAJAN
FollowAug 17, 2025 15:31:45Jalna, Maharashtra:
FEED NAME : 1708ZT_JALNA_ACCIDENT(9 FILES)
जालना : मालवाहू ट्रकची अँपे रिक्षाला धडक
भीषण अपघात तिघांचा जागीच मृत्यू
दुर्दैवी घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त...
अँकर :जालन्यात मालवाहू ट्रकने ॲपे रिक्षाला धडक दिल्याने भीषण अपघात झालाय.या अपघातात रिक्षातून प्रवास करणारे 3 जण जागीच ठार झाले आहेत.आज संध्याकाळच्या सुमारास जालना - राजूर रोडवरील राजुर चौफुली भागात ही घटना अपघात घडलीय. 33 वर्षीय भरत खोसे,
34 वर्षीय गणेश बोरसे आणि 36 वर्षीय सुनिता वैद्य अशी मयतांची नावं आहेत. मयत तिघे जण हे ॲपे रिक्षा ने जालन्याहून बदनापूर तालुक्यातील मांडवा गावाकडे निघाले होते. यादरम्यान राजुर रोडवर सुर्या लाॕन्स जवळ त्यांच्या ॲपे रिक्षाला मालवाहू ट्रकने जोराने धडक दिली. या धडकेत ॲपे रिक्षा मधील तिघे जण गंभीर जखमी झाल्यानं त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर मालवाहू ट्रकचालक घटनास्थळावरून पसार झाला. या अपघाताची माहिती स्थानिकांनी तातडीने चंदनझिरा पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच चंदनझिरा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा करून मयतांचे मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात उत्तरीय तपासासाठी पाठवले.तर मालवाहू ट्रक ताब्यात घेऊन रस्त्यावरील वाहतूक सुरळीत केली. तसेच या घटनेनंतर फरार झालेल्या ट्रक चालकालाही पोलिसांनी पाठलाग करून ताब्यात घेत ट्रक जप्त केलाय.
बाईट : पुंजाराम टेकाळे,प्रत्यक्षदर्शी
14
Report
JMJAVED MULANI
FollowAug 17, 2025 15:00:45Baramati, Maharashtra:
JAVEDMULANI
SLUG 1708ZT_BARAMATIRAM
BYTE 1
अजित पवार ते वक्तव्य करून मला टॉर्चर करण्याचा प्रयत्न करतायेत; राम शिंदेंचा अजित पवारांवर आरोप
बारामतीत राम शिंदे यांचा दौरा...
Anchor : काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रोहित पवार यांना उद्देशून भावकीचा विचार केला नसता तर रोहित तू आमदार झाला नसतास असं वक्तव्य केलं, यावरून आता भाजपचे नेते विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी अजित पवारांवर निशाणा साधलाय..अजित पवार ते वक्तव्य करून सातत्याने मला टॉर्चर करण्याचा प्रयत्न करत आहेत..त्यामुळे याबाबतीत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी याबाबत योग्य तो निर्णय घ्यावा.. अजित पवार हे वक्तव्य सातत्याने पुन्हा पुन्हा करून शिळ्या कडीला उत का आणतायेत ? असा सवाल राम शिंदे यांनी बारामतीत आल्यानंतर माध्यमांशी बोलताना उपस्थित केलाय..
बाईट : राम शिंदे ( विधान परिषद सभापती )
14
Report
SRSHRIKANT RAUT
FollowAug 17, 2025 14:03:07Yavatmal, Maharashtra:
AVB
हरितक्रांतीचे प्रणेते व माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा ४६ वा स्मृतिदिन पुसद येथे सोमवारी यवतमाळ च्या पुसद येथे आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राहतील. कृषिमंत्री दत्तात्रय भरणे प्रमुख अतिथी आहेत. राज्यमंत्री इंद्रनील नाईक या सोहळ्याचे स्वागताध्यक्ष आहेत.
या कार्यक्रमात वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठान पुसदच्या वतीने महाराष्ट्रातील प्रयोगशील तेरा शेतकरी व कृषी शास्त्रज्ञांना वसंतराव नाईक कृषी गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत मंत्री इंद्रनील नाईक
बाईट : इंद्रनील नाईक : मंत्री
15
Report
SNSWATI NAIK
FollowAug 17, 2025 14:02:54Navi Mumbai, Maharashtra:
story slug - पनवेल मद्ये घरामद्ये शॉर्ट सर्कीट मुळे आग
पनवेल मे घर मे आग
FTP slug - nm panvel fire
shots - video
reporter - swati naik
navi mumbai
पनवेल ब्रेकींग
पनवेल वडाळा तलाव जवळील नंदनवन इमारती मद्ये आग
इमारती च्या तिसऱ्या मजल्यावर फ्लॅट मद्ये शॉर्ट सर्कीत मुळे लागली आग
घरातील सदस्य वेळीच बाहेर पडल्याने दुर्घटना टळली
अग्नीमशमन दलाने घटना स्थळी जात आग विझवली
14
Report
SNSWATI NAIK
FollowAug 17, 2025 13:48:11Navi Mumbai, Maharashtra:
Story slug -नवी मुंबई मद्ये पावसामुळे विद्युत खांब कोसळला
नवी मुंबई मे बारीश के कारण लाईट का पोल गीर गया
FTP slug - nm street light pole
Shote- street light
Reporter- swati naik
Navi mumbai
Anchor - नवी मुंबई तीलमहापे एमआयडीसी परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे सर्व्हिस रोडवर लावलेला विद्युत दिवा अचानक कोसळून रस्त्यावर पडला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र या दिव्याच्या विद्युत तारा र रस्त्यावर उघड्याच पडून आहेत. त्यामुळे परिसरात वावरणाऱ्या नागरिकांना विद्युत धक्क्याचा मोठा धोका निर्माण झाला होता,विशेष म्हणजे, या दिव्याच्या खांबावर नवी मुंबई महानगरपालिका व नवी मुंबई पोलीस विभागाचे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले होते. हे कॅमेरे देखील खांबासोबत रस्त्यावर कोसळले होते।
Gf-
14
Report
LBLAILESH BARGAJE
FollowAug 17, 2025 13:47:53Pune, Maharashtra:
रिपोर्टर:- लैलेश बारगजे
स्लग:- रस्ता नसल्याने सरपंचाच्या गाडीवर विद्यार्थ्यांनी फेकला चिखल
फीड 2C
Anc:-
शाळेला जायला रस्ता नसल्याने चिखलातून जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी चक्क सरपंचाच्या गाडीवर चिखल फेक करत रस्त्याची मागणी केली आहे अहिल्यानगरच्या शेवगाव येथील नवीन दहिफळ गावातील महिला सरपंच सविता बाळासाहेब शिंदे यांच्या चारचाकी गाडीवर शालेय विद्यार्थ्यांनी चिखल फेकल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. गावातील विद्यार्थ्यांना पावसाळ्यात शाळेकडे जाण्यासाठी रस्ताच नसल्यामुळे अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. दोन किलोमीटर अंतरावर असलेली शाळा आणि शाळेकडे जाणारा कच्चा रस्ता पावसाळ्यात रस्त्यावर होणारा चिखल यामुळे वैतागलेल्या विद्यार्थ्यांनी थेट रस्त्यावरून जाणाऱ्या सरपंचाच्या गाडीला चिखल फेकून राग व्यक्त केला आहे. विद्यार्थ्यांनाच नाही तर ग्रामस्थांना देखील पावसाळ्यामध्ये गावातून जाणारा रस्ता नसल्यामुळे मोठी हाल होतात. शेतीची कामे करण्यासाठी या रस्त्यावरून जाताना मोठी कसरत करावी लागते. अनवाणी या चिखल तुडवत अनवाणी जावं लागतं. सरपंचांनी देखील विद्यार्थ्यासह ग्रामस्थांना हा रस्ता पक्का करण्याचं आश्वासन दिल मात्र अनेक वेळा पाठपुरावा करून देखील शासन आणि प्रशासनाकडून दुर्लक्ष झाल्याचं सरपंचांनी म्हटल आहे. त्यामुळे लवकरात लवकर रस्ता व्हावा अशी मागणी विद्यार्थ्यांनी आणि ग्रामस्थांनी केली आहे
बाईट:- सविता शिंदे सरपंच
बाईट:- तारामती बेडके नागरिक
बाईट:- विद्यार्थी
14
Report
MAMILIND ANDE
FollowAug 17, 2025 13:47:46Wardha, Maharashtra:
वर्धा
SLUG- 1708_WARDHA_BANJARA
- वर्ध्यात बंजारा समाजाचा तिज उत्सव
- महिला - पुरुषांनी काढलीय मिरवणूक
- पारंपारिक वेशभूषेत महिलांनी धरला फेर
अँकर – वर्धा जिल्ह्यात बंजारा समाजाच्या वतीन पारंपारिक तिज उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. तिज उत्सवानिमित्त महिलांनी खास पारंपरिक वेशभूषा परिधान केली होती. रंगीबेरंगी पारंपरिक ड्रेसमध्ये सजलेल्या महिलांनी समूहाने फेर धरत पारंपरिक गाणी गात नृत्य केलं. यावेळी पुरुषांचाही उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. उत्सवाच्या निमित्ताने शहरातून एक भव्य मिरवणूक काढण्यात आली. ढोल-ताशांच्या गजरात नाचत-गात ही मिरवणूक पवनार इथल्या नदीवर जाऊन समारोप करण्यात आली. या सोहळ्याने परिसरात आनंदाची लाट पसरली होती.
14
Report
JJJAYESH JAGAD
FollowAug 17, 2025 13:16:36Akola, Maharashtra:
Anchor : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी उपस्थित केलेल्या वोट चोरीच्या मुद्द्याचं आम्ही स्वागत करतो, असं स्पष्ट वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी अकोल्यात केलं आहे. निवडणूक आयोग लोकशाहीचा खून करत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी यावेळी केला.येणाऱ्या १५ ऑगस्टला मासांवर बंदी येणार असल्याच म्हणत आव्हाडांनी सरकारवर जोरदार टीका केली. देश आधी वाटला, भाषा वाटली आता खाद्यपदार्थही वाटणार का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. आम्ही हिंदू आहोत पण सनातनी नाही, अशा शब्दांत आव्हाडांनी सरकारवर हल्लाबोल केला..यासोबतच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लवकरच सुरू करणार असलेल्या योजनांवरही त्यांनी टिका केली. लाडका नातू, लाडकी सासू, लाडका सासरा अशा योजना सुद्धा राज्य सरकारने आणाव्यात, अशी उपरोधिक टीका आव्हाडांनी केली.मंडळ यात्रेच्या निमित्ताने अकोल्यात आयोजित पत्रकार परिषदेत आव्हाड बोलत होते.आंदोलकांवर सिने स्टाईल लात मारणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याला बॉलिवूड मध्ये फायटर म्हणून घ्यावा म्हणत या घटनेचा त्यांनी विरोध केलाय..
Byte : जितेंद्र आव्हाड , राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष , नेते
14
Report
NMNITESH MAHAJAN
FollowAug 17, 2025 13:01:41Jalna, Maharashtra:
FEED NAME : 1708ZT_JALNA_ROAD_WATER(2 FILES)
जालना :भोकरदन- जाफराबाद रोडवर गुडघाभर पाणी साचलं
भोकरदन तालुक्यात मुसळधार पाऊस
पाण्यातून वाहनधारकांना शोधावी लागते वाट
अँकर: जालना जिल्ह्यातल्या भोकरदन ते जाफराबाद रोडवर एक किलोमीटरर्यंत पाणी साचल्याचं बघायला मिळातय.भोकरदन तालुक्यात मुसळधार पावसाने हजेरी लावलीये.. मात्र भोकरदन ते जाफराबाद रोडवरील आन्वा फाट्यावर गुडघाभर पाणी साचल्याचं बघायला मिळालंय..त्यामुळं कंत्राटदाराने चुकीच्या पद्धतीने रस्ता केला असून पाण्याचा मार्ग काढून दिलेला नाहीये..त्यामुळं गुडघाभर पाण्यातून वाहनधारकांना वाट शोधावी लागत आहे.
14
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowAug 17, 2025 12:48:52Hingoli, Maharashtra:
अँकर- इसापूर धरण पूर्ण क्षमतेने भरल असून धरणाच्या पाणलोट क्षेत्रामधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा येवा सुरू असल्याने ईसापुर धरणाचे 13 दरवाजे उघडण्यात आले आहेत. या 13 दरवाजा मधून 54 हजार 466 क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग पैनगंगा नदी पात्रात केला जात आहे. यामुळे पैंनगंगा नदी धोक्याच्या पातळीने वाहत आहे, माळेगाव शेंबाळपिंपरी पुसद हा राज्यमहामार्ग तीस तासापासून बंद पडलाय,अनेक गाव परिसरात पैनगंगेचे पाणी शिरल आहे. पाण्याचा येवा असाच राहिल्यास पाण्याचा विसर्ग वाढविला जाणार आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा ईशारा देण्यात आलाय. या धरणातून सोडलेल्या पाण्याची धडकी भरवणारे दृश्य ड्रोन कॅमेर्यात कैद करण्यात आली आहेत.
14
Report
JJJAYESH JAGAD
FollowAug 17, 2025 12:32:52Akola, Maharashtra:
Anchor : अकोला जिल्ह्यातील मुर्तिजापूर रेल्वे स्थानकावर तब्बल दोन तास वंदे भारत एक्सप्रेस खोळंबल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागलाय.
मुंबई -नागपूर या प्रमुख लोहमार्गावरील मुर्तिजापूर रेल्वे स्थानकावर नव्याने सुरू झालेली नागपूर -पुणे वंदे भारत एक्सप्रेस तब्बल दोन तास खोळंबल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागलाय. मुर्तिजापूर ते बोरगाव रेल्वे स्थानकादरम्यान पोल क्रमांक ५९९/१२ नजिक एका मालगाडीचे कप्लिंग तुटल्याने नागपूर ते भुसावळ या अप मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली होती. मात्र मालगाडीच्या लोको पायलट च्या प्रसंगधावणाने या घटनेत मोठा अनर्थ टळला तर या मुळे वंदे भारत एक्सप्रेस मूर्तिजापूर स्थानकावर दोन तास खोळंबली तर यामुळे मार्गावरील इतरही गाड्या खोळंबल्याचे सांगितल्या जात आहे..घटनेची माहिती मिळताच रेल्वे प्रशासनाच्या वतीने युद्ध पातळीवर दुरुस्तीचे काम करून अकोल्याच्या दिशेने मालगाडी हलवण्यात आले. यानंतर वंदे भारत एक्सप्रेस गाडीला पुण्याच्या दिशेने रवाना करण्यात आले..
14
Report